ऐसी अक्षरे सांस्कृतिक कट्टा १ - पुणे फिल्म फेस्टिवल

सध्या ऐसी सदस्यांसाठी कट्टा करण्याचं घाटतं आहे. त्यावरून आठवलं. ऐसी अक्षरेतर्फे काही सांस्कृतिक कट्टे व्हावेत अशी इच्छा स्थापनेपासूनच व्यक्त केलेली होती. त्यात नुसतंच कट्ट्याला भेटण्यापेक्षा काहीतरी कार्यक्रम एकत्र करावा, पहावा आणि त्याबरोबर गप्पाटप्पा व्हाव्यात अशी कल्पना होती. पुण्यात लवकरच सुरू होत असणारं फिल्म फेस्टिवल ही या दृष्टीने उत्तम संधी आहे.

सांस्कृतिक कट्ट्यांमध्ये येऊ शकणाऱ्या गोष्टी.
- साहित्य, नाट्य, कला, विज्ञान, मीडिया अशा क्षेत्रातल्या कुणातरी मातब्बर व्यक्तीला जेवणासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बोलवायचं. त्यांची उत्स्फुर्त मुलाखत घ्यायची, अनौपचारिक चर्चा करायची आणि त्यावर ऐसीवर लेख लिहायचा.
- एखादा सिनेमा, नाटक, चित्रप्रदर्शन, संगीतजलसा वगैरे ठिकाणी एकत्रित हजेरी लावायची. आणि नंतर कुठेतरी कॉफी पीत किंवा चरत गप्पा मारायच्या.
- साहित्य संमेलनासाठी, परिसंवादांसाठी एकत्र जायचं. आणि नंतर कुठेतरी कॉ पी किं च ग मा.

ऐसीचे माननीय सदस्य आणि संपादक चिंतातुर जंतू हे फिल्म फेस्टिवलच्या आयोजकांपैकी आहेत. त्यांची सिनेमा या विषयावरची जाणकारी आणि अभ्यासाबाबत जितकं लिहावं तितकंच थोडं आहे. तर त्यांच्याबरोबर फेस्टिवलमधला एक किंवा अनेक सिनेमे पहायचे. आणि त्यानंतर एकत्र बसून गप्पा मारायच्या अशी साधारण कल्पना आहे. चिंतातुर जंतूंनी याला मान्यता दिलेली आहे. तेव्हा आता कधी, केव्हा, कुठचा सिनेमा पहायचा हेच ठरवणं बाकी आहे. या प्रकारात मला रस आहे कारण मीही भारतात ९ जानेवारीला पोचणार आहे. ऐसीच्या अनेक सदस्यांना भेटायची इच्छा आहेच, तेव्हा सुरूवात फिल्म फेस्टिवलच्या एखाद्या सिनेमाने झाली तर मजा येईल.

पुणे फिल्म फेस्टिवल
काळ - ९ जानेवारी ते १६ जानेवारी
स्थळ - वेगवेगळी थिएटरं.
ऑनलाइन डेलिगेट रजिस्ट्रेशन

पुण्यात ह्या ठिकाणी डेलिगेट रजिस्ट्रेशन करता येईल :
इ-स्क्वेअर, सिटी प्राइड कोथरुड, सिटी प्राइड सातारा रोड, आयनॉक्स
वेळ - ११ ते ६:३०
दर : सर्वसामान्य - रु. ७००/- विद्यार्थी, फिल्म क्लबचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक - रु. ५००/-

महोत्सवाविषयी ताज्या बातम्या महोत्सवाच्या फेसबुक आणि ट्विटर पानावर पाहता येतील.

महोत्सवातल्या सर्व चित्रपटांची यादी इथे पाहता येईल.

महोत्सवाचं वेळापत्रक इथे पाहता येईल.

चिंतातुर जंतूंनी अधिक माहिती द्यावी ही विनंती. ज्यांना केवळ एकच नव्हे तर अधिक सिनेमे बघण्याची माझ्याप्रमाणे इच्छा आहे त्यांनी इथे ती प्रकट करावी. म्हणजे काही स्वतंत्र टोळकी तयार करून सिनेमे बघायला जाण्यासाठी एकमेकांशी व्यनिने संपर्क करता येईल.

अद्ययावत : महोत्सवाच्या वेळापत्रकाचा दुवा आता मूळ लेखात दिला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

खूप छान कल्पना _/\_
आंतरराष्ट्रीय चित्रपटांबाबतीत माझा शुन्य अनुभव आहे. त्यामुळे चित्रपट न पाहता नंतरच्या चर्चाँना आले तर चालेल का? आधी नेटवर थोड वाचुन येइन चित्रपटांबद्दल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळं सुटी मिळण्यावर अवलंबून आहे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वर दिलेल्या संकेतस्थळावर कोणत्या दिवशी कोणते चित्रपट कोणत्या ठिकाणी बघायला मिळतील याची काहिच माहिती नाही (निदान मला दिसली नाही). हि माहिती कुठे मिळेल? ११/१२ तारखेला विकांत आहे, त्या दिवशी बघता येईल. चिंज नी अधिक माहिती द्यावी. शिवाय शुल्कं किती असते इथे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

उत्तम कल्पना!
मी विकांताच्या १/२ चित्रपटांना नक्की येईन. त्याहून अधिक, विकडेजच्या एखाद-दोन रात्रीच्या चित्रपटांनाही प्रयत्न करेन, पण येऊ शकेन की नाही आता सांगू शकत नाही.

@चिंज:
१. चित्रपटांची यादी, ठिकाण व वेळा सगळे एकत्र कुठे मिळेल?
२. यापैकी "बघाच" असे रेकमेंडशन तुमच्याकडून आले तर निवड करणे सोपे जाईल
३. चित्रपट बघायसाठी नेहमीसारखी बुक माय शो वर तिकीटे मिळातील का काही वेगळी योजना/प्रोसेस आहे?

चित्रपटाच्या निमित्ताने होणारे छोट्या छोट्या गटांतील मिनीकट्टे, आणि शेवटी १७ तारखेला मुंबईकरांबरोबर (कुठे ते ठरायचंय) एकत्रित कट्टा स्वरूप आपोआप येईल असे दिस्तेय Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून कोणते चित्रपट आहेत त्याचं शेड्युल आलेलं नाहीये बहुतेक. पण फिल्म फेस्टिवलचे पासेस आयनॉक्स आणि ई स्क्वेअरला नेहमी मिळतात. पेपरमधे वाचलं त्यानुसार रजिस्ट्रेशन फी रु 700/- आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी रु 500/-

रजिस्ट्रेशन केल्यावर एक पुस्तिका मिळते ज्यात फेस्टिवल मधे दाखवले जाणारे सर्व चित्रपट आणि त्यांचा थोडक्यात परिचय दिलेला असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपटांची यादी - सिंहावलोकन (रेट्रोस्पेक्टिव्ह) विभाग व उद्घाटनाचा चित्रपट जाहीर झालेला आहे. मराठी स्पर्धा विभाग आणि जागतिक स्पर्धा विभाग ह्यांमध्ये समाविष्ट सिनेमांची यादी २६ तारखेला जाहीर होईल. त्याशिवाय ताजा जागतिक सिनेमा आणि अजून प्रदर्शित न झालेले मराठी सिनेमे महोत्सवात पाहायला मिळतील. आतापर्यंत जाहीर झालेले प्रमुख तपशील -

रेट्रोस्पेक्टिव्ह - फेदेरिको फेलिनी, बिली वाइल्डर, इस्त्वान झाबो, बन्वा जाको, गोरान पास्काल्येव्हिक, अदूर गोपालकृष्णन

उद्घाटनाचा चित्रपट - आना अरेबिया - दिग्दर्शक आमोस गिताई.

ह्या यादीवरून लक्षात यावं की अभिजात दर्जाचा सिनेमा आणि तुलनेनं नवीन पण गेल्या काही वर्षांत नावाजलेले चेहरे ह्यांचा मेळ इथे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सोशल मीडिआवर महोत्सवाची अधिकृत पानं आहेत. त्यांविषयीची माहिती मूळ धाग्यात अद्ययावत केली आहे. महोत्सवात समाविष्ट असलेल्या काही चित्रपटांचे ट्रेलर्स आणि वर्तमानपत्रांत आलेलं महोत्सवाचं कव्हरेज सध्या तिथे पाहता येईल. चित्रपटांचं वेळापत्रक वगैरे उपलब्ध झालं की त्या पानांवर तसे अपडेट्स टाकले जातात. त्यामुळे इच्छुकांनी त्या पानांना लाइक/फॉलो केलं तर ती माहिती सहज मिळवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१२वा आशियाई फिल्म फेस्टिवल मुंबईमध्ये ३ ते ९ जानेवारीदरम्यान आहे.. http://www.affmumbai.info/index.html

कोणकोणते चित्रपट असतील याची थोडीफार माहिती वृत्तपत्तांमधून आली आहे, पण मागील वर्षांचा त्यांच्या संस्थळावरील अहवाल पाहता ही खूपच फुटकळ माहिती आहे असे दिसते.

थोडक्यात, मला या महोत्सवास जायची इच्छा आहे, जमतील तितक्या सिनेमांना हजेरी लावावी असं वाटतंय. आणखी कोणांस (माझे अर्धांग सोडून) येणे शक्य असल्यास तिथेही भेटीगाठी होऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

आणखी एक गोष्ट सांगायची राहून गेली. पुण्यात फेस्टिव्हलच्या निमित्तानं आलेल्या फिल्म्सपैकी निवडक फिल्म्स मुंबई आणि औरंगाबाद इथेही पाहायला मिळतील. पुण्यातलं फेस्टिव्हल संपल्यावर मुंबईत त्या दाखवल्या जातील - बहुधा १८ जानेवारीपासून काही दिवस आणि त्यानंतर म्हणजे जानेवारीच्या अखेरीला त्यातल्या काही फिल्म्स औरंगाबादेत दाखवल्या जातील. नक्की तपशील कळले की सांगेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>> ३. चित्रपट बघायसाठी नेहमीसारखी बुक माय शो वर तिकीटे मिळातील का काही वेगळी योजना/प्रोसेस आहे? <<

डेलिगेट रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला महोत्सवाचा पास मिळतो. त्या पासवर महोत्सवातला कोणताही चित्रपट पाहता येतो. ऑनलाइन डेलिगेट रजिस्ट्रेशनचा दुवा आणि इतर माहिती मूळ धाग्यात आता अद्ययावत केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्पर्धा विभागातले चित्रपट आता जाहीर झाले आहेत.

मराठी स्पर्धा विभाग :

चित्रपट दिग्दर्शक
टपाल लक्ष्मण उतेकर
अस्तु सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
७२ मैल : एक प्रवास राजीव पाटील
मौनराग वैभव आबनावे
फॅण्ड्री नागराज मंजुळे
नारबाची वाडी आदित्य सरपोतदार
रेगे अभिजित पानसे
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दिलेल्या दुव्यांवरील माहिती वाचुन यापैकी
The Girl from the Wardrobe
A Touch of Sin
House with a Turret
Kanyaka Talkies K R Manoj
Rhino Season
Mr. Morgan's Last Love
Rosie

यापैकी वेळ व दिवस यांच्या काँबिनेशनने शक्य होतीत ते चित्रपट पहायला आवडतील असं वाटतंय.

मुळ यादीपैकी एखादे/काही 'मस्ट वॉच' रेकमेंडेशन आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्पर्धा विभागातले सर्वच चित्रपट पाहण्यासारखे आहेत. अर्थात, व्यक्तिगत आवडीनिवडीनुसार प्रत्येकजण त्यात थोडंफार डावंउजवं करू शकेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेळापत्रक उपलब्ध झाल्याचे दिसते आहे, चिंतातुर जंतूंनी रात्रीचे चित्रपट सुचवावेत आणि त्यावेळेस कट्टा असावा असे मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेळापत्रक उपलब्ध व्हायला अद्याप वेळ आहे. सध्या केवळ कोणते चित्रपट पाहायला मिळतील त्याची यादी उपलब्ध झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके, ८-१० जानेवारी दरम्यान असलेल्या(रेट्रोस्पेक्टिव्ह) चित्रपटांच्या वेळापत्रकाबद्दल मी सांगितले, नविन चित्रपटांबद्दल तुम्ही सांगालच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महोत्सवातल्या सर्व फिल्म्सची यादी आता उपलब्ध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. ते इथे पाहता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भरगच्च प्रोग्राम अपेक्षित होताच. तसाच आहे.
बरं ९ ला कोणी येणार आहे का? संध्याकाळी ७:३० ला आहे मी पोचायचा प्रयत्न करेन.

१०, ११, १२ सिटीप्राईड कोथरूड, आर डेक्कन आणि ई स्वेअर या तीन गृहे मला प्रेफरेबल आहेत.
(बाहेरून आपल्या चार-चाकी गाडीने येणार्‍यांसाठी: आर डेक्कनला पार्किंगस्पेस लिमिटेड आहे. ई-स्वेअरलासुद्धा अनेकदा पार्किंग फुल होते तेव्हा अकॉडिंगली वेळ हातात ठेऊन पोचावे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जयजयकार मराठी पिक्चर, दिलीप प्रभावळकरांची प्रमुख भुमिका, परवा एशियन फिल्म फेस्टिवलला पाहिला. पुण्यात बहुदा शनिवारी दुपारी ई-स्क्वेअरला आहे.
या बद्दक थोड्या वेळाने लिहितो. शक्य असल्यास जरुर बघावा. कदाचीत आवडेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला मुळात भीक देणं आवडत नाही, धडधाकट व्यक्तीस तर त्याहून नाही. परंतु मी ट्रेनमध्ये किंवा इतरत्र समोर आले, तर तृतीयपंथीयांना स्वतःहून पैसे देते. या लोकांना कुणी काम देणार नाही/ त्यांनी आपले सहकारी असलेलं कुणाला चालणार नाही, अशा परिस्थितीत त्यांनी जगावं कसं? हे नेहमी मला वाटतं. अगदीच अतिप्रामाणिकपणे सांगायचं तर पैसे देणं ही एक पळवाट, त्यानं साध्य काहीच होत नाही.
दिलिप प्रभावळकरांची मुख्य भूमिका असलेल्या 'जयजयकार' मध्ये तृतीयपंथीय आणि त्यांच्या स्वकष्टाने जगण्याबद्दल एक वेगळाच पैलू दाखवला आहे. एक विक्षिप्त म्हातारा आणि काम करण्यास तयार नसलेले/भीक मागण्याची सवय झालेले चार तृतीयपंथीय यांच्या भोवती सिनेमा घडतो. शंतनूच्या मते त्या लोकांच्या आयुष्यात दु:ख, किळस हे सगळं असतंच, पण ते न दाखवताही त्यांच्याबद्दल वेगळं काही दाखवता येऊ शकतं. वस्तुनिष्ठ विनोदामुळे प्रेक्षक हसत राहातो आणि तरीही भल्यामोठ्या उपदेशपर भाषणाशिवाय जायचा तो संदेश मनापर्यंत पोचतो.

बरेचदा गांभिर्यामुळे चांगले चित्रपट सर्वांपर्यंत पोचत नाहीत आणि अर्थातच, एकंदर सादरीकरणावरून चित्रपटावर(मराठी तर नक्कीच) शहरी किंवा ग्रामीण शिक्का बसतो. हा चित्रपट त्याच्या आशय व सादरीकरणावरून दोन्हीकडे पसंतीस उतरेल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वेगळा विषय हे नक्की!
सदर चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या प्रदर्शित होऊन गेला आहे? व्हायचा आहे? व्हायची शक्यता नाही किंवा कसे?
यासाठी विचारतोय की शनिवारी व रविवारी मिळून इतके चांगले/नवीन विषयांवरील चित्रपट आहेत की गाळणी लावणे कठीण जावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रपट व्यावसायिकरित्या प्रदर्शित व्हायचा आहे, तेव्हा तू म्हणतोस तसा नंतर थेटरात जाऊन पाहता येईल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

(इथे कोणताही रहस्यभेद नाही किंवा गोष्ट सांगितलेली नाही.)

चित्रपट : अ‍ॅना अरेबिया
दिग्दर्शक : आमोस गिताई

चित्रपटक्षेत्रात आणि टी.व्ही. मालिकांतदेखील इस्राईलला गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. आणि आमोस गिताई हा इस्राईलमधला सध्याचा सर्वात गाजलेला दिग्दर्शक म्हणता येईल. लंडनची ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट, न्यू यॉर्कचं म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट आणि लिंकन सेंटर, पॅरिसचं जॉर्ज पाँपिदू सेंटर (म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट) अशा प्रतिष्ठित ठिकाणी त्याच्या चित्रपटांचे महोत्सव झाले आहेत. त्यानं दिग्दर्शित केलेले सात चित्रपट कान आणि व्हेनिससारख्या महत्त्वाच्या महोत्सवांत स्पर्धा विभागात निवडले गेले होते. 'अ‍ॅना अरेबिया'ला ह्या वर्षी व्हेनिस महोत्सवात दोन पारितोषिकं मिळाली आहेत आणि त्याचं 'गोल्डन लायन'साठी नामांकनही झालं होतं.

चित्रपट एका कुटुंब-वसाहतीची गोष्ट सांगतो. इस्राईल-पॅलेस्तिनी संघर्षाची पार्श्वभूमी चित्रपटाला आहे. एका छोट्या वसाहतीत एक ज्यू वार्ताहर येते आणि तिथल्या काही लोकांना भेटते असं एका वाक्यात चित्रपटाविषयी सांगता येईल. 'शांती प्रस्थापित करणं हे एखाद्या समीकरणाला आदर्श रीतीनं सोडवण्याची एखादी रीत असते तसं नसतं, तर माणसं न मारता संघर्ष सोडवण्याचा तो एक निर्णय असतो' असं दिग्दर्शक त्याविषयी म्हणतो. '(दोन समाजांमधले बिघडलेले संबंध सुरळीत करण्यासाठी) सिनेमा हे संवादाचं माध्यम असू शकतं. काही प्रश्नही त्यातून उपस्थित करता येतात' असंही दिग्दर्शक म्हणतो. एका व्यापक अर्थानं पाहिलं तर विविध अस्मितांशी नित्यनेमानं ज्यांना संघर्ष करावा लागतो अशा भारतातल्या आपल्याशीसुद्धा हे येऊन भिडतं.

ट्रेलर -

चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्रपट एकाच 'टेक'मध्ये घेतलेला आहे. कुठेही शॉट कापलेला नाही. सलग चाललेल्या एखाद्या नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे चित्रपट सलग चित्रित केला आहे. म्हणजेच कुठेही रीटेक घ्यायचा झाला तर संपूर्ण ९० मिनिटं पुन्हा चित्रित करायला लागणार. अतिशय सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाची इस्राईली चित्रपटांची समृद्ध परंपराही इथे पाहायला मिळते. एकाच टेकमध्ये असा अभिनय करता येणं किती कठीण असेल त्याची कल्पना करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार. सारांश जालावर असाच तुकड्या तुकड्यात वाचला होता.
शेवाती दिलेल्या अधिकच्या माहितीने उत्सूकतेत बरीच भर पडली आहे. साध्या घरगुती समारंभातही एडीट न करता शुट करता येऊ नये. असे वन टेक शुटिंग करताना नाटकासारखी आधी रिहर्सल होते काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> असे वन टेक शुटिंग करताना नाटकासारखी आधी रिहर्सल होते काय? <<

साधारणतः हो. कारण नक्की कोणत्या वेळी कॅमेरा कुठून कुठे जाणार, नटानं कुठून कुठे हलावं वगैरे गोष्टी गुंतागुंतीच्या असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काल हा चित्रपट पाहिला. सुरवातीला रटाळ वाटला.. पुढे पुढे जेव्हा तेथील लोकांच्या कथानकाला आकार येऊ लागतो तेव्हा इंटरेस्ट वाटू लागला.
यातील कित्येक प्रश्न भारतात म्हटले तर रिलेट होतात अर्थात युद्धजन्य भागातील प्रश्नांची तीव्रतेची तुलनाही अस्थानी ठरावी!
*बाकी विनोद हे कारूण्य टिपायचे महत्वाचे माध्यम आहे हे शेवटच्या म्हातार्‍यांच्या टोळक्यातील संवादावरून पुन्हा एकवार पटतेच!*

प्रयोग म्हणूनही चित्रपट आवडला. अर्थात लोकेशनच्या सीमा मर्यादित असल्याने हे शक्य झाले आहे- असावे. मात्र त्या बोळांत क्यामेरा कसा फिरवला आहे? खांद्यावरुन? मग त्याच्या मुव्हमेट्स हलत/व्हायव्रेशन कशा नाहीत? इतक्या गोल गोल फिरण्यात क्यामेरामनची सावली एकदाही दिसत नाही हे ही उल्लेखनीय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेक पदर, सशक्त स्त्री व्यक्तिरेखा, छोट्या छोट्या, साध्या संवादांतून सघन आशय मांडणं हे आमोस गिताईचं कौशल्य आहे. ते ह्यातही दिसलं.

>> मग त्याच्या मुव्हमेट्स हलत/व्हायव्रेशन कशा नाहीत? इतक्या गोल गोल फिरण्यात क्यामेरामनची सावली एकदाही दिसत नाही हे ही उल्लेखनीय!<<

नीट पाहिलं तर हँडहेल्ड कॅमेराची हालचाल नेहमीच्यापेक्षा अधिक आहे हे जाणवेल. जर्क येऊ न देणं किंवा सावली दिसू न देणं वगैरेसाठी तालीम आणि सवय ह्यांची मदत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(कोणताही विशेष क्रम नाही)
द ह्यूमन बीस्ट - जाँ रन्वार ह्या विख्यात फ्रेंच दिग्दर्शकाचा एक क्लासिक चित्रपट.
द रेड अँड द व्हाईट - मिक्लॉस यांचो हा एक अत्यंत महत्त्वाचा हंगेरिअन दिग्दर्शक आहे. हंगेरीच्या इतिहासातल्या महत्त्वाच्या घटनांविषयीच्या चित्रपटांचं एक पॅकेज ह्या वर्षी महोत्सवात आहे. त्यातला हा चित्रपट आहे. सिनेमाची नवी भाषा घडवणारा एक क्लासिक चित्रपट.
मेफिस्टो - इस्त्व्हान झाबो हा हंगेरीतला एक जागतिक कीर्तीचा दिग्दर्शक आहे. त्याचं रेट्रोस्पेक्टिव्ह ह्या वर्षी आहे. झाबोचा हा सर्वात गाजलेला चित्रपट आहे. ऑस्कर, बाफ्टा, कान आदि अनेक पारितोषिकं मिळालेला क्लासिक चित्रपट.
मदर, आय लव्ह यू - (सिंगल पेरंट) आई-मुलाच्या नात्याबद्दलचा तरल लाटव्हिअन चित्रपट. लाटव्हिआकडून हा ऑस्करसाठी पाठवला गेला आहे. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलला पारितोषिक.
पापुशा - एका जिप्सी कवयित्रीच्या सत्यकथेवर आधारित पोलिश चित्रपट. अत्यंत खडतर आयुष्याचं नाट्यमयता टाळून केलेलं प्रभावी चित्रण.
द बँड्स व्हिजिट - कान आणि इतर महोत्सवांत अनेक पारितोषिकं मिळालेला इस्राएली-इजिप्शिअन चित्रपट. इस्राईल-अरब संबंधांच्या पार्श्वभूमीवर चित्रविचित्र माणसांचं मनोज्ञ चित्रण.
अ टच ऑफ सिन - जिया झांगके ह्या सध्याच्या काळातल्या अत्यंत महत्त्वाच्या चिनी दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट. कानमध्ये पारितोषिक. चीनमधल्या सद्य परिस्थितीवर टीका केल्याचा चीनमध्ये आरोप. त्यामुळे हा चित्रपट अद्याप चीनमध्ये प्रदर्शित होऊ शकलेला नाही.
अस्तु - सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्या जोडगोळीचा अल्झायमर्स डिसीजबद्दलचा चित्रपट. मोहन आगाशे प्रमुख भूमिकेत.
कमीलिऑन - अझरबैजानचा चित्रपट. लोकार्नो महोत्सवात ह्याला नामांकन होतं. फार काही घटना न दाखवता साध्याशा कथेतून मानवी स्वभावाचे कंगोरे दाखवणारा चित्रपट.
व्हेन डे ब्रेक्स - आपले आईवडील ज्यू छळछावणीत मेले होते हे खूप उशीरा कळल्यानंतर त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न करणारा एक संगीतशिक्षक.
नाईट ट्रेन टू लिस्बन - पास्काल मर्सिएच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित चित्रपट. जेरेमी आयर्न्स प्रमुख भूमिकेत. सालाझारच्या हुकुमशाहीत पिचलेल्या एका प्रतिभावान लेखकाची कहाणी.
यंग अँड ब्यूटिफुल - फ्रॉन्स्वा ओझाँ ह्या सध्याच्या आघाडीच्या फ्रेंच दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट. कानमध्ये नामांकन.
इनोसंट्स - सिंगापूरसारख्या छोट्या देशातला एक उल्लेखनीय चित्रपट. लहान मुलांची गोष्ट, पण गोड नसून भेदक.
फॉरेन बॉडीज - कॅन्सरशी लढा देणारं मूल आणि त्याचे वडील ह्यांच्या गोष्टीतून इमिग्रेशन, अस्मिता अशा गंभीर आणि महत्त्वाच्या प्रश्नांना भेदणारा इटालिअन चित्रपट.
वन शॉट - पिस्तुलातून सुटलेल्या एका गोळीनं दोन स्त्रियांचं आयुष्य बदलतं त्याची गोष्ट. उत्कंठावर्धक आणि तरीही सामाजिक भाष्य करणारी.
निंगेन - एका जपानी फेबलला सद्यकालीन कॉर्पोरेट विश्वाशी गुंफणारा चित्रपट.
क्लब सँडविच - कुमारवयाच्या नाजुक टप्प्यावर असणारा मुलगा आणि त्याची सिंगल पेरंट आई ह्यांच्यातल्या नात्याविषयीचा वरवर हलकाफुलका वाटणारा पण गंभीर चित्रपट.
लुडविग २ - जर्मनीच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा काळ दाखवणारा तिथल्या तुघलकी राजाचा भव्य चरित्रपट.
गर्ल फ्रॉम द वॉर्डरोब - वेगळ्या हाताळणीद्वारे दिशाहीन तरुणांची गमतीशीर वाटणारी पण रोमँटिक गोष्ट सांगणारा चित्रपट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आहे, १२ ते १६ जमाटेल तेवढे चित्रपट पाहायचा विचार आहे. ऐअचे महारथी भेटले तर आनंदच होईल.
कृपया काय अगदी पहायचंच अथवा तिथे कोणी भेटणार असेल तर व्यनी करता का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इच्छा असूनही जमत नाहिये. काही महत्वाच्या कामात व्यग्र राहिन.
कार्यक्रमास शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तो एक टिशर्ट घ्या रे!! तो वरच्या फटूत लावलाय तो!

(साईझ वगैरे, कृपया, जाहिर विचारू नका!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

तोच हवाय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो सुद्धा चालेल. पण मग अजुन एक पाठवा. म्हणजे जोडीने घालून फिरू. अधिक काय लिहणे! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

(कोणताही विशेष क्रम नाही)
फँड्री - ह्या वर्षीचा गाजलेला मराठी चित्रपट. लहान मुलांभोवती केंद्रित इराणी चित्रपटांच्या वळणानं जातो आहे असं वाटतं न् वाटतं तोच दाहक सामाजिक वास्तवाचा वेध घेणारा प्रभावी चित्रपट.
टपाल - माजिद माजिदीच्या इराणी सिनेमाच्या वळणानं जाणारा चित्रपट.
ऱ्हाइनो सीझन - 'टर्टल्स कॅन फ्लाय' ह्या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट. एका कुर्द कवीच्या आयुष्याची जीवघेणी कहाणी. एका वेगळ्या भूमिकेत मोनिका बेलुची.
क्वीन ऑफ मॉन्त्रय - आइसलँडमध्ये ज्वालामुखी जागृत झाल्यामुळे विमानोड्डाणं स्थगित झाली होती तेव्हाची गोष्ट. चित्रविचित्र माणसं (आणि एक जनावर!) एकत्र येतात आणि नवे भावबंध उभे राहतात. पाश्चात्य जगातल्या सद्यस्थितीवर भाष्य.
मि. मॉर्गन्स लास्ट लव्ह - विधुर मायकेल केनची पॅरिसमध्ये घडणारी हृद्य प्रेमकथा.
कामिल क्लोदेल १९१५ - रोदँ ह्या जगविख्यात शिल्पकाराची एकेकाळची तल्लख, गुणवान शिष्या आणि प्रेयसी आता वेड्यांच्या इस्पितळात दिवस कंठते आहे. ज्यूलिएत बिनोश ह्या प्रख्यात अभिनेत्रीचा प्रभावी अभिनय.
ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर - २०१३ची सर्वात गाजलेली फिल्म. कान आणि इतर अनेक ठिकाणी पारितोषिकं आणि नामांकनं. अनेक समीक्षकांच्या २०१३च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश.

जिंजर अँड फ्रेड - फेलिनीचा एक कमी गाजलेला पण विलक्षण चित्रपट. आजच्या रिअलिटी शोच्या वातावरणात विशेष पाहावा असा. मार्चेलो मास्त्रोइयानी आणि ज्युलिएत्ता मासीनाचा सरत्या वयातला उत्कृष्ट अभिनय.
रोमा - फेलिनीच्या नजरेतून समकालीन पाश्चात्य ऱ्हास आणि पार रोमन साम्राज्याशी त्याची लागणारी संगती.
व्हाईट शेक - सिनेमाच्या माध्यमातून सिनेतारकांच्या आणि सामान्य माणसाच्या भावबंधांचा फेलिनीच्या खास पद्धतीनं घेतलेला वेध.
डबल इंडेम्निटी - बिली वाईल्डरचा न्वार क्लासिक.
अपार्टमेंट - 'लाइफ इन अ मेट्रो'ची प्रेरणा असलेला बिली वाईल्डरचा क्लासिक.
मॅसी साहेब - समांतर चित्रपटांच्या ऐन भरात आलेला वेगळा चित्रपट. रघुवीर यादवची अविस्मरणीय भूमिका.
याशिवाय फिल्म आर्काइव्हमध्ये रन्वार, झाबो आणि हंगेरियन ऐतिहासिक पॅकेजमधले चित्रपट आहेतच.

(वर शुक्रवारचे उल्लेखनीय म्हणून दिलेले सिनेमे तुमच्या पसंतीच्या / जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा दाखवले जातील त्यामुळे त्या यादीकडेही पाहात रहा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऱ्हाइनो सीझन - 'टर्टल्स कॅन फ्लाय' ह्या गाजलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट. एका कुर्द कवीच्या आयुष्याची जीवघेणी कहाणी. एका वेगळ्या भूमिकेत मोनिका बेलुची.

मोनिका बेलूची हे नाव वाचले आणि तिचा तीनएक वर्षांपूर्वी पाहिलेला मलीना हा इटालियन चित्रपट आठवला.

इटलीतील एक गाव वजा शहर. दुसर्‍या महायुद्धाचा काळ. नुकतेच लग्न होऊन गावात आलेली युवती. नवरा युद्धभूमीवर. युद्धात बेपत्ता. दोस्त राष्ट्रांचा विजय होत आलेला. गावात अमेरिकन सैन्याचा तळ. परिस्थितीला शरण जात वेश्याव्यवसाय करणारी ती युवती. नवर्‍याचे परत येणे. गावात आधी कुचेष्टेचा विषय ठरलेली आणि आता पुन्हा मानाचे स्थान मिळवू पाहणारी ती युवती. आणि ह्या सर्व घटनांचा साक्षीदार, तिच्यावर दुरूनच प्रेम करणारा एक शाळकरी मुलगा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलीना हा पिच्चर होष्टेलवर हिट होता- का ते वेगळे सांगणे न लगे. नंतर मात्र तो दृष्टिकोन जाऊन धडपणी पाहू शकलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा कधीचा नेटफ्लिक्सवर यादीत टाकलेला आहे पण बघायचा बाकी आहे. आता लवकरच पहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(कोणताही क्रम नाही)
द पेंटिंग - फ्रेंच animation package मधली एक रोचक फिल्म
मौनराग - महेश एलकुंचवारांच्या लिखाणावर आणि प्रेरणांवर आधारित. मराठीत एक वेगळा प्रयोग.
रेगे - डॉक्टर जोडप्याचा एकुलता मुलगा एका गर्तेत सापडतो. काळात पुढेमागे जात सांगितलेली गोष्ट.
हाउस विथ अ टरेट - युद्धकाळातल्या लहानग्याच्या भावविश्वाचं तरल पण
भेदक चित्रण.
वीकेंड - अनेक वर्षांनंतर क्रांतिकारक सवंगडी एकत्र येतात आणि भूतकाळाला सामोरे जातात. प्रभावी नाट्य.
ला पाझ - मानसिक असंतुलनाच्या उंबरठ्यावरचा नायक आयुष्याचा अर्थ शोधू पाहतो.
वॉवेन्सा (Walesa) - आंद्रे वायदा ह्या दिग्गज पोलिश दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट. विख्यात पोलिश नेत्यावरचा चरित्रपट.
ग्रेट ब्यूटी - ह्या वर्षी प्रचंड गाजलेला अनेक बक्षिसं मिळवणारा चित्रपट. ऱ्हासाच्या काळात अडलेला लेखक.
क्लासिक्स :
सम लाइक इट हॉट - मन्रो, लेमन, वाइल्डर... अधिक सांगणे न लगे.
सनसेट बूलव्हार्ड - हॉलिवूडवरची अजरामर कलाकृती
क्लाउन्स - कारकीर्द संपलेले विदूषक. फेलिनी. शब्दातीत अभिजात सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(कोणताही क्रम नाही)
(वर उल्लेखनीय म्हणून दिलेले सिनेमे तुमच्या पसंतीच्या / जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा दाखवले जातील त्यामुळे त्या यादीकडेही पाहात रहा.)
लिव्हिंग इमेजेस - सिनेमाशी संबंधित व्यक्तिरेखांच्या माध्यमातून देशाचा इतिहास सांगणारा हृद्य लाटव्हिअन चित्रपट.
द पॅशन ऑफ मायकेलँजेलो - लहान मुलाचा अंधश्रद्धेसाठी होणारा वापर त्या मुलाचं आयुष्य कसं आमूलाग्र बदलून टाकतो त्याची काळीज पिळवटणारी गोष्ट.
यंग अँड ब्यूटिफुल - फ्रॉन्स्वा ओझाँ ह्या विख्यात दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट.
वॉटर - इस्राएली-पॅलेस्तिनी दिग्दर्शकांनी केलेल्या लघुपटांचा गुच्छ.
पिएटा - किम की डूक ह्या प्रख्यात कोरिअन दिग्दर्शकाचा चित्रपट.
द डॉन जुआन्स - यिरी मेंझेल ह्या अत्यंत महत्त्वाच्या चेक दिग्दर्शकाचा ताजा चित्रपट.
गोरान पास्काल्येव्हिच ह्या गाजलेल्या सर्बिअन दिग्दर्शकाच्या रेट्रोस्पेक्टिव्हमधले अनेक चित्रपट आज विविध ठिकाणी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(कोणताही क्रम नाही)
(वर उल्लेखनीय म्हणून दिलेले सिनेमे तुमच्या पसंतीच्या / जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा दाखवले जातील त्यामुळे त्या यादीकडेही पाहात रहा.)
गर्ल फ्रॉम द वॉर्डरोब (वर पाहा)
रोजी - म्हातारी आई आणि आपल्या आयुष्यात झगडणारे तिचे मुलगा-मुलगी ह्यांची (जर्मनांच्या मानानं) गंमतशीर गोष्ट.
द ग्रेट ब्यूटी (वर पाहा)
द पेंटिंग (वर पाहा)
कामिय क्लोदेल (वर पाहा)
क्लब सँडविच (वर पाहा)
द वीकेंड (वर पाहा)
हाउस विथ अ टरेट (वर पाहा)
फ्लॅमेंको फ्रॉम द रूट्स, हबाना ब्लूज - स्पेनमधल्या संगीत/नृत्यप्रकारांबद्दलचं एक पॅकेज महोत्सवात आहे.
सत्यान्वेषी - ऋतुपर्ण घोष ह्यांची अखेरच्या काळातली निर्मिती
फँड्री (वर पाहा)
व्हर्जिन टॉकीज (वर पाहा)
क्लासिक्स - बोकाचिओ ७० - बोकाचिओच्या डेकॅमेरनवर आधारित चित्रपट, कर्नल रेडल (इस्तवान झाबो),

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(कोणताही क्रम नाही)
(वर उल्लेखनीय म्हणून दिलेले सिनेमे तुमच्या पसंतीच्या / जवळच्या चित्रपटगृहात पुन्हा दाखवले जातील त्यामुळे त्या यादीकडेही पाहात रहा.)
द डॉन जुआन्स
वॉलेसा
मदर, आय लव्ह यू
लुडविग २
लाइट्स ऑन अदूर (अदूर गोपालकृष्णन ह्यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरी)
अप्रूव्ह्ड फॉर अडॉप्शन - युद्धामुळे फ्रान्समध्ये दत्तक गेलेल्या मुलाची गोष्ट. फ्रेंच अ‍ॅनिमेशनपट.
ऱ्हाईनो सीझन
पॅशन अॉफ मायकेलॅंजेलो
पावडर केग - १९९२- १९९८ विजनवासात असलेल्या गोरान पास्कालयेविचनं सर्बियात परतल्यावर सर्बियन युद्धावर केलेला चित्रपट.

क्लासिक्स -
ला दोल्चे व्हिता (ज्यांना कालची ग्रेट ब्यूटी आवडली असेल त्यांनी हा जरूर पाहावा), ज्यूलिएट ऑफ द स्पिरिट्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आज संध्याकाळी समारोप समारंभात पारितोषिकांची घोषणा होईल. त्यानंतर जागतिक स्पर्धाविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेला चित्रपट दाखवला जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शनिवारी १८ तारखेपासून २४ तारखेपर्यंत मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये पिफमधले काही चित्रपट दाखवले जातील. क्लब सँडविच, वीकेंड, रशिअन नॉव्हेल, लिव्हिंग इमेजेस, वन शॉट, इनोसंट्स इत्यादि जगभरच्या चित्रपटांबरोबर टपाल, रेगे, मौनराग, अस्तु, नारबाची वाडी असे काही मराठी चित्रपट आणि सेल्युलॉइड, भारत स्टोअर्स, शॉप अ‍ॅट क्रॉसरोड्स असे काही ताजे भारतीय सिनेमेसुद्धा ह्या महोत्सवात पाहायला मिळतील. अधिक माहितीसाठी इथे पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छान, पिफमधे चांगले हुकलेले सिनेमे पुन्हा पहायला मिळण्याची संधी आहे तर.. Smile

ह्या मोहोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांचे 'शेड्यूल' मिळेल का? वरील दिलेल्या दुव्या वर तशी काही महिती नाही म्हणून विचारले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> ह्या मोहोत्सवात दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांचे 'शेड्यूल' मिळेल का? <<

दुव्यावर दिलेल्या फोन नंबरवर विचारून पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पिफमध्ये जागतिक स्पर्धेतले दोन मुख्य पुरस्कार 'पापुशा'ला मिळाले, तर मराठी सिनेमासाठीच्या पुरस्कारांत ह्या वर्षी फँड्रीचं वर्चस्व होतं. परीक्षकांचे अधिकृत पुरस्कारही फँड्रीला मिळाले आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कारही मिळाला. ज्यांना फेस्टिव्हलमध्ये फँड्री पाहायला मिळाला नाही त्यांच्यासाठी माहिती - फेब्रुवारीत तो महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे.
संबंधित वार्तांकन -
प्रहार
सकाळ
लोकसत्ता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जागतिक चित्रपटांच्या स्पर्धा विभागात प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार कोणाला मिळाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> जागतिक चित्रपटांच्या स्पर्धा विभागात प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार कोणाला मिळाला? <<

नाईट ट्रेन टू लिस्बन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१४ फेब्रुवारी ला महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0