ब्रेड अँड बटर - भाग ३ 'पावभाजीचा पाव'

लहानपणी पावभाजी खायला जायचे म्हणजे माझ्यासाठी पाव खायला जाणे असायचे. लुसलुशीत आणि बटरमध्ये खरपूस भाजलेला पाव समोर असताना लोक त्याच्याबरोबर भाजी कशाला खातात असा मला प्रश्न पडायचा. "अजून एक....अजून एक..." अशी मागणी करताना "भाजीपण खायची..." अशी दटावणी करणाऱ्या आईकडे सर्रास दुर्लक्ष करून मी पुढच्या पावावर तुटून पडायचे. पुढेपुढे भाजीदेखील आवडायला लागली पण तरी त्याच्याबरोबर 'अस्सल पाव' नसेल तर त्याची काही मजा नसायची. परदेशात रहायला आल्यावर पावाभाजीबरोबर 'बर्गर बन' ही बरीच मोठी तडजोड वाटायची त्याऐवजी चांगल्या बेकरीतून मिळणारे 'डिनर रोल' हे पावाच्या अधिक जवळचे नातलग आहेत याचा शोधही लागला. घरी ब्रेड बनवायला लागल्यावर पावही बनवून पहायची अर्थातच इच्छा झाली आणि त्याला चांगले यश यायला लागल्यावर ते पुनःपुन्हा बनवायला लागले. गंमत म्हणजे जी पाककृती वापरते ती 'बर्गर बन' साठी असलेली पण त्यातून बनणारा हा 'बन' अगदी थेट देशी पावासारखा बनतो. पावभाजीसाठीच नव्हे तर वडापाव, मसाला पाव वगैरेसाठीही हा पाव अगदी मस्त आहे. पावावर लावलेले तीळ, काळी खसखस वगैरे जर फार बर्गर बनची आठवण करून देणारे वाटत असतील तर ते वापरणे टाळता येईल पण व्यक्तीश: मला ते आवडतात कारण त्यामुळे पावांची चव आणि रूप दोन्ही वाढतात असे मला वाटते.

पावासाठी लागणारे साहित्य:

फास्ट अ‍ॅक्शन यीस्ट २ टीस्पून
ब्रेड फ्लॉर / मैदा ५०० ग्रॅम*
कोमट पाणी २५० मिलीलीटर (१ कप)
कोमट दूध ४० मिलीलीटर (३ टेबलस्पून)
एक अंडे
साखर २.५ टेबलस्पून
मीठ १.५ टीस्पून
लोणी ३५ ग्रॅम (२.५ टेबलस्पून)
* मी ४५० ग्रॅम फ्लॉर आणि ५० ग्रॅम मैदा वापरते पण एवढ्या काटेकोरपणाची आवश्यकता आहे असे वाटत नाही त्यामुळे पूर्ण ५०० ग्रॅम ब्रेड फ्लॉर किंवा मैदा वापरला तरी चालेल.

भाजण्याआधी पावावर वरून लावण्यासाठी साहित्य (हवे असल्यास) :

एक अंडे
एक टेबलस्पून पाणी
थोडे तीळ, काळी खसखस वगैरे.

१) एका मोठ्या भांड्यात अथवा परातीत मैदा आणि मीठ एकत्र करून घ्यावे.
२) एका कपमध्ये कोमट पाण्यात यीस्ट व साखर मिसळून ते पूर्ण विरघळून घ्यावे.
३) अंडे थोडेसे फेटून त्यात दूध मिसळून घ्यावे.
४) भांड्यातल्या मैद्यात पाणी,अंड्याचे मिश्रण आणि लोणी हळूह्ळू घालत पीठ मळून घ्यावे.
५) थोडे मळल्यावर स्वच्छ ओट्यावर गोळा घालून तो चांगला मळून घ्यावा.
६) पीठ साधारणतः सहा-सात मिनिटे मळल्यावर फोटोतल्या गोळ्यासारखे दिसायला लागले की आतून तेलाचा हात फिरवलेल्या एका भांड्यात तो गोळा ठेऊन द्यावा व भांडे ओलसर फडक्याने किंवा क्लींग फिल्मने झाकावा. साधारण एक ते दीड तासात पीठ दुप्पट फुगेल.
७) एका १७ इंच बाय ११.५ इंच आकाराच्या बेकिंग शीटवर पार्चमेंट पेपर अंथरावा व त्याला पुन्हा तेलाचा एका हात द्यावा. फुगलेल्या पिठाचे १२ सारखे भाग करून ते बेकिंग शीटवर थोडे अंतर राखून ठेवावेत आणि अजून एक तासभर त्यांना फुगू द्यावे. गोळ्यांमधले अंतर कमी झाले तर भाजताना हे गोळे एकमेकांत मिसळतील. (अर्थात ते एकत्र मिसळले तर त्यांचा बाजूचा भागही लुसलुशीत रहातो आणि ते अधिक पावासारखे दिसतात त्यामुळे मी बरेचदा ते फार दूरदूर ठेवत नाही.)
७) ओव्हन २०० अंश सेल्सियस किंवा ४०० अंश फेरेन्हाईट वर तापवून घ्यावा.
८) एका अंड्यात एक टेबलस्पून पाणी मिसळून ते एकत्र फेटल्यासारखे करावे. फुगलेल्या पावाच्या गोळ्यांवर एका ब्रशने हे अंड्याचे मिश्रण फेटावे व हवे असल्यास त्यावर तीळ, खसखस वगैरे पसरावी. 'एगवॉश' मुळे पावाचा वरचा पृष्ठभाग चकचकीत होतो आणि त्यावर तीळ वगैरे नीट चिकटतात.
९) ओव्हनमध्ये मधल्या कप्प्यावर थाळी ठेऊन त्यावर पाव पंधरा मिनिटे भाजावा.

पाव लोण्यावर भाजण्यासाठी मधून कापावा लागेल, ते करण्याआधी तो पूर्ण गार होऊ द्यावा. माझ्या घरात या पावांना भरपूर मागणी असते आणि तीन माणसांत हे बारा पाव पट्कन संपून जातात त्यामुळे मी नेहमी पूर्ण प्रमाण वापरते पण खप कमी असल्यास निम्मे प्रमाण वापरण्यासही हरकत नाही.
भाजी बाजूला ठेऊन, पावांवर आडवा हात मारणाऱ्या माझ्या पोरीला "भाजीपण खायची" असे मोठे डोळे करून दटावताना मला हमखास हसू येते आणि हे पावभाजीचे जीवनचक्र एक पूर्ण गोल फिरून जागेवर आल्यासारखे वाटते!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

वेगळा धागा काढलास तर पुढे संदर्भासाठी सोयीचं होईल. फोटो चांगले असतील तर फोटोंसाठीही काढच वेगळा धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काहीतरी कॉपी करताना चुकत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अह्हाहा! कसले चकाकताहेत!
पाव आणि फोटो दोन्ही मस्त.. एक उचलून पटकन तोंडात टाकावासा वाट्टोय. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सेरेपी, छानच दिसतोय तुमचा पाव! चव आवडली का? बनताना तुम्ही वापरलेले प्रमाण, केलेले बदल, ़जाणवलेल्या तृटी किंवा निरिक्षणे वगैरे बद्दल लिहिलेत तर इतरांना नक्की उपयोग होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाव पाव लिखा होता है बनानेवाले का नाम. सेरेपी १०० ऑट ऑफ १००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पाव पाव लिखा होता है बनानेवाले का नाम.

'बनाना ब्रेड'च्या एखाद्या रेसिपीखाली ही प्रशंसा अधिक शोभून दिसली असती, नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बनाना ब्रेड कोणी घरी बनवतं का? तो घरी बनवायला (खरंतर घरी बनवलेला खायला) मला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बनाना ब्रेड'च्या एखाद्या रेसिपीखाली ही प्रशंसा अधिक शोभून दिसली असती, नाही?

बाय द वे ये बनाना ब्रेड किस चिडीया का नाम है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

वानगीदाखल, गूगलशोधाच्या पहिल्याच फळाचा दुवा.

किस चिडीया का नाम है

(नाही. या प्रकारात चिमणी घालत नाहीत. अंडे घालतात, तेसुद्धा चिमणीचे नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वानगीदाखल, गूगलशोधाच्या पहिल्याच फळाचा दुवा.

थांकू बर का. अस कोण आयत कोण देईल

(नाही. या प्रकारात चिमणी घालत नाहीत. अंडे घालतात, तेसुद्धा चिमणीचे नाही.)

पण मला अंडेविरहीत पदार्थ आवडतात, मग काय कराव बर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

हा बनाना ब्रेड, ब्रेड कमी आणि केक जास्त असतो. पूर्वी आधीच्या देशात बेकरीत चांगला मिळायचा आता बनाना ब्रेड खुदहीच बनाना पडेगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्रेड नसेल तर केक म्हणून खाईन! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला बनाना ब्रेड खूप आवडतो, आणि मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज हा बनाना ब्रेड बनवला, मस्तं झालाय. ही पाकृ. वापरली,फक्त त्यात थोडे आक्रोडही घातले. केक बनवायला फार सोपा वाटला, केळी कुस्करून त्यांचा लगदा करण्याचे काम माझ्या पोरीने फार आवडीने केले Smile

Banana Bread

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा कसला मस्त दिसतोय _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__/\__
बाकी पिझ्झ्याच्या रेसिपीची आणि इतरही ब्रेड्सची वाट बघतोय.. या ब्रेडचाही आणि इतरही ब्रेडचे वेगळे धागे येऊ द्यात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुरेख फोटो!
मुलाच्या वाढदिवसाला मी सुद्धा बनाना-केक (म्हणजे लोफ पॅन मध्ये न करता गोल पॅन मध्ये) केला होता, अकरोड आणि काजू घालून. मी वर दिलेल्या कृतीत १/४ कप मध लागते, त्या ऐवजी हिवाळ्यात मिळणारा खजुराचा गूळ घातला, मस्त लागला. केक कापून खाण्याच्या घाईत फोटो काढायला विसरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता परत एकदा पाव बनवण्याची हुक्की आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थ्यांकू!
रुची - माझ्या आधीच्या प्रतिसादात लिहिलंय काय बदल केले ते. चव भन्नाट आवडली सगळ्यांना.
अदिती- मी बनाना ब्रेड नेहमी घरीच बनवते. तो खायला तुला थंड प्रदेशात यावं लागेल Smile
आधी राहायचो तिथे फार्मर्स मार्केट मध्ये मस्त मिळायचा. रेग्युलर बेकरीमधून कधी आणला नाहीये.
जाई- अंड्याशिवायही बनवता येतो. तसाही डेन्स असल्याने चालून जातं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुचीताई चव बघितल्याशिवाय आम्ही चांगला झालाय हे कस सांगणार
तेव्हा पार्सलाची कृपा करावी Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पाने