आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे
आधीच्या भागात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू करत आहोत.
============
या आठवड्यात २२.०३.१५ आणि २८.०३.१५ दोन वेळा हॉटेल सोनाई येथे जाण्याचा चान्स मिळाला. अप्रतिम चव, हवेशीर ठिकाण, आणि हॉटेलचा व्युव,सेवेला सदा तत्पर असणारे कर्मचारी यामुळे सोनाई हॉटेल खूपच आवडलं.सोनाई स्पेशल ग्रीन पनीर आणि व्हेज महाराजा त्याचबरोबर व्हेज अंडाकरी यांची चव तर खूपच अप्रतिम आहे. विशेष मला तिथे वेगळी वाटलेली गोष्ट म्हणजे जेवण वाढण्याची/ ठेवण्याची भांडी काहीशी अनोखी होती.पण एवडी सुरेख होती कि त्यावरून नजरच हटत नव्हती. बाहेरचा मोकळा पेसेज, लौंन एकंदरीत सर्वच गोष्टीसाठी हॉटेल सोनाई मला वेगळे आणि खास वाटले.
व्हेज अंडाकरी??
व्हेज अंडाकरी??
व्हेजिटेरियन कोंबडीची अंडी
व्हेजिटेरियन कोंबडीची अंडी असतील. ;)
तिच तर खासियत आहे. बटाटा
तिच तर खासियत आहे. बटाटा कोरून आतमध्ये पनीर भरून व्हेज अंडाकरी केली जाते.
रामा! काय पण सोस...
रामा! काय पण सोस...
माणसाने जगण्यासाठी खाऊ नये तर
माणसाने जगण्यासाठी खाऊ नये तर खाण्यासाठी जगावे
कुठे आहे हे?
कुठे आहे हे?
..काय हे?...किती काळ मराठी
..काय हे?...किती काळ मराठी आंजावर आहात?.
..गावबीव लिहिलेलं नसलं की पुणे एवढी साधी गोष्ट म्हाईत नाई?
पण बहुतेक या केसमधे ते पुणे
पण बहुतेक या केसमधे ते पुणे नाहीय. शिर्डी आय थिंक.
अरेच्चा होय की. पामराला
अरेच्चा होय की. पामराला क्षमा असावी. ह्या अपराधाबद्द्ल पुण्याचा पाहुणचार घेण्याची शिक्षा देउ नये ही विनंती. ;)
( लिहीताना पामर हा शब्द स्त्रीलिंंगी वापरत नाही किंवा कसं असा विचार आला.)
"पामरा" स्त्रीलिंगी आहे की.
"पामरा" स्त्रीलिंगी आहे की.
मॅाडेल कॅालनीत टिएन(TIEN)
मॅाडेल कॅालनीत टिएन(TIEN) येथे जरा हटके आणि डाएट काॅन्शस लोकांना मानवेल असा मेन्यु आहे. ग्रिल्ड चिकन विथ डेमीग्लेस साॅस अॅन्ड मॅश्ड पोटॅटो हा पदार्थ खाल्ला. साॅस अफलातून होता. साॅस चिकन, पोटॅटो मॅश आणि सोबत दिलेल्या स्टिर फ्राय व्हेज सगळ्याचा थोडा तुकडा घेउन खाल्ला तर स्वर्ग होते. मी दररोज किमान महिनाभर हा पदार्थ खाऊ शकेन.
पनीर सॅन्डविच ( ज्यात ब्रेड ऐवजी एक आख्खी स्लाइस पनीरची होती) पण भारी लागले.
डाएटींग
छान!
डाएटिंगची व्याख्यादेखिल बदलते आहे वाट्टं! ;)
...
झीरो-कार्ब, अॅटकिन्स, वाट्टेल-तेवढे-प्रोटीन्स-खा-हवे-तर-फ्याटसुद्धा-खा-पण-कार्ब-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-वैट्ट-दुष्ष्ष्ष्ष्ष्ट!!!!!! वगैरेंच्या पठडीतील एखादा डाएट असू शकेलसुद्धा.
आज स्वयंपाक करताना मध्येच
आज स्वयंपाक करताना मध्येच ग्यास संपल्याने चरफडत उठून जाऊन मगरपट्ट्यात पराठे खावे लागले.
ब्याटू आणि स्वयम्पाक??? क्या
ब्याटू आणि स्वयम्पाक??? क्या हो रहा है यह??
धुरंधर अंडी
धुरंधर अंडी आठवली.
www.maayboli.com/node/49746
www.maayboli.com/node/49748
जबरहीई... लेख आणि पाकृ
जबरहीई... लेख आणि पाकृ दोन्ही. आता लक्ष्मीबाई धुरंधरांचे पुस्तक शोधणे आले.
...
अजून छापात असेल का हे पुस्तक? साधारणतः मला वाटते पहिल्या महायुद्धाच्या आसपासच्या काळातले असावे.
अंग्रेज़ों के ज़माने वाली क़िताब आहे, एवढे निश्चित. शिवाय, लेखिका ही त्या काळच्या इंग्रज साह्यबाच्या पुढेपुढे करणार्या जातींपैकी असल्याने, इंग्रज साहेबास जर मडमेसह कधी घरी जेवावयास बोलावले (आणि तो मडमेसहवर्तमान टपकला), तर त्यांस काय खायला करून घालावे, किती कोर्सचा काय मेनू असावा वगैरे हेसुद्धा त्या पुस्तकात कधीकाळी वाचल्याचे स्मरते. शिवाय इंग्रजांकडील त्या काळातील 'आधुनिक' वगैरे चुलींची चित्रे, 'क्यारवे सीड' वगैरे कोणत्याही आम हिंदुस्थान्याने बापजन्मीसुद्धा कधी न ऐकलेल्या गोष्टींचा ज़िक्र, 'मेयोनेज़ अथवा अंड्याचे चालते बोलते सॉस' अशा चित्रविचित्र नावाच्या पाककृती, झालेच तर कोंबडीच्या सुपाच्या रेशिपीची 'एक कोंबडीचे पिल्लू घ्यावे. त्यास मारून त्याची पिसे काढावीत.' इथपासून सुरुवात, अशा मसाल्याने आमच्या भटुरड्या बालपणी आमचे चांगलेच रंजन केल्याचे स्मरते. (आमच्या तीर्थरूपांच्या ब्याचलरहुडाच्या जमान्यातली एक अत्यंत ट्याटर्ड अथवा चिंध्या झालेली, पिसे काढलेली चालती बोलती आवृत्ती आमच्या बालपणी आमच्या घरात पडीक असे. असो.)
म्हणूनच वाचायचं
म्हणूनच वाचायचं आहे.
स्वातंत्र्यानंतर "हो, आम्ही सायबाच्या पुढेपुढे करणार्यांपैकी होतो" असं कबूल करणारे लोक एकदम अदृश्य झाले. हि. हा. रावबहाद्दुर चिंतामणरावजी ढमुक वगैरे लोकांच्या आत्मचरित्रात/आठवणींतही "आम्ही गोर्या माकडांशी सामोपचाराने वागण्याचा बेमालूम देखावा करून आतून सशस्त्र क्रांतिकारकांना मदत करत असू" वगैरे गॅस दिलेला असतो. त्यामुळे त्याकाळच्या अशा वर्गाचं खरं प्रतिबिंब पाकृंचं पुस्तक वगैरेमध्येच सापडेल.
...
मुद्द्यात दम आहे.
संस्थानिकांच्या वरिजिनल
संस्थानिकांच्या वरिजिनल डायर्यांमध्ये असा मजकूर मिळतो. दक्षिण महाराष्ट्रातील एका संस्थानिकांच्या वहीत १८५७ च्या 'बंडवाल्यां' बद्दल अगदी अनुदार उद्गार काढलेले आहेत अन त्यांचे म्होरक्ये पकडल्याबद्दल आनंद वगैरे व्यक्त केलेला आहे.
कोलकात्यातले बीफ जॉइंट्स
कोलकात्यातले बीफ जॉइंट्स
कोणी Land-O-Lakes चे पीच
कोणी Land-O-Lakes चे पीच योगर्ट खाल्लय का? बाप रे!! It's a savagely delicious assault on tongue. फारच मस्त आहे. ग्रीक योगर्टहूनही खूप चविष्ट. अन परत दहीसम असल्याने प्रिबायॉटिक्स + कॅल्शिअम हे फायदे आहेतच.
कोंढव्यातील एका केटररने
कोंढव्यातील एका केटररने बनवलेली अप्रतिम बिर्यानी खाल्ली. त्याला बिर्यानीभूषण पुरस्कार द्यावा अशी शिफारस या टिकानी या माद्यमातूण कर्न्यात येत हाये....
नक्की कुठे?
नक्की कुठे?
पत्ता विचारून टाकतो इथे. एका
पत्ता विचारून टाकतो इथे. एका कलीगने ऑर्डर केली होती.
तिथले दावत आणि निझाम्स
तिथले दावत आणि निझाम्स बिर्याणीवाले फ़ेमस आहेत
ओके, पाहतो तिथे.
ओके, पाहतो तिथे.
हुम्मूस + पिटा/ता ब्रेड हे
हुम्मूस + पिटा/ता ब्रेड हे काँबो अलीकडेच खाण्यात आले, लय आवडले.
माझा ही आवडता प्रकार. गरम गरम
माझा ही आवडता प्रकार. गरम गरम हुम्मुस खायला मजा येते. बाणेर च्या पोस्ट-९१ मधे आणि एफ.सी रोडच्या 'बाय-द-वे' मधे छान मिळतं हुम्मूस.
धन्यवाद, मी खाल्ले ते सीझन्स
धन्यवाद, मी खाल्ले ते सीझन्स मॉल मगरपट्टा इथल्या फूड कोर्टात.
नरम गरम
गरम हुम्मस की पिटा?
उप्प्स पिटासोबत* राहिलं
उप्प्स पिटासोबत* राहिलं वाटतं.. बरोबर :)
गरम गरम पिटासोबत* हुम्मुस खायला मजा येते.
हम्मुस घरी करणे अतिशय सोपे
हम्मुस घरी करणे अतिशय सोपे आहे. वेळ गावला की टाकतो रेशिपी
अवश्य टाका, हे करून बघण्याचा
अवश्य टाका, हे करून बघण्याचा विचार आहे.
आता हा एक हात-दाखवून-अवलक्षण
आता हा एक हात-दाखवून-अवलक्षण किंवा हाय-कंबख्त-तूने-पीही-नहीं टैप प्रतिसाद आहे, पण पिटा आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे काँबिनेशन कमाल लागतं.
पिटा मंजे मऊ पोळीसारखाच नै का
पिटा मंजे मऊ पोळीसारखाच नै का शेवटी, त्यामुळे ते चांगले लागेलच. यद्यपि मला द्रव पदार्थासमवेत पिटा आवडणार नाय.
अमनोरामधील चारकोल ग्रिल
अमनोरामधील चारकोल ग्रिल अजिबात आवडले नाही .मेन कोर्स ठीक ठाक होता .
अमनोरा मॉलच्या आवारातील
अमनोरा मॉलच्या आवारातील बार्बेक्यू नेशनमध्ये पान कुल्फी खाण्याचा योग आला. बाकी सगळे बकवास होते पण डेझर्ट्सनी ती उणीव भरून काढली. पान कुल्फी हा प्रकार निव्वळ अफलातून आहे.
कामात ब्युगुल रॉक
बंगलोर मध्ये अडिगा , अ २ ब , नागार्जुना , मस्त कलंदर , खाना खजाना अशी एकाहून एक 'खाद्यापिठे ' आहेत . पण मला कामात ब्युगुल रॉक मधले उत्तर कर्नाटकी ढंगाचे जेवण खूप आवडले. बसवनगुडी मध्ये हे उपहारगृह आहे. जेवताना वेळेला विसंगत राग वाजवत केविलवाणे पेटी -तबला वाले कल्लाकारी पेश करत असतात. पण जेवण चविष्ट.
उत्तर कर्नाटक पद्धत म्हणजेच
उत्तर कर्नाटक पद्धत म्हणजेच "करावली मील्स" का?
नाही सांगता येणार !
@ आदुबाळ - नाही सांगता येणार मला.
उत्तर कर्नाटकी भोजनात ज्वारी , शेंगदाणा , तीळ ह्यांचा वापर जास्त तर दक्षिणेत तांदूळ , नारळ , वेलची दालचिनी इ वर भर असा माझा समज .
कर्वे रोडजवळ चायनीज रूमला
कर्वे रोडजवळ चायनीज रूमला गेले होते . जेवण आवडले . veg Cantonese stew rice , veg crispi saiwoo ,baked dumplings आवडलं. एकुणात बरेच पदार्थ उत्तम आहेत .