भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ | १७
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
===
ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मोठ्या आरोग्य संशोधन संस्थेने होमिओपॅथी माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी असण्याचा निर्वाळा दिला आहे. ऑस्ट्रेलियात आरोग्यविम्यावर खर्च केलेल्या रकमेवर 30% आयकर सवलत मिळते. या खर्चात complementary therapies वर केलेल्या खर्चाचा समावेश करावा का नाही, या निर्णयावर संशोधन संस्थेच्या निर्णयाचा फरक पडेल असं बातमी म्हणते.
wait
आत्ता दुवा हाताशी नाहिये. पण आजच्याच TOI मध्ये का express मध्ये होमिपथीला youngest and most effective असं काहीतरी म्हणणारा मथळा दिसला. माझ्या प्राधान्याच्या विषयातली बातमी न वाटल्याने मी ते बायपास करुन पुढे वाचू लागलो. दुवा सापडला की डकवतो.
>>ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात
>>ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात मोठ्या आरोग्य संशोधन संस्थेने होमिओपॅथी माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने निरुपयोगी असण्याचा निर्वाळा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने हा निर्वाळा होमेपदी डॉक्टरांच्या मागणीवरून यापूर्वीच दिला आहे. इथेतरी महाराष्ट्र शासन ऑष्ट्रेलियाच्या फुडे आहे. ;)
फोटोचोरुनका
जालावर टाकलेले फोटो चोरी होण्याची शक्यता असतेच, स्टॉपस्टीलिंगफोटोज् हि वेबसाइट अशाच चोरांची माहिती सगळ्यांसमोर ठेवते. बघा तुमचे फोटो तर कोणी चोरले नाहित न?
ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात
ऑस्ट्रेलिया देश इतकी वर्षे होमिओपथीला उपयोगी मानत होता ही धक्कादायक बातमी आहे.
इथे होमिओपथीच्या
इथे होमिओपथीच्या उपयुक्ततेपेक्षा सरकारने, अधिकृतरित्या नाकारणं महत्त्वाचं वाटलं. तुम्हाला घ्यायचं तर ती "औषधं" घ्या पण त्या खर्चावर करसवलत मिळणार नाही. खरोखर किती ऑस्ट्रेलियन होमिओपथीची "औषधं" घेत होते आणि किती लोकांवर या निर्णयाचा फरक पडेल याबद्दल शंका आहे.
ते मान्यच आहे.. लेकिन .. इसका
ते मान्यच आहे.. लेकिन ..
इसका गम है के बहोत देर में बरबाद किया...
सहानंतर 'कोण तु?'
एकदा का ऑफिस मधुन बाहेर पडला कि फ्रेंच त्याच्या बॉसच्या बापाचं पण ऐकणार नाही, हा कायदा आणायचं वचन दिलं तर 'मोदींना' पंतप्रधान करणार का?
जर "कमाल अधिकृत कार्यकाळ"
जर "कमाल अधिकृत कार्यकाळ" खाजगी क्षेत्राला लागु व बंधनकारक केला तर पुढिल निवडणुकीत भाजपाला मत देण्याचा खरंच विचार करावा लागेल. :)
खाजगी क्षेत्राला कोणतेही या
खाजगी क्षेत्राला कोणतेही या प्रकारातले नियम (सुट्टी, कामाचे तास, कामाचे दिवस, कामाचे प्रमाण आदि) लागू करुनही उपयोग नाही, कारण खाजगी क्षेत्रात कोणी कर्मचारी या कारणास्तव कायद्याचा बडगा उभारु इच्छितच नाही.
सध्याही अनेक कायदे लागू आहेत. उदा. २६ जाने / १५ ऑगस्ट / २ ऑक्टोबर / इलेक्शन या दिवशी सुट्टी देणे कायद्याने बंधनकारक आहे, पण अनेक खाजगी कंपन्या या दिवशी पूर्ववेळ / अर्धवेळ काम लावतातच. अशा वेळी कायद्याने कंपनीविरोधी तक्रार करणे म्हणजे स्वतःची गच्छंती करुन घेण्यासारखे आहे. कोण वैर घेणार कंपनीशी?
सरकारी नोकरीला असे नियम लावण्याची गरजच नाही कारण तिथे खरोखर कोणाला कशाची पडलीय ? कोणीही कधीही या, कधीही जा.. कितीही रजा घ्या..
.. कं.ज.ना.
खाजगी क्षेत्राला कोणतेही या
खाजगी क्षेत्राला कोणतेही या प्रकारातले नियम (सुट्टी, कामाचे तास, कामाचे दिवस, कामाचे प्रमाण आदि) लागू करुनही उपयोग नाही, कारण खाजगी क्षेत्रात कोणी कर्मचारी या कारणास्तव कायद्याचा बडगा उभारु इच्छितच नाही.
अतिमार्मिक. टाळ्या. :D> :D> :D>
अनेक खाजगी कंपन्या कायदा
अनेक खाजगी कंपन्या कायदा वगैरे तर राहूदेच.. युनियन शब्दातला यू जरी कोणाच्या तोंडून बाहेर पडला तरी त्याला नारळ देतात. चार कर्मचारी एकत्र येऊन काही थोडाजरी संघर्ष करु पाहात असतील तर तातडीने ते संघटन तोडतात.
एकेकट्याने तात्विक लढा देण्यापेक्षा खाजगी नोकरीतल्या कर्मचार्याला महिनाअखेरी येणारा पगार महत्वाचा वाटतो असतो.
काही कायदे / नियम हे पाळले जाण्याची जबाबदारी अंतिम लाभार्थीवर न टाकता ते नियमन करणार्या अथॉरिटीने घेतली तरच ते लागू पडतात.
सिग्नल तोडला की थेट हवालदार पकडतो. त्यासाठी अन्य कोणा नागरिकाने तक्रार करावी लागत नाही. हवालदाराचे लक्ष असते.
तसेच खाजगी कंपन्यात सुटीच्या दिवशी कोणी सरकारी नियामक मंडळाचा अधिकारी चक्कर टाकून कारवाई करत असेल तरच असल्या नियमांना अर्थ आहे.
>>सिग्नल तोडला की थेट हवालदार
>>सिग्नल तोडला की थेट हवालदार पकडतो. त्यासाठी अन्य कोणा नागरिकाने तक्रार करावी लागत नाही. हवालदाराचे लक्ष असते.
तसेच खाजगी कंपन्यात सुटीच्या दिवशी कोणी सरकारी नियामक मंडळाचा अधिकारी चक्कर टाकून कारवाई करत असेल तरच असल्या नियमांना अर्थ आहे.
बरोबर. पण हवालदार पकडतो ते तुम्ही सिग्नल तोडला म्हणून नाही. तो ज्या कारणासाठी पकडतो ते कारण खाजगी कंपनीच्या बाबतीत आधीच साध्य झालेले असते.
मार्मिक दिया आपको चाचा..
मार्मिक दिया आपको चाचा..
अनेक खाजगी कंपन्या कायदा
अनेक खाजगी कंपन्या कायदा वगैरे तर राहूदेच.. युनियन शब्दातला यू जरी कोणाच्या तोंडून बाहेर पडला तरी त्याला नारळ देतात. चार कर्मचारी एकत्र येऊन काही थोडाजरी संघर्ष करु पाहात असतील तर तातडीने ते संघटन तोडतात.
मागे एका रिटेलर मधल्या एका छोट्या सेक्शन मधल्या लोकांनी युनियन केली (उदा. भाज्या सेक्शन). तर कंपनीने ती बिझनेस लाईन च बंद करून टाकली.
अवांतर - Labor arbitrag .... ......
---
एकेकट्याने तात्विक लढा देण्यापेक्षा खाजगी नोकरीतल्या कर्मचार्याला महिनाअखेरी येणारा पगार महत्वाचा वाटतो असतो.
स्वतःचाच Quasi Leveraged Buyout केलेला असतो. इएमआय च्या माध्यमातून. त्यामुळे इलाज नसतो. Debt disciplines individuals.
स्वतःचाच Quasi Leveraged
गब्बरजी, आपण कधी भेटलो तर या वाक्याबद्दल पार्टी! कडकडून टाळ्या...
मीही घेईन पार्टी.. गब्बरशेट..
मीही घेईन पार्टी..
गब्बरशेट.. मार्मिक दिली आहे.
पार्टी आत्ता चालू आहे. पिनो
आदूबाळ, गवि, पार्टी आत्ता चालू आहे. पिनो न्युआर प्यायला या !!!
अतिशय सहमत! आपल्याच वस्तूंचे
अतिशय सहमत!
आपल्याच वस्तूंचे आपण चाकर! भोक्ता भुक्तं का काय ते..
Instead of you owning the
Instead of you owning the property, the property (now) owns you !!!
गवि
गवि गवि गवि...
निव्वळ थोर आहात.
कायदा
हे जरी खरे असले तरी, इतर अनेक कायदेशीर बाबींची(मटर्निटी बनेफिट्स, बोनस, ग्रॅच्युटी वगैरे) पुर्तता 'झक' मारत का होईना कंपनीला करावी लागते, त्यामुळे कमाल तासांचा कायदा आल्यास त्यामधुन पळवाट काढावी लागेल पण पुर्तता करावी लागेल.
आणि प्रत्येक वेळेस स्वतःची मान काढुन द्यायची(व्हिसल ब्लोअर) गरज नाही, बातमी (पुराव्यासकट) 'लिक' होणे पुरेसे आहे.
मुलगी शिकली प्रगती झाली
'मुलगी शिकली प्रगती झाली' हा मंत्र आता अमेरीकेतही गाजणार. मुलींना संगणकाचे शिक्षण देण्यासाठी गुगलने आपले पाकिट थोडे बाहेर काढले आहे, त्याअंतर्गत माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी मुलींना ठरवल्याप्रमाणे संगणकाचे शिक्षण दिल्यास त्यांना जवळपास २,५०० डॉलर्स पर्यंत रक्कम/मूल्य असलेले बक्षिस मिळु शकेल. पण तुम्ही कितीही मुलांना शिकवले तरी तुम्हाला एक छदामही मिळणार नाही. ;)
अमेरिकेतील मुलींचा संगणक क्षत्रातील टक्का(१८%) फारच कमी असल्याने व भविष्यात संगणकाशी निगडीत संधी जास्त असल्याची शक्यता असल्याने हे पाऊल गुगलने उचलले आहे असे बातमीप्रमाणे लक्षात येते.
आता तुम्ही ह्याला लैंगिक भेदभाव म्हणा किंवा गुगलला स्त्री संगणक अभियंता जास्त उत्पादनक्षम वाटत असेल असे म्हणा, आता संगणकसंबंधी क्षत्राचा उज्ज्वल भविष्यकाळ जवळ आला आहे ह्यात शंका नाही. ;)
स्पीचलेस.. Now, Abu Azmi says
स्पीचलेस..
Now, Abu Azmi says women having sex outside marriage, rape victims should be hanged
बातमी
http://www.fakingnews.firstpost.com/2014/04/buffalo-chewed-azam-khans-b…
मूर्खपणा
मुलायम आणि आझमीचे अकलेचे तारे :(
यू पी ए चे सदस्य तुम्ही. गप्प
यू पी ए चे सदस्य तुम्ही. गप्प रहा.
सोकावलेला काळ!
जेव्हा आम्ही म्हणतो की "पुरूष म्हटला की तंग कपड्यातली बाई बघुन चाळवणारच, बाईनेच योग्य कपडे घालावेत" असे म्हणणे गैर आहे, तर त्याचा कसून विरोध होतो. 'म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावतो' म्हटले तर कुठे सोकावला आहे काळ अशी उलट विचारणा होते.
आता हे उदाहरण तसा सोकावलेला काळ म्हणून तरी ग्राह्य धरणार आहेत का पुरूषवृथाकळवळे कोण जाणे!
हा हा हा. पण आता मुलगा फरहान
हा हा हा.
पण आता मुलगा फरहान आझमी आणि सून आयेशा टाकिया यांनी अबू असीम आझमींना एकटं सोडलं आहे.
Netaji, dad must say sorry to all Indians, says Farhan Azmi
गांधी आणि आंबेडकर
Annihilation of Caste हे माझे अत्यंत आवडते पुस्तक. (जालावर काही ठिकाणी ते उपलब्ध आहे) या पुस्तकाच्या अनुषंगाने लिहिलेला The Doctor And The Saint हा अरुंधती रॉय यांचा भलामोठा लेख वाचायला सुरुवात केली. गांधीजींच्या महात्मा होण्यापूर्वीच्या द. आफ्रिकेच्या दिवसांतील काही घटनांचे उल्लेख या लेखामध्ये आहेत. स्वतः आंबेडकरांनी अनेक लेखांमध्ये अधोरेखित केलेला गांधींचा जातीयवाद आणि वर्णाश्रमाच्या समर्थनाची पार्श्वभूमी उलगडण्याचा रॉय यांचा हा प्रयत्न वाटला. 'हिंदू' एकजुटीमागची गरज का निर्माण झाली आणि या गरजेपोटी एकत्र येण्याचा प्रयत्न करतानाही आर्य समाज, रामकृष्ण मिशन किंवा काँग्रेसचे तत्कालीन नेते उदा. लोकमान्य टिळक यांनी काय भूमिका घेतली हे मुळातून वाचण्यासारखे आहे. (उदा. 'प्रबुद्ध भारत' या आंबेडकरांच्या वर्तमानपत्राची जाहिरात 'केसरी'मध्ये प्रसिद्ध करण्यास नकार देणे किंवा जातीयवाद निर्मूलनविषयक करारावर स्वाक्षरी करण्यापासून पळवाट काढणे वगैरे)
लेखाच्या उत्तरार्धात रॉय यांच्या नेहमीच्या विकास आणि संपत्तीविरोधी विचारसरणीकडे वळण घेतल्याने लेख वाचून पूर्ण केलेला नाही. लेखाच्या शेवटी काही संदर्भ वगैरे दिले आहेत ते तपासून पाहता येतील.
मी असं ऐकलंय की रॉय यांच्या
मी असं ऐकलंय की रॉय यांच्या विचारांवर नॉम चॉम्स्की यांचा खूप प्रभाव आहे...
आणखी
गांधी बिफोर इंडिया या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाबाबत आजच ऐकले. सदर पुस्तकासंदर्भातील चर्चेत गांधींच्या तुरुंगवासाचा उल्लेख गुहा यांनी कौतुकाने केलेला आहे मात्र रॉय यांना त्यात बराच रेसिझम दिसला.
मोदिंच्या पत्नि
मोदिच्या लग्नाविषयि वाचले. या भामट्या मनुष्याने इतके दिवस पत्निचे अस्तित्त्व नाकारले. जसोदाबेनचे १७व्या वर्षि मोदिंशि लग्न झाले. म्हणजे काहि एकदमच बालविवाह नव्हे. लग्नानंतर हा भामटा माणुस संघ प्रचारक बनुन निघुन गेला. मग याने लग्न का केले असावे?
शरद पाटिल
डाव्या विचारसरणिबद्दल मुलभुत विचार करणार्या महाराष्ट्रातल्या मोजक्या विचारवंतांपैकि एक असलेले शरद पाटिल यांचे निधन.
आळशी फ्रेंच आणि गार्डियनचे मटाकरण?
Under the agreement, she said, each company would develop a policy and enforcement mechanisms. One might choose to block communications from 11 p.m. to 10 a.m. by shutting down its email servers, while another might simply ask employees not to check email between 9 p.m. and 8 a.m.
Similar limits have been tested elsewhere. In 2011, Volkswagen started shutting off its BlackBerry servers at the end of the workday, stopping some employees in Germany from sending or receiving emails. Last year, the German Labor Ministry ordered its supervisors not to contact employees outside office hours.
But the British press did not seem to notice the German precedents, and reveled at another opportunity to confirm scornful stereotypes about the French. Several websites, Twitter feeds and other news outlets in Britain lost no time in misconstruing the agreement on Thursday, asserting that France had banned email after 6 p.m. or that one million 35-hour-a-week workers would be covered by the accord.
स्रोत - http://www.nytimes.com/2014/04/12/world/europe/in-france-a-move-to-limi…
मटा-री पाऊल पडते पुढे
मटा-री पाऊल पडते पुढे ;)
अंगकोर
कंबोडियाचे अंगकोर वाट मंदिर आता पहा गुगल स्ट्रीट व्हिव्युवर, मागे ह्या मंदिर-भेटीचा वृत्तांत चंद्रशेखर ह्यांनी उपक्रमवर लेखस्वरुपात लिहिला होता.
हा त्या लेखमालिकेतल्या
हा त्या लेखमालिकेतल्या पहिल्या लेखाचा दुवा.
(उपक्रमावरचा लेख नीट दिसत नाहीये म्हणून हा दुवा दिला.)
कोणत्या पक्षाशी जवळीक?
विविध मुद्द्यांवरच्या तुमच्या मतांचा आधार घेऊन कोणत्या पक्षाच्या जाहीर धोरणांशी तुम्ही किती सहमत आहात ते शोधून काढण्यासाठी एक ऑनलाइन सर्व्हे.
छान
उत्तम दुवा. आताच चाचणी घेतली. रिजल्ट्स अपेक्षेप्रमाणेच आलेत.
रोचक दुवा. आप ८६%, काँग्रेस
रोचक दुवा. आप ८६%, काँग्रेस ८२% आणि भाजप ७२% आले.
माझा निकाल
काँग्रेस ८३ टक्के, आप ७० टक्के, भाजपा ५३ टक्के.
अगदी हार्डकोअर काँग्रेसी आहात
अगदी हार्डकोअर काँग्रेसी आहात वाटत तुम्ही ;-)
माझा निकाल बर्यापैकी उन्नीस बीस आहे. मी सर्व प्रश्न somewhat important ठेवलेले. तुम्ही?
येथे
माझे निकष व त्यासंदर्भातील अधिक माहिती.
http://india.isidewith.com/results/492203890
वो दादा! हाच दुवा, या
वो दादा!
हाच दुवा, या धाग्यावर ऑलरेडी दिला आहे
पुलित्झर
भारतीय वंशाच्या विजय सेशाद्रींना कवितासंग्रहासाठी २०१४चे पुलित्झर घोषित. त्यांच्या विजेत्या '3 Sections' ह्या कवितासंग्रहाबद्दल इथे थोडेफार वाचता येईल.
शेषाद्री
नाव विजय शेषाद्री असावे. स्पेलिंग करण्याच्या पद्धतीवरून मूळ मलयाळी असावेत असा अंदाज आहे.
तृतीयपंथीय
तृतीयपंथीयांना ओबीसी म्हणून मान्यता.
अजून एक रोचक बातमी: रॉच्या
अजून एक रोचक बातमी: रॉच्या वेगवान हालचालींमुळे महत्त्वाचा हस्तक हस्तगत!
..
चुकीच्या जागी आला म्हणून
प्रकाटाआ.
सिलिकॉन व्हॅली
सिलिकॉन व्हॅलिबद्दल कुतुहल असणार्यांसाठी -
सॅन्ता क्लारा व्हॅलीमधे सिलिकॉन/संगणक संबंधी औद्योगिकरण झाले आणि तिथली (महा)उपजाऊ जमीन हळू-हळू औद्योगिकरणात स्वाहा झाली, आता जमिनीचे/घरांचे भाव आणि संगणकाशिवाय-इतर-उद्योग करणार्यांच्या उत्पन्नाचा हिशोब जमेना त्यामुळे एकुणच व्हॅलीत काय उलथापालथ चालु आहे हे ह्या टेकक्रन्चच्या प्रदिर्घ(सुपरलेटिव्ह) लेखात वाचता येईल, मीहि सध्या लेख पुर्ण वाचलेला नाही.
हे सगळं उद्या बँगलोर किंवा पुण्यात होऊ शकतं, त्यामुळे त्याअर्थी जागरुक होण्यासाठी किंवा निदान चांगली इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने तरी विचार करायला हवा.
Oligarchy
अमेरीका हि लोकशाही नसून अल्पलोकसत्ताक(Oligarchy) राज्य आहे असे मत प्रिन्सटन आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापिठांच्या संशोधकांनी शास्त्रोक्त अभ्यासावरुन मांडले आहे.
त्यातलं हे उधृत -
आनंदाची बातमी!
This comment has been moved here.
गवि व थत्ते चाचांचे प्रतिसाद
This comment has been moved here.
'हिजडे' अथवा तृतियपंथीयांबद्दल.
This comment has been moved here.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झाले आहेत. 'शिप ऑफ थिसिअस'ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'फँड्री'ला सर्वोत्कृष्ट पदार्पण (बेस्ट डेब्यू) आणि बालकलाकार ह्यासाठीचे पुरस्कार, शिवाय, 'यलो', 'अस्तु', 'तुह्या धर्म कंचा?' वगैरे मराठी चित्रपटांना पुरस्कार. स्ंपूर्ण यादी इथे पाहता येईल.
'Cineoo' चा सिने-कट्टा (२०१४ एप्रिल १८)
Announcing the first Cineoo Meetup
Cineoo Meetup commences this Friday, 18th April 2014 with the first meetup to be held in Mumbai.
Cineoo Meetup's will enable film enthusiasts from across the globe to gather at one place for a discourse on cinema in the company of film makers, film scholars and film lovers.
We invite you to participate in the Cineoo Meetup this Friday, along with some good grub to keep you filled, by our sponsor,
Kala Ghoda Cafe.
Details of the Meetup are as follows
Film
Battleship Potemkin
Time
7.30 pm to 9.30 pm
Venue
Chatterjee & Lal, 01/18, Kamal Mansion, 1st Floor, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai, Mumbai - 400005
* Free entry. Seating on first come first serve basis.
गॅब्रिएल गार्सिया मार्केस
या श्रेष्ठ लेखकाचे आज निधन झाले.
न्यू यॉर्क टाईम्समधल्या लेखातला काही निवडक भाग -
हा मार्केसवरच्या नंदनच्या
हा मार्केसवरच्या नंदनच्या लेखाचा दुवा.
आठवण
काही महिन्यांपुर्वीच One Hundred Years of Solitude वाचली. माझ्याकडे ही कादंबरी गेल्या १२-१५ वर्षांपासून आहे. तेव्हा वाचतांना ३०-४० पाने वाचल्यानंतर कंटाळून वाचली नाही. त्यानंतर News of Kidnapping कसेबसे रडतखडत संपवले. News हे एक प्रचंड कंटाळवाणे पुस्तक आहे. कदाचित अपहरण झालेल्या व्यक्तिची परवड-तपशिलांचा सोस हे सगळे जास्तच परिणामकारकपणे त्या पुस्तकात उतरले असावे. नंतर ५-६ वर्षांमागे 'Memories of My Melancholy Whores' ही लघुकादंबरी वाचतांना मार्केजच्या भाषेतले काव्य, त्यातला थोराड रोमँटिसिझम आणि खट्याळ लैंगिकता यामुळे भारावून गेलो. आणि पुन्हा एकदा सॉलिट्युड वाचण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा संपवू शकलो नाही.
मग मागच्या वर्षी पुन्हा वाचणे सुरू केल्यानंतर आपण किती मोठ्या पुस्तकाला मुकलो असतो याची जाणीव झाली. मला वाटतं Solitude वाचतांना लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाविषयी थोडीफार माहिती असल्यास कादंबरीच्या निर्मितीतल्या प्रेरणा लक्षात येतात. पण तशी काही माहिती नसल्यासही (माझे त्या इतिहासाचे ज्ञान फारच तोकडे असल्याने) हे अतिशय प्रवाही पुस्तक त्यातल्या काव्यमय भाषेमुळे, ठसठशित पात्रांमुळे सहज वाचता येते. मॅजिक रिअॅलिझमचा वापर दगडगोट्यांवर वाढलेल्या शेवाळाप्रमाणे निवेदनास न खरचटता पुढे नेतो. वास्तव वर्तमानापासून वेगळे करण्यासाठीही या शैलीचा उपयोग झाला असावा. Solitude मधले जग इतके नविन आणि इतर जगापासून विभक्त आहे की कादंबरीची सुरूवात कमीतकमी इंग्रजीत वाचतांना भयंकर कंटाळवाणी होऊ शकते. पण एकदा बुएंदिया कुटूंबाचा स्थळ-काळातील नकाशा समजल्यानंतर पुढे वाचायला मजा येते. निव्वळ हरकून जावे अशी पान-पानभर वाक्यं, कुठलाही शब्द अनावश्यक वाटू नये अशी घट्ट वीण यामुळे ही कादंबरी वाचकाच्या ग्रहणक्षमतेला मोठेच आव्हान देते. पुन्हा-पुन्हा वाचल्याशिवाय आपल्याला हे पुस्तक आकळलेच नाही असे बर्याचदा वाचतांना जाणवले. भिंताड वाड्यात राहणार्या लोकांच्या स्थिंत्यंतरातुन महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास दिसल्यास तो जितका विशवसनीय असेल तितकाच Solitudeचाही आहे. माझ्याच काही मर्यादांमुळे कदाचित मला Solitudeचा परिसर चित्रदर्शी वाटू शकला नाही आणि मला या कादंबरीची निवेदनशैली भयानक पुरुषी वाटली. पुन्हा एकदा कधीतरी लांब सुट्टीत Solitude वाचले पाहीजे.
मार्केझबद्दल लोकसत्ता
मार्केझबद्दल 'लोकसत्ता'त आलेला अग्रलेख.
वेंडी डॉनिजर
पेंग्विननं आपलं पुस्तक मागे घेतलं त्याविषयी आणि अमेरिकेतही हिंदुत्ववादी लॉबी काय प्रकारचे निर्बंध आणण्याचा प्रयत्न करते आहे ते सांगणारा वेंडी डॉनिजर ह्यांचा लेख 'न्यू यॉर्क बुक रिव्ह्यू'मध्ये आला आहे.
फेअर
अॅड्व्होकसी किंवा लॉबीइंग अनुमत असल्यास हे न्याय्यच आहे, ह्याचा फायदा झालाच तर वेंडीलाच(पुस्तक वाचन/खप) होणार आहे.
फायदा-तोटा?
कॅलिफोर्निआत पाठ्यपुस्तकांत बदल घडवून आणण्याचा हिंदुत्ववादी लॉबीचा प्रयत्न त्यात डॉनिंजर ह्यांनी वर्णन केला आहे. पाठ्यपुस्तकं बदलली गेली तर त्या प्रकाराचा फायदा कुणाला होईल असं तुम्ही म्हणताय? डॉनिंजर बाईंना? तोटा मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांचा होईल असं वाटतं.
अधिक वाचन
त्या प्रयत्नाबद्दल तपशीलवार वाचल्यास त्यात लॉबीचाच तोटा झाला हे लक्षात येते, त्याचप्रमाणे लॉबीने सुचविलेले बदल काही प्रमाणात योग्यच होते हेही लक्षात येते. डॉनिंजर बाईंना २०१४ मधे २००५ च्या घटनेचा आधार घ्यावा लागला हिहि एक प्रकारची अॅडव्होकसी आहे असे म्हणण्यास वाव आहे.
चिंताजनक लेख आहे. आजकाल
चिंताजनक लेख आहे. आजकाल प्रत्येकाच्या भावना फार लवकर दुखावल्या जातात. चित्र असोत, लेख असोत की व्यंगचित्र...
हा पॅरा खरा आहे का ते नाही माहित. असेल तर असे अभ्यासक्रम असायला हवेत.
धर्माविषयक फॉर्मल शिक्षण /
धर्माविषयक फॉर्मल शिक्षण / माहिती विद्यापीठात मिळत नसेलही. पण ती केवळ धार्मिक संस्थांमध्ये मिळते हे काही पटत नाही.
धार्मिक ग्रंथ, त्यांवरील जुने टीका ग्रंथ बहुधा ग्रंथालयांतून उपलब्ध असतात.
ताजी टीका?
अॅकॅडमिक डिसिप्लिनमधून नवं संशोधन आणि ताजी टीकाटिप्पणीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकते.
+१
सहमत आहे, अशी सोय असणे गरजेचे आहे. पण भारतातील विद्यापीठात अशी सोय करणे(पक्षी: असे डिपार्टमेंट काढणे) म्हणजे दारुगोळा बनवण्याचे कोचिंग क्लासेस घेण्यासारखे आहे.
एकत्र अभ्यास
धर्माचा अभ्यास करण्यासाठी वेगळे डिपार्टमेंट सगळ्याच विद्यापिठांमधे असण्याची शक्यता कमी आहे(बनारस विद्यापिठ एक अपवाद), पण फिलॉसॉफी किंवा सोशिओलॉजी डिपार्टमेंटच्या सिलॅबसमधे धार्मिक अभ्यास थोड्याफार प्रमाणात अंतर्भूत असतो.
पण थत्ते म्हणतात त्याप्रमाणे शिकण्यासाठीचे मटेरिअल मात्र ग्रंथालयात नक्कीच उपलब्ध असावे.
आजकाल प्रत्येकाच्या भावना फार
आजकाल प्रत्येकाच्या भावना फार लवकर दुखावल्या जातात.
क्या बात है.
एकदम चपखल.
आमचे एक हिंदुत्ववादी मित्र - तावातावाने मला सांगत होते की त्या ताजमहाला च्या खाली शिवलिंग आहे. मी त्याला म्हंटलं की तुमचं खरं दुखणं ते नसून तुमचं दुखणं हे आहे की एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे भव्य दिव्य स्मारक उभे केले. आपल्या देशात पत्नी ही अतिकनिष्ठ मानली गेलेली आहे. (उदा. स्त्री ही अनंत कालाची माता असते व क्षणैक कालाची पत्नी असते .... वगैरे बकवास केला जातो) व माता ही अत्युच्च मानली गेलेली आहे. व मातेचे स्मारक बांधण्यापेक्षा पत्नीचे स्मारक बांधले - हे हिंदुत्ववाद्यांच्या परंपरागत विचारांत बसत नाही. एवढेच मी त्याला बोललो. व वर असे ही टॉपिंग्स लावले की - "यार" मे खुदा देखनेका प्रयास अनेक उर्दु कवींनी केलेला आहे. (शेवाळकरांनी ही असाच एक विचार ... त्या ज्ञानेश्वर माऊली क्यासेटात व्यक्त केलेला आहे की काही इस्लामिक कवींनी आपल्या प्रियतमेमधे खुदा ढूंढनेका प्रयास केलेला आहे....). व हिंदुत्ववाद्यांच्या नेमके हेच डोळ्यात खुपते व म्हणून हिंदुत्ववाद्यांना तो ताजमहाल खुपतो.
आता हे माझे एक फक्त कंजेक्चर होते. बस्स. बाकी काही नाही. It was hardly any argument ... let alone a strong one.
पण .... झाले ... तेवढे निमित्त पुरे होते ... सायबांच्या भावना अशा काही दुखावल्या की बोलायची सोय नाही.
"यार" मे खुदा देखनेका प्रयास
अनेक देवांची परवानगी मुस्लिम धर्म देत नाही म्हणून हे करावं लागलं बहुदा. ;)
हताश टिप - स्मायली देणं म्हणजे वाचणार्याच्या अकलेचे वाभाडे काढण्यासारखं आहे, पण असोच.
पण गैरसमज होऊन वादविवादी
पण गैरसमज होऊन वादविवादी प्रतिसादांची तिरकी माळ वाढत जाण्याहून ते परवडलं.
अरेरे! हा दंडेली अजून सत्ता
अरेरे! हा दंडेली अजून सत्ता आली नाही तर आहे, उद्या काय होईल त्याची कल्पना करणं अवघड नाही.
राजेश्वरी देशपांडे यांचा लेख
राजेश्वरी देशपांडे यांचा लेख 'त्यांच्या' बायका, 'त्यांची' इभ्रत!
या विषयावरच्या लेखांबद्दल काहीही आक्षेप न घेता सहमत म्हणावं असं फार कमी वेळा होतं. त्यामुळे हा लेख फारच जास्त आवडला.
लेख आवडला. खणखणीत आहे.
लेख आवडला. खणखणीत आहे. दुव्याकरता दुवा.
घाई
किचकट शब्द आहेत पण शेवटचा भाग थोडाफार आवडला, लेखाची लांबी बघता लिहिता-लिहिता 'पटकन' त्या निष्कर्षावर आल्यासारखं वाटलं, म्हणजे अजुन दोन-एक पानं सहज लिहिता आलं असतं पण बहुदा वृत्तपत्रिय मर्यादेमुळे(बेनेफिट ऑफ डाउट) आवरतं घेतलं त्यामुळे पहिल्या काहि परिच्छेदात म्हणावा तेवढा दम वाटत नाही.
सहमत आहे.
सहमत आहे.
खणखणीत
खणखणीत, थेट आणि स्पष्ट.
छान व नेटका लेख. आभार!
छान व नेटका लेख. आभार!
लेख आवडला कारण त्यामागची भावना
मला काही हा लेख तितकासा पटला नाही. अनेक बाबी न पटण्यासारख्या आहेत.
सहमत. निव्वळ पोटशूळ उठल्यावर
सहमत. निव्वळ पोटशूळ उठल्यावर जी भाषा तोंडी येते ती वापरली आहे. असंयत लोकांवर टिका करणारा लेख संयंत भाषेत असावा. न्याय्य मुद्द्यांवर असंयत टिका ऐकून टाळ्या पिटू वाटणारा बराच वाचक समाज असतो.
"बलात्काराचे समर्थन" वैगेरे काय? "गलती हो जाती है।" मधे पण समर्थन आहे असे म्हणता येत नाही.
बाकी ठीक, पण..
ती घटना क्षुल्लक आहे असे म्हणून कार्पेटखाली दडवायचाच प्रकार आहे की ओ तो. समर्थन नसलं म्हणून काय कमी गर्हणीय होतो काय तो?
मी फक्त लेखात वारंवार आलेल्या
मी फक्त लेखात वारंवार आलेल्या समर्थन आणि तत्सदृश शब्दांबद्दल बोलतोय.
मुलायम सिंगाने जे म्हटले, लिटरली त्याला तेच म्हणायचे होते असेच असेल तर तो निव्वळ बेअक्कल आहे. पण त्यातही त्याला जे म्हणायचेच नव्हते ते लेखिकेने म्हटले आहे.
मुलायम सिंगाने जे म्हटले,
या वाक्यात मुलायम सिंगास दुसरे कैतरी म्हण्णे अपेक्षित होते असे वाटतेय. ते काय असेल याचा अंदाज शब्दयोजनेवरून मला तरी आजिबात घेता येत नै. असो.
तदुपरि
सहमत. पण तो सूक्ष्म भेद असून गर्हणीय कोशंट पाहिल्यास तिकडे दुर्लक्ष केले तरी ठीक असे वाटते खरे.
आता हेच उदाहरण घ्या -
आता हेच उदाहरण घ्या -
भारताचे नवे मसीहा नरेंद्र मोदी यांनी
मोदी हे मसीहा आहेत हा कुत्सित कॉमेंट नाहिये का ? विश्लेषण करायचे म्हंजे पॉलीसी चे करायला नको का ? गुजरातेत बलात्काराच्या / विनयभंगांच्या किती घटना झाल्या ? त्या गेल्या १० - १२ वर्षांत कमी झाल्या की वाढल्या ? इतर राज्यांच्या तुलनेत कमी झाल्या का ? त्यांचा कन्व्हिक्शन रेट (समस्याजनक स्टॅटिस्टिक्स), पिडीत महिलेस मिळणारा सपोर्ट, महिलांविरुद्ध च्या गुन्ह्यांचे बदलते रूप(***) व ते गुजरातेत किती प्रिव्हेलंट आहे, प्रिव्हेंटिव्ह मेझर्स कोणती घेतलेली आहेत - या सगळ्यांबद्दल बोलणे गरजेचे असले तरी जागेअभावी शक्य नाही असे मान्य केले तरी किमान काही मुद्दे तरी उपस्थित केले पाहिजेत. नाही का ? (निदान मोदींचा विषय उपस्थित केलेला असताना.). नाहीतर मग मोदींचा मुद्दा उपस्थित करू नका.
एखाद्या परिच्छेदाच्या सुरुवातीस जो मुद्दा उपस्थित केला जातो त्याचे विवेचन त्या परिच्छेदात असावे ही माफक अपेक्षा.
---
बलात्कार्यांना फाशी द्यावी याबद्द्ल त्यांची मते विचारात घेण्याजोगी आहेत. पण - It is not enough to do justice .... Justice must also be seen to have been done. न्यायाच्या अनेक तत्वांत सिग्नलिंग हे एक तत्व असते. याकडे पूर्ण दुर्लक्ष करून चालेल का ? त्याचा परिणाम म्हणून फाशी ... जर काही केसेस मधे होत असेल तर ? Especially if as a result of the rape the woman is completely devastated mentally - then ? In this case she is reduced to a body without a mind. Isn't it ? या केस मधे न्यायाधीशाने फाशी ची तरतूद केली तर ?
या मुद्द्यावर - त्यांनी अतिरेकी कणवपूर्ण भूमिका घेतलेली आहे. कणव ही समस्याजनक नसतेच असे गृहितक असावे त्यामागे.
---
स्त्रीगर्भाच्या नि:पातातून आणि निलाजऱ्या डॉक्टरांकडून जसे हे घडते
डॉ़क्टरांचा उल्लेख निलाजरे असा केला. पण स्त्रीगर्भाचा नि:पात करणार्या पालकांचा उल्लेख टाळला. (खरंतर डॉक्टर हे दोषी नाहीतच या मुद्द्यावर. कायदा डॉक्टरांना दोषी मानत असेल तर कायदा चूक आहे.)
या मुद्द्यावर बरेच लिहिण्यासारखे आहे पण् स्फोट होईल म्हणून थांबतो.
----
आता माझ्या जिव्हाळ्याचा मुद्दा.
भांडवली भणंग सांस्कृतिक-सामाजिक वास्तवाच्या
भारतातल्या कुंठित आणि भणंग भांडवली विकासाचा परिणाम म्हणून हे तिपेडी सत्तासंबंध उलथेपालथे झाले आहेत.
(खरंतर हे आमचे खरे दुखणे. भांडवलवादावर आक्रमण केले की आम्ही चवताळून उठतो.)
त्यांनी "भांडवली" असा शब्द (अनेकदा) वापरलाय व मी असे गृहीत धरतो की हा त्यांचा भांडवलवादास संबोधित करण्याचा मार्ग आहे.
आता या सगळ्या समस्येचा भांडवलवादाशी काय संबंध ? Is capitalism really driving this criminal mentality of (Indian) men ? कसा ? हा संबंध आहे हे गृहितक की निष्कर्ष ?
पर्यायी अर्थव्यवस्थेत काय सिच्युएशन होती ? आजही आपल्या देशात मोठ्याप्रमाणावर भांडवलवाद आहे असे नाही. पण तो भाग सोडला तरी भांडवली अर्थव्यवस्थेपूर्वी स्त्रियांवरील अत्याचार कमी होते का जास्त ?
भांडवल व भणंग यात "भ"कार सोडल्यास काय संबंध आहे की ते दोन शब्द एकाशेजारी एक ठेवलेत ?
----
आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने
म्हंजे काय ?
व्यापारीकरण - हे गेली किमान १००० वर्षे चालू आहे ना ? १९४७ मधे देश स्वतंत्र झाला त्यापूर्वी देशात प्रचंड जागतिकीकरण होतेच ना??? १९४७ नंतर त्याचे De-globalization झाले. मग १९९५ नंतर पुन्हा globalization ची लाट आली. globalization हे व्यापारीकरणाचे "वसुधैव कुटुंबकम" रूप नाहिये का ?
----
(***) She is alluding to this aspect in this statement ...
उरलेले सर्व दिवस, उरलेले सर्व पुरुष स्त्रियांवर या ना त्या प्रकारचे अन्याय करण्यास मोकळे राहतात
बऱ्याच अंशी सहमत.. या
बऱ्याच अंशी सहमत.. या लेखामध्ये नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या पत्नींना का आणले याचे कारण काही कळले नाही.. मोदींनी त्यांच्या बायकोला चारधाम यात्रेला पाठवले वगैरे हे नेमके कश्याच्या आधारावर हे काही कळले नाही..
त्यामुळे लेख थोडासा भरकटला असे वाटले..
संकेत
जसोदाबेनने देशपांडेबाईंना स्वप्नात दृष्टांत दिला असावा.
