८) जाणिवेचे झाड फोफावू द्या - Grow the Awareness!

growawareness
२ एप्रिल हा 'जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे' आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा 'ऑटीझम अवेअरनेस मंथ' आहे.

लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल.

prevalence-graph1

autism_stat

इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा संशोधनाचाच विषय आहे. अलिकडे ते होतही आहे. परंतू याचबरोबर आपल्याला हवे आहे भान. या डिसॉर्डरबद्दलचे भान. आजूबाजूल अशी मुलं दिसली तर त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवा. त्यांना नॉर्मल मुलांसारखंच वागवा. आपल्या मुलांबरोबर त्याच्या प्लेडेट्स अ‍ॅरेंज करा.. तसेच आपल्या मित्रपरिवारात कुणाचे मूल ऑटीझमचे सिम्प्टम्स दाखवत असेल तर प्लीज पालकांना लवकरात लवकर थोडीतरी जाणीव करून द्या. जितकं लवकरात लवकर रेड फ्लॅग्स लक्षात येतील, तितकं त्या मुलाच्या भविष्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

आणि मला हा बदल दिसतो आहे. समाज अजुन जास्त प्रगल्भ होत आहे, नक्कीच. या अवेअरनेस मंथच्या निमित्ताने तुम्ही दाखवत असलेल्या आधाराबद्दल, आमच्या मुलांना आपल्यात सामावून घेतल्याबद्दल मी सर्व ऑटीझम कम्युनिटीकडून तुमचे आभार मानते.
आम्हाला इतकंच हवं आहे, अवेअरनेस. आपुलकी. आत्मियता. बस्स.

ceeda7d28db6a978937cae927e7edc64

c88bc102642ba2316e2042daadabf6f2

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

समयोचित लेख. लेखमालेतल्या इतर लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण आणि सकारात्मक.

मला या आकडेवारीबाबत थोडी शंका वाटते. दहा वर्षांत ऑटिझमचाच काय, कुठच्याही गोष्टीचा प्रीव्हेलन्स रेट पंधरापट होणं हे विश्वासार्ह वाटत नाही. प्रीव्हेलन्स रेट म्हणजे डायाग्नोसिस रेट का? डायग्नोसिसचे निकष बदलले आहेत का? की डायग्नोज करून घ्यायला येण्यासाठी लागणारा अवेअरनेस वाढलेला आहे? की दोन्ही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवेअरनेस वाढला आहे हे नक्की. डायग्नोसिसचा क्रायटेरिया बदलला असेल थोडा पण तो सुरवातीला. जेव्हा ऑटीझम म्हणजे काय हे निश्चित होत होते. अलिकडच्या काळात वाढलेले प्रदुषण, अन्नपदार्थातील भेसळ, केमिकल्स, पेस्टिसाईड्स, तसेच क्रुत्रिम अन्न व त्याचबरोबर जीवनातील ताण तणाव वाढले आहेत. ऑटीझमच्या कारणांमध्ये जेनेटिक व एन्वायत्न्मेंटल अशी कारणे असतात. एन्वायर्न्मेंटलमध्ये हे वरील सगळं येतच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकीपीडियावरून साभार

The reported increase is largely attributable to changes in diagnostic practices, referral patterns, availability of services, age at diagnosis, and public awareness.[2][3][23]

थोडक्यात कारणं अशी -
- जनतेला ऑटिझमविषयीची जाण वाढलेली आहे
- फंडिंग वाढलेलं आहे. त्यामुळे ऑटिझम ओळखण्याची व्यवस्था अधिक सक्षम झालेली आहे.
- या सक्षमतेमुळे पूर्वी ज्यांना सर्वसाधारण म्हटलं जायचं, त्यांना आता अधिक प्रमाणावर ऑटिस्टिक म्हणून ओळखलं जातं.
- Nearly half of the kids with an ASD diagnosis (46%) had above-average intelligence (IQ over 85), an interesting finding in itself. In 2002, only about a third of children with ASD were thought to have above-average intelligence. (दुवा)
- पूर्वी ज्यांचं निदान सर्वसाधारण 'मेंटल रिटार्डेशन' असं व्हायचं, त्यांना अधिक अचूकपणे ऑटिझमच्या कक्षेत आणलेलं आहे.
A review of the "rising autism" figures compared to other disabilities in schools shows a corresponding drop in findings of mental retardation.[26]
- लवकर निदान होत असल्यामुळे फ्रीक्वेन्सी काहीशी कृत्रिमरीत्या वाढलेली आहे. म्हणजे पूर्वी तिसऱ्या वर्षी निदान होत असेल तर काही मुलांच्या बाबतीत ते होतंच, शिवाय दुसऱ्या वर्षी निदान झालं अशीही मुलं त्यात येतात.

थोडक्यात, पालकांनी 'आपण मुलांना अमुक अन्न दिलं किंवा अमुक लस टोचली म्हणून असं झालं' असा स्वतःला दोष देण्यात काही अर्थ वाटत नाही. प्रिव्हेलन्स रेट पेक्षा डिटेक्शन आणि रिपोर्टिंग रेट्सच वाढलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेटा काय म्हणतो याही पेक्षा आम्हाला आमच्या मुलात कधी, कुठल्या शॉटनंतर वगणुकीत बदल झाला हे प्रत्यक्ष दिसते व सतत आठवत राहते. ते नाकारणे फार अवघड आहे. मी अजुनही तो तापाने फणफणलेला, उलट्यांनी बेजार झालेला माझा १.५ वर्षाचा मुलगा विसरू शकत नाही, एमएमआरच्या नंतरचा. आणि ते त्याचे 'पहिलं' आजारपण होते. तो त्याआधी कधेही आजारी पडला नव्हता. त्यानंतर नावाला रिस्पॉन्स न देणारा मुलगाही विसरता येत नाही.

थेअरी, रिसर्स , डेटा हे सगळं मलाही कायम मान्य होतंच. परंतू आता गोष्टी बर्याच बदलल्या आहेत. कुठेतरी सिक्स्थ सेन्सला जाणवणारी गोष्ट नाकारता येत नाही सहज. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही वाढ भयावह आहेच.
असे म्हटले जाते की याला जेनेटिकली मॉडिफाईड फुडसुद्धा कारणीभूत आहे. हा लेख त्या दृष्टिने वाचनीय आहे

जगभरात अनेक ठिकाणी तसेच मराठी आंजावरही या जीएमपिकांचे बरेच कट्टर समर्थक आहेत. त्यांना विचारणा करतो की जर या पिकांमुळे ऑटिझममध्ये वाढ होण्याची किंचितही शक्यता असेल तरी तुमच्या मतात काही फरक पडेल का?

जेनेटिकली मॉडिफाईड फुड आता भारतातही येतेय. सध्याच्य सरकारने (वीरप्पा मोईलींच्या पर्यावरण 'खात्या'ने)निवडणूक आचारसंहिता लागु होण्याच्या केवळ २ दिवस आधी याची 'प्रायोगिक लागवडी'साठी मान्यता दिली आहे. प्रकट भांडवलवादी भुमिका न घेणारे सरकार असताना जर इतका प्रभाव असेल, तर उद्या मोदींसारखे निर्ढावलेले भांडवलवादी सरकार आल्यावर नॉन-जीएम पिकांचा पर्यायच उपलब्ध रहाणार नाही अशी भिती वाटते! Sad

असो.! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हो हे देखील कारण आहे. मी कृत्रिम पदार्थ लिहिले ना प्रतिसादात ते हेच.
४ -५ वर्षांपूर्वी मी आतासारखी डोळे उघडे ठेऊन वावरत नव्हते इतकी. आपल्याबाबतीत वाईट काही घडेल ही शंका कधीच आली नव्हती. मात्र आता सगळ्या गोष्टी तपासल्या जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोवर आणि गालगुंडाच्या(MMR vaccine) लसिकरणामुळे अमेरीकेत काही मुलांमधे ऑटिझमची लक्षणे आढळली, ह्या प्रकरणावर जगभर बराच वादंग माजला. अनेक देशात लोकांनी मुलांना लस देणे बंद केले. अधिक माहिती इथे वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या मुलामध्येही त्या इम्युनायझेशन शॉटनंतर व्हॉमिटिंग, जास्त ताप अशी रिअ‍ॅक्शन आलेली. नंतर तो बदललाच.
माझे काही दिवस असतात जेव्हा मी खूप चिडते त्या शॉट्सवर, साईडिफेक्ट्स न सांगितल्याबद्दल डॉ. वर. मुळात डोळे उघडे ठेऊन न वावरल्याबद्दल माझ्यावरच..

आणि काही दिवस असतात जिथे मला कारणांचे काहीच वाटेनासे होते. कारण डॅमेज इज ऑलरेडी डन. माझ्यापुढे उरते, पुढे पाहणे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे माहिती नव्हते! आभार!
मुलीला ही लस देऊन थोडाच काळ लोटला आहे त्यामुळे पोटात एक सुक्ष्मसा गोळा उठलाच.

असो. आता लस देऊन झाली आहे.!

यानिमित्ताने आपण (किमान मी) डॉक्टरांकडे गेल्यावर किती झापडबंद व अंधश्रद्धेने वागतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, सहमत आहे. जगभरात लसीकरणाच्या विरोधात किंवा त्याच्या संभाव्य दुष्यपरिणामांच्या अथवा त्याच्या सुरक्षिततेबद्दल कोणी 'ब्र' जरी काढला तरी त्या पालकांना अंधश्रद्ध किंवा बेजबाबदार ठरविण्याची जी पद्धत ठरते आहे तीही चिंताजनक आहे. अँड्र्यू वेकफिल्डच्या संशोधनाबद्दल अनेक उलटसुलट लेख वाचले होते. त्याच्या संशोधनात कितपत तथ्य आहे ते माहीत नाही पण त्याच्या संशोधनामुळे यु.के.त एम.एम.आर मोहिमेने फार मोठा मार खाल्ला. त्या पापाची शिक्षा म्हणून त्याचे 'विचहंटींग' केले गेले आणि त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटवले गेले असे वाटल्यावाचून रहात नाही (याला ठोस विदा मिळणे कठीण आहे पण घटनांचा क्रम, उलटसुलट आरोप आणि कोर्टकचेरीतली प्रकरणे पाहिली तर हे जाणीवपूर्वक केले गेले होते हे जाणवते.)
पब्लिक पॉलिसीजच्या विरुद्धचे संशोधन अवैज्ञानिक, लसीकरण न करणारे पालक बेजबाबदार आणि अंधश्रद्धाळू अशा सरसकटीकरणांमुळे आपल्यासारखे अनेक पालक काहीवेळा मनाविरुद्धही लसीकरण करतात. शेवटी लसीकरणाच्या संभाव्य दुष्परिणामांची शक्यता आणि मूळ रोगामुळे ओढवू शकणार्या परिणामांची शक्यता यातला कोणता धोका पत्करणे सोपे आहे ते ठरवायचे झाले.
माझी मुलगी लहान असताना स्वाईन फ्लूची लस पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना द्यावी असे पत्रक आले आणि आम्ही जबाबदार पालकांप्रमाणे ही लस तिला देऊन आलो. नंतर समजले की ज्या पॅनडेम्रिक्सची लस तिला देण्यात आली होती ती बॅच सदोष होती आणि काही मुलांना त्यातून नॅर्कोलेप्सी झाली होती. त्याबद्दल वर्तमानपत्रात काही बातमी आली त्याकडेही काणाडोळा केला पण एका ओळखीच्या स्त्रीच्या मुलाचाच त्यात समावेश असलेला कळला आणि पोटात असाच गोळा आला होता. मुलगा पोहत असताना प्रत्येक क्षण ती स्त्री डोअळ्ञात तेल घालून पाळत ठेवायची, हा विकार लसीकरणानंतर लगेचच झाला हे ती ठामपणे सांगायची. शेवटी हे गुणसूत्रांतील दोषाने झाले की लसीकरणाचा परिणाम म्हणून झाले की गुणसूत्रातले दोष आणि लसीकरण या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे झाले हे कोर्टात सिद्ध करणे कठीण असते पण लसीकरणाने हे होण्याच्या शक्यता सहाशेपट वाढतात वगैरे बातम्या ऐकल्या की आपण बचावलो म्हणून हुश्श्य म्हणण्यापलिकडे काही उरत नाही. शेवटी इनफॉर्म्ड डिसिजन्स वगैरे काही नसतं, डिसिजन्य पब्लिक पॉलिसीजच ठरवितात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिसळपाववर आज दिलेला प्रतिसाद इथे चिकटवत आहे.

ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे.......

प्रेग्नन्सीत इकडे आवर्जून कोणते फिश खा/ खाऊ नका ते सांगतात कारण त्यात मर्क्युरी असतो. पण फ्ल्यु शॉटमधला मर्क्युरी कसा चालतो मग?

बघा.. Sad

वरील मते वाचून लसीकरण तोट्याचे आहे, असा (गैर)समज होण्याची शक्यता आहे. निव्वळ या कारणासाठी प्रतिसाद देत आहे. एम्.एम्.आर. लशीचा आणि ऑटिझमचा संबंध आहे, असा एक मतप्रवाह आहे जो आजवरच्या पुराव्यानुसार आणि CDC च्या मतानुसार चुकीचा आहे. ऑटिझमसाठी मोठी लॉबी कार्यरत आहे हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. One of the loudest broadcasters of this supposed link between vaccines and autism is actress Jenny McCarthy, who has campaigned in support of Wakefield's findings as recently as 2011. वेकफिल्डचा रिसर्च पेपर चुकीचा होता हे सिद्ध झाले आहे आणि तो मागे घेण्यात आला आहे.

लशीकरणामुळे जगभर खूप फायदा झाला आहे. देवीसारख्या रोगाचे १००% निर्मूलन झाले आहे. पोलियो आणि मलेरियासारख्या रोगांचे निर्मूलन होण्याच्या मार्गावर आहे. इतर अनेक रोगांसाठी लशीकरण उपयुक्त ठरत आहे. पण अश्या परिस्थितीतसुद्धा लशीकरणाच्या विरोधात चळवळ सुरू होत आहे, हे खेदकारक आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत.

टीपः मी डॉक्टर नाही आणि माझ्या अख्ख्या खानदानात कुणीही डॉक्टर नाही. मी डॉक्टरकडे एक प्रोफेशनल म्हणून सल्ला मागतो, प्रश्न पडले तर त्याला विचारतो, त्याचा सल्ला मानतो, पटले नाही तर दुसर्‍या प्रोफेशनलकडे जातो. पण आजकाल तर गूगल वापरून आणि इंटरनेटवर माहिती वाचून आपण डॉक्टरपेक्षा हुशार, इंजिनीयरपेक्षा तज्ञ, राजकारण्यांपेक्षा धूर्त वगैरे समजण्याचा जमाना आहे. तसे होऊ नये म्हणून हा प्रपंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकीपीडियावरून साभार

Other proposed causes, such as childhood vaccines, are controversial and the vaccine hypotheses lack convincing scientific evidence.[3] Andrew Wakefield, the doctor whose study linked Autism with childhood vaccines, has since had his licence revoked in the United Kingdom for medical fraud.[11][12]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लस आणि ऑटिझमबद्दल अधिक माहिती देणारा न्युयॉर्करमधला हा रोचक लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

६८ मधे १ म्हणजे भीतीदायक आकडा आहे. ज्या देशांत GM अन्न &/ MMR लस नाही त्या देशांत काय आकडेवारी आहे हे कुठुन कळु शकेल का? (ऑटीझमची कारणे इतरही असू शकतात याची कल्पना आली आहेच या लेखमालेमुळे, पण त्यातल्यात्यात टाळता येण्याजोग्या बाबीँचा विचार करतेय.)

या लेखावर मायबोलीकरांकडुन आलेल्या प्रतिसादांमधुन खालील लिँक साभार www.scientificamerican.com/article/spike-in-autism-numbers-might-reflect...

www.theguardian.com/commentisfree/2014/apr/02/diagnosed-autism-adult-chi...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औटिझम वरील औषध संशोधन, बहुदा एक आशेचा किरण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0