पतंजली
कोणी कोणी वापरलाय पतंजली ची औषधे मॅगी नुड्डेल, कपड्याची पावडर,शोचकूप साफ करायची पावडर, इत्यादी इत्यादी..?
कसा आहे तुमचा अनुभव? इतर कंपनीच्या प्रॉडक्ट हुन?
मला प्रश्न पडतो डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली? फक्त बाबाजीच्या(थोर गरु) खरंच गुणवत्ता आहे जी बाकीच्या कंपनीहुन?
टीप-बाकीचे उत्पादकही 'देशी च' आहेत.
संशोधन
>>डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून<<
त्या खरंच संशोधन करतात का आणि केलं तर नक्की कशाविषयी, ह्याविषयी मला शंका आहे. काही वर्षांपूर्वी एक आयुर्वेदतज्ज्ञ भेटला होता. तो म्हणाला की (उदा.) खऱ्या पारंपरिक रेसिपीनुसार चवनप्राश केलं तर त्याची किंमत काहीच्या बाही होईल. म्हणून ह्या कंपन्या त्यात वाटेल त्या स्वस्त गोष्टी घालून ते स्वस्तात विकतात आणि नफा कमावतात. पण ते अस्सल च्यवनप्राश असणंच शक्य नाही हे मी केवळ किंमतीवरून सांगतो. आयुर्वेदिक उत्पादनांना दर्जाची हमी काही नसते कारण त्यात काही प्रमाणीकरणच नाही. त्यामुळे असं काहीही केलेलं खपून जातं.
आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये प्रमाणीकरण
विशिष्ट उदाहरणं सोडून द्या हवी तर. आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये प्रमाणीकरण नसण्याविषयीच्या दोन बातम्या पाहा :
FDA demands guidelines for ayurvedic drugs (१४ मे २०१६)
Regulatory body for ayurveda a must: Experts (१० एप्रिल २०१५)

बिस्किटं/ कॉर्नफ्लेक्स/मध
बिस्किटं/ कॉर्नफ्लेक्स/मध सुमार आहेत पतंजलीची. पेस्ट चांगली आहे.