मोदीने बायकोला सोडायला नाही पाहिजे, सोडायचेच होते तर आधी लग्न नाही करायला पाहिजे होते, सोडले तर तिचे दुसरे लग्न लावून द्यायला पाहिजे होते, किमान तिची स्वतःची ओळख मोदीची बायको अशी नको ठेवायला हवी होती, आपल्या विवाहाचे स्टॅटस अगोदरच नीट सांगायला पाहिजे होते, तिचे आयुष्य (मोदीमुळे + परंपरांमुळे) बर्बाद झाले, याची तिला जाणिवही नाही, इ इ ठिक आहे. पण अख्खा मेडीया तिला शोधत असताना ती जर फक्त देशपांडेबाईंनाच भेटली, बोलली असेल तर हे थोडे नवलाचे आहे आणि बाईंनी वाचकांच्या माहितीसाठी तसे स्पष्ट करायला हवे.
शिवाय मोदीने बायकोला सोडले या वाक्यात बायकोबद्दल "अरेरे बिचारी" टाईपचा भाव दिसतो. लग्नाचा करार कोणी मोडला? रितसर काडीमोड कोणी दिला नाही? मोदीने. मग त्याच्यावर सडकून टिका करा (ही मात्र लेखात आहे), पण बायकोबद्दल अजागळ सहानुभूती का? विवाहाबद्दलचे तिचे जे (मागास) तत्त्वज्ञान आहे, त्यालाही मोदी थोडीच जबाबदार आहे? तिने मोदी नावाचा चॅप्टर विसरून आपले आयुष्य वेगळेपणाने का जगले नाही त्याबद्दल टिका खुद्द तिच्यावरच व्हायला हवी, मोदीवर नाही. अशी टिका कुठे दिसतच नाही. इथे बोंब उलटीच आहे.
आणि मोदींनी रामदासांचे चरित्र लै सिरीअसली घेतले. त्यांनी गौतम बुद्धाचे चरित्रही सेम टू सेम कॉपी केले. जमान्यानुसार प्रोसिजरमधे फरक नाही केला. आणि अजूनही नक्की काय भानगड आहे याबद्दल तोंड गप्प ठेऊन आहेत. याचे दोन अर्थ आहेत. एकतर लोकांनी त्यांच्या खासगी बाबतीत बोलावं किंवा बोलू नये. बोलावं तर माहिती नीट हवी आणि त्यांचं मत काय आहे ते ही नीट हवं. आणि ते ते देत नसतील तर केवळ गप्प आहेत इतकीच टिका व्हावी. बोलू नये असा अर्थ असला तर प्रश्नच मिटला. सामाजिक संकेत नक्की काय आहे?
तुमच्या प्रतिसादाचे मला हव्या
तुमच्या प्रतिसादाचे मला हव्या त्या मुद्द्यात रुपांतर करतो -
जसोदाबेन ही शोषित असल्याने फक्त अनुकंपेस (कणवेस) पात्र आहे व मोदी हे निर्विवादपणे शोषक आहेत - असे गृहीतक केले की बाकीचा प्यारा एकदम सोप्पा होतो.
मोदींनी रामदासांचे चरित्र लै
छे! उलट असा प्रवाद आहे की त्यांनी रामाप्रमाणे देशासाठी पत्नीचा त्याग केला! ;)
राम उरलाच होता.
राम उरलाच होता. विश्वामित्राचं काय? अजून बरेच निघतील...
"महान कार्यासाठी कुटुंब्/बायको/लेकरे/देश्/गाव/नवरा/इइ सोडणे ही एक जागतिक परंपरा आहे.
अहो पण मोदींसाठी रामाचं
अहो पण मोदींसाठी रामाचं महत्त्व मी का सांगायला हवं? :P
ह्यला मंतेत पोस्टमार्टम
ह्यला मंतेत पोस्टमार्टम
रोचक
तुम्ही नरेंद्र मोदींना काय मानता ते म्हत्त्वाचे नाही- पण जो माणूस आपल्या बायकोला ३-४ दशके लपवून ठेवतो, तिचा उल्लेख सुद्धा होऊ देण्याची काळजी ज्याने कधी दाखवली नाही त्याच्याबद्द्ल कुत्सितपणे जर कोणी बोलले तर ते फार चुकीचे वाटू नये.
हे काय आणि कसं? स्त्रीभ्रूणहत्या बेकायदेशीर नाही? आणि त्यात डॉ दोषी नाहीत हा तुमचा दावा कशाच्या आधारावर तुम्ही मांडला आहे ते कळलं तर बरं होईल. जर प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान आणि त्या अनुषंगाने गर्भपात हा बेकायदेशीर आहे, तर मग तो करणारे डॉक्टर्स पण दोषी ठरतात. नुसता, वैद्यकीय कारणामुळे केलेला गर्भपात हा गुन्हा नाही पण केवळ स्त्री गर्भ नको म्हणून इतर कुठलेही कारण नसता केलेला गर्भपात हा बेकायदेशीर आणि अनैतिक दोन्हीही आहे.
कधी, कुठे आनि कसले जागतिकीकरण होत होते? तुम्ही ज्याला कदाचित ग्लोबलायझेशन म्हणत आहात ते केवळ मायग्रेशन आहे, ग्लोबलायझेशनची व्याख्या अशी आहे-
the process by which businesses or other organizations develop international influence or start operating on an international scale.
यातल्या कुठल्या गोष्टी १००० वर्षे चालू आहेत? ईस्ट इंडिया कंपनी वा डच ईस्ट इंडिया कंपनी या थोड्या फार प्रमाणात जागतिकीकरणाकडे वाटचाल करणार्या वाटू शकतील पण त्या सुद्धा ग्लोबलायझेशनच्या नव्हे तर इम्पेरिअलिझम च्या प्रतिक मानायला हव्यात. ज्याला ग्लोबलायझेशन म्ह्णावे असे मोठे बदल तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आणि ते हे गेल्या काही दशकातच. त्यामुळे ग्लोबलायझेशन हा एक कंटिन्युअस फेनोमिनॉ आहे हा तुमचा दावा अपुरा आणि सरसकट आहे.
"बलात्काराचे समर्थन" वैगेरे
रोचक! ऐकावे ते नवलच!
तुम्ही इम्प्लिसिट कन्सेन्ट ऐकली आहे का? मुलायमसिंघाची ती टिप्प्णी त्याचेच एक उदाहरण आहे.
पोट्शूळ?
राजेश्वरी बाईंना पोटशूळ कशामुळे झाला असेल असं आपल्याला वाटतं? इतक्या बायकांवर बलात्कार झाले मग माझ्यावर का झाले नाहीत अशा असूयेपोटी त्यांना पोटशूळ झाला असेल असंच तुमच्या विधानावरून वाटतं. आणि ह्या बाईंनी वापरलेली भाषा असंयत का आहे याचं एकही उदाहरण न देता ते लेखन असंयत आहे असा निर्वाळा देऊन तुम्ही मोकळे झालात! वर परत, टाळ्यापिटू वाचक समाज अशी हेटाळणी! चांगलंय!
फाऽर एग्झांबळ्????
फाऽर एग्झांबळ्????
युरेनियम फिल्म फेस्टिव्हल
मुंबईत १८-२० एप्रिल.
दुवा.
'लोकसत्ता'मधली बातमी.
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/opinion/columns/national-interest-secu…
डॉ. शेखर गुप्ता बहुतांश वेळा मस्त (म्हंजे इनसाईटफुल) लिहितात. पण आजच्या लेखात जरा प्रॉब्लेम आहे. लेख वाचून झाल्यावर पुन्हा लेखाचा मथळा वाचलात की - हा मथळा का दिलेला आहे हा प्रश्न पडतो ? एक लक्ष वेधून घेणारा मथळा म्हणून ठीक आहे पण .....
समकालीन भारतीय कला - व्याख्यान
२६ एप्रिल संध्याकाळी ६:३० वाजता मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात समकालीन भारतीय कलेविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहिती -
मोदी
माया कोदनानी यांच्या खटल्याचा पाठपुरावा करुन त्यांना शिक्षा घडवून आणणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी गुजरात सरकारची सूडबुद्धीची वागणूक याबाबतचा एक रोचक लेख वाचनात आला.
http://www.livemint.com/Leisure/RzMzJqvoJR5OE24Z8ypChJ/Narendra-Modi-cr…
हीच बातमी दोन प्रकारे वाचता
हीच बातमी दोन प्रकारे वाचता येते.
एक. अतिशहाणाची लिंक नि http://centreright.in/2013/02/can-anyone-ever-beat-aakar-patels-record/… ही लिंक हे एकत्र वाचावे
दोन. http://timesofindia.indiatimes.com/india/Gujarat-harassing-me-over-riot…
ही बातमी वाचावी.
जातीबाहेर लग्नाला एका खाप
जातीबाहेर लग्नाला एका खाप पंचायतीने मंजुरी दिली. ६५० वर्षे जुनी परंपरा मोडित
वाह!!! बहुत अच्छे. या बातमीस
वाह!!! बहुत अच्छे.
या बातमीस मिळालेला कमी प्रतिसादही बोलकाच आहे. हेच जर खापवाल्यांवर टीका करणारं असतं तर लोक कसे तुटून पडले असते त्याची कल्पना करून डोळे अंमळ पाणावले. (श्रेणीदातेहो, होऊदे खर्च, तेवढंच मनोरंजन वर्चं.)
खरे आहे.
कुत्रा माणसाला चावला, तर ती बातमी नव्हे; माणूस कुत्र्याला चावला, तर ती बातमी. इथवर ठीकच आहे. पण एखाददिवस कुत्रा माणसाला जर चावला नाही, तर तीही ब्रेकिंग / हेडलाइन न्यूज़ व्हायला पाहिजे खरे तर. पण तशी ती होत नाही, ही बहोत नाइन्साफी आहे, नाही का?
====================================================================================================================
(अतिअवांतर: कुत्र्यावरून आठवले. तो "अइउण्ऋऌक्!! हल्!!!" प्रकार म्हणजे, रस्त्यात एखाद्या अनोळखी कुत्र्याने जर हटकले, तर त्याला अगोदर एक सणसणीत शिवी हासडून नंतर मग "हाड्!" असे जे मराठीत म्हणतात, त्याचे पाणिनीय भाषांतर असावे काय?)
या केसमध्ये नाइन्साफी तर
या केसमध्ये नाइन्साफी तर आहेच.
तदुपरि आमची स्वाक्षरी म्ह. पाणिनीची काही सूत्रे आहेत. त्यांचा अर्थ काय, हे आम्हांस ठौक नाही. पण गोनीदांच्या "स्मरणगाथा" नामक आत्मचरित्रपर ग्रंथात त्यांनी एक किस्सा दिलेला आहे. ते घराबाहेर पडून भटकंती करीत होते तेव्हाची गोष्ट. संन्यास घेतला होता आणि एका माणसास घाबरवणे गरजेचे होते-का, कशासाठी, इ.इ. सफै विसरलो. भौतेक कुणी गुंड असावा. मग त्यांनी कमंडलूतले पाणी हातात घेतले आणि वरील मंत्र म्हणून ते त्याजवर फेकले. तो माणूस घाबरून पळून गेला. ते आठवलं, इतकंच. शिवाय ती अक्षरे शिवीचा फील देतात, हेही तितकेच खरे आहे.
गुजरातमध्ये प्रगती कुणाची?
गुजरात सरकारच्या अडाणी संबंधांविषयी फोर्ब्जमध्ये आलेला लेख - Doing Big Business In Modi's Gujarat
फोर्ब्जसारख्या मासिकात आल्यामुळे हा डाव्यांचा प्रोपागांडा मानता येणार नाही बहुतेक.
'अपिल टू नेचर'
लेखाची साउंड इफ्फेक्ट्स वापरुन भिती दाखवणारे भयपटाशी तुलना करता यावी, झारपारा खेड्यातील लोकांना सकाळच्या 'सुंदर' दवबिंदूंच्या ऐवजी आणि झेलाव्या लागणार्या राखेच्या माध्यमातून लोकांच्या मुलभूत 'अपिल टू नेचर' ला हात घालणारे लेखन प्रपोगांडा वाटत नाही.
याला खवचट श्रेणी का? काहीही?
याला खवचट श्रेणी का? काहीही?
खवचट का?
खाली उद्धृत केलेल्या वाक्याला 'खवचट' मानलं गेलं असावं. अर्थात, माझी त्याला हरकत नाही.
त्या वाक्यातही खवचटपणा नाही.
त्या वाक्यातही खवचटपणा नाही. लिहिणारा कोण हे पाहूनच बातमी लोक टोलवतात. ही बातमी गांबीर्याने घ्यावी असे तुम्हाला मनोमन वाटले म्हणून तशी तुम्ही नोंद केलीत.
'शु'चिता
आणि एका दुसर्या बातमीत - "एका माणसाने पाण्याच्या टाकीत शु केल्याने पोर्टलँड शहाराच्या पाणीविभागाने १४०दशलक्ष लिटर पाणी साठ्यातून सोडून दिले."
ही जुनी बातमी आहे भौतेक. असे
ही जुनी बातमी आहे भौतेक. असे आधीही कधी वाचल्याचे आठवते. चूभूदेघे.
हिंदू वस्तीतून मुस्लिमांना काढा!
मिसळपाव access करता येत नाही इथून ह्याचे वाईट वाटते.
खालील बातमी वाचण्यात आली :-
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Togadia-BJP-Muslim-Hindu/…
*******************************बातमी सुरु********************************
हिंदू वस्तीतून मुस्लिमांना काढा!
राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी यांचा उद्य झाल्यापासून झाकोळले गेलेले विश्व हिंदू परिषदेचे वादग्रस्त नेते प्रवीण तोगडिया यांनी ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. 'हिंदू वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुसलमानांना बाहेर काढा,' असे वक्तव्य तोगडिया यांनी आले आहे. या घडामोडींमुळे भाजपची, पर्यायाने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
गुजरातच्या भावनगर शहरातील मेघानी सर्कलजवळ एका मुस्लिम उद्योजकाने घर खरेदी केले आहे. परिसरातील हिंदूंनी त्यास विरोध केला आहे. याचे निमित्त करून तोगडियांनी यांनी शनिवारी विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह या मुस्लिम उद्योजकाच्या घरावर धडक दिली. तिथे निदर्शने करण्यात आली व रामजप करण्यात आला. यावेळी तोगडियांनी विहिंपच्या कार्यकर्त्यांना या उद्योजकाच्या घरावर बजरंग दलाची पाटी लावण्याचे आदेश दिले. तसेच चिथावणीखोर भाषणही दिले.
'भावनगरमध्ये डिस्टर्ब एरिया अॅक्ट लागू करण्यात यावा किंवा हे घर जबरदस्तीने ताब्यात घेतले जावे आणि कायदेशीर लढाई लढावी, असे तोगडिया म्हणाले. '४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा. 'हे सगळं करण्यात काहीच गैर नाही. अजून राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनाही फाशी झालेली नाही. तुमच्यावरचे खटलेही वर्षानुवर्षे चालतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी याआधी असे अनेक खटले लढलो आणि जिंकलोही आहे, असेही तोगडिया म्हणाले.
'हिंदूंच्या हितासाठी राजकीय पक्षांवर दबाव आणण्याची निवडणूक ही संधी आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी काँग्रेस आणि भाजपवर दबाव आणा. तसे करताना अजिबात मागे हटू नका,' असे आवाहनही तोगडियांनी केले. तोगडियांच्या या भाषणानंतर मुस्लिम उद्योजकाच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे.
************************बातमी समाप्त***************************
भाजपा नेहमी राज्यांची बाजू
भाजपा नेहमी राज्यांची बाजू घेतो (स्थानिक सुरक्षेच्या बाबतीत) तो ह्यासाठीच. की जेणेकरून त्यांना हे उद्योग करता यावेत. घटनेनुसार स्थानिक सुरक्षा ही राज्यांच्या अखत्यारीत ठेवलेली आहे. पण त्याचा परिणाम हा होतो की .... अशा निर्वाणीच्या वेळी व्यक्ती समोर फक्त एकच मार्ग असतो - तो म्हंजे पोलिस. पण पोलिसांचा बॉस असतो गृहमंत्री (राज्यसरकार). पर्याय उरतच नाही. There is hardly any check there.
Power tends to corrupt and absolute power corrupts absolutely. ____ Lord Acton.
प्रवीण तोगडिया म्हणजे भाजपाचा
प्रवीण तोगडिया म्हणजे भाजपाचा दिग्विजयसिन्घ आहे!
दिग्विजयसिंग काहीही बरळतात
दिग्विजयसिंग काहीही बरळतात तसे तोगडिया बरळत आहेत; तेव्हा दुर्लक्ष करा असे सुचवू पहात आहात का?
पण इथे बरळण्याच्या पुढची पायरी गाठली जात आहे असे दिसते.
डिसओन्ड
भाजपा आणि रास्वसंघाला तोगडियापासून अंतर राखावे लागले हि ते काँग्रेसप्रमाणेच सेक्युलर होण्याची नांदी आहे काय असे क्षणभर वाटून गेले.
महिलांचे सक्षमिकरण
महिलांची बायोलॉजिकल घड्याळापासून मु़क्ती - आता भविष्यकालीन अपत्यप्राप्तिसाठी स्त्रीबीज गोठवून ठेवता येणार. कॉलिंग राहूल गांधी.
आमचे अज्ञान
याने नक्की फायदा काय झाला? म्ह. एग फ्रीझिंग केले सो दॅट नंतर पाहिजे तेव्हा वापरले हे ठीकच आणि उत्तमच.
पण ३५+ वयात गर्भार राहण्याचे जे कै तोटे आहेत असे म्हटल्या जाते, त्यांपैकी किती अडचणी अंडे गोठवल्याने नष्ट होतील हे पहायची उत्सुकता आहे. त्याबद्दल लेखातून काही कळ्ळे नै.
चिंता
बायोलॉजिकल घड्याळाची सतत चिंता करावी लागणार नाही हा एक फायदा दिसतो, बाकी तोटे सध्यातरी होते तसेच असणार आहेत.
अर्थातच- तो एक मोठा फायदा
अर्थातच- तो एक मोठा फायदा आहेच. तरी आमचे अज्ञान अपार असल्याने नीट लक्षात आलं नाही. समजा अंडे गोठवले नाही तर नक्की कसला प्रॉब्लेम येऊ शकतो? स्त्रीशरीरातली तशी जेवढी अंडी असतात ती जन्मतः असतात तेवढीच राहतात असे वाचलेले आहे. दर महिन्यास एक अंडे शरीराबाहेर पडते-प्रोव्हायडेड स्त्री तेव्हा गर्भार नसेल तर. मग अंडे गोठवल्याने पुढे अंडी संपतील अशी चिंता नको म्हणून गोठवले तर ठीक. पण एकदा का सगळी अंडी संपली म्ह. मेनोपॉजल वय आले, की अंडी गोठवून तरी काय फायदा? कारण तेव्हा तर गर्भार राहता येणारच नै. ते कै लक्षात आलं नै. जोपर्यंत पाळीप्रक्रिया सुरू आहे तोपर्यंत अंडी गोठवण्याच्या प्रक्रियेची नक्की गरज काय असा प्रश्न आहे. समजा अंडी गोठवली नाहीत तर संयुक्तपेशी बनण्यास नंतर नंतर प्रॉब्लेम कशामुळे होतो ते पाहिलं पाहिजे, मग कदाचित आमचे शंकासमाधान होईल. असो.
माझ्यामते अंडे गोठवल्यास हवे
माझ्यामते अंडे गोठवल्यास हवे तेव्हा बाहेरच स्पर्मशी मिलाफ करुन मग बनलेला गर्भ गर्भाशयात ट्रान्सफर करता येइल. IVF मधे हेच करतात ना?
होय, हेच होते. पण मुद्दा असा
होय, हेच होते.
पण मुद्दा असा की हे सगळे नैसर्गिकपणे होण्यास ३५+ वयात नक्की कसल्या अडचणी येतात?
आणि शिवाय अंडे गोठवूनही जर सरोगेट मदर वापरायची नसेल तर किती वयापर्यंत मूल पैदा करता येईल त्यालाही लिमिट आहेच ना? मेनोपॉज एकदा सुरू झाली की हे शक्य होईल का? कदाचित नसावे किंवा माझी काही गफलत होत असावी.
मी तज्ञ नाही पण थोड्याफार
मी तज्ञ नाही पण थोड्याफार इकडेतिकडे वाचलेल्या माहितीवरुन अंदाजपंचे उत्तर देतेय. मी ती बातमीदेखील वाचली नाही कारण इंटरेस्ट नाहीय. त्यामुळे चुभुद्याघ्या.
१. वय वाढल्यावर अंड्याची क्वालीटी डिग्रेड होत असावी.
२. नैसर्गिकरित्या कंसीव करणे अवघड जात असावे.
३. गर्भ मेनोपॉजनंतरही वाढवू शकतो सरोगेटचीच गरज नसते.
धन्यवाद.
मुद्दा क्र. १ व ३ विशेष महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.
www.eggsurance.com/top-10-fer
www.eggsurance.com/top-10-fertility-myths.aspx
धन्यवाद!
धन्यवाद!
माझं या विषयातलं ज्ञानही फार
माझं या विषयातलं ज्ञानही फार नाही. डॉक्टर जास्त तपशील देऊ शकतात.
१. ३५+ वयापुढे बीजाचं फलन होण्याची शक्यता कमी असते. दुसरं, मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या शरीरात जेवढी अंडी असतात, त्यापेक्षा बरीच कमी अंडी वयात येताना असतात. (ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये कमी होतात; मासिक पाळीतून दोन-चार कमी होतात तशी नाही.)
१अ. वयानुसार बीजांडांची प्रतही कमी होत जाते. (वयानुसार स्पर्म्सचंही हेच होतं.)
२. स्वतःचं मूल हवंय पण स्वतःला गर्भार रहायचं नसेल (किंवा पुरुष व्हायचं असेल आणि हे परवडत असेल) तरीही हा पर्याय वापरता येईल.
३. वरच्या प्रतिसादात जे काही लिहीलं आहे ते सगळं सामान्य आरोग्यवंत स्त्रियांबद्दल आहे. शरीरात असणाऱ्या गुंतागुंतीच्या अवयवांमध्ये किंचितसा बिघाड असेल तरीही गर्भधारणा, गर्भ गर्भाशयात टिकून राहणं कठीण होतं. अशा बऱ्याच गुंतागुंती मला माहित नाहीत, हे समजावण्याचा आवाका या लेखाचा असावा असं दिसत नाही.
तरीही ज्या स्त्रियांना स्वतःची मुलं, स्वतःच्या सोयीनुसार हवी आहेत तेव्हा होण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकलं गेलं इतपत मला या बातमीचा अर्थ लावला.
धन्यवाद. अस्मि यांनी क्लीअर
धन्यवाद. अस्मि यांनी क्लीअर केलेच होते, या प्रतिसादातून अजून जरा क्लीअर झाले. विशेषतः मेनोपॉज सुरू झाल्यावरही गर्भार राहता येऊ शकते(जर ऑलरेडी फलन झाले असेल बाहेरच्या बाहेर तर) हे मला विशेष रोचक वाटले. त्यामुळे तत्त्वतः अगदी ५० पर्यंतही स्वतःचे मूल या पर्यायाने पैदा करता येईल. मग टेन्शनच नाही. हे विशेषत: करिअरिस्ट महिलांसाठी आणि अन्य काही कारणांमुळे मूल पोस्टपोन करू इच्छिणार्या सर्वांसाठीच अतिशय उत्तम आहे.
एवढं सोप्प पण नाहीय बरं का ते
एवढं सोप्प पण नाहीय बरं का ते :-). प्रेगन्सी कअॅरी करायची ताकद असलेल आणि इतर काही त्रास नसलेल शरीर लागत त्यासाठी. जे ५०+ वयात असणे अवघड आहे
म्हणूनच तर म्हणालो
म्हणूनच तर म्हणालो 'तत्त्वतः'.
का बुवा म्हणे?
बातमी.
शाझिया
This comment has been moved here.
निम्म्या दरात
फ्लिपकार्टवर काही पुस्तके निम्म्या भावात उपलब्ध आहेत, हे क्लासिक्सचे कलेक्शन बहुदा कोणास रोचक वाटेल.
माउंट एव्हरेस्ट
This comment has been moved here.
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250114___220910