आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.
---
Kashmir The Story | Full Documentary on Kashmir Valley
पाचेक महिन्यांपूर्वीच आलेला माहितीपट, १२-१३व्या शतकापासून कश्मीरचा इतिहास सुरू करून अगदी उरी, सर्जिकल स्ट्राईकपर्यंत आलेला. उत्तम निर्मितीमूल्यं आहेत. काळ्या-पांढऱ्या चित्रीकरणापासून रंग येणं, माहितीपटाच्या अगदी शेवटी स्त्रियांच्या मुलाखती वाढणं, अशा बारक्या तपशिलांमधूनही बऱ्याच गोष्टी दिसतात. जरूर बघा. (मात्र माहितीपट मध्ये-मध्ये अडकतो, तेवढं सहन करावं लागेल.)
ऑफलाईन पाहण्यासाठी
ऑफलाईन पाहण्यासाठी https://vodtimesnow.akamaized.net/2018/11/DTN131118_Kashmir_Full_Docume…
डेटिंग अराउंड - रिॲलिटी शो/ नेटफ्लिक्स्
https://www.vulture.com/2019/02/netflix-dating-around-casting.html
.
मला आवडला.
तुंबाड.
(इतरत्र कुठे ह्या सिनेमाविषयी डिट्टेलात लिहिल्यासारखं वाटत होतं, पण धागा सापडला नाही. असो!)
ॲमेझॉन प्राईमच्या कृपेने तुंबाड पाहिला. "दिसायला अतिशय देखणा" सिनेमा आहे ह्यात वाद नाही.
काही गोष्टी-
०. थेट्रात बघायला पाहिजे होता......
१. कथा धारपांच्या "हस्तर प्रसन्न" अशा कायश्या (किंगची गॅम्मा) आणि "बळी" नामक दुसऱ्या एका कथेवर आधारित आहे. दोन्ही कथा जोडल्यात.
२. सिनेमातले स्पेशल इफेक्टस जबरद्स्त आहेत. खूपच मस्त. तुलनेसाठी "रोबो" किंवा "ठग्स ऑफ हिंदोस्तान" पहा म्हणजे पटेल.
३. चित्रपटातल्या अभिनेत्यांचा अभिनय मात्र आवडला नाही. किंवा -दिग्दर्शकाने त्यावर भर दिला नसावा. मुख्य पात्र जे सोहम शहाने केलंय ते सोडून बाकी लोकं अगदीच हे.
पण एकंदरीत मला आवडला तुंबाड. भयपटाला खास भारतीय टच देणारे फार कमी चित्रपट आहेत. एक तर मग त्यात तांत्रिक, मंदीर, त्रिशूळ तरी असतात किंवा मग दुसरं टोक म्हणजे शहर,ऑफिस चकचकीत फ्लॅटमधली भुतं असतात.
तुंबाडने छोटीच पण चांगली सुरूवात केलीये. ह्या उदाहरणाकडे बघून खास भारतीय असे भयपट येवोत हीच कालीमातेकडे१२ प्रार्थना.
मला पडद्यावर बघायला आवडतील अशा काही मराठी (भय?)कथा कुठल्याही क्रमाशिवाय -
१. धारपांची इक्माई (१००% लवक्राफ्टीयन मूळ आहे.) - ही कथा पडद्यावर दाखवायला फार मजा येईल- प्रतलामागचं प्रतल वगैरे कल्पना.
२. जी.एंची कथा (नाव विसरलो, पण त्यात रामकोळी आहेत, सदानंद आणि वाड्यावरची म्हातारी आहे. विशेषत: त्यातला शेवटला भाग.)
३. नारळीकरांची एका महानगराचा मृत्यू ( कथा सरधोपट आहे, पण मरणारं मुंबई शहर पडद्यावर दाखवणं ही अस्सल भयकथा ... अंगावर शहारे येतील असा अनुभव असेल. कश्यपने हा सिनेमा काढला पाहिजे)
४. Song of Kali - ही कलकत्त्त्यात घडणारी भयकथा. त्यात कलकत्त्याचं वर्णनही बरंच घुसमट करणारं आहे.
--------------
१ - हस्तरचरणी असं लिहिणार होतो, पण हस्तर भारतीय देव/राक्षस नाही. हे लवक्राफ्टीयन विश्वातलं एक दैवत आहे. ते किंगने आपल्या कथेत वापरलं आणि आता धारपांकरवी तुंबाडमार्गे भारतीय चित्रपटात पोचलं.
इच्छुकांनी समग्र हेच.पी लवक्राफ्ट वाचावा. त्यात असे बरेच देव सापडतील. क्थुलू हा त्यांचा नेता.
२. न.बा, तुमच्यासाठी आहे हा रेफरन्सचा रेफरन्स.
मिर्झापूर
ॲमेझॉन प्राईमची मिर्झापूर ही मालिका पाहिली. दोन बैठकीत सगळे 9 भाग पाहून झाले. म्हटलं तर ह्या मालिकेचा प्लॉट यापूर्वी अनेकवेळा येऊन गेलेला आहे. गावातील बलदंड गुंड, त्याचा माजलेला परंतु नालायक मुलगा, कॉलेजमधलं राजकारण, प्रामाणिक वडिलांची वाया जाणारी मुलं, भ्रष्ट पोलीस अधिकारी, हाणामारी-गोळीबार वगैरे वगैरे. पण तरीही अतिशय आवडली.
1. पंकज त्रिपाठीचा कालीन भैय्या ऊर्फ अखंडानंद त्रिपाठी एकदम एक नंबर! न्यूटन, गुरगाव आणि वासेपूरपेक्षाही त्याचं यातलं काम मला आवडलं. मुलाच्या नालायकपणाची जाणीव असलेला - तरीही 'तो नालायक आहे हे महत्त्वाचं नाही, तो माझा मुलगा आहे हे महत्त्वाचं आहे' सांगणारा बिझनेस ओरिएंटेड बाहुबली एकदम परफेक्ट. मला पंकज त्रिपाठी हा जबरदस्त अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी/मनोज वाजपेयी यांच्या तुलनेत खूपच अंडररेटेड वाटतो.
2. स्त्रीपात्रंः श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी (मसानमधली) आणि कालीनभैय्याच्या बायकोचं पात्र - ही तिन्ही पात्रं इतर पुरुष पात्रांच्या तुलनेत महत्त्वाची वाटली.
3. त्याखालोखाल मुन्ना त्रिपाठी, बबलू पंडित ही पात्रं आणि कुलभूषण खरबंदाचा सत्यानंद त्रिपाठी हे आवडले.
4. यापूर्वी फुकरेमध्ये पाहिलेला शामळू गिटारवादक अली फजल इथं गुड्डू पंडित आहे. - त्याचा रोल जबरदस्त महत्त्वाचा असूनही अनेक प्रसंगात तो मला इरिटेटिंग वाटला.
5. थीमसाँगचं म्युझिक झकास, सीरीयलचा मूड पकडणारं, एकदम कॅची.
6. गुड्डू-बबलूच्या आई आणि वडिलांमधला विरोधाभास मस्त.
---
मालिकेतली हिंसा, शिव्या आणि सेक्सदृश्यं अंगावर येतात. त्रिपाठीचा विरोधी असलेले शुक्ला? की कुणीतरी फारच पिचकवणी घेतलाय. तो कुठल्याच अँगलने त्रिपाठीसमोर उभा राहू शकतो असे कधीच वाटत नाही.
सॅक्रीड गेम्स, रंगबाज, अपहरण, मिर्झापूर यांचा आता दुर्दैवाने पॅटर्न व्हायला लागलाय की काय अशी शंका येते.
ट्रॅप्ड - नॉर्डिक न्वार
'नॉर्डिक न्वार' प्रकारची 'ट्रॅप्ड' ही आइसलँडिक मालिका पाहिली. अगदी खास त्या विधेत शोभावी अशी मालिका आहे. बाल्ताझार कोर्माकुर हा तिथला गाजलेला सिनेदिग्दर्शक आहे. ह्यापूर्वी त्याचा 'ओथ' हा चित्रपट पाहिला होता त्यामुळे ही मालिका पाहायची उत्सुकता होती.
हिमवादळामुळे बाहेरच्या जगापासून तुटलेलं एक गाव. गावात सगळे सगळ्यांना ओळखतात. अवयव तोडलेलं एक धड समुद्रात सापडतं. गावातले पोलीस त्याचा तपास करू लागतात. हळूहळू गावातली आणि बाहेरची अनेक काळीकुट्ट कथानकं उघडकीला येऊ लागतात. कथानकाला २००८मधल्या आर्थिक मंदीची पार्श्वभूमी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचेही संदर्भ आहेत. आणि अर्थातच गावातल्या अनेक लोकांच्या व्यक्तिगत आयुष्याचेही संदर्भ आहेत. बारकाईनं रेखलेल्या व्यक्तिरेखा आणि टप्प्याटप्प्यानं येत गेलेले रहस्यभेद वगैरेंमुळे मालिका उत्कंठा टिकवून धरते. गावात साचलेलं हिमदेखील एखादी व्यक्तिरेखा असण्याइतपत लक्ष वेधून घेतं. ज्यांना अशा प्रकारच्या (नॉर्डिक न्वार) कथनशैलीत रस आहे त्यांच्यासाठी तर अभ्यासाला ठेवावी अशी मालिका आहे.
ट्रेलर इथे
रोचक आहे, धन्यवाद!
रोचक आहे, धन्यवाद!
रच्याकने तो फोटो पाहून जीओटीच आठवलं. =)) विंटर इज़ कमिंग!!!
ट्रॅप्ड - नवा सीझन
'ट्रॅप्ड'चा नवा सीझन नेटफ्लिक्सवर आला आहे. ह्या वेळी इमिग्रंट्स, मुस्लिमद्वेष, समलिंगीद्वेष, जागतिकीकरण, पर्यावरण, अशा समकालीन प्रश्नांना हात घालण्यासाठी खून आणि पोलीस-तपास हा फॉर्म्युला वापरला आहे. स्थानिक निसर्गाचा चांगला वापर केला आहे. आणि आपल्या भल्याभल्या लेखकांनी अभ्यासावी इतकी सुरस आणि उत्कंठावर्धक पटकथा आहे.
पाश्चात्य संगीत - ओळख, चैतन्य
पाश्चात्य संगीत - ओळख, चैतन्य कुंटे.
दृकश्राव्य कार्यक्रम.
//
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघ आणि पॅाप्युलर पुस्तक प्रकाशन सहआयोजित 'प्रिय रसीक साहित्य महोत्सवा'च्या तीन दिवसीय कार्यक्रमातील शेवटचा कार्यक्रम म्हणून श्री चैतन्य कुंटे यांचे पाश्चात्य संगीत या विषयावर दृकश्राव्य सादरीकरण-भाषण काल ( २०१९-०३-१०,रविवार) सेवा संघात झाले.
अशोक रानडे यांनी पाश्चात्य संगीताचा अभ्यास करून एक पुस्तक लिहायचे काम हाती घेतले होते पण ते पूर्ण करण्याअगोदरच त्यांचे निधन झाले. त्यांचा एक शिष्य चैतन्य कुंटे यांनी ते काम पूर्ण केले व पॅाप्युलर प्रकाशनतर्फे ते प्रकाशित केले 'पाश्चात्य संगीत कोश' या नावाने. चांगले जाडजूड पुस्तक आहे, किंमत १५००रुपये.
या पुस्तकातील उतारे,उदाहरणं देत चैतन्य यांनी दोन तासभर माहिती दिली. अशासारखे पुस्तक मराठीत असणे फारच महत्त्वाचे आहे.
पंधरा एक ओडिओ / विडिओ ऐकवले.
Harmony, pitch, volume, timbre,रिदम हे पाश्चात्य संगीतात वेगळे आहे हे सांगितले. शिवाय
कंडक्टर, संगीत लिहिणे स्क्रोल_शीट, पॅालिफोनी, chord, counterpoint, harmony असते.
मेलडी म्हणजे स्वरांची ओळ म्हणता येईल. यात एखादा आधारभूत स्वर असेलच असे नाही. बऱ्याचदा आपल्याकडच्या प्रचलित संगीतात गणले जाणारे लय,ताल,नाद,राग,छंद हे या वरील पाश्चात्य संज्ञांचे योग्य भाषांतर करू शकत नाहीत कारण त्या कल्पनाच वेगळ्या आहेत.
चैतन्य कुंटे हे गाण्याचे अभ्यासक आहेत हे जाणवते.
लोकसंगीत,शास्त्रीय भारतीय, युअरोपिअन,जिप्सी,नव अमेरिकन जॅझ,रॅाक इत्यादि कोणास का आवडते ही ज्याची त्याची आवड असते. संगीताचा विकास / फरक/प्रकार कसे झाले याला कारण बऱ्याच लोकांची आवड लक्षात घेऊन तसतसे आवाज, वाद्ये आणली गेली. उदा० अॅन्थेम ही स्तुती आहे. अफ्रिकन मजूर अमेरिकेत गेले त्यांनी सोप्या स्वस्त वाद्यांतून जॅझ आणले. पुरुषांबरोबर स्त्रियाही गाऊ लागल्या, त्यांच्या वरच्या पट्टीतील आवाजाचा उपयोग करून घेण्यात आला. ओपरा, नृत्यासाठी संगीत.
आवाजात सोप्रॅनो,बेस असतो. नाट्यसंगितिका उर्फ ओप्रा प्रकारात कधीकाळी दीडदोनशे पानांचे संवाद होत ते तीसपस्तीस पानांवर खाली आले आणि त्यातल्या संगीताच्या स्क्रोलशीट्स आठशे पानांपर्यंत वाढल्या! आपल्या मराठी संगीत नाटिकांचे झाले तसे. नाटक कमी आणि पदं अधिक. सोलो आणि ग्रुप वादन- बेथवनचे 'फॅार इलिझा' ही लोकप्रिय धून एक लहान मुलगी वाजवते, तीच धून पन्नासेक कलाकारही वाजवतात तेव्हा कंडक्टरचे काम बघण्यासारे असते. रचनाकार ती धून लिहून ठेवतो मग कंडक्टर त्याच्या पद्धतीने ती गाऊन वाजवून घेऊ शकतो. सध्या म्हणे जपानी, चिनी कलाकारांनी या पाश्चात्य संगितात मुसंडी मारली आहे, पण दुर्दैवाने ते त्यांचेच जुने संगीत विसरत चालले आहेत. भारतीय याविषयी सुदैवी म्हणायचे. हिंदी सिनेमांत पाश्चात्य वाद्ये आणि धून सलिल चौधरी,नौशाद,सी रामचंद्र इत्यादि प्रभृतिंनी आणली पण भारतीय संगीत मागे पडलेले नाही. भारतात ताज हॅाटेलात जॅझ किंवा पाश्चात्य संगीत १९१० पासून वाजवले जात आहे.
वाद्यांविषयी - पाश्चात्य संगीत प्रकारात दिसणारे पियानो,चर्च ओर्गन्स, निरनिराळी तारवाद्ये,ड्रम्स, कीबोर्डस असणारी वाद्ये कशी तयार झाली? याला एक कारण म्हणजे तंत्रज्ञान विकास होय. कारागिर हे बनवू लागले.
सादर केलेले विडिओ -
१) मोझार्ट सिंफनी ४० - यावर एक हिंदी गाणं आधारित आहे.
२) Byzantine Chant - मोनोफोनिक धून , हा थोडासा भैरव थाट वाटतो.
३) पॅालिफोनिचा एक नमुना D3
४) French bagpipe, folk tune/ song
राजस्थानी वाटतं.
५) Hurdi Gurdi वाद्य
६) Finnish folk music - harmoony (!)
chord.
७) medici_tv, Anthem
गायन वादनातील विराम.
८) Opera, C7
९) Opera,Queen and the night, Aria
१०) Gypsi style dance and music
११) बॅलेसाठी संगीत
१२) piano, recital solo , 'For Elisa' -Bethovan.
१३) piano, recital orchestra , 'For Elisa' -Bethovan.
१४) paper and box music by John Cage.
१५) American Jazz - Ella Fritzgerald.
///
( या पुस्तकाबद्दल अबापट यांनी मागेच ऐसीवर उल्लेख केला होता. काल याची जाहिरात मटामध्ये वाचल्यावर ही संधी सोडू नका हा सल्ला दिला. मला एकुणच भारतीय विरुद्ध पाश्चात्य संगीताचा उहापोह फारच आवडला. जसं भाषण आठवलं तसं लिहिलं आहे. )
आभार !
गोषवारा सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
सध्या म्हणे जपानी, चिनी कलाकारांनी या पाश्चात्य संगितात मुसंडी मारली आहे
.....वादकांबाबत तरी हे बऱ्यापैकी खरं आहे असं दिसतं. नुकतंच रिम्स्की कोर्साकोव्हचं प्रसिद्ध काम 'शेहरजादे' ऐकायला गेलो असता बाल्टिमोर सिम्फनी ऑर्केस्ट्रातला जवळापास १/३ वाद्यवृंद आशियाई वंशाचा दिसला. थोडं नवल वाटलं. अर्थात स्थलांतरांमुळे हे अमेरिकेत जितकं दिसतं तितकं युरोपात दिसेलसं वाटत नाही. २०१६ साली विएन्नात एका कार्यक्रमातल्या वाद्यवृंदात एकही आशियाई दिसला नव्हता.
पण भारतीय संगीत मागे पडलेले नाही.
....याबद्दल प्रचंड शंका आहे. पाश्चात्त्य वाद्यं आणून जे 'भारतीय' संगीत सलिल चौधुरी, राहुलदेव बर्मनप्रभृति तयार करत होते, तसं आता ऐकू येतं का?
इथे भारतीय संगीत म्हणजे रानडे/कुंटेंना काय अपेक्षित होतं हे जाणून घ्यायला आवडेल.
छान गोषवारा च्रट्जी
बारकाव्यांसहीत बरीच माहीती दिली आहेत.
आचरटबाबा आणि अमुकराव ,
आचरटबाबा आणि अमुकराव ,
++भारतात ताज हॅाटेलात जॅझ किंवा पाश्चात्य संगीत १९१० पासून वाजवले जात आहे.++
याबद्दल थोडे अजून ...
मुंबईतच नव्हे तर भारतातील अजून काही शहरातही जॅझ वाजवले जाई ( कोलकत्ता )
अर्थात मुंबईतील ताज हाटेलात सगळ्यात जास्त .
सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध लुई आर्मस्ट्राँग हाही ताज हाटेलात वाजवून /गाऊन गेला आहे .
अर्थात जॅझ वाजवणाऱ्यांमध्ये मुख्यतः अँग्लो इंडियन्स आणि गोव्यात पाश्चात्य शास्त्रीय संगीत शाळेपासून शिकून आलेल्या गोव्यातील म्युझिशिअन्स चा सहभाग मुख्य असे. ( नंतरच्या काळात यातील म्युझिशिअन्स , जे संगीत ' लिहू वाचू' शकत त्यांनी हिंदी चित्रपट संगीतात अरंजेर म्हणून नाव कमावले. उदाहरण अँथनी गोन्साल्विस ,तोच तो अमिताबच्चंच्या प्रसिद्ध गाण्यातला )
याविषयी अजून माहिती हवी असेल तर नरेश फर्नांडिसची ही वेबसाईट बघा . http://www.tajmahalfoxtrot.com/. त्याने या विषयावर पुस्तकही लिहिले आहे
हे पुस्तक माझ्याकडे आहे.
डिटेल वृत्तांताबद्दल आभार. हे अशोक रानडे यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. जबरदस्त आहे ...(नेहमीप्रमाणे कुणीतरी वाचायला नेले आहे )पण
कुणाला हवे असल्यास संदर्भासाठी तर उपलब्ध आहे.
२ab की गजब कहानी
वरूण ग्रोव्हर - २ab की गजब कहानी youtube वर शोधा. (इकडे लिंक देऊन मला पाप करायचं नाही)
"ए प्लस बी इंटु ब्रॅकेट स्क्वेअर" केला तर त्यात (एक्स्ट्रा) २ab येतो की नाही? त्याचे गूढ या व्हीडिओत उकलले आहे.
(डिस्क्लेमर - "ए प्लस बी इंटु ब्रॅकेट स्क्वेअर" - हे शब्द माझे नाहीत. )
"न मो कॅनडा स्पीच - एक्स्ट्रा २ab" हा ४६ सेकंदांचा एक अधिक मनोरंजक व्हीडिओसुद्धा बघा. (दोन्ही व्हीडिओज डिलीट होण्याआधी पाहून घ्या)
अलिकडं काय पाहिलत.
नेटफ्लिक्स वरील' रोमा'सिनेमा.विषय साधा पण तो मांडला ज्या रितीनं, त्याला तोड नाही. याच्या सिनेमटोग्राफी बोलायचं तर कित्येक पानं लिहावे लागतील.
रोमाची सिनेमॅटोग्राफी
लिहा लिहा प्लीज. संस्थळ आहे घरचं, होऊ द्या की खर्च.
कार्यकर्त्या सरांचं व्याख्यान
‛तथाकथित हुशार’, ‛गल्ली चुकलेले’ अशा भाषेत इथं
वाळीत टाकल्या गेलेल्या व्यक्तिमत्वानं(मी समजतोय त्याप्रमाणे वैयक्तिक पातळीवर तरी)
(त्यांची खाली लिंक देतोयच)समकालीन विषयावर केलेलं हे (खालील लिंकचं)(माझ्यासाठी तरी)मार्मिक भाष्य भावून गेलं.होय, हे(म्हणजे मी म्हटलेलं)भावनिक वगैरे आहेच.आणि भावनिक उद्रेक व बुद्धिमत्ता यांचा ऋण-सहसंबंध असतो वगैरेही (मानसशास्त्रीय) बौद्धिक मी तूर्त (या विषयापुरता) का होईना स्वीकारतो.काहीही असो.समकालीन विषयावर (सरांनी) मांडलेलं हे विवेचन लक्षात घेण्यासारखं आहे.निदान तसं ते वाटतं.https://youtu.be/18j_IjeQDVQ
अविनाश धर्माधिकारी
अविनाश धर्माधिकारी हे नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या यूट्यूब हिस्टरीमध्ये येऊ नये असं काही तरी असणार ह्याचा अंदाज आला होताच. त्यामुळे प्रायव्हेट मोडमधून ब्राउजरमधून लिंक उघडली, केजीएफची जाहिरात बघितली, आणि ते पिवळ्यावर लाल अक्षरांत ‘पुलवामा आणि आपण सगळेच’ आल्यावर घाबरून ब्राउजर बंद केला. _/\_
हिस्टरी
लोल.
जंतूजी, तुम्ही डकवलेल्या काही लिंका आठवल्या. आखिर कब तक बचोगे बिग ब्रदर से?
कोणत्या लिंका डकवल्या होत्या?
कोणत्या लिंका डकवल्या होत्या? काही देता येतील का?
उतारा
मीही धर्माधिकारींचं नाव आणि ते चिनी रंग बघूनच फीत बंद केली. प्रायव्हेट ब्राउजिंग वगैरेंच्या फंदात पडत नाही. एक-दोन गोऱ्या वर्णद्वेषी लोकांची भाषणं ऐकायची, मिलो यानोपोलस वगैरे, म्हणजे सगळी रंगसफेती होऊन जाते.
किंवा
धर्माधिकारांवर उतारा म्हणून ट्रंपतात्यांची भाषणं पाहा, ट्वीट्स पाहा. त्यानंतर ट्रंपतात्या आणि अविनाश धर्माधिकारी अशी तुलना करणारं लेखन करा. आपसूक विनोदी होईल.
-
मीही धर्माधिकारींचं नाव आणि ते चिनी रंग बघूनच फीत बंद केली.
हा हा हा... मला माझंच परीक्षण करावंस वाटू लागलंय.
बाकी उतारा मस्तच जहाल आहे.
पास
अविनाश धर्माधिकारी हे इतकं तीव्र अन् वेगळं रसायन असावं की ज्यासाठी मुळात दारच बंद केलं जात आहे. तीव्रतेच्या संदर्भात मला या रसायनाची केवळ भगवी, अध्यात्मिक आणि देशी बाजूच काही प्रमाणात माहिती आहे. पण दारच बंद करणं वगैरे खूपच व्यक्तिगत पातळीवर जातंय. तशी त्याला तशीच कारणंही असणार हे उघड आहे. त्यामुळं माझा पास.
कशाची लागण होत असेल तर मात्र काळजी घेतलेली बरी.
अविनाश धर्माधिकारी हे नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं.
खरं तर इथं नाव घ्यायला दबकलो होतो. अन् पुढची फार काही कल्पनाही केली नव्हती. प्रतिसाद वाचल्यावरच नाव द्यायलाच हवे होते ते लक्षात आलं.
चाणक्य वि. जुंगा
ह्यात व्यक्तिगत काही नाही. जगाला आयएएस अधिकारी देणं हे महाराष्ट्राचं परम कर्तव्य आहे आणि ते कुणी असोशीनं पार पाडत असलं तर त्याविषयी मला काही अडचण वगैरे नाही. मात्र, ह्या उपरनिर्दिष्ट व्यक्तीपासून दूर राहण्याचं माझं कारण वेगळंच आहे. अनेक वर्षांपूर्वी ह्या उपरनिर्दिष्ट व्यक्तीनं पुणे आकाशवाणीवर एक मालिका प्रस्तुत केली होती. 'मी वाचलेली पुस्तकं आणि त्यातून माझी झालेली जडणघडण' असं त्या मालिकेचं स्वरूप होतं. मला सुपरिचित असलेल्या अनेक देशीविदेशी पुस्तकांबद्दल ह्या गृहस्थानं जे तारे तोडले होते त्यानं माझी सुरेख करमणूक झाली होती. मात्र, 'आयुष्याविषयी बोलू काही...' छापाचे सल्ले मी त्याच्याकडून घ्यावेत इतकी भकास वेळ अद्याप आलेली नाही आणि इतक्यात येणं शक्य नाही ह्याची प्रखर जाणीव मला तेव्हा झाली. आणि करमणुकीसाठी मी वेगळे मार्ग शोधले. (आता लिंक द्यायची माझी पाळी...)
'जलपरी- द डेझर्ट मर्मेड'
'जलपरी- द डेझर्ट मर्मेड' - नेटफ्लिक्सवरती पाहीला.
अगदी भरपूर प्रेडिक्टेबल सिनेमा आहे. कथा फोडत नाही. सर्व बाल कलाकारांचे काम छान आहे.
कथा अंगावरती काटा आणणारी आहे मात्र.
हे पुस्तक सापडलं
हे पुस्तक सापडलं
सासरेबुवांच्या पुस्तकठेव्यात, यत्ता आठवीतलं.
-
माहितीपूर्ण
अति उत्तम. देशी भाषांमधील
अति उत्तम. देशी भाषांमधील विज्ञान आणि गणित यांचा प्रसार, शिकवण, इत्यादींबद्दल सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे.
आय ॲम - नेटफ्लिक्स्
आय ॲम नावाचा नेटफ्लिक्स सिनेमा.
'स्वत:ची जडणघडण'' - हा विषय वेगवेगळ्या चष्म्यातून साकारला आहे. आपण हा जो 'मी' कोणी आहे असे म्हणतो, तो कदाचित काही डिफाइनिंग मोमेंटस, प्रसंग किंवा एखाद्या कालखंडाचा (जसे बालपण) परिपाक असू शकतो. त्यमध्ये भल्या-बुऱ्या अर्थाने, इतरांचा सहभाग किती असतो.
सिनेमा डार्कच आहे आणि शेवटी तर इतका डार्क होत जातो. बाप रे!!! मळमळायला लागलं मला.
भारतात जाऊन बाँम्बस्फोट करणार का?
"I'm just a guy with a camera. I make Videos." असं सांगणारा पाकिस्तानी हारिस आवान पाच लाखांहून अधिक सबस्क्रायबर असणारं लोकप्रिय यूट्यूब चॅनल (आणि फेसबुक, इन्स्टा वगैरे) चालवतो. 'तुम्हाला भरपूर पैसे दिले तर भारतात जाऊन बाँम्बस्फोट करणार का?' असं विचारत तो फिरला त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे -
सुंदर
"जिस ने एक इन्सान को कतल किया उन ने इन्सानियत को कतल किया।"
प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी
- नामक सिनेमाचा ट्रेलर पाहिला.
विवेकानंद ओबेरॉय (हो. तोच तो.) ह्याने नरेंद्र मोदींची भूमिका केली आहे. ट्रेलरमधे मोदी आपल्याला विविध रूपांत दिसतात - त्या सर्व रूपांतही विवेकानंद ओबेरॉय हा विवेकानंद ओबेरॉयच वाटतो हे त्याचं यश नाही तर काय? इतके गेट अप बदलल्यावर एखादा अभिनेता वेगळा वाटू शकला असता, पण वि.ओ.ने मात्र ह्या सापळ्यात न अडकता सुंदर काम केलं आहे. तोंडी लावायला बोमन इराणी, मनोज जोशी वगैरे मंडळी आहेत.
वि.सू - मोदींनी विवेकानंदांप्रमाणेच(ओरिजिनल. ओबेरॉय नव्हे) हिमालयात वगैरे जाऊन भारत भ्रमण केलं होतं, दंगली झाल्यावर ते "मेरा गुजरात जल रहा है" म्हणून रडले होते, त्यांनी काश्मीरात ह्या एवढ्या बर्फात उभं राहून झेंडावंदन केलं होतं, हे सगळं ट्रेलरमधून समजलं.
वि.वि.सू - चित्रपट आणि निवडणूकांचा संबंध काही लोकं लावतील. ही फालतूगिरी समजावी. नरेंद्र मोदींवर चित्रपट काढण्यात पाप काय आहे? उमंग कुमार तसंही बायोपिक्स बनवतात. त्यात आणखी एक बायोपिक.
मग काय मित्रांनो, बघणार ना हा चित्रपट?
इशारा
मोदीलाटेपुढे ‛खळ्ळ खट्याक’ने काय होणार?
सेम
मोदींनी विवेकानंदांप्रमाणेच(ओरिजिनल. ओबेरॉय नव्हे) हिमालयात वगैरे जाऊन भारत भ्रमण केलं होतं, दंगली झाल्यावर ते "मेरा गुजरात जल रहा है" म्हणून रडले होते, त्यांनी काश्मीरात ह्या एवढ्या बर्फात उभं राहून झेंडावंदन केलं होतं, हे सगळं ट्रेलरमधून समजलं.
ट्रेलरमधून मलाही प्रथमच समजलं!
चित्रपट आणि निवडणूकांचा संबंध काही लोकं लावतील. ही फालतूगिरी समजावी. नरेंद्र मोदींवर चित्रपट काढण्यात पाप काय आहे? उमंग कुमार तसंही बायोपिक्स बनवतात. त्यात आणखी एक बायोपिक.
अगदी मनातलं...
मग काय मित्रांनो, बघणार ना हा चित्रपट?
नक्की नक्की!
खळ्ळफट्याक सध्या दोनच सल्ले
खळ्ळफट्याक सध्या दोनच सल्ले जाहीर सभेतून देत आहेत. " तुम्ही एवढेच करायचं, फक्त या दोघांना हटवा, पक्ष बिक्ष हटवायचं पुढचं काम मी पाहतो."
आता महाराष्ट्रातला मतदार वाराणसीला जाऊन कसा काय 'त्या'ला मतदानाने हटवणार?
गंमत
खळ्ळफट्याक सध्या दोनच सल्ले जाहीर सभेतून देत आहेत. " तुम्ही एवढेच करायचं, फक्त या दोघांना हटवा, पक्ष बिक्ष हटवायचं पुढचं काम मी पाहतो."
आता महाराष्ट्रातला मतदार वाराणसीला जाऊन कसा काय 'त्या'ला मतदानाने हटवणार?
त्याशिवाय तरी तरुणाईचे मनोरंजन तरी कसे होणार? पर्यायाने उमेदवार कोणता निवडायचा हे तरी कसे निश्चित होणार?
‛निवणूकपूर्वी’च्या अशा रंगातच गंमत आहे. गंमत गमतीवारी नेहली जाते हीही एक गंमत आहे. तीच पाहून गंमत लुटायची. इतकंच काय ते कळतं.
एस. ई. :)
आमच्या घरी मालिकेच्या शीर्षकाचा हा कळीचा शब्द प्रचलित आहे, कारण मुलासमोर 'सेक्स' हा शब्द म्हणवत नाही :) :) :).
नेमकं ह्याच कारणासाठी "सेक्स एजुकेशन" ही नेटफ्लिक्सवरील मालिका सर्व आमच्यासारख्या 'विशिष्ट वाढ खुंटलेल्या" व्यक्तींनी बघण्यासारखी आहे! एका किशोरवयीन मुलाची आई सेक्स-थेरपिस्ट असते. मुलाच्या समोर (कदाचित मुद्दामच) अती मोकळी बोलते, त्यामुळे मुलगा बिचारा कानकोंडा होतो! पण गंमत अशी, की पुढे शाळेतल्या कितितरी पोरांना अर्धवट माहिती, आणि अर्धवट अनुभवामुळे ज्या समस्या येतात, त्यांचं निवारण करायला आपला शामळू शामच पुढे होतो! एकच सीझन आलाय, पण तीन दिवसात फडशा पडला!
शाळेत आपण खरंच किती बावळट्ट होतो, आयुष्याची किति वर्ष आपण वाया घालवली, ह्याचं सारखं वाईट वाटत राहिलं :-) आपल्या समाजात तरूणांना चुका करायची मुभा नसते. लग्न करण्यालायक/ तितक्या तीव्रतेचं प्रेम असेल, तरच पुढे जायची शक्यता होती, ती पण अत्यंत भीतभीतच. त्यामुळे जोवर लग्न करण्याजोगा व्यक्ती सापडला, तोवर लग्नच करायची वेळ आली! ह्या अशा मालिका बघून जरा तरी दृष्टीकोन बदलला, थोडा व्यापक झाला. आता अजुन ७-८ वर्षांनी आपल्या घरातच ह्याला सामोरं जायची तयारी म्हणा! :)
बघते.
तू कपलिंग बघितली आहेस का? मुलांसाठी नाही, पण तुला आवडेल बहुतेक.
Perhaps, perhaps perhaps!
हो! बघितलिये, खूप वर्ष झाली पण त्याला! पुन्हा बघायला पाहिजे... शीर्षकगीत मात्र खूप आवडलं होतं! अजुनही लक्षात आहे.
Marvelous Mrs. Maisel पण खूप आवडली. काय ते गोडगोSSSSSSSSड फ्रॉक :) तेवढ्याकरता बघायचीसुद्धा तयारी होती, पण कथा ही अगदी वेगळी, छान निघाली. ६० च्या दशकात अमेरिकन ज्युईश लोकांची जीवनशैली पहायला मजा आली. सारखे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प चे उद्धार - "मी एकहाती तेरा माणसं वाचवलीयेत.... तेरा! इथे त्यांना नोकर्या दिल्या. गम्मत आहे का?" "आमच्या वेळी आम्ही डायेट करत होतो कारण खायला मिळत नसे! तुम्हाला आता गम्मत वाटतेय का?"
भारतात सध्या 'स्टॅन्ड अप कॉमेडी' जोरात आहे. त्यात काही मुली असतात, पण तरी प्रमाण कमी आहे. माझी पुण्याची आजी (पुण्याची असल्यामुळे?) खवचट बोलायची, तिला स्टेजवर उभी करायला हवी होती! सॉलिड हशा मिळवला असता तिने. मिज मेसलच्या वाक्यांत सांगायचं झालं तर, "दुर्दैव, उपेक्षा, भेदभाव, आणि निराशा- सगळ्यात जास्त पचवली आहे बायकांनी, म्हणजे खरंतर बायकांचा विनोद हातखंडा. पण बायकांनी हसलेलं जगाला बघवलं पाहिजे नं!"
Spoiler Alert:
एक एक करत मेसलच्या आयुष्यातल्या सगळ्या पुरूषांना तिच्या "भूमिगत कारवायांचा" पत्ता लागतो (स्टॅन्ड अप कॉमेडी सहसा न्यू यॉर्कच्या बेसमेंट क्लब आणि बार मधे उदयाला आली). फ्रॉईडच्या Electra Complex प्रमाणे मुली आपल्या नवर्यात बापाला शोधतात, तर अशा स्पृहणीय आदरणीय पुरूषांची 'अस्मिता' तिच्याकडून नकळत मोडून काढली जाते. मात्र हळूहळू बदलणात्या जगात आर्थिक स्वातंत्र्य आणि विचार/प्रकटन स्वातंत्र्य मिळवून मेसेल चक्क आपल्या आईचाही 'उद्धारास' कारणीभूत ठरते, हे फार छान दाखवलंय.
मर्द को दर्द...
खूप लोकांकडून स्तुती ऐकल्यामुळे 'मर्द को दर्द नही होता' नावाचा सिनेमा पाहिला. फारच ओव्हररेटेड आणि कंटाळवाणा वाटला. कोणत्याही दिवसाच्या कोणत्याही क्षणी टीव्हीवरच्या काही चॅनलवर काही टुकार दाक्षिणात्य सिनेमे चाललेले असतात. ते टुकार असतात म्हणजे वाईट नसतात, तर 'सो बॅड दॅट इट इज गुड' असतात. एक तर, दर्जेदार असण्याचा कोणताही दावा त्यांच्याकडून केला जात नाही. अत्यंत ढ दर्जाचे नट आणि ढिसाळ कथानक त्यात असतं. मात्र अशा सिनेमाची मजा ही त्यातले छपरी विनोद आणि बहारदार स्टंट आणि नाच वगैरेंमुळे येते. शिवाय, उघडउघड दाक्षिणात्य असलेल्या शहरात बसमध्ये 'एक नायगावचं तिकीट दे' वगैरे स्थानिकीकरण केलेल्या डबिंगमुळे सिनेमामध्ये आणखीनच मजा येते. असल्या सिनेमातले किंवा हाँगकाँग - जॅकी चॅन टाइपच्या सिनेमातले (म्हणजे ज्यांची भ्रष्ट नक्कल टॅरँटिनोनं केली वगैरे) घटक वापरून खूप वरच्या दर्जाच्या मल्टिप्लेक्सी-फेस्टिव्हली टैपच्या प्रेक्षकासाठी ओढूनताणून कुथूनकुथून केलेला सेल्फ-कॉन्शसपणा 'मर्द को दर्द'ला फारच केविलवाणा आणि कंटाळवाणा करतो. कट्टर शत्रू सोडता कुणालाही शिफारस करण्याच्या लायकीचा नाही.
नभिनेता.
ओके लोकहो.
पॉपकॉर्न घेऊन बसा.
अख्ख्या विश्वातला सर्वात वाईट अभिनेता कोण? ह्याचं जवळपास उत्तर सापडलं आहे.
एम्बेडेड लिंकसाठी क्षमा.
पण हा नरपुंगव जबरद्स्त आहे.
स्विमिंगपूलमधे आपल्या प्रेयसीला "आय लव यू" म्हटल्यानंतर १.४ सेकंदात तिला कुणीतरी गोळी घातल्यावर तिच्या नग्न देहाला कवटाळून आक्रोश करतानाही एक छुपं सुखं झाल्याचा अभिनय- बघा.
किंवा - बेभान होऊन "रिअली?" असं विचारल्यावर आपल्या (दुसऱ्या, न मेलेल्या) प्रेयसीला जवळ घेऊन ताशी १ किलोमीटर/तास या वेगाने डेस्कवरच्या वस्तू खाली फेकत, हॅहॅहॅ करत एकमेकांचे कपडे फाडताना दाखवलेल्या (अंमळ संथ, तरीही) प्रणयोत्सुक कामभावना - बघा.
ह्या नटावर रिसर्च करायला पाहिजेले.
रूम
यातला रूम हा चित्रपट मी पाहिला आहे. त्यातल्या टॉमीवर the disaster artist म्हणून एक उत्तम सिनेमा आलेला दीडेक वर्षांपूर्वी. रूम पाहताक्षणीच आजीवन फॅनत्व पत्करले म्या.
हो हो
रूम मी पण फ्यान.
टॉमी विसू (?)ची ॲक्टींगही उत्तम.
त्याचे ते गच्चीवरचे सीन्स झब्री आहेत.
विवेक - आनंद पटवर्धन
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निमित्तानं सध्याच्या वातावरणातल्या विवेकाच्या पराभवाविषयी भाष्य करणारा आनंद पटवर्धनांचा माहितीपट 'विवेक' एका यूट्यूब चॅनलवर उपलब्ध झाला आहे.
तेच ते
लिंक पाहिली आणि मनात आलेल्या त्याच त्या शंका परत अधोरेखित झाल्या :
1) हिंदू आतंकवादामध्ये सनातन, संघ वा तत्सम संघटना समाविष्ट आहेत असं तत्कालीन पुराव्यावरून जणू स्पष्ट झालं आहे असं समजून त्यांचा बिमोड करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना तथाकथित हिंसक पद्धतीनं छळलं गेलं असू शकतं.
2) मालेगाव बॉंबस्फोटासारख्या अनेक प्रकरणांमध्ये ‛हिंदुत्व’च्या नावाखाली ‛साध्वी प्रज्ञासिंह’सारखे अनेकजण ‛हिंदू जिहादी’ वगैरे बनलेले असावेत.
कितीही खल केला तरी नुसते प्रश्नच तयार होणार असतील तर खल करायला हरकत नाही.
‛व्हाट्स अप’वर आलेला मेसेज (जसाच्या तसा)
मी हिंदुत्ववादी नाही, माझ्या घरी मी कुठलेही कर्मकांड काय देवपूजाही करत नाही. माझा धर्म- जात मला अपघाताने मिळण्यात माझं कुठलंही श्रेय-अपश्रेय नाही, त्यामुळे मला त्याविषयी अभिमान- राग-लाज अशी कुठलीही भावना नाही. सार्वजनिक पातळीवर धर्म पाळणं, त्याचे उत्सव मला हिडीस वाटतात. हे सगळे मी धर्माच्या रूढ अर्थाविषयी बोलते आहे.
मात्र आपल्या समाजात धर्माला एक राजकीय अर्थही आहे. तो या रूढ धर्मापेक्षा वेगळा आणि 'पक्षसापेक्ष' आहे ! त्या सापेक्ष अर्थातूनच मुस्लिम दहशतवादाला संरक्षण देण्यासाठी 'हिंदू दहशतवाद' नावाचा एक बागुलबुवा निर्माण केला गेला. अनेक वर्षे पद्धतशीरपणे त्याची माध्यमांमधून पेरणी केली गेली,केसेस तयार केल्या गेल्या आणि आधीच पापभिरू असलेल्या हिंदू समाजमनात एक अपराधगंड, एक भयगंड तयार केला गेला. हे सगळं कशासाठी? तर दुसऱ्या एका धार्मिक समूहाला खुश करण्यासाठी ! हिंदू दहशतवाद नावाने जे दोन महत्वाचे खटले उभे केलेत,ते म्हणजे मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेस.. पैकी समझोता एक्स्प्रेस खटल्यातील आरोपी निर्दोष सुटले आहेत आणि मालेगाव खटल्यातले आरोपी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावरचे महत्वाचे आरोप रद्द झाले असून त्यांची जामीनावर मुक्तता झाली आहे.
त्या दरम्यान, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जी नऊ वर्षे तुरुंगात काढली, त्या काळात युपीएचे सरकार असूनही, त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही, कारण तो सिद्ध करायचाच नव्हता. केवळ ' हिंदू दहशतवाद' हा बागुलबुवा जिवंत ठेवण्यासाठी, खटला चालू ठेवायचा होता. मात्र या काळात, प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांच्यावर जे अनन्वित अत्याचार कोठडीत झाले, त्याचा जाब कोण देणार? कोणत्या सुसंस्कृत समाजात मान्य असतात हे अत्याचार? 9 वर्षे एकही गुन्हा न सिद्ध करता, एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याचा अधिकार यंत्रणेला कोणी दिला? प्रज्ञा ठाकूर स्त्री असूनही, त्यांच्यावर केले गेलेले प्रचंड शारीरिक-मानसिक अत्याचार कोणत्या सभ्यतेचा भाग आहेत?
हेमंत करकरे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केलं म्हणून आज दिवसभर सर्व राजकीय पक्ष, विचारवंत, वाहिन्यांचे धुरीण पत्रकार, यांनी त्यांना धारेवर धरलं. दिवसभरात त्यांच्यावर वाटेल ती टीका-अर्वाच्च भाषा वापरून झाली. यापैकी एकाही वाहिनीला, त्यांनी म्हटलेल्या बाकी वाक्यांची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही. " माझ्यावर कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही, पुरावेही मिळाले नाहीत, त्यामुळे मला सोडावं, असं तपास समितीने म्हंटलं, मात्र करकरेंनी त्याला नकार दिला आणि काहीही करुन पुरावे आणेन," असं सांगितलं, असे वाक्यही प्रज्ञा ठाकूर बोलल्या आहेत. ते का? त्यामागचे सत्य काय? याचा शोध कोणालाही घ्यावासा वाटला नाही. त्यांचे आरोप खरे असतील किंवा खोटे, मात्र त्यांचा तुरुंगात छळ झाला का? तो का? आणि इतक्या वर्षांत इतक्या तपास संस्थांनी केलेल्या तपासानंतरही काहीही तथ्य समोर येऊ नयेत,असं का? याचा शोध घ्यावा असे कोणत्याही पत्रकाराला वाटत नाही? तुमची पत्रकारिता संपली आहे, बुद्धी बधिर झाली आहे, की मन मेले आहे? की केवळ दुकानदारी करायची आहे?
आर व्ही एस मणी या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या, 'Hindu Terror: Insider Account of Ministry of Home Affairs 2006-2010' या पुस्तकात तत्कालीन सरकारविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. खोटी प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर करणे, खोटे तपास अहवाल तयार करण्यासाठी दबाव आणणे, अनेक लोकांना अडकवण्याची कारस्थाने असे कितितरी आरोप त्यांनी सविस्तर लिहिले आहेत. त्याचा तपास करावा, शहानिशा करावी असेही कोणाला वाटत नाही. राजकीय दृष्ट्या एखाद्या धर्माला बदनाम करण्यासाठी एक संपूर्ण खोटी थिअरी तयार करण्याचा बनाव रचणे, ही किती भयंकर गोष्ट आहे. हे खरे असेल तरीही देशविघातक आहे आणि खोटे असेल तरीही असा अपप्रचार , राजकीय पक्ष आणि यंत्रणा आणि एकूणच समाजाची विश्वासार्हता धोक्यात घालणारा आहे. मग पत्रकारांना या गोष्टीचा शोध घेणे आव्हान वाटत नाही का? त्याची गरज वाटत नाही का? असे का? याच पुस्तकात हेमंत करकरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, हे तपासावे असं वाटत नाही? करकरे तर दहशतवादी कारवाईत शहिद झालेत. मात्र, आर वी एस मणि त्यांच्यावर मोठा कलंक लावू पाहत आहेत. मग त्याचा शोध घेऊन हा कलंक दूर करत करकरेंना 'पुण्यात्मा' म्हणून सिद्ध करावं असं कोणत्याही पत्रकाराला वाटत नाहीं का? की शाहिद झालेल्या व्यक्तीच्या कुठल्याही गोष्टींविषयी प्रश्न विचारलेच जाऊ शकत नाही?
साध्वीच्या वक्तव्याचा शंभरदा निषेध !! भाजपचा 'खरा' चेहरा बाहेर आला हे ही मान्य ! पण त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील?
निवडणुकीचे दिवस आहेत, त्यामुळे साध्वीच्या वक्तव्याचा फायदा घेण्याची राजकीय पक्षांची गरज आणि अपरिहार्यता समजू शकते. मात्र पत्रकारांसमोर कोणती अपरिहार्यता आहे? स्त्रीच्या अन्याय अत्याचारावर बोंबा मारणाऱ्या आधुनिक महिला पत्रकारांना प्रज्ञा ठाकूरवर झालेले शारीरिक-मानसिक अत्याचार मान्य आहेत? केवळ एका धर्माला बदनाम करण्यासाठी खरोखरच एक थियरी तयार करण्यात आली होती का? तसे नसेल तर या प्रकरणात अद्याप काहीही सिद्ध का करता आलेलं नाही, याचा शोध घ्यावा, असे का वाटत नाही? यालाच धंदेवाईक,बेगडी, आंधळी पत्रकारिता म्हणतात.
दोनच दिवसांपूर्वी कर्नल पुरोहित यांच्या पत्नी डॉ अपर्णा पुरोहित यांना एका कार्यक्रमात भेटण्याची संधी मिळाली. त्यांचा तो पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता. त्या बाईंनी देखील गेली 9 वर्षे जे भोगलं ते ऐकलं तर अक्षरशः या सडलेल्या यंत्रणेची चीड आणि माणूस म्हणून स्वतःची लाज वाटते. इशरत जहां, जाफरी, यांच्या घरच्या बायकांना तुम्ही अनेकदा टीव्हीवर रडताना पाहिलं असेल. पण मी अपर्णा पुरोहितांना रडताना, तक्रार करतांना नाही पाहिलं. उलट, ज्यांनी मदत केली त्यांच्याविषयी त्या कृतज्ञ आहेत.'माझी बाजू सत्य आहे म्हणून मीच जिंकणार,असा विश्वास त्या शांतपणे व्यक्त करतात. या संपूर्ण नऊ वर्षांच्या काळात मी हजारो वेळा कर्नल पुरोहितांशी संबंधित बातमी केली असेल,, मात्र एकदाही माझ्या मनात त्यांच्या कुटुंबाविषयी कसलीच भावना आली नाही,प्रश्न पडले नाहीत, माझ्या निबर, निद्रिस्त मनाची अक्षरशः लाज वाटली मला त्याक्षणी!
साध्वी प्रज्ञासिंह तर तुम्हाला न आवडणाऱ्या धर्माचं काम करतात, त्यामुळे त्या दोषी आहेत, हे तुम्ही पहिल्याच दिवशी गृहीत धरलंय, मान्य! पण कर्नल पुरोहित तर लष्करी अधिकारी आहेत. (आहेत!) मग त्यांनी देशाशी खरंच गद्दारी केली की त्यांच्यावर अन्याय झाला असेल? आणि कारस्थान असेल तर ते का? हा शोध का घेत नाही? केवळ हिंदू दहशतवादाची 'थियरी' समाजात तशीच पसरलेली रहावी म्हणून?
मोदी सरकारच्या हातात तपास यंत्रणा आल्यामुळे, ह्या तथाकथित 'हिंदू दहशतवाद्यांना' सोडलंय, असा युक्तिवाद जर तुम्ही करणार असाल, तर त्याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूने, आधीच्या सरकारने याच यंत्रणांवर दबाव टाकून त्यांना 'अडकवलं' होतं, हे ही तुम्हाला मान्य करावे लागेल. तेव्हा हा सोयीचा युक्तिवाद सोडून, निर्भीड असाल, तर तथ्य शोधून काढा, मगच शिरा ताणून भाषणं आणि उपदेश द्या.
राजकीय पक्षांसारखीच पत्रकारांचीही काही 'अपरिहार्यता' असू शकेल. पण जनतेची मात्र कुठलीच अपरिहार्यता नसते. ती हा सगळा बेगडी तमाशा बघत असते, समजूनही घेत असते. जर प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल पुरोहित दोषी असतील, आणखी कोणीही हिंदू धर्माच्या नावाखाली खून किंवा गुन्हे करत असतील, तर त्यांना खुशाल फासावर लटकवा! माझ्यासारखी एकही सर्वसामान्य व्यक्ती त्यांच्या बचावासाठी सही करणार नाही, की मध्यरात्री न्यायालयात जाणार नाही.
मात्र, जर उद्या, साध्वी प्रज्ञा ठाकूर किंवा कर्नल पुरोहित निर्दोष आहेत,आणि केवळ एका कारस्थानाचा भाग म्हणून देशाची सेवा करणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याला 'हेतुपुरस्सर' अडकवण्यात आलं होतं, हे सिद्ध झालं, तर, त्यादिवशी माझ्या विचारवंत पत्रकार मित्रांनो , तुम्ही माफी मागाल का? तुमची मान शरमेनं खाली जाईल का? तुमचा आत्मा जागृत होईल का?
ते होणार नाही. कारण सत्य आजही तुम्हाला माहिती आहे. तुमच्या ह्या 'खऱ्या बेगडी आणि द्वेषपूर्ण' चेहऱ्याचा निषेध म्हणून मी अपर्णा पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह च्या बाजूने उभी असेन !
पत्रकारांनो आणि विचारवंतानो, तुम्ही निद्रिस्त हिंदुना जागे करत आहात !
राधिका अघोर
20/4/2019
कासवराव, शाप दिला, सुतक सुटलं
कासवराव, शाप दिला, सुतक सुटलं वगैरे सांगितलं प्रज्ञा ठाकोरने, सभेत की पत्रकार परिषदेत की भाषणात.
म्हणून चर्चा सुरू झाली .
मग बिल विचारवंत आणि पत्रकारांवर का फाडताय ?
संपूर्ण मेसेज फॉरवर्डेड आहे.
संपूर्ण मेसेज फॉरवर्डेड आहे. अगदी शेवटच्या दिनांकासह. संपूर्ण मेसेज (शेवटच्या दिनांकासह) इटालिकमध्ये टाकला होता; पण शेवटच्या ओळी इटालिकमध्ये झाल्याच नाहीत. भक्तांची ताकद म्हणावी काय?
हास्यास्पद तरी उपयुक्त
हे सगळं "लेखण" हास्यास्पद म्हणण्याच्याही लायकीचं नैये. पण भावना पेटवणं किती सोपं आणि विचार करायला लावणं किती कठीण, हे दाखवण्यासाठी उपयुक्त.
डावीकडे झुकलेला
Italic फॉन्ट मधले वरचे स्फुट वाचून लगेच खालचे प्रतिसाद वाचले तेव्हा अक्षरं उजवीकडे कललयाचा भास होतो. बाकी चालू द्या.
'नॉक नॉक सेलेब्रिटी' आणि चहेता
लागोपाठ दोन रोचक नाटकं पाहिली. पहिलं 'नॉक नॉक सेलेब्रिटी' सध्याच्या सेलेब्रिटी आणि सेल्फी वगैरे गोष्टींचा आधार घेऊन समकालीन वास्तवाचा एक निर्घृण काप समोर ठेवतं. ओंकार कुलकर्णीनं लिहिलं आहे आणि सुमीत राघवननं अभिनय केला आहे. तर दुसरं मोहित टाकळकरचं 'चहेता' - सागर देशमुखचा एक वेगळा अभिनय पाहायला मिळेल. कथानक सांगण्यात अर्थ नाही, पण मिथककथेला समकालीन संदर्भ देत मानवतावादी दृष्टिकोनातून मांडण्याचा एक वेगळा प्रयत्न. 'आसक्त'ला पुष्कळदा बॅकस्टेज सपोर्ट करणारा आशिष मेहता एका वेगळ्याच भूमिकेत चमकून जातो, हा बोनस.
आजचे गुगल डुडल पहा. रुथ
आजचे गुगल डुडल पहा. रुथ असावाच्या वायर शिल्पांबद्दल माहीती आहे. काय अप्रतिम शिल्पे आहेत. अर्थात मी फक्त गूगल केले. लवकरच न्यु यॉर्कच्या व्हिटनी संग्रहालयात जाउन पाहून येईन.
.
काक्क-रोच
ह्या चित्रावरून आठवलं, नेटफ्लिक्सवर 'रशियन डॉल' बघितलीस का?
नाही
नाही
पण एकीत एक - एकीत एक असणाऱ्या
पण एकीत एक - एकीत एक असणाऱ्या रशिअन बाहुल्या माहीत आहेत.
द भारतीय चित्रपट
आवाज न करता चित्रपट पाहण्याची वेळ आल्याने न समजणाऱ्या भाषांतले काही चित्रपट पाहिले:
महेशिंते प्रतिकारम् (मल्याळम्) - फोटो स्टुडिओ चालवणारा, लहान गावातला महेश. रस्त्यावर त्याला मारहाण होते त्याचा त्याने केलेला प्रतिकार (बदला या अर्थी), त्याची प्रेमकहाणी. सच्चा, साधा पिक्चर. आवडला.
Sudani from Nigeria (मल्याळम्) - स्थानिक फुटबॉल क्लबचा मॅनेजर, त्याचं कुटुंब (यात शेजारी, गावकरीही आले) व दुखापत झाल्याने मॅनेजरच्या घरी राहिलेला कृष्णवर्णीय खेळाडू यांची गोष्ट. अतिशय आवडला. फार पैसा हातात येत नसला तरी फुटबॉल प्रेमापायी क्लब चालवणारी मंडळी, त्यांच्या बायकांचे गहाण पडणारे दागिने, सगळीकडे पळापळ करून संघाची धुरा वाहणारा - लग्न होत नसलेला मॅनेजर, मुलाने सावत्र बाप न स्वीकारल्याने व्यथित आई, नळाखाली पाय धुताना वाया जाणाऱ्या पाण्यामुळे अस्वस्थ झालेला खेळाडू, त्याचा हरवलेला पासपोर्ट... असं बरंच काय काय आहे
राजा राणी (तेलुगू) - अजिबात आवडला नाही. आपापल्या प्रेमिकांशी ताटातूट/ प्रेमभंग झाल्याने नाईलाज म्हणून लग्न केलेल्या जोडप्याची कथा.
श्रीनिवास कल्याणम् (तेलुगू) - बडजात्या टाइप. गोड गोड. कुटुंबसंस्थागुणगान. वैताग आला.
To Let (तमिळ) - नावात आहे त्याप्रमाणे भाड्याचे घर शोधणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट. तसा ठीक आहे पण या विषयावर बरेच व्हिडिओ आहेत युट्यूबवर.
अजूनही काही पाहिले. वेळ झाल्यावर टंकते
दाली : एक सेल्फी आरपार
हा ए. आय वापरून केलेला दाली. एकंदर प्रकरण काहीसे भीतीदायक, काहीसे मजेशीर. (ऑर गंमतीशीर)
चेर्नोबिल
कुणी 'चेर्नोबिल' पाहतंय का? इंटरेस्टिंग असावी.
नाही, पण...
पण कास्ट सिलेक्षन मूळ व्यक्तिबरहुकूम किती अचूक आहे ह्याबाबतचे लेख वाचले बरेच. उत्सुकता आहे.
रेडिटच्या कृपेने
The creative path of screenwriter and director Craig Mazin.
पाहिली आणि खूप आवडली.
पाहिली आणि खूप आवडली.
या सिरियलबद्द्ल हा लेख वाचनीय वाटला. सिरियलमध्ये स्युडो-सायंस आहे असा दावा हा लेख करतो
https://www.forbes.com/sites/michaelshellenberger/2019/06/06/why-hbos-c…
मराठी बिग बॉस सीझन 2
मागच्या सीझनप्रमाणे याही सीझनला ऐसीकरांनी मराठी बिग बॉसला वाऱ्यावर सोडलेले दिसते. आपल्याला तर मजा येते आहे ब्वॉ. अभिजीत बिचुकले, वीणा जगताप, शिवानी सुर्वे यांच्यामुळे मस्त मनोरंजन होतंय. बिचुकल्यांनी चांगलीच हवा केली आहे. चोर मचाये शोर हा आतापर्यंत आवडलेला टास्क. पुढे पाहू काय होतं. मागच्या सीझनपेक्षा हा जरा बरा आहे.
मी मी
मी पाहतोय. मागच्या सीजन पेक्षा हा खूपच बरा आहे. शिवानी सुर्वे इत्यांदींची भांडणं आणि त्यांचे डायलॉक हे स्क्रीप्टेड नाटाकी डायलॉक हून जास्त रिफाइन्ड वाटतात. सध्या खटला सुरु आहे आणि बिचुकले जज आहे!
बिचुकले , म्हणजे 2019 चा
बिचुकले , म्हणजे 2019 चा पंतप्रधान निवडणारे का ते ? छ.उदयनराजे महाराजही ज्यांना घाबरून असतात तेच का ते ?
हो तेच ते
गेले आठवडाभर पाहता आले नाही. सुदैवाने लोकसत्तेत डेली अपडेट्स येतात. टॉयलेटवर बसून चिंतन करण्याऐवजी लोकसस्ता वाचतो. तिथून बिगबॉसची प्रोग्रेस कळते. शिवाय मराठीतील आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड गाणे कुठले ही लोकोपयोगी बातमीही काल तिथे कळाली
मायबोलीकर बरंच दळतात बिग बॉस
मायबोलीकर बरंच दळतात बिग बॉस आणि इतर मालिकांवर. तुम्हीही दळू शकता.
मांजरेकरांना सुट्टी द्यावी.
बाकी बॉसचा आवाज कुणाचा हे गुप्तच.
२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप.
संदर्भ-
सुरूवात अगदीच बोअर झाली होती.
पहिल्या मॅचेस एकतर्फा झाल्या (इंग्लंड वि. पाक सोडून).
नंतर भेंडी पाऊसच आला. ३-४ मॅचेस वाहून गेल्या. श्रीलंकेला फटका बसला.
मग लोकं म्हणायला लागले की पहिले ४ नंबर फिक्स आहेत. काय बघायचं त्यात?
सध्या
ऑस्ट्रेलिया नंबर वन आहे आणि सेमीफयनलात पोचलेत.
भारतही बहुतेक पोचणार आहे.
भयानक गडबड झाली नाही तर न्यूझीलंडही पोचलेत सेमीफयनलीत.
ह्यानंतर मजा आहे- इंग्लंड स्पर्धेआधी स्वत:ला फेवरिट समजत होते, सध्या लटकले आहेत.
बांगलादेश, श्रीलंका त्यानंतर आहेत- जर उरलेल्या मॅच ते जिंकले तर सेमीत पोचतील.
पाकिस्तान- बेक्क्क्कार (म्हणजे खूप भारी) खेळलेत शेवटल्या मॅचमधे. बघू काय करतात!
साउथ अफ्रिका,वेष्टैंडीज आणि अफगाण - टाटा बायबाय. परतीची तिकिटं काढलीत.
पुढले सामने जुलै ६ पर्यंत जाम इंट्रेश्टिंग होणारेत. बघा. (१०$ उसगावात महिन्याभरासाठी भरून स्लिंगवर दिसतात मॅचेस)
अलजझीरा चानेल/ विटनेस/अपोलो
अलजझीरा चानेल/ विटनेस/अपोलो ओफ गाझा
एक तास डॉक्यु. गाझा समुद्रात सापडलेला अपोलोचा मोठा ब्रान्झ पुतळा.(२०१३) . नंतर गायब होतो.
द टर्मिनल - कुवेती मालिका
नेटफ्लिक्सवर 'द टर्मिनल' नावाची कुवेती मालिका आहे. बऱ्या अर्ध्यानं लावली आणि तिथेच सोफ्यावर लुडकला. दोन भाग बघितल्यावर मला त्यात बराच रस वाटायला लागला. शिवाय मुस्लिम मालिकेत बोडक्या बायका बघून हा देश नक्की कोणता, असाही प्रश्न पडला. कुतूहल चाळवलं ह्या 'शरीर'प्रदर्शन करणाऱ्या बायांमुळे! मालिकेची काही क्षणचित्रं -
१. तुला पाहते रे, अर्थात तुपारेचं कुवेती रूप आहे. एक पुरुष, त्याच्या दोन बायका. ह्याला पुराणातल्या कहाण्याही म्हणता येईल. पाटमाधवराणी (पामारा) आवडती, ती धाकली. चिमादेवराणी (चिदेरा) नावडती, ती थोरली.
२. पहिली नावडती झाली कारण तिला मूकबधीर मुलगा झाला. बाकीच्या मुली.
३. पामारा लोभी. चिदेरा आहे त्यात सुख मानणारी.
४. चिदेराची मुलं बहुतेकशी बरी वागणारी, पण एक मुलगी कर्कश खवचट. पामराच्या एकाही अपत्याची जीभ तिखट नाही, म्हणून पामाराच बालिश आणि तिखट बडबड करते. तिची सगळी मुलं निकम्मी, निठल्ली, पण एक मुलगी प्रेमळ.
५. बापाला सतत भयगंड, आपल्या मुलींशी लोक पैशांसाठी लग्न करत आहेत. चिदेराच्या मुलींचं काही का होईना, त्याला शष्प फरक पडत नाही.
६. चिदेराची एक मुलगी आपल्या सख्ख्या मावसभावाच्या एकतर्फी प्रेमात.
७. तो मावसभाऊ पक्का देशस्थ. मनानं चांगलाच असायला पाहिजे, चिदेराच्या घरी राहतोय ना! पण अमेरिकेत शिकायला गेला तेव्हा तिथे त्याला पोटापाण्यासाठी भांडी घासावी लागली, म्हणजे किती अपमान झाला त्याचा!
८. भाच्याचे आई-वडील अत्यंत लोभी. दोघांनी दुसरी लग्नं केलेली! (हो, कुवेती मालिकेत बाया-पुरुषांनी सर्रास बरीच लग्नं केलेली.) दोघांनी पोराचे स्कॉलरशिपचे अमेरिकेतले पैसे हडपलेले. पोरालाही श्रीमंती म्हणजे सगळं काही असं वाटतंय.
९. सख्ख्या मावसबहिणीच्या प्रेमाकडे बघण्याजागी त्याचा जीव उथळ, श्रीमंत मुलीत अडकलेला. तिच्यासाठी तो ऋणं कृत्वा घृतं पिबेत करतोय. 'घृतं पिबेत' ह्याचा अश्लील अर्थ काढणाऱ्यांच्या **चा घो!
१०. शिवाय एक डॉक्टर बाई, काही कारणानं आपल्या गावंढळ, रासवट आणि philistine चुलतभावाशी लग्न करून बसल्ये. तिच्या आईवडलांनीच तिला असं करायला भाग पाडलंय. आता ती हळूहळू नवऱ्याला उलट उत्तरं द्यायला लागली आहे.
११. मालिकेत चिकार बायका, पण केंद्रबिंदू श्रीमंत, म्हातारा, फर्निचरच्या दुकानाचा मालक बाप.
१२. बहुतेकशा बायका चांगल्या खात्यापित्या आकाराच्या; चिक्कार मेकप जनरलात करणाऱ्या; टिपिकल अरबी चेहरे.
१३. जे काही पुरुष आहेत त्यांत एकही नेत्रसुख नाही. किमान त्यांचे चेहरे टिपिकल अरबी वाटत नाहीत. अरबी चेहऱ्याच्या बायांचे नातेवाईक पुरुष भारतीय खपून जातील एवढे सौम्य चेहऱ्यांचे कसे निघाले असतील?
१४. मालिकेत 'टिढीश टिढीश' नाही. आणि साटल्य सापडलं तर पैसे परत!
सध्या तीसापैकी ८ भाग बघून झाल्येत. बघू पुढे काय होतंय.
उगाच
आठवलं म्हणून.
मिसेस मेझल?
इथे कोणी 'अॅमेझॉन प्राईम'वरचं 'मार्व्हलस मिसेस मेझल' बघताय का? काहीकिंचित चीझीपणा वगळता तुफान विनोदी मालिका आहे. चीझीपणाही अधूनमधून विनोदासाठी वापरला आहे.
मिसेस मेझल आवडलीच आहे फार.
मिसेस मेझल आवडलीच आहे फार. मिज मेझल, सुझी मायर्सन आणि एब वाईसमन ही तीन पात्रं विशेष आवडली. मंकपासून टोनी शलूबचा अभिनय आवडत होताच.
खटकेदार संवाद आणि ज्युईश ऑर्थोडाॅक्सपणापासून ते पुरुषप्रधानतेपर्यंत आणि संस्कृतीरक्षणाच्या दुटप्पीपणापासून ते चायनीज उद्योगापर्यंत प्रत्येक गोष्टीवरच्या टपल्या मस्त आहेत.
असुरन (Asuran)
धनुष आणि वेत्रीमारनचा आणखी एक खिळवून ठेवणारा तमिळ सिनेमा. गावातील उच्चवर्णीय जमीनदार आणि नीचवर्णीय अल्पभूधारक शेतकरी यांच्यातला संघर्ष. मेलोड्रामा साजेसा आहे.
संक्षेपात - स्वतःच्या अल्पवयीन मुलाने उच्चवर्णीय जमीनदाराचा खून केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एका नीचवर्णीय बापाने केलेली धावपळ.
+1
मागच्याच आठवड्यात हा चित्रपट प्राईमवर पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे.
Laal Kaptaan : a hidden gem
आपल्याकडे अनेक फालतू चित्रपटाना पब्लिक डोक्यावर घेतं आणि त्यात हिरेमाणके बाजूलाच राहतात . माझ्या मते सैफ अली खान ची मुख्य भूमिका असलेल्या " नागा साधूचा सूड " अर्थात " लाल कप्तान " हा अगदी " लगान " च्या तोडीस तोड असलेला जबरदस्त मूव्ही आहे .
अठराव्या शतकातील वातावरण आणि ब्रिटिशांविरुद्ध सुरू असलेली बंडाळी यांचे अभूतपूर्व असे चित्रण ह्या सिनेमात आहे . क्लायमॅक्स ला तर सिमेमॉटोग्राफीची कमाल आहे . यमुना तीरावरील किल्ला आणि नदीत होणारी लढाई अप्रतिम टिपली आहे .
माझ्याकडून या सिनेमाला 4.5 *
Available on Amazon Prime
काही आवडलेल्या मालिका
अॅमेझॉन प्राईमवर पाहिलेल्या खालील हिंदी मालिका खूप आवडल्या
1. ब्रीद (Breathe) - एका मध्यमवर्गीय फूटबॉल कोचला त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी करावी लागणारी धावपळ(!) दाखवणारी ही मालिका ब्रेकिंग बॅडच्या तोडीस तोड आहे. आर. माधवनचा हीरो/व्हीलन व्हाटएवर रोल जबरदस्त आहे. इतर कॅरॅक्टर्सही मस्त. श्रीकांत यादव आणि हृषीकेष जोशी यांच्यासारख्या मराठी कलाकारांना टीवी/वेब सीरिजच्या निमित्ताने चांगले रोल मिळत आहेत हा एक छोटा प्लस पॉईंट. सीरीजचा शेवट थोडा उरकल्यासारखा आणि फारच अपेक्षित होता पण एकंदरीत अतिशय मनोरंजक आणि खिळवून ठेवणारी मालिका.
2. फॅमिली मॅन (Family Man) - ब्रीद आणि फॅमिली मॅन यांत जास्त आवडलेली मालिका कुठली, असं विचारलं तर पटकन उत्तर देता येणार नाही. दोन शाळकरी पोरं-बायको असं मध्यमवर्गीय कुटुंब सांभाळत अंडरकवर इटेलिजन्स ऑफिसरचं काम करणाऱ्या हीरोची ही गोष्ट. आयसिस, काश्मीर वगैरे सद्यकालीन/तत्कालीन प्रश्न जोडीला घेऊन झकास डोलारा उभा केला आहे.
3. इनसाईड एज (Inside Edge) - ह्यात आयपीएलच्या तमाशावर चांगले ताशेरे ओढले आहेत. सिनेमातली संपत चाललेली करियर पाहून क्रिकेटच्या ग्लॅमरस दुनियेकडे वळणारे कलाकार, टीम विकत घेऊन स्पॉट फिक्सिंगचे रॅकेट चालवणारे बिझनेसमन/राजकारणी, क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी आयपीएलकडे आशाळभूतपणे पाहणारे खेळाडू, ही फालतूगिरी समजत असूनची चुत्या बनणारे आपण पब्लिक सगळं झकास जमून आलं आहे. अगदी रीयल आयपीएल पाहतो आहोत असं कधीकधी वाटून जातं. उडता पंजाबनंतर हिंदी मालिका/चित्रपटात ड्रग्जचा वारेमाप वापर प्रथमच पाहिला. काही निरर्थक सेक्स दृश्यं वगळली असी तरी चाललं असतं. याचा दुसरा भागही आलाय - तो बराचसा प्रेडिक्टेबल वाटला. पहिल्या भागाची मजा आली नाही.
तिन्ही मालिका एकदम एकदम रेकमेंडेड
द विचर पहिली
मालिका आवडली. हेन्री कॅव्हिलच काम खूप आवडलं. टाइमलाईन कळायला जरा वेळ लागला, पण पुढच्या भाग पाहणार.
प्रताप भानू मेहता
प्रताप भानू मेहता यांची करण थापर यांनी 'वायर'साठी घेतलेली मुलाखत नुकतीच यूट्यूबवर आली आहे -
'Colloquially Speaking, BJP is Fascist. And More Insidious Than Indira's Emergency'
१९१७, पॅरासाइट आणि जोजो रॅबिट
ऑस्करच्या स्पर्धेत असलेले आणि चर्चेत असलेले तीन सिनेमे मुंबई-पुण्याच्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येतील - १९१७, पॅरासाइट आणि जोजो रॅबिट.
१९१७ पाहिला.
१९१७ पाहिला.
शेवटला काही भाग सोडून बाकी सिनेमा खूपच आवडलेला आहे.
बॅकग्राऊंड म्यूझिक + पहिल्या महायुद्धातले खंदक + एकसंध चित्रिकरण हा प्रकार जाम आवडला.
चिं,ज - असं continuous shooting निव्वळ गिमिक वाटलं नाही, त्यामुळे सिनेमा जास्त खरा वाटला.
पण ह्यामागे काय कारणं असतात आणि आणखी कुठले फेमस चित्रपट आहेत का असं केलेले?>
"रुप तेरा मस्ताना" हे गाणं
"रुप तेरा मस्ताना" हे गाणं असं सलग चित्रित केलं आहे.
मोजके
असे काही मोजके सिनेमे आहेत आणि त्यामागे विचार वेगवेगळा असू शकतो (किंवा उगीच गिमिकही असू शकते). त्यांपैकी अधिक गाजलेला म्हणजे हिचकॉकचा रोप. मला विशेष आवडणारे - रशियन आर्क आणि आना अरेबिया.
जाता जाता : १९१७वरची टीका.
हां रशियन आर्क - याच सिनेमाचे
हां रशियन आर्क - याच सिनेमाचे नाव शोधत होते. वेगळाच सरीयल सिनेमा आहे.
पेन अँड ग्लोरी
पेद्रो अल्मोदोव्हार दिग्दर्शित 'पेन अँड ग्लोरी'सुद्धा भारतात निवडक शहरांत प्रदर्शित झाला आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
अपहरण
वेब सीरिजमुळं काही झकास मनोरंजक मालिका बघायला मिळत आहेत. अल्ट बालाजीची अपहरण ही अशीच एक खुर्चीला खिळवून ठेवणारी मालिका. प्रामाणिकपणे काम केल्याने नोकरीतून बडतर्फ झालेल्या आणि तुरुंगाची हवा खाल्लेल्या अपहरण स्पेशालिस्ट इन्स्पेक्टर रुद्र श्रीवास्तववर अक्षरशः भीक मागायची पाळी येते. त्याला एका तरुण मुलीचे अपहरण करण्याची सुपारी त्या मुलीच्या सावत्र आईकडून मिळते. या प्लानमध्ये ती मुलगीही सामील असल्याने - सगळीकडून नाडलेला रुद्र २ कोटींची ही सुपारी घेतो - ही वरवर सरळ वाटणारी अपहरणाची स्टोरी कशी गुंतागुंतीची होत जाते हे प्रत्यक्ष पाहण्यातच मजा आहे.
सगळ्यांचीच कामं जोरदार.. त्यातही रुद्रची बायको रंजना आणि तिच्या फॅक्टरीचा मालक दुबे यांनी अनेक छोट्या प्रसंगांत धमाल उडवली आहे. डोकं बाजूला ठेवून टाईमपास थ्रिलर पाहण्याची आवड असणाऱ्यांची अपेक्षा १००% पूर्ण होईल.
Dance with Song
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील तूर्तास आवडलेली (टॉप) 5 नृत्य-गाणी :
1) नानी गारु - https://youtu.be/y9gUpVWcELU
2) रॉवडी बेबी - https://youtu.be/x6Q7c9RyMzk
3) रामुलू रामुला - https://youtu.be/wFAj0pW6xX0
4) डँग डँग - https://youtu.be/w9EIM1mxQx4
5) सिंगिलू सिंगिलू - https://youtu.be/Ab4nSs3zRLs
रावडी बेबी
रावडी बेबी हे गाणं खूप दिवसांपासून ऐकतोय/पाहतोय. साई पल्लवी हिने जोरदार डान्स केलाय.
अवांतर
या गाण्यानं पाहणे वा उतरवून घेणे याबाबतीत 10 कोटींचा टप्पा अवघ्या दोन आठवड्यांतच गाठला होता.
अतिअवांतर :
नुकताच फोर्ब्स इंडिया च्या 30 under 30 च्या (करमणूक विभाग) यादीत साई पल्लवी चा समावेश झाला आहे.
नाव?
मी अजून हे गाणं बघितलेलं, ऐकलेलं नाही. पण साई पल्लवी असं नाव असणाऱ्या बाईनं जोरदार नाच केला आहे, म्हणल्यावर अजूनही गंमत वाटत्ये. डोक्यात अवघ्या धार्मिकतेचा हलकल्लोळ उडाला आहे.
.
त्यांचे नाव तसे आहे हा त्यांचा दोष नसून त्यांच्या आईबापांचा आहे, एवढेच निदर्शनास आणून देऊन खाली बसतो. (परंपरेस अनुसरून, त्यांना त्या मॅटरमध्ये काही से असेल, असे वाटत नाही.)
मीही नाही. किंबहुना, बघण्याची शक्यताही नाही. वर्णनावरून, हा काहीतरी तरुणाईला आवडू शकणारा प्रकार असून, आपल्याला झेपण्यासारखा नसावा, असा (कदाचित उगाचच) ग्रह होत आहे. (नाही, डोंट गेट मी राँग. कोठलीही बाई (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठलाही पुरुषसुद्धा) कशीही/कसाही (नागडी/नागडा अथवा संपूर्ण देह झाकणारा पोषाख घालून अथवा अधल्यामधल्या कोठल्याही स्टेजमध्ये) नाचली/नाचला, तरी मला त्याबद्दल काहीही आक्षेप नाही, आक्षेप असण्याचे कारणही नाही. फक्त, माझे वय झाले (पन्नाशी कधीच ओलांडून साठीच्या दिशेने मजल-दरमजल चालू आहे), याची ही प्रांजळ कबुली आहे, इतकेच. तरुणाईने आनंद खुशाल नि मनमुरादपणे लुटावा - तशीही त्यांना आमच्या संमतीची गरज नाहीच - आणि असूही नये. फक्त, इदं न मम, एवढेच वस्तुस्थितिदर्शक असे हे विधान आहे, इतकेच. बाकी असो.)
दोष कसला आणि कशासाठी?
दोष कसला आणि कशासाठी?
मला गंमत वाटली. माझंही नाव तसं मध्यमवर्गीय छापाचं वगैरे आहे. त्यामुळे माझ्या नावाची व्यक्ती ममवेतर उद्योग करून उजेडात आली तर मला गंमत वाटेल. तसंच हे.
(उलटपक्षी, का कोण जाणे, व्हेरॉनिका नावाची बाई गणितात पीएचडी केलेली आणि तिच्या क्षेत्रात आघाडीची गीक-संशोधक म्हणून प्रसिद्ध असेल तरीही मला गंमत वाटेल. व्हेरॉनिका हे नाव मला फारच ग्लॅमरस वाटतं. त्याजागी अदिती, मरियम, किंवा जेनी अशी कुठलीही नावं दिसली तरी आश्चर्य वाटणार नाही.)
साई आणि सत्य साई
साई शब्दात जादूच अशी आहे की तिथे हलकल्लोळच काय ‛अर्थ’कल्लोळही होणार.
त्यातही मजेशीर बाब म्हणजे असं म्हटलं जातं की साई पल्लवीचे कुटुंब सत्य साई बाबांच्या भक्तगणातले आहे. आणि सत्य साई बाबांच्या का त्यांच्या आईच्या नावावरूनच तिचं नाव साई असं ठेवलं गेलं आहे. म्हणजे योगही बघा कसा योगायोगाने जुळवून आणला आहे.
आणि बाई म्हणूनी का तिला मोठी करता? जशी दिसते तशीच राहुद्या की...
बाकी त्या साई नावातच काहीतरी प्रॉब्लेम असावा.
आता बघितलं.
ती खरंच चांगली नर्तिका आहे, आणि प्रचंड फिट असणार.
वाह!
रावडी बेबी बेष्ट आहे गाणं!
सीटी मार
रावडी बेबी आवडलं असेल तर अल्लू अर्जूनचे सीटी मार हे गाणेही पाहा. मस्त आहे (https://youtu.be/F5X694sak5U)
रावडी बेबीतल्या साई पल्लवी हिचा फिदा नावाचा एक तेलुगू चित्रपट आहे. त्याची हिंदी आवृत्ती युट्यूबवर आहे. एकदम झकास काम.
स्टेप्स
यातली 3.39 ते 3.54 दरम्यानच्या स्टेप्स आवडल्या. हे असलं पहिल्यांदाच पाहिलं.
मस्तं !
मस्तं !
पण रावडी बेबीचा डान्स जास्त आवडला. प्रभू देवाने बसवलेला असेल म्हणून असेल मेबी. धनुशपण बेश्ट नाचतो,
अवाण्तर: साई पल्लवी डाक्टर आहे! जॉर्जिया का कुठुन तरी!
हे पण भारी आहे
लिग्गी- ritviz काय एनेर्जेटिक काम आहे !
हे पण भारी आहे
लिग्गी- ritviz काय एनेर्जेटिक काम आहे !
मस्तच
एकाचवेळी उच्छृंंखल, उत्स्फूर्त, अवखळ आणि घटनेला साजेसा असा भावाविष्कार! प्रसंग इतका भारी चितरलाय की तो बघण्याच्या नादात (आयेजा अन् ले-जायेजा-व्यतिरिक्त) घंटा गाणं काही कळून येत नाही.
बोजॅक हॉर्समन
बोजॅकचे अंतिम पर्व पहिले. आतापर्यंत पाहिलेल्या कुठल्याही मालिकेपेक्षा बोजॅक सोबत भावनिक बंध जास्त तयार झाला. सगळ्या पत्रांमध्ये आपला अंश सापडत गेला मला.पहिल्या एपिसोडमध्ये अतिशय बाष्कळ आणि बकवास वाटणारी हि मालिका अतिशय जास्त आवडून गेली.
बोजॅक मधील गाणी-
Take me down easy
Horse with no name
Back in the 90's
Sea of dreams
Judah's song
Impossible
Mr.blue
यातील "take me down easy, horse with no name, Mr. Blue, impossible" अगदी सुदंर आणि न चुकवण्यासारखी गाणी आहेत.
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने…
नवी कॉमेंट. स्क्रीप्टने लिहील्येय. -- 20250116___142754