Skip to main content

पतंजली

कोणी कोणी वापरलाय पतंजली ची औषधे मॅगी नुड्डेल, कपड्याची पावडर,शोचकूप साफ करायची पावडर, इत्यादी इत्यादी..?
कसा आहे तुमचा अनुभव? इतर कंपनीच्या प्रॉडक्ट हुन?
मला प्रश्न पडतो डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली? फक्त बाबाजीच्या(थोर गरु) खरंच गुणवत्ता आहे जी बाकीच्या कंपनीहुन?
टीप-बाकीचे उत्पादकही 'देशी च' आहेत.

अतिशहाणा Thu, 06/04/2017 - 20:11

In reply to by अनुप ढेरे

येस. पेस्ट चांगली आहे. आवळा कँडी, बेल कँडी वगैरे चांगले आहेत. शांपू चांगला आहे. तूपही चांगलं आहे. बिस्किटं, नूडल्स वगैरे फारसे आवडले नाहीत.

आदूबाळ Thu, 06/04/2017 - 14:35

मला प्रश्न पडतो डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली? फक्त बाबाजीच्या(थोर गरु) खरंच गुणवत्ता आहे जी बाकीच्या कंपनीहुन?

थोडा विचार‌ क‌रा की नाना...

बिटकॉइनजी बाळा Fri, 07/04/2017 - 17:16

In reply to by आदूबाळ

म्हणजे?
पतंजलीचे च्यवनप्राश वगैरे उत्तराखंडमधल्या पौर्णिमेला विशाल निरामय चंद्रप्रकाशात आणि चांदण्यात कुटून इत्यादी तयार करत नाहीत??

तिरशिंगराव Thu, 06/04/2017 - 14:42

मोग‌ऱ्याचा सुगंध अस‌लेला साब‌ण‌ही चांग‌ला आहे.

चिंतातुर जंतू Thu, 06/04/2017 - 15:00

>>डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून<<

त्या ख‌र‌ंच‌ संशोध‌न‌ क‌र‌तात का आणि केलं त‌र न‌क्की क‌शाविष‌यी, ह्याविषयी म‌ला शंका आहे. काही व‌र्षांपूर्वी एक आयुर्वेद‌त‌ज्ज्ञ भेट‌ला होता. तो म्हणाला की (उदा.) ख‌ऱ्या पारंप‌रिक रेसिपीनुसार च‌व‌न‌प्राश‌ केलं त‌र त्याची किंम‌त काहीच्या बाही होईल. म्ह‌णून ह्या कंप‌न्या त्यात वाटेल त्या स्व‌स्त गोष्टी घालून ते स्व‌स्तात विक‌तात आणि न‌फा क‌माव‌तात‌. प‌ण ते अस्स‌ल च्य‌व‌न‌प्राश‌ अस‌ण‌ंच‌ श‌क्य‌ नाही हे मी केव‌ळ किंम‌तीव‌रून सांग‌तो. आयुर्वेदिक उत्पाद‌नांना द‌र्जाची ह‌मी काही न‌स‌ते कार‌ण त्यात‌ काही प्र‌माणीक‌र‌ण‌च‌ नाही. त्यामुळे असं काहीही केलेलं ख‌पून‌ जातं.

घाटावरचे भट Fri, 07/04/2017 - 09:28

In reply to by चिंतातुर जंतू

>>म्ह‌णून ह्या कंप‌न्या त्यात वाटेल त्या स्व‌स्त गोष्टी घालून ते स्व‌स्तात विक‌तात आणि न‌फा क‌माव‌तात‌.

ख‌रंय. च्य‌व‌न‌प्राशात भोप‌ळा आणि गुल‌क‌ंदात कोबीप‌त्ता हे त‌र स‌ग‌ळ्यात कॉम‌न आहे.

सामो Thu, 06/04/2017 - 18:04

यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली?

इथे ऐसीवाले नाही खूप विचातर‌ क‌रुन धागा काढ‌त प‌ण व‌र‌ तुम्ही आलात भ‌साभ‌स‌ फुट‌क‌ळ् धागे काढुन त‌स्स‌च‌ ;) =))
ज‌स्ट किडिंग‌ ब‌र्का.

सामो Thu, 06/04/2017 - 18:11

In reply to by बॅटमॅन

अरे कॉफी पिते आहे ;) ख‌र‌च‌ .... दुस‌री चाल‌लीये ;)

https://scontent.xx.fbcdn.net/v/t1.0-0/p526x296/17796056_182477605602346_8339044156369454178_n.jpg?oh=a0f71cf1d00bc8b863851c41dd8e1a1f&oe=599125E8
.
फीलींग‌ टु अॅड‌वेन्च‌र‌स्. डोंब‌ल्याच‌ं हापिसात काय अॅड‌वेन्च‌र क‌र‌णार्?
कॉफी ची किक‌ हेच अॅड्वेन्च‌र =))

चिमणराव Fri, 07/04/2017 - 13:07

१) तो म्हणाला की (उदा.) खऱ्या पारंपरिक रेसिपीनुसार चवनप्राश केलं तर त्याची किंमत काहीच्या बाही होईल.
२)च्यवनप्राशात भोपळा आणि गुलकंदात कोबीपत्ता हे तर सगळ्यात कॉमन आहे.
दोन्ही अतिरंजित विधानं वाटतात.

चिंतातुर जंतू Fri, 07/04/2017 - 13:54

In reply to by चिमणराव

विशिष्ट‌ उदाह‌र‌णं सोडून द्या ह‌वी त‌र. आयुर्वेदिक उत्पाद‌नांम‌ध्ये प्र‌माणीक‌र‌ण न‌स‌ण्याविषयीच्या दोन बात‌म्या पाहा :
FDA demands guidelines for ayurvedic drugs (१४ मे २०१६)
Regulatory body for ayurveda a must: Experts (१० एप्रिल २०१५)

मनीषा Sat, 08/04/2017 - 09:49

प‌त‌ंज‌लीचा गुल‌क‌ंद‌ अस‌तो का?
मी ब‌हुदा तोच‌ वाप‌र‌लाय‌. चांग‌ला होता.

दिव्य‌ फार्म‌सी चे दिव्य‌ पेय आणि मुलेठी क्वाथ‌ आण‌ले होते. पाण्यात‌ उक‌ळून, गाळून प्याय‌चे.
म‌ला चांग‌ला फाय‌दा झाला त्याचा.