भारतीय राजकारण व लोकसभा निवडणूका - २०१४ (भाग ३)
सदर धागा तत्कालीन राजकीय चर्चा, मते व अन्य स्वरूपाचे लेखन करण्यासाठी काढत आहे.
विदा/संदर्भ देऊन केलेले दीर्घ-विश्लेषणात्मक लेखन सोडल्यास सदर विषयाशी संबंधीत सर्व लेखन या धाग्यावर करावे अशी विनंती करतो. या विषयाशी समांतर लेखन नव्या धाग्यात काढल्यास ते लेखन या धाग्यावर हलवण्यात येईल याची नोंद घ्यावी! कोणते लेखन या धाग्यात हलवायचे याचा निर्णय संपादकांचा असेल.
भाग: १ | २
============
कोणाला मत द्यावे याच संभ्रम आहे? तुम्हाला सगळ्यांचीच काही मते पटताहेत? मग तुमचे मत कोणत्या पक्षाच्या अधिक जवळ जाते हे पहाण्यासाठी एक मार्ग एका संस्थळाने दिला आहे.
इथे बघा. इथे विविधे प्रश्न व त्याचे विविध पर्याय दिले आहेत. इतकेच नाही तर ते प्रश्न तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे तेही तुम्ही ठरवु शकता.
त्यानंतर भारतीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व आम आदमी पार्टी या तीन पक्षांपैकी तुमचा कद कोणत्या बाजुला आहे, किंबहुना तुमचे विचार कोणत्या पक्षाशी किती टक्के जुळत आहेत हे दिले जाते. एकुणच रोचक प्रकार आहे.
माझा अंदाज / कल जो होता, त्यावर या प्रोसेसनंतर शिक्कामोर्तबच झाले. तुम्हीही ट्राय करा, रोचक प्रकार आहे.
मदरसा व अल्पसंख्य ह्याबद्दल
मदरसा व अल्पसंख्य ह्याबद्दल पुढील मजकूर दिसला भाजपचा :-
Minorities - Equal Opportunity
BJP believes that in India's 'Unity in Diversity' lies India's biggest strength. We cherish the depth and vibrancy that the diversity in Indian society adds to the nation. BJP is thus committed to the preservation of the rich culture and heritage of India's minority communities; alongside their social and economic empowerment.
It is unfortunate that even after several decades of independence, a large section of the minority, and especially Muslim community continues to be stymied in poverty. Modern India must be a nation of
equal opportunity. BJP is committed to ensure that all communities are equal partners in India's progress, as we believe India cannot progress if any segment of Indians is left behind.
We will:
१. Ensure that the young, and the girl child in particular get education and jobs without discrimination.
२. Strengthen and modernize minority educational systems and institutions; dovetailing them with modern requirements. National Madrasa modernization programme would be initiated.
३. Empower with vibrancy in Livelihood and Entrepreneurial opportunities.
४. Augment their traditional artisanship and entrepreneurial skill, which are a backbone of our cottage and small-scale industry - strengthening these sectors through better market linkages, branding and access to credit.
५. Empower Waqf Boards in consultation with religious leaders; taking steps to remove encroachments from and unauthorized occupation of Waqf properties.
६.Curate their rich heritage and culture - maintenance and restoration of heritage sites; digitization of archives; preservation and promotion of Urdu.
७. Ensure a peaceful and secure environment, where there is no place for either the perpetrators or exploiters of fear.
८. Facilitate the setting up of a permanent Inter-faith Consultative mechanism to promote harmony and trust, under the auspices of religious leaders
वैधानिक मार्गाने अयोध्येतील राम मंदिर आणायचा मुद्दासुद्धा घोषणापत्रात आहे म्हणे.
अयोध्या आहे म्हटलं "काशी मथुरा बाकी हय" ओघानं आलच. (असा आपला म्या अडाण्याचा अंदाज)
.
.
"काशी मथुरा बाकी हय " ह्या घोषणेची वरील मुद्द्यांशी सांगड कशी घालता येइल ह्याचा मी अज्ञजन विचार करतोय.
"काशी मथुरा बाकी हय " ह्या
"काशी मथुरा बाकी हय " ह्या घोषणेची वरील मुद्द्यांशी सांगड कशी घालता येइल ह्याचा मी अज्ञजन विचार करतोय.
काय हे मनोबा.
बाकीचे प्रोग्राम्स व स्कीम्स (टॅक्स पेयर च्या जीवावर) पॅरलली चालू राहतील. (उदा. Entrepreneurial opportunities, cottage and small-scale industry strengthening स्किम्स वगैरे.)
व काशी मधे जी काही समस्या आहे ती तिथल्या तिथे सोडवली जाईल. तिथे जे स्टक्चर आहे त्याचा प्रॉपर्टीमालक हा एकमेव लोकस स्टँडी वाला असणार ... या मुद्द्यावर. आणि नाहीतरी आजकाल चा युवक व इतर लोक ही - असा दावा करतात की आम्हाला मंदीर व मस्जिद समस्येमधे काहीही स्वारस्य नाही. आम्हाला एकॉनॉमिक अपॉर्च्युनिटि हवी आहे. विकास हवा आहे. मग विकास/भरभराट हवा आहे तर तो वरील प्रोग्रॅम्स/स्कीम्स द्वारे दिला जाऊ शकतो. स्कीम्स चे पॅकेज चार पटीने वाढवूया ... हवं तर. व मंदिर मस्जिद वादात स्वारस्य नाही मग काशी मथुरेतल्या आमच्या इनिसियेटिव्ह बद्द्दल काही बोलू नका. आम्ही तिथे हवं ते करू. व तिथले लोकल पोलिस बघून घेतील.
हाय काय अन नाय काय !!!
काळा पैसा परत आणणार प्रथम -
काळा पैसा परत आणणार
प्रथम - तो काळा पैसाच आहे हे कशावरून ? रामदेव यादव आरडाओरडा करतात म्हणून ???
दुसरे म्हंजे - भारतीयांनी स्विस ब्यांकेत ठेवलेला पैसा हा भारताच्या ट्रेड डेफिसिट ला मारक म्हणून काम करतो. आणि ट्रेड डेफिसिट च्या नावानं बोंबलायला जगातल्या सगळ्या देशातले सगळे राजकारणी (भाजपा अपवाद नाही) एका पायावर तयार असतात.
मग हे परवडणारे का ?
(If I wanted to be cynical ... I would have said that a lot of the people who park their wealth in Swiss bank ... are donors to BJP and Congress alike.)
.
>>रामदेव यादव आरडाओरडा करतात म्हणून
ते बाबा रामदेव आहेत. रामदेव यादव* हे नाव चौदाव्या शतकातल्या देवगिरीच्या राजाचे आहे.
*चौदाव्या सतकातसुद्धा महाराष्ट्रावर यादवच राज्य करीत होते असा एक रोचक विदाबिंदू उपलब्ध होतो. समस्त ठाकरे उगाच भय्यांच्या नावे खडे फोडत असतात.
तसेही तुम्ही छुपे भाजपा
=))
तसेही तुम्ही छुपे भाजपा प्रचारक असल्याची कॉन्स्पिरसी थियरी आहेच ;)
त्यांच्या पर्यायातली उत्तरं निवडली तरच त्यांना उत्तर काढता येतं असं दिसतंय
+१
मात्र त्यातल्यात्यात जवळचा पर्याय निवडला, आणि तसंच जे निकष अधिक महत्त्वाचे आहेत, ते 'मोस्ट', 'मोअर' इंपॉरटन्ट म्हणून योग्य प्रकारे मार्क केले तर उत्तर बरेच बरे आले.
या बातमीनुसार केजरीवाल यांना
या बातमीनुसार केजरीवाल यांना निवडनुकीनंतर आअपच्या उमेदवारांवर अधिक भीषण किंवा त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "रीयल" हल्ले होतील अशी शक्यता दिसते.
तिथे पुण्यात ब्राह्मण नावे
तिथे पुण्यात ब्राह्मण नावे निवडून मतदारयादीतून वगळण्यात येत आहेत/आली आहेत अशी कॉन्स्पिरसी थिअरी ऐकली.
आधी अण्णा जोश्यांचा इतिहास आहे आणि आता त्यात बापटांची वर्णी लागली असल्याने ऐकले असावे.
मुसलमानांप्रमाणेच ब्राह्मण गठ्ठ्याने मतदान करतात का?
भाजपाचे काही तुरळक गठ्ठे आहेत पण उर्वरीत सगळे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीला मत देतात असा अनेक वर्षांचा अनुभव आहे.
एकगठ्ठा?
>> मुसलमानांप्रमाणेच ब्राह्मण गठ्ठ्याने मतदान करतात का?
देशभरातले मुसलमान एकगठ्ठा मतदान करतात हेच मुळात एक मिथक आहे.
हिंदूतल्या लेखाचा दुवा.
ब्राह्मण : माझ्या परिसरात भाजप/शिवसेना/मनसेची बाजू घेणारे ब्राह्मण संख्येनं अधिक आहेत, तर डावे पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा 'आप'ची बाजू घेणारे ब्राह्मण मुख्यतः कलाकार, प्राध्यापक वगैरे गटातले म्हणजे अल्पसंख्य आहेत. बसपा, मुलायम सिंग किंवा अबू आझमी प्रभृतींची बाजू घेणारं कुणीच नाही. अर्थात, प्रत्यक्ष मत कुणाला देत असतील ह्याविषयी खात्रीनं सांगता येत नाही.
प्रत्यक्ष आणि आभासी जग यांतली फारकत
>> मला जालावरती जेवढी ब्राम्हण मंडळी दिसतात सगळी कडवी सेना-भाजप-मनसे ला भयानक शिव्या घालतात.
NDAशी जवळीक साधणर्याला सोडून कुणालाही ही मतदान करत असावीत असे वाटते.
ह्यांच्यातली अगदि, अगदि अल्प, अत्यल्प मंडळी भाजपवाली दिसतात.
मी माझ्या प्रत्यक्ष परिसराविषयी बोलतो आहे. त्यात आप्त/सहकारी वगैरे (पक्षी : ज्यांना मी माझे मित्र म्हणणार नाही असे, पण माझ्या नित्य सहवासातले) अनेक लोक येतात. त्याउलट, आभासी जगात माझ्याही आसपास कट्टर भाजप/सेना/मनसेप्रेमी लोक कमी आहेत; मात्र, मी त्यांच्याशी किंवा ते माझ्याशी गळेपडूपणा करायला जात नाहीत हे त्यामागचं कारण असावं. माझ्या 'फ्रेंड'लिस्टमध्ये नसलेले, पण माझ्या मित्रांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेले जहाल मोदीप्रेमी मी जालावरही पुष्कळ पाहिले आहेत. माझ्या काही मित्रांनी त्यांना कंटाळून त्यांना ब्लॉक केल्याचं मला माहीत आहे. मात्र, ते माझ्या आभासी परिसरात आहेत असं म्हणता येत नाही, कारण त्यांचं गरळ मला पाहावं लागत नाही.
एकगठठा
देशभरातले मुसलमान एकगठ्ठा मतदान करतात हेच मुळात एक मिथक आहे.
१. १९४७ पूर्वी मुस्लिम काँग्रेसला मतदान करत नसत. आता तेव्हा (नि आताही) ही काँग्रेस धर्मनिरपेक्ष होती हे विसरायला नको.
२. आजही मुस्लिम हिंदुत्ववादी पक्षाला, कोणत्याही किमतीने हरवायला बघतात. http://twocircles.net/2009may22/muslims_hate_bjp_bjp_often_wins_muslim_…
इथे भारतातल्या सर्वात अधिक मुस्लिम असलेल्या ७० लोकसभा मतदारसंघांत कोण जिंकते याचा अनालिसिस आहे. त्याचा अर्थ असा काढू नये कि मायनॉरिटीत असताना अशा चूका करतात.
३. मुस्लिम तर मतदानाच्या बाबतीत प्रचंडच कट्टर आहेत. ते जाऊच द्या. बाकी सगळ्या जातीही अशाच आहेत. ब्राह्मण देखिल एकगठठा* भाजपला मत देतात.
४. प्रत्येक राज्यात प्रत्येक पक्षाचा लोकसंख्येचे जातीनिहाय विभाजन नि उमेदवारांचे जातीनिहाय विभाजन यांचा एक पॅटर्न असतो.
५. २०१४ मधे मोदींमुळे 'अधिकृत' राजकारण जातीकारणापासून दूर गेले आहे. कदाचित धर्मकारणावर आले आहे वा विकासकारणावर आले आहे.
तरी अजून बरेच खालीच बरबटलेले आहे.
६. पक्षाचे - मतदारसंघाचे आणि उमेदवाराच्या जातीचे एक समीकरण सर्वत्र बनते. लातुर मधे लोकसभेसाठी मराठे बीजेपीचे, लिंगायत काँग्रेसचे, इ इ. सहसा उमेदवार बदलला तरी पक्ष त्याच मतदारसंघात (आरक्षण नसल्यास) उमेदवाराची जात बदलत नाही.
७. मुस्लिम बाबरी नंतर भाजपला कोण हरवतो ते असेस करतात. मग तसा फतवा निघतो. भितीमुळे मुस्लिम मतदान जास्तीत जास्त टक्के होते. म्हणून ते डीसिसीव असते.
८. वेगवेगळे अलायन्सेस बनणे याला जातीय समीकरणे बनण्यापलिकडे अर्थ नसतो. यदियुरप्पा भ्रष्ट असूनही भाजपत आपली पार्टी विलिन करतो कारण तो नसला तर भाजपला ती विनिंग मार्जीन मिळणारच नाही.
९. भारतात १००० राजकीय पक्ष असतील. सगळ्या जगात मिळून इतकी राजकीय तत्त्वज्ञाने नसतील.
१०. मोदी हे पारंपारिक मतदाराला (धर्म, जात पाहणाराला) मोठे कंफ्यूजन आहे. म्हणून आपल्या दुव्यात गुजरातचे मुसलमान भाजपला उ प्र पेक्षा जास्त मतदान करतात असे दाखवते. असे व्हायलाच नको. वास्तविक (२००२ मधे दंगली केल्या अशी प्रतिमा असणार्या) गुजराती मायनोरीटी ओबीसी (तथाकथित) कट्टर हिंदूला मुस्लिम बहुल मतदारसंघांत विजय (आणि वर मुसलमानांची मते देखिल ) मिळायचे कारण नाही.
११. २०१४ मधे मोदीला मी हरवतो म्हणून विपक्षांत अहमहमिका माजली आहे. उ प्र त अपक्ष, सपा, बसपा, काँग्रेस, आप सगळे भाजपशी लढताहेत. अर्थातच भाजप जिंकणार. पण तो 'फतवा' प्रत्येक मतदारसंघात नीट पास झाला तर हारणार.
१२. विदेशात ओपिनिअन पोल मधे मतदारांचे जे वर्गीकरण असेल त्याचा निकष वेगळा असावा. भारतात सरळ कोणत्या जातीच्या/धर्माच्या टिपीकल माणसाने कोणाला मत टाकले पाहतात. हे काय एकगठठा मतदान नाही म्हणून का?
* एकगठ्ठा म्हणजे - ८०-८५%+, १००% नव्हे.
ब्राह्मण मतदारांना वगळलं आहे
ब्राह्मण मतदारांना वगळलं आहे का ते नाही माहीत पण कसबा आणि कोथरूड भागातल्या हजारो लोकांची नाव वगळली गेली आहेत. बरं असं नाही की हे नवे मतदार होते. अनेक लोकांकडे वोटर आयडी होतं. यातल्या अनेक लोकांनी ७-८ महिन्यांपूर्वी महानगरपालिकेसाठी मतदान केलं होतं. तरीही नावं वगळली गेली आहेत. हा योगायोग वाटत नाही.
+१कित्येकांची नावे वगळली
+१
कित्येकांची नावे वगळली आहेत, आमच्या घरातही काल हा अनुभव आला. माझ्या कुटुंबातील अर्ध्या सदस्यांची नावे वगळलेली होती. त्यांनी त्याच पत्त्यावर गेले ३-४ निवडणूकांत मतदान केले आहे.
माझ्या परिचितांपैकी काहिंचे निवासस्थान गेली २५ वर्षे तेच असूनही यावर्षी नाव वगळले गेले होते.
