देवळातला देव भिकारी

देवळातला देव भिकारी
नकाच मजला अर्पू कोणी
गंध, अक्षदा, फुले, माळा
नका मजला शेंदूर फासू
नकाच द्या कळसा झळाळा

कोण कोठला देव मज समजले
उगाच येवूनी रांगा लावूनी
पाया पडण्या, हार वाहण्या
व्यापार्‍याची वस्तू करूनी
देवळात मज कोंबले

व्यर्थ फुकाचा नमस्कार करता
अन्नछत्रात जेवूनी
भरल्या पोटी लाडू प्रसाद खाता
न लागणारे नोटा दागीने मुकूट सोनेरी
का मजला देता ?
पापपुण्याचा खोटा हिशेब मांडता?

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी मुशाफिरी
धनाचे नच लालूच मजला
वृत्ती माझी आहे फकीरी
देवळातला देव भिकारी

- पाषाणभेद
१२/११/२०११

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

वृत्त असल्यासारखे वाटते :
- - -
नकाच मजला अर्पू कोणी
गंध, अक्षता, फुले नि माळा
नकाच मजला शेंदुर फासू
नकाच कळसा देवु झळाळा

कधी कशा मज देव समजले
उगाच येवुनि रांगा लावुनि
पाया पडण्या, हार वाहण्या
व्यापाराची वस्तू करूनी
देवळात मज बळे कोंबले

व्यर्थ फुकाची नमने करता
अन्नछत्रामध्ये जेवूनी
भरल्या पोटी प्रसाद खाता
नोट-दागिने मुकुट स्वर्णिम
का मजला तुम्हि देत राहता ?
कृताकृताचा हिशेब मांडता?

नकाच मजला तेथे भेटू
चालू असते माझी फिरती
नाहि धनाचे लालुच मजला
वृत्ती माझी आहे फकिरी
देवळातला देव भिकारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा व्वा धनंजयराव, आमच्या दगडाला छन्नी हातोड्यांचे घाव मारून त्यातून तुम्ही देव साकारला आहे. हि तुमची रचना तुमची एक स्वतंत्र कविता ग्राह्य धरली जावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही