Skip to main content

वर्तमानाचा अभन्ग

देवा तुझे किती
सुंदर आकाश
झोपड्या भकास
पृथ्वीवर....
येशू तूझी किती
दयाळू नजर
प्राण्यांचा गजर
उत्सवाला ....

खुदा तुझी दुनिया
आबादी आबाद
माणूस बरबाद
फक्त येथे .....
बुद्धा तुझी कुठे
अहिंसा अहिंसा
युद्धाची मीमांसा
कोण करी .....
सारे धर्म, पंथ
ठेवले खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ......

- अशोक थोरात.
अमरावती.
९९६००४८८७८

ऋषिकेश Thu, 09/08/2012 - 13:11

वा!

सारे धर्म, पंथ
ठेवले खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ......

मस्त!

आणि हो!.. ऐसीअक्षरेवर स्वागत! :) येत रहा लिहित रहा!

तिरशिंगराव Mon, 12/11/2012 - 20:47

In reply to by ऋषिकेश

शेवटच्या चार ओळी विशेष आवडल्या. लिहित रहा.

अजित विश्वनाथ भागवत Fri, 25/01/2013 - 22:27

कल्पना आणि साधेपणा आवडला.