मतदान झाल्याची टक्केवारी मोठी दिसते आहे कारण एकूण मतदारसंख्या कमी झाली आहे की खरेच अधिक व्यक्ती बाहेर पडल्या हे कळायला मार्ग नाही :(
बाकी हा अनुभव माझ्या परिचयातील ब्राह्मण तसेच अब्राह्मण दोन्ही मंडळींना आला. इतकेच नाही तर आमच्या घरी पोळ्या लाटायला येणार्या मावशी, वॉचमन वगैरे आर्थिक निम्न स्तरावरील मंडळींनाही हा अनुभव आला. तेव्हा हे एकाच जाती किंवा वर्गाला टार्गेट केलेले वाटत नाही.
अनेक जातींतले लोक
>> बाकी हा अनुभव माझ्या परिचयातील ब्राह्मण तसेच अब्राह्मण दोन्ही मंडळींना आला.
सहमत. टीव्हीवर ज्यांचा उल्लेख झाला अशांतही अनेक जातींचे लोक होते.
जाताजाता : फेसबुकवर वावरणारे अनेक लोक मतदानाच्या दिवशी केंद्रावर जाऊन अपयशी परतले हे पाहून मात्र गंमत वाटली. एलेक्शन कमिशनच्या संस्थळावर याद्या पाहता येत होत्या. त्यात आधी नाव शोधणं शक्य होतं. मतदानाच्या साधारण महिनाभर आधी माझ्या एका मित्राला अशा शोधानंतर आपलं नाव गायब झाल्याचं कळलं. त्यानं रीतसर अर्ज केला (तोही ऑनलाईन करता येत होता), त्यानंतर त्याचं नाव पुन्हा दाखल झालं आणि तो काल मत देऊन आला.
+१
फेसबुकच्या नियमित वापरकर्त्यांनी ऑनलाइन तपासलं नसेल तर महत् आश्चर्य आहे.
(खरं तर ज्यांना ज्यांना इंटरनेट नामक तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल ज्यांना माहिती आहे ; त्या
सगळ्यांनी precaution म्हणून नाव तपासून घ्यावं ह्या मताचा मी आहे. पण तसे म्हटल्यास
"आम्हाला सांगणारा तू कोण" असा निरुत्तर करणारा प्रश्न येण्याची शक्यता असल्याने गप्प बसतो.)
मी स्वतः ऑनलाइन तपासलं. अर्ज केल्यावर नाव योग्य त्या यादीतही आलं. मद्दानही केलं.
ऑनलाइन नाव तपासता येतं हे ठाउक आहे. पण ऑनलाइन अर्जही करता येणं शक्य आहे ही सर्वस्वी नवीन माहिती आहे.
मी काही ठिकाणी चौकशी केली, ऑनलाइन प्रकिया संभव आहे काय ह्याची.
पण कुणालाच पत्ता नव्हता. मग मला हार्ड कॉपीज् घेउन अर्ज करायला लागला.
इथे अधिक तपशील देउ शकाल काय ऑनलाइन अर्ज करण्याचा ?
.
.
बादवे, ज्यांना आपली नावे मतदार यादीत दिसली नाहित, त्यांनी सार्यांनीच ऑनलाइन तपसलं नव्हतं असं समजायचं का ?
की ऑनलाइन नाव दिसते आहे; पण प्रत्यक्ष यादीत, मतदान केंद्रावर नाव नाही; असे कुणाचे झाले आहे ?
तसे झाले असेल तर मग खरोखर अधिकच मोठ्ठा घोळ आहे.
ऑनलाईन हेच फायनल
>> ऑनलाइन नाव दिसते आहे; पण प्रत्यक्ष यादीत, मतदान केंद्रावर नाव नाही; असे कुणाचे झाले आहे ?
तसे झाले असेल तर मग खरोखर अधिकच मोठ्ठा घोळ आहे.
>> माझं नाव प्रत्यक्ष यादीत आहे, पण ऑनलाईन यादीत नाही.
ऑनलाईन यादीत नाव नसणं हे धोक्याचं आहे. मी ज्यांच्याविषयी ऐकलं त्या सर्वांचीच जुन्या यादीत नावं होती, पण जी सगळ्यात अद्ययावत आहे त्या मतदान आयोगाच्या संस्थळावरच्या ऑनलाईन यादीत नावं नव्हती. आता इतक्या उशीरा त्यावर काही करता येईल का ह्याविषयी साशंक आहे.
यादीतून गायब झालेलं नाव घालण्यासाठी माझ्या मित्रानं मतदान आयोगाच्या संस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज भरला होता. हा दुवा.
शंका
गंभीरपणे विचारत आहे. अर्ज केल्याची काही पोचपावती, रिसिप्ट वगैरे मिळते का ?
तिचा वापर करुन RTI वगैरे वापरुन ह्या प्रकरणांचा छडा लावता येतो का ?
मला नक्की कल्पना नाही; कारण मी मागितल्यावरही मला पोचपावती दिली गेली नव्हती.
बरे, काम करणारी माणसे NGO ची स्वयंसेवक, म्हणजेच फुक्टात काम करणारी होती.
घरी येउन कागदपत्र वगैरे स्वतःहून नेताहेत म्हटल्यावर मीसुद्धा मग फारसं ताणत बसलो नाही.
पण ह्याऐवजी जर मी सरकारी हापिसात गेलो असतो तर पोचपावती,acknoledgement वगैरेसाठी त्यांच्या उरावर नक्कीच बसलो असतो.
होय
पोच पावती मिळते.
त्यासाठी सर्कारी कचेरीत जावे लागते. फॉर्म ६ (नाव नोंदणी करणे) + फोटो आयडेन्टिटी कागदपत्र (पॅन कार्ड इ.) + पत्ता पुरावा कागदपत्र (इले. बिल इ.)
सर्व कागदपत्रे हे अटेस्टेड (फॅमिली डॉक्टरची सहीदेखिल चालते) असावी लागतात.
काम होते. १००% टक्के (स्वानुभव).
असं ऐकण्यात आलं (बातम्यांमधे)
असं ऐकण्यात आलं (बातम्यांमधे) की जे भाजप/शिवसेनेचे परंपरागत किल्ले समजले जातात, उदा. कोथरुड, कसबा पेठ, त्या भागांत यादीतून नाव गायब होण्याचे प्रकार सगळ्यांत जास्त घडले आहे. आता यादीत नावच नसल्याने किती लोकांसोबत हे घडले याची नक्की आकडेवारी मिळणं मुश्किल आहे. असो कॉन्स्पिरसी थेअरी वगैरे सोडलं तरीही हे निवडणुक आयोगाच्या यंत्रणेचं साफ अपयश आहे.
आज एक नवीन कंडी ऐकायला मिळाली. कलमाडींनी म्हणे काल दुपारनंतर इंजिन चालवलं (म्हणजे मनसेकरता मतदान घडवून आणलं).
ईव्हीएम बिघाड, नावे गायब
काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याच्या बातम्याही आल्या आहेत http://www.loksatta.com/pune-news/evm-changed-after-shivsenas-complaint…
एका बातमीत पुण्यात काही ठिकाणी १५-२० % मतदारांची नावे गायब असल्याचे वाचले.
असे गोंधळ ह्याच प्रमाणात आधी ही व्हायचे की यावेळी मिडियामुळे कानावर येत आहेत ?
कलेक्टर
बोंबाबोंब तर भलतीच जोरात आहे. मिदियात बातमी आहेच. आम पब्लिकनंही म्याटर सिरियसली घेतलेलं दिसतय.
तिकडं भाजपचे उमेदवार शिरोळे उपोषणाला बसलेत.
"आप"चे सुभाश वारेही आंदोलन करु म्हणताहेत.
पुणे जिल्ह्याचा जो कुणी कलेक्टर आहे त्याला लै महागात पडेल; त्याच्या करियरच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा
येइल असं दिसतय.
+१
लोकांना तपासायची सोय आहे, आणि ती याच कारणासाठी आहे, वगैरे सगळे ठीक आहे. पण तरीही, असे तपासणे ही नागरिकाची प्राथमिक जबाबदारी असू नये.
किंबहुना, असे तपासण्याची मुळात गरज असणे हे निवडणूकप्रक्रियेच्या/यंत्रणेच्या विश्वासार्हतेस तडा देणारे आहे. (मग संभाव्य गैरप्रकाराची बेनिफिशियरी काँग्रेस/भाजप/मनसे/शिवसेना/अन्य कोणीही असो.)
शंभराहून अधिक?
>> नाव नसलेल्या लोकांचा आकडा(१ लाख वगैरे) कसा काय काढला आहे ह्याबद्दल माहिती कुठेच मिळत नाही.
ह्या बातमीनुसार -
यादीतून नावे गायब झालेल्या शंभरहून अधिक मतदारांची प्रतिज्ञापत्रे आवश्यक कागदपत्रांसह अॅड. विनायक अभ्यंकर यांनी निवडणूक आयोगाला सादर केली आहेत.
लाख शंभराहून अधिक असतात हे माहीत आहे, पण बातमीतली भाषा विश्वासार्ह मानली तर प्रतिज्ञापत्रांचा आकडा खूपच कमी असावा. मग पुनर्मतदानाच्या मागणीला निवडणूक आयोग कितपत महत्त्व देईल?
पण मी काञ म्हंटो, मोदी एकदा
पण मी काञ म्हंटो, मोदी एकदा येऊदे किंवा न येऊदे. काय तो निकाल लागल्यावर पाहू की कुणाला किती शिव्या घालायच्या किंवा कुणाची भलामण करायची ते. इतका कंठशोष कशापायी?
बाकी अजोसाह्यबांच्या पंखापक्षात गरगरा फिरणारा पंखा म्हणून आमची अॅडिशन पुनरेकवार केली जावी अशी इणंती करतो. त्याच त्या वीट आणणार्या डूम्सडेष्टैल पोष्टींचा प्रतिवाद दणकून करावा तर अजोंनीच. माण गये.
बाकी श्रेणीदानाचा डिस्क्लेमर राहूनच गेला ओ. तस्मात विनोदी सोबतच भडकाऊ, निरर्थक, खोडसाळ, इ.इ. सुद्धा येऊद्या प्लीज. मोदी चुकूनमाकून पंप्र झालाच तर कॉन्संट्रेशन कँप सुरू होतील त्याआधीची शेवटची मजा म्ह. चांगले आहे, नैका?
अर्थातच. पण हवेतल्या हवेत लोक
अर्थातच. पण हवेतल्या हवेत लोक लै वायबार काढतात फुक्कटचे त्याबद्दल म्हणतोय.
मोदींनी गुजरातमध्ये शून्यातून सगळं उभारलं आणि प्रत्येक गोष्टीत भारतात गुजरात नं.१ आहे म्हण्णारे काय आणि ते मोदी=हिटलर म्हण्णारे काय, सारखेच मूर्ख. पण यातला एकाच प्रकारचा मूर्खपणा लोक सहन करतात ते रोचक वाटतं.
जेटली फायनान्स!?
जेटली फायनान्स!!
मला वाटलं होतं त्यांना गृह मिळेल!
मग गृह खातं कोणाला? राजनाथ? अडवाणी? की अमित शहा!? ;)
अरे मनमोहन सिंग यांनी ऑफीस
अरे मनमोहन सिंग यांनी ऑफीस रिकामं केल्यावर तिथे कोणाला तरी बसायला नको का? ;)
शिवाय कार्यक्षम पंतप्रधान होणारेत नं ते! :P
सग्गळं कस्सं बै वेळेआध्धीच उरकतात नैतर आधीचे पंतप्रधान! (कवतिकाने मोडे मिचकावणारी स्मायली)
अबकी बार शरद पवार?
लोकमतने आज पहिल्या पानावर एक बातमी प्रसिद्ध केली आहे. मोदी यांना रोखण्यासाठी पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दर्शविली असल्याचे या बातमीत म्हटले आहे. भाजपाला बहुमत मिळणार नाही. किमान काही जागांची गरज पडेल, हे गृहितक त्यामागे आहे. असे झाल्यास "अब की बार, मोदी सरकार" ऐवजी "अब की बार, शरद पवार" असे म्हणण्याची वेळ येईल. मतमोजणीला काही तास उरले असताना, ही खलबते सुरू आहेत.
बहुतांश वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलांनी भाजपाला बहुमताजवळ नेऊन बसविले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र भाजपाला २५९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.
दुसरीकडे भाजपाने आपले मंत्रिमंडळही ठरवून टाकले आहे, असे वाहिन्यांवरील बातम्यावरून दिसते. अजून कशात काही नाही. "बाजारात तुरी, अन् भट भटणीला मारी", असाच हा प्रकार आहे. एक दिवस वाट पाहण्याचाही धीर भाजपावाल्यांना नाही. भाजपाची सत्ता येणारच आहे, असे गृहित धरले तरीही अशा प्रकारचा उतावीळपणातून सत्ता लालसा बटबटीतपणे समोर येते. हे राजकिय परिपक्वतेचे लक्षण नक्कीच नाही.
कोण कुणाचे मिंधे?
>> लोकमतने आज पहिल्या पानावर एक बातमी प्रसिद्ध केली आहे. मोदी यांना रोखण्यासाठी पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी दर्शविली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
लोकमत समूहाची मालकी दर्डांकडे आहे आणि सकाळची पवारांकडे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल ह्या पेपरांत जे काही लिहून येतं त्याला मी फारसं महत्त्व देत नाही. हां, काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांवर हलकट टिप्पण्या करतात ते मनोरंजनासाठी वाचता येईल एवढाच काय तो त्यांचा उपयोग.
मालकी
मालकी असली तरी हे वृत्तपत्रसमूह कधीच स्वतःला मुखपत्र म्हणवून घेत नाहित.
सामना, पांचजन्य्,विवेक वगैरेंनी निदान मुखपत्र असल्याचं घोषित तरी केलय.
लोकमत , सकाळ हे वारंवार आपण कसे निष्पक्षपाती आहोत असं सांगत असतात.
स्वतः प्रताप पवारांचं पूर्वी रविवारच्या पुरवणीत एक सदर यायचं ; त्यात इतर अनेक गोष्टींसोबतच
वारंवार निष्पक्षपाती असल्याचं सांगितलं जाइ. ते पाहून मौज वाटे.
बाबा रामदेव सुद्धा वारंवार आपला आणि भाजप,संघ, विहिंप असा कुण्णा कुण्णाशी संबंध नाही असे
सांगत असतात. फक्त चुकुन, योगायोगाने दरवेळी त्यांच्याच व्यासपीठावर असतात.
भाजपसाठीच मतेही मागतात. मजा आहे.
नैतर काय, कोण्याही
नैतर काय, कोण्याही सर्वेकराने, २००४ नि २००९ मधे काय चूका झाल्या, त्या कशा सुधारल्या, इ इ काहीही सांगीतले नाही. नि २००४ मधे एन डी ए ची इतकीच 'हवा' होती. म्हणून उद्या यू पी ए लिंडींग ३०० सीट्स अशी बातमी आली तर नवल नको वाटायला. आणि एन डी ए आलं तरी तो तुक्का असू शकतो.
http://ibnlive.in.com/news/se
http://ibnlive.in.com/news/secular-parties-should-join-hands-and-elect-…
ममतांना नेता बनवू - रशिद अल्वी. त्याही गोटात हालचाली आहेत.
भाजपा मॅनिफेस्टो
भाजपाने आपला मॅनिफेस्टो प्रकाशित केला आहे. (इथे)
काही हायलाईट्सः
-- काळा पैसा परत आणणार
-- पोलिस फोर्स, निवडणुकांचे रिफॉर्म
-- हाय प्रायॉरीटी रुरल एरीआज निर्माण करणार
-- NPA अबॉलिश करणार
-- ३७०, समान नागरी कायदा, राम मंदीर हे जुने मुद्दे समाविष्ट
-- काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन
-- आदिवासींसाठी 'वन बंधु कल्याण योजना' राबवणार
-- महागाई रोखण्यासाठी पुढिल पावले ताबडतोपीने उचलणारः
- put in place strict measures and special Courts to stop hoarding and black marketing.
- setting up a Price Stabilisation Fund.
- unbundle FCI operations into procurement, storage and distribution for greater efficiency.
- leverage on technology to disseminate Real time data, especially to farmers - on production, prices, imports, stocks and overall availability.
- evolve a single 'National Agriculture Market'.
- promote and support area specific crops and vegetables linked to food habits of the people.
बाकी, जोशी गुर्जींच्या प्रीफेसच्या पहिल्याच वाक्याला अडखळलो: 'India is the most ancient civilization of the world'