आजचे दिनवैशिष्ट्य - ११
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
मृत्युदिन : अभिनेता प्रेमनाथ (१९९२)
.
.
पडद्यावर तलत व प्रेम नाथ.
.
.
मृत्युदिन : बासरीवादक विजय
मृत्युदिन : बासरीवादक विजय राघव राव (२०११)
एक काळ असा होता जेव्हा माझा बाहेरील जगाशी एकमात्र आणि एकतर्फी संपर्क हा रेडियो होता. त्यावेळी यांचं बासरीवादन खूप ऐकलं. ऑल इंड्या रेडियोचं यांच्यावर फार प्रेम होतं. तूनळीचं तेवढं दिसत नाहीये.
तत्त्वज्ञ हाना आरेंट (१९७५)
तत्त्वज्ञ हाना आरेंट (१९७५)
बाईंचे The Origins of Totalitarianism अवश्य वाचावे. एखादी पेजटर्नर सस्पेन्स कादंब्री वाचल्यासारखे वाटते. अतिशय सुंदर पुस्तक. खरोखर अस्सल पोलिटिकल थियरिस्ट(फिलॉसॉफर म्हटलेले आरेंटना आवडत नसे.)
https://www.theguardian.com/us-news/2017/feb/01/totalitarianism-in-age-…
वरील लेख बरा आहे.
I’ve taken an epigraph from . . . [Karl Jaspers]: ‘Give yourself up neither to the past nor
to the future. The important thing is to remain wholly in the present’. That sentence
struck me right in the heart, so I’m entitled to it.
-Hannah Arendt
रोचक्
ही तुझी मते बघुन तुझा मार्केट मेकॅनिझम वर अजिबात विश्वास नाही असे मला वाटते.
सकृतदर्शनी जे दिसतं तेच प्रकर्षाने जाणवतं, अनु.
अनु राव हा आयडी सकृतदर्शनी दिसतो. त्याच्या मागे असलेली व्यक्ती कधी तरी जाणवते का ?
आता Frederic Bastiat चं "What Is Seen and What Is Not Seen" वाचून टाक. म्हंजे तुला आत्मसाक्षात्कार होईल.
तुम्ही दोन गायिकांची तुलना
तुम्ही दोन गायिकांची तुलना करुन लता भारी होती असे म्हणा काही हरकत नाही, मी सुद्धा तसे म्हणेन. पण पॉईंट तो नाहिचे.
एखाद्या गाण्याचा उल्लेख करताना ते गाणे लताचे/रफिचे आहे असे म्हणणे मुद्दलात चुकीचे आहे हे मी गब्बुला सांगत होते. गब्बूला अनेक वेळेला सांगितले आहे, पण त्याला कळत नाही.
सिनेमा दिग्दर्शकाचा असतो हे पण जाता जाता सांगुन जाते.
एखाद्या गाण्याचा उल्लेख
एखाद्या गाण्याचा उल्लेख करताना ते गाणे लताचे/रफिचे आहे असे म्हणणे मुद्दलात चुकीचे आहे हे मी गब्बुला सांगत होते. गब्बूला अनेक वेळेला सांगितले आहे, पण त्याला कळत नाही. सिनेमा दिग्दर्शकाचा असतो हे पण जाता जाता सांगुन जाते.
पिडां काकांचे मत पण साधारण अनु सारखे च आहे. याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाल्याचे आठवतेय. खव मधे.
थत्तेचाचा, तुम्ही गल्ली चुकता
थत्तेचाचा, तुम्ही गल्ली चुकता आहात. गाणे ही कलाकृती समजत असाल तर त्याचे क्रेडिट कोणाला द्यायचे हा प्रश्न आहे. ते क्रेडीट नो डाउट संगीतकाराचे आणि गाणे लिहिणाऱ्याचे आहे. ते आपल्या कानापर्यंत पोचवण्यासाठी आवाज ठीकठाक सुरेल असला तरी चालुन जाते. म्हणुनच तुम्ही टिव्हीवरचे सारेगम सारखे प्रोग्रॅम एन्जॉय करु शकता ( जरी गाणारे लता, रफी नसले तरी ) आणि ते "एक शाम रफी के नाम" सारखे सुद्धा.
गब्बु ला जरी ते मुळ क्रेडिट कोणाचे आहे कळत नसले तरी सिनेमा व्यवसायाला मात्र कळले पहिल्यापासुनच. म्हणुन संगीतकाराला गाणाऱ्या पेक्षा खुप पटीने जास्त पैसे दिले जायचे. शं.ज. सारख्या लोकांना तर कधी कधी सिनेमाच्या टोटल बजेट च्या १०-१५% सुद्धा पैसे मिळाले आहेत.
संगीतकार गाणे कोणाला द्यायचा हे शक्यतो ठरवायचा.
चाल आणि शब्द उत्तम असतिल तर हेमलता नी तिच गाणी गायली असती तरी आपल्याल आवडलीच असती. विजयता पंडीत, सुधा मल्होत्रा, अगदी मीना कपुर, शमशाद बेगम काही फार भारी गायिका नव्हत्या, पण त्यांची गाणि हीट झालीच.
ओके पण १५% मानधन घेणारे शंज
ओके पण १५% मानधन घेणारे शंज (लताशी भांडण नसण्याच्या काळात) हेमलताला/शारदाला घेऊन गाणी का रेकॉर्ड करत नसत हा प्रश्न सयुक्तिक आहे की नाही?
सारेगम मध्ये जुनी गाणी लोक ऐकतात ती ते गाणे एन्जॉय करण्यासाठी नाही तर गाणारा स्पर्धक मूळ गायकाच्या किती टक्के खाली आहे त्याची तुलना करण्यासाठी ऐकतात.
गब्बु ला जरी ते मुळ क्रेडिट
गब्बु ला जरी ते मुळ क्रेडिट कोणाचे आहे कळत नसले तरी सिनेमा व्यवसायाला मात्र कळले पहिल्यापासुनच. म्हणुन संगीतकाराला गाणाऱ्या पेक्षा खुप पटीने जास्त पैसे दिले जायचे. शं.ज. सारख्या लोकांना तर कधी कधी सिनेमाच्या टोटल बजेट च्या १०-१५% सुद्धा पैसे मिळाले आहेत.
हे माहीती नव्हते मला.
लता व आशा ची ड्युओपोली असूनही आणि संगीतकारांमधे अनेक* जण स्पर्धा करणारे असूनही !!!
*म्हंजे शंकर जयकिशन च्या कालात सुद्धा मदनमोहन, नौशाद, अण्णा, एसडी बर्मन असे दिग्गज स्पर्धक असूनही.
---
चाल आणि शब्द उत्तम असतिल तर हेमलता नी तिच गाणी गायली असती तरी आपल्याल आवडलीच असती. विजयता पंडीत, सुधा मल्होत्रा, अगदी मीना कपुर, शमशाद बेगम काही फार भारी गायिका नव्हत्या, पण त्यांची गाणि हीट झालीच.
सुरय्या, गीतादत्त, कमल बारोट यांचं काय ?
आयमिन धांडोळा घेत च आहात तर यांच्याबद्दल पण तुमचे मत सांगून टाका.
.
बोर्डावर मंगेश पाडगावकरांचं
बोर्डावर मंगेश पाडगावकरांचं "असा बेभान हा वारा" गाणं लावलंत ते आवडतं आहे. बाळासायबांचे संगीत सुद्धा झक्कास. निर्णयन मंडलाचे मायंदाळ आभार
कवितेतल्या काही ओळी ऐकून फेमिनीस्ट मंडळी वैतागली कशीकाय नाहीत ?
उदा.
(१) जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?
(२) तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
इश्श!
स्त्रिया कसा विचार करतात हे बाप्यांना समजत नाही, याचा आणखी एक पुरावा. असल्या पकावपणावर वैतागायचं कशासाठी? (तुम्ही सारखं 'फडतुसांना मारून टाका', 'पॅलेस्टाईन नष्ट करा', 'पाकिस्तानवर अणूबाँब टाका', वगैरे लिहिता. इथे कोणी वैतागतं का त्यावर?) माशा वारण्याची सवय सगळ्या भारतीयांना असते.
वासना
१) जिवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?
(२) तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
मुळात बेभान वारा, लाटा, गाव बुडाले, कुळाचे लौकिकाचे धागे तोडले, वगैरे गोष्टी म्हणजे आपल्या शुद्ध वासनापूर्तीसाठी सगळं काही सोडून आलेली ती प्रेयसी आहे. बाकी सौभाग्य वगैरे उगीच ममवना फार धक्काबिक्का बसू नये एवढ्यापुरतं तोंडीलावणं आणि थोडी पुरुषाला जरब म्हणून. थोडक्यात, ही उन्मुक्त वगैरे स्त्री आहे. फ्लेम अलर्ट :-)
I Believed that Communism
I Believed that Communism Would Liberate the World from Oppression. I Was Catastrophically Wrong.
Max Eastman (1883-1969) was born on this date. He was an ardent socialist in early life but matured into a true lover of liberty.
प्रेमनाथ चं अजून एक. पडद्यावर
प्रेमनाथ चं अजून एक. पडद्यावर प्रेम नाथ, मधुबाला, व दुर्गा खोटे. लताबाईंचा अतिकोमल आवाज.
.
.
.