विश्वामित्र आणि विषाणू

अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली. त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला

नारदा! इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे.

अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना मी वीणा दाखविली तरी त्यांच्या विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते. भारी हुशार आहे तू. कसे ओळखले तू मला?

या गुप्त जागेची माहिती कुणालाही नाही. इथल्या कुठल्याही यंत्राने तुझ्या येण्याची नोंद केली नाही. अर्थात तू पृथ्वीचा मानव नाही, बाकी तुझी वेशभूषा तुझा परिचय आहेच. माझा वेळ किमती आहे, तुला जो काही संदेश द्यायचा आहे किंवा तुझे इथे येण्याचे जे काही कारण आहे, स्पष्ट आणि कमी शब्दांत बोल.

कारण असल्याशिवाय मी कुठेच जात नाही. तू जे काही करत आहे त्याच्या काय परिणाम होणार,याचा विचार केला आहे का?

काय म्हणजे, मी "घातक आणि विनाशक" अश्या विषाणूची निर्मिती केली आहे. या विषाणूच्या शक्तीने माझा देश संपूर्ण जगावर राज्य करेल.

‘घातक आणि विनाशक’, त्या घातक सिनेमात बहुतेक अडीच किलो हात वाला हिरो होता. नाव विसरलो त्याचे.

सनी देओल, वा! तुमच्या स्वर्गातही बॉलीवूडचे सिनेमे लागतात.

तसे नाही रे, मी जेंव्हा मृत्युलोकात भटकायला येतो, तेंव्हा पाहतो, हॉलीवूड, बॉलीवूड, सनी लिओनि ...

च्यायला! बाल ब्रह्मचारी असून सनी लिओनि ....

तसे नाही रे, मी इथे आलो कि इथेले सर्वच मला दिसते. तू जो हा विनाशक प्रयोग करत आहे त्याला थांबवण्यासाठी मी इथे आलो.

हा! हा! हा! मानव निर्मित एका छोट्या विषाणूला तुमचे देवराज इंद्र घाबरले आणि तुला पाठवविले. इथे आम्हाला हे हि माहित नाही तुमचा स्वर्ग लोक कुठे आहे ते.

तू काहीही समज. पण एक लक्षात ठेव, निर्मितीचे कार्य ब्रम्हदेवाचे आहे, मानवाचे नाही. या विषाणूला नष्ट कर, हेच तुझ्या आणि मानवजातीच्या हिताचे आहे.

व्हाट अ जोक! ब्रम्हदेवाने माणसाला बुद्धी दिली. त्या बुद्धीचा वापर करून मी विषाणू निर्मित‍ केला. अर्थात मी जे काही करत आहे, त्यात ब्रम्हदेवाची इच्छा आहेच.

कदाचित् असेलही, पण तू दुसर्‍यांना संपवण्यासाठी विषाणूची निर्मिती केली आहे, हे कितपत योग्य आहे.

या मृत्यू लोकात आमचा बाप डार्विन म्हणतो, जो शक्तिशाली तोच जिवंत राहणार. जे निर्बल आहे ते नष्ट होणार.

तुला नाही वाटत, निर्बलांचे रक्षण करणे हा मानवाचा धर्म आहे.

नारदा, तू माझे जास्त डोके पकवू नको, मी एकच धर्म मानतो, दुसर्‍यांना नष्ट करून स्वत:चे रक्षण करायचे. शिवाय मी इथे एकटाच नाही, माझ्या सारखे अनेक विश्वामित्र इथे एकापेक्षा एक घातक विषाणूच्या निर्मितीत व्यस्त आहे. ज्या देशाजवळ जेवढे घातक विषाणू तो तेवढाच शक्तिशाली. आता कृपा करून येथून प्रस्थान करावे.

मलाहि वेळ नाही इथे जास्त वेळ थांबायला, पण एक शेवटचा प्रश्न विचारू का? हा विषाणू निसटला तर काय होईल,याचा विचार केला आहे का?

विश्वामित्र क्षणभर विचार करतो आणि उत्तर देतो, नारदा!,जास्तीसजास्त काही कोटी लोक मरतील. पृथ्वीवरचा थोडा भार कमी होईल. बाकी विषाणूचे काय करायचे ते आम्ही बघून घेऊ म्हणत नारदाला जाण्याचा इशारा करतो.

नारदाचे पृथ्वीवर येऊन अनेक विश्वामित्रांना समजविण्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी नारद निराश होऊन स्वर्गलोकी परतले आणि थेट ब्रम्हदेवाला जाऊन भेटले.

नारायण नारायण!

ब्रम्हदेवाने हसत-हसत विचारले, काय समाचार आहे पृथ्वीलोकाचे.

माझे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. कुणालाच भविष्याची चिंता नाही. सर्वच आगीशी खेळत आहे, म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी .

नारदा, हे कलयुगाचे शेवटचे चरण आहे, आता पृथ्वीवरील जीवसृष्टी क्रमश: नष्ट होणार, हे अटळ आहे. कदाचित, मानव आपल्या कर्माने प्रलय पूर्वीच जीवसृष्टी नष्ट करणार. बहुतेक या महायुगाचा अंत असाच असेल.

म्हणजे पिताजी, तुम्हालाहि माहित नाही, मानवाचे भविष्य?

नारदा, माझे कार्य फक्त निर्मितीचे, सृष्टीचा अंत कसा होणार, याची कल्पना मलाहि नसते.

अखेर, विषाणू विश्वामित्रच्या प्रयोगशाळेतून निसटला. पृथ्वीवर मृत्यूचे थैमान सुरु झाले. मानव विरुद्ध विषाणू युद्ध सुरु झाले. कोट्यावधी जीव गेले. एवढे होऊनही आजचा विश्वामित्र अधिक घातक विषाणूंच्या निर्मितीत व्यस्त आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

कोव्हिड (डेल्टा व्हेरियंट) होऊन गचकले वाटते दोघेही.

आणि आता हा वायझेड नारद, मास्क न लावताच त्या विश्वामित्राच्या लॅबमध्ये गेला होता, नि तेथून तसाच (पुन्हा, मास्क न लावताच) ब्रह्मदेवाला भेटायला गेला. बरे, त्या ब्रह्मदेवालासुद्धा मास्कबिस्क लावण्याची अक्कल नाही. (बहुधा रिपब्लिकनांना मत देत असावा, ट्रम्पच जिंकला म्हणून अजूनही समजत असावा, नि ६ जानेवारीच्या हल्ल्यात त्याचा सक्रिय सहभाग असावा. लस तर घेतली नसावीच. तर ते एक असो.) हं, तर सांगत काय होतो? हा नारद. स्वतःही वर जातंय, नि बरोबर ब्रह्मदेवालासुद्धा वर घेऊन जातंय, येडं.

असो चालायचेच. ईश्वरेच्छा बलीयसी, दुसरे काय?

==========

अतिअवांतर: ६ जानेवारीच्या हल्ल्याचा जो फोटो आहे (ज्यात त्या कॅपिटॉलच्या इमारतीवर हल्लेखोर जिकडूनतिकडून चढू पाहताहेत), त्या फोटोत, नि ६ डिसेंबरच्या हल्ल्याचा जो फोटो आहे (ज्यात त्या बाबरी मशिदीच्या इमारतीवर तथाकथित 'कारसेवक' जिकडूनतिकडून चढू पाहताहेत), त्या फोटोत, कमालीचे साधर्म्य आढळते, नाही? (की फक्त मलाच तसे ते जाणवत आहे?)

Capitol Attack

Babri Masjid Attack

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो.

विश्वामित्र 'युरेका-युरेका' असे का बरे ओरडला? ही त्याची गुलाम मानसिकता समजावी, की त्याचा बाप यवन (ग्रीक) वगैरे होता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी4
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबावर भरोसा नाय का? सगळे विषाणू नील करतो ना तो?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही लस बनवू शेवटचा माणूस असे पर्यंत आम्ही एकाच प्रकारच्या विषाणू साठी लसी बनवू काळजी नसावी.
बघा covid साठी किती प्रयत्न करत आहोत .लसी वर लसी ,औषधावर औषध शोधून काढत आहोत ना.येईल यश पाच पन्नास वर्षांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ0

आम्ही लस बनवू शेवटचा माणूस असे पर्यंत आम्ही एकाच प्रकारच्या विषाणू साठी लसी बनवू काळजी नसावी.
बघा covid साठी किती प्रयत्न करत आहोत .लसी वर लसी ,औषधावर औषध शोधून काढत आहोत ना.येईल यश पाच पन्नास वर्षांनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ0

लस विकसित करण्यास आणि बनवण्यास हजारो माणसे लागतात, आणि त्यांना जगता आणि काम करता यावे यासाठी लाखो माणसे लागतात & so on. तेंव्हा जिवंत राहणाऱ्या शेवटच्या माणसासाठी लस कोण बनवणार बरे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

विश्वामित्र असा विनाशकारी विषाणु का बनवत होते? त्यांचा कुणावर राग होता का?
मेनकेने त्यांचा तपोभंग केला आणि त्यांची ब्रम्हर्षी होण्याची संधी हुकली म्हणून सूड उगविण्यासाठी ते हे करत असावेत का?
त्यांनी आत्मपरीक्षण केले असते, तर त्यांचा तपोभंग झाला यात दूसऱ्या कुणाचीही (अगदी मेनकेची देखिल) चूक नाही हे त्यांच्या लक्षात आले असते.
पण त्यांच्या चाललेल्या एकंदरीत कार्यावरून लक्षात येते की त्यांनी आत्मचिंतनात अजिबात वेळ वाया घालवलेला नाहीये.
असो.. जे जे होईल, ते ते पहावे ...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

विश्वाचे निर्माते,देवाचे दुत,ज्यांनी जटिल सृष्टी निर्माण केली त्यांना च नाकारणारे पण अजुन corona,cancer, heart attak, आणि विविध अगदी फालतू केस गळती वर काय उपाय आहे हे ज्यांना माहीत नाही
ते स्व पंडित .
अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्या साठी विषाणू निर्मिती .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी3
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याची शिक्षा विश्वाचे निर्माते,देवाचे दुत,ज्यांनी जटिल सृष्टी निर्माण केली असा विश्वास ठेवणाऱ्यांना का?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0