Skip to main content

पीप शो

वास्तवाच्या शक्यता
काहीतरी पूसट
स्मृतीशिवाय
भावना अशक्य

तिरशिंगराव Sat, 21/02/2015 - 13:37

'पीप शो'

फटीतून बघताना अचानक,
दिवा मालवल्यामुळे
स्मृतीभ्रंश झाल्याने
पुढचे वर्णन अशक्य

वृन्दा Mon, 23/02/2015 - 19:08

फालतू - सायकिअ‍ॅट्रिस्टला दाखवा काहीतरी केमिकल लोचा आहे.
त्याशिवाय इतक्या भिकार कविता प्रसविता येणारच नाहीत.

धनंजय Mon, 23/02/2015 - 20:17

तत्त्वज्ञानाचे सांगाडे जसेच्या तसे सांगून कलाकृती बनवली, तर मला व्यक्तिशः ती आवडत नाही.

कारण खरोखर सामान्य वैश्विक तत्त्वे सांगायला जावे, तर ती अगदी थोडक्यात सांगता येत नाही - त्यांना सांगताना अतिसुलभीकरण होते, आणि त्यामुळे अपवादच अपवाद समोर येतात.

त्यापेक्षा कलाकृतीत एखादे तथ्य, घटना, व्यक्ती, भावना, तळमळ, मनःशांतीचा क्षण, वगैरे जिवंत होऊन आस्वादकाला समजली, तर वेगळे. त्याद्वारे तेच तत्त्वज्ञान अगदी आपणहून सुचल्यासारखे आस्वादकात उमलण्याची किमया कलाकाराला जमली, तर आणखी मजा येते.

वरील चारोळीत तर स्मृती, भावना, वास्तवाची जाण, वगैरे तत्त्वे नुसतीच ओकीबोकी* गुंफून वाक्य बनवले आहे.

*ओकेबोके, म्हणजे "ओकेबोकेपणाचे वास्तव जिवंतपणे वाचकाला जाणवेल" अशी रचना मला तरी गमली नाही. रचनेत जीवनाचा भकासपणा जाणवत नाही**.
**"They are not laughing WITH you, they are laughing AT you"च्या धर्तीवर "They are not feeling the sense of vacuousness WITH you; they have a sense of YOUR vacuousness." असे होता कामा नये.

----
असो. कोणाला काही आवडते, कोणाला आवडत नाही. परंतु या सदस्याच्या अनेक रचना वाचल्या, आणि शेवटी माझे हे मत व्यक्त करावेसे वाटले.

अजो१२३ Wed, 25/02/2015 - 11:54

In reply to by धनंजय

तत्त्वज्ञानाचे सांगाडे जसेच्या तसे सांगून कलाकृती बनवली, तर मला व्यक्तिशः ती आवडत नाही.

कारण खरोखर सामान्य वैश्विक तत्त्वे सांगायला जावे, तर ती अगदी थोडक्यात सांगता येत नाही - त्यांना सांगताना अतिसुलभीकरण होते, आणि त्यामुळे अपवादच अपवाद समोर येतात.

धनंजय, हे आपल्याकडून या कवितेचं जे रसग्रहण (रस इन नॅनोग्राम्स) झालं आहे त्याच्या अनुषंगांनं लिहिलं आहे का? यात काय वैश्विक तत्त्व दिसलं? कोणता सांगाडा? कोणता अपवाद समोर आला?

धनंजय Thu, 26/02/2015 - 00:24

In reply to by अजो१२३

:-) (नॅनोग्रॅम्स)

वरील कविता म्हणजे तत्त्वज्ञानातील पुस्तकातील मधल्यास एखाददोन वाक्यांचे उद्धरण वाटते. मधील दोनतीन शब्द अध्याहृत म्हणून गाळून मग चारोळीसारखे लिहिलेले आहे.

"वास्तवाच्या शक्यता काहीशा पुसट असतात. म्हणूनच स्मृतीशिवाय भावना अशक्य असतात.

आता ही वाक्ये कुठे लागू करायची त्याचा संदर्भ या एकदोन वाक्यांत दिसत नाही. "बेनिफिट ऑफ डाऊट" म्हणून संदर्भ देऊन कदाचित मला वरील वाक्ये सार्थ करता येतील. परंतु ते नसते ओझे माझ्यावरती कशाला?

त्यामुळे मी माझा त्यातल्या त्यात हल्लीचा अनुभव घेऊ शकतो, उदाहरणार्थ :
परवा चालताना माझ्या पायाला ठेच लागली. थोडेसे हुळहुळल्यासारखे झाले. मी खाली बघितले तर वाटेत पायाशी थोडा उंचवटा होता. मग मी त्याच्यावरून पाय उचलून पुढे गेलो.
आता "पायाला ठेच लागणारा उंचवटा पायाशी होता" या रोखठोक वास्तवात उगाच "वास्तवाच्या शक्यता पुसट आहेत" हा विचार करायची गरज काय? मला पूर्वी लागलेल्या ठेचांची स्मृती आहे, अथवा पूर्वी हाच उंचवटा बघितल्याची स्मृती होती, म्हणून मला वास्तव समजले, आणि त्याबाबत हुळहुळल्याची भावना मनात येऊ शकली... असा गुंतागुंतीचा विचार अनाठायी वाटतो.

असे तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात असते, तर या वाक्याच्या मागेपुढे संदर्भ असता - अमुक अशा परिस्थितीत हे तत्त्व वापरायचे आहे. तमुक प्रकारची परिस्थिती या विषयाच्या बाहेर आहे, वगैरे. ते रुक्ष असते, पण विचार पटण्या-न-पटण्याकरिता अधिक साधनसामग्री तिथे असते.

आता कवीने असे एका वाक्यात तत्त्व न सांगता एखादा अनुभव सांगितला असता, समजा. आणि चांगल्या प्रकारे भावेल असा सांगितला असता, म्हणा. तर बात वेगळी होती. कवीच्या त्या जिवंत अनुभवाच्या बाबतीत मी पटलो असतो : "हो, खरेच, या अनुभवात खरे काय ते कळतच नाही. मग कवीने अनुभव वर्णन करून मला भावनांबाबत पटवले असते : स्मृतींमुळे भावना जागृत झाल्या. तेही मला पटले असते. तो कवीचा अनुभव असता, तत्त्व म्हणून काही सांगितलेले नसते. त्यामुळे "या तत्त्वाकरिता विषय कुठला, विषयाबाहेरचे मुद्दे कुठले" हा विचारही मनात आला नसता. कविता अगदीच भावली, तर मी त्या बाबत अधिक विचार करत राहिलो असतो. माझ्या स्वतःच्या अनुभवांत असे अनुभव आले असतील, त्याबाबत विचार करू लागलो असतो. माझ्या अनुभवात कदाचित "वास्तव नीट कळत नाही" असे झाले असेल. मग त्यांतही स्मृतींमुळे भावुक झालो असे अनुभव मी धुंडाळू लागलो असतो. आणि जो अनुभव कवीने सुंदररीत्या सांगितला, त्याला माझ्या वैयक्तिक अनुभवाची जोड मी दिली असती. आणि कवीचा अनुभव आणि माझे वैयक्तिक अनुभव यांना जोडून आपोआप अस्फुटपणे तत्त्व वापरण्याचे क्षेत्र मला जाणवले असते. आणि त्या क्षेत्रामध्ये ते तत्त्व आपोआप उमजून पटलेही असते.

परंतु असे उघडेनागडे तत्त्व सांगितल्यामुळे माझ्यात कुठलेही सुंदर विचारचक्र फिरले नाही. ते तत्त्व पटलेही नाही.

----

काव्य-कलाकृतींबाबत वरील सर्व अपेक्षा या माझ्या वैयक्तिक आहेत. अन्य लोकांची आवड आणि कवीचा हेतू वेगळा असेल तर ठीकच - हा खुलासा मी वर दिलेलाच आहे.

अजो१२३ Fri, 27/02/2015 - 11:59

In reply to by धनंजय

खूप खूप छान समजावून सांगीतलं आहे. अक्षरशः इतका कॉम्प्लिकेटेड मॅटर कळला. नाहीतर एरवी इटरकवि किंवा इंटरकाव्यवाचक संवाद डोक्यावरून जातात. काव्य किंवा तत्त्वज्यान विषयांशी फारसा काही संबंध नसलेल्या लोकांना देखिल सगळं कळावं इतकं स्पष्टीकरण दिल्याबद्दल आभार.
------------
कविने काहीतरी अनुभव आणि काहीतरी स्मृती नि त्या भावना जागवतात , नाही याची काहीतरी उदाहरणं द्यायला हवी होती.