Skip to main content

गुळाचा गणपती.

सर्वप्रथम इथे (म्हण्जे या सायटीवर) कलादालन नसल्याने संस्थापक अन संयोजक मंडळाचा तीव्र निषेध (एकवेळ पाकिस्तानविरुद्ध भारत युनोमधे कमी तीव्र निषेध नोंदवत असेल, पण माझा जास्त तीव्र आहे)

सभासदांच्या उपजत कलागुणांना वावभर वाव कसा मिळावा म्हणतो मी.

तर निषेध नोंदवून धागा मौजमजेत डकवतो आहे. गुळापासून केलेली कलाकृती असल्याने पाकृ मधे टाकायचा विचार होता. पण म्हटलं गणपती आहेत, तर धार्मिक मधे टाकू. पण तो ही विभाग नाही :( मग काय करू कसं करू ही धुसफुस करत शेवटी मौजमजेत टाकलाय.

आकांतांचे देणे

(मुलीस).....

क्षितिजे धुळीने मळतील
आयुश्याच्या सांजक्षणी
तु वळुन पहावे परतुन
माझ्या रुपेरी हिरकणी

येतील उन्हाच्या वाटा
जातील परतुनी सगळे
तुझ्या मनाच्या कुशीत
माझी चंदनपणती उजळे

सांग तुजला काय देऊ
आपला पेशा फ़किरी
मिळे तुजला एकला कबीर
व्यथित पावलांच्या परि

येता आयुश्याची सांज
तु मला साद दे
तु माझे आवर्त घे
या जगाशी झुंज दे

साई -

सोन्याचा मुकुट
हिऱ्यांचा हार
सोन्याच्या पादुका
रत्नजडित सिंहासन
सोन्याचे मखर
सर्वांच्या डोळ्यांत ठसले -

त्या
सोनेरी धामधुमीपासून
दूर - - - -
कोपऱ्यातल्या
एका गरीबाच्या
मिटलेल्या डोळ्यांतून
ओघळणारे ... मोती ...
फक्त साईलाच दिसले ;

आणि
(सोन्यापेक्षा सामान्यांवर
माया जडलेले -)
साई
उदासपणे स्वत:शीच हसले !

देवळातला देव भिकारी

देवळातला देव भिकारी
नकाच मजला अर्पू कोणी
गंध, अक्षदा, फुले, माळा
नका मजला शेंदूर फासू
नकाच द्या कळसा झळाळा

कोण कोठला देव मज समजले
उगाच येवूनी रांगा लावूनी
पाया पडण्या, हार वाहण्या
व्यापार्‍याची वस्तू करूनी
देवळात मज कोंबले

व्यर्थ फुकाचा नमस्कार करता
अन्नछत्रात जेवूनी
भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता
न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी
का मजला देता ?
पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता?

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी मुशाफिरी
धनाचे नच लालूच मजला
वृत्ती माझी आहे फकीरी

परीचे पशुधन

परीचे पशुधन
*****************
परीच्या गोठ्यात गोगलगाय
तिच्या दुधाची चंदेरी साय
शिंगे मऊमऊ म्हणून काय
धोक्याचे तिच्या पोटातले पाय
***
परीच्या छतातलं चिमणीचं घरटं
लखलख काचेचं चकचक करतं
चिमणीचा चालतो आराम मस्त
गरजेच्या वेळी तेलच नसतं
***
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा
बाबड्याला लागतो खुराक थोडा
लगाम न लागे, कधी न ओढा
उधळे तेव्हा, कधी न झोडा
***
परीच्या झाडावर पराचा कावळा
उगाच वाटतो परीला बावळा
असून आवळा कोकले कोहळा
मागून माजतो गोंधळ सावळा
*****************

दुसरं लग्न

Taxonomy upgrade extras

आपल्या आजूबाजूला बघितलं तर ज्या लोकांनी दुसरं लग्न केलंय (मग ते पहिल्या जोडीदाराशी फारकत घेऊन असो की जोडीदाराच्या पश्चात) त्या व्यक्तीविषयी/त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी आपलं मत त्या व्यक्तीची सर्वसाधारण पार्श्वभूमी बघून बनवतो. दुसऱ्या लग्नाचा निर्णय कितीही वैयक्तिक असो, लोकांची मते ही असतातच, आणि ती ते व्यक्तंही करतात. पुरुषाने पत्नी निवर्तल्यावर दुसरे लग्न करणे काही गैर मानले जायचे नाही (किंवा काही प्रसंगी दोन बायकाही असायच्या). पण विधवाविवाह मात्र सर्वमान्य नव्हता किंवा आताही तेवढा नाही. पण काळ बदलला आणि विधवाविवाहही व्हायला लागले.

‘हार्ड लेबर’ – आधुनिक जगण्याचा भयपट

Hard Labour - Film Poster

खा-उ-जा धोरणांपायी होणारी फरफट दाखवणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षांत जगाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांत निर्माण झाले. ‘तेच ते’ म्हणता येईल इतकं या वास्तवाचंसुद्धा कसं जागतिकीकरण झालं आहे ते अशा चित्रपटांमधून अनेकदा लक्षात येतं. तरीही काही चित्रपट त्यांतल्या वेगळेपणामुळे लक्षात राहतात. ‘हाय-सो’मध्ये आत्ममग्न म्हणता येईल अशा प्रकारे ते वास्तव भिडतं. भयपटासारख्या एखाद्या वेगळ्याच विधेतून (genre) जर सामाजिक आशय मांडला तर ते कसं वाटेल? असा काहीसा प्रयत्न ‘हार्ड लेबर’ हा ब्राझिलीअन चित्रपट करतो.

देऊळ

मला 'देऊळ' खूप आवडला.

मराठी सिनेमा म्हणजे असे काहीतरी ज्याला पदरचे पैसे खर्च करून जाणे हे आपले कर्तव्य असते; मग प्रत्यक्षात सिनेमा रंजन करणारा, विचार करायला लावणारा, अस्वस्थ करणारा असो वा नसो... अशी काहीतरी समजूत मराठी सिनेमाबद्दल दिसते. मराठी सिनेमांचे निर्मातेही 'लोक थेटरात येऊन पाहात नाहीत... सरकारने मदत करावी, मल्टिप्लेक्सवाल्यांनी शो लावावेत...' असले काहीतरी दीनवाणे बडबडत असतात.