एक हे विश्व, शून्य हे विश्व
Taxonomy upgrade extras
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते.
शून्य
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.
- Read more about एक हे विश्व, शून्य हे विश्व
- 15 comments
- Log in or register to post comments
- 20186 views
बिगारी
कामावर निघतो सायकलीवर
उचलूतो खडी रेती डबर माती
शिमीटाची डोक्यावर पाटी
उघडं डोकं तापून जातं
उन्हातान्हानं सडकून निघतं
रचतो मालात विटेवर विट
भिंतीत चिणतो मलाच निट
बांधले बांबू वासे लाकडी फळ्या
जगतो झालंय लोखंडाच्या सळ्या
कांक्रीट मिक्सर गोल फिरतं
मातीधुळीतच आयुष्य जायचं
बाकीचे एखादंच घर बांधतात
गरीब बिगारी घरं बांधतो
- पाषाणभेद
- Read more about बिगारी
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3105 views
शब्द
शब्दांचे वार झेलूनी
शब्दांचेच प्रहार करतो
शब्द कधी गळ्यात पडती
हार होवूनी खोटे सुखवती
स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती
नफा नुकसान व्यवहार जेव्हा
नजरेसमोर जाणवतो केव्हा
शब्द गिळतो शब्द फिरवीतो
शब्द जोडतो शब्द पेरतो
रूजवूनी त्यांना कागदावर
शब्दांचीच शेती करतो
शब्दांचा आधार बोलण्याला
शब्दच साह्य करी भावनांना
शब्द नसता बोलतो निशब्दांना
- पाषाणभेद
१४/११/२०११
- Read more about शब्द
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5093 views
माझ्यासाठी
माझ्यासाठी एक मन लिही - चांदण्याचा वर्ख माखलेले
आभाळाच्या कुशीत पहुडलेले - अनाघ्रात, कोवळे
माझ्यासाठी एक गाणे लिही - पाचूच्या पोपटी शीतलशा
ज्वाळेने वेढलेले, पेटलेले - दुर्बोध आणि अगम्य
माझ्यासाठी एक क्षण लिही - अनेक अश्वांच्या दमदार
घोडदौडीने निनादलेला - शीतल हेमंतात
माझ्यासाठी एक चव लिही - टपोर्या जांभळाची
लुसलुशीत, लाललाल ओठांवर ओथंबलेली - तुरट तुरट
माझ्यासाठी एक स्पर्श लिही - ऊबदार, हात
हातात धरून दिलेला - आश्वासक, प्रेमळ
माझ्यासाठी एक नाद लिही - शारीरीक मीलनात
एकमेकांत विरघळताना - आवेगाचा, तन्मयतेचा
माझ्यासाठी एक रात्र लिही - वार्यावरच्या मंजूळ लकेरीची
- Read more about माझ्यासाठी
- 8 comments
- Log in or register to post comments
- 6869 views
मन्वंतर: एक दृष्यकथा
मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात.
- Read more about मन्वंतर: एक दृष्यकथा
- 13 comments
- Log in or register to post comments
- 16170 views
---------------
इथे मी केलेल्या लेखनाखाली लेखक म्हणून मी एका सदस्याला त्याच्याबाबतचे मत सांगितल्याने दिलेले प्रतिसाद कसलीही सूचना न देता उडवण्यात आलेले आहेत.
इथे सर्वांना समान न्याय असेल असे मला लेखन करण्यापूर्वी वाटले होते, म्हणून मी इथे लेखन टाकले होते, ते आता काढून टाकत आहे.
- Read more about ---------------
- 16 comments
- Log in or register to post comments
- 10187 views
रांगणेकर
“२५ तारखेची डेल्टाची फ्लाईट कन्फर्म झाली. चला, म्हणजे, एक आठवडा आधी आला की त्याची सगळी खरेदी व्यवस्थित करता येईल. दोन तारखेच्या मुहूर्ताला सगळं सेट”. रांगणेकर काका बाबांशी फोनवर बोलताना मी ऐकलं.
विजय रांगणेकर बाबांचे अगदी जुने मित्र. बाबांनी आणि त्यांनी अनेक वर्षे स्टेट बँकेत एकत्र काढली. ते बाबांपेक्षा २-३ वर्षे आधी बँकेत लागले असावेत. पण बाबांची आणि त्यांची खार ब्रँचला जॉइन झाल्यावर पहिल्याच दिवशीच चांगलीच ओळख झाली आणि पुढे घट्ट मैत्री. ५:४७ च्या चर्चगेट स्लो लोकलने दोघांनी एकत्र अनेक वर्ष एकत्र प्रवास केला.
- Read more about रांगणेकर
- 16 comments
- Log in or register to post comments
- 16121 views
युगलगीतः आज पाहणार आहे
तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही
ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||
तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली
ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||
ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले
तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||
- Read more about युगलगीतः आज पाहणार आहे
- 3 comments
- Log in or register to post comments
- 4525 views
माझे डॉक्टर होणे : ५ (क्रमशः)
होस्टेल

होस्टेलचा असा कोणताच फोटू माझ्याकडे नव्हता. मग गूगल मॅपवर गेलो, तर आश्चर्याचा झटका बसला. कुणीच तिथे होस्टेल डिफाईन केलेलं नाहिये! ते आता वेळ काढून करावं लागेल.
तर या फोटूमधे लाल चौकोनात आहे ते जेन्ट्स होस्टेल. समोर, उत्तरेकडून, पूर्व कोपर्यात आत घुसायचं गेट आहे.
- Read more about माझे डॉक्टर होणे : ५ (क्रमशः)
- 22 comments
- Log in or register to post comments
- 16502 views
विश्राम बेडेकरः "रणांगण"
काही पुस्तकांबद्दल आपण बरेच काही ऐकून असतो. वाचली नसली तरी त्यांच्या मजकूराची, आशयाची आसपासच्या चर्चेतून पुसट कल्पना असते. "प्रसिद्ध", "सनसनाटी", "मैलाचा दगड" "आक्षेपार्ह" वगैरे त्यांना लावलेले लेबल्स आत्मसात करतो आणि चर्चेत अनेकदा माना डोलावतो. पण असले एखादे प्रसिद्ध आणि बहुचर्चित पुस्तक एकदाचे वाचण्यात आले, की त्याबद्दल नवीन काय आणि कसे म्हणायचे, हा प्रश्न उठतो. (काही म्हणायलाच हवे असे नाही हे मान्य आहे, तरी शांत बसवत नाही म्हणून :-)) "हे तुला आत्ता कळलं? पुस्तकाला येऊन प वर्षं झाली की, ही चर्चा आता जुनी झाली!" हे ऐकावे लागते.
- Read more about विश्राम बेडेकरः "रणांगण"
- 28 comments
- Log in or register to post comments
- 46442 views