Skip to main content

हिवाळी सत्र

गन कंट्रोल अर्थात बंदूक नियंत्रण लॉबी आता भारतातही

Taxonomy upgrade extras

दुसर्‍या एका धाग्यावर बंदुकीच्या परवाना धारकांची कैफियत आपण वाचली. भारतात बंदुक वापरणं खूप अवघड आहे हे आपल्याला माहिती आहेच. त्यात हे असले परवाने घ्यायला लागल्यामुळे वापर अजुनच अवघड होतो. टीव्ही किंवा अगदी प्रार्थमिक बातम्या, सिनेमे पाहिले तरी आपल्याला हे समजेल की अमेरिकेत बंदुकीचा वापर सढळ होतो. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणू नये असं तिथे साक्षात संविधान सांगतं. आपल्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीला हे का नाही सुचलं असा प्रश्न साहाजिक आहे. आता ओबामासारखे बंदुक नियंत्रक बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांचे दिवस आता भरत आले आहेत.

संसद: हिवाळी अधिवेशन २०१४

Taxonomy upgrade extras

आज, २४ नोव्हेंबर २०१४, पासून बजेट सत्र सुरू होत आहे.

या सत्रात एक बदल असा आहे की राज्यसभेत प्रश्नकाळ ११ ऐवजी १२ वाजता सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे लघुचर्चा किंवा लक्षवेधी सुचना वा सभापतींच्या मंजुरीने शुन्य काळ ११ ते १२ या वेळेत होऊ शकेल. या प्रयोगामुळे प्रश्नोत्तराचा तास काही तत्कालीन घटनांच्या चर्चेवरील मागणीच्या गदारोळात वाहून जात असे त्याला पायबंद बसवा असा उद्देश व आशा आहे. प्रत्यक्षात काय होते ते समजेलच.

या सत्रातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके