ब्रेड अँड बटर - भाग ३ 'पावभाजीचा पाव'

लहानपणी पावभाजी खायला जायचे म्हणजे माझ्यासाठी पाव खायला जाणे असायचे. लुसलुशीत आणि बटरमध्ये खरपूस भाजलेला पाव समोर असताना लोक त्याच्याबरोबर भाजी कशाला खातात असा मला प्रश्न पडायचा. "अजून एक....अजून एक..." अशी मागणी करताना "भाजीपण खायची..." अशी दटावणी करणाऱ्या आईकडे सर्रास दुर्लक्ष करून मी पुढच्या पावावर तुटून पडायचे. पुढेपुढे भाजीदेखील आवडायला लागली पण तरी त्याच्याबरोबर 'अस्सल पाव' नसेल तर त्याची काही मजा नसायची. परदेशात रहायला आल्यावर पावाभाजीबरोबर 'बर्गर बन' ही बरीच मोठी तडजोड वाटायची त्याऐवजी चांगल्या बेकरीतून मिळणारे 'डिनर रोल' हे पावाच्या अधिक जवळचे नातलग आहेत याचा शोधही लागला. घरी ब्रेड बनवायला लागल्यावर पावही बनवून पहायची अर्थातच इच्छा झाली आणि त्याला चांगले यश यायला लागल्यावर ते पुनःपुन्हा बनवायला लागले. गंमत म्हणजे जी पाककृती वापरते ती 'बर्गर बन' साठी असलेली पण त्यातून बनणारा हा 'बन' अगदी थेट देशी पावासारखा बनतो. पावभाजीसाठीच नव्हे तर वडापाव, मसाला पाव वगैरेसाठीही हा पाव अगदी मस्त आहे. पावावर लावलेले तीळ, काळी खसखस वगैरे जर फार बर्गर बनची आठवण करून देणारे वाटत असतील तर ते वापरणे टाळता येईल पण व्यक्तीश: मला ते आवडतात कारण त्यामुळे पावांची चव आणि रूप दोन्ही वाढतात असे मला वाटते.

पावासाठी लागणारे साहित्य:

फास्ट अ‍ॅक्शन यीस्ट २ टीस्पून
ब्रेड फ्लॉर / मैदा ५०० ग्रॅम*
कोमट पाणी २५० मिलीलीटर (१ कप)
कोमट दूध ४० मिलीलीटर (३ टेबलस्पून)
एक अंडे
साखर २.५ टेबलस्पून
मीठ १.५ टीस्पून
लोणी ३५ ग्रॅम (२.५ टेबलस्पून)
* मी ४५० ग्रॅम फ्लॉर आणि ५० ग्रॅम मैदा वापरते पण एवढ्या काटेकोरपणाची आवश्यकता आहे असे वाटत नाही त्यामुळे पूर्ण ५०० ग्रॅम ब्रेड फ्लॉर किंवा मैदा वापरला तरी चालेल.

भाजण्याआधी पावावर वरून लावण्यासाठी साहित्य (हवे असल्यास) :

एक अंडे
एक टेबलस्पून पाणी
थोडे तीळ, काळी खसखस वगैरे.

१) एका मोठ्या भांड्यात अथवा परातीत मैदा आणि मीठ एकत्र करून घ्यावे.
२) एका कपमध्ये कोमट पाण्यात यीस्ट व साखर मिसळून ते पूर्ण विरघळून घ्यावे.
३) अंडे थोडेसे फेटून त्यात दूध मिसळून घ्यावे.
४) भांड्यातल्या मैद्यात पाणी,अंड्याचे मिश्रण आणि लोणी हळूह्ळू घालत पीठ मळून घ्यावे.
५) थोडे मळल्यावर स्वच्छ ओट्यावर गोळा घालून तो चांगला मळून घ्यावा.
६) पीठ साधारणतः सहा-सात मिनिटे मळल्यावर फोटोतल्या गोळ्यासारखे दिसायला लागले की आतून तेलाचा हात फिरवलेल्या एका भांड्यात तो गोळा ठेऊन द्यावा व भांडे ओलसर फडक्याने किंवा क्लींग फिल्मने झाकावा. साधारण एक ते दीड तासात पीठ दुप्पट फुगेल.
७) एका १७ इंच बाय ११.५ इंच आकाराच्या बेकिंग शीटवर पार्चमेंट पेपर अंथरावा व त्याला पुन्हा तेलाचा एका हात द्यावा. फुगलेल्या पिठाचे १२ सारखे भाग करून ते बेकिंग शीटवर थोडे अंतर राखून ठेवावेत आणि अजून एक तासभर त्यांना फुगू द्यावे. गोळ्यांमधले अंतर कमी झाले तर भाजताना हे गोळे एकमेकांत मिसळतील. (अर्थात ते एकत्र मिसळले तर त्यांचा बाजूचा भागही लुसलुशीत रहातो आणि ते अधिक पावासारखे दिसतात त्यामुळे मी बरेचदा ते फार दूरदूर ठेवत नाही.)
७) ओव्हन २०० अंश सेल्सियस किंवा ४०० अंश फेरेन्हाईट वर तापवून घ्यावा.
८) एका अंड्यात एक टेबलस्पून पाणी मिसळून ते एकत्र फेटल्यासारखे करावे. फुगलेल्या पावाच्या गोळ्यांवर एका ब्रशने हे अंड्याचे मिश्रण फेटावे व हवे असल्यास त्यावर तीळ, खसखस वगैरे पसरावी. 'एगवॉश' मुळे पावाचा वरचा पृष्ठभाग चकचकीत होतो आणि त्यावर तीळ वगैरे नीट चिकटतात.
९) ओव्हनमध्ये मधल्या कप्प्यावर थाळी ठेऊन त्यावर पाव पंधरा मिनिटे भाजावा.

पाव लोण्यावर भाजण्यासाठी मधून कापावा लागेल, ते करण्याआधी तो पूर्ण गार होऊ द्यावा. माझ्या घरात या पावांना भरपूर मागणी असते आणि तीन माणसांत हे बारा पाव पट्कन संपून जातात त्यामुळे मी नेहमी पूर्ण प्रमाण वापरते पण खप कमी असल्यास निम्मे प्रमाण वापरण्यासही हरकत नाही.
भाजी बाजूला ठेऊन, पावांवर आडवा हात मारणाऱ्या माझ्या पोरीला "भाजीपण खायची" असे मोठे डोळे करून दटावताना मला हमखास हसू येते आणि हे पावभाजीचे जीवनचक्र एक पूर्ण गोल फिरून जागेवर आल्यासारखे वाटते!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

आहा! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजी बाजूला ठेऊन, पावांवर आडवा हात मारणाऱ्या माझ्या पोरीला "भाजीपण खायची" असे मोठे डोळे करून दटावताना मला हमखास हसू येते आणि हे पावभाजीचे जीवनचक्र एक पूर्ण गोल फिरून जागेवर आल्यासारखे वाटते!

हे वाचल्यावर या जन्मातली पापं या जन्मात फेडावी लागतात असं काहीतरी सुचलं! Wink

आत्तापर्यंत आयुष्य फार सुखात जात होतं हो. चालत जाण्याच्य अंतरावर असणार्‍या दुकानात जे काही मिळतं ते आणायचं, खायचं आणि तक्रार करायची नाही अशा तत्त्वज्ञानावर मी फार सुखात होते. या रुचीच्या 'ब्रेड अँड बटर'मुळे काहीतरी पाशवी खुळं डोक्यात शिरत आहेत.

फोटो फारच आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुलं जन्माला घालून त्यांना वाढवणं हे लहानपणी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड दुसर्या कोणावर तरी काढता यावा म्हणूनच आहे असं माझं मतच आहे Wink
अगं, आत्ता पाशवी वाटणारी ही खुळं नंतर अतिशय उपयुक्त छंदात बदलली तर आभार मानायला विसरू नकोस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आआह! या वीकेंडला नक्की करून पाहणार. खूप दिवसांपासनं प्रयोग करायचा विचार होता.
एकच प्रश्न - या कृतीत अंडं वगळलं तर बाकी काय बदल करावे लागतील? घरी सगळे अंडी खात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यीस्ट ब्रेडमधे अंड्याचा उपयोग स्निग्धता आणि आर्द्रतेसाठी होतो. अंडे वगळायचे असल्यास त्याऐवजी तितक्याच प्रमाणात आर्द्रता (पाणी, दूध, दही) आणि स्निग्धता (तेल, लोणी) वाढवावी लागेल. एक अंडे साधारण ४५ मिली भरते, म्हणजे आणखी दोन टेबलस्पून दूध किंवा दही (३० मिली) आणि एक टेबलस्पून लोणी (१५ ग्रॅम) वाढवल्यास चालायला हरकत नाही. त्याच बरोबर पाव चमचा बेकिंग पावडरही घालता येईल (अंड्याचा ब्रेड फुलायला आणि हलका व्हायलाही उपयोग होतो त्यासाठी बेकिंग पावडर! )
वरून तीळ वगैरे चिकटवायला आणि तकाकी यायला नुसते दूधही वापरता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा काही शब्द नाहीय बहुतेक! स्निग्धपणा म्हणायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुधाच्या गुणधर्मांच्या संदर्भात (fat content) स्निग्धता, स्निग्धांश हे शब्द वाचलेले आहेत. मोल्सवर्थ शब्दकोषात हा शब्द सापडला नाही, पण या शब्दाची मराठी विकी एंट्री आहे.

महाराष्ट्र टाईम्सवरच्या या लेखातही स्निग्धता हा शब्द वापरलेला आहे. अशाच संदर्भात लोकसत्तामधल्या या लेखात स्निग्धता हा शब्द सापडला. या लेखातली माहिती कितपत ग्राह्य आहे याबद्दल हे मतप्रदर्शन नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. ड्राय यीस्ट असल्यास किती घ्यावं?
२. बेकिंग शीट आणि पार्चमेंट पेपरला काय पर्याय? (फार मागास भागात राहते गं मी, अ‍ॅल्युमिनिअम फॉईलही मिळत नाही इथे)

ही उत्तरे मिळाल्यास पुढच्याच आठवड्यात पा कृ करून पाहण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती, मी वापरलेलं यीस्ट ड्रायच आहे, ते फास्ट एक्शन यीस्ट / इंस्टंट आहे. हे यीस्ट बाजारात मिळू शकेल आणि ते नीट हवाबंद ठेवलं तर बरेच दिवस छान टिकतं. त्याशिवाय अजून एक अ‍ॅक्टिव्ह ड्राय यीस्ट मिळतं जे आधी पाण्यात मिसळून बुडबुडे येईर्यंत ठेवावं लागतं, ते वापरल्यास अडीच चमचे वापरावं. तुम्ही तुमच्या यीस्टच्या पाकीटावर काय लिहिलं आहे ते सांगितलंत किंवा पाकिटाचा फोटो लावलात तर मला अधिक माहिती देता येईल.
फ्रेश यीस्ट वापरल्यास ड्राय यीस्टच्या तिप्पट प्रमाणात वापरावे, या पाकृ.त साधारण २० ग्रॅम.
या पाकॄ.साठी पार्च्मेंट कागदाची गरज नाही, कोणतीही धातूची थाळी भरपूर तेल चोपडून वापरता येईल, अ‍ॅल्यूमिनियमची थाळी अधिक उत्तम.
तुम्ही शहरी भागात रहात नसतानाही या प्रकल्पात भाग घेता आहात हे वाचून छान वाटलं, उपकरणे, सामान वगैरेपेक्षा उत्साह आणि आवड हे कोणत्याही पाककृतीच्या यशात जास्त महत्वाचे असतात हे अनुभवाने शिकलेय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही अजून फोकाचियाचं सहित्य जमवतोय तोच नव्या पाकृने तोंपासु Smile

बाकी, आमच्या घरी ६ व्यक्ती आणि सरासरी ४ पाव धरले तर दुप्पट मेहनत करावी लागेलसं दिसतंय Wink

एक प्रश्नः किती तापमानावर पाव १५ मिनिटे भाजावा?

अरे हो.. आभार! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश, हा पाव बाजारात मिळणार्या पावापेक्षा अंमळ मोठा आहे त्यामुळे 'भाजीबरोबर खाल्यास' प्रत्येकी दोन किंवा तीन पुरायला हरकत नाही. अर्थात इतका चविष्ट होतो की दुप्पट बनवला तरी संपायला त्रास होणार नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
बाकी, तापमान किती ठेवायचे तेही सांगाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

४०० अंश फॅरेन्हाईट किंवा २०० अंश सेल्सियस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश,
कृतीत सांगितल्याप्रमाणे हेच(४०० फेरेन्हाईट) तापमान ठेवले होते
७) ओव्हन २०० अंश सेल्सियस किंवा ४०० अंश फेरेन्हाईट वर तापवून घ्यावा.

मी पीठ भिजवल्यानंतर बेताच्या उबदार ठिकाणी दीड तास ठेवले होते, कारण घरात हवा थंड होती. पाव छान झाला, पण लादी पाव असतो, तितका हलका आणि पातळ कव्हराचा नव्हता. कदाचीत पुढील प्रयोगात अजून चांगला जमू शकेल (कणीक चाळून घेतली असता कितपत फरक पडेल?). मी ब्रेड फ्लोर ३ १.३ कप वापरली कारण माझ्याकडे वजनकाटा नव्हता. कणीक भिजवताना सुरुवातीला पीठ पातळ आणि चिकट होते, पण मळायला सुरुवात केल्यावर लवकरच त्याचा गोळा बनला. मळताना पोळ्यांच्या कणकेसारखीच मळली. आयत्यावेळी ब्रश सापडला नाही म्हणून वरून अंड चमच्यानेच लावले. ब्रशने अधिक चांगले लावले जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.मी नीट वाचले नव्हते बहुदा.. Smile
बाकी मी पिठ फूड प्रोसेसरमध्ये मळून बघणार आहे (अवांतरः आम्ही कणीकही त्यातच मळतो आणि गुलाबजामाचे पीठही अतिशय हलके गुलामजाम होतात आणि पाकही आतपर्यंत जातो)

या शनिवारी हा आणि जमल्यास फोकाचियाचा प्रयोग आहे. बघुया Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>या कृतीत अंडं वगळलं तर बाकी काय बदल करावे लागतील?<<

ब्रेडच्या पिठात अंडी, दूध किंवा लोणी, तेल ह्या घटकांचा वापर दोन कारणांसाठी होतो -
१. पिठात स्निग्ध पदार्थ मिसळल्यामुळे ब्रेड हलका आणि खुसखुशीत होतो. फेटलेल्या अंड्यात हवेचे बुडबुडे असल्यामुळे ती ह्यासाठी अधिक उत्तम पडतात.
२. भाजण्याआधी वरून चोपडल्यामुळे भाजल्यानंतर पृष्ठभागाला तकाकी येते.

जर अंडं वापरायचं नसेल, तर -
१. पिठात लोणी किंवा दूध वाढवता येतं. पण त्यामुळे पिठाच्या प्रवाहीपणात फरक पडतो. त्यापेक्षा अशा वेळी मी दुधाची पावडर वापरतो. सुरुवातीला मैदा आणि मीठ एकत्र करतानाच ५०० ग्रॅम मैद्यासाठी ३-४ टेबलस्पून दुधाची पावडर वापरता येईल.
२. वरून लावण्यासाठी अंड्याला पर्याय म्हणून दूध (आणि चालत असेल तर किंचित साखर त्यात विरघळून) वापरता येईल. भाजलं जाताना दूध-साखरेचं कॅरॅमेलाइझेशन होऊन त्यामुळे तकाकी येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहाहा! कसला मस्त दिसतोय हा पाव... आणि करायलाही तसा फारसा किचकट वाटत नाही. पावभाजीसोबत अमेरिकन ब्रेड स्लाईसेस खाण्यापेक्षा असा ब्रेड करायला हरकत नाही.

(एरवी कधी घरी पाव बनवण्याचा विचारही करणारी मी आजकाल दुकानातल्या बेकिंग मटेरियलच्या सेक्शनमधे यीस्ट कोणतं असावं असा ओझरती नजर टाकून अंदाज घेत असते ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

पाकृ. तशी सोपीच आहे. ़खरंतर रोज कणिक भिजवून, पूर्ण कुटुंबासाठी पोळ्या नाहीतर भाकरी थापण्याच्या कष्टांपेक्षा हे ब्रेड बनवण्याचं काम बरंच सोपं आणि कमी कष्टाचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच फोकाचिया बनवून पाहणार होते, तेवढ्यात हे पाव बनवण्याचे आवाहन पाहिले आणि बेत बदलला.

ही वेगवेगळ्या स्थितीतली चित्रे.

पीठ दुप्पट फुगले असताना

गोळे बनवताना किती जोर देऊन बनवायचे ते कळले नाही, हलक्या हाताने बनवल्यावर असे दिसत होते. गोळेही क्लिंग फिल्मने झाकून ठेवले होते.

मेहेनतीचे फळ

माझी भट्टी कमी उष्ण आहे, म्हणून पाव जास्त वेळ ठेवायला लागले, पुढच्या वेळी किंचीत जास्त तापमान ठेवून बघेन. कदाचीत बाहेरुन जरा जास्त नरम आणि ओलसर राहतील(केक बनवताना मी खालच्या कप्प्यात एका भांड्यात पाणी ठेवत असते, तसेही करून बघावे का?).

रुची, आपली कॄती सांगितल्याबद्द्ल आभार.

संपादकः चित्रे डकवताना height किंवा width यापैकी कोणताही एक अथवा दोन्ही पॅरामिटर्स देत नसाल तर तो पर्याय कृपया हटवावा. त्यामुळे काही ब्राऊझर्समध्ये चित्रे दिसत नाहित. या प्रतिसादात योग्य ती सुधारणा केली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सानिया, गोळे बनवताना हलक्या हाताने वळायची गरज नाही, उलट ताणून-ताणून खाली ओढून त्याची खाली पुरचुंडी केल्यासारखे केले तर वरचा पृष्ठभाग चांगला गुळगुळीत आणि एकसमान बनेल, मी पुन्हा बनवेन तेव्हा एक चित्रफित काढून डकवेन. मला वाटते की तुम्ही पुढच्या वेळेस पीठ वजन करून घेतले आणि इतर सामानही काटेकोरपणे मो़जून घेतलेत तर पाव जास्त हलका होईल. तुम्ही वर्णन केल्यापेक्षा पीठ बरेच सैल बनते. भट्टी जास्त तापविली तर ब्रेड बाहेरून कडक होतो, थोड्या कमी तापमानावर जास्त वेळ भाजला तर मऊ होतो. या ब्रेडसाठी खाली थाळीत पाणी ठेवायची गरज नाही, साधारण क्रस्टी ब्रेड हवा असेल तर जास्त तापमानावर भट्टी तापवून आणि खाली पाण्याची थाळी वगैरे ठेऊन ब्रेड भाजतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग्ग.. हा ब्रेड घरीही बनवता येऊ शकत असेल हे लक्षातच आलं नव्हतं.

परदेशांतले अनेक मित्रमैत्रिणी या पावाच्या अभावाने ग्रस्त आहेत हे ऐकून वाईट वाटलं. भारतात, निदान मुंबईत तरी पहाटे पहाटे ट्रिंग ट्रिंग सायकलची घंटी वाजवत आणि धीटपणे दाराची बेलही वाजवत झोप खराब करणार्‍या काही दुष्ट व्यक्ती हे पाव घेऊन येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव. मस्तच :D> पण मी काही एअवढे कश्ट घेणार नाही. त्यापेक्षा खालच्या बेकरीतून आणेन. Dirol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

बेकरी म्हणजे केवळ विक्रीवाली की ब्रेड बनवणारी?

बनवणारी असेल तर त्यांची वेळ साधून नुकताच बनलेला गरम पाव आणून त्यात लोणी लावून खाल्ला आहेत का?

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेकरी म्हणजे केवळ विक्रीवाली की ब्रेड बनवणारी?
बनवणारी असेल तर त्यांची वेळ साधून नुकताच बनलेला गरम पाव आणून त्यात लोणी लावून खाल्ला आहेत का?

ती बेकरी दोन्ही प्रकारची आहे. सकाळी मॉर्निग वॉकला जाताना काय खरपूस वास येतो.

आणि तो लोण्याचा पाव महिन्यातून दोनदा असतोच माझ्याकडे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

एक फर्माईश** आहे: पिझ्झा बेस बनवायला शिकवाल का?
विकतच्या पिझ्झा बेसवर घरी पिझ्झा बनवतो पण तसा पिझ्झा खाण्यापेक्षा पिझ्झावाल्यांसारखा सुरवातीपासून बनवता आला तर बहार येईल

=
** (खरं तर विनंती शब्द हवा.. पण तुम्ही इतके कॉप्लेक्स ब्रेड्स बनवता तर ही विनंती कीस झाड की पत्ती आहे असे वाटल्याने फर्माईश शब्द वापरत आहे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बेकरीतून जे ब्रेड पाव आणतो त्यासगळ्यात अंडे असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पिझ्झा बेस बनवायला शिकवाल का?<<

माझ्या अनुभवानुसार कमी तापमानावर आणि कमी वेळ भाजलेला फोकाचिया हा पिझ्झा बेस म्हणून उत्तम पडतो.

>बेकरीतून जे ब्रेड पाव आणतो त्यासगळ्यात अंडे असते का?<

भारतापुरतं बोलायचं झालं तर नाही. त्याचं कारण हेच की भारतात बऱ्याच लोकांना अंडं चालत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पाव मला पावला नाही, सपशेल फसला.. Sad प्रत्येक गोळा तोफेत वापरता यावा इतका टणक झाला होता Wink
बहुतेक यीस्ट कमी पडले असे वाटते.

ब्यू बर्डचे अ‍ॅक्टिव्ह यीस्ट होते. दिसायला ग्रॅन्युलर दाणे दिसतात. ते अडीच टीस्पून घेतले. पूर्ण ५०० ग्रॅ मैदा घेतला होता. ब्रेड फ्लॉर म्हणून वेगळे काहि मिळाले नाहि. (बाकी इतर गोष्टींचे प्रमाण धाग्यात दिले होते अस्सेच)

पीठ भिजवतानाच पाणी कमी वाटत होते. पण धाग्यात १ कप दिल्याने तितकेच घेतले.
दोन तासात बरेच आकारमान वाढले (जवळजवळ दुप्पट असावे) पण काही विडीयोत दाखवतात तितके पीठ 'फ्लफी' झाले नव्हते..शिवाय वर दिसतेय तसे पोरसही नव्हते
गोळे करायलाही किंचित जोर लागेल इतके कठीण पीठ होते.(साधारण शंकरपाळ्यांच्या पीठाइतके किंवा त्याहुन किंचीत हलके)

काय कारण असु शकेल? पाणी कमी पडले असेल का? अजून एक म्हणजे मायक्रोवेव्हच्या कन्व्हेक्शन मोडवर १६ मिनिटे बेक केले. त्यामुळे काही असेल का? (म्हंजे OTGच हवे का?) का अधिक यीस्ट घालावे लागेल?

यीस्टच्या खोक्याचा फोटो:

आतील यीस्ट असे दिसत होते:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे पीठ बरेच सैल होते खरे! पाणी २५० मिली मोजून घेतले होते ़की एक कप? काही वेळा, वेगळ्या देशांप्रमाणे मोजायच्या कपाचे आकार वेगळे असतात. या पाकृ.त पाणी २५० मिली, दूध ४० मिली, एक अंडे (४५ मिली) असे मिळून ३३५ मिलीच्या आसपास द्रव्य पदार्थ आहेत आणि ५०० ग्रॅम मैदा आहे, ते पहाता पीठ बरेच सैल होते. शिवाय तुमचे पीठ बरेच फुगले याचा अर्थ यीस्टही चांगले होते म्ह्णजे ही कन्व्हेक्श्न ऑव्हनची भानगड असावी. इतर ़कोणी कन्व्हेक्श्न ऑव्हन वापरते का?
अशावेळी पाव फसल्यास आणि पीठ थोडे उरल्यास त्याच पीठात अजून थोडे दूध मिसळून त्याचे नान थापून ते तव्यावर भाजता आले असते. मी नानसाठी जी पाकृ वापरते त्यात हेच सगळे साहित्य थोड्या वेगळ्या प्रमाणात आहे.
असो, मी उद्या पुन्हा हे पाव बनवेन आणि या वेळेस एक छोटी चित्रफीत काढून इथे चिकटवेन त्यामुळे अधिक अंदाज येईल, पुन्हा बनवायचे धाडस करायचे असेल तर Smile
आणि हो, पुढचा धागा पिझ्झावर लिहेन, त्यासाठी दोन- तीन वेगळ्या कृती वापरते त्याचे संकलन करते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शनच्या गाईडमध्ये म्हटले आहे की या मोडवर गेल्यावर मायक्रोवेव्ह नॉर्मल ओव्हनसारखाच होतो. (मला वर हीटिंग कॉईल आहे असे दिसले. सामान्य ओटीजीत कॉईल कुठे असते?) तेव्हा त्याचा हा प्रॉब्लेम नसावा असे वाटते. पण कोणी हा मोड वापरून बनवत असेल तर त्यांचा अनुभव उपयुक्त व्हावा.

अजून एक ऑब्झरवेशनः पाव (किंवा जे काय झाले ते;) ) आतून कच्चा वाटत होता.

थोडी पश्चातबुद्धी:
तृटी१: मी ज्या कपातून पाणी घेतले ते पाणी मोजले, जे साधारण २२५मिली भरले
तृटी२: शिवाय भारतात मिळणारी अंडी आकाराने लहान असतात हे ही मी लक्षात घ्यायला हवे होते.

प्रश्नः
१. पीठ फुगले खरे पण तुम्हा दोघीच्याही फोटोमध्ये गोळे ओले असतानाच त्यांना अगभूत जाळीदारपणा (पोरस स्ट्रक्चर) दिसते आहे [विशेषतः सानिया यांच्या पहिल्या दोन फोटोत] मी भिजवलेल्या पीठाला तशी अंगभुत जाळी दिसत नव्हती. तेव्हा अजून अर्धा टीस्पून यीस्ट घातले तर फायदा होईल असे वाटते का?
२. मी फुड प्रोसेसर मध्ये कणीक मळली जी जेमतेम दिड मिनिटात छान मळल्यासारखी त्याचा गोळा झाला. तरी तो बाहेर काढून हाताचे अजून दोन चार मिनिटे मळायची गरज आहे का?

बाकी, पुन्हा एकदाच काय, हे पाव जमेपर्यंत धाडस करत रहाणारच आहे, त्याशिवाय चैन पडणार नाही. फक्त पुढल्यावेळी थोडे थोडे बेक करेन म्हणजे प्रयोग फसला तर लगेच काही बदल करून पुन्हा प्रयोग करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटतं, फूड प्रोसेसर ने तुमचा घात केला असावा!

ब्रेड चा गोळा मळण्यासाठी यु ट्युब वर जर तुम्ही सर्च केले तर वेगळे मशिन असते. अगदी घुसळल्या, कुस्करल्या सारखी ब्रेड ची कणिक मळली तर तापमान वाढून यीस्ट गांगरतो, मरतो असे कुठेतरी वाचले आहे.

पुढच्या वेळी जरा हाताने मळण्याचा प्रयत्न करा. मला वाटते जमून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

ओह! आता पीठाचे चार भाग करतो, एक हाताने मळतो, एक फुड प्रोसेसरमध्ये, एकात यीस्ट किंचित वाढवतो आणि एक २५० मिलीपेक्षाही अधिक पाणी घेतो. बघुया!

बाकी हाताने मळायचे म्हंजे बायकोला इन्व्हॉल्व्ह करायला लागेल आणि मग पाव छान झाला की क्रेडीट तिला Smile मला कणीक मळता येते असा फक्त माझा एकट्याचा (पोकळ) दावा आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी हाताने मळायचे म्हंजे बायकोला इन्व्हॉल्व्ह करायला लागेल

आजुबाजूला लहान मुलं असतील, तर त्यांनाही सामिल करून घ्या. पावाची कणीक भिजवणे/तिंबणे ही एक मस्त सेन्सरी अ‍ॅक्टिवीटी आहे. करंज्यांची घट्ट भिजवलेली कणीक मुलांना खेळायला दिली असता, फुड प्रोसेसरमधून काढल्यासारखी मऊसूत होते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पीठ भिजवतानाच पाणी कमी वाटत होते. पण धाग्यात १ कप दिल्याने तितकेच घेतले.<<

वेगवेगळ्या पिठांमधलं ग्लुटेनचं प्रमाण कमीअधिक असतं. त्यामुळे असं झाल्यास (पाककृतीशी एकनिष्ठ राहण्यापेक्षा) पाणी/पीठ कमीजास्त करावं.

>दोन तासात बरेच आकारमान वाढले (जवळजवळ दुप्पट असावे) पण काही विडीयोत दाखवतात तितके पीठ 'फ्लफी' झाले नव्हते..शिवाय वर दिसतेय तसे पोरसही नव्हते<

आकारमान वाढलं म्हणजे पीठ व्यवस्थित आंबलं होतं. आतल्या बुडबुड्यांविषयी फार काळजीचं कारण नाही, कारण आंबताना नाही आले तर भाजताना येतात. पण पाणी कमी पडल्यामुळे पीठ घट्ट झालं; आणि हातानं न मळल्यामुळे त्याला लवचिकता कमी आली.

>मायक्रोवेव्हच्या कन्व्हेक्शन मोडवर १६ मिनिटे बेक केले. त्यामुळे काही असेल का? (म्हंजे OTGच हवे का?)<

ब्रेड वरून खरपूस भाजला गेला होता का? तसं असेल तर कन्व्हेक्शनमध्ये काही अडचण नाही. पण तसं झालं नसेल तर त्याचं कारण हे असू शकेल : काही वेळा हीटिंग काॅईल तापण्यासाठी नुसत्या कन्व्हेक्शनपेक्षा 'ग्रिल' किंवा कन्व्हेक्शन+ग्रिल किंवा 'बेक' असा पर्याय निवडावा लागतो. हे तपासायचं असेल, तर नुसते शेंगदाणे टाकून कोणत्या मोडमध्ये त्यांचा रंग बदलतो ते तपासता येईल.

>अजून एक ऑब्झरवेशनः पाव (किंवा जे काय झाले ते;) ) आतून कच्चा वाटत होता.<

हे तपासण्याचा सोपा उपाय : पाव भट्टीतून काढून त्यावर (दरवाजा वाजवावा तसं) टकटक करणं. जर आतून पोकळ असल्यासारखा आवाज आला, तर ब्रेड भाजला गेला आहे. जर आतून ओलसर आणि कच्चा असेल तर भरीव आवाज येतो.

>मी भिजवलेल्या पीठाला तशी अंगभुत जाळी दिसत नव्हती. तेव्हा अजून अर्धा टीस्पून यीस्ट घातले तर फायदा होईल असे वाटते का?<

अधिक यीस्टची गरज मला तरी भासत नाही. गोळा जवळजवळ दुप्पट झाला म्हणजे यीस्ट योग्य होतं. एखादवेळेस यीस्ट कमी पडलं असेल तरीही थोडा अधिक वेळ आंबवून गोळा दुप्पट करता येतो. जाळी न येण्याचं कारण पाणी आणि मळणं हे आहे.

>तृटी१: मी ज्या कपातून पाणी घेतले ते पाणी मोजले, जे साधारण २२५मिली भरले <

पाणी कमी पडलं हे निदान बरोबर दिसतंय.

>तृटी२: शिवाय भारतात मिळणारी अंडी आकाराने लहान असतात हे ही मी लक्षात घ्यायला हवे होते. <

अर्धा किलो पिठाला ह्यानं फारसा फरक पडणार नाही.

>बाकी हाताने मळायचे म्हंजे बायकोला इन्व्हॉल्व्ह करायला लागेल<

का? हातानं पीठ मळणं फार अवघड नाही. मातीत खेळल्यासारखं चिवडत राहा. एखाद्या बोथट उलथण्यानं अधूनमधून चिकट हाताची कणीक खरवडून काढा.

एकंदर निष्कर्ष : पाणी कमी पडलं.

टणक ब्रेड टाळण्याचे आणखी काही उपाय -
ब्रेड भाजताना आत एका छोट्या वाटीत पाणी ठेवायचं. ह्यामुळे आतलं वातावरण आर्द्र राहतं.
ब्रेड भाजून झाल्याझाल्या त्यातून खूप आर्द्रता बाहेर पडते. टणक झाला आहे असं वाटलं तर ओव्हनमधून बाहेर काढल्याकाढल्या फाॉईलमध्ये गुंडाळला तर ती आर्द्रता टिकून राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अनेक आभार!
होय, ब्रेड वरून खरपूस भाजला गेला होता. तो 'दिसायला' ब्रेडसारखाच होता, वरून भाजलेला वगैरे..फक्त कडक.

आता दोनेक दिवसांत पाणी वाढवून + हाताने मळून बघतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बटर बनले का पावा ऐवजी? Smile


हरकत नाही. चहा बटर उत्तम पदार्थ आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा.. अगदी अगदी.. मात्र तेही फटुतल्यासारखे दिसत नव्हते. वरून जास्त भाजलेले (पावासारखे) बटरच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी काय म्हणते सरळ आणा की बेकरीतून पाव
हाय काय नाय काय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

काल पुन्हा पाव बनवून पाहिले आणि यावेळी चित्रफीत बनवायचा प्रयत्नही केला. (फाईल छोटी करायची असल्याने, चित्रफीतीचा दर्जा फार चांगला नाहीय पण साधारणपणे पीठाची घनता, मळायची पद्धत वगैरेचा अंदाज येईल.) यावेळेस माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी:
१) पाण्याच्या प्रमाणात अगदी २५ मिलीचा जरी फरक पडला तरी कणकेच्या घट्टपणात मोठा फरक पडतो त्यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घ्यावे.
२) ५०० ग्रॅम मैदा माझ्या मोजायच्या कपाने साधारण साडेतीन कप भरला.
३) कणीक एकत्रित गोळा बनून आल्यावर, सपाट पॄष्ठभागावर सात ते आठ मिनिटे मळावी लागली.
४) कणीक आंबवायला ठेवताना थोड्या ऊबदार जागी ठेवल्यावर दीड तासात हवे तशी फुगली पण प्रादेशीक तापमानाप्रमाणे (विशेषतः थंडीच्या दिवसात) हा वेळ बराच बदलू शकतो. कणीक चांगली फुगावी म्हणून यीस्टचे प्रमाण वाढविण्याऐवजी पीठ ऊबदार जागी ठेऊन त्याला फुगायला अधिक वेळ दिल्यास ती चांगली हलकी होईल आणि पावही हलका होईल.
५) पहिल्यांदा फुगल्यावर त्याचे गोळे करून ते पुन्हा फुगण्यासाठी ठेवताना झाकले नाहीत तर अधिक उत्तम. मी चित्रफीतीत ते ओल्या फडक्याने झाकताना दाखविले आहेत पण नंतर मी ते फडके काढून टाकले आणि त्यामुळे (ते फडक्याला न चिकटल्याने)गोळ्यांचा आकार चांगला गोल राहिला.
६) यावेळेस भाजताना, पंधरा मिनिटांनंतरही पाव पुरेसे तपकीरी झाले नाहीत म्हणून अजून दोन मिनिटे ओव्हनमध्ये ठेवले. मागच्या वेळेपेक्षा यावेळेस पीठ थोडे अधिक आंबल्याने व फुगल्याने थोडा अधिक वेळ भाजावे लागले असे वाटते. त्यामुळे आपापल्या ओव्हनच्या गरमपणाच्या अंदाजाप्रमाणे भाजण्याचा वेळ ठरवावा. चिंतातूर जंतूंनी सांगितलेली पावावर टिचकी मारून त्याच्या आतून पोकळपणाच्या अंदाज बांधण्याची युक्ती चांगली आहे पण या पावाच्या लुसलुशीत बाह्यपृष्ठभागासाठी ती वापरता येत नाही. त्यामुळे पावाच्या रंगावरून अंदाज बांधावा लागेल, फार तपकीरी रंगावर गेला तर कडक होईल आणि जास्त पांढरा राहिला तर आतून कच्चा राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज संध्याकाळी डिजिटल स्केल वगैरे आणून प्रयोग सुरू करण्याचा विचार आहे. पावासाठी मैद्याऐवजी कणीक किंवा अन्य पीठं वापरता येतील का? मला बाजरी आणि नाचणीची चवही आवडते, पण एकतर भाकर्‍या करता येत नाहीत आणि गॅस नाही, तुझ्याकडे आहेत तशा कॉईलच आहेत. या किंवा अन्य पीठांचा पाव बनवला आहेस का कधी?

तुझ्या स्वयंपाकघरातला केशरी रंग आणि मोठ्ठा सुरा आवडला. माझ्याकडेही असाच एक मोठ्ठा सुरा आहे, तो बर्‍याच दिवसांत तसाही वापरलेला नाही. आता पाव बनवलाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाकरी न करता येण्याचे कारण कळेल का ?
भाकरीसाठीची कृती इथे मिळेल. मला तर पोळ्याम्पेक्षा भाकरी करणेच अधिक सोपे वाटते. पोळपाट-लाटणेदेखील लागत नाही. तुमच्याकडे विस्तव नाही त्यामुळे एक बाजू तव्यावर भाजल्यानन्तर, दुसरी बाजू थेट विस्तवावर भाजल्याने येणारा खरपूसपणा किंवा पापुद्रा विलग होणे कदाचित जमणार नाही. (थेट कॉईलवर टाकून प्रयोग करून पाहायला हरकत नाही), पण ते ठीक आहे. दिलेल्या दुव्यात दोन्ही बाजू तव्यावर भाजून दाखविल्या आहेत.
------
रुची - चित्रफितीसाठी खूप अभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थेट कॉइलवर टाकायच्या ऐवजी पापड भाजायचं जे काही उपकरण असतं ते वापरता येतं, मी फुलके तसेच भाजते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भाकर्‍या का जमल्या नाहीत हे आता आठवत नाही. भाकर्‍या बनवताना बघितल्यामुळे हे प्रकरण फार सोपं असावं आणि लगेच जमेल अशी खात्रीही होती. (अन्य प्रकारचे पदार्थ, पोळी, थालिपीठ इ. बनवण्याची सवय असल्यामुळे जमेल याची खात्रीही होती.) पण भाकर्‍या फार आवडल्या नाहीत. कदाचित पीठ जुनं असेल किंवा काही.

थेट कॉईलवर पापड भाजलेले आहेत. ते विस्तवासारखे छान होत नाहीत, पण न पेक्षा बरे. सध्या थंडी आहेच आणि घरात फायरप्लेसही आहे. तिथेही प्रयोग करून बघितले पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भाकरी न जमण्याबाबत समदु:खी आहे. बाजरीची खुसखुशीत भाकरी अत्यंत आवडते. एकटा राहात असताना बर्‍याचदा पीठ आणून भाकरी करायचो. पीठ ताजं असो किंवा जुनं, मुख्य प्रॉब्लेम भाकरीच्या पिठाच्या मळलेल्या गोळ्यात होता. पाण्याची वेगवेगळी प्रमाणं घेऊन मनासारखा (?) गोळा झाला की तो थापायचो. थापेपर्यंत सर्व उत्तम व्हायचं. पण तो तव्यावर टाकण्यासाठी उचलायला गेलं की त्याच्या खाली हात / बोटं / उलथनं जे काही घातलं असेल तितक्याच आकाराचा तुकडा तुटून वर उचलला जायचा आणि बाकीचा पार्ट खालीच. यामधे खालील व्हेरिएशन्स करुन पाहिली:

- पोळपाटावर थापणे
-भरपूर कोरडं पीठ पोळपाटाला लावून मग थापणे
-प्लॅस्टिक पिशवीवर थापणे
-तेलाच्या हाताने थापणे
-ओल्या हाताने थापणे
-कोरड्या पिठाच्या हाताने थापणे.

तरीही भेगाळ जमिनीप्रमाणे तुकडे पडणं तसंच. त्यामुळे मग ते छोटे छोटे तुकडे चिमट्याने थेट गॅसच्या ज्योतीवर भाजून बिस्कीटासारखे खायचो.

शेवटी तव्यावर थेट भाकरी थापणे हा एकच उपाय उरला. पण या पद्धतीने एकच भाकरी बनवता येते. मग गरम तवा गार होईपर्यंत थांबावं लागतं.
मग मी दोन तवे आणून एकावेळी दोन भाकर्‍या बनवण्याची सोय केली.

तरीही ती भाकरी दोन पदरी कधीच झाली नाही. लहान लहान भाजक्या तुकड्यांऐवजी एक मोठ्या आकाराचा भाजका तुकडा इतकाच फरक.

तरीही मला ती तशीसुद्धा आवडत असे.

आजतागायत मला ती जशी असायला हवी तशी जमलेली नाही. मी हार मानली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(मला अजुनी धड पोळ्या जमत नाहीत. पण भाकर्‍या मात्र अगदी पहिल्या दिवसापासून छान जमतात. त्या बळावर हा अनाहूत सल्ला. :प)

भाकरीचं पीठ भिजवताना एक तर उकड काढायची. (जेवढं पीठ, तेवढंच पाणी. पाण्याला उकळी फुटली, की त्यात चवीपुरतं मीठ नि मापलेलं पीठ घालून ग्यास बारीक करायचा. झाकण ठेवायचं. नि हलक्या हातानी तळापासून हलवून पाचेक मिंटात बंद करायचं.) ती भरपूर मळून घेतली नाही, तर भाकरी हमखास मोडते. गेला बाजार तिला चिरा तरी पडतातच. नि चिरा पडल्या की भाकरीची वाफ त्यातून निसटून जाते नि मग भाकरी फुगत नाही.

पीठ मळताना हाताच्या तळव्याचा - मनगटाच्या लगतचा उंचवटा - वापर करायचा. पीठ रेमटवून ताटलीला चिकटवायचं नि परत सोडवून तीच कृती करायची. चांगलं मिळून येतं. असं मऊ झालेलं पीठ असलं, की भाकर्‍या मोडत नाहीत.

भाकरी थापताना सुरुवातीला तरी भरपूर पीठ गोळ्याखाली घ्यायचं. थापताना हातही कोरड्या पिठात वारंवार बुडवून घ्यायचा. मधे मधे ताटली भाकरीसकट उचलायची नि पीठ चाळताना चाळण हलवतो तशी हलवायची. की भाकरी ताटलीत चिकटणारच असेल, तर सुटी होते. असं मधे मधे करत राहायचं. भाकरी पुरेशी मोठी झाली की भाकरीवर एक हात ठेवायचा नि तो हात अलगद उताणा करायचा. तसा उताणा करताना दुसर्‍या हातानी ताटली पालथी करायची, की भाकरी उताण्या हातावर अलगद येऊन पडते. तिला दुसर्‍या हाताचा आधार देऊन - खाली पीठ लागलेली बाजू वर येईल अशा बेतानी - तिला तव्यावर पोचती करायची. नी ग्यास बारीक करून तिच्यावर पाणी फिरवून घ्यायचं. लगेच ग्यास वाढवायचा.

पाणी सुकलं की लगेच भाकरी उलटायची. चिकटू द्यायची नाही, हे ट्रिकी.

एकदा नीट भाजू दिली, की परत उलटायची.

मग तिला चांगली दाबून दाबून भाजायची. की फुगायला लागते. मग तव्यावरून थेट विस्तवावर घ्यायची. सगळं नीट जमलं असेल, भाकरीला चिरा नसतील, ती चिकटून फाटली नसेल, तर वाफ सुटू शकत नाही, आत कोंडली जाते नि भाकरी टम्म फुगते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी अचुक .. Smile
आता मी काहि लिहायची गरज नाही.. टंकनश्रम वाचवल्याबद्दल आभार! Smile

@गवि,
फक्त हातावरील शुक्राचा उंचवटा आणि त्याबाजूचा भाग वापरून भाकरीचे पीठ मळल्याने (आणि खरंतर बायकोला भाकरी आयती मिळाल्याने) नवराबायकोंत प्रेम वाढते Wink
तेव्हा बघाच करून नाहितर असाच एक ग्रुप प्रोजेक्ट करू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेकोत्तम धन्यवाद. उकड काढणे आणि मळण्याची ही चिकट पद्धत या दोन्ही गोष्टी माझ्या कृतीत मिसिंग होत्या. आता परत करण्याचा हुरुप आला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगायच्या राहून गेलेल्या गोष्टी:
भाकरीवर पाणी फिरवताना थोडेही पाणी तव्यावर दवडू नये. पीठ आणि पाणी मिसळून तव्याला चिकटते आणि भाकरी उलटताना वाट लागते.
भाकरी थापताना ती सगळीकडे सारख्या जाडीची असेलसे पाहावे. त्याने फुगण्याच्या शक्यतेत खूपच वाढ होते.
मधे जाड राहिली तर एकवेळ चालेल, पण कडा शक्यतोवर पातळ होईलसे पाहावे.
भाकरीला चीर पडलीच, तर ती फडक्याने वा कालथ्याने दाबून थोडी चीटिंग करावी आणि वाफ कोंडावी. भाकरी फुगते.
पोळ्यांची कणीक (म्हणे) थोडा वेळ भिजवून ठेवून ती तेवते (म्हणजे काय देव जाणे) आणि पोळ्या मऊ होतात. भाकरीचे पीठ मात्र अगदी दरेक भाकरी थापायपूर्वी चांगले मळून घेतले तर भाकरी चांगली होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भाकरी करणं अगदी पहिल्या एक-दोन प्रयत्नात फारसं जमत नाही तरी थोडीशीच चिकाटी ठेवली तर लगेच जमतात, असा माझा अनुभव आहे. मलाही पहिल्या वेळी जमल्या नव्हत्या. पण २-३ प्रयत्नांत त्यांचे तंत्र उमगल्यावर आता छान जमतात. माझ्याकडे गॅस नाही, हॉट प्लेट आहे. मी दोन्ही बाजू तव्यावरच भाजते, छान पोपडा सुटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

एक दोन नव्हे, मी सहाएक वर्षं एकटा बॅचलर राहात होतो. त्यातली तीन वर्षं स्वतःच्या घरात किचनची उपलब्धता असलेल्या स्थितीत राहिलो. तेव्हा दर थोड्या दिवसांनी भाकरी बनवायचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे किमान वीसतीस प्रयत्न तरी झाले असतील. इतकंही सांगतो की ती तुकडा-भाकरी ही मी स्वीकारली होती इतक्यांदा प्रयत्न करुन फसलो. आजी, आई यांच्याकडून सल्ले घेतले. पण मुद्दा पिठाच्या कन्सिस्टन्सीचा होता. अजिबात चिकटपणा नसल्याप्रमाणे भाकरी सलग उचललीच जायची नाही. इतकाच प्रॉब्लेम. पण तेवढ्याने सर्व फ्लॉप व्हायचं. शिवाय पदर सुटण्यासाठी पोळीसारखी पुन्हापुन्हा मळून पाहिली पण नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं जस पोळ्यांशी वाकडं आहे त्यातला प्रकार दिसतोय Wink

बाकी, मला भाकर्‍या थापता येतात, पापुद्रा वगैरेही सुटतो. एकद नीट प्रमाण वगैरे लिहुन टाकतो इथे. मात्र मला जास्त पीठात थापाव्या लागतात.

सुरवात म्हणून बाजरीची बाकरी नाही तर मिक्स पिठाची भाकरी बनवून बघा (बाजरी+ज्वारी+नाचणी) हल्ली हे भाकरीचं पीठ म्हणून तयार मिळतं..
नुसत्या बाजरीच्या भाकरीची मजा नसली तरी याच्या भाकर्‍या बनवणं अधिक सोपं आहे, त्यावर सराव झाला की बाजरीच्या पिठाकडे वळता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile तुमचं आणि भाकरीचं खरंच काहितरी वाकडं असावं. अन्यथा मेघनाने दिलेली कृती व्यवस्थित फॉलो केली तर भाकरी चुकणे नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

पीठ मळताना किञ्चित तेल घालून पाहा. कदाचित चिकटपणा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला ही अन्य पिठांचा वापर केल्यास काय बदल करावे लागतील हे जाणून घ्यायला आवडेल. बाजरी, नाचणी, राजगिरा, ज्वारी, इव्हन साधी कणीक वापरल्यास. साधा ब्रेड करताना मात्र मैद्याबरोबर गव्हाचं पीठ वापरलं तर पाव चांगलाच दाट आणि जड होतो असा अनुभव आहे. एकदा १/३ मैदा, कणीक आणि राजगिर्‍याचं पीठ करून पाहिलं होतं, पण प्रयोग फसला. अंडे घालून कदाचित असला पाव कदाचित अधिक हलका होईल, नाही?

अदिती, अमेरिकेत दुकानातले ज्वारीचे पीठ फारच जुने असते, भाकर्‍या चांगल्या होत नाहीत. माझी आई एकदा पुण्याहून ताजं घेऊन आली, पण एका महिन्यानंतर तेही वापरता आलं नाही. उत्तर कर्नाटकात (कदाचित कोल्हापूर कडे सुद्धा) ज्वारीच्या पिठाची पिठल्यासारखी 'मुद्दी' करतात, ते करून करून पीठ संपवले. माझ्या मैत्रिणीनी आता ज्वारीच्या पिठासाठीच घरी एक छोटीशी गिरणी घेतली आहे.

रुची, कमाल आहे तुझी- चित्रफितेने फार मदत झाली. आमच्याकडे पाहुण्यांची रांग लागल्याने सारखा प्रयोग पुढे ढकलावा लागतोय, पण आज उद्या करून पहायलाच हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत नाहीच. काही वर्षांपूर्वी पुण्यात दोन-तीन प्रयोग करून बघितले आणि मग सोडून दिले. नाचणीचं पीठ आणून पाहिलं, तोच निकाल. मग शेवटी उरलेली पिठं कणकेत मिसळून किंवा पोळी लाटताना वर लावायला वापरून संपवून टाकली. मी भाकरीची कणीक बहुदा फार मळत नव्हते. आता बघू कधी प्रयोग करेन तेव्हा करेन. पोळीची कणीकही मी फार मळत नाहीच. आदल्या रात्री भिजवून दुसर्‍या दिवशी पोळ्या केल्या तरी काम होतं. शिवाय आळशीपणामुळे रविवारी रात्रीच शुक्रवारपर्यंतची कणीक भिजवली की आणखीनच फायदा.

सध्या पावाचं भूत शिरलंय. फुसफुशीत पाव मलाही आवडत नाही. त्यामुळे मैद्यावर केलेले एक-दोन प्रयोग सफल झाले तर मग कणीक आणि इतर पीठांवर प्रयोग करून बघायचा विचार आहे.

नाचणीचं पीठ पोळ्यांना वरून लावायचे त्या काळात एकदा घरी पाहुणे आले. त्यांच्याबरोबर एक लहान मुलगाही होता. त्याच्या आजीने त्याला चॉकलेट लावलेली पोळी म्हणून ती वाढली. त्याने आनंदाने खाल्लीही. त्याच्या आई आणि आजीलाच त्रास झाला. पुन्हा घरी गेल्यावर "चॉकलेटची पोळी हवी" म्हणून त्याने आपल्या घरी दंगा केला हे ही नंतर समजलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनेक आभार!
इतके कष्ट घेऊन तुम्ही फिल्म टाकल्यावर तर माझ्यावरची जबाबदारी (उगाच) वाढल्यासारखी वाटते आहे Smile
हा विडीयो बघुन काहि गोष्टी नक्कीच्या जाणवल्या+ एक प्रश्नः
-- मी पाव केले तेव्हा पाणी नक्कीच कमी पडले
-- हाताने मळणे आवश्यक
-- माझे पिठ फुगले होते पण ते तुमचे पिठ हलके हलके / गुलगुलीत झाले आहे तसे नव्हते बरेच दडस राहिले होते (कमी पाण्याचाच परिणाम असावा)
-- गोळे केल्यानंतर ते विडीयोत दाखवल्याइतके फुगले नाहीत.
-- बाकी प्रमण तुमच्याकडे जसे चमचे आहेत तशाच चमच्याच्या सेटमधे मोजून घेतले होते तेव्हा तिथे चुक व्हायची शक्यता कमी दिसते.

प्रश्नः
विडीयोत ३:५० ते ३:५८ दरम्यान तुम्ही लोणी मिक्स करताय का? तसे असल्यास मी ते केले नव्हते कारण वर दिलेल्या धाग्याच्या कृतीत तसा उल्लेख नाही Smile (म्हणजे इन्ग्रेडीयन्ट्समध्ये आहे पण मला वाटलं पावभाजीबरोबर खाताना शेवटी पावाला लोणी लावायचं लिहिलं आहे त्यासाठी ते लिहिलं असावं)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझाही पाव बनवताना असाच गैरसमज झाला होता आणि मीही लोणी घातले नव्हते. पाव किंचीत कोरडे वाटल्यावर इतर काही फिती बघण्यात आल्या तेव्हा ही चूक लक्षात आली होती, पण लिहायची राहून गेली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी गडबड झाली होय? कृतीत लिहायचे राहून गेले खरे पण लोणी कणकेतच मिसळायचे होते. लोण्यानेदेखिल पावाच्या मऊपणात खूप फरक पडेल, पुन्हा बनवून पहा. लोणी सुरवातीलाच मैद्यात मीठ मिसळायच्या वेळीच घातले तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विकांताला नेमका पुण्याबाहेर आहे आणि आज-उद्या बरीच गडबड आहे. पुढल्या आठवड्यात नक्की करेन.
त्यानिमित्ताने डिट्टेलवार विडीयो आला हे ही नसे थोडके Smile

बाकी, काही दिवसांनी हा धागा बघणार्‍यांच्या सोयीसाठी मुळ धाग्यात योग्य तो बदल कराल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यांदाच पाव बनवणार्यांनी आधी मैद्याचा पाव बनवून पहावा असं मला वाटतं कारण त्यातलं ग्लूटनचं प्रमाण मुबलक असल्याने पाव चांगला बनण्याची शाश्वत्ती असते. नंतर हात बसला आणि अंदाज आला की वेगवेगळी पीठे मिसळून प्रयोग करता येतात, मी राय, स्पेल्ट, कणीक वगैरे वापरून पाव बनविले आहेत पण ते चांगले हलके बनायचे असतील तर त्यात मैदा मिसळावाच लागतो. मला स्पेल्ट आणि राय वापरून बनवलेले पाव आवडतात. शिवाय पाव बनवताना नैसर्गिक पद्धतीने वाढवलेले यीस्ट (सावरडो) वापरूनही छान चव येते पण हे सगळं बरंच वेळखाऊ आणि अनुभवाचं काम आहे, इतरांना उत्साह असेल तर पुढचे ग्रूप प्रोजे़क्ट (याला मराठीत काय म्हणायचं?) त्यावर करता येतील.
माझ्याकडच्या सुर्यांचा संच, नवर्याने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दिला होता :-)(काय पण धाडसी माणूस आहे नाही! ;-)) अजूनही छान चालला आहे (नवरा आणि सुराही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पावासाठी मैद्याऐवजी कणीक किंवा अन्य पीठं वापरता येतील का?<<

बाजरी आणि नाचणीमध्ये ग्लूटेन फार कमी असतं त्यामुळे त्यांचे पाव हलके होत नाहीत. भरड दळलेली कणीक किंवा रायसारख्या धान्यांना ग्लूटेन कमी, पण चिकटपणा असतो. त्यामुळे त्यांचे पाव करता येतात, पण ते हलके होत नाहीत. बाजारातल्या फुसफुशीत ब्रेडपेक्षा पंपरनिकेल वगैरे जड ब्रेड आवडत असतील, तर असे पाव करावेत. मी अनेकदा रायचा सावरडो किंवा गव्हाच्या भरड पिठाचा मसालेदार गोड ब्रेड करतो. ही पाककृती पाहा, म्हणजे पिठाच्या गोळ्याचा पोत किती वेगळा असतो ते लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

राय ला मराठीत काय म्हणतात? पुण्यात मिळतं का? (शी आस्क्ड, रायली.. ;-))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>राय ला मराठीत काय म्हणतात? पुण्यात मिळतं का? (शी आस्क्ड, रायली.. (;-)))<<

रायला मराठी प्रतिशब्द माहीत नाही. मला रायची चव अतिशय आवडते म्हणून मी परदेशी मित्रमैत्रिणींकडून पीठ आणवतो.

राय यांचे सिनेमेदेखील अवीट असतात, पण ते वेगळं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा हा, मस्त!
आपकी राय में क्या मुझे भी ऐसा ही करना पडेगा? मला ही त्याची चव फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐश्वर्या येण्यापूर्वी कॅचरलाही ह्या रायावळीत सामावून घ्या Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राय ला प्रतिशब्द नसावा ़कारण हे आपल्या देशातलं धान्यच नाहीय. बाजरी, नाचणीत खमंगपणा असतो पण ग्लूटन जवळजवळ नसतंच, त्यामानाने रायमध्ये बरेच ग्लूटन असते (त्याशिवाय का, ती राय टीव्हीवर आली की सगळे पुरुष टीव्हीला चिकटतात!) त्यामुळे त्याचा पाव बनवणं सोपं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचना थोडं गूगललं तर मुंबईतल्या या आयात व्यापार्याकडे मिळण्याची शक्यता आहे. त्याचा इमेल पत्ता आहे, मेल टाकून चौकशी करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावासाठी मैद्याऐवजी कणीक किंवा अन्य पीठं वापरता येतील का?

नाचणी आणि सोयाबीन यांची पिठे घालून पाव करून बघण्याचा विचार आहे. रोजच्या फुलक्यांमधेसुद्धा ही पिठे थोड्या प्रमाणात मिसळत असते. केक करतानाही मी थोड्या हलकेपणासाठी मैदा, कणीक, नाचणी(थोड्या प्रमाणात..याने केक बराच जड होतो) आणि सोयाबीन घालते.

तांदळाच्या भाकर्‍या करताना उकड काढते. इतर भाकर्‍यांचे पीठ भिजवताना त्यात सुरुवातीला गरम आधणाचे पाणी घालते. पीठ जुने असेल, तर त्यात थोडी कणीक चिकटपणाकरता मिसळली, तर भाकर्‍या बर्‍या होतात. पीठ खुपच जुने असेल, तर ते मी थालिपीठ करताना थोडे थोडे वापरून टाकते.

काही दिवस एका खेडेगावात राहण्याचा योग आला. तिथे राहून भाकरी करण्याची नवीन पद्धत शिकले. पिठाचा गोळा बनवल्यानंतर दोन्ही हात पिठात बुडवून घेऊन, एका हातात गोळा धरायचा आणि दुसर्‍या हाताने टाळी वाजवायची. मग दोन्ही हात विलग करून परत गोळा खाली पडायच्या आत टाळी वाजवायची. असे करत आता मी जवळजवळ अर्ध्यापर्यंत भाकरी थापू शकते. उरलेली मग पोळपाटावर थापते.

रुची, आता एकदा लोणी घालून पाव बनवून बघेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मैद्याखेरीज वेगळ्या पीठांचे पाव बनवायचे हा थोडा आदर्शवाद वाटतो कारण पाव हलका बनायचा असेल तर त्यात मैदा मिसळण्याची तडजोड करावीच लागते. इतर पीठे मिसळता येतात पण त्याच्यातल्या ग्लूटनच्या प्रमाणाप्रमाणे ते कीती वापरायचं यावर मर्यादा येतात. उदाहरणार्थ राजगिरा (अ‍ॅमरंथ) पीठ वापरून करायच्या पावात बरेचदा राजगिर्याच्या पीठाचं प्रमाण ३० टक्क्यांपेक्षाही कमी असतं. या धान्न्यांनी पावाला चांगली चव येते हे खरंच आहे पण फक्त प्रकॄतीस अधिक चांगला वगैरे या कारणासाठी इतर पीठे वापरायची असल्यास अधिक विचार ़करावा. मैद्याच्याच पावात थोडा गव्हाचा कोंडा (व्हीटजर्म) किंवा एकतृतियांश होल व्हीट फ्लार किंवा कणिक वापरूनही चांगला पाव बनू शकतो. मैदाही न ब्लीच केलेला वगैरे वापरून किंवा पाव बनवताना त्यात, जवस, तीळ, खसखस, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया वगैरे जिन्नस घालून त्याची चवही वाढते आणि तो प्रकृतीलाही चांगला असतो. मुळात घरी कोणतेही रासायनिक पदार्थ न घालता बनवलेला ताजा मैद्याचा पावही बाजारातल्या पावापेक्षा अनेक पटींनी सरस आहे.
या धाग्याला मिळालेला प्रतिसाद पाहून पुढे अधिक क्लिष्ट, वेळखाऊ आणि चविष्ट पाव बनवायचे उपक्रम एकत्र करता येतील अशी आशा वाटते. माझे सावरडो स्टार्टर बनवायला घातले आहे, एक आठवड्यात तयार होईल, पुढे त्याविषयी लिहेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फायनली! ढँटॅढॅण!!!

रुची यांनी विडीयो टाकून मदत केल्याने बराच फायदा झाला. एक म्हणजे आळस झटकून काल घरी केल्यावर रात्री उत्साहाने पाव बनवायला घेतला आणि विडीयो बघितल्याने पीठ किती मळाआयला पाहिजे, किती फुगायला हवे वगैरे प्रश्न पडत नव्हते. पीठ होऊन फुगेपर्यंत मध्यरात्र उजाडली, पण 'देवा मला पाव!' ही प्रार्थना देवानी ऐकली आणि केलेला'पाव' बर्‍यापैकी सक्सेसफुल झाला. Smile अगदी रुची करतात तितका 'सुंदर' आणि फ्लफी नसला तरी आमच्याजवळ दोन पाववाले आहेत, त्यातील मला न आवडणारा पाव आहे त्यापेक्षा चांगला झाला होता Wink अधिक प्रॅक्टिसने अधिक चांगला होईल अशी खात्री वाटतेय.

-- पाव आता बर्‍यापैकी फ्लफी असला तरी मी बनवलेल्या पावाचे कव्हर जरा कुरकुरीत झाले आहे. बहुदा अंड्याचा वॉश अधिक नीट + ब्रशने द्यायला पाहिजे (त्यासाठी एक तसा ब्रश आणायला हवा)
-- मायक्रोवेवमध्ये भाजताना जरा अधिक प्रयोग करावे लागतील असे दिसतेय. कारण कॉईल आणि ब्रेडमधील अंतर अधिक असते. मी पहिले चार ब्रेड ट्रेमध्ये ठेऊन भाजले जे भाजायला जवळजवळ २० मिनिटे लागली आणि तरी आतून किंचित ओलसरपणा / दडसपणा वाटत होता. म्हणून मग पुढील चार ब्रेडसाठी ग्रिलच्या जाळीवर ट्रे ठवला आणि बेक केले तर बरोबर १५ मिनिटे लागली मात्र कव्हर कुरकुरीत झाले. बरीच रात्र झाल्याने अधिक प्रयोग न करता उरलेले चार तसेच भाजले.
-- अजून एक फरक असा की मायक्रोवेव्हमध्ये OTG च्या विपरीत पाव गोल फिरतो त्यामुळे किती फरक पडतो ते सांगणे कठीण आहे पण एकूणच हे तंत्र जमले की पाव अधिक चांगला बनेल असे वाटते.

बाकी गार झाल्यावर पाव आतून किंचित दडस वाटत असेल तर परत बेक करावा काय?

सुरवातीला उत्साहात दोन स्टेपचे फोटो काढले. आणि अजून एक आहे तो तयार पावाचा. बाकी फोटोग्राफी सकाळी करु म्हणून झोपलो. सकाळी उठल्यावर तो ऑमलेट बरोबर दिमाखात प्लेटमध्ये विराजमान होता त्या आनंदात खाऊन टाकल्याने त्याचे फोटो नाहित Smile

आधी मळलेला गोळा

फुगलेला गोळा

तयार पावाचा तुकडा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान. कणिक दुसर्या फोटोत दिसतेय तेवढीच फुगली की अजून फुगवली होती? थंडीच्या दिवसात फुगायला वेळ लागतो पण जास्त फुगली की पाव हलका होतो. मी घर गार असेल तर आधी ओव्हन एखादा मिनिट गरम करते, मग बंद करते आणि पीठ त्याच्या आत उबदारपणे फुगायला ठेवते किंवा घरातल्या इतर थोड्या ऊबदार जागी ठेवले तर लवकर फुगते. अजून एक म्हणजे, ओव्हनचा आकार छोटा असेल तर तो थोडा जास्त तापतो त्यामुळे दोनशे ऐवजी १८० अंशावर थोडा अधिक वेळ भाजून पहायला हरकत नाही. तुमचा ओव्हन वेगळा असल्याने तुम्हाला थोडे प्रयोग करूनच भाजायचे तंत्र नेमके करावे लागणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेवढीच फुगवली होती. त्या दिअशी हुक्की आल्याने रात्री उशीरा प्रयोग सुरू केला, त्यामुळे अजून जास्त वेळ ठेवणे कठीण होते Smile
आत पुढच्या वेळी अजून फुगू देईन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल संध्याकाळी एकदाचा प्रयोग करायला वेळ मिळाला. कणीक छान मळली, पण फुगायला खूप वेळ लागला; इथे प्रचंड थंडीची लाट आहे आणि भांडं शालीत गुरफटून ठेवलं तरी रात्रभर ठेवावी लागली. पहाटे उठून पावाचे आकार करून पुन्हा फुगवले. भाजायला १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. म्हणजे वरून खरपूस रंग यायला वेळ लागला, पण नंतर मागचे काही पाव वरून जास्त कडक वाटले. हा बॅलन्स बरोबर जमायला अधिक सराव हवा. आणि माझा ओव्हन थोडा विचित्रच आहे.

पाव मस्त झालाय! लोणी-जॅम लावून नाश्त्याला गरमागरम खाल्ला.

pav2

pav1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंडे वापरले का? वापरले नसल्यास त्याऐवजी काय वापरले? पाव छानच दिसताहेत पण थोडे कोरडे वाटताहेत, मला वाटतेय की भारतात मिळणार्या मैद्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण वाढवायला हवेय की काय? तुझे काय मत आहे?
अजून एक म्हणजे पहिली सात आठ मिनिटे झाल्यावर ट्रे फिरवून ठेवला तर सगळीकडून पाव चांगले भाजले जातात, मी तसंच ़करते पण लिहायचे विसरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंडं वापरलं - पहिल्यांदा करताना तू दिलेली कृती तशीच्या तशी करून पहावी म्हणून साम्रगीचे प्रमाण ही तसेच वापरले.
पीठ मळतानाच पाणी थोडं कमी आहे असं वाटलं होतं - पुढच्या वेळेस थोडे जास्त वापरून पाहीन. पण चव मस्त आहे, आणि मुख्य म्हणजे हलके आहेत. रादर होते , आज दोनच राहिले आहेत, मुलाने ही आवडीने खाल्ले.

खाली कणकेच्या पावाचं चित्र आत्ताच पाहिलं - ते ही करून पाहणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता कणीक भिजवून फुगण्याची वाट पहाते आहे.

दोन तासांमधे कणकेच्या आकारमानात दृष्य फरक नाहीये. डोशाचं पीठ काल रात्रीपासून होतं तिथेच बसून आहे. बाहेर झकास हवा आहे, टीशर्ट-शॉर्ट्सवर बाहेर पडता येईल असं. (उत्तरेकडे रहाणारे माझे स्नेही याची दखल घेतील का?) त्यामुळे वेगळं हीटींग करायची आवश्यकता नाहीये. ते करायला लागलं असतं तर गरम हवेच्या झोताखाली पीठं ठेवता आली असती. अजून अर्ध्या तासात फार फरक नसेल तर वर रुचीच्या प्रतिसादातली ओव्हन गरम करण्याची पद्धत दोन्ही पीठांसाठी वापरण्याचा विचार आहे. डोश्याचा पीठावर ही पद्धत हुकमी चालते हे अनुभवातून माहित्ये.

अजून एक. मी जे ब्रेड फ्लार आणलं ते थोडं तपकिरी रंगाचं आहे. कणीक मळताना हाताला मैद्यापेक्षा कोंडामिश्रीत कणकेसारखंच लागत होतं. म्हणून भिजवताना त्यात पाणी आणि बटर अधिक घातलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होल व्हीट फ्लार आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१००% अमेरिकन संपूर्ण गव्हाचं पीठ आहे. आता कणीक आकारमानाने बाहेर ठेवूनच साधारण ५०% वाढलेली आहे. गोळे करण्याआधी पुन्हा थोडं पाणी घालून बघण्याचा विचार करते आहे. त्याचा फायदा होईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाणी वाढवून फरक पडणार नाही. तशीच बाहेर राहू दे आणि अजून फुगू दे. संपूर्ण गव्हाचं पीठ मैद्याइतकं (किंवा पांढर्या ब्रेड फ्लार इतकं) फुगणार नाही पण आता फुगायला लागलं असेल तर अजून फुगू दे. थोडे फोटो (विशेषतः) पीठाच्या पाकीटाचे लावलेस तर जरा अंदाज येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची, पाव चवीला आणि कन्सिस्टंसीला उत्तम झाला आहे. चुकून आणलेल्या आख्ख्या गव्हाच्या पीठाच्या पावाची कन्सिस्टंसी मला आवडेल अशी झालेली आहे. पाव किंचित क्रस्टी आहे आणि फुसफुशीतही नाही.
हे पीठ

ही गुरूदक्षिणा:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाव तुला आवडण्यासारखा झालाय हे जास्त महत्वाचं Smile तुझा पूर्ण गव्हाच्या पीठाचा पाव बनवायचा उपक्रम पाहून मलाही आज तो प्रयोग करायची हुक्की आली, सुदैवाने घरात ते पीठही होते. दूध, अंडी, लोणी, पाणी या सगळ्याच्या प्रमाणात बरेच बदल करायला लागले पण पाव उत्तम झाला. त्यानिमित्ताने असेही पाव छान होतात हे कळले त्याबद्दल धन्यवाद! Smile
अधिक फोटो आणि कृती दुसर्या धाग्यात लावायचा विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! कसला टम्म पाव आहे Smile
कृती येऊच दे.. त्यानिमित्ताने "अरे अगदी घरी केला तरी पण शेवटी येवढा मैदाच पोटात जाणार ना?" या वाक्यांना डावलता येईल Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यम्मी किंवा तोंपासू अशी वेगळी श्रेणी पाहिजे होती राव या अशा फोटोसाठी. काय दिस्तोय पाव आहा!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा माझा प्रयोग.
पाणी थोडं अधिक लागलं. अवनमधे खाली पाण्याचं भांडं ठेवलं, वेळ थोडा कमी पुरला, आणि बाहेर काढल्यावर फॉईलने झाकून ठेवल्याने मऊ झाला. पुढच्या वेळी अधिक प्रमाणात करून पहायला हवेत. अतिशय आवडली आहे रेसिपी. धन्यवाद!
फोटो दिसत नाहीये काही कारणाने Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो कुठे अपलोड केला/केले आहेत?

रुचीने खरडवहीत दिलेल्या प्रमाणानुसार, याच कृतीने पूर्ण गव्हाचा पाव बनवला. मस्त झालाय. हे प्रमाणः
५०० ग्रॅम पीठ, १.५ टेस्पून यीस्ट, २ अंडी (हो खूपच आहेत पण ब्रेड खूपच हलका होतो), ७५ ग्रॅम लोणी, ८० मिली कोमट पाणी, १७० मिली दूध, ४० मिली मध, १.५ टीस्पून मीठ.

पाव मधामुळे गोड लागत नाही. बनवण्याआधी थोडी धाकधूक होती. पण पाव नसेल तर केक म्हणून खाऊ असा विचार केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिकासावर. सेटींग्स ओपन आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक द्याल का? तुमच्या प्रतिसादात कुठलीच लिंक दिसत नाहिये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अदिती, पूर्ण गव्हाचा पाव बनवताना मी फोटो ़काढले होते त्यामुळे वेगळा धागा ़काढावा की काय असे मनात आले होते पण त्यापेक्षा याच धाग्यात पुरवणी म्हणून जोडेन.
परदेशांत मिळणारे पूर्ण गव्हाचे पीठ (होल व्हीट फ्लार) हे भारतातल्या गव्हाच्या पीठापेक्षा वेगळे असते. भारतात आपण जो गहू कणकेसाठी वापरतो त्यात प्रोटीनचे आणि त्यामुळे ग्लूटनचे प्रमाण बरेच कमी असते असा अनुभव आहे. त्यामुळे भारतात बनविणार्यांनी कणकेच्या चिकटपणाचा अंदाज बांधून त्याप्रमाणे त्यात थोडा मैदा मिसळला तर पाव हलका व्हायला मदत होईल.
दुसरे म्हणजे पूर्ण गव्हाचा पाव बनवताना मिसण्याची पद्धत थोडी वेगळी वापरली,
१) कोमट पाण्यात यीस्ट मिसळून ठेवले, पीठात मीठ मिसळून ठेवले.
२) लोणी, मध एकत्र फेटून घेतेले आणि त्यात अंडी मिसळून पुन्हा थोडेसे फेटले. त्यात यीस्ट मिसळलेले पाणी आणि दूध घातले.
३) मिश्रणात पीठ हळूहळू घालत एकत्र गोळा बनवला. लागल्यास अधिक पीठ किंवा पाणी घालून सैलसर ़कण्केचा गोळा बनवला.
४) कणिक चांगली तिंबली आणि मैद्याच्या पावाप्रमाणे पुढील कृती वापरली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने