माझे डॉक्टर होणे : ५ (क्रमशः)

होस्टेल
hostel
होस्टेलचा असा कोणताच फोटू माझ्याकडे नव्हता. मग गूगल मॅपवर गेलो, तर आश्चर्याचा झटका बसला. कुणीच तिथे होस्टेल डिफाईन केलेलं नाहिये! ते आता वेळ काढून करावं लागेल.

तर या फोटूमधे लाल चौकोनात आहे ते जेन्ट्स होस्टेल. समोर, उत्तरेकडून, पूर्व कोपर्‍यात आत घुसायचं गेट आहे.

पिंक आकारात लेडिज होस्टेल. त्या लेडिज होस्टेल मधे मी 'सँडविच ब्लॉक' लिहिलंय तिथे तेंव्हा फक्त मैदान होतं. अन तिकडे व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटकडे जाणार्‍या एका बोळीवजा रस्त्या पलिकडे, जुना एफ व्लॉक होता. एफ ब्लॉकसमोर बिल्डिंगा आहेत, त्या सेंट हेलेनाझ स्कुल, मग फोटो झिंको प्रेस. मग रस्ता, मग तिकडे जीपीओ. एफ ब्लॉकच्या बाजूला संत ज्ञानेश्वर होस्टेल. मग एक चर्च. मग.. गूगल मॅप बघा!

जेन्ट्स होस्टेलातला डी ब्लॉक २ मजली. गेटमधून आत आल्या आल्या उजवीकडे दिसतो तो जुना, दगडी बांधकामवाला कौलारू. समोरचा रस्ता अन डी ब्लॉक यांच्यामधे एक गार्डन पण. या डी ब्लॉकच्या समोर मधोमध उभं राहून बाल्कनीकडे पाहिलं तर एक दगडी पाटी दिसते. "बी जे मेडिकल स्कूल १८**" मला नक्की साल आठवत नाहिये पण ते मागचे सगळे ब्लॉक्स उभे रहाण्याआधी हेच मेडिकल स्कूल होतं अन इथून एलसीइएच की काय अशी डिग्री मिळत असे. ज्यांना फार वाटे ते इंग्लंडातून डिग्री आणत. (आनंदी गोपाळ) आम्ही शिकत होतो तेंव्हा या ब्लॉकच्या वरच्या मजल्यावर मुली रहात, अन खाली पोस्ट ग्रॅड् स्टुडंट्स. अन ठीक त्या पाटीखालि ग्राऊंड फ्लोअरला हॉलमधे होतं होस्टेल कँटीन.

तसं गेटातून आत आल्या आल्या समोर दिसत असे ते उजवी कडे डी चं कंपाऊंड, डावीकडे दारातच एक सिमेंट पाईपमधे टेलिफोन बूथ, अन बाहेर खुर्ची टाकून वॉचमन. समोर ई ब्लॉक. याच्या पाठीमागून सरळ रस्ता आरपार जातो जेन्ट्स होस्टेलातून. थेट एलेच म्हंजे लेडिज होस्टेलकडे. उजवीकडे ई ब्लॉकची पाठ, मग रेक्टरचा बंगला. मग थोडा सरळ रस्ता, जो बी ब्लॉकच्या समोरुन दिसतो, मग ए ब्लॉक, अन मागे चर्च स्ट्रीटवर उघडणारं दार. हे मुख्य दार कायम बंद असे. त्याबाजुला एक छोटं रिव्हॉल्व्हिंग गेट, तेच कायम वापरात. या रस्त्यच्या कडेने, डाव्या बाजूला सेंट हेलेनाझ स्कूल्च्या साईडला कंपाऊंडच्या भिंतीला लागून गुलमोहोराची अन चाफ्याची गर्द झाडी. रस्त्यावर कायम गुलमोहोराच्या लालभडक केशरी पाकळ्यांचा, अन सुगंधी चाफ्याचा सडा.. अन त्या अंथरलेल्या सुगंधि पायघड्यांवरून घाईघाईने जाण्यार्‍या ड्रीमगर्ल्स (म्हंजे एलेचच्या रहिवाशिणी).. मुलींनी चालत जाण्यासाठी तो रस्ता अगदी आयडियल होता. अन थोडीफार एफ ब्लॉकवाली 'एलिट' पण त्यातल्या त्यात गरीब पोरं हा रस्ता वापरीत. बाकी एफ वाल्यांकडे गाड्या असत, ते फोटोझिंकोकडुन भुर्रर जात.

तसं रेक्टर सरांना मामा म्हणायची पद्धत तेंव्हा होस्टेलात होती. सामान्यत: सासरेबुवांना मामा म्हणतात, अन रेक्टरला एकंदर ३ कन्या होत्या, सगळ्यात धाकