वर्तमानाचा अभन्ग
अशोक थोरत…
देवा तुझे किती
सुंदर आकाश
झोपड्या भकास
पृथ्वीवर....
येशू तूझी किती
दयाळू नजर
प्राण्यांचा गजर
उत्सवाला ....
खुदा तुझी दुनिया
आबादी आबाद
माणूस बरबाद
फक्त येथे .....
बुद्धा तुझी कुठे
अहिंसा अहिंसा
युद्धाची मीमांसा
कोण करी .....
सारे धर्म, पंथ
ठेवले खिशात
शस्त्रसज्ज हात
पूजेसाठी ......
- अशोक थोरात.
अमरावती.
९९६००४८८७८
मस्त!
वा!
मस्त!
आणि हो!.. ऐसीअक्षरेवर स्वागत! :) येत रहा लिहित रहा!