अ‍ॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१

लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अ‍ॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.
गेले वर्षभर मला खाताना गिळण्याचा त्रास जाणवू लागला होता. सुरवातीला एखादाच घास अडकायचा आणि पुन्हा तोंडापर्यंत यायचा. पुढे पुढे हे प्रमाण वाढू लागले. डब्यात कोरडी भाजीपोळी नेली की जेवायला इतरांपेक्षा जास्त वेळ लागायचा. मग, सरबरीत भात-आमटी, रसभाज्या यावर चालू लागले. सुरवातीला अ‍ॅसिडिटी समजून अनेक डायजिन संपवल्या.रात्री-बेरात्री अचानक जाग येऊन, छातीत दुखायचे, पण पाणी प्यायले की ढेकर येऊन ते थांबायचे. घरचे सगळे, तपासणी करण्यासाठी मागे लागले. पण कॅन्सर निघाला तर, या भीतिने मी ते टाळू लागलो. समारंभात लोकांना चुकवून कमीतकमी जेवू लागलो. माझा आकार बघून मी डाएट करतोय, असे लोकांना वाटायचे.
शेवटी एक दिवस, जेवल्यानंतर मळमळू लागले आणि एक उलटी झाल्यावर घरच्यांचा धीर खचला. मीही, आता एकदा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच, असे ठरवून स्पेशालिस्टची वेळ घेतली. त्याने वेळ न घालवता मला एन्डोस्कोपिस्टकडे पाठवले. ती अत्यंत पेनफुल झाली आणि त्यातून रोगनिदान झाले. या रोगात, जठरावरचा वॉल्व्ह(एलीएस) घट्ट होतो. परिणामी, वरची अन्ननलिका विशाल होते. याबाबतची जास्त माहिती गुगलून सहज मिळते. आता याचे पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी मॅनोमेट्री अर्थात इसोफॅगसमधले प्रेशर मोजणे, ही टेस्ट झाली. पण मधल्या काळात, माझा जठरावरचा वॉल्व्ह त्या एन्डोस्कोपीमुळे सैल झाला होता. त्यामुळे विनासायास गि़ळता येऊ लागले होते. मॅनोमेट्रीच्या रिझल्टवरुन तज्ञांमधे दोन मते पडली. एक तर लॅप्रोस्कोपिक सर्जरी वा बलून डायलेशन! या प्रकारात एका फुग्याने तो जठरावरचा वॉल्व्ह सैल करतात. पण धोका पाच टक्के केसेसमधे परफोरेशनचा ! ते झालं की मोठ्ठा राडा! पण दोन विरुद्ध एक अशा मतांमुळे मी सोपा उपाय करण्याचे ठरवले. काम पंधरा ते वीस मिनिटांचे, आणि एक दिवस ऑब्जर्व्हेशनसाठी हॉस्पिटल मधे वास्तव्य! दिवस ठरला. सकाळी हॉस्पिटलमधे दाखल झालो. तिथून ऑपरेशन थिएटर! आधी जय्यत तयारी केली होती. मेडिक्लेम वाल्यांना कळवले होते. मला आंत घेण्यात आले. बायको बाहेर. अर्धा तासाच्या वर लागल्याने तिचे प्राण कंठाशी.मला ऑपरेशन चालू असतानाच शुद्ध आली. पोटात वेदना आणि कोणीतरी 'परफोरेशन' म्हटल्याचे ऐकू आले.

- क्रमशः

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

बापरे! माहित नव्हतं या आजाराबद्दल. आता सर्व ठीक आहे अशी अपेक्षा. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा! काळजी घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कॅन्सर निघाला तर, या भीतिने मी ते टाळू लागलो.

कॅन्सर असण्याची शक्यता ही तपासणीच्या घटनेशी संबंधित नाही. कॅन्सर असो वा नसो पण शंका आल्यास तपासलेले उत्तम. उपचार करण्याचा पर्याय उपलब्ध राहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ऑपरेशन चालू असतानाच शुद्ध आली. पोटात वेदना आणि कोणीतरी 'परफोरेशन' म्हटल्याचे ऐकू आले.

आई शपथ. भुल असताना अशी शुद्ध येऊ शकते, हे महिती नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑपरेशन दरम्यान भूल उतरली आणि मसल रिलॅक्संटचा इफ्फेक्ट मात्र उतरला नाही त्यामुळे तुम्हाला शेवटी झालेला त्रास झाला असणार, असे झाले असल्यास हा निष्काळजीपणा आहे. तुम्ही डॉक्टरवर/अ‍ॅनेस्थेटिस्टवर केस करु शकता.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो, पुढील भाग वाचण्यास उत्सुक. काळजी घेणे हेवेसांनल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काळ्जी घ्या.खुप शुभेच्छा .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही हे इथे लिहीताय म्हणजे सगळं आलबेल झालेलं असणार किंवा त्या मार्गावर असणार असं गृहित धरते.

तुमच्या अनुभवाबद्दल (कोरडी) उत्सुकता आहेच; पण विकाराबद्दल जमेल तितपत माहितीही द्या अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कालच हॉस्पिटल मधून घरी आलो आहे, त्यामुळे त्रोटक लिहिले आहे. अजून पूर्ण आलबेल व्हायला महिना-दीड महिना आहे. जरा ताकद आल्यावर पुढचे भाग लिहिणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रासदायक अनुभव असणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars