मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६३
आमचा एक एमडी होता. तो म्हणाला की - प्रत्येक एक्सटेंडेड कुटुंबा मधे एक gone case मुलगा असतो. एक्सटेंडेड कुटुंब म्हंजे सगळे काका, आत्या वगैरेंच्या कुटुंबांचं मिळून एक बृहदकुटुंब. हां ... तर ... प्रत्येक एक्सटेंडेड कुटुंबा मधे एक gone case मुलगा असतो. and if you do not know who that is ... chances are ... it is you.
मनात म्हंटलं हे तर देशातल्या कम्युनिटीसाठी सुद्धा लागू पडत असावं का ?
If "a particular" community does not know which community is a gone case ... chances are ... "that" community is a gone case.
(ऐसीवरचा gone case मुलगा कोण हे जर माहीती नसेल तर ....)
म्हणजे बॅट्यानी स्वताला फक्त
म्हणजे बॅट्यानी स्वताला फक्त एमसीपी म्हणवुन न घेता हिंदुत्ववादी एमसीपी का म्हणवुन घेतलय?
ब्याट्या हिंदुत्ववादी आहे याबद्दल मला शंका आहे. ब्याट्या हिंदूवादी असेल. हिंदुत्ववादी असेलसे वाटत नाही.
सोप्पंय
>> थत्तेचाचा, तुमच्या एमसीपी असण्यात आणि बॅट्याच्या हिंदुत्ववादी एमसीपी असण्यात मुलभुत फरक काय आहे?
>> इथे मला अर्थ, उद्देश जाणुन घ्यायची नहान लागलीय
>> ब्याट्या हिंदूवादी असेल. हिंदुत्ववादी असेलसे वाटत नाही.
दोघांतला फरक अगदी उघड आहे. थत्ते कन्सिस्टंटली सिक्युलर एमसीपीपणा करतात, तर बॅट्या मोदीभक्तांसमोर सिक्युलर असतो आणि इथल्या फुरोगामींसमोर हिंदुत्ववादी असतो. खरा बॅट्या फार तर हिंदू असेल, हिंदूवादी असण्याबद्दलही मला शंकाच आहे.
शनीचा फेरा
>> मी विचारतीय "सिक्युलर एमसीपीपणा" आणि "हिंदुत्ववादी एमसीपीपणा" मधला फरक.
हिंदुत्ववादी एमसीपी म्ह्णेल की शनि शिंगणापुरात बायकांना प्रवेश नको. उगीच परंपरा का मोडायच्या? सिक्युलर एमसीपी म्हणेल की बायकांनी मंदिरात जावं (नाही तरी कुठेही गेल्या तरी काय दिवे लावणार आहेत?), पण मशिदीत जाण्यासाठी मात्र हट्ट करू नये.
हिंदुत्ववादी एमसीपी म्हणेल की माझ्या बायकामुलींनी अंगभर कपडे घालावेत, पण सिम्बीतल्या किंवा फर्ग्युसनमधल्या मुलींनी मला रस्त्यावर तंग आणि कमी कपड्यांमधून अंगप्रत्यांगं दाखवावीत. सिक्युलर एमसीपी पण तेच म्हणेल; फक्त 'मुस्लिम बायकांना बुरखा घालू देत घालायचा तर' अशी तळटीप जोडेल.
वाह
तगडा अभ्यास आहे!
पण मशिदीत जाण्यासाठी मात्र हट्ट करू नये.
एक दुरुस्ती. सिक्युलर एम्सीपी हुषार असतात. ते असं डायरेकली नाही म्हणणार. पण शनि-शिंगणापूरला फुल्ल जोर लावणार, खूप आरडा ओरडा करणार चेपू, आंजावर. पण मशिदीच्या वेळेला स्वतःहून काही बोलणार नाहीत. कोणी हटकलच तर "हो हो.. आमचाही पाठिंबा आहे." अशी प्रतिक्रिया देणार.( किंवा डायरेक भारतीय संस्कॄतीतला स्त्रीयांचा हजारो वर्षांचा दमनाचा इतिहास अशी टेप लावणार.)
सिक्युलर एम्सीपी हुषार असतात.
सिक्युलर एम्सीपी हुषार असतात. ते असं डायरेकली नाही म्हणणार. पण शनि-शिंगणापूरला फुल्ल जोर लावणार, खूप आरडा ओरडा करणार चेपू, आंजावर. पण मशिदीच्या वेळेला स्वतःहून काही बोलणार नाहीत. कोणी हटकलच तर "हो हो.. आमचाही पाठिंबा आहे." अशी प्रतिक्रिया देणार.
यग्झाक्टली.
( किंवा डायरेक भारतीय संस्कॄतीतला स्त्रीयांचा हजारो वर्षांचा दमनाचा इतिहास अशी टेप लावणार.)
ते वायले. ही टेप लावणारे लोक म्हणजे एमसीपीचा फीमेल कौंटरपार्ट.
सर्टिफिकेट
एतद्द्वारा प्रमाणित करण्यात येते की, श्री. नितिन थत्ते हे हिंदुत्ववादी आहेत.
- 'न'वी बाजू
सचिव, अखिल वैश्विक हिंदुत्ववाद तथा हिंदुत्ववादी प्रमाणन महामंडळ.
..........
(घ्या. सर्टिफिकेट.)
..........
(हम्म्म्म्... बिनभांडवली धंदा वाईट नाही.)
..........
(प्रस्तुत प्रमाणपत्र प्रमोशनल तत्त्वावर विनाशुल्क देण्यात आलेले आहे. इत:पर अधिकच्या प्रमाणपत्रांकरिता माफक शुल्क आकारण्यात येईल. दोन प्रमाणपत्रांमागे तिसरे फुकट. सवलतीची योजना लवकरच संपुष्टात येत आहे. त्वरा करा आणि आजच या योजनेचा लाभ घ्या.)
..........
काय की
बाहेर तापमान ४० अंश वगैरे असताना रस्त्यात चालून पाहा - रस्त्यावर झाडांची सावली असते तेव्हा कसं वाटतं आणि नसते तेव्हा कसं वाटतं ते. झालंच तर, आमच्या आसपास सध्या बहावा, गुलमोहोर, आणि काय काय रंगीबेरंगी फुलून ओसंडतं आहे. या आमच्या पुण्यात जरा डोळे थंड करायला ;-)
झाडं वाचवणं/वाढवणं हे इतकं
गेल्या काही वर्षात "भारतीय वृक्ष विरुध्द विदेशी वृक्ष " असे वर्गीकरण करून भारतीय वृक्ष लावणे चांगले पण विदेशी लावणे घातक असा प्रचार एका गटाने चालवलेला आहे. भाबड्या देशभक्तीला आवाहन करून पर्यावरणवाद्यांची रिक्रुटमेन्ट वाढवण्याचा तो प्रकार असावा. पण सर्व मासे जसे सारखे लागत नाहीत तसेच सर्व वृक्ष सगळीकडे उपकारक असतातच असे नाही हे मात्र खरे.
लाउड थिंकींग
चेतावनी: अतिशय लाऊड थिंकींग करतो आहे. मुद्द्यांतून उअपमुद्दे फुटले आहेत.
झाडे वाचवून फायदा आहेच.
मात्र समजा काही कारणांसाठी झाडे तोडावी लागली (उदा, रोड वाइडनिंग किंवा मुळांच्यामुळे बिल्डिंगलाच धोका निर्माण झालाय) किंवा काही फांद्या छाटाव्या लागल्या (उदा. घरात फांद्या येताहेत) आणि आपण झाड तोडायचे की मग असे म्हटले की "हा आला पर्यावरणाचा संहारक. झाड तोडायचं म्हणतो. अब्रहण्यम!!" अशा ज्या रिअॅक्शन्स येतात (किंवा वर प्र ची जी रिअॅक्शन होती ;) ) हे झाड म्हणजे काहीतरी इतकं थोर करून ठेवलंय की पुछो मत!
मी काय लगेच कुर्हाडी घेऊन झाडं तोडुया नै म्हणत आहे. पण कमॉन ती फक्त झाडं आहेत.
एकटी phytoplankton नावाची पाणवनस्पती पृथीवरचा ६० ते ८५% ऑस्क्सीजन जन्माला घालते. ती ही समुद्रात असते. एकेक करून अनेक झाडं तुटतील ही भिती साधार असली तरी जिवंत पिढ्यांच्या काही अपरिहार्य तजवीजीपेक्षा ४०० ऐवजी माणून ३९० वर्षे जगला यापलिकडे नक्की काय होईल?
एकीकडे जिवंत माणसांच्या झोपडपट्ट्या उडवून लावा म्हणून ओरडा करणारे अनेकदा झाडावरचे पक्षी आणि त्यांची घरटी याबद्दल कढ काढताना दिसतात. नक्की काय महत्त्वाचे?
मला चार झाडे उडवून तिथे झोपडपट्टीवासियांसाठी घरे येत असतील तर अधिक आवडेल!
==========
दुसरं वृक्ष अधिक कॉस्ट एफेक्टिव्ह की शेती? म्हणजे एक वृक्ष तोडून त्याच्या एकुण घेराइतकी शेती केली तर पर्यावरणाचं नेमकं काय नुकसान होतं?
पण यातून माझाच मुद्दा
पण यातून माझाच मुद्दा अधोरेखित होतो आहे. झाडे वाचवून फायदा आहेच.
बाकी
एकीकडे जिवंत माणसांच्या झोपडपट्ट्या उडवून लावा म्हणून ओरडा करणारे अनेकदा झाडावरचे पक्षी आणि त्यांची घरटी याबद्दल कढ काढताना दिसतात. नक्की काय महत्त्वाचे?
या दोहोंत अंतर्विरोध वाटला तरी तो वेगळ्या पातळीवरचा आहे. बेसिकली प्रदूषण नकोय या भूमिकेतून कधी झोपडपट्ट्यांचा विरोध तर कधी पक्ष्यांबद्दलचा उमाळा येतो. हे पक्ष्यांबद्दलचे उमाळे काढणारे लोक झोपडपट्टीला विरोध करतात याचा अर्थ त्यांनी जगू नये असे मानतात असे नाही.
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे- भूमिकेत अशी निश्चित हायरार्की असण्याने नक्की काय सिद्ध होतं? समजा माझं एक लाडकं कुत्रं आहे आणि काही माणसांपेक्षा मला त्याचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं वाटतं, काही माणसे मेली तरी त्यांच्यापेक्षा कुत्र्याच्या मृत्यूचं दु:ख मला जास्त होईल. यात नुकसान काय आहे?
यात काही माणसं व्यक्तिपरत्वे बदलतील. कुणासाठी काही माणसं = फडतूस, तर कुणासाठी गुन्हेगार किंवा अजून कोणी असतील. मुद्दा इतकाच, की कुणाचे/कशाचे महत्त्व वाटावे हा पर्सनल मामला आहे. सरसकट ह्यूमन > नॉनह्यूमन अशी हायरार्की करायची गरजच नाहीये इतक्या फर्मलि माणूस डॉमिनंट आहे सध्या पर्यावरणात.
वर प्रतिसाद देताना अगदी
वर प्रतिसाद देताना अगदी बोटांवर आलं होतं, आठ-दहा शब्द टंकलेही होते पण मग वाटलं इतका कीस काही निघायचा नाही म्हणून कंटाळा करून उडवलं लिहीलेलं. पण...
हेच लिहीणार होतो, की 'रस्त्यात मधे येणारं, वाहतुकीला अडथळा/धोकादायक असणारं असले फाटे फोडत बसू नये. मनातला प्रश्न सहज, सुट्टा विचारलाय तर त्याला जर-तरचे फाटे नकोत.'
एकीकडे जिवंत माणसांच्या झोपडपट्ट्या उडवून लावा म्हणून ओरडा करणारे अनेकदा झाडावरचे पक्षी आणि त्यांची घरटी याबद्दल कढ काढताना दिसतात. नक्की काय महत्त्वाचे?
मला चार झाडे उडवून तिथे झोपडपट्टीवासियांसाठी घरे येत असतील तर अधिक आवडेल!
जिवंत माणसांच्या झोपडपट्ट्यांपेक्षा झाडावरचे पक्षी जास्त महत्त्वाचे का वाटू नयेत कोणाला? मला वाटतात. मला माझ्या घराभोवती असणारी झाडं झोपडपट्टी पुनर्वसनापेक्षा जास्त प्यारी असतील.
हो झाडं मध्ये येतात कधी कधी-
हो झाडं मध्ये येतात कधी कधी- अगदी माणसं मरूही शकतात. पण रस्तेरूंदी वगैरे करताना निदान झाडे न तोडता काम होणार आहे का हे विचारात घेतलं जावं. कदाचित डिझाइन थोडं बदलून झाडांसकट नवीन लेन करणं शक्य होत असावं.
औंध रोड (पुणे) रूंदी करण होणार आणि त्यात बरीच झाडे जाणार असं ऐकलं आहे !
पण कमॉन ती फक्त झाडं आहेत.
हे विधान कोण कधी म्हणतं ते फार महत्त्वाचं आहे. झाडं वाढेपर्यंत माणसाच्या एक दोन (किंवा कित्येक सुद्धा) पिढ्या जातात, ती कापायच्या आधी निदान न कापता काम होऊ शकेल का इतकं तरी बघणं आवश्यक आहे.
ग्लोबल वॉर्मिंग वगैरे जाऊद्या- बसस्टॉपव्र उभे राहतो तेव्हा वर एखाद्या झाडाची कॅनपी असेल तर किती बरं असतं ! दरवेळी एक झाड म्हटलं की या एकातून असा कितीसा ऑक्सिजन मिळतोय असे आकडे दाखवून काय फायदा ?
"दुसरं वृक्ष अधिक कॉस्ट एफेक्टिव्ह की शेती? म्हणजे एक वृक्ष तोडून त्याच्या एकुण घेराइतकी शेती केली तर पर्यावरणाचं नेमकं काय नुकसान होतं? "
वृक्ष म्हणजे ऑक्सीजन सोडणारी मशीन,किंवा अमुक एवढा जैवभार वगैरे अशी काहीतरी मर्यादित व्याख्या असेल तर तेवढ्यापुरतच या प्रश्नाचं उत्त्र काढता येइलही ! पण मुळात शेत आणि वृक्ष यांचा माणसाच्या दृष्टीकोनातून रोल वेगवेगळा आहे.
मला चार झाडे उडवून तिथे झोपडपट्टीवासियांसाठी घरे येत असतील तर अधिक आवडेल!
खवचटपणे म्हणायचं तर- "तुमच्या आवारातली चार झाडं तोडून उभारा की तिथे झोपडपट्टीवासियांसाठी घरे."
(हे स्र्व तुम्हालाच काय इथे सगळ्यांना माहित आहे.तरीही लिहिले.)
मला चार झाडे उडवून तिथे
मला चार झाडे उडवून तिथे झोपडपट्टीवासियांसाठी घरे येत असतील तर अधिक आवडेल!
अनेक प्रशासकीय बिल्डिंगा ज्या संध्याकाळी ६ नंतर कोणीही वापरत नाही (उदा. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, विधीमंडल, सचिवालय, तहसिलदार कचेरी) यांमधे रात्री बेघरांना फक्त झोपण्यापुरती जागा का दिली जाऊ नये (म्हंजे सकाळी ती जागा पुन्हा ताब्यात घ्यायची. वाटल्यास त्यां बेघरांनाच ती जागा साफ करायचे पैसे पण द्यायचे.) ? बघा जमतंय का.
दिवसा आणि रात्री
झाडे दिवसा फोटोसिन्थेसिसमध्ये हवेतून कार्बन डायॉक्साइड घेऊन प्राणवायू बाहेर सोडतात. रात्री श्वसनाद्वारे कार्बन डायॉक्साइड सोडतात. या संपूर्ण क्रियेत प्राणवायूचे प्रमाण झाडांमुळे नक्की किती वाढते? माणसे आणि पशुपक्षी दिवसरात्र प्राणवायू शोषून कर्बद्विप्राणिल वायू उत्सर्जन करतात, त्या मानाने झाडे बरी हे विधान योग्य आहे का? म्हणजे झाडांमुळे प्राणवायूमध्ये निव्वळ घट होत नाही म्हणून? [इथे झाडांचे इतर उपयोग क्षणभर बाजूला ठेवू. जसे की झाडांची मुळे माती धरून ठेवतात, पाने गळून जमीन झाकली गेल्यामुळे जमीन कोरडी पडत नाही वगैरे. (सुकलेल्या पानांत सेल्यूलो़ज़ नसल्यामुळे ती शेतीस उपयुक्त बॅक्टीरियांना उपयोगी नाहीत हे नुकतेच इथेच वाचले.) शिवाय फळे-फुले मिळतात इ. ]
हो आहेच. झाडांना पर्यावरण
हो आहेच. झाडांना पर्यावरण प्रेमाचे प्रतिक म्हणून जाहीर झाल्या मुळे त्यां च्या बद्दल नकारात्मक बोलणे पर्यावरण द्रोहाच मानला जातो.
पण सरसकट सर्व झाडे सारखी नसतात. कित्येक मनुष्य वस्ती जवळ वाढल्याने pollan alergy सारखे आरोग्याचे प्रोब्लेम्स निर्माण करतातच. उन्हाळ्यात जरी सावली हवीशी वाटत असली तरी हिवाळ्यात हवेसे उनही अडवतात. वारा तर नक्कीच अडतो. वगैरे
उंदीर खरी घरात येतात. नारळ पडून गाड्या आणि डोकी फुटतात. तेंव्हा झाडे लावताना जरा जपून. एकदा लावले कि काढताना अत्यंत मठ्ठ कायदे आणि अत्त्यंत भ्रष्ट वृक्ष समिती सदस्य आडवे जातात. स्थलांतरात जगण्याची अजिबात शक्यता नसताना तीस तीस फुट उंचीची झाडे हलवायाच्या अटी वर नवीन बांधकामाला परवानगी दिली जाते. तीस चाळीस हजार खर्च करुनी ते अखेर मरतेच.
स्थलांतरात जगण्याची अजिबात
स्थलांतरात जगण्याची अजिबात शक्यता नसताना तीस तीस फुट उंचीची झाडे हलवायाच्या अटी वर नवीन बांधकामाला परवानगी दिली जाते. तीस चाळीस हजार खर्च करुनी ते अखेर मरतेच.
यावरती उपाय म्हणून झाडाची साल सोलवटून काढतात. काही दिवसात झाड मरतेच असा निर्घृण प्रकार ऐकला होता. अर्थात निर्घृण आहे की ती अतिशयोक्ती आहे हा वादाचा मुद्दा.
सरसकट झाडे शहरांत नकोच.
दाट घरे आणि इमारतींच्या शहरांत झाडे लावताना फार काळजी घ्यावी लागते किंवा घेतली गेली पाहिजे. फाय्कस कुळांतली झाडे अजिबात लावू नयेत, ती कितीही पवित्र असली तरी. त्यांची मुळे काँक्रीटची बांधकामे खिळखिळी करतात. प्रसार वेगाने होतो. फांद्या आडव्यातिडव्या पसरतात आणि 'पाप' म्हणून मजूर लोक त्या तोडायला तयार होत नाहीत. ड्रेनेज-पाइपवर उगवलेल्या पिंपळाच्या खोडाच्या आधाराने घरात चोर शिरलेले माहीत आहेत. नारळ खाली पडून गाड्यांचे नुकसान होते. अलीकडे काहीवेळा वानरांच्या झुंडीने नारळाच्या आतले खोबरे फस्त करून रिकामे एका बाजूने फोडलेले नारळ इतस्ततः भिरकावून दिलेले पाहिले आहेत. जुहूच्या बंगल्याच्या आवारात नारळाची पन्नासेक झाडे असलेले मालक त्यांची व्यथा सांगताना म्हणाले की फळती झाडे तोडणे जिवावर तर येतेच पण परवानगी मिळत नाही. आणि उंच झाडे तोडणे फार खर्चिक असते. एका झाडावर चढून नारळ उतरवण्याच्या कामाचे मापले लोक तीनशे ते पाचशे रुपये घेतात. शिवाय नारळ सोलण्याचे वेगळे. शिवाय सालांचा, किशीचा प्रचंड कचरा होतो तो ट्रक आणि मजूर बोलवून उचलण्याचे आणखीनच वेगळे. इतर झाडांपैकी गुलमोहर, शंकासुर, चाफा, पेरू, सीताफळ ही झाडे अगदी अचकुल असतात. कधीही तुटून पडू शकतात. जुन्या अशोकाच्या (आशुपालव)झाडांना वाळवी लागते आणि ती सर्वत्र पसरते. आमच्या भागात इमारतींत फणसाची झाडे आहेत. फणस उतरवायला कोणी मिळत नाही आणि शेवटी ते पिकून बदकन खाली पडतात. पिकलेली उंबरे आणि जांभळे खाली जमिनीवर फार निसरडे करतात. शेवटी, 'हाती नाही बळ, दारी नाही आड | तेणे फुलझाड लावू नये || हेच खरे.
डॉक्टर
१) डॉक्टर मंडळी आयकर कसा भरतात ? म्हणजे नोकरदाराचे जसे पगाराचे आकडे पासबुकात तपासता येतात, व्यावसायिकांची खरेदी-विक्री पुस्तके तपासता येतात, तसे यांचे नक्की काय तपासले जाते ? की ते म्हणतील ती कमाई ग्राह्य मानली जाते ?
२) ह्या मंडळींना कर्ज मिळताना 'प्रोफेशनल्स" म्हणून त्वरीत कर्ज मंजुरी मिळते का ?
ऐसीवरच्या तांत्रिकांना उद्देशून एक प्रश्न.
ऐसीच्या खव आणि खफ या दोन्हीकडे एक समान फीचर दिसते आहे. दोन्हीकडे सर्वांत रीसेंट जी खरड असेल ती स्वहस्ते लिहिली किंवा चोप्य पस्ते केली आणि 'खरडा' वर क्लिक केले तर रिपीटवाली खव दिसत नाही. एक कण्डिशन म्हणजे त्या खरडीत कोणताही स्मायली नको.
उदा. "अच्चेदिन" ही सँपल खरड लिहा आणि ती प्रकाशित झाल्यानंतर लग्गेचच तीच खरड लिहा किंवा चोप्यपस्ते करा. दिसत नाही.
तर ही नेमकी काय भानगड आहे? ड्रुपलचं काही फीचर आहे का?
मजा म्हणजे कुठल्याही धाग्यावर मात्र रीसेंट प्रतिसादाखाली (त्याला प्रतिप्रतिसाद म्हणून नव्हे, स्वतंत्र प्रतिसाद) तोच प्रतिसाद चोप्यपस्ते केला तर दिसतोय. सो ह्या भेदभावाचे कारण काय?
मॉड्यूल निराळं आहे.
प्रतिसादांपेक्षा खव+खफ यांचं मॉड्यूल निराळं आहे. दोनदा प्रतिसाद प्रकाशित होतात कारण कधीकधी संस्थळाचा वेग मंदावतो (क्वचित कधी हे आपल्या कंप्यूटरच्या मंदावण्यामुळेही होत असेल). तेव्हा आपण प्रतिसाद प्रकाशित झाला नसेल असं समजून 'प्रकाशित करा' हे बटण दुसऱ्यांदा दाबतो. मग प्रतिसाद एकापेक्षा अधिक वेळा प्रकाशित होतो.
खफवरची ही चोप्य-पस्ते अडचण माझ्याकडे येत नाही. (लिनक्स+फाफॉचं अद्ययावत रूप.) त्यामुळे मला शंका आहे की हा ड्रूपाल+कोणतीशी ती बेकार ओएस (विंडोज का काय ते म्हणतात ना?) आणि कोणतासा ब्राऊजर असं काहीतरी लफडं असणार.
दोनदा प्रतिसाद प्रकाशित होतात
दोनदा प्रतिसाद प्रकाशित होतात कारण कधीकधी संस्थळाचा वेग मंदावतो (क्वचित कधी हे आपल्या कंप्यूटरच्या मंदावण्यामुळेही होत असेल). तेव्हा आपण प्रतिसाद प्रकाशित झाला नसेल असं समजून 'प्रकाशित करा' हे बटण दुसऱ्यांदा दाबतो. मग प्रतिसाद एकापेक्षा अधिक वेळा प्रकाशित होतो.
अंहं. हेतुपुरस्सर डुप्रतिसाद दिला तरी होतोय पेस्ट.
खफवरची ही चोप्य-पस्ते अडचण माझ्याकडे येत नाही. (लिनक्स+फाफॉचं अद्ययावत रूप.) त्यामुळे मला शंका आहे की हा ड्रूपाल+कोणतीशी ती बेकार ओएस (विंडोज का काय ते म्हणतात ना?) आणि कोणतासा ब्राऊजर असं काहीतरी लफडं असणार.
मेबी. पण खफवर तुम्हीच केलेल्या प्रयोगावरून लिनक्स + अग्निकोल्हा वापरूनही दोनदा खरड येत नसल्याचे कसे काय दिसले?
नै, फोनवरून वेगळे वापरलेय म्हणजे ओएस ब्राउज़र इश्श्यूच. माय बॅड.
कोणासही कोणत्याही
टार्गेट नावाच्या एका डिपार्टमेंटल स्टोअर ने हे धोरण जाहीर केलेले आहे.
we welcome transgender team members and guests to use the restroom or fitting room facility that corresponds with their gender identity.
स्त्रीयांसाठी प्रसाधनगृहेच नाहीयेत पुरेशी, त्यासाठी राईट टू पी ची चळवळ चालू आहे - हा एक व्हॅलिड मुद्दा आहे पण त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित नाही. दुसरे म्हंजे - स्त्रियांना उभे राहून सुसु करता येत नाही व पुरुषांना उभे राहून सुसु करता येते यात काहीही मोठा पुरुषार्थ नाही - हे सुद्धा घासून गुळगूळीत झालेले आर्ग्युमेंट आहे. तेव्हा कमोड कशाप्रकारचा असावा (बसून सुसु करण्यास पूरक की उभे राहून सुसु करण्यास पूरक असावा) याबद्दल ही चर्चा नाही.
एकमेकांच्या रेस्टरुममध्ये जऊन
एकमेकांच्या रेस्टरुममध्ये जऊन काय भेदभाव-विहीनतेचा तीर मारतायत देवच जाणे. बरेचसे हट्ट, आग्रह, दुराग्रह आजकाल कळतच नाहीत. वय झालं आता.
___
एकदा पोट भरलं, बेसिक प्रश्न सुटले की आपण अशा चळवळी करायला मोकळे. वादग्रस्त मत - ट्रान्स्जेंडर लोकं विचीत्र वाटतात. काही केसेस जेन्युइन असतील पण आजकाल एवढं पेव का फुटलय तेच कळत नाही.
स्वतंत्र रेस्टरुम का हव्यात?
मुळात स्त्रीया आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे (रेस्टरुम) का हव्यात? युनीसेक्स रेस्टरूम्स का बनवत नाहीत ज्या कुणीही वापरू शकेल. प्रत्येक रेस्टरुममध्ये भारतीय पद्धतीचा संडास किंवा पाश्चात्य कमोड द्यायचा. पाण्याची बचत व्हावी म्हणून दोन साखळ्या द्यायच्या. एका साखळीने मुतारीसाठी कमी पाणी वापरले जाईल आणि दुसर्या साखळीने संडाससाठी जास्त पाणी वापरता येईल, अशी सोय द्यावी. युनीसेक्स रेस्टरूम्समुळे भारतासारख्या ठिकाणी, जिथे स्त्रीयांची खूपच कुचंबणा होते, तिथे मदत होईल. (मात्र प्रसाधनगृहात जे अश्लील लिखाण केले जाते, ते वारंवार साफ करावे मागेल, हा एक तोटा वाटत आहे). परदेशातसुद्धा युनीसेक्स रेस्टरूम्स करणे सोपे आहे. त्यामुळे ट्रान्सजेण्डरना पण सोय होईल, काही वाद होणार नाहीत. शिवाय फेमिनिस्ट पण खूष होतील, हा अजून एक अवांतर फायदा.
रेल्वेच का? घरात सुद्धा कॉमनच
रेल्वेच का? घरात सुद्धा कॉमनच असतात की !!
प्रसाधन गृह जेव्हा लघवी करणे + शौचास जाणे दोन्हीसाठी असते तेव्हा ती युनिसेक्सच असतात. केवळ लघवी करणे या उद्देशाची स्वच्छतागृहे पुरुषांसाठी सिंपल असतात. म्हणून ती संख्येने जास्त असू शकतात. आणि अशा केवळ लघवीसाठी असलेल्या पुरुषांच्या स्वच्छता गृहात महिलांना प्रवेश देऊन काही साध्य होणार नाही.
I feel therefore I am.
स्त्रीयांसाठी प्रसाधनगृहेच नाहीयेत पुरेशी, त्यासाठी राईट टू पी ची चळवळ चालू आहे - हा एक व्हॅलिड मुद्दा आहे पण त्याबद्दल इथे चर्चा अपेक्षित नाही.
असं मुद्दाम लिहिण्यात काय हशील हे समजलं नाही. जिथे 'राईट टू पी' चळवळ सुरू आहे त्या देशात ट्रान्सजेंडर असण्याला सरकारी, निमसरकारी किंवा सरकार बाहेरचे फार भाव देतात असं दिसत नाही. ज्या देशात ही गडबड सुरू आहे तिथे पुरेशी स्वच्छतागृहं उपलब्ध आहेत. पण ते एक असो.
शस्त्रक्रिया करून लिंगबदलाची प्रक्रिया पूर्ण करून घेतलेल्या ट्रान्स लोकांबद्दल काही प्रश्न उद्भवू नये. ज्यांना आपण चुकीच्या शरीरात जन्माला आलो आहोत असं वाटतं, पण शस्त्रक्रिया केलेली नाही त्यांना आपापल्या लैंगिक धारणांच्या प्रसाधनगृहात जाऊ द्यावं. स्त्रिया आणि पुरुषांसाठी एकच प्रसाधनगृह बनवल्यास पुरुषांचीही कमी अडचण होईल असं वाटत नाही; अशा मागण्याही फार दिसत नाहीत. तेव्हा त्या मुद्द्यावर सध्या चर्चा करण्यात हशील दिसत नाही.
स्त्रियांच्या प्रसाधनगृहात असा एखादा 'पुरुष' दिसला तर मी सुरुवातीला दचकेन. मग हळूहळू मला त्याची सवय होईल आणि कालांतराने काही वाटेनासं होईल.
ट्रान्सजेंडरांच्या प्रश्नाचं या प्रसाधनगृहाच्या मुद्द्यामुळे सरलीकरण होतंय, अशी भीती मात्र वाटते.
स्त्रियांच्या प्रसाधनगृहात
स्त्रियांच्या प्रसाधनगृहात असा एखादा 'पुरुष' दिसला तर मी सुरुवातीला दचकेन. मग हळूहळू मला त्याची सवय होईल आणि कालांतराने काही वाटेनासं होईल.
पण अदिती जिथे पीपींग टॉम सारख्या, फ्लॅशिंग सारख्या घटना सर्रास घडतात (एकंदर सगळीकडेच) तिथे शांतीने कार्यभाग उरकता येइलसं वाटतं तुला? साधं कोणी स्त्री आत आली आणि अनावधानाने बंद (मी आत असलेल्या) दाराच्या फटीजवळ चुकून रेंगाळली तरी मला भीतीचा शहारा येतो. हे असे २-३ वेळा झालेले आहे.
स्त्रिया विकृत नसतात का काय!
समजा कोणी विकृत व्यक्ती असेलच, तर ती व्यक्ती पुरुषाच्या शरीरातच जन्माला आलेली असेल याची काय खात्री आहे? त्यापेक्षा फटीविरहीत क्यूबिकल्स बनवणं हा सोपा, खर्चिक पण पुरोगामी उपाय नाही का?
(अवांतर - बऱ्या अर्ध्याला सगळ्यात जास्त कटकट घरीच होत असेल. "तू तिथे झोपतोस का कादंबऱ्या वाचतोस?" असे प्रश्न बाहेरचे लोक विचारत नाहीत.)
(अतिअवांतर - एकदा बारका कार्यभाग उरकायला सुरुवात केली की थांबता येतं का?)
बिटकॉईन चा जनक कोण
ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट क्रेग राईट यांनी "मीच तो सातोशी नाकामोटो" असे जाहीर केलेले आहे. काहींना खात्री आहे काहींना नाही व काहींच्या काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यातलाच एक प्रश्न या बातमीत आहे
“If this was real,” said Peter Todd, a bitcoin developer, Mr. Wright would have signed a message with the private key from the first bitcoin block mined, the so-called Genesis Block.
-
यावरून मला प्रश्न पडला - उद्या ईश्वर जर प्रकट झाला व त्याने असा दावा केला की तो स्वतः ईश्वर आहे तर तुम्ही त्याच्याकडून ईश्वर असण्याचा कोणता पुरावा मागाल ?
-
( सातोशी नाकामोटो ची ईश्वराशी तुलना करण्याचा माझा उद्देश नाही व नव्हता. तसेच ईश्वर "तो" आहे व "ती" नाही हे कशावरून ? - हा प्रश्न इथे अस्थानी आहे. )
>>उद्या ईश्वर जर प्रकट झाला व
>>उद्या ईश्वर जर प्रकट झाला व त्याने असा दावा केला की तो स्वतः ईश्वर आहे
विचार करतो आहे की ईश्वराला तो ईश्वर* आहे असा दावा करण्याची गरज* कोणत्या परिस्थितीत भासेल?
*ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान जगन्नियंता,काहीहीघडवू शकणारा**. त्याने तसा दावा करण्याऐवजी इतरांना ते आपोआप कळण्याची व्यवस्था त्याला नाही का करता येणार? आपोआप कळणे म्हणजे हा ईश्वर आहे असे ज्याला कळले आहे त्याने इतरांना सांगणे नव्हे.
**याची कॉरोलरी म्हणजे असा दावा करणारा कोणीही ईश्वर असू शकणार नाही.
विचार करतो आहे की ईश्वराला तो
विचार करतो आहे की ईश्वराला तो ईश्वर* आहे असा दावा करण्याची गरज* कोणत्या परिस्थितीत भासेल?
आजच्या परिस्थितीत. ईश्वराचे स्केप्टिक्स अस्तित्वात आहेत. म्हंजे नास्तिक लोक. व त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची प्रचीती आणून देणे, पटवून देणे गरजेचे वाटत असेल त्याला तर ?
आता तुम्ही म्हणाल की यावरूनच ईश्वर अस्तित्वात नाही असे सिद्ध होते. पण ही लाईन ऑफ रिझनिंग मला थोडी अस्वस्थ करणारी वाटत्ये. का अस्वस्थ करत्ये माहीती नाही पण I am unable to put my finger on it.
जानी...
>> मी ठोसे नाही मारत चिंज, चिमटे काढते.
काही का असेना, सांगण्याचा मुद्दा हा की पुरुषांनी कसं वागलं तर त्यांना शोभून दिसतं ह्याचे धडे जर अनुताई घेऊ लागल्या, तर कोणत्याही विषयावर थयथयाट करणाऱ्या अनुताईंची असलेली नसलेली रीतभातही आम्ही काढणारच काढणार. तात्पर्य काय, तर 'शीशे के घर मे रहनेवाले...' न्यायापोटी उदारमतवादाशिवाय आणि सहिष्णुतेशिवाय तुम्हाला पर्याय नाही बघा. ;-)
परवाचच उदाहरण आहे. ऑगस्टा
परवाचच उदाहरण आहे. ऑगस्टा प्रकरणात काही पत्रकारांनी पॉझिटिव्ह बातम्या द्यायला पैसे घेतले अशी बातमी आली. एकाने राजदीप सरदेसाइंना विचारलं की तुम्हीही घेतलेले का? त्यांनी त्या युजरला 'तुझ्या आईला विचार' असा प्रेमळ सल्ला दिला. झालं! हे फिरलं सगळीकडे. सरदेसाईंना यथेच्छ श्या/टोमणे मिळाले. ते तणतणत ट्विटर सोडून गेले. अनेक लोकांनी ही झुंड शाही आहे वगैरे वगैरे टॅण-टॅण सुरू केली.
यंदा दहावीच्या १५,४७,८२५
या कलचाचणीत नेमके कोणते प्रश्न विचारतात?
अशी एक फेसबुक पोस्ट वाचनात
अशी एक फेसबुक पोस्ट वाचनात आली..
'अहिंसा परमो धर्मः' हा संपूर्ण श्लोक खालीलप्रमाणे आहे आणि त्याचा अर्थ अशा प्रकारे आहे.
अहिंसा परमो धर्मः धर्महिंसा तदैवच |
अहींसा हा मानवाचा परमधर्म आहे आणी धर्माचे रक्षण करण्याकरता केलेली हिंसा त्याहून श्रेष्ठ आहे.
संस्कृत जाणकारांनी हा श्लोक आणि अर्थ बरोबर अथवा चूक आहे ते सांगावे..
http://spandn.blogspot.in/201
http://spandn.blogspot.in/2013/10/blog-post_2.html
यावरची कमेंट पहा. अनुशासनपर्व चेकवले पाहिजे, पण संदर्भासहित लिहिलंय म्हणजे बरोबर असलं पाहिजे असं वाटतं.
वेबॅक मशीन
काळात मागे जाउन दिसले !
वेबॅक मशीन वर ५ मे २००८ चे पान वाचता येत आहे.
http://web.archive.org/web/20080505020539/http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2964583.cms
अवांतर
अशोकाचे शिलालेख वाचून हा पियदसी कोण हे लोकांना लक्षात येईना पण बौद्ध कथांवरून तो बहुधा अशोकच असला पाहिजे असे म्हणत होते. शेवटी कर्नाटकातल्या मास्की नामक गावी सापडलेल्या शिलालेखात पियदसी आणि अशोक ही दोन्ही नावे सापडल्यावर पियदसी = अशोक हे कन्फर्म झाले.
इस बात पे एक पीजे हो जाए|
एकदा पाकिस्तान इंटरन्याशनल एअरलाइन्सच्या एका विमानाचे अपहरण होते. (डिस्क्लेमर: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही प्रत्यक्ष घटनेशी अथवा जिवंत वा मृत व्यक्तीशी तीत साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आगाऊ धन्यवाद.) तर ते विमान Milan (Italy) येथे वळविण्याकरिता अपहरणकर्ते वैमानिकास कसे सांगतील?
('पिया, मिलन को जाना|')
(आदूबाळ यांना हात पुढे करून टाळी मागणारी स्मायली इथे कल्पावी.;))
ओतावि
हा जरा ओतावि वाटतो. जसे की,
कदम नांवाचा एक मिलवर्कर मुंबईच्या बीडीडी चाळीत, मित्राच्या कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून रहात होता. मित्रही मिलवर्करच होता. कदम जमिनीवर झोपायचा आणि त्याचा मित्र, बायकोबरोबर पलंगावर झोपायचा. एकदा मित्राची रात्रपाळी आली. तो गेला कामावर. कदमची बढती पलंगावर झाली. कदमची बायको गाणे म्हणू लागली.
मिल गये मिल गये आज मेरे सनम
आज मेरे जमींपर नही है कदम
ह्याला ओतावि म्हणतात.
अर्थात!
पण हा (आपण उल्लेखिलेला) ओताविशिरोमणि किंवा ओताविसम्राट मानता यावा, हे त्याचे माहात्म्य निश्चितच दखलपात्र नि वाखाणणीय आहे.
(वरील प्रकरणाच्या परिणतीचे वर्णन 'कदम कदम बढाए जा' असेही करता येईल. विशेषत:, वरील किश्श्यातील गाणाऱ्या पार्टीचे१ 'कदम भारी' झाल्यावर.२)
..........
१ एक गोष्ट कळली नाही.
एकदा मित्राची रात्रपाळी आली. तो गेला कामावर. कदमची बढती पलंगावर झाली. कदमची बायको गाणे म्हणू लागली.
म्हणजे? कदम विवाहित होता, आणि बायकोसमवेत मित्राकडे पीजी राहात होता? आणि, मित्र रात्रपाळीवर गेल्यावर मित्राची बायको (खोलीची बाकायदा मालकीण/कागदोपत्री अधिकृत भाडेकरीण असूनसुद्धा) जमिनीवर झोपली? यह बात कुछ जँची नहीं|
(नाही म्हणजे, भारतीय आतिथ्याची कीर्ती ऐकली होती, परंतु ते लेजेंडरी भारतीय आतिथ्य अठराशे सत्तावनच्या बंडात धारातीर्थी पडून नामशेष झाले म्हणतात. खास करून मुंबईसारख्या शहरात. आणि तसेही, ईव्हन बाय दोज़ ष्ट्याण्डर्ड्ज़, धिस ईज़ टू मच! पण असो.)
त्यापेक्षा, वरील किश्श्यातील कदम हा अविवाहित असता, नि मित्राची बायको ही गाणारी पार्टी असती, तर बहार येती!
२ काय, आम्हीसुद्धा विनोदाच्या तन्यतेची परिसीमा ओलांडू शकतो की नाही? द्या टाळी! ;)
जिकडेतिकडे आजकाल पाण्याबद्दल
जिकडेतिकडे आजकाल पाण्याबद्दल बोललं जातंय. मध्यभारतात, पश्चिम अमेरिकेत वगैरे मोठा दुष्काळ आहे म्हणतात. पाण्यावरून युद्धं होतील म्हणतात. पाण्यात गुंतवणूक करा असं खूपवेळा ऐकलंय. त्यामुळे काही प्रश्न पडलेत.
१. पाण्यात गुंतवणूक करण्याचे मार्ग किंवा फायनॅन्शिअल प्रॉडक्ट्स कोणते?
२. पाण्यात गुंतवणूक करायला उशीर झाला आहे की नाही हे कसे कळणार? थोडक्यात, ही प्रॉडक्ट्स ओव्हरव्हॅल्युड आहेत की अंडरव्हॅल्युड आहेत हे कसे कळणार?
३. जरी युद्धं झाली तरी गुंतवणूक सुरक्षित राहील याची काळजी कशी घेणार?
४. ह्या गुंतवणुकीतला नफा पाण्याच्या रुपात असेल की कॅशच्या?
५. कॅशच्या रुपात असेल तर प्रॉफिट टेकिंग कधी करायचे आणि आलेल्या प्रॉफिटचे काय करायचे?
६. पाण्याच्या रुपात असेल तर ते पाणी सुरक्षित राहील याची काळजी कशी घ्यायची?
तज्ज्ञांपैकी कोणी थोडीफार माहिती दिल्यास आभारी होईन.
उत्तम तिरकसपणा, खवचट अशी
उत्तम तिरकसपणा, खवचट अशी श्रेणी देणार आहे.
पण सीरियसली, पाण्यावरून युद्धं वगैरे काही होणार नाहीत. त्या युद्धाच्या खर्चापेक्षा समुद्रातलं पाणी वापरात आणणं जास्त स्वस्त आहे. तेव्हा असल्या फीअरमॉंगरिंग गुंतवणुकांमध्ये न पडलेलंच बरं. २००८ साली नाही का 'तेलाचे भाव बॅरलला २०० डॉलरपर्यंत सहज जातील' असं म्हणणारे लोक होते?
त्या युद्धाच्या खर्चापेक्षा
त्या युद्धाच्या खर्चापेक्षा समुद्रातलं पाणी वापरात आणणं जास्त स्वस्त आहे.
जगाला नक्की किती पाणी लागतं हे कोणाला माहित आहे का?
जर असं झालं तर ग्लोबल वॉर्मिंगवर हा एक चांगला उपाय ठरेल का? :प - हिमनग वितळल्याने समुद्रातलं पाणी वाढलं की ते माणसाने वापरून टाकायचं
===
वितळणारे जे हिमनग आहेत त्यांच बर्फ खारं असतं का? नसल्यास ते एवीतेवी वितळणारच आहेत तर त्याचं पाणी आधीच का वापरू नये! :प
गोठणारे हिमनग खार्या
गोठणारे हिमनग खार्या पाण्याचे असतात म्हणजे वितळणारेही खार्या पाण्याचेच असावेत बहुधा. जमिनीवरील बर्फ गोड्या पाण्याचा असावा बहुतेक. ऐवीतैवी वितळणारच आहे तर आधीच वितळवायला हरकत नाही पण निसर्गापुढे माणूस इतका क्षुद्र आहे की माणसाने काहीही केलं तरी एवढालं बर्फ अज्जिबात वितळणार नाही.
छ्या! युद्ध-बिद्ध नाहीतरी
छ्या! युद्ध-बिद्ध नाहीतरी गेलाबाजार किंमती तरी आभाळाला भिडतील आणि आम्हालाही गब्बर होता येईल असं वाटलं होतं. पण तेलाप्रमाणेच सप्लाय ग्लट येऊन किंमती पडणार म्हणता? मग काही उपयोग नाही. मुकाट टेक्नॉलॉजी इन्डेक्समध्ये गुंतवणूक करावी. लवकरच पाथब्रेकिंग इनोव्हेशन येणार आहे तेव्हातरी पैसे मिळतील चांगले.
पण सिरियसली, डिसॅलिनेशन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल म्हणजे.
काय की ब्वॉ. गेली दोनतीनशे
काय की ब्वॉ. गेली दोनतीनशे वर्षं तरी पाणी स्वस्तच होतं आहे. एके काळी म्हणे कोणाच्याच घरात नळाचं पाणी नसायचं. सगळ्यांनाच कुठूनतरी बाहेरून शेंदून, उचलून, वाहून आणायला लागायचं. श्रीमंतांकडे पाणक्ये असायचे, गरीबांचं काय व्हायचं माहीत नाही. तरी बरं, बायकांना शिक्षण वगैरे फ्याडं नव्हती त्याकाळी.
पण सीरियसली, डीसॅलिनेशन कंपन्यांपेक्षा सर्वसाधारण सोलार कंपन्यांच्या इंडेक्समध्ये गुंतवा. सोलारशिवाय डीसॅलिनेशन काही होत नाही. तसंच डीसॅलिनेशन करण्याची वेळ आली नाही तरी सोलार चालेलच.
हो.. आता मस्त टँकरने
हो.. आता मस्त टँकरने दारापर्यंत येतं. किंवा फारतर दोन-चार मैल जावं लागतं. लोकांना पाणी भरायला म्हणून दोन-दोन बायका करायला परवडू लागलं आहे. त्यामुळे मौज आहे. बाकी डिसॅलिनेशनची वेळ येणार नाही याचीही शक्यता आहेच. हे सिंगापूरसारखे देश उगीच शो ऑफ म्हणून चौथा प्लॅन्ट टाकताहेत. काय तर म्हणे मलेशियातलं धरण रेकॉर्ड लो पातळीला गेलंय. हा एल निनो संपला की धो-धो पाऊस पडणारेय; पण ह्यांना दम निघेल तर ना?
पण सिरीयसली, सन एडिसन सारख्या कंपनीचं दिवाळं निघतं अचानक त्यामुळे अजून काही वर्षं तरी वेट ॲन्ड वॉच केलं पाहिजे असं वाटतं. सोलर इलेक्ट्रीक वाहनांनी मालवाहतूक सुरु व्हायची नुसती शक्यता निर्माण झाली तरी पैसे लावणार.
इकडे कोणी ऑडीबल.कॉम वापरत का
इकडे कोणी ऑडीबल.कॉम वापरत का पुस्तकं ऐकण्यासाठी? अनुभव कसा आहे?