मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १५
व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---------------
थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाला लाल रक्त पेशी देता येतात तसे चांगले कॉलेस्ट्रॉल (बहुदा एच डी एल) सुद्धा इंजेक्शन / सलाइन द्वारे देता येणे शक्य नाही का?
हृद्यरोगावर ही पद्धत "प्रिव्हेन्टिव्ह मेजर" या पद्धतीने काम करू शकेल ना? या दृष्टीने काही संशोधन झाले आहे का?
टोटल कॉलेस्ट्रॉल हा माझ्या
टोटल कॉलेस्ट्रॉल हा माझ्या माहिती प्रमाणे फक्त रेशो आहे.
In healthy individuals, about 30% of blood cholesterol, along with other fats, is carried by HDL.[1] This is often contrasted with the amount of cholesterol estimated to be carried within low-density lipoprotein particles, LDL, and called LDL-C. HDL particles remove fats and cholesterol from cells, including within artery wall atheroma, and transport it back to the liver for excretion or re-utilization; thus the cholesterol carried within HDL particles (HDL-C) is sometimes called "good cholesterol" (despite being the same as cholesterol in LDL particles).
एच डी एल वाढवले तर ते रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहिलेले फॅट आणि इतर कॉलेस्ट्रॉल घटक काढायला मदत करते आणि ब्लॉकेजेस कमी करायला मदत करते.
"टारझनच्या गोष्टी" नामक अनमोल
"टारझनच्या गोष्टी" नामक अनमोल प्रकाशनाचे शशिकांत कोनकर/रमेश मुधोळकर यांचे जुने पुस्तक कुठे मिळेल? पुण्यात एबीसीमध्ये तीन दुकाने सर्चवली, पण मिळालंच नाही. :(
मला त्या मराठी पुस्तकाची वरिजिनल व्हर्जनच पाहिजे आहे. अन्य कुठलीही नकोय. अनमोलवाल्यांनी त्या जुन्यावाल्या व्हर्जनीत बदल केले असतील तर बदलपूर्व व्हर्जनच पाहिजे.
एडगर राइस बरोज़ वाली इंग्रजी व्हर्जनही नकोय-ती ट्रेडमार्क वल्कले नेसलेला टारझन सिंहाच्या जबड्यात सुरा खुपसतानाचे मुखपृष्ठ असलेली मराठी व्हर्जन पाहिजे.
ही पुस्तकमालिका माझ्याकडे
ही पुस्तकमालिका माझ्याकडे होती. आता जीर्ण होऊन गेली. पण ती परत मिळवायला आवडेल. आउट ऑफ प्रिंट ?
मला तर एखाददोन वर्षांपूर्वी फास्टर फेणेचा एकत्रित संच आला त्या सुमारास हाही संच मॅजेस्टिकमधे दिसला होता. तेव्हा समहाउ फाफे घेतला पण टारझन घेतला गेला नाही. आता हे सर्व कळीचे शब्द ऐकून त्या मंडळींना भेटण्याची इच्छा होतेय.
बादवे मॉन्शर थुरान हा कोणत्या खलनायकाचा दुसरा अवतार असतो ? माझी मेमरी दगा तर देत नाही ना?
आणि हा पुस्तकसंच माझ्यामते कोणी टिकेकर नावाच्या लेखकाने लिहीला (भावानुवादित केला असेल) आहे. मुधोळकर नसावे.
प्रकाशक बहुधा उत्कर्ष (याविषयी मात्र खात्री नाही)
ओक्के.. रॉकॉफचा अवतार..
ओक्के.. रॉकॉफचा अवतार.. सही..
बाकी मी म्हणतोय ते दहा भाग लई म्हणजे लईच भारी आहेत.. ते मिळाले तर आधी घे. आपल्याला पूर्ण त्या त्या जागी घेऊन जाणारे.
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=070514052431&Previ…
हे पहा. मी लहानपणी घेतलं तेव्हा कव्हर वेगळं होतं. एकसारखं आणि साधं.
आता प्रत्येक भागाला वेगळे कव्हर आलेले आहे.
बुकगंगावर औट ऑफ स्टॉक असले तरी औट ऑफ प्रिंट वाटत नाहीये. तिथेच ई बुक मात्र उपलब्ध दिसते आहे.
पुस्तक सापडले का?
"टारझनच्या गोष्टी" पुस्तक online शोधता शोधता इथे येऊन पोहोचलो. माझ्यासारखे उत्सुक अजूनही आहेत हे बघून फार बरं वाटलं आणि पुस्तक एव्हढं दुर्मिळ झालं आहे हे समजून वाईटही वाटलं.
मागील ४-५ वर्षात काही प्रगती झाली का? कोणाला original ( वल्कले नेसलेला टारझन सिंहाच्या जबड्यात सुरा खुपसतानाचे मुखपृष्ठ असलेलं) पुस्तक सापडलं का?
भारतापासून पाकिस्तान वेगळा
भारतापासून पाकिस्तान वेगळा केला गेला तेव्हा धर्माधारित फाळणी झाली. बांगलादेश तयार झाला १९७१ साली, त्याआधी तो पाकचाच भाग होता.
आता प्रष्ण असा, की अख्ख्या उपखंडात पोष्ट-१९७१ पाकिस्तान सोडला तर 'बांगलादेश' मुसलमान मेजॉरिटीवाला कसा काय तयार झाला? बाकी यूपीबिहारात नै झालं असं कै ते? पंजाब, सिंध, इ. बद्दल समजू शकतो, ते भाग सेंट्रल आशिया इ. ला जवळ होते त्यामुळे त्यांचे इस्लामायझेशन समजू शकतो. काश्मीरबद्दलही समजू शकतो. पण मधला सगळा पट्टा सोडून एकदम बांगलादेश कसा काय मुसलमानबहुल झाला? असं नक्की काय झालं तिथं जे अन्य भारतापेक्षा वेगळं होतं?
आरएसएसची थिअरी
आरएसएसची थिअरी ताणून.....
बंगाल मध्ये सर्वप्रथम इंग्रजी राज्य (१७५७) स्थापन झाले. हिंदू त्यांच्या संपर्कात आल्यामुळे प्रबोधन वगैरे झाले. त्यामुळे त्यांना कमी मुले होऊ लागली वगैरे.......................
सिरिअसली....
माझ्या माहितीप्रमाणे बिहार १९१२ मध्ये वेगळा झाला. तोवर तो बंगाल प्रेसिडेन्सीतच होता. तेव्हाची डेमोग्राफी ठाऊक नाही.
...
प्रश्न संयुक्त बंगाल प्रांताच्या डेमोग्राफीचा नसून, बंगालचा जो हिस्सा आज बांग्लादेश म्हणून ओळखला जातो (आणि वंगभंगात वेगळा करण्याचे घाटिले होते), तेवढ्याच भूभागाच्या डेमोग्राफीबद्दल असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
(अतिअवांतर: 'बंगाल प्रेसिडेन्सी' हा शब्दप्रयोग येथे तितकासा उचित वाटत नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे, 'बंगाल प्रेसिडेन्सी'ची मूळ व्याप्ती ही (निदान एके काळी तरी) बंगाल, बिहार, ओरिसा आणि कदाचित आसाम/ब्रह्मदेश इ.इ. इतपतच मर्यादित नसून, 'मुंबई किंवा मद्रास प्रेसिडेन्श्यांत अंतर्भूत न होणारा ब्रिटिश हिंदुस्थानाचा उर्वरित सर्व भाग' अशी (बहुधा व्याख्येने) असावी. बोले तो, ब्रिटिश पंजाब हासुद्धा बहुधा 'बंगाल प्रेसिडेन्सी'खाली यावा.
कदाचित येथे आपल्याला (बोले तो तुम्हांआम्हाला) जो संयुक्त बंगाल अपेक्षित आहे, त्यास 'बंगाल प्रॉव्हिन्स' अथवा 'बंगाल प्रांत' म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे काय? (चूभूद्याघ्या.))
(संदर्भ.)
येस्स
यग्जाक्टलि हाच मुद्दा आहे. धन्यवाद न'वी बाजू.
पूर्व बंगाल या प्रदेशात इतक्या मोठ्या प्रमाणात इस्लामायझेशन कसे काय झाले? सराउंडिंग म्हणाल तर मुसलमानबहुल भाग आजिबात नाहीत कुठल्याच दिशेने.
अन हा भागही अगोदरच मुस्लिमबहुल झाला असावा. पंजाब हा किमान रणजितसिंगाच्या वेळी तरी मुसलमानबहुल असल्याचा उल्लेख आहे. झालंच तर बंगालचे नबाब लोक काय इतके कन्व्हर्जनबद्दल आग्रही म्हणूनही प्रसिद्ध नाहीत म्हणताना शंका.
वाईल्ड गेस
माझा अत्यंत अनाभ्यासु तर्क
मुघल राजवटींच्या वेळी हल्लीचा पाकिस्तान ते बंगाल या पट्ट्यात बरेच मुसलमान वाढले होते. पैकी युपी, बिहार भागात हिंदुंची धार्मिक स्थळेही खूप असल्याने, तसेच बौद्ध धर्माचाही प्रभाव असल्याने तिथे हिंदु सुद्धा बरेच होते. पुढे इंग्रज आल्यावर कलकत्ता, कराची ही मोठी बंदरे तयार झाल्यावर अनेक जनता या दोन पोल्सला एकवटली, त्यात हिंदूंमध्ये जातीव्यवस्थेमुळे प्रत्येकाला काही रोजगार बांधलेला होता. त्यात साधारण १/४ जनता व्यापारी वर्गातली असली तरी तितकीच या पोल्सला स्थलांतरीत झाली बाकीची हिंदु जनता मधेच राहिली. मुसलमान जनतेला तसे बंधन नसल्याने, नोकरी+धंदा अश्या दुहेरी कारणाने ती जनता पूर्वेला व पश्चिमेला गेली. त्यामुळे हे पोलराझेशन झाले असु शकत असेल का?
अर्थात हा अत्यंत वाईल्ड गेस. मुर्ख विचार वाटल्यस सोडून देणे
@अस्मि: मुसलमान आक्रमणे
@अस्मि: मुसलमान आक्रमणे झाल्यानंतर काही वर्षांतच इस्लाम भारतभर पसरू लागला तसा तो बंगालमध्येही पसरला. प्रष्ण त्याबद्दल नाहीये तर 'मुस्लिमबहुल' होण्याबद्दल आहे. बाकी १८ व्या शतकात दिल्लीच्या राजसत्तेची पॉवर अतिशयच कमी झाली होती हे निर्विवादच आहे.
@सलीलः इस्लामचे लोकल फ्लेवर्स कैक ठिकाणी होत होते, आधी मेहदवी अन आता वाहाबी, देवबंदी, इ. चळवळींना ते खपत नाही. ते फ्लेवर्स असूही शकतील, पण 'मेजॉरिटी' पणाबद्दल प्रष्ण आहे.
शंका
ऋषिकेशच्या दहा प्रमुख शंका कोणत्या असाव्यात?
तो इतक्या शंका मांडतो नि इतक्या शंकेखोरपणे मांडतो कि विचारता सोय नाही. शिवाय अलिकडे मोदी सरकार आल्यापासून त्याच्या शंकांना उत आला आहे. सरकार नि राजकारणाचे जाऊ द्या, तो अगदी कोणाला म्हणजे कोणालाच शंकापरीक्षेपासून सोडत नाही. तर अलिकडे त्याला पडलेल्या सर्वात मोठ्या दहा शंका कोणत्या असाव्यात?
मंजे - १. नृपेंद्र मिश्रांना
मंजे -
१. नृपेंद्र मिश्रांना अध्यादेश काढून सचिव बनवले तेव्हा अजून १०० अध्यादेश पोतडीतून येणार का?
२. धर्मेद्र प्रधान "मला" माहित नाहीत तर ऑयल नि गॅस क्षेत्र सांभाळायची क्षमता त्यांच्यात असेल काय?
३. जर्मन आज्जी माझा मोबाईल पळवून नेईल का?
४. ऑर्गॅनिक फूड बनवता येते का (वर लेखकाने येते म्हटले असताना देखिल)?
असले विचार मी करत नाही.
मी प्रश्न मांडतो, कोणत्याही अधिकृत भूमिकेवर शंका घेत नाही. अधिकृत भूमिका मान्य करून मी पुढचे म्हणणे मांडतो.
आणि बाकी जाऊ दे, तो सुप्रसिद्ध कॉसेंट्रेशन कँप विसरलास का?
मला वाटतं की ऋषिकेश हा एक
मला वाटतं की ऋषिकेश हा एक केवळ आयडी आहे. तो स्त्री, पुरुष, मशिन कि अजून काय आहे मला माहित नाही. अरुणजोशी या आयडीचे देखिल असेच असू शकते. जोपर्यंत योग्य त्या न्यायिक अॅफिडेविटवर कोणी माहिती जाहीर करत नाही तोपर्यंत तिला काही अर्थ नसतो.
आणि धाग्यांचे वा प्रतिसादांचे अनेक प्रकार असू शकतात. मागे एका आयडीने (बतुकेच आपणच) अरुणजोशी या आयडीच्या क्षमतांच्या सन्मानार्थ एक फ्लेक्स वाला धागा काढला होता. त्याला बाकी सदस्य morbid reformist intellectual arrogance-cum-sarcasm म्हणाले का?
मैत्री
वर्षभराच्या आतच ऐसी अक्षरेचे सदस्यत्व संकेतस्थलीय कम्यूनिकेशनच्या बाहेरही एकटेपणा घालवायला फार उपयुक्त ठरले आहे. एका वा अनेक प्रकारे समरुचीय (भिन्नविचारी का असेनात)अशा सदस्यांशी स्थळाबाहेरही चांगल्या कम्यूनिकेशला प्रारंभ झाला आहे. सर्कल मधल्या प्रत्येकाने नोकर्या, राहायच्या जागा, इ इ बदलल्याने डोक्यातले विचार मांडायचे कुठे ही भ्रांत मिटली आहे असे म्हणता येईल. या स्थळाच्या सदस्यांच्या जागी (मुख्यत्वे, महाराष्ट्र, अमेरिका) राहत नसताना देखिल (म्हणूनच ही गरज प्रकर्षाने भासली असावी का?) बर्याच इंटरअॅक्शन्स झाल्या ज्या मैत्रिपूर्ण नि इन्फॉर्मल म्हणता याव्यात.
यावरून, जनरली ४० वर्षे वयानंतर, जो मी लवकरच होईन, प्रत्यक्ष आयुष्यात नवी अनौपचारिक मैत्री होणे थोडे दुष्कर असते का? शिवाय क्ष व य दोन लोकांची मैत्री व्हायला, अशा वेळी, त्यांच्या कुटुंबातील सर्व लोकांचे थोडे थोडे तरी जुळणे गरजेचे आहे का? म्हणजे हम तीन और वो तीन असतील तर ३*३ =९ मैत्र्या गरजेच्या आहेत का? आम्ही गुरगावला असू तेव्हा तरी २*२ =४ मैत्र्या दोन कुटुंबांच्या सदस्यांत असत. जेव्हा एखादे काँबो मैत्री नसे, तेव्हा त्या नात्याची खेचायला इतरांना फार मजा येई.
अंदाज
>> महाराष्ट्रात (खासकरून कोकणात) चाकवत, आंबट चुका, राजगिरा आणि लालमाठ या पालेभाज्यांच्या पेरणीचा सीजन कोणता आहे?
ह्या पालेभाज्या बाजारात वर्षभर दिसतात. पाणी मिळालं की पालेभाजीला ते पुरेसं असावं आणि भाजीचं रोपटं खाण्यायोग्य तयार व्हायला फार कमी वेळ लागत असावा असा माझा अंदाज आहे. त्यामुळे वेगळा सीझन नसावा.
बाजारात दिसतात हे खरंय, पण
बाजारात दिसतात हे खरंय, पण नेमके कुठून येतात हा प्रश्न देखील आजकाल महत्त्वाचा आहे. आमच्याकडे कोबी-कॅप्सिकम-टोमॅटो-पालक बारा महिने बाजारात दिसतात, पण इथे ३-४ महिनेच उगवतात. बंगलोर कडून, किंवा उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशाकडून "रबी" हंगामाच्या अधिकाधिक भाज्या आजकाल इथल्या बाजारात आता वर्षभर मिळतात - आणि त्यांच्यावर प्रवासात नेमके काय संस्कार केले जातात देव जाणे.
येथील पालेभाज्यादेखील वर्षभर उगवत नाहीत - बहुतेक देशी प्रकार पावसाळ्यातले (कोलमी शाक, लाल शाक - आपल्या राजगिर्यासारखी, पुईं शाक - मायाळू चा प्रकार), किंवा थंडीतले आहेत (पालक, दोपाटी पालक, माठ, वगैरे).
मला कोणीतरी चाकवत, राजगिरा आणि चुक्याच्या बिया दिल्या. - या पावसाळ्यात लावून बघावे का विचार करत होते.
(जाता जाता - बागकामात रस असलेल्या ऐसीकर आहेत का? "सध्या बागेत काय लावलंय" या मोसमी धाग्याला वाव असेल का?)
होणारे अपत्य पोटात असताना
होणारे अपत्य पोटात असताना महिला जेव्हा कसली कसली चूर्णे, नी सकाळच्या तांब्या-पितळ्यांच्या नादी लागून स्वतःच्या शरीरावर सौष्ठवपूर्ण अत्याचार करून आपला आकार २-३पटीने वाढवतात तेव्हा त्यांना हसावे, कीव करावी की रागवावे हेच समजत नाही! :(
त्या अपत्यात २-३ किलोच्या अधिक वाढिसाठी स्वतःचं आजन्म नुकसान! वाईटही वाटतं नी रागही येतो त्या बायकांचा.
मी कुठे म्हटलंय त्यात वाईट
मी कुठे म्हटलंय त्यात वाईट आहे? नीट वाच मी काय म्हटलंय
नीट संतुलीत खाणे, आणि काहिबाही गोष्टी खाऊन उगाच शरीरे दुप्प्ट-तिपटीने वाढवणे यात फारच मोठा फरक आहे.
त्या काळात बाळाच्या वजनाव्यतिरिक्त काही किलोने वजन भरपूर आराम व उत्तम खाणे यामुळे वाढते ते कबूल आहेच. विविध सप्लिमेंट्सने शरीर बेढब होईल इतके फुगवण्याबद्दल म्हणतोय. अशा बायकांना मग या जाडपणामुळे अनेक व्याधी आयुष्यभर होतात - नी त्या जाडेपणाचेचे त्या व त्याहीपेक्षा त्यांच्या आया समर्थनही करतात व मुलींना भरीस पाडतात ते बघुन प्रचंड राग येतो.
ऋ शी सहमत. संतुलित आणि
ऋ शी सहमत.
संतुलित आणि प्रमाणात खाणे हेच योग्य. जास्त फॅटयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ पोषणाच्या नावाखाली खायला घातले असता आणि हालचाल अजिबात न करता जास्तीतजास्त आराम करण्याने (प्रेग्नन्सीत कष्ट केल्याने विशिष्ट रिस्क अपेक्षित नसतानाही) वजन भरपूर वाढून राहात असतेच. हे बर्याच सुखवस्तू स्त्रियांबाबत होते.
इनफॅक्ट मला या क्षेत्रातल्या डॉक्टरकडून कळलेली माहिती अशी की मूल हे पूर्णपणे पॅरासाईट असते. आईच्या शरीरातून ते आपल्याला हवे ते घटक पूर्णपणे शोषतेच. त्यामुळे आईचे पूर्ण कुपोषण झाल्यावरच बाळाचे कुपोषण होते. एरवी आई सुकेल पण बाळ आपला कोटा वसूल करतेच.
याचा अर्थ लगेच असा घेऊ नये की गर्भाचे कुपोषण होतच नाही. मुद्दा इतकाच की आहारशास्त्रीय दृष्ट्या सकस पण एम्प्टी कॅलरीज आणि फॅट्स कमी असलेला नेहमीचा आहरच चांगला. अधिकच्या अतिरिक्त पोषणाची गरज नाही.
माझ्या एका मैत्रिणीला दर दीड
माझ्या एका मैत्रिणीला दर दीड तासानं भूक लागत असे. नि ते खाऊनही तिचं वजन इतकं वाढलं नव्हतं.
बिंगो! केवळा अधिकच्या आहाराने वजन असं दुपटी-तिपटीनं वाढत नाही.शरीरप्रकृती असतेच पण त्यामुळे गर्भारशीचे जाडपण येतं हे बघितलं आहे. अन् ते कायमस्वररूपी नसतं, केवळ जास्त खाण्याने व चलनवलनाचा अभाव यामुळे ते येतं. पुन्हा व्यायाम सुरू झाला व आहार मंदावला की हे कमी होतं.
जरा सकाळादी वृत्तपत्र वाचलीत तर माझ्या रागाचे कारण समजावे. एक डॉक्टर नसलेले बाबा (इतर काही वृत्तपत्रात इतरांची दुकाने चालु आहेत), विविध तयार चुर्णे आदी गोष्टी गर्भाच्या प्रकृतीला अतिशय आवश्यक सांगत त्याची जाहिरात करतात. इतकंच नाही तर असा गर्भ वाढवणे ही आपली संस्कृती वगैरेची लेबले लावतात. म्हणे गर्भावर संस्कार करतोय! त्यात ती आयुर्वेदिक वैग्रे असल्याने 'साईडैफेक्टस' नाहित असा दावा असतो. "झालाच तर फायदाच होईल की नै? शिवाय दूध वाढतं!" वगैरे वरचा फुकट हितोपदेश असतोच.
या गोष्टींनी गर्भ गुटगुटीत होत असेलही किंवा नसेलही - मात्र त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून बाईच्या शरीराचे काय?
"त्यात काय एवढे? बाळंतपण म्हटले की "थोडे इकडे तिकडे व्हायचेच!"" -इति आकाशवाणी..
प्रत्यक्षात त्या (कायमचे गर्भार दिसु लागलेल्या) बाईकडे बघुन याला "थोडे" कसे म्हणावे हे समजत नाही :(
माझ्या परिचयात असे एक उदा पूर्वी होते तेव्हा मीही ज्येष्ठ बायकांच्या बोलण्यावरून हे बाळंतपणानंतर होतेच अशी समजुत करून घेतली होती. मात्र आता हे सर्रास दिसू लागले आहे.
आजच हाफिसात एक कलिगला वेगळ्या रुंदीची खुर्ची लागावी इतकी वाढता वाढे होऊन आलीये (प्री-बाळंतपण अर्धीखूर्चीही खूप झाली असती). त्यात तिच्या गायनॅकने स्पष्ट सांगितलं होतं की वजन वाढवायची गरज नाही गर्भ उत्तम वाढतो आहे. तरी हिच्या आई व सासु दोघींनी प्रचंड फोर्स करून "त्या पुस्तकातील" ''कोर्स'' पूर्ण करायला लावला. तीने सुरवातीला नकार दिल्यावर "काय बै हल्लीच्या मुली. नुसती चवळीची शेंग रहायला हवं. मग दोन पौंडाचं पोरही खपवून घेतील. आम्ही बघा कसं...."
हे सगळं ऐकून कितीही सम्यक रहायचं म्हटलं तरी तोल सुटतोच! :(
(अवांतर कुतूहल)
त्यात तिच्या गायनॅकने स्पष्ट सांगितलं होतं की वजन वाढवायची गरज नाही गर्भ उत्तम वाढतो आहे. तरी हिच्या आई व सासु दोघींनी प्रचंड फोर्स करून "त्या पुस्तकातील" ''कोर्स'' पूर्ण करायला लावला. तीने सुरवातीला नकार दिल्यावर "काय बै हल्लीच्या मुली. नुसती चवळीची शेंग रहायला हवं. मग दोन पौंडाचं पोरही खपवून घेतील. आम्ही बघा कसं...."
ही बोले तो ती आपल्या मुलांनातवंडावर 'माया' करणारी पिढी, की त्या ('मायावी') पिढीचा ह्यांगोवर?
ते कोलेस्टेरॉल (एच डी एल)
ते कोलेस्टेरॉल (एच डी एल) वाढवले तरी एलडीएल आणि व्हीएलडीएल कसे कमी करणार? टोटल कोलेस्टेरॉल सुद्धा महत्त्वाचेच ना?