मनातले छोेटेमोठे प्रश्न आणि विचार - ९४
या बातमीबद्दल प्रतिक्रिया हव्यात.
जोशी आडनावाच्या व्हिलनची फारएण्डनं मागे टिंगल केली होती. पण फारएण्डा, जपून. आता तर स्वप्नील जोशी व्हिलन बनतोय, अशा बातम्या आहेत.
या बातमीबद्दल प्रतिक्रिया हव्यात.
जोशी आडनावाच्या व्हिलनची फारएण्डनं मागे टिंगल केली होती. पण फारएण्डा, जपून. आता तर स्वप्नील जोशी व्हिलन बनतोय, अशा बातम्या आहेत.
काय सांगता काय ?
अहो, त्यांची प्रेरणा- साक्षात देव साहेबांनीही हे डेरिंग केले नव्हते. चॉकलेट हिरोचा व्हिलन ? चॉकलेटचे फार फार तर बिटर चॉकलेट होऊ शकते, कारलं कसं होईल ?
फक्त एकच सल्ला द्यावासा वाटतो. व्हिलन झाल्यावरही आपल्या दैवताप्रमाणे मान हलवण्याचं सोडू नका. लहान मुलांची सहाव्या महिन्यापर्यंत मान डुलायची थांबते, देवसाहेब त्याला अपवाद होते.
टोप बाई टोपाचा.
माला त्याचा टोप हावा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निव्वळ करमणुक्
http://www.tarunbharat.com/news/568261
किती तो बाळबोधपणा!
ऐसी अक्षरे ला सध्या काय झालेलं आहे ?
मी गेले अनेक दिवसांपासुन बघतोय (म्हणजे जाणवण्यासारखा एक ठळक काळ आता झालाय असे वाटले म्हणून म्हणतो ) की ऐसी अक्षरे संस्थळ हळुहळु कोमेजुन जात आहे असे जाणवते.
म्हणजे ऐसी अक्षरेवर सुरुवातीपासुन बहुधा संख्या महत्वाची नाहीच आहे, या संस्थळाची प्रकृतीच तशी नाहीये. हे एक अनियतकालिकं होती मराठीत तशी, ऑफबीट, निश वगैरे म्हणता यावं तशा प्रकृतीच संस्थळ आहे. हे सर्व मान्य आहे,
तरीही गेले अनेक दिवसांपासुन एकुण जुन्या सदस्यांची लेख/प्रतिसादीय (लेप्र) सक्रियता फारच कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे नविन सदस्यांची लेप्र सक्रियता जी काही अंशी तरी जुन्यांच्या लेप्र सक्रियतेची मोहताज आहे. ती देखील पुरेसे पाणी न मिळाल्याने एखाद दोन अंकुर फुटुन कोमेजुनच जात आहे असे जाणवते.
क्वांलिटी चा बळी देऊन क्वांटीटी चा ओढा या प्रकाराचा एकुण ऐसी च्या अंगभुत प्रकृतीला तिटकाराच आहे. किंव क्वांटीटी वाढली तर " कुछ तो गडबड है दया " हा रास्त स्केप्टीसीझम जरी असला तरीही
तरीही
एकुण ऐसी अक्षरे कोमात गेले की काय इतक्या मंद गतीने श्वास घेत आहे ही
योगनिद्रा आहे की कोमात आहे की हायबरनेशन मध्ये आहे ?
एक आप है और एक वोह था..... जो
एक आप है और एक वोह था..... जो कह गया .... "बाजीचा ए अत्फाल ... होता है शबो रोज तमाशा मेरे आगे"
"अजून जीव आहे...!!"
"अजून जीव आहे...!!"
(अमेरिकन कंपनीच्या थर्मासमधून) एवढेस्से पाणी आणा बघू...
फिर देखिये अंदाज-ए-गुलअफ्शानी
फिर देखिये अंदाज-ए-गुलअफ्शानी-ए-गुफ्तार
रख दे कोई पैमाना-ए-सहबा मेरे आगे
.
किती वाजलेत?
"अजून जीव आहे...!!"
"अजून जीव आहे...!!"
गो हाथो मे जुंबिश नही तो क्या
आखो मे तो दम है
रहने दो अभी सागरोमीना मेरे आगे
मराठी अनुवाद
बोटांमध्ये दम नुरला म्हणुन काय झाले गडे
डोळ्यात तर अजुन जान आहे
ऐसी ची हिरवळ राहु दे डोळ्यापुढे
धागा विणु शकलो नाही म्हणुन काय झाले
प्रतिसादांत तर बागडु दे गडे !
आजकाल...
...'ऐसी'ची बहुतांश धमाल खरडफळ्यावर चालते.
तिकडे या. मजा आहे.
अत्यंत सहमत . बघू यावर ऐसी
मारवा जी अत्यंत सहमत . बघू यावर ऐसी व्यवस्थापन काय म्हणतं आणि कार्यवाही करतं का ते !!
कार्यवाही?
काय कार्यवाही करणार ब्वॉ?
ऐसीचा दिवाळी अंक सोडल्यास
ऐसीचा दिवाळी अंक सोडल्यास ऐसीला विरक्ती आली आहे. खफवर अण्णा हातात मुंडासं घेऊन एकटेच लढत असतात, फक्त तोफा कडाडायचा अवकाश. जंतूंचे प्रात:स्मरणीय दर महिन्याला मन की बात करत असले तरी एरव्ही जंतू मौन सोडत नाहीत. अदितीला अजगराने पुरते घेरलेले दिसते. बाकी मुसु, नंदन आजकाल ऑस्करविनर चित्रपटांचे फक्त ट्रेलरच बिंजवॉचत आहेत असं ऐकून आहे. आबा आता दिवाळी अंकांपुरतेच उरतात की काय अशीही भिती वाटू लागली आहे. मनोबालादेखील कुणी मधूसुदन भगवान भेटलेत आणि विश्वरूपदर्शन झाल्यामुळे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली दिसतात. मेघना आणि ऐसीची सोडचिट्ठी आधीच झाली असल्यामुळे ऐसी काही डेसिबलने कधीच कमी झाली आहे. आता फक्त अनंत यात्रींच्या अनंत कविता वाचायचं नशीबी आलेले आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
आबा आता दिवाळी अंकांपुरतेच
क्या बात कर्रे हो नीळदादा? परवाच तर धागा काढला की.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ते घासकदवि
ट्यन्चि ८वन येते
डिलीट फेसबुकची टूम ऐसी
डिलीट फेसबुकची टूम ऐसी व्यवस्थापनाच्या प्रेरणेनेच निघाली आहे !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
केसं वाढवून व्हिलन होणे
केसं वाढवून व्हिलन होणे म्हणजे उदाहरणार्थ भारीच की! पण वरणात कितीही तडका मारला तरी त्याचा फारतर डाल फ्राय होईल, त्यापलीकडे काही नाही. त्या वरणाला आपण बिर्यानी असल्याची स्वप्ने पडताहेत की काय????
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पार्श्वभूमीला प्रत्येक
पार्श्वभूमीला प्रत्येक एंट्रीसोबत क्याव क्याव क्याव किंवा तत्सम आवाज काढून व्हिलनत्वास अधिकची मदत होऊ शकेल. सुरुवातीच्या एंट्रीलाच एखाद्या गरीबाला षौकाखातर गोळी घालून व्हैलन्य इंट्रोडयूस करता येईल.
केसं वाढवून व्हिलन होणे
केस वाढवून अमिताभ बच्चन होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा - असा सुविचार आमच्या शाळेत वाचल्याचे आठवतेय. तो फार अर्थपूर्ण होता असं नाही. पण...........
.
देवानंद हो मालक; अमिताभ बच्चन
देवानंद हो मालक; अमिताभ बच्चन नाय !! विवेकानंदाशी यमक जुळायला नको का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आयला आमच्या वेळेला, म्हणजे ९२
आयला आमच्या वेळेला, म्हणजे ९२-९३ साली मी सहावीत असतांना, हा सुविचार बराच बदलला होता ना. संजय दत्त होता त्या सुविचारात. आणि ते यमक? अर्रर्र.... ते तर अजिबातंच राहिलं नव्हतं. केस वाढवायचं तेव्हढं बरोबर राहिलं.
पण जोश्यांच्या स्वप्नीलने असा रोल केलाच कसा? म्हणजे शारुक कान ने असा रोल केलाय का आधी? नाही तर साहेब टुकार नक्कल कोणाची करणार?
केस वाढवण्याचं माहिती नाही पण
केस वाढवण्याचं माहिती नाही पण शारुकचे सुरुवातीच्या अनेक पिच्चरमध्ये भिलनचे रोल होते.
डर्रर्र- विथ जूही चावला
अंजाम- विथ माधुरी दीक्षित
बाजीगर इ. (अर्ध भिलन) - विथ काजोल
--------------------------------------------------
टीप: वरील सुविचारात प्रॉपर यमकजुळणीसाठी तो शब्द "देवानंद" असा लिहिणे आवश्यक असे. देव आनंद असे लिहून चालत नसे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कदाचित...
...ते पुढल्या पिढीतले असल्यामुळे कंटेंपररी म्हणून त्यांना अमिताभ बच्चन म्हणून शिकविले असेल. यमकबिमक गेले तेल लावत.
(विवेकानंदांचे काय, म्हणून विचाराल, तर ते ऑल-टाइम प्राचीन आहेत. अगदी बाबा आदमच्या जमान्यापासून. बोले तो, श्री. आलोक नाथ हे कसे जन्मतःच बाबूजी म्हणून पैदा झाले, तद्वत. थोडक्यात, कंटेंपररी बनू नका, पुरातन व्हा, असा तो पुरातत्त्ववादी संदेश आहे. पारंपरिक हिंदू थेरडेशाहीकडून याहून वेगळी ती काय अपेक्षा करणार?)
वरच्या इमेज मधे लिहिलय तो ३६०
वरच्या इमेज मधे लिहिलय तो ३६० डिग्री टर्न घेतोय ह्या रोलसाठी, म्हणजे वेगळं काहिच करणार नाही, फक्तं केस वाढवलेत!
-अनामिक
३६० की १८० ?
३६० की १८० ?
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या
गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या खेळणारे तो.
किंवा हाताखाली येईल तो झपाटा खाईल.
.
नावातले डबल डब्ल्यु मात्र लैच कॉमिक वाटतेय.
www
वर्ल्ड वाईड आहेत ते, डोक्यावर वेब आणलंय, ते तिसरं W म्हणा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
थूsss
मराठी चित्रपट ह्या शिट्टीत बोलणार्यामुळं सोडलेत. अन् दुसरं ते घुबड ताम्हणी
भांबड आलं
माबो आणि मिपावरही तीन
माबो आणि मिपावरही तीन वर्षांपूर्वीचे लेखक फारसे दिसत नाहीत. फेसबुकसारखी इकडे/संस्थळांवर पाठ थोपटली जात नाही.
बाकी किती(लेखक आइडी) जणांची मुलं आता मराठी शाळेत जातात?
माझी मुलगी "आता" शाळेत जात
माझी मुलगी "आता" शाळेत जात नाही. कॉलेजला आहे. पण ती अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत शिकली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मराठी शाळेतल्या मुलांकडून
मराठी शाळेतल्या मुलांकडून मराठी लेखनाची अपेक्षा धरल्यास तो कॅार्पसच पूर्वीच्या तीनचार टक्के उरला आहे. त्याच्यातून एकदोन टक्के संस्थळावर येणार हे गणित करायला नवनीत नको.
वावा चेंडु पाहा या गाण्याची जागा ज्याकअँडजिलने घेतलीय अगदी दूरच्या/शहरांपासूनच्या दूरच्या गावात.
whatever you can rightly say
whatever you can rightly say about India, the opposite is also true ____ असं Joan Robinson म्हणाल्या होत्या.
याबद्दल कुणाला स्ट्राँग मतं आहेत का ? ( या बाजूने किंवा विरोधी बाजूने ) ?
.
एक मोठं गिह्राइक या विचाराने
एक मोठं गिह्राइक या विचाराने इतर देश पाहात असताना आता राइट/रॅान्ग चर्चा फक्त दिवाणखान्यापुरत्याच महत्त्वाच्या राहिल्या आहेत॥ हिंदी बॅालीवुड सिनेमावरच्या टिकेसासारखं.
व्हॉट्सअॅप नसलेलं फॉरवर्ड
आता वाण्याच्या दुकानात एक पुणेरी संवाद झडलेला कानावर पडला -
गिऱ्हाईक १ : मोदीचं काम चांगलं आहे म्हणून नाही, तर देश चालवायला मोदीपेक्षा बरा पर्यायच नाही म्हणून २०१९मध्ये मोदीच यायला हवा
गिऱ्हाईक २ : का, मोदी नव्हता तेव्हा देश चालत नव्हता की काय?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
१) "तुमचं बिजेपीचं चांगलं
१) "तुमचं बिजेपीचं चांगलं सरकार ना? त्यांनी मोबाइलमध्ये कॅमय्राला परवानगी दिलीच कशी?"
"सगळीकडे जोड्या बसल्यात बागेत तोंडापुढे मोबाइल घेऊन."
२) "हे स्काइवॅाक कशाला बांधलेत? गुलुगुलु गप्पा मारायला? या बिजेपीला काही जमलंच नाही."
मोदींची परराष्ट्रनीती यशस्वी व प्रगल्भ आणि व्यापक आहे
मोदींची परराष्ट्रनीती यशस्वी व प्रगल्भ आणि व्यापक आहे.
विरोधकांना सर्वात जास्त गॅरंटी मोदी परराष्ट्रनीती व्यवस्थित हाताळु शकणार नाहीत अशी सुरुवातीला होती.
पण मोदींच्या कारकीर्दीतले सर्वात यशस्वी क्षेत्र परराष्ट्रनीती हेच आहे.
सहमत आहे. याचं श्रेय सुषमीला*
सहमत आहे. याचं श्रेय सुषमीला** जास्त आहे.
आणि शी प्लस प्लस केलेलं 'अर्थखातं' असावं.
_________
**माझ्या आत्यास स्मरून. ती युतीच्या जुन्या मुख्य-उपमुख्यमंत्र्यांना 'मन्या' आणि 'गोप्या' म्हणायची.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
सुषमीकाकू वाराणसी सिल्क साडी
सुषमीकाकू वाराणसी सिल्क साडी नेसून तयारीत बसल्या होत्या.पंप्र न केल्याने रुसल्या. समारंभात रुसवेफुगवे चालायचेच.
शी प्लस प्लस
इतकं होऊनही इतकं होऊनही आमच्या ऑफिसमधले लोक तावातावाने नोटबंदी वगैरेचं समर्थन करत असतात की विचारू नका.
एल्टीसीजी देताना आनंद होतो का असं विचारल्यावर मात्र गुळमुळीत उत्तरं देतात.
लेलिनचा पुतळा पडल्यावर दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली तेव्हा दोन बंगाल्यांनी बोलणंच बंद केलंय.
२०१९ पर्यंत काय काय होईल गोमाता जाणे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
शपथविधी समारंभाला सार्क
शपथविधी समारंभाला सार्क देशांच्या प्रतिनिधीना बोलावून लगोरी फोडली.
मोदींची परराष्ट्रनीती यशस्वी
चारपाच चांगली उदाहरणे द्याल का - की मोदींची परराष्ट्रनीती प्रगल्भ आहे याची ? फक्त या देशाबरोबर संबंध बनवले, मजबूत केले असे मुद्दे नकोत. त्यामागची प्रगल्भता म्हंजे काय याची उदाहरणे द्या.
दुसरं म्हंजे - व्यापकता हे धोरण असते ते नेमके कसे ? सगळ्या देशांशी मस्तमस्त संबंध ठेवायचा यत्न करणे हे धोरण असते का ??
.
यशस्वी परराष्ट्रनीती म्हणजे
यशस्वी परराष्ट्रनीती म्हणजे आपल्या देशाचे इंटरेस्ट बहुतांश वेळा सांभाळले जाणे. आणि भविष्यातील उद्दिष्टांच्या साध्यासाठी आंतरराष्ट्रीय मोर्चेबांधणी करणे.
आपल्या देशाचे इंटरेस्ट तात्कालिक असू शकतात आणि दीर्घकालीन असू शकतात. तात्कालिक उद्दिष्टांमध्ये बहुतांश व्यापारी इंटरेस्ट असतात. पाकिस्तान/चीनच्या कारवायांचे नियंत्रण हे सार्वकालिक उद्दिष्ट आहे.
नेहरू पंप्र असताना जागतिक पातळीवरील राजकारणात भारताला "भूमिका" असावी असे उद्दिष्ट होते (असे वाटते). त्या उद्दिष्टाला तात्कालिक परिस्थितीमुळे खीळ बसत असे. पण भारताला भूमिका असावी या हेतुने अलिप्तराष्ट्र परिषद वगैरे गोष्टी नेहरूंनी केल्या. (त्याच वेळी तात्कालिक उद्दिष्टांसाठी अमेरिका किंवा रशिया यांना चुचकारण्याचे प्रकार चालू होते). १९६२ नंतर (की नेहरूंनंतर?) आंतरराष्ट्रीय राजकारणातून भारताने अंग काढून घेतल्यासारखे झाले. अलिप्तता चळवळ चालू होती पण तिचा भारताच्या आंतरराष्ट्रीय स्थानाला फार उपयोग नव्हता. (शेवटी गरीबांचा दादा !! ).
(इंदिरा गांधींच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि) राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर भारताने आशियाचा दादा बनायचा प्रयत्न केला. पण तो थोडा ॲरोगंट आर्म ट्विस्टिंग प्रकारचा होता. फार काही यश मिळाले नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका घेण्याचा विचार करण्याची सवड मधल्या काळातल्या सरकारांना मिळाली नाही असे असेल का?
नेहरूंनंतर शास्त्रींचा काळ सोडला तर इंदिरा गांधींच्या पहिल्या इनिंग मध्ये त्यांची पक्षावर मजबूत पकड झालेली नव्हती. तसेच जयप्रकाश नारायण वगैरेंच्या आंदोलनामुळे सरकारची बरीच शक्ती स्वत:च्या सर्व्हायव्हलसाठी खर्च होत होती. राजीव गांधींना तो प्रश्न फारसा नव्हता. त्यानंतर व्ही पी सिंग ते ममो सिंग यांच्यापर्यंत सर्व सरकारे सर्व्हायव्हिंग बाय द डे/मंथ होती.
आता मोदींना पुन्हा ती सवड मिळाली आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
खरय.
खरय.
खरय.
भाजपच्या रेट्यापुढे काही पक्ष दिल्लीतला अधिकृत सरकारी बंगलाही घालवून बसलेत. पक्ष चालवण्यासाठी आसरा नको का?
दीदी,काका एकाच बैठकीत विचारविनिमय करताना पाहून बरं वाटलं.
दीदीला/डाव्यांना कारखाने नकोत पण नोकय्रा द्यायच्या आहेत. ते कसं काय करणार? सरकारी निगमांची अवस्था आता काये?
चीनच्या कॅाम्युनिझमची चुणूक बिजिंग ओलिंपिकमध्ये दिसली इतका कॅाम्यु० अवगुंठित प्रगल्भ साम्राज्यवाद भारतात शक्य आहे का? फुकटचे बसून पेन्शन कसे मिळेल एवढीच इच्छा ठेवायची पण जगाच्या मागे राहायला तयार अशी मानसिकता इथे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भूमिका
राव सरकारने इस्राएलशी राजकीय संबंध सुरु केले. बाकी इंदिरा गांधींना, आपल्या विरोधकांचा नि:पात करणाऱ्या इंदिरा गांधींना १५ वर्षात सवड मिळाली नाही हे पचायला जड आहे.
उलट अंगाशी आला तो प्रयत्न. (रा.गांच्याच !)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
गरीबी हटाव हा घोष छान वाटायचा
गरीबी हटाव हा घोष छान वाटायचा.
तुलना
++ . बाकी इंदिरा गांधींना, आपल्या विरोधकांचा नि:पात करणाऱ्या इंदिरा गांधींना १५ वर्षात सवड मिळाली नाही हे पचायला जड आहे.++
१९६७ ते १९७०-७१ इंदिरा गांधी आपले डळमळीत पक्षांतर्गत स्थान मजबूत करण्यात व्यग्र असाव्यात .
१९७०-७१ च्या काळात संपूर्ण वेस्ट ब्लॉक भारताच्या विरोधी ( प्रो पाकिस्तान , निक्सन किसिंजर एरा ) असताना बांगला देश मुक्तीचे युद्ध चालू असण्याच्या काळात आपले मर्यादित उद्दिष्ट अत्यंत सक्षमपणे पार पाडणे हे अवघड काम असेल असे वाटते .
वेस्ट ब्लॉक संपूर्ण कट्टर विरोधात असताना सोविएत रशिया च्या बाजूला जाऊन आपला कार्यभाग साधणे हे मोठे परराष्ट्र नीतीचे यश म्हणावे असे वाटते .
१९७२ युद्दातून बाहेर पडल्याच्या लगेच नंतर ऑइल एम्बार्गो ज्यात आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती एकदम तिप्पट झाल्या. त्यामुळे अर्थातच महागाई अतोनात वाढणे वगैरे प्रकार झाले असावेत ज्याची परिणती त्यानंतर हळूहळू वाढत १९७५ च्या सुमारास पीक ला गेलेल्या जन आंदोलनात झाली. असावी .
( आज तेलाचे दर एक तृतीयांश झालेले असतानाही अर्थव्यवस्था मार्गावर ठेवण्यात येणाऱ्या अडचणी बघितल्या तर त्या काळातील अडचणी समजता येऊ शकतील .)
१९८० नंतर तीन वर्षे तशी स्थिर म्हणावीत अशी , पण तरी खलिस्तान चळवळीमुळे आलेला टेररिसम हि मोठी समस्या होतीच.
तुलनेने देशाची स्थिर व आर्थिकदृष्ट्या संपन्न परिस्थिती असताना परराष्ट्र नीती व उपरिनिर्दिष्ट काळातील परराष्ठ्रनीती यांची तुलना करणे अयोग्य वाटते .
या काळातील सामाजिक , राजकीय आणि जागतिक आर्थिक घटनांबद्दल थोडे वाचन केल्यास फायदा होईलसे वाटते .
बाकी जास्त माहिती नाही मला,मी लहान होतो . पण आचरट बाबा , तिरसिंगराव , कोल्हटकर वगैरे या काळात जाणत्या वयात असलेल्या ज्येष्ठानी या बाबत मत व्यक्त करावं .
बांग्लादेश स्वातंत्र्य हे नि
बांग्लादेश स्वातंत्र्य हे नि:संशय प्रचंड यश आहे. ते इं.गांच्या फारीन पालिसीचंच आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
+१
चांगलाच इं०गा० दाखवला बाईंनी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
.
.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अनु राव
अनु राव कुठे आहेत?
फॉर द फर्स्ट टाईम त्यांनी
फॉर द फर्स्ट टाईम त्यांनी प्रतिसाद देताना काहीतरी मिस्टेक केली त्यानंतर त्या गुल झाल्या.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
paण नक्की मिस्टेक काय केलेली?
paण नक्की मिस्टेक काय केलेली? चुकून स्वतःचा फोटो टाकला? गब्बरशेठकडे अचूक माहिती असावी..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
गब्बरशेठकडे अचूक माहिती असावी
नाय.
जिएसटी
जिएसटी
इमारतीचं काही काम केलं त्या कामाला, परंतू कंत्राटदार म्हणतो वीस लाखांपेक्षा कमी (त्याचे टोटल वर्षाचे टर्नोवर इतके नाही) असल्याने मला नाही.
१) असंबी हाय का?
२) म्हणजे पावतीवर काय लिहायला हवे?
not applicable /without GST?
काही काम - स्ट्रक्चरल ओडिट*
आदूबाळ सांगतीलच. पण तुम्ही
आदूबाळ सांगतीलच. पण तुम्ही कस्टमर आहात असं समजून.
बहुधा अनरजिस्टर्ड सर्व्हिस प्रोव्हायडर असं असेल.
पण तुम्हाला त्यावर सीएसटी भरावा लागेल (रिव्हर्स चार्ज की कायसा).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पटलं.
पटलं.
जिएसटीखाली ती सर्वीस आली की लागू झालाच. न भरल्यास ती पावती अधिकृत ठरणार नाही.
( एस्टिमेटमध्ये त्याने "अमुक रु विदाउट जिएसटी" लिहिलेले त्याबद्दल विचारले. "मला जिएसटी नाही भरावा लागत.")
हो . सोसायटी ही कस्टमरच झाली.
हो . सोसायटी ही कस्टमरच झाली.
-पिडिएफ
-पिडिएफ
१) पिडिएफ चे कॉपीराइट adobeकडेच आहे का? म्हणजे फाईल इक्सटेंन्शन डॉट पिडिएफ वापरणे?
२) लाटेकची पिडिएफ फाईल .Div?
नाही
पेटंटेड आहे पण कॉपीराइट नाही.
अधिक माहिती इथे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ते पेटंट पंधरा वर्षांनी
ते पेटंट पंधरा वर्षांनी संपल्यावरच दुसय्रा कुणाला 'प्रिंट करता येण्यासारखे डॅाक्युमेंट' करता येईल? लाटेकची फाइल dot div अशी सेव होते असं वाचलं. तर हीसुद्धा प्रिंट होईल?
धन्यवाद.
पीडीएफ प्रिंट
कुणालाही पीडीएफ इम्प्लिमेंट करायचा हक्क आहे. म्हणून वर्ड किंवा तत्सम कित्येक प्रणालीतून पीडीएफ फाईल एक्सपोर्ट करता येते.
पीएस किंवा पीडीएफ फाईल प्रिंट करता येतात. डिव्ह फाईलपासून पीएस किंवा पीडीएफ कन्व्हर्जनसाठी प्रणाली उपलब्ध आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
The Dreams of Tipu Sultan.
The Dreams of Tipu Sultan. हे गिरिश कार्नाड यांच नाटक कोणी वाचल/ बघितलय का ? यावरची जनतेची मते जाणुन घ्यायला आवडेल.
शोधगंगा वर हा पेपर आहे त्यातील ही माहीती
It was A. K. Ramanujan who drew Karnad’s attention to the dreams Tipu recorded, the original of that are now in th India House Library in London. Karand also selects, “Tippoo’s Dream Book,” for his source material to rebuild Indian History and to review the grand personality of Tipu with a modern perspective. This book was found in his palace after his death. It preserves the record of his never told dreams maintained till the last day of his life which Munshi Habibullah stumbled upon at the palace, and which was cast aside by Colonel Colin Mackenzie considering as ‘an odd little book a pleasantly inconsequential conversation piece The words written on its first page in the Sultan’s own hand were “In this register are recorded the dreams I’ve had and am having.” His last dream must have been recorded on a piece of paper which he handed to Kirmani in a sealed envelope with the instruction to keep it till he came back. He could never
come back because it was his final battle with the English on the 4th May, 1799. Kirmani reveals:
“I forgot all about the letter. Naturally, with all that followed. Next day, I found it in my pocket. Reluctantly, I broke open the seal. Inside was a paper on which he had recorded the dream he had had the previous night. His last dream.” This dream book thus becomes a metaphor for an exploration of man behind the curtain of a warrior. But unfortunately his visions and dreams do not find fulfillment.
शोधगंगा वर जो पेपर आहे त्याचा दुवा
http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/24123/5/05_chapter%202...
गिरीश कार्नाड म्हणतात्
Karnad says
–
“What I find fascinating is the fact that Tipu Sultan , who practically spent forty nine years of his life on horse back, recorded his dreams and kept them under his pillow.”
He admits, “The plot obviously had to deal with some aspect of Indo–British relations and I immediately thought of Tipu Sultan, one of the most politically perceptive and tragic figures in modern history.”
त्या स्वप्नांबदल वाचले नाही
त्या स्वप्नांबदल वाचले नाही परंतू ब्रिटिश लोक टिपूचे कौतुक करायचे. त्याने सैन्याला फ्रेंचांकडून शिक्षण दिलेले.
आय मिस अनुतै.
हे आज वाचलं. गब्बरना आवडेल बहुतेक.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
Music to my ears
तांबड्या रंगाने रंगवलेले वाक्य एकदम मार्मिक आहे. ते पूर्ण बरोबर आहे असं नाही. पण.....
.
.
लेखाच्या शेवटी जो अति अलार्मिस्ट टोन आहे तो न पटणारा आहे.
.
लेखात लेफ्टीस्टांना दोष देण्यात आलेला आहे. मुळात त्यांना दोष देणे हा पलायनवाद आहे.
दोष मुख्यत्वे, व प्राधान्याने लेफ्टिस्टांना दिला जाऊ नये.
.
---
.
या विषयावर नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. -
.
The High Cost of Good Intentions: A History of U.S. Federal Entitlement Programs
.
स्टॉक मार्केट संदर्भात एक प्रश्न पडलाय
सध्या स्टॉक मार्केट चे फंक्शनींग समजुन घेतोय. तर फ्युचर च्या व्यवहारांचा बेसीक समजुन घेतला. तर तो असा की समजा मला एक इन्फोसीसचा फ्युचर्स चा व्यवहार करायचा आहे. तर नियमाप्रमाणे ठराविक लॉट घ्यावे लागतात (जे वेगवेगळ्या संख्येचे असतात जसे १२५ वा २०० इ.) त्यानंतर % ऑफ मार्जिन अगोदर भरावे लागते जे वेगवेगळे असते उदा. १८% समजा मी मार्जिन अमाउंट भरतो. त्याबदल्यात मला उर्वरीत पुर्ण रकमेचा लिव्हरेज मिळतो वगैरे. म्हणजे मी या स्टेज पर्यंत आलोय. आता या मार्केट मध्ये तर सेलर्स लॉस = बायर्स प्रॉफिट किंवा उलट हे तत्व आहे. म्हणजे दोन्हीकडुन एक्झॅक्ट व्यव्हार बॅलन्स होतो शिवाय एक्स्पायरी डेट को सौदा तोडना पडता है. तर मला एक कन्फ्युज अस झालय की सौदा तोडण्याच्या दिवशी उर्वरीत लिव्हजेज ची रक्कम (ज्याची हमी रेग्युलेटरची असते ) तो रेग्युलेटर ती एन्शुअर कशी करतो.
तर मी इथपर्यंत आलोय. पुढे मार्केट टु मार्केट चा मुद्दा येतोय इथे जरा समजत नाही.
कोणी प्लीज समजावुन सांगेल का ?
प्रश्न असा आहे की रेग्युलेटर कसे एन्शुअर करतो की शेवटी सर्वांच्या खिशात योग्य रक्कम जाईल ?
म्हणजे उत्तरही नाही दिले सविस्तर तरी चालेल पण कोणत्या टर्म्स कन्सेप्ट अभ्यासल्या तर हे समजुन घेणे सोपे जाइल.
किंवा टॉपिक ऑफ स्टडी नेमके कोणते घेतले पायजे तेवढ सांगा जेणेकरुन यंत्रणा समजेल.
रिसोर्स
तुम्ही कुठुन अभ्यास करता हे माहित नाही, पण तुम्हाला एक अतिशय सुंदर मटेरिअल सांगतो.
https://zerodha.com/varsity/
यातले ४, ५, ६ मॉड्युल्स काळजीपूर्वक वाचा.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
Thank You !
Thank You for the link
निळु भाऊ फारच मस्त सोर्स पुरवलाय तुम्ही
हे फारच झकास मोड्युल्स आहेत. बेसीक्स मध्ये नविन नाही आढळल पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे चौथा वाचायला सुरुवात केलीय.
फारच सुंदर सोपी सुटसुटीत भाषा उदाहरणे आहेत. माझ्यासारख्या नवशिक्याला तर खजिना भेटल्यासारखा आनंद वाटला.
खर म्हणजे मी एक एक कन्सेप्ट घेत गुगलुन चार ठिकाणाहुन जमवुन वाचत होतो. आत यात एकदम सुसुत्र व्यवस्थित टॉपिक बाय टॉपिक मोड्युल ॲरेंज केलेले आहेत. त्यामुळे विषय नीट समजतोय. माझी बरीच उत्तरे यातच गावतील असे वाटतेय.
पुन्हा एकदा अनेक धन्यवाद !
आज भाषणात आदरणीय मोदीजी
आज भाषणात आदरणीय मोदीजी म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस ने पाडले पण श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मुळे ते राज्यसभेत गेले . काँग्रेस उमेदवाराकडून ते लोकसभा निवडणुकांमध्ये दोनदा पराभूत झाले हे माहीत होतं. पण हे श्यामाप्रसाद मुखर्जींमुळे वगैरे खरं आहे का ?
कोण सांगू शकेल ?
बहुभाषिक विनोद - एक पृच्छा
हा विनोद त्यातली मजा न घालवता मराठीत अनुवादित करणे बहुधा अशक्य असावे (चूभूद्याघ्या), परंतु, अशा पठडीतला एखादा मराठी विनोद कोणास ठाऊक आहे काय? कोणी सांगू शकेल काय?
(सहज कुतूहल म्हणून.)
..........
(विनोद कळला नसेल तर विचारा, हात वर करा. (सवडीनुसार) मराठीतून समजावण्याचा - अगदी पंचलाइनीच्या मराठीतून स्पष्टीकरणासह - जमेल तितका प्रयत्न करेन. मग भले पंचलाइनीचा पचका होऊन विनोदाचा विचका झाला तरी बेहत्तर. पण विनोदाकडे कृपा करून दुर्लक्ष करू नका, मायबाप! विनोदानंतरचा प्रश्न (कुतूहल म्हणून) आत्यंतिक गांभीर्यपूर्वक विचारलेला आहे. धन्यवाद.)
केस कसे?
>>> परंतु, अशा पठडीतला एखादा मराठी विनोद कोणास ठाऊक आहे काय? कोणी सांगू शकेल काय?
१. एका अन्य संकेतस्थळावर, कुणी एक सदस्या घरी फ्रेंचचा सराव करत असताना तिच्या बहिणीने तिचा फ्रेंच प्रश्न ऐकून, 'बरे आहेत की. विंचरायचेत तर विंचर' असं काहीसं उत्तर दिल्याचा किस्सा वाचला होता. तो प्रश्न: qu'est-ce que c'est? (उच्चारी: केस कसे?)
२. देशी नवरा आणि इंग्रज कलेक्टर (भायखळ्याच्या स्टेशनावर तिकीटं गोळा करणारा!) यांचा एक काल्पनिक संवाद 'बायकुला तू खाली आण' (पक्षी: 'भायखळा ते कल्याण') या वाक्याने, एका इनोदात, संपन्न होत असे. आता मूळ इनोद पूर्णपणे आठवत नाही, पण तो साधारण करमरकर साहेब म्हणजे डू-डाय-डू साहेब या दर्जाचाच असावा.
बाकी एका भाषेतले शब्द/उच्चार आणि दुसऱ्या भाषेत निराळाच अर्थ यावर विनोद रचायचेच म्हटले तर मराठीत नवरा (गुजरातीत: रिकामटेकडा), तेलगूत रंडी (अर्थ: या), गुजराती माकड (मराठी: ढेकूण), जर्मन आबा (अर्थ: परंतु), तमिळ मोर/पाल (ताक/दूध) इ. अनेक पर्याय आहेत.
धन्यवाद!
- 'केस कसे'करिता एक संभाव्य उत्तर 'पांढरे' असेही असल्याचे ऐकिवात आहे.
- 'बायकुला तू खाली आण' विनोदातील पुढील संवाद 'उष्टं पीठ देऊन टाक' ('यू स्टुपिड, डोंट टॉक') असा असल्याचे अंधुकसे स्मरते. विनोद टुकार होता, हे सांगणे अर्थातच नलगे.
- एकदा एक तेलुगू सद्गृहिणी एका तेलुगू सद्गृहस्थांस सहास्यवदने 'मी रंडी. रेप!' असे ऐकविताना पाहून उपस्थित त्रयस्थांस अचंबा जाहला. अधिक चौकशीअंती, त्या संभाषणाचा मराठी तर्जुमा साधारणतः 'तुम्ही या. उद्या.' असा असल्याचे कळले.
- गुजरातीभाषिकबहुल एडिसन (न्यूजर्सी) येथील लोकसंख्येतील तेलुगूभाषिकांचे प्रमाण वायटूकेनंतर अचानक वाढले. म्हटल्यावर स्थानिक देशी व्यापाऱ्यांनी त्याची दखल घेऊन स्थानिक रेडियोवरील आपल्या जाहिरातींत तेलुगू वाक्यांची पेरणी करावयास सुरुवात केली. नि मग रेडियोवरून 'श्री ज्युवेलर्स की रंडीऽऽऽऽऽऽ' ('श्री ज्युवेलर्सकडे याऽऽऽऽऽऽ') अशा जाहिराती ऐकू येऊ लागल्या. त्यावर, 'श्री ज्युवेलर्सनी आपला बिज़नेस डायव्हर्सिफाय केला वाटते' अशी एका स्थानिक सज्जनांची प्रतिक्रिया झाल्याचे ऐकिवात आहे.
असो.
एक
भारत-ऑस्ट्रेलिया यांचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये बाळासाहेब ठाकरे बसलेले असतात. भारताची ब्याटिंग चालू असते. सचिन एक सिक्सर ठोकतो. बॉल ठाकऱ्यांच्या जवळ येऊन पडतो. सीमेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मॅकग्रा ठाकऱ्यांना ओळखत असतो. तो जोरात ओरडतो 'बॉल टाकरे'. ठाकरे बॉल परत स्टेडियममध्ये टाकतात.
आबऽ
जर्मन आबा (अर्थ: परंतु)
.... शब्द: aber, उच्चार: आबऽ
पण कधी कधी 'आबा' असा ऐकू येऊ शकतो.
बहुभाषिक विनोद
सीझनल विनोद -
बाब्या: आई, हा आंबा नाय पिकनार... त्येचं काय करायचं??
आई: आरं pickle!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पीजे
पीजे
जड पाय
माझे पाय जड झालेत हे वाक्य हिंदीत म्हटल्यामुळे जे होतं तो एक विनोद आठवतो. शिवाय बंगाली उच्चारांमध्ये भजन-भोजनवाला. अगदीच पीजे म्हणजे मेरेकू मत दो हेही.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
नव्या जीमेलमध्ये काय फरक
नव्या जीमेलमध्ये काय फरक केलाय?
नवं जीमेल
हे पाहा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
You can now add recipients to
You can now add recipients to your emails directly from the body text. When typing out a message, enter a “+” and start spelling out a contact’s name
हे भारी आहे! गरज होती याची.
अक्षरश: भयावह
https://9gag.com/gag/a7rj9Wb?ref=fbp
हे पहा. मागे एकदा जपानच्या अशाच प्रॉब्लेमबद्दल वाचलेलं तेव्हा अंगावर जो काटा आलेला त्या तुलनेत हे अजूनच भयंकर आहे.
तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.
(भांडवलदारांच्या) प्रगतीसाठी
(भांडवलदारांच्या) प्रगतीसाठी झोपडपट्ट्या आवश्यक आहेत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कवी म्हणे आतून
आज फेसबुकवर वाचायला मिळालेला मराठीचा एक नमुना -
स्रोत इथे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
...
शुद्धलेखनाच्या चुका भरपूर आहेत.
(मायनस दॅट, असले मराठी तर आजकाल आम्ही हरदम लिहितो. कालमहिमा, दुसरे काय?)
भाशा बदला, आयुश्य बदलेल.
हे मराठी किंवा इंग्लिशमध्ये, समजेलशा भाशेत कोणी सांगेल का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समजेलशा भाषेत
टाईम्सच्या शब्दकोड्यांत जसे, साधे आणि क्रिप्टिक क्लू असतात, तसे ते, मला या वाक्यांत दिसले. म्हणून भाषांतरेही दोन झाली.
१. फारसा विचार न करता, सुचलेल्या शब्द वा कल्पना, यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेतून आस्तित्वाच्या रहस्यावर प्रकाश पाडणारी, शहाण्या जाणिवेचा अर्क, तोंड न वेंगाडता, आपल्याआपल्यालाच सांगणारी कविता आंतून आलेली असते.
त्यांत, कमीजास्त जरुरीप्रमाणे, कविच्या क्षमतेनुसार तोडजोड असते, पण मूळ कल्पना ही अतार्किकतेतून सुचलेली असते.
२. कॅलक्युलसही न येणार्या, एखाद्या सामान्य, व्यक्तिचे शब्द वा कल्पना यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेतून, आस्तित्वाच्या रहस्यावर प्रकाश पाडणारी, मेंदूरुपी शहाळ्याचे उर्ध्वपातन करुन, पावटे सुद्धा न खाता, आपल्याआपल्यालाच सांगणारी कविता, आंतून आलेली असते.
त्यांत, कमीजास्त जरुरीप्रमाणे,सोडा घालून, कविच्या क्षमतेनुसार तोडफोड असते, पण मूळ कल्पना एखाद्या अतृत्प्त आत्म्यामुळे सुचलेली असते.
रावले?
रावले?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हम्म्म्म्...
रावले चावले... यमक छान जुळते.
कविता आतून, शिवाय आणखी कुठून
कविता आतून, शिवाय आणखी कुठून येतात?
इ-सकाळ मधल्या प्रतिक्रिया
गेले काही महिने मला इ-सकाळ मधल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचता येत नाहीत. त्यांनी त्या इ-व्हर्शनमध्ये दाखवणं बंद केलंय आणि म्हणून कुणालाच वाचता येत नाहीत की फक्त मलाच वाचता येत नाहियेत, कुणी जाणकार सांगेल का?
कारण सकाळ मधल्या वाचकाच्या प्रतिक्रिया (विशेषत: मुक्तपीठातल्या) अतिशय वाचनीय असतात, किंबहुना त्यातल्या बातम्या किंवा लेखांपेक्शा!
त्यांनीच गळचेपी केल्ये.
काही दिवसांपूर्वीच ज्यु. ब्रह्मेंनीही याच अर्थाची पोस्ट लिहिली होती. त्यांनी प्रतिक्रिया दाखवणं बंद केलंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दुर्दैव, आणि काय म्हणणार!
दुर्दैव, आणि काय म्हणणार!
मग आता सकाळ वाचणं बंद करून संध्यानंद चालू करावा काय?
करमणुकीच्या दृष्टीने तो वरचढ ठरेल...
मटाच्या प्रतिक्रिया
पिडां, तुम्ही म्हणता तोच अनुभव मलाही आहे. पण मटाच्या बाबतीत. सुरवातीला काही २-३ प्रतिक्रिया दिसतात, त्यानंतर खाली अधिक नांवाचे बटन येते. ते दाबल्यावर पूर्वी आणखी प्रतिक्रिया दिसायच्या. आता त्या दिसत नाहीत. एका करमणुकीला आपण मुकलो आहोत.
बोध घ्या.
मात्र त्या २-३ प्रतिक्रियांमधली शिवीगाळ, हमरीतुमरीवर उतरणं, मात्रुभाशेची आयमाय काढणारं टंकन वगैरे गोष्टी मला अत्यंत बोधप्रद वाटतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरंय्
मटामधील प्रतिक्रिया जास्त शिवराळ असतात. सकाळ्मधल्या प्रतिक्रिया ह्या कल्पक आणि खमंग असायच्या. विशेषत: अमेरिकावारीवरल्या लेखांवर येणाऱ्या...
अगदी
ज्यु. ब्रह्मेसारखं पात्र त्या प्रतिक्रियांमधून तयार झालं. कोणीसे 'बालमोहन' नावानं लिहिणारे, स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारा बबन वगैरे आंजा व्यक्तिमत्त्वांमध्ये गंमत होती. तसा खेळकर इरसालपणा मटावर दिसत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खोचकपणा
तसा खेळकर इरसालपणा मटावर दिसत नाही.
त्याला पुणेरी डोकं लागतं.
प्रतिक्रिया दाखवणं बंद?
तुमच्यापैकी कुणी त्या सायटींवर खातं बनवून मग प्रतिक्रिया पाहण्याचा प्रयत्न केला आहे का? प्रतिक्रियांचं वाचनमूल्य लक्षात आल्यामुळे त्यांनी त्या केवळ नोंदणीकृत सदस्यांना दाखवून त्याद्वारे काही तरी बिग डेटा वगैरे करण्याचा प्रयत्न चालू केला असावा असा माझा संशय आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मटाचा वाचकवर्ग थोडा
मटाचा वाचकवर्ग थोडा सधनवर्गातला पश्चिम उपनगरे मुंबईकडचा आहे आणि त्यांना विनोदी लेखन झेपत नाही.
अजूनही सिनेमाच्या सर्टफिकेटवर
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.
नवीन धागा निघेपर्यंत -
हा प्रतिसाद इथे हलवला आहे.