30 मीटर व्यासाच्या दूरादर्श प्रकल्पात भारताचा सहभाग

आंतर्राष्ट्रीय सहभागाने अंतरिक्ष निरीक्षणासाठी एक विशाल दूरादर्श अमेरिकेतील हवाई राज्यामधील सर्वात उंच म्हणून गणल्या गेलेल्या मौना की (Mauna Kea) या पर्वतावर स्थापन करण्यासाठी एक प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. या दूरादर्शामधील अंतर्गोल आरशाचा व्यास 30 मीटर एवढा विशाल होणार असल्याकारणाने या प्रकल्पाचे नामाभिधान "30 मीटर दूरादर्श" (TMT) असे करण्यात आले आहे. अशी अपेक्षा आहे की या दूरादर्शामधून शास्त्रज्ञाना 1300 कोटी (13 billion) प्रकाश वर्षे पूर्वीचे विश्व, बघणे शक्य होणार आहे.

2014च्या डिसेंबर महिन्यात, भारताने या प्रकल्पात सहभागी होण्याला अधिकृत मान्यता दिली. भारताशिवाय या प्रकल्पात अमेरिका, जपान, कॅनडा आणि चीन हे देश सहभागी रहाणार आहेत. 2014 ते 2023 या कालात भारत या प्रकल्पात 100 कोटी रुपये गुंतवणूक करणार असून यापैकी 30 टक्के गुंतवणूक रोख व बाकीची गुंतवणूक या दूरादर्शाच्या भागांचे भारतात जे प्रस्तावित उत्पादन निरनिराळ्या उद्योगांमध्ये केले जाणार आहे त्यांच्या स्वरूपात असणार आहे.

कोणत्याही दूरादर्शासाठी, त्याची प्रकाश ग्रहण करण्याची आणि दोन एकमेकांच्या अगदी जवळ दिसणार्‍या आकाशस्थ ज्योतींमधील फरक विशद करण्याची,( resolve small detail) या दोन्ही क्षमता त्या दूरादर्शाच्या ऑब्जेक्टिव्ह ( प्राथमिक रितीने अंतरिक्षातून येणारा प्रकाश ग्रहण करून तो एकत्रित करण्याचे कार्य करणार्‍या) असलेल्या भिंग किंवा आरसा यांच्या व्यासावर (diameter or aperture) मुख्यत्वे अवलंबून असतात. हा व्यास जेवढा मोठा तेवढ्या त्याच्या या दोन्ही क्षमता अधिक असतात. भारतात सध्या कार्यान्वित असलेल्या सर्वात मोठ्या दूरादर्शातील आरशाचा व्यास फक्त 2 मीटर आहे. ( हा दूरादर्श लडाख मधील हानले गावाजवळील सरस्वती या पर्वतावर आहे). नैनिताल जवळील देवस्थल येथे बांधल्या जाणार्‍या नवीन दूरादर्शाच्या आरशाचा व्यास 3.6 मीटर एवढा असणार आहे. यावरून वाचकांना कल्पना येऊ शकेल की मौना की वरील 30 मीटर दूरादर्शाच्या क्षमता केवढ्या प्रचंड असणार आहेत.

कोणत्याही दूरदर्शामध्ये ऑब्जेक्टिव्ह्चे कार्य, आरसा किंवा भिंग यांच्यामुळे करता येते. भिंगाचा ऑब्जेक्टिव्ह म्ह्णून वापर केलेल्या दूरादर्शांना रिफ्रॅक्टिंग दूरादर्श (dioptrics) या नावाने तर आरसा वापरलेल्या दूरादर्शांना रिफ्लेक्टिंग दूरादर्श (catoptrics) असे म्हणतात. काही दूरादर्शांमध्ये या दोन्हीचा वापर केला जातो त्यांना कॅटॅडायोप्ट्रिक दूरादर्श (Catadioptric telescopes) या नावाने संबोधले जाते. मात्र कोणताही मोठ्या आकाराचा दूरादर्श हा नंतरच्या दोन प्रकारातीलच असावा लागतो. याचे सोपे कारण असे आहे की डिस्टॉर्शन न येऊ देता आकाशस्थ ज्योतींची प्रतिमा हुबेहुब निर्माण करू शकेल असे भिंग बनवण्यासाठी मुळात आवश्यक अशी काचेची एवढी मोठी स्लॅब काचेचा रस ओतून तयार करणे हे मोठे कठीण कार्य आहे व अशी स्लॅब जरी ओतली तरी त्यातून बहिर्गोल आकाराचे एवढे मोठे भिंग घासून बनवणे हे तर अशक्यप्रायच असते. त्या मानाने वक्रता दिलेले आरसे बनवणे सोपे असते व त्यांना पॅरॅबोलिक किंवा हैपरबोलिक वक्रता देणे सहज साध्य होते.

मात्र 30 मीटर एवढ्या मोठ्या व्यासाचा, अखंड आणि पाहिजे तसे कार्य करू शकणारा आरसा बनवण्याचा विचार सुद्धा करता येत नाही कारण असे करणे जवळ जवळ अशक्यप्रायच आहे. असा आरसा बनवलाच तर तो अत्यंत वजनदार होईल आणि मध्यभागी गुरुत्वाकर्षणाच्या बलाने लवकरच खचेल व त्याचा आकार डिस्टॉर्ट होईल. अशा आरशाची देखभाल करणेही अत्यंत जिकिरीचे ठरेल. मौना की पर्वतावर जपानी तंत्रज्ञांनी बांधलेला सुबरू या नावाचा आणखी एक दूरादर्श उभारलेला आहे. जुलै 2011 मध्ये या दूरादर्शातील आरशावर कूलण्ट गळती झाली. या अपघातामुळे या दूरादर्शाच्या कार्यावर जबरदस्त परिणाम झाला. आवश्यक ती दुरूस्ती आणि देखभाल करून दूरादर्शाला पूर्वस्थितीत आणण्यासाठी ( या देखभालीमध्ये बारकाईने केलेली तपासणी आणि खराब झालेल्या भागांची स्वच्छता याचा अंतर्भाव होता.) तंत्रज्ञांना तब्बल दोन वर्षे लागली व दूरादर्श परत कार्यान्वित होण्यासाठी 2013 सालच्या उन्हाळ्याची वाट पहावी लागली.

या प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची वेळ येऊ नये म्हणून TMT च्या आराखड्यात एकच ऑब्जेक्टिव्ह आरसा न वापरता 1.44 मीटर आकाराचे 492 अष्टकोनी आरसे एकमेकाला जिग-सॉ-पझल सारखे जोडून एक मोठा आरसा बनवण्याचे ठरवले गेले आहे. या प्रत्येक अष्टकोनी आरशाचे, तिन्ही अक्षांवरील स्थानांचे (Position) 3 प्रिसिजन अ‍ॅक्चुएटर्स (precision actuators) वापरून नियंत्रण करण्यात येणार आहे. 1 मायक्रॉन ( मिमीचा 1/100 भाग) पर्यंतच्या अचूकतेने जर तिन्हीपैकी कोणत्याही अक्षावर आरशाचे स्थान पाहिजे त्या ठिकाणापासून ढळलेले आढळले तरी हे प्रिसिजन अ‍ॅक्चुएटर्स त्या आरशाला योग्य त्या स्थानी परत आणतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे या 492 अष्टकोनी आरशांचा मिळून एक महाकाय 30 मीटर व्यासाचा अखंड आरसा तयार होणार आहे.

एकूण 492 अष्टकोनी आरसे, त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक 1500 अ‍ॅक्चुएटर्स आणि आरसे ज्या आधारभूत स्ट्रक्चरवर उभे राहणार आहेत आणि नियोजित रितीने (एकत्रितपणे एकच आरसा म्हणून) कार्य करणार आहेत ती संपूर्ण बांधणी या सर्वांचे उत्पादन, चाचण्या आणि पुरवठा हे करण्याची जबाबदारी भारताने अंगावर घेतलेली आहे. या संपूर्ण व्यवस्थेमुळे ही संपूर्ण बांधणी एकच हैपरबोलॉइड आरसा म्हणून कार्यरत राहील. या बांधणीचे बहुतांशी भाग बेंगलुरू येथे उत्पादित केले जाणार आहेत. या शहरात इलेक्ट्रोनिक्स, संगणक प्रणाली आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या विषयांमधील बरेच उच्च तंत्रज्ञान विकसित झालेले असल्याने या बांधणीच्या उत्पादनात या सर्व तंत्रज्ञानाचा कस लागणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स मधे असोसिएट प्रोफेसर असलेले व TMT-India च्या या प्रकल्पाचे संचालक असलेले प्रोफ. ईश्वर रेड्डी यांना असे वाटते की या प्रकल्पातील सर्वात कठीण भाग, या शेकड्यांनी असलेल्या आरशांच्या अष्टकोनी तुकड्यांना एकच विशाल आरशाप्रमाणे हलवणे हा आहे. यासाठी मेकॅनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिक्स आणि नियंत्रण प्रणाली या क्षेत्रांतील नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज भासणार आहे. TMT-India हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, नैनिताल मधील आर्यभट रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ऑबझर्व्हेशनल सायन्स आणि पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेन्टर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स यांच्या भागीदारीत उभा राहिलेला आहे.

प्रो. रेड्डी यांच्या म्हणण्याप्रमाणे, 2023 मधे पूर्ण होणारा TMT दूरादर्श इतका शक्तीमान असणार आहे की अंतरिक्षात पाठवलेल्या हबल दूरादर्शापेक्षा याची प्रकाश ग्रहण क्षमता 150 पटींनी जास्त असणार आहे. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्यमालेपासून दूर दूर अंतरावरील अंतरिक्षाचे निरीक्षण करणे सहज साध्य होणार आहे. लांबच्या अंतरावरच्या अंतरिक्षाचे आपण निरीक्षण करतो तेंव्हा प्रत्यक्षात आपण भूतकालातच डोकावून बघत असल्याने कालमापन सुरू झाले त्या क्षणाच्या अगदी जवळपासून किंवा महास्फोटाला 5 लक्ष वर्षे पूर्ण झाल्याच्या क्षणी विश्व कसे दिसत होते होते हे बघणे शक्य होणार आहे.

सॅन्टा बार्बारा येथील कॅलिफोर्निया विद्यापीएठाचे चॅन्सेलर आणि TMT च्या संचालक मंडळाचे प्रमुख हेनरी यांग म्हणतात; " भारताने या प्रकल्पात गुंतवणूक करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्याची खात्री अधिक बळकट झाली आहे. भारताने अंगावर घेतलेल्या, अष्टकोनी आरसे, त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक अ‍ॅक्चुएटर्स आणि आरसे ज्या आधारभूत स्ट्रक्चरवर उभे राहणार आहेत ती संपूर्ण बांधणी या सर्वांचे उत्पादन, चाचण्या आणि पुरवठा हे करण्याच्या जबाबदारीमुळे या प्रकल्पाचे कार्य उत्तम रितीने पुढे जाईल.

या आठवड्यात या प्रकल्पाच्या प्रगतीत एक नवीनच अडचण निर्माण झाली आहे. अमेरिकेतील काही मंडळींना हा प्रकल्प म्हणजे हवाईयन लोकांच्या एका पवित्र स्थलावर झालेले अतिक्रमण वाटत असल्याने त्यांनी निदर्शने, सत्याग्रह आणि नेटवर सह्यांची मोहीम वगैरे प्रकारांनी आपला निषेध व्यक्त करणे सुरू केले आहे. ही अडचण लवकरच दूर होईल व प्रकल्पाची कार्य नेटाने पुढे जाईल एवढीच आशा आपण व्यक्त करू शकतो.

15 एप्रिल 2015

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माहिती रोचक.

दूरादर्श हा दुर्बिणीला योग्य शब्द आहे का? दूरदर्शक असा असतो ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण मुळात 'दुर्बीण' असा चांगला सोपा सुटसुटीत शब्द असताना असा (सावरकर चावल्यागत) प्रतिशब्द का शोधायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकेकाळी ऐकलेल्या व्याख्यानांनुसार या दुर्बिणीत वातावरणामुळे होणारं डिस्टॉर्शन (मराठी?) बऱ्याच प्रमाणत कमी करण्याची सोय असणार आहे. वातावरणामुळे होणारं डिस्टॉर्शन कसं तर हवेत, वातावरणात वेगवेगळे थर असतात. या थरांमध्ये वारा वेगळ्या वेगाने वाहते, त्यांची अपवर्तन क्षमता (refractive index) वेगवेगळी असते. हे सगळे फरक फारच सूक्ष्म असले तरीही टीएमटीसारखी वर्धनक्षमता असल्यावर त्याचे परिणाम बरेच जास्त दिसतात. ताऱ्याची वर्तुळाकार चकती दिसण्याजागी चोळामोळा केलेली कागदी ताटली दिसावी तशी प्रतिमा दिसू शकते.

हबल स्पेस टेलिस्कोपपेक्षा मोठ्या दुर्बिणी तेव्हाही जमिनीवर होत्या, तरीही हबलचं महत्त्व वाढलं ते वातावरणाच्या बाहेर असल्यामुळे ताऱ्यांच्या चकत्या वर्तुळाकार दिसल्यामुळे. टीएमटीचे आरसे फक्त पॅराबोला आकारात ठेवण्यासाठी बरंच तंत्रज्ञान - मेकॅनिकल आणि सॉफ्टवेअर - वापरावं लागेल. त्यापुढे वातावरणामुळे होणारं डिस्टॉर्शन टाळण्यासाठी गुंतागुंतीची आणखी एक पायरी. हे आव्हान पार पडल्यानंतर टीएमटी निश्चितच हबलच्या पुढे जाईल.

(हवाईत मौना कियावर बऱ्याच दुर्बिणी आहेत. त्या उंचीवर हवेतल्या बाष्पाचं प्रमाण बरंच कमी होतं. त्यामुळे तिथून अवरक्त किरण (infrared) वापरून खगोलाभ्यास करणं शक्य होतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकेकाळी ऐकलेल्या व्याख्यानांनुसार या दुर्बिणीत वातावरणामुळे होणारं डिस्टॉर्शन (मराठी?) बऱ्याच प्रमाणत कमी करण्याची सोय असणार आहे.

टीएमटी, जीएमटी आणि ईईएलटी हे तिन्ही स्कोप्स ३० मीटर क्लास कॅटेगिरीत येतात, म्हणजे यांचा प्रायमरी (इफेक्टीव्ह) मिरर साधारण ३० मीटर व्यासाचा आहे. तीन्ही प्रकल्प सद्द्ध्या चालू आहेत. त्यातील जीएमटी आणि टीएमटी अ‍ॅडाप्टिव्ह ऑप्टिक्स नक्की वापरणार आहे आणि त्यातून मिळणारी प्रतिमा हबलपेक्षा चांगली असेल याची शास्त्रंज्ञांना खात्री आहे.

अ‍ॅडाप्टिव्ह ऑप्टिक्स

टीएमटी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने रेडीओ अस्ट्रानॉमर्स करतच आहेत. दृश्य प्रकाशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर करण्याची ही पहिल्ीच वेळ असणार आहे. शिवाय मुख्य आरसा एकसंध नसेल. त्यामुळे कमीतकमी पैसे खर्च करून जास्तीतजास्त चांगल्या प्रतिमा मिळवणं हे टीएमटी समोर असणारं मोठं आव्हान असेल. ('जनहितार्थ जारी' व्हिडीओजमध्ये गुलाबी चित्रं रंगवली तरीही दुर्बीण बांधताना सगळ्यात मोठं आव्हान हे असेल, असं वाटतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'आई मी येऊ का' (;)) संस्थेत ह्या दुर्बिणीबद्दलचे व्याख्यान ऐकले होते. 'ज्योतिर्विद्या परिसंस्था' ह्या पुण्यातल्या हौशी खगोलप्रेमींच्या संस्थेने ह्या दुर्बिणीची लहान प्रतिकृती (परस्परप्रमाण राखत) बनवली होती. दूरादर्श शब्द अजिबात आवडला नाही. 'न'वी बाजूंशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बायनाक्युलर आणि टेलिस्कोप यांच्यात फरक करता यावा म्हणून दुर्बिणीऐवजी "दूरादर्श" असा शब्द वापरला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

माहितीपूर्ण लेख.

माझेही दोन पैसे.

३ मीटर व्यास आणि ३० मीटर व्यास यांच्यातला फरक हा सर्वच बाबतीत प्रचंड आहे. एकतर व्यास दहापट झाला की क्षेत्रफळ १०० पट होतं. त्यामुळे गोळा करता येऊ शकणारा प्रकाशही १०० पट होतो. जितका जास्त प्रकाश एखाद्या ताऱ्याकडून किंवा तारकासमूहाकडून गोळा करू शकू तितकंच तयार होणारं चित्र हे अधिक रेखीव आणि सुस्पष्ट असतं. म्हणजे लहान दुर्बिणीतून एखादा तारकापुंज हा नुसताच एक अंधुक ठिपका दिसत असेल, तर मोठ्या दुर्बिणीतून त्यातले वेगवेगळे तारे आणि त्यांची वेगवेगळी प्रकाशमानता दिसू शकेल. वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर चार प्रकाशवर्षं लांब असलेला तारा नुसताच एक पांढरा ठिपका म्हणून दिसतो. याउलट आपल्याला सूर्य जवळून दिसत असल्यामुळे त्यावरचे ठिपकेही दिसू शकतात.

मात्र जितका व्यास मोठा करू तितकाच तो आरसा तयार करण्याचा कठीणपणाही वाढतो. चंद्रशेखरांनी काचेच्या भिंगाविषयी लिहिलेलं आहेच. भिंग जितकं मोठं करायला जाऊ तितकं वजन वाढतं. आणि हे वजन व्यासाच्या वर्गाच्या प्रमाणात नाही, तर घनाच्या प्रमाणात वाढतं. म्हणजे व्यास दहापट केला तर वजन हजारपट होतं. हॅलेचा धूमकेतू वगैरे बघण्यासाठी लागणारं भिंग आठ इंची वगैरे असतं. ते हौशी लोकांना घरी तयार करता येऊ शकतं. मात्र त्याच्या चौपट व्यास करायचा झाला तर त्यासाठी प्रचंड खर्च येतो.

आरशांच्या बाबतीतही हा प्रश्न हळूहळू येतो. तीस मीटरचा एकच एक आरसा तयार करणं हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे अनेक 'लहान' आरसे शेजारी शेजारी बसवून त्यांचा एक सलग आरसा तयार केला जातो. तरीही डिस्टॉर्शनचा प्रश्न सुटत नाही. कारण प्रत्येक आरशाचा प्रत्येक लहान भाग कायम त्या एकसंध आरशाच्या विशिष्ट ठिकाणी राहील अशी व्यवस्था करावी लागते. लेखात उल्लेख केलेले अॅक्च्युएटर्स हे काम करतात. समजा काही कारणाने एखादा आरसा किंचित तापला किंवा थंड झाला तर त्याच्या मोठ्या आकारामुळे दर डिग्रीला काही मायक्रॉन प्रसरण किंवा आकुंचन पावू शकतो. त्यामुळे अर्थातच त्याचा पृष्ठभाग वर किंवा खाली होऊ शकतो. हा झालेला बदल दुरुस्त करण्यासाठी मागे लावलेल्या अॅक्च्युएटर्सनी तो खेचला किंवा ढकलला जाऊ शकतो. ४९२ आरशांसाठी ही रचना करणं हे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट काम आहे.

हवेमुळे जे डिस्टॉर्शन होतं त्यामुळे आपल्याला पृथ्वीवरून लांबचं बघायला त्रास होतो. यासाठी अॅडॉप्टिव्ह ऑप्टिक्स वापरतात. म्हणजे ज्या प्रमाणात चित्र डिस्टॉर्ट झालेलं असेल त्याचा अंदाज घ्यायचा आणि ते दुरुस्त करण्यासाठी आरसा त्याच्या 'विरुद्ध प्रमाणात' डिस्टॉर्ट करायचा. एवढ्या प्रचंड आरशासाठी अनेक आरसे एकाच वेळी बदलण्याची गरज पडते. त्यामुळेही हे तांत्रिकदृष्ट्या महाकठीण असतं.

या पानावर अॅडॉप्टिव्ह ऑप्टिक्सचं काम कसं चालतं हे दाखवणारा छोटासा व्हिडियो आहे.

हे सगळं करण्यात भारताचा मोठा सहभाग आहे हे वाचून बरं वाटलं. त्यातही रोख पैसे कमी आणि पार्ट्स तयार करून देण्याची जास्त जबाबदारी, हेही आवडलं. कारण त्यामुळे इथेच तांत्रिक ज्ञानाची जोपासना आणि नोकऱ्याही तयार होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळं करण्यात भारताचा मोठा सहभाग आहे हे वाचून बरं वाटलं.

केवळ वास्तव काय आहे याची माहिती असावी म्हणून.
१०० कोटी =~ १६ मिलीयन डॉलर्स.
टेलिस्कोपचं बजेट १ बिलीयन डॉलर्सच्या आसपास आहे. इंटेलचा संस्थापक मूर आणी त्याची बायको यांनी ६०० मिलियन डॉलर्सची देणगी दिली आहे.

भारत सहभागी आहे यात आनंदच आहे, अपेक्षा जास्ती आहे इतकंच. भारताने किती सहभाग घ्यायला हवा वगैरे वादांत पडायची इच्छा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

पण मग काय ...

एकूण 492 अष्टकोनी आरसे, त्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक 1500 अ‍ॅक्चुएटर्स आणि आरसे ज्या आधारभूत स्ट्रक्चरवर उभे राहणार आहेत आणि नियोजित रितीने (एकत्रितपणे एकच आरसा म्हणून) कार्य करणार आहेत ती संपूर्ण बांधणी या सर्वांचे उत्पादन, चाचण्या आणि पुरवठा हे करण्याची जबाबदारी भारताने अंगावर घेतलेली आहे.

हा जरी फार मोठा भाग वाटत असला TMTचा (फिजिकली असेलच पण एकंदरीत सुद्धा) तरी प्रत्यक्ष जागा, बिल्डींग, बाकीच्या यंत्रणा यांच्या मानाने खरंच कमी आहे की मुळात अमेरीकेत २०० मिलीयन डॉलर्सला पडणारं काम भारतात १६ मिलीयनमधे होतंय असं काही आहे? विशेषतः गेली दोनेक वर्ष सातत्याने १$ = ६०रुपये च्या जवळपास असणारा चलनबदलदर बघता??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

1 मायक्रॉन ( मिमीचा 1/100 भाग)

छिद्रान्वेषीपणाबद्दल आगाऊ मापी करा पण १ मायक्रॉन = १/१००० मिमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1 मायक्रॉन ( मिमीचा 1/100 भाग)
............१ माय्क्रॉन = १ मिलिमीटरचा १००० वा भाग. १०० वा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे आभार.
१. मायक्रॉन म्हणजे मिमी चा १/१००० भाग हे बरोबर आहे. लेखात चूक झालेली आहे. ती दर्शवून दिल्याबद्दल आभार.
२. मला दूरादर्श हा शब्द जास्ती रुचतो म्हणून वापरला आहे. कोणाला तो पसंत नसल्यास त्यांनी वापरू नये इतकेच मी म्हणेन.
३. राजेश म्हणतातः
"हे सगळं करण्यात भारताचा मोठा सहभाग आहे हे वाचून बरं वाटलं. त्यातही रोख पैसे कमी आणि पार्ट्स तयार करून देण्याची जास्त जबाबदारी, हेही आवडलं. कारण त्यामुळे इथेच तांत्रिक ज्ञानाची जोपासना आणि नोकऱ्याही तयार होतील."

माझ्याही मताने हेच महत्त्वाचे आहे. अमेरिकेत पैसे देणारे अनेक असतील. भारताने जो वाटा उचलला आहे त्याचा भविष्यकाळात तांत्रिक ज्ञानाच्या जोपासनेसाठी मोठा उपयोग होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२. मला दूरादर्श हा शब्द जास्ती रुचतो म्हणून वापरला आहे. कोणाला तो पसंत नसल्यास त्यांनी वापरू नये इतकेच मी म्हणेन.

रुचण्याबाबत प्रश्न नाहीच. तो योग्य / बरोबर / अचूक आहे का या अंगाने प्रश्न विचारले गेलेत. दूरादर्श या शब्दाची फोड दूर + आदर्श अशी होऊ शकते पण त्याचा अर्थ दूरचे दाखवणारा असा होऊ शकतो का याविषयी शंका आहे.

दूरदर्शक हा शब्द कदाचित योग्य ठरला असता. जड आहे की हलका हे त्यापुढचं झालं.

लेख अर्थातच उत्तम आहे. या शब्दाचा लेखाच्या माहितीपूर्णतेशी संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टिंकूतैंनी याआधीच्या धाग्यावर सांगितलेले तुम्ही वाचले नाही का? काय शब्द वापरावा याने काय फरक पडतो? तुम्हाला आवडेल तो शब्द वापरा. योग्य/बरोबर/अचूक आहे का हे विचारायचे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी दूरादर्श हा शब्द वापरतो याला थोडी कौटुंबिक पार्श्वभूमीही आहे. 1950 च्या सुमारास पुण्यात ज्योतिर्विद्या परिसंस्था ही बरीच कार्यरत होती. (सध्या आहे किंवा नाही याबद्दल मला माहिती नाही.) माझे आजोबा नारायण महादेव आठवले, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे संचालक गोपाळराव परांजपे वगैरे मंडळी संस्थेच्या कामात उत्साहाने भाग घेत असत. त्यांच्या पुष्कळ चर्चा आमच्या घरीसुद्धा होत असल्याने मोठ्या दुर्बिणींना दूरादर्श म्हणायचे हे माझ्या मनात लहानपणापासून ठसलेले आहे. त्यामुळेच हा शब्द मी सहजपणे वापरतो. त्याची फोड बरोबर का चूक याचा मी विचार केलेला नाही. या साठीच मी माझ्या आधीच्या प्रतिसादात ज्यांना हा शब्द योग्य वाटत नाही त्यांनी तो वापरू नये असे म्हटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्योतिर्विद्या परिसंस्था पुण्यात अजुनही कार्यरत आहे.
टिळक स्मारक मंदिरामध्ये त्याचे ऑफिस आहे.
http://jvp.org.in/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणतः असे आंतरराष्ट्रीय प्रकल्प असतात त्यात ज्या देशाने जेवढा पैसा दिला आहे साधारण तेवढ्या किंमतींची कंत्राटं त्या देशाला मिळतात. या प्रकल्पातून भारतात परदेशी पैसे येतीलच याची खात्री नाही. पण रोजगार निर्मिती होईल; संपूर्ण जगातलं तंत्रज्ञान पुढे जाण्यासाठी मदत होईल त्याचा फायदा भारतालाही होईलच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>मला दूरादर्श हा शब्द जास्ती रुचतो म्हणून वापरला आहे.

मेरे मन को भाया....वगैरे.

बाकी लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नारळीकरांच्या 'प्रेषित' मधल्या "सायक्लॉईड" (नावातील चुभूदेघे) ची आठवण आली. (नाव बरोबरे ना?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्याचे नाव सायक्लॉप्स होते. ग्रीक पुराणांतल्या एक डोळा असणाऱ्या कोणत्या तरी राक्षसावरून होते बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय सापक्लॉप्स! आभार!

या सायक्लॉप्स प्रोजेक्टचा विकी दुवा
शिवाय हा पीडीएफ पेपरही रोचक व रंजक असावा (मी सध्या तरी ४-५ पानेच वाचलीयेत - एकुण १४ एम्बी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सायक्लॉईड म्हणजे तो इंजिनिअरिंग फर्स्ट ईयरला ग्राफिक्समध्ये काढायला लावतात तो कर्व्ह ROFL एपि आणि हायपोसायक्लॉईड असे त्याचे दोन भाऊही आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं