आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवं ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच. अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाही, तर पिण्याबद्दलही आहे.
=====================================================================
मागच्या धाग्यावर वैचित्र्यपूर्ण पदार्थांबद्दल चर्चा झाली. त्यासाठी हा नवीन धागा. तुम्ही स्वतः बनवून खाल्लेले किंवा कुठेही मिळणारे पदार्थ इथे नमूद करुया.
=====================================================================
(No subject)
.
हेच ते रेस्तराँ .... मनोबा व ब्याट्या गेले होते ते. खाणं झक्कास होतं म्हणे.
.
.
जळवा अजून
जळवा अजून
याना सिझलर्स अँड वोक
आज लंच ला "याना सिझलर्स अँड वोक" ला , जवळ जवळ पाच सात वर्षांनी गेलो . ( पूर्वी झामु ज आणि टूशे {द प्लेस} पुढे हे फार कमी वाटले होते )
भरपूर पाऊस असून हि भरपूर गर्दी होती.
सूप . फिश न चिप्स , कटलेट, चिकन सॉसेजेस सिझलर बारबे क्यू सॉस , जुलिएन चिकन हनी जिंजर सॉस ऑर्डर करण्यात आले .
सूप ( Manchow ) बरे होते , कटलेट ठीक ठीक , फिश न चिप्स बेचव . चिकन सॉसेजेस सिझलर वरील बारबे क्यू सॉस अजिबात जमले नव्हते . जुलिएन चिकन हनी जिंजर सॉस सिझलर हा च फक्त बरा होता . येथील अजून एक अडचण /विशेष म्हणजे सिझलर मध्ये फक्त राईस/नूडल्स चा चॉईस असतो . मॅश्ड पटॅटॊ अनुपस्थित .
इरीटंट म्हणजे अक्कल नसलेला सर्विस स्टाफ . सूप सर्व्ह केल्यानंतर एक मिनिटाच्या आत स्टार्टर्स व एक मेन कोर्स घेऊन आले . सूप झाल्यावर आणा सांगितल्यावर "फिर ठंडा हो जायेगा शाब "असे उत्तर आल्यावर आवाज लावायला लागला .
शिवाय सिझलर्स महाग आहेत इतर ठिकाणांपेक्षा ( त्यालाही हरकत नाही , पण सुमार दर्जा , वाईट सर्विस आणि जास्त किंमत हे बरोबर नाही असे वाटले )
आता पुन्हा पाच सात वर्षे तरी जाणार नाही परत तिथे .
सिझलर्स खायला झामू ज च ( किंवा द प्लेस , अर्थात तिथेही पार्किंग अडचणीमुळे गेलो नाही काही वर्षात ) भारी हे पुन्हा एकदा जाणवले
प्रचंड गर्दी होती तिथे . यावरून अशी शक्यता वाटते कि आम्हाला मिळालेले कमी दर्जा /चव/ सर्विस असलेले फूड हे एखाद्यावेळी वन ऑफ वाईट अनुभव असेल , किंवा लोकांना चांगली चव/दर्जा हि माहितच नसावी त्यामुळे त्यांच्या अपेक्षा खाली आल्या असाव्यात ( किंवा मी म्हातारा झालो असावो :)
हायला आश्चर्य आहे. ललित महाल
हायला आश्चर्य आहे. ललित महाल चौकातल्या यानामध्ये बऱ्याचदा आवर्जून जाणं झालं आहे. (आयकर भवन ते भूतपूर्व हपीस या रस्त्यावर असल्याने.)
मला वाटतं हा गर्दी इफेक्ट असावा. दोन मजल्यावर असलेली गच्च भरलेली टेबलं आणि सिझलर्ससारखा वेळखाऊ पदार्थ यामुळे काही कोपरेकर्तन केलं असण्याची शक्यता आहे. (कारण बार्बेक्यू सॉसमध्ये चुकवण्यासारखं काय आहे?)
आता सात वर्षांनी परत गेलात आणि गर्दी असेल तर वोक घेऊन पहा. त्यात जवळजवळ सगळंच आपण कंट्रोल करत असल्याने चुकायला वाव कमी आहे.
+++कारण बार्बेक्यू सॉसमध्ये
+++कारण बार्बेक्यू सॉसमध्ये चुकवण्यासारखं काय आहे?+++
हा ना राव , सगळंच गंडलं होतं काल तिथे . एकदा मूळ गोष्ट खराब निघाली कि इतर काड्या येतात त्याप्रमाणे , मी उगाचच बंद एशी दाखवून त्याला तुम्ही १८% GST का लावताय विचारलं, तर म्हणाला तुम्हाला कमी लावू .
अन त्यात मनोबा आणि बॅट्या नि जळवलं जर्दाळू कोंबडी आणि शेवगावांग आणि काय काय खाल्लेलं सांगून .( वर बिल विदाउट GST .)
आता बॅट्या म्हणतो त्याप्रमाणे तुमचं ते सून मोई शोधायला पाहिजे .
याना खरूखरच बोअर आहे.
याना खरूखरच बोअर आहे.
सिझलर्स अनेक ठिकाणी
सिझलर्स अनेक ठिकाणी पुनःपुन्हा खाऊन (विविध "योको" आणि इतरत्र) असं मत झालं की आपल्या आवडीत हे बसत नाहीये.. कारण जळल्यामुळे वेस्टेज खूप. प्रत्यक्ष खाणेबल टेस्टी भाग कमी अन फ्राईज, कोबी वगैरे भरताड जास्त.
त्यापेक्षा उंधियो देणारी हॉटेल्स का निघत नाहीत? बहुतांश भाग खाणेबल..
फक्त भारतात खाल्लेले आहे पण
फक्त भारतात खाल्लेले आहे पण सिझलर खूप आवडल्याने स्मरते.
सिझलर
फारा वर्षांपूर्वी, खैबर मध्ये, चांगले सिझलर खाल्ल्याचे आठवते.
हापिस-स्पेशल खादाडीवरून आठवलं
हापिस-स्पेशल खादाडीवरून आठवलं: एकेकाळी माझं हपीस बोटक्लब रोडवर होतं. तिथे 'सुन मोई' नावाचं चिनी रेस्टॉरंट आहे. त्या हपिसातले आम्ही मित्र अजूनही नियमित तिथे जातो.
तिथे "फू याँग" नावाचा ऑम्लेटसदृश प्रकार फार भारी मिळतो. जनरल चिनी हाटेलांच्या मानाने पदार्थांची मोठी रेंज आहे. ऑथेंटिक पदार्थांबरोबर इंडोचायनीज पदार्थही मिळतात, त्यामुळे चिनी हाटेलांत जाऊन ट्रिपल शेजवान रैस मागवणाऱ्या पब्लिकचीही सोय होते.
हाटेलाचा अँबियन्स वर्षानुवर्षं तसाच आहे - पडद्यामागून कधीही ब्रूस ली येईल असं वाटतं. बोटक्लब रोडवर माझ्या आठवणीप्रमाणे चिक्कार पार्किंग स्पेस आहे.
मोलाची माहिती, अनेक धन्यवाद.
मोलाची माहिती, अनेक धन्यवाद. अता इकडे जाणे आले.
(ब्रूसली आणि क्षयझ-ली जोक्सचा डायहार्ड फॅन) बॅटमॅन.
फू याँग , chinese room ला
फू याँग , chinese room ला पण मस्त मिळतो
अमेरीकेचं फु याॅंग अनेकदा
अमेरीकेचं फु याॅंग अनेकदा खाल्लेले आहे. ओके वाटले. नवऱ्याला आवडते.
मुंबैतल्या सांगा की ओ जागा...
मुंबैतल्या सांगा की ओ जागा... पुण्याला कस काय यायचं... फक्त सिझलर्स खायला
खायचे पान घालून लाडू केले होते .. चांगले लागतात .
सुन्दर दिसतायेत
सुन्दर दिसतायेत
मध्ये गुल्कंद का?
माझ्या मैत्रिणीने मोदक केलेले असे.मस्त लागतात.
धन्यवाद गौराक्का आणि बॅटमॅन
धन्यवाद गौराक्का आणि बॅटमॅन ..हो ..मध्ये गुलकंद आणि ड्राय फ्रुटस ..
फोटो आता दिसत नाहीत पण गुलकंद
फोटो आता दिसत नाहीत पण गुलकंद व ड्राय फ्रुटस घालून केलेले मोदक ऐकुनच वारले.
एक नंबर दिसतायत लाडू. खीरकादम
एक नंबर दिसतायत लाडू. खीरकादम नामक बंगाली पदार्थाची आठवण झाली लाडवाचे आवरण पाहून. तिथेही असेच, बाहेर हिरवे आत पांढरे असे कायतरी होते.
इश्श, खिर कदम हिरवा कुठे
इश्श, खिर कदम हिरवा कुठे खाल्लेलात तुम्ही...
बाहेर पांढरंच असतं , मावा असतो, आत रस्गुल्ला, बाहेरुन किसून भाजलेल्या पनीर किंवा किसलेल्या माव्यात घोळवतात ते.
हे लाडू सुक्या खोबऱ्यात घोळवलेले आहेत.
असा फोटो बघितल्याचे आठवते, मी
असा फोटो बघितल्याचे आठवते, मी चुकतही असेन.
जर्मन शिकताहात काय? ich वगैरे दिसतंय म्हणून विचारलं.
चांगलं ठणठणीत मराठी कळेना होय
चांगलं ठणठणीत मराठी कळेना होय तुम्हाला...
तुम्ही मुंबई ला या, आम्च्या स्विट बंगालचे खिरकदम मस्त असतात
भंगार मालगुडी टिफिन्स शुद्ध शाकाहारी
५०० मीटर च्या रुल चा बळी का काय माहित नाही पण करिष्मा चौकातील फोर सीझन्स बंद पडून त्याजागी २-४ दिवसांपूर्वी मालगुडी टिफिन्स नामे उडुपी सर्व्ह इट ऑल( शुद्ध शाकाहारी ) चालू झालंय . म्हणजे मालगुडी चा संबंध फक्त काही ब्रेकफास्ट आयटम पुरता बाकी त्यांना सुचेल ते सर्व . ( अभिषेक व्हेज ची यशस्वी टेम्प्लेट )
काल गेलो होतो . नजीकच्या भविष्यकाळात पुन्हा जाणार नाही . कारण अनलाइक एनी उडुपी जॉईंट , एकदम भंगार आणि स्लो सर्विस . गेल्यानंतर १५ मिनिटांनी मेन्यू कार्ड आले . नंतर काही काळ कोणीच आले नाही . मग कॉउंटर वरच्या इसमाला बोलावले तेव्हा काहीतरी हालचाल चालू झाली .
नवीन उडुपी जॉईंट असल्याने इतर काही धैर्य न करता आपले डोसा उत्तप्पा वगैरे मागवले . उत्तप्पा चांगला होता पण इतका वाईट डोसा बऱ्याच दिवसांनी खाल्ला . ( डोश्याच्या भाजीत काजू बेदाणे का घालतात ?)
किमती आजूबाजूच्या किमया , शीतल वगैरे ला झोपवणाऱ्या आहेत . ( कॉफी रुपये २० , पण इतकी वाईट होती , कि फुकट दिली तरी वगैरे ) पण अशी क्वालिटी आणि सर्विस असेल तर त्या इतरांना मरण नाही .
मॉडर्न कॅफे च्या गुंडू शेट्टींचे कुंकू मेनू कार्ड च्या पहिल्या पानावर आहे . पण तरीही बेकार आहे . सध्या तरी जाऊ नये .
राज डायनिंग हॉल
ठाण्यात कोर्ट नाका/टेंभी नाका/जांभळी नाका (तिन्हीपासून जवळ) परिसरात उघडलेल्या राज डायनिंग हॉलमध्ये जाणं झालं. उत्तम जेवण.
भगवती शाळेच्या मैदानाजवळचं पोळी भाजी केंद्र कम स्नॅक्स सेंटर ज्यांचं आहे, त्यांनीच हे नवीन चालू केलंय. (तिथल्या अप्रतिम चिरोट्यांबद्दल इथेच कोणीतरी कधीतरी लिहिलं होतं बहुतेक)
१४० रुपयात मर्यादित थाळी. त्यात ३ भाज्या, ३ चपात्या, वाटीभर भात, वाटीभर आमटी, थोडी कोशिंबीर, ताक, थोडं तळण (काल मिरगुंड आणि पिटुकला बटाटा वडा होता), आणि एखादा गोड पदार्थ.
या व्यतिरिक्त बाकी मिसळ, ब्रेड रोल, बटाट्याचा कीस, खिचडी इत्यादी पदार्थही तिथे मिळतातच.
उत्कृष्ट चवीचं महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण बाहेर जाऊन खायचं असेल तर must try ठिकाण.
बॅरोमीटर , अर्थात केपी आले कोथरुडा
आज लंच बॅरोमीटर येथे , सिटीप्राईड कोथरूड च्या लेन मध्ये शेवटी
नुकतेच म्हणजे २८ किंवा २९ तारखेला चालू झाले आहे म्हणे .
घरापासून चालत अंतरावर .
फुल बार , मोठा मेन्यू ,मुख्यतः कॉंटिनेंटल , थाई/कोरियन , मर्यादित नॉर्थ इंडिअन .
अँबियांस : भरपूर प्रकाश पण डार्क भिंती. उंच सीलिंग . एका भिंतीवर चॅप्लिन साहेब चालू आहेत , ऐसपैस सीटिंग . ब्लूईझी जॅझ चालू *. हवा संपूर्ण कोरेगाव पार्कि किंवा बालेवाडी हाय स्ट्रीटी.
सर्विस : ग्राहकाभिमुख ** , उत्तम .
अत्यंत इंटरेस्टिंग ग्राहकवर्ग . ***
( काल रात्री पावणेदोन तास वेटिंग होते असे ऐकले )
ट्रफल मश्रुम चिकन , पेने पोलो अराबियाटा , स्फगेटी अग्लीओ ओलीओ आणि दा पॅन जी घेतले
ट्रफल मश्रुम चिकन अति उत्तम , पेने पोलो अराबियाटा स्टॅंडर्ड चांगले , सेम विथ स्फगेटी आणि दा पॅन जीअतिशय जाळ पण अत्यंत चविष्ट .
मेन्यू कार्ड ची उजवी बाजू पण कोथरूड पेक्षा केपी मध्ये जास्त शोभते . ( तरीही पूर्णपणे जस्टिफाईड )
पुन्हा नक्की जाण्यात येणार आहे .
बॅट्या , आबा , चिं ज , नील लोमस . जाऊन येणे करावे .
मालक मंडळी कुणी पेंडसे,चिरगुटकर ?/ शिरगुटकर ? आणि म्हणे पुण्याचे सुप्रसिद्ध प्रायोगिक मोहित टाकळकर, आणि कोण दोन मंडळी ( नावे कळली नाहीत )
'न 'बा टीपा
* ब्लूईझी जॅझ पुण्यात रेस्टोरंटस मध्ये ऐकायला मिळत नाही . इथे होता . दिल खुश . आर्टिस्ट कोण विचारल्यावर ओशाळून "ते सगळं मोहित सर बघतात "असे उत्तर मिळाले .
** ग्राहकाभिमुख : बॅकग्राऊंड: पुण्याच्या पश्चिम भागात असलेल्या कॉंटिनेंटल /इटालियन/फ़्रेंच ठिकाणी मालक मंडळी मराठी असली तरी मराठी व्यवहार डाऊनमार्केट समजलं जात असाव असे वाटते . आणि अतिशय नाक वर अर्थात आगाऊ सर्विस देतात असा अनुभव . उदा : ल प्रसिर ( महाडिक ? ) , ल पतित ( रोडे ?) .
पण इथे तसे नाही , इंग्रजी आणि मराठी दोन्हीतून जे काही सर्व्ह होत आहे आहोत त्याबद्दल माहिती असलेले सर्व्हर्स मजा वाढवतात .
शेफ : कुणी जतीन .. दर टेबलावर जाऊन अभिप्राय मागत होते , मराठी/इंग्रजीतून हे आणखी सुखद अमराठी होते . ( चिकन बारबे क्यू ऑर्डर केले होते . मिळू शकणार नव्हते हे स्वतः शेफ दिलगिरी व्यक्त करत सांगून गेले हे चांगले वाटले )
*** इंटरेस्टिंग ग्राहकवर्ग : द युज्वल सस्पेक्टस बरोबरच ६०-६५ च्या पुढचे म म व हि चापत होते . ( शेजारच्या टेबलावरचे डायलॉग भारी होते : (७०+आजोबा ग्राहक टू सर्व्हर : विल यु बी गिविंग फिंगर 'बाउल' ?. बिल दिल्यावर :अगं ते बिल ठेव . काय खाल्ल ते सांगता येईल .
उगाचच अवांतर : इथे पाणी फक्त बिसलेरिच मिळते .साधे फिल्टर पाणी उपलब्ध नाही . बिलात वेगळे लावत नाहीत .
"संक्रमणावस्थेतील म म व "या विषयावर आबा किंवा जंतू यांनी काहीतरी लिहावे अशी विनंती . काही न सुचल्यास इथे येऊन बसावे . सुचायला वेळ लागणार नाही .
अदिती : या पुढे कोथरुडात साधी पाणीपुरीही चांगली मिळत नाही हि तक्रार बदलावी . हे कोथरुडातील साधारण पाचवे फ्रेंच रेस्टोरंट असावे .
आयला भारीच! मराठीतून उत्तम
आयला भारीच! मराठीतून उत्तम सर्विस हा सर्वांत मोठा प्लस पॉईंट दिसतोय.
अनेक आभार!
अनेक आभार!
केपी आले कोथरुडा । सर्व्हण्या ममवाचा बुडबुडा ।।
आतली सजावट
रेस्तराँची आतील सजावट (इन्टिरीअर डिजाइन) कसे आहे? माझ्या चड्डी मित्राने ते केले आहे म्हणून चौकशी
अंतर्गत सजावट टिपिकल कोथरुडी
अंतर्गत सजावट टिपिकल कोथरुडी रेस्टोरंट्स पेक्षा खूप वेगळी आहे . कोणी केली आहे ?
अंतर्गत सजावट
सत्यजीत पटवर्धन आणि पश्मिन शहा
सत्यजित पटवर्धन
बापजन्म नावाचा नवीन सिनेमा येत आहे. त्यात सचिन खेडेकरांच्या मुलाची भुमिका केली आहे तो हाच सत्यजित पटवर्धन.
ठाण्याची पाणीपुरीच थोर असते.
कोथ्रूडात कोण जाणार१ पाणीपुरीसाठी! मी राहायचे आधी बाणेर आणि नंतर खडकी भागात. पाणीपुरी खायला मी ठाण्याला जायचे, भावाला वाटायचं मी त्याच्यावरच्या प्रेमाखातर येते. पुण्यात स्कूटर चालवण्यापेक्षा ट्रेननं ठाणं गाठणं सोपं. आमच्या राम मारुती रस्त्यावरच्या इव्हनिंग स्पॉटमध्ये एकदा पाणीपुरी खा, आणि मग कोथरुड वगैरेंवर काट मारून टाका.
आणि फ्रेंच अन्न खायचं म्हणून मी सध्या एका फ्रेंचाशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात आहे. मोलाचे डालरां टाकून खाण्यापेक्षा 'तू मला फ्रेंच पदार्थ खायला घाल, मी तुला डोसे करून वाढते', हे मला जमतं२. याच डीलमध्ये शुक्रवारी एक व्हिएतनामी पदार्थ खाल्ला. त्याचं नाव विसरले. दिसायला अगदी तिळगुळासारखा! बघून मी दचकलेच.
गूगलून मिळालेला फोटो पाहा -
![व्हिएतनामी तिळगूळ](http://d1v827hezncazj.cloudfront.net/wp-content/uploads/banh-cam-1.jpg)
बाहेरून तीळ लावले होते. आत किंचित गुळाची गोडी असणारं, मऊसर, मुगडाळीचं सारण होतं. बाकी गोऱ्यांना 'मंग बीन्स' म्हणजे काय ते समजेना. मी डाळींच्या डोशाचं पीठ (पॉटलक/गोपाळकाला होता) घेऊन गेले होते. "कसं ना! यात पण स्प्लिट मंग बीन्स आहेत!" तुझ्याकडे मंग बीन्स, माझ्याकडे मंग बीन्स असं म्हणत आम्ही मानवी भावनांच्या कंगोऱ्यांचं शारीर प्रदर्शन जमलेल्या गर्दीसमोर केलं. (हे गुगलून मिळालेलं ज्ञान.)
१प्रश्न भूतकाळात बदलून घेणे.
२स्वतःचं एक्झॉक्टिकपण वापरून घेता आलं तर किती फायदा होतो, ते काय सांगणार इथे म०म०व० गर्दीत!
अरेरे , आपला गैरसमज झाला .
अरेरे , आपला गैरसमज झाला . कोथरुडच्या पाणीपुरीच्या चांगल्यत्वाचा विषय नाहीये .
शिवाय आपले* सध्या मौनात असलेले मित्र रा रा जंतु ( व त्यांचा अज्ञात शिक्षकवर्ग **) उपलब्ध असताना आपल्याला फ्रेंच शिकण्यासाठी डोश्याची मांडवली करायला लागली हे दुर्दैवी आहे. असो. मूळ मुद्दा असा आहे की आता कोथरुडात फ्रेंच पदार्थ कसे वाईट मिळतात अशी चर्चा ठाणेकरांनी सुरू करावी . पाणीपुरी इज सो ठाणे वगैरे .बाकी आपल्यास खडकी भागात राहावे लागले ही माहिती रोचक आहे . अवांतर फॉर आबा वगैरे : कर्वेनगर भागात अप्पा ( डेक्कन माज खिचडी काकडी फेम ) चालू होतं आहे .
*हे आदरार्थी एकवचन समजावे
**शिक्षकवर्ग हा शब्द लिंग निरपेक्ष समजावा . याच शब्दात अज्ञात शिक्षिका पण गृहीत धरल्या आहेत .
अति अवांतर : बाकी व्हिएतनामी तिळगुळाचे लाडू इंटरेस्टिंग आहेत
बाकी आपल्यास खडकी भागात
+१
माल्किणबैंनी 'खडकी-दापोडी' वगैरे वाक्प्रचार ऐकले असतीलच म्हणा!
अवांतर
दुरुस्ती : सध्या विद्यार्थीवर्गाशी मिळूनमिसळून वागण्यात आणि घसा खरवडून त्यांच्यावर ओरडण्यात मग्न आहे. पण आठवण काढल्याबद्दल आभार!
बॅरोमीटर : मोहित टाकळकर दस्तुरखुद्द होता का तिथे तुम्ही गेला असताना? मी अनेकांकडून चांगलं ऐकतोय, पण अद्याप जाणं झालं नाही. दारू + जेवण चांगलं मिळत असेल तर जाईन म्हणतो.
+++मोहित टाकळकर दस्तुरखुद्द
+++मोहित टाकळकर दस्तुरखुद्द होता का तिथे तुम्ही गेला असताना?+++
( स्वगत : सॉल्लिड वट जंतूंचा ) नसावेत . माझा परिचय नाही त्यांच्याशी . ब्लूईझी जॅझ चांगले चालू होते .आर्टिस्ट कोण विचारल्यावर "ते सगळं मोहितसर बघतात . सकाळी असतात बऱ्याच वेळा पण अजून नाहीयेत आले" असे उत्तर मिळाले होते .
मोहितसर आपल्या प्रभावळीतील असल्यास रविवारी दुपारी चांगले ब्लूईझी जॅझ लावल्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स द्या(ल का ?) माझ्यावतीने .
+++ दारू + जेवण चांगलं मिळत असेल तर जाईन म्हणतो.+++
(दारू हा शब्द तुमच्या तोंडी योग्य दिसत नाही )
मद्य मेन्यू मोठ्ठा आहे .( पण पास्टीस नव्हती त्यात.आणि कलिंगड घातलेली मार्टिनी का करतात लोकं ? फोटोत चांगली दिसते म्हणून कि अजून काही ? )
खरा वाटणारा बारटेंडर पण आहे . मी गाडीचालक असल्याने वगैरे जास्त माहिती देऊ शकत नाही .
जेवण : घेतलेले एकमेव ओरिएंटल "दा पॅन जी" ( उच्चार चुका चू भू दे घे ) तिखट पण अतिशय चविष्ट ,
ट्रफल मश्रुम चिकन हि उत्तम . बाकी ठीक .
जरूर जा . फक्त वीकेण्डला जायचे असेल तर एकतर खूप वेळ घेऊन जा किंवा मोहित कार्ड वापरा.
चविष्ट कविता
Eating the Bones - Ellen Bass
The women in my family
strip the succulent
flesh from broiled chicken,
scrape the drumstick clean;
bite off the cartilage chew the gristle,
crush the porous swellings
at the ends of each slender baton.
With strong molars
they split the tibia, sucking out
the dense marrow.
They use up love, they swallow
every dark grain,
so at the end there’s nothing left,
a scant pile of splinters
on the empty white plate.
ऑक्टोपस, स्क्विड, डक, क्रॅब
बाँबे बारबेक्यु ने आमंत्रण दिलेलं भोजन समिक्षेसाठी.
ऑक्टोपस, स्क्विड, क्रॅब हे घालून वोक खाऊन पाहीला...
ऑक्टोपस आणि स्क्विड चांगला लागतो...
आॅक्टोपस व स्क्विड फार रबरी
आॅक्टोपस व स्क्विड फार रबरी वाटतात मला. बटर-गार्लिक बरोबरीचा क्राॅफिश प्रचंड चविष्ट लागतो.
+/./-
ऑक्टोपसच्या रबरीपणाबद्दल आत्यंतिक सहमत आहे. खास करून सुशीमध्ये कच्चा खावा. आहाहा! इतका बेचव आणि जुन्या जमान्यातली स्वस्तिक, करोना किंवा बाटा ब्राण्डची आंगठ्यापासून बेचकी फुटणारा पट्टावाली हवाई चप्पल चावून चावून चघळण्याचे सात्त्विक समाधान देणारा दुसरा पदार्थ त्रिभुवनांत शोधला तरी बहुधा सापडणार नाही.
बाकी, कालामारी म्हणजे स्क्विडच ना? मग त्याची तळलेले भजे आवृत्ती (कंपॅरेटिवली चिवट असली तरीही) इतकीही वाईट वाटत नाही मला. (अर्थात, आवर्जून मागवून खाण्यासारखीही वाटत नाही म्हणा, परंतु त्यामागे 'कारण शेवटी आम्ही भटेच' हेही कारण असू शकेल. चूभूद्याघ्या.)
(अवांतर: चिनी सुपांतून वगैरे तो गिळगिळीत समुद्रप्राणी कोणता असतो? स्कॅलप का? तो मात्र बऱ्यापैकी आवडतो.)
क्रॉफिश बोले तो तो झुरळासारखा दिसणारा प्राणी असतो, तोच ना? खाण्याचा प्रयत्न केला होता पूर्वी. नाही झेपला. बोले तो, झुरळासारखा दिसणारा प्राणी खाण्याचे वावडे म्हणून नव्हे. अॅक्सेस प्रॉब्लेम्स. ते एवढेसे मांस खाण्यासाठी त्या एवढ्या कचऱ्यातून वाट काढून चोखण्याची फाइट मारण्याइतका वर्थ नाही वाटला मला.
(खेकडे, लॉबस्टर वगैरे मंडळींबद्दलही हेच. नॉट वर्थ द फाइट. तरी मागे एकदा पुण्यात 'निसर्ग'मध्ये ('कारण शेवटी आम्ही' इ.इ.) त्यांनी लॉब्स्टर फोडून आणून दिला होता, तो बरा लागला होता. परंतु सहसा त्या वाटेला जात नाही. खेकड्यांलॉब्स्टरांचे सुदैव, दुसरे काय?)
कालामारी
माझ्या शाकाहारी जीभ-मेंदूला कालामारी (च्यामारी! हा न-विनोद खास अस्वलासाठी) न-शाकाहारी वाटलं नाही.
मांस नाही नबा , मसालेदार
मांस नाही नबा , मसालेदार रस्सायुक्त मांस खायला प्रचंड मजा येते. ती समुद्राची खारी चव लागते. समुद्राचा खारा वारा कसा सुगंधी असतो तशी एक प्रकारची चवहि असते. ती बहुधा कवचधारी जलप्राण्यांतच चाखलेली आहे.
वोक
हा खाण्याचा पदार्थ आहे, हे ममव असल्यामुळे माहितच नव्हतं. मला ती नॅचरल रिॲक्शन वाटायची!!!
ठिकाण: हॉटेल मूनलाईट, क्रांती
ठिकाण: हॉटेल मूनलाईट, क्रांती चौक, औरंगाबाद.
पदार्थ: नानकालिया (इंग्रजी स्पेलिंग naan qalia)
बेसिकली नान आणि मटन ग्रेवी. प्लस सुक्काही मागवला, एक नंबर चव. मटन ग्रेवी ठीकठाकच. पण मटन पीस असे मस्त शिजवलेले की क्या बात है. इन्स्टंट जन्नत. नानही एरवीपेक्षा जाड, पिवळसर रंगाचे आणि फुगीर. जरा वेगळा प्रकार.
हॉटेलही अगदी रेपुटेशनला जागणारे. ऑथेंटिक चवीच्या जागांचा कळकटपणा आणि तत्रस्थ अन्नाची क्वालिटी हे एकमेकांच्या समप्रमाणात असतात या नियमात बसणारे अगदी टेक्स्टबुक एग्झांपल. लय मजा आली साला. एक नंबर. औरंगाबादेस गेल्यावर अवश्य ट्राय करणे.
ज.म. रस्त्यावर ममता स्वीट्स
ज.म. रस्त्यावर ममता स्वीट्स नामक ठिकाणी पाणीपुरी खाल्ली. बटाटा घातलेली पा.पु. पुण्यातल्या ठेल्यावर आधी कधी पाहिली नव्हती. पण पापु. उच्च होती.
ममताचा समोसा
अरे सर, ममताचा समोसा खायचा होतात. राजस्थानी पद्धतीचा इतका चांगला समोसा खूप कमी ठिकाणी मिळतो.
धन्यवाद. पुढल्या वेळेला नक्की
धन्यवाद. पुढल्या वेळेला नक्की खाण्यात येईल.
' द टीपसी डकलिंग ' , मौजे कर्वेनगर
' द टीपसी डकलिंग ' , मौजे कर्वेनगर , वारज्याकडे जाणारा रस्ता मिर्च मसालाच्या शेजारी येथे जाणे झाले .
मद्य मेन्यू चांगला आहे . पुण्यातील दोन मायक्रोब्रिवरीजमधील क्राफ्ट बिअर टॅपवर उपलब्ध आहे . चक्क स्टाऊट होती आणि बरी होती .
फूड मेन्यू टिपिकल आणि महाग आहे . ( बटर चिकन नाचोज रु . २४३ फक्त तीन पिसेस वगैरे )
एकदा जायला हरकत नाही अशी जागा . क्राउड मुख्यतः तरुण . पण आतमधे , कोपच्यात कुटुंबांची/म्हाताऱ्याकोताऱ्यांची व्यवस्था केलेली असते , ज्यायोगे बाहेरील तरुण पिढीला कुटुंबांचा त्रास होणार नाही :) :)
( हि जागा मद्यपानाची जागा ' शुभंकरोती अपार्टमेंट ' मध्ये आहे . असो.)
( हि जागा मद्यपानाची जागा '
साधारणतः ऍमस्टरडॅमच्या गांधी रेस्टॉरंटमध्ये फिश पकोडे, चिकन थाळी इत्यादि, तसं.
The tipsy duckling - नाव मस्त
The tipsy duckling - नाव मस्त आहे. परवाच एका 'पर्पल टर्टल' नामे पबमध्ये गेलो होतो, तेही फक्त नाव आवडल्याने.
मस्त
पर्पल टर्टल मस्त.
आपल्याकडे पण अशीच तांबडा कोंबडा, लाल पाल, काळुंद्री साळुंद्री, करडा सरडा अशी नावे ठेवायला पैजेत.
ग्राफिक लोगो करायला पण किति सोपे.
फक्त रंगच का? - मनकवडा
फक्त रंगच का? - मनकवडा नाकतोडा, लुंगासुंगा भुंगा अशीही नावे चालतील.
व्हिज्युअल व्हिज्युअल
खालची लाईन वाचली नै का शुचि प्रतिसादातली?
ग्राफिक लोगो करायला किति सोपे म्हणून.
आता नाकतोडा दाखवता येईल चित्रात पण तो मनकवडा आहे कसे दाखवणार? किंवा लुंगासुंगा भुंगा कसा दाखवणार?
वाचली होती अभ्या. पण तरीही मी
वाचली होती अभ्या. पण तरीही मी म्हणयतेय की, चित्रात प्रकट करु न शकणारी नावेही मस्त की.
अमेरिकी थ्यँक्सगिव्हिंग
आज थ्यँक्सगिव्हिंग हा खास भांडवलशाही, अमेरिकी सण आहे/होता. प्रतिसाद लिहितेसमयी गुरूवार असला तरी ब्ल्याक फ्रायडे नामक चवचालपणा सुरू झाला आहे.
संध्याकाळी शेजारच्या मैत्रिणीच्या आग्रहाला, इमोसनल अत्याचाराला बळी पडून तिच्या आईच्या घरी गेले होते. सात प्रकारचे पाय होते, π नव्हे, गोडधोड पाय. त्यांचा प्रत्येकी एक तुकडा घरी माझ्यासोबत पाठवण्यात आला. सहा लोकांसाठी सात पाय म्हणजे जरा जास्तच होतं; मी एकच बनवला असता. असो. सातापैकी तीन तुकडे, चव घेऊन थेट कचऱ्याच्या डब्यात गेले. साखरेचे पाय कसले खायचे!
इति भांडवलशाही सुफळ संपूर्ण.
होय आज टर्की डिनर माझ्याही
होय आज टर्की डिनर माझ्याही नशीबी होतं. ग्रेव्ही सुपर्ब होती.
लाल भोपळ्याचा पाय फार आवडला. हादडला.
टर्की!!!
टर्की हा सामान्यत: (खाण्यास) नावडता पक्षी असला१, तरी थ्यांक्सगिविंगला ते टर्की+स्टफिंग+ग्रेव्ही अधिक क्र्यानबेरीचे ते सॉस एकादशीला साबूदाण्याची खिचडी अधिक वऱ्याचे तांदूळ+दाण्याची आमटी खाल्ल्याच्या धर्मभावनेने आजतागायत न चुकवता खात आलेलो आहे. का कोण जाणे, पण फक्त याच दिवशी ते खाण्यालायकच नव्हे, परंतु ॲक्च्युअली रुचकर लागते.
वेल, करेक्शन. लागत असे. नॉट धिस टाइम. या खेपेस मजा नाही आली. ईदर धिस कंट्री हॅज़ (फायनली) टोटली गॉन टू द डॉग्ज़२, ऑर आय ॲम ग्रोइंग ओल्ड, ऑर बोथ.
..........
१ त्यापेक्षा कागदाचा लगदा मनोभावे चावून चावून खावा.
२ माझ्या तमाम श्वानपरममित्रांची आगाऊ क्षमायाचना.
आकडा नाही एडका
सगळे पाय गोडाचेच का? अमेरिकनांना ब्रिटिश मेंढपाळांचा पाय माहीत नाही का?
सांपल
दोन वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांत हिलरी पडत होती आणि तात्या जिंकत होता तेव्हा आम्ही एकत्र दारूत दुःख बुडवत होतो. गेल्या वर्षी ती तिच्या दोन्ही मुलांच्या नवीन गाड्या ओवाळत होती, तेव्हा योग्य पद्धतीनं कसं ओवाळायचं हे मी तिला दाखवलं. माझ्यापेक्षा जास्त साड्या तिच्याकडे आहेत, बहुतेक माझ्यापेक्षा जास्त वेळा ती साडी नेसलीही असेल. तिचा जन्म हवाई बेटावर झाला, वर्ण हवाईयन आहे आणि तीन वर्षं हवाईत राहिली म्हणून ती स्वतःला हवाईयन समजते; पण वागणं-बोलणं पक्कं टेक्सन. (मतपेटीतले विचार वगळता.) हवाईतले लोक घरात चपला घालून फिरत नाहीत, आपल्यासारखेच. तिच्या घरी मी गेले की घाबरून चपला काढत नाही.
त्यातही अमेरिकी लोकांची साचेबद्ध टिंगल करायची असेल तर शेजारची मैत्रीण हे उत्तम सांपल आहे. ग्लूटन, लॅक्टोज झेपत नाही (अॅलर्जी निराळी) म्हणायचं; वजन कमी करण्याबद्दल बरंच बोलायचं; भेटवस्तूंची देवाणघेवाण करायला निमित्ताला टेकलेलं असायचं; सण संपला की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या-त्या सणासाठी ज्या काही शोभेच्या वस्तू वापरतात त्यांची स्वस्तात खरेदी करायला जायचं; बरंच काही.
पण टिंगल करायची तर आधी निरीक्षण करावं लागतं. ते जवळून करण्याची संधीही मिळते कारण अगदी शेजारचंच घर; पण फार जवळ गेलं की नातंही तयार होतं. असा माझा गमतीशीर प्रकार आहे. तिच्याबद्दल स्वतंत्र लिहिण्याएवढं मटेरियल कधीतरी माझ्या डोक्यात गोळा होईलच.
(अवांतर)
छ्या:! या वेळच्या ब्लॅक फ्रायडेत दम नव्हता.
असो.
केपी आले कोथरुडा भाग २ . 'लेव्हल ५ बिस्त्रो '
ममव कोथरुडाचा ( खाद्य )रुचीमेकओव्हर गेलं काही वर्षे चालू आहे . गेल्यावर्षी चिटगोपकर , पेंडशे , ( मोहित ) टाकळकर(सर ) वगैरे मंडळींनीही रोकठोक केपी कोथरुडात आणले . काळाच्या ओघात त्याची प्रशिध्दी एवढी वाढली कि संध्याकाळी साडेसातास गेल्यास भोजनासाठी स्थानापन्न होण्यास एकदिड तास लागू लागला. त्या क्रांतीतील हा पुढचा टप्पा .
आज लन्च 'लेव्हल ५ बिस्त्रो '
जागा : मेहेंदळे ग्यारेज समोर , महादेव मंदिराच्या तिरकं समोर आणि बाबूजी फडके भुयारी मार्गापासून ५० मीटरात . या जागी ट्राफिक चा राडा असतो नेहमी पण वॅलेआहे . तवा बिंदास जावा .
डेकॉर युरोपिअन आहे . अत्यंत प्लेझंट ( इथे आल्यावर तुलनेने बॅरोमीटर चे डेकॉर फार क्लटर्ड वाटते ) पण म्युझिक स्पॅनिश .
येथे मेन्यू मुख्यतः कॉंटिनेंटल व काही मेडीटेरेनियन आहे . ( यांनी उगाचच भारतीय आणि ओरिएंटल घेतले नाहीये हे उत्तम. यामुळे मेन्यू इतर हाटेलांपेक्षा छोटा वाटतो पण मोठा आहे )
संबंध कुटुंब गेलो होतो .
खाणेत आलेले जिन्नस खालीलप्रमाणे .
१. पोर्क रागू
२. Caramalized अनियन सूप .
३ सीफूड चावडर
४. स्टफ्ड चिकन Parmigiana
५. चिकन Schnitzel
६. मेझे सेलिब्रेशन
सर्व जिन्नस स्वादिष्ट होते .
एकंदरीत थोडे महाग आहे ( पण चालतंय की )
मद्य मेन्यू खूपच मोठा आणि खूपच इंटरेस्टिंग आहे ( पण दुपार व अधिकृत चालक ही भूमिका असल्याने एका बिअरवर क्षुधाशांती केली )
येथे किमान मद्य आस्वाद घेण्यासाठी का होईना , वारंवार यायला जमले तर आनंद होईल .
मंडळी , सध्या ( नवीन असल्याने बहुधा ) इथे गर्दी फारशी नाहीये, तेव्हा गर्दीच्या बाबतीत याचे बॅरोमीटर व्हायच्या आधी जाऊन आस्वाद घेऊन या .
आधी आहे कलिंगा ... शेट्टी , मग आले के लाउंज ... सेम शेट्टी , त्यात जवळच भर पडली ती ' कलिंगा गुरमे व्हेज' .. सेम शेट्टी बहुधा पुढची पिढी . आणि आता चालू झाले ' लेव्हल ५ बिस्त्रो ' तात्पर्य : शेट्टी रिइन्व्हेंट्स आल्वेज ..
आगामी आकर्षण : केपी आले कोथरुडा भाग ३ . : जोशी म्युझियमच्या गल्लीत बॅरोमीटरचे माजी रा रा पेंडशे यांचे 'ऑब्लिक' नामे रेस्टॉरंट चालू होत आहे उद्या बहुधा . प्रत्यक्ष भेट दिल्यावर मंडळास अहवाल सादर करणेत येईल .
खाद्यपदार्थांचे फटू काढले आहेत . फेसबुकावर ऐसी रसिक नामे आचरटबाबा स्थापित ग्रुपावर आहेत . माननीय टेक्नोसॅव्ही आचरटबाबा गुरुजी कृपया ते फटू इकडे छापणार काय ?
वॉव अगदीच authentic दिसतंय.
वॉव अगदीच authentic दिसतंय. पुर्वी Inox च्या शेजारी Flags नावाचं असंच authentic रेस्टॉरंट होतं ते अता नाही याची खंत गेली म्हणायची.
हे मात्र समजले नाही :
तो पण का हो?
पण म्हणजे भाषा स्पॅनिश असली
पण म्हणजे भाषा स्पॅनिश असली तरी ते म्युझिक जास्त लॅटिनो वाटत होतं , दक्षिण अमेरिकेतील म्हणून हो.
बाकी जाऊन या इथे घनोबा, मस्त आहे
स्पॅनिश असली तरी ते म्युझिक
ओह आय सी.
हो नक्की जाईन :) धन्स्
टाकतोच. तिथल्या जागेचा
टाकतोच. तिथल्या जागेचा मॅपवरचा स्क्रीनशॅाटही घ्या.
---
एकूण वर्णानावरून एक वेगळ धागा पडण्याचा ऐवज आहे.
---
रविवारीय पुणे पुरवणीत एक दोन फोटोसह टाकल्यास 'मोनेटाइज' होईल.
फोटो १
फोटो १ stuffed chicken parmigiana
![](https://scontent.fbom17-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50780470_10219356780056720_6409025704616263680_n.jpg?_nc_cat=107&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent.fbom17-1.fna&oh=c5cae0469ab7b3d04b127a9425ef4072&oe=5CC47841)
फोटो २
![](https://scontent.fbom17-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50160230_10219356779736712_6321159379638812672_n.jpg?_nc_cat=106&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent.fbom17-1.fna&oh=33b03c32de50d6e2f5fd782a7b92b076&oe=5CFF5D2A)
Chicken Schnitzel
फोटो 3
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50620428_10219356780296726_4245258117610209280_n.jpg?_nc_cat=106&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=a03da1eed48556c08177ac620cd96be3&oe=5D0130CE)
पोर्क रागु
फोटो ४)
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50253086_10219356780856740_769284301194788864_n.jpg?_nc_cat=106&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=4ffd98b7120e3116dcb419de331de509&oe=5D00A208)
stuffed chicken parmigiana
फोटो ५)
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50309744_10219356781136747_6912163887638904832_n.jpg?_nc_cat=104&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=9f1b5b1298dbcf97e397258885db5f98&oe=5CBCBCFD)
Mezze सेलिब्रेशन
फोटो ६ )
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50537472_10219356781416754_8085211742138793984_n.jpg?_nc_cat=104&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=9e30d8fd736ecf5e2793114b08616166&oe=5CBA80CB)
caramelized अनियन सूप
फोटो ७)
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50711558_10219356781736762_5231831394199535616_n.jpg?_nc_cat=104&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=2fe6c4c66b8049caa045881c830f5ae6&oe=5CC1ECB7)
caramelized अनियन सूप
फोटो ८ )
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50740864_10219356782016769_80970402796404736_n.jpg?_nc_cat=101&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=a167710cb91e604ca48b7fb2fae71d82&oe=5CC3F3C7)
सिफूड चावडर
फोटो ९)
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50687354_10219356782376778_160047218936512512_n.jpg?_nc_cat=101&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=8b10d8b5d8bf9fe578c0d8b8627b5438&oe=5CCD2194)
चिकन Schnitzel
फोटो १०)
![](https://scontent-bom1-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/50919542_10219356783296801_20298505067167744_n.jpg?_nc_cat=109&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ht=scontent-bom1-1.xx&oh=ac8e12f5db31f5bb32d79ff67d27b5ae&oe=5CC2685C)
मेक युअर ओन रॅप
मस्त
झकास दिसताहेत सगळेच पदार्थ!
(उसगावातून पुण्यनगरीत परतलेले आणि इटालियन पदार्थांच्या आठवणींनी उसासे टाकणारे काही मित्रगण आहेत - त्यांना याबद्दल कळवलं आहे)
श्री श्री आचरटबाबा की जय हो !
श्री श्री आचरटबाबा की जय हो !!!
धन्यवाद हो , या मदतीबद्दल ...
यात काय कठीण नसते हो.
यात काय कठीण नसते हो. चुटकुल्या मोबल्यातूनही फेसबुकवरचे फोटो इथे आणता येतात.
१) फेसबुक फोटो पोस्टखालच्या "view full size" क्लिक करायचे. -
२) मोठा फोटो दिसल्यावर अड्रेस बार लिंक कॅापी करायची -
३)
<img src="लिंक" width ="480"/>
इथे टेम्प्लेटात बदलायची आणि योग्य ठिकाणी लेखात पेस्ट करायचे. पुर्वदृष्यमध्ये फोटो दिसला पाहिजे, मग प्रकाशित करायचा.
-----------
बाकी ते चावडर 'चवदार' असावे.
बाकी ते चावडर 'चवदार' असावे.
फार यमी दिसतय ते.
प्रेझेन्टेशनमध्येही सीफूड चाउडरच भाव खाउन जातय. सॅन फ्रान्सिस्कॉला पिएर २३ (नंबर आठवत नाही) येथे क्रॅब चाऊडर खाल्लेले आहे. नंतरही कुठे कुठे . खूपच मस्त लागते. कोरलेल्या ब्रेडच्या वाडग्यातील वाफाळते सूप.... स्वर्ग!!!
पिअर 39 का मामी ?
पिअर 39 का मामी ?
+
मार्मिक दिली आहे.
गेले होतात की नाही तिथे
रोचक दिला आहे याला. गेले होतात की नाही तिथे ?
पुरातन काळी.
१९९२-९३च्या सुमारास.
करेक्ट
होय बरोबर अबा.
केपी आले कोथरुडा भाग ३ : सुशी आणि नागा
मराठी व्यावसायिकांची उज्वल परंपरा पाळत ( दीड तास वेटिंग फेम) बॅरोमीटर मधील दोन पार्टनर , पेंडसे आणि मानकर यांनी ( भांडणाची परंपरा पाळली आहे का नाही ते कळायला स्कोप नाही ) 'ऑब्लिक' नामे रेस्टॉरंट बॅरोमीटर पासून एक किलोमीटरच्या आत , जोशी म्युझियम च्या गल्लीत काढले आहे .
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे एवढ्या एकाच हेतूने ( रविवारीच बाहेर गिळलेलं असूनही ) एकवीस तारखेला चालू झालेल्या 'ऑब्लिक' मध्ये काल गेलो .
पूर्वीचा जुना इंजिनीरिंग वर्कशॉप कन्व्हर्ट केला आहे . त्याचा एक्सटर्नल डीकॉर मध्ये वापर केला आहे .
मेन्यू साधारणपणे बॅरोमीटर सारखाच , म्हणजे थोडे भारतीय , थोडे ओरिएंटल , थोडे कॉंटिनेंटल . सध्या साध्या कॉम्युटर प्रिंटाऊट वरच मेन्यू आहे ( बॅरोमिटरी परंप्रा ) . साधारण कल बघून नन्तर मेन्यू फिक्स करतील असे वाटते .
वेगेळेपणा म्हणजे इथे सुशी मिळते !!! आणि नागा नावाने काही आसामी पदार्थ .
काल ठिकठिक होतं . पण दुसराच दिवस असल्याने बेनिफिट ऑफ डाउट देऊन , महिन्याने परत जाऊन बघणार .
बार आहे .
अजून एक विंग उघडणार आहेत , त्याचे काम चालू आहे .
!!!/?
सुशी मिळू लागली ही चांगली गोष्ट, परंतु हिंदुस्थानात सुशी खाणे हे कितपत सेफ असावे?
तसं मी काय खाल्लं नाही काल,
तसं मी काय खाल्लं नाही काल, त्यामुळे सांगता येणार नाही नक्की पण पण ..का बरं असं वाटलं तुम्हाला? ( म्हणजे इथे सेफ नसेलही कदाचित रॉ फिश आणि सॅलड ,कोशिंबिरीना पण) पण इतर ठिकाणी सेफ असतं ?
(प्राचीन काळी सुश्री मा आनंदशीलाबैंनी, ओरेगॉनमधे अनसेफ करण्याचं प्रात्यक्षिक दिलं होतं, ते काय कुणिबी करू शकेल असं होतं ते )
अवांतर म्हणजे व्हेज सुशी (@#) पण आहे इथे , आमच्या सारख्या फडतुसांकरिता)
बाणेर येथे चिनार नामक
बाणेर येथे चिनार नामक नुकत्याच उघडलेल्या काश्मिरी हाटेलात गेलो. अप्रतिम जेवण. नॉनव्हेजच खाल्लं या वेळेस, त्यांची ऑथेंटिक चव पाहून व्हेजचीही चव उत्तम असेलसं वाटतं. तबक माझ ऊर्फ मटन रिब्स आणि कबाब फ्राय हे स्टार्टर्स घेतले. तबक माझ लय आवडलं. मेन कोर्सात मटन रोगनजोश, रिस्ता (मीटबॉल्स इन ग्रेव्ही) विथ प्लेन पराठा हे खाल्लं. दणदणीत पोर्शन साईझ आणि माईल्ड स्पाईस तरी सुंदर चव. रेटही फार जास्त नाय. रोगनजोश अप्रतिम होतं. नंतर फिरनी घेतली, ती घेतली नसती तरी चाललं असतं. नंतर घेतलेला काहवा मात्र अप्रतिम होता, प्रत्यक्ष श्रीनगरात चाखलेल्या काहव्याची आठवण करून देणारा. अतिसुंदरेस्ट. माझ्याकडून दणदणीत शिफारस.
नेमका पत्ता वगैरे इथे पाहता येईल. हॉटेलमालकांपैकी एकजण प्रॉपर काश्मिरी आहे आणि त्याचे नीट लक्ष आहेसे दिसते. फ्रोझन मीट कुठे दिसले नाही.
https://www.zomato.com/pune/chinar-baner
बाकी नॉनव्हेज डिशेस अति उत्तम, परंतु त्यातही काहवा हा क्लास अपार्ट.
चिनार गार्डन व चिनार
बाणेर मध्ये चिनार गार्डन नावाचे अति भंगार हॉटेल आहे तिकडे कृपया कोणी चुकून फिरकू नये म्हणून हा प्रतिसाद.
चिनारच्या रेको साठी खूप धन्यवाद
कारलोस आर्ट किचन अँड कॅफे
एसेम जोशी पुलाकडून कर्वे रोड क्रॉस करून जो रस्ता जातो त्या रस्त्यावर कोहिनुर मंगल कार्यालयाच्या अलीकडे दोन प्लॉट सोडून एक जुना बंगला* कन्व्हर्ट झाला आहे. कारलोस आर्ट किचन अँड कॅफे .
मिक्सड मेन्यू आहे. मध्यम पोरशन्स , चविष्ट जेवण . बारआहे..नॉनव्हेज नाही ( अंडे आहे) वेगळी प्रेप्रेशन्स आहेत. एकदा जायला नक्की हरकत नाही.
एकदा जायला ठीक आहे
एकुणात चव सुमार आहे. इनोव्हेशन म्हणून बाकरवडी चाटच्या नावाखाली मिरगुंड आणि बाकरवडीचा चुरा खपवला होता आम्हाला, वर भरीला म्हणून चिंगुचटणी होती. बाकी आंबेडाळ-समथिंग वगैरे गोष्टी मेन्यूत वाचून ड्वाले पानावले. बेसिल (किंवा बेझिल किंवा बाझिल, तुम्हाला जे बरे वाटेल ते) पास्ता मात्र बरा होता. पक्वान्नात चीझकेकवरती मोतीचुराचा थर देऊन त्याचीही वाट लावली होती. मित्राच्या ओळखीच्यांचे असल्याने झक मारत गेस्टबुकात चांगले रिव्ह्यू द्यावे लागले.
जाऊन आला होय भटोबा. आंबे डाळ
जाऊन आला होय भटोबा. आंबे डाळ फलाफल आहे ते .
आम्ही ते एगसेत्रा घेतलं होतं. वेगळ्या (बऱ्या चवीचा ) अंडा मसाला होता . आणि ते टरबूज कलिंगड खरबूज स्कुप असलेलं ( सध्या असल्या जॉइंटात फ्यामस असलेलं) सॅलड घेतलं, दोन्ही बरं होतं .
बाय द वे, तो बंगला कुणी जुन्या फेमस माणसाचा असावा. जंतूंनी यावर प्रकाश टाकावा.
आणि हो , अजून एक म्हराटी माणसाचे असले हाटेल. मालक कुणी डॉ देव आहे म्हणे . वळखीचे आहेत ?
के नारायण काळे?
के नारायण काळ्यांचा बंगला का हा?
होय होय त्यांचाच. कॉलेजातून
होय होय त्यांचाच. कॉलेजातून टीपी करत हिंडताना अनेकवेळा हे नाव वाचून प्रश्नचिन्हांकित झालो होतो. केशव नाव का लपवित ते म्हणे ? आणि त्यांची महती काय हेही सांगा.
( बार आहे पण नॉनव्हेज नाही पण अंड आहे असं का करतात लोकं ? )
त्यांची नाट्यमन्वंतर संस्था
त्यांची नाट्यमन्वंतर संस्था आणि 'आंधळ्यांची शाळा' हे नाटक गाजलं होतं. दीदी अंमलदार, माझा मुलगा, लपंडाव वगैरे सिनेमे गाजले होते.
ओह तो बंगला होय! आमच्या
ओह तो बंगला होय! आमच्या कालेजच्या दिवसांत तिथे 'अंगण' नावाचं हाटेल होतं. जुन्या बंगल्याचा अँबियन्स बरा असूनही सर्व्हिस थुकराट होती. त्यामुळे त्या हाटेलला 'ढुंगण' म्हटलं जाई.
नाय हो आबा, आंगण म्हणजे
नाय हो आबा, आंगण म्हणजे कोपर्यावरचं ( कै अंबा भुवन च्या जागी चालू झालेलं) हा बंगला गल्लीत आहे.
अच्च्छा!
अच्च्छा!
केपी आले कोथरुडा भाग ४ : ' हिप्पी at हार्ट ' ..
केपी आले कोथरुडा भाग ४ : ' हिप्पी at हार्ट ' ... नथिंग हिप्पी अबाऊट इट .
{हॉटेल रणजित ( म्हणजे माजी एव्ही भट , मग आगाशे आणि सध्या माहित नाही कोण ते ) , रविराजच्या समोरच्या गल्लीत असलेले . हॉटेल पडून पूर्णपणे नवीन झालेले रणजित. हे कधी झालं काही कल्पना नाही ( लानत हय . असो. ) }
हॉटेल रणजितच्या आवारात संपूर्ण तळमजला, मागे मोठे मोट्ठे आवार. त्यात हे हिप्पी at हार्ट. अँबियांस हा खरा तर गोव्याच्या बीचवरचा वाटतो. नावाव्यतिरिक्त इथे हिप्पी काहीही नाही . गारेगार छान प्रफुल्ल वातावरण वाटलं. इथे सर्वप्रकारचे मद्य उपलब्ध आहे . मेन्यू फिंगर फूड आणि सध्या असल्या रेस्टोरंटस मध्ये असतो तसा मिक्सड . ( चीज चिली टोस्ट ते पीत्झा व्हाया पनीर चिली , टाकोस आणि नाचोज )
इथे ' मुनशाईन मिडरी * ' ची Apple सायडर मीड होती म्हणल्यावर इतर सगळ्यावर काट मारून ' त्या घेतल्या ' बाकी फिंगर फूड घेतल. चविष्ट होतं .
एकंदरीत आम्ही चौघे सोडल्यास संपूर्ण तरुण वर्ग . बाळ चौदावे यांची पिढी कॅज्युअल ऐश म्हणून काय करते हे बघणे असल्यास येथे येऊन बघणे.
पुन्हा नक्की जाणार , कारण मीड सोडता इतर खाणे पिणे काही झाले नाही .
* मुनशाईन नावावर जाऊ नका . ही हातभट्टी नाही . पिरंगुटच्या अलीकडे एका छोट्याश्या सेटअप मध्ये ही मंडळी मीड बनवतात. छान आहे .
कॅज्युअल ऐश
चिकन, (मटणही; असल्यास) चीझसह लोडेड नाचोज् हे मित्रांबरोबर कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, उनो, मोनोपोली डील, पत्ते इ. प्रकार खेळत असताना चरणे हा झक्कास टाईमपास आहे. पिणारे असाल तर अजूनच मजा. टाको हा प्रकार खायला इरिटेटिंग तरीही चविष्ट असतो. पिझ्झाचा कंटाळा आलेला असल्याने नवे ॲव्हेन्यूज्.
निरागस ऐश नव्हे हो..
चौदावे, मी निरागस ऐश याबद्दल लिहिले नव्हते.( नाय नाय , मी आंबटशौक लीळा नाय म्हणत ) एकंदरीत ममव पुढची पिढी यांचे पबिय वर्तन आणि मोकळेधाकळेपणा , त्यातील फोनीय वर्तनाचे नवे आयाम वगैरे याबद्दल होते. त्याबद्दल काही त्या साईटने रोचक लिहिलेत तर ...
म्हणताच आहात तर...
;)
केपी आले कोथरुडा भाग ४ : ' हिप्पी at हार्ट ' ..
डबल पोस्ट झाल्यामुळे उडवली ...
Couscous सॅलड्
या वीकेन्डला, अटलांटिक गावात कॅसिनो वगैरे खेळले. बुफे महाग होता पण अतिशय चविष्ट होता. पहील्यांदा Couscous (कुस्कुस) सॅलड खाल्ले .
अ-प्र-ति-म चव होती.
____________
जवळजवळ ३-४ वर्षांनी शेपूची भाजी आज खाते आहे.