युगलगीतः आज पाहणार आहे

युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.)

तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही
ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||

तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली
ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||

ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले
तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||

तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो
ती: मोरपीसी शब्द गोडवे; कंठातून कधी पुटणार नाही ||३||

ती: हेच असे का जीवन जगणे?; शांत, शीतल, उष्णाव्याने धगणे!
तो: आठवणी कुपीतल्या कुलूपबंद; यापुढे कधी उघडणार नाही ||४||

ती: कितीक जन्मे जगली असली; कितीक मरणां मरून जन्मली
तो: नकोच आता जन्ममरण ते; चक्राकार ती गती शमावी ||५||

ती: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही
तो: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ||

- पाषाणभेद
२४/०९/२०११

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

वा! वा! वा! इतकी सुंदर कविता मागील १२०० वर्षांत आली नसावी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो असे काय म्हणता? थोडे आणखी मागे जावून अत्रेसाहेबांसारखे 'गेल्या दहा हजार वर्षात' असे म्हणा की!
Smile

बरं जावू द्या पण हि स्तुती आहे की विषाद? काय कमी जास्त असेल तर सांगा ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही