जेंडर प्रोनाउन्स - सर्वनामात काय आहे?

या लेखाची संपादित आवृत्ती २३ मार्चच्या 'लोकमत' मध्ये आली होती. या समूहावर उत्तम चर्चा होईल असं वाटल्यानं पूर्ण लेख इथं देत आहे.

---------------

काही महिन्यांपूर्वी आम्हांला कंपनीच्या एच आर मधल्या एका वरिष्ठ अधिकारी स्त्रीची इ-मेल आली होती. त्यात तिनं लिहिलं होतं ‘ मी आजपासून माझ्या कंपनी प्रोफाइलमध्ये आणि इ-मेल सिग्नेचरमध्ये माझ्या ‘जेंडर प्रोनाउन्स’चा समावेश करणार आहे. कंपनीत काम करणारे जे ट्रान्सजेंडर (ज्यांची जन्मतः मिळालेली आणि आत्ताची लैंगिक ओळख यांत फरक आहे असे) सहकारी आणि स्वतःच्या लैंगिक परिचयाबद्दल प्रचलित निकष न मानणारे सहकारी आहेत त्यांना आपल्याबद्दल भेदभाव होतोय असं वाटू नये म्हणून मी हे पाऊल उचलत आहे. तुम्हीही तुमची ओळख सांगणारी ‘जेंडर प्रोनाउन्स’ वापरावीत असं मी आवाहन करते.’

तोवर एलजीबीटीक्यू लोकांच्या समस्या, त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव, त्यांचे हक्क यांबद्दलची राजकीय आणि सामाजिक चर्चा वाचली होती. ‘बाथरूम बिल’ला - म्हणजे ट्रान्सजेंडर लोकांनी सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांसाठीची रेस्टरूम्स वापरायची की पुरुषांसाठीची हे ठरवणारा कायदा - धरून माजलेलं वादंग ऐकलं होतं, पण ‘ जेंडर प्रोनाउन्स’ ही संकल्पना नवीन होती आणि ती वापरत जा असं आवाहन एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापनानं थेट कर्मचाऱ्यांना करावं हेही थोडं वेगळं वाटलं होतं!

‘प्रोनाऊन किंवा सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द’ ही लहानपणी व्याकरणात शिकलेली व्याख्या. ‘तो, त्याला, त्याचं’ ही पुल्लिंगी आणि ‘ती, तिला, तिचं’ ही स्त्रीलिंगी सर्वनामं. पुरुषाबद्दल बोलताना पुल्लिंगी आणि स्त्रीबद्दल बोलताना स्त्रीलिंगी सर्वनामं वापरायची. सोप्पंय की! मग आता ही ‘जेंडर प्रोनाउन्स’ म्हणजे काय वेगळी भानगड आहे? तर अलीकडच्या काळात माणसाचा स्वतःच्या ‘जेंडर आयडेंटिटी’ कडं बघायचा दृष्टिकोन खूप व्यापक झालाय. ‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे जेंडरचं ‘बायनरी’ वर्गीकरण मोडीत निघालंय. ट्रान्सजेंडर हा एक प्रकार झाला, पण त्याबरोबरच ‘जेंडरक्विअर’ (म्हणजे जे स्वतःला कुठल्याच जेंडरचे समजत नाहीत किंवा दोन्ही जेंडरचे समजतात ), ‘जेंडरफ्लुइड’ (म्हणजे ज्यांची लैंगिक ओळख वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असू शकते), ‘अजेंडर’ असे ‘जेंडर आयडेंटिटी’ चे नवनवीन पैलू अस्तित्वात आलेत. ‘बायोलॉजिकल सेक्स’ आणि ‘जेंडर आयडेंटिटी’ मध्ये फरक असू शकतो, आपण स्त्री आहोत, पुरुष आहोत, दोन्ही आहोत की दोन्ही नाही आहोत ही लैंगिक ओळख ठरवायचा अधिकार फक्त त्या व्यक्तीला आहे, आणि ही ओळख काळाप्रमाणं बदलू शकते हे विचारही रूढ होत चाललेत. त्यामुळं समाजात वावरताना या वेगवेगळ्या पैलूंना स्वीकारणं, त्यांचा आदर करणं महत्वाचं झालंय. एखादी व्यक्ती नावावरून किंवा दिसण्यावरून एखाद्या जेंडरची वाटते म्हणून तिच्याबद्दल बोलताना त्या जेंडरची सर्वनामं (‘तो’ आज येणार नाहीये, ‘तिला’ फोन केला पाहिजे वगैरे) वापरणं म्हणजे त्या व्यक्तीची जेंडर आयडेंटिटी गृहीत धरल्यासारखं होतं. विशेषतः ट्रान्सजेंडर किंवा जेंडरक्विअर व्यक्तींना ‘आपली लैंगिक ओळख नक्की काय आहे ?’ हे शोधायला आणि स्वीकारायला बराच संघर्ष करायला लागलेला असतो आणि जर त्यांच्याबद्दल बोलताना चुकीची सर्वनामं वापरली गेली तर ते त्यांचा संघर्ष झिडकारल्यासारखं होऊ शकतं, तो त्यांचा एक तऱ्हेचा मानसिक छळ ठरू शकतो!

म्हणूनच अशा लोकांचा त्यांच्याबद्दल किंवा त्यांना उद्देशून बोलताना कुठली सर्वनामं वापरली जावीत हे ठरवण्याचा हक्क मान्य करणं ही सार्वजनिक ठिकाणी त्यांची ओळख स्वीकारण्यातली पहिली पायरी आहे. मग ती सर्वनामं “he, him, his असतील, “she, her, hers” असतील, किंवा ‘जेंडर न्यूट्रल’ they, them, their’ असतील. पण ते गृहीत न धरता त्यांना विचारून घेतलं पाहिजे. लेखासोबतच्या चित्रात दाखवल्याप्रमाणं या तीन शिवायही बाकी बरीच जेंडर प्रोनाउन्स आहेत आणि ती निवडायचा पूर्ण हक्क प्रत्येकाला आहे. म्हणूनच ज्यांची लैंगिक ओळख जन्मापासून कायम आहे अशा लोकांनीही आपली जेंडर प्रोनाउन्स आवर्जून इ-मेल सिग्नेचरमध्ये, बिझनेस कार्डसवर किंवा सार्वजनिक संभाषणात नोंदवावीत असं आवाहन सध्या केलं जातं (उदाहरणार्थ, मी माझ्या नावापुढं कंसात he, his, him असं लिहायचं). असं केल्यानं कुणालाच आपल्या लैंगिक ओळखीवरून भेदभाव होतोय असं वाटणार नाही आणि सर्वसमावेशक मनोवृत्ती वाढीला लागेल.

अर्थात अजूनही या विचारधारेला अमेरिकेत भरपूर विरोध आहे. ‘माणसाला जन्मतः मिळालेली लैंगिक ओळखच खरी, बाकी सगळं झूट!’ असं मानणारे भरपूर लोक आहेत. त्यामुळं ट्रान्सजेंडर/जेंडरक्विअर/जेंडरफ्लुइड लोकांना बऱ्याच द्वेषाला, हिंसेला सामोरं जावं लागलंय. एकीकडं सध्याच्या डेमोक्रॅटिक बायडेन सरकारनं ट्रान्सजेंडर लोकांनी सैन्यात काम करण्यावरची बंदी उठवली आहे, रेचल लिव्हाइन या ट्रान्सजेंडर स्त्रीला आरोग्यखात्यातलं एक महत्वाचं पद देऊ केलं आहे. तर दुसरीकडं आपल्यासमोर ऑफिस असलेल्या डेमोक्रॅटिक काँग्रेसवूमनची वीस वर्षांची मुलगी ट्रान्सजेंडर आहे हे कळल्यावर तिला खिजवायला स्वतःच्या ऑफिसबाहेर ‘फक्त स्त्री आणि पुरुष हीच दोन लिंगं खरी बरं का!’ असा बोर्ड लावणाऱ्या विरोधी रिपब्लिकन पक्षाच्या वादग्रस्त संसद सदस्य मार्जोरी टेलर ग्रीनसारखी माणसंही राजकारणात आहेत!

दोन वर्षांपूर्वी फ्लोरिडामधल्या शाळेत पाचवीच्या वर्गावर आलेल्या एका नवीन शिक्षकानं स्वतःबद्दल ‘he, his, him’ ऐवजी ‘they, them, their’ ही सर्वनामं आणि ‘मिस्टर (Mr.)’ ऐवजी ‘मिक्स (Mx.)’ असं ‘जेंडर न्यूट्रल’ संबोधन वापरायची विनंती केली तर काही पालकांनी शाळेकडं “आमच्या मुलांना लहान वयात हे काय बघावं लागतंय?’ अशा तक्रारी केल्या आणि मुलांचा त्या शिक्षकाच्या वर्गातला प्रवेश रद्द केला. नाईलाजानं शाळेनं शिक्षकाला त्या वर्गावरून काढून मोठ्यांसाठीच्या एका वर्गावर नेमलं. आश्चर्य म्हणजे मुलांना त्या शिक्षकानं निवडलेली संबोधनं वापरण्यात काहीच अडचण नव्हती, विरोध होता तो पालकांचा....आणि त्या विरोधाचं मूळ कदाचित ‘असली विचित्र लैंगिक ओळख असणं हेच मुळात निसर्गाच्या आणि देवाच्या इच्छेविरुद्ध आहे’ या ग्रहात होतं!

शेक्सपिअरनं ‘नावात काय आहे?’ असं विचारलं होतं. तसंच ‘सर्वनामात काय आहे?’ हा प्रश्न साधा वाटला तरी त्याचं उत्तर ‘बरंच काही!’ असंच द्यावं लागेल. एकीकडं सतत ‘कोsहं?’ या प्रश्नाचं उत्तर शोधत वैयक्तिक जाणिवांचा आणि अस्तित्वाचा परीघ विस्तारत न्यायचा आणि दुसरीकडं धर्म, कुटुंब, विवाहसंस्था याबद्दलच्या पारंपारिक आणि ऐतिहासिक कल्पनांच्या आधारानं समाजातल्या बदलांना विरोध करत रहायचा या दोन्ही प्रवृत्ती परस्परविरोधी असल्या तरी शेवटी मानवीच आहेत. त्यांच्या सततच्या संघर्षातून समाजाची सामूहिक ओळख घडत जाते. हे असे विषय प्रत्येकालाच स्वतःची वैचारिक बैठक आणि उदारमतवादीपणाच्या सीमा तपासून बघायचं आव्हान देतात हे मात्र नक्की!

Pronoun-card

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

...नक्की काय आहे, ते सविस्तर सांगितलेत, तर बरे होईल.

बाकी, लेख चांगला आहे. उद्बोधक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सॉरी ते लेखात क्लिअर झालं नाही. He, She, They यांबरोबर Per, Ve, Xe, Ze अशी नवीन 'non-traditional gender pronouns' वापरात आली आहेत. ट्रान्स किंवा लैंगिकतेबद्दल प्रचलित निकष न मानणारे लोक स्वतःसाठी यातली कुठलीही सर्वनामं वापरू शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्विटर, लिंक्डिन अशा ठिकाणीही लोक आपल्या ओळखीमध्ये आपल्यासाठी अपेक्षित असलेली सर्वनामं लावताना दिसतात. गेल्याच आठवड्यात 'न्यू यॉर्कर'मधला एक लेख वाचला. तो लेख कुटुंबव्यवस्थेला आवाहन देणाऱ्या लोकांबद्दल असला तरीही त्यात जेंडरक्वियर, अलैंगिक, वगैरे लोकांच्या परस्परसंबंधांचेही उल्लेख आहेत. वेळ असेल तर जरूर वाचा.

How Polyamorists and Polygamists Are Challenging Family Norms

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मराठीत काय करता येईल याचा विचार करतो आहे. काही त्रोटक विचार सुचले ते असे:

(१) ‘तो-त्याला-त्याचे-त्याने’ किंवा ‘ती-तिला-तिचे-तिने’ ऐवजी ‘क्षू-क्षुला-क्षुचे-क्षुने’ वापरता येईल.

(२) ‘गेला, आली’ ही क्रियापदांची रूपं न वापरता ‘गेलू, आलू’ वापरता येतील. त्याचप्रमाणे ‘काळा, वेडी’ ही विशेषणरूपं न वापरता ‘काळू, वेडू’ अशी वापरता येतील.

काही नमुना वाक्यं:

(अ) क्षू पुण्याला गेलू.

(ब) क्षुची आई प्रेमळ आहे पण क्षुचू क्षुपालक मारकुटू आहे. (इथे आई स्वत:ला स्त्रीलिंगी समजते, पण ‘बाप’ स्वत:ला gender fluid समज’तो’ अशी कल्पना केली आहे. त्यामुळे अर्थात ‘त्या’ला ‘बाप’ म्हणता येणार नाही, कारण तो शब्द जात्याच पुल्लिंगी आहे.)

(क) क्षुचा मुलगा हुशार आहे पण क्षुचू क्षुपत्य ढ आहे. (इथे पालक आणि एक अपत्य gender fluid आहे, पण दुसरं अपत्य स्वत:ला पुल्लिंगी समजतं असं गृहीत धरलं आहे.)

(ड) क्षू सावळू असल्यामुळे अजून क्षुचं लग्न जमलेलं नाही. त्यामुळे हळद खायला घालून घालून सर्वांनी क्षुला भंडावून सोडलं आहे. पाप बिचारू!

सध्या इत्यलम्. ह्या क्षेत्रात अजून खूप काम करावं लागेल आणि अनेक शक्यता विचारात घ्याव्या लागतील.

उदाहरणार्थ, समजा नेहा नावाची स्त्री वयाच्या विसाव्या वर्षी gender fluid झाली, तर अशा परिस्थितीत ‘तिचं बालपण’ असा शब्दप्रयोग करता येईल का? कारण ‘बाल’ असताना ती स्त्रीलिंगी होती, पण आत्ता नाही.

‘आई-बाप’ याऐवजी गुणसूत्रांच्या जोडीप्रमाणे ‘द्विक्षपालक’ आणि ‘क्षयपालक’ असे नवे शब्द बनवता येतील, पण त्यांच्यावरचे संभाव्य आक्षेप मला आत्ताच दिसताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

> या समूहावर उत्तम चर्चा होईल असं वाटल्यानं पूर्ण लेख इथं देत आहे.

पण तुम्हीच पाहा! ‘शिरसि मा लिख’ कॅटेगरीतले लोक आजूबाजूला वावरत असताना चर्चा करणार कशी? मनोमन पूर्ण गांभीर्य राखून मी प्रतिक्रिया दिली होती, तर एक ‘विनोदी’ आणि एक ‘खवचट’ श्रेणी मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

यडपटांकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय नेहमीच असतो, नाही का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक.. असा चॉइस विचारुन घेणे यात निश्चितच संवेदनशीलता दिसते. कितीही कमी संख्येने असले तरी त्यांना गृहीत धरणे अयोग्यच.

पुढचा मुद्दा गमतीने:

"मनुष्य" ही एक किमान समान पातळी स्वीकारायला लोक तयार आहेत असं दिसतं. त्यामुळे जेंडरचे चार पाच प्रकार म्यानेज होतील असं वाटतंय. स्वत:ला मनुष्य मानणेच नामंजूर अशी स्टेज आली तर किचकट होईल व्यवस्था.

निसर्गावर वर्चस्व गाजवणारा, स्वार्थी, स्वत:ला इतर प्राण्यांपेक्षा सुप्रीम समजणारा अन्यायी मनुष्यप्राणी मी स्वत:ला मानत नाही. मला पोपई (आणि त्यातील नर झाड) अशी आयडेण्टीटी हवी असे कोणी अपेक्षिल्यास मुश्किल होईल. म्हणजे मी पोपईसारखा दिसत नसल्याने सर्वजण असंवेदनशीलपणे नकळत मला मनुष्य पुरुष संबोधताहेत. माझे पोपइत्व... असो.

Wink

यात कोणाचाही अनादर किंवा चेष्टा करण्याचा उद्देश नाही, तसे वाटल्यास क्षमस्व... आणि at the same time ते वाटते तितके अशक्य, फार फेच्डही नाही, दहा वीस वर्षे आणखी.. बघा विचार करुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मरण्यापूर्वी, असेही प्रश्न पृथ्वीवरील मानवाला असतात हे माहीत झालं. कदाचित त्या सर्वशक्तिमान प्रकाशाला भेटण्याची संधी मिळाली तर घालेन हो त्याच्या कानावर !

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित त्या सर्वशक्तिमान प्रकाशाला भेटण्याची संधी मिळाली तर घालेन हो त्याच्या कानावर !

त्याला तुम्ही सांगण्याअगोदरच हे ठाऊक नसेल, हे गृहीत धरण्याची जुर्रत!

(बाकी, त्याची सर्वनामेसुद्धा लोक जेथे पिढ्यानपिढ्या गृहीत धरीत आलेले आहेत, त्या तुलनेत याबद्दल आश्चर्य वाटत नाही.)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

twitter/instagram वर अनेकांनी हा उल्लेख केल्याचं पाहिलं आहे. हा सगळा विषय फारच गुंतागुंतीचा आहे इतकंच मला यातनं कळलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!

मला वाटतं हा सर्व सव्यापसव्य हा जेंडर फ्लुईड आणि जेंडरक्विअर लोकांना मुख्य प्रवाहात येता यावे, त्यांना आत्ता करावा लागतोअ आहे तसा संघर्ष करावा लागू नये - म्हणुन आहे. तसे असेल तर भाषा बदलणे संयुक्तिक आणि ताकदीचेच आहे. कारण मी वाचलेल्या एका लेखाप्रमाणे, भाषा ही आपल्या अमूर्त मनावर कमालीचे सूक्ष्म पण मूलगामी परीणाम करत आस्ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

जेंडर फ्लुइड हा एक अनाकलनीय प्रकार आहे.

"विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार" या केस मध्ये आमिष दाखवणाऱ्याने "मी जेव्हा तिच्याशी लग्न करायचा विचार करतो तेव्हा मला स्त्री असल्याची भावना होते आणि मग मी तो विचार सोडून देतो" हा बचाव ग्राह्य ठरेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जागतिक जे प्रश्न आहे ते एक एक करून पूर्ण सोडवावेत.
फक्त प्रश्नांची मालिका निर्माण करू नये.
लिंग वरून भेदभाव होवू नये हा मुळ प्रश्न आहे.
जगात दोन लिंग आहे एक स्त्री लिंग आणि दुसरे पुल्लिंगी.
हा प्रश्न संपला आहे का?,
तर बिलकुल नाही.
अजुन पण खूप मोठ्या प्रमाणात स्त्री आणि पुरुष ज्यांना समान समजले जात नाही .
जे प्रमाण 90%,, पेक्षा जास्त असावे
स्त्री आणि पुरुष लिंग भेद हाच प्रश्न अजुन सुटला नाही.
समलैंगिक सेक्स असणाऱ्या लोकांना आज पण जाहीर पने 1% लोक पण स्वीकारत नाहीत.
हे सत्य आहे
कोणताच मुलगा ,मुलगी माझे वडील gay आहेत असे जाहीर पने सांगू शकत नाहीत.
माझे वडील gay आहेत किंवा माझी आई Lesbian आहे .
हे कबूल करणाऱ्या एका मुलाचे जाहीर वक्तव्य जगात कोणी केले असेल तर त्याची लिंक द्यावी.
एक पण उदाहरण मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इकडे भारतात तृतीयपुरुषी ( किंवा स्त्रीया म्हणा या लेखापुरते) स्वत:चा उल्लेख किन्नर म्हणून मान्य करतात. पौराणिक कथेप्रमाणे अर्जुन होता एक दिवस-रात्र. आणि नावे स्त्रियांची लावतात. कमला, लक्ष्मी वगैरे.
महाकुंभ स्नानासाठी यांचाही नंबर असतो. ( https://youtu.be/tQPXCD1w43E at 06:00)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्री ही कमजोर,बेअक्कल,असते आणि पुरुष हे समजदार असतात असे मत असणारी लोक जगात मोठ्या प्रमाणात आहेत..
गाडी स्त्री चालवत असेल तर ती मुर्खासारख च ड्राईव्ह करणार आपण सांभाळून राहवे असे बहु संख्य पुरुषांना आज पण वाटत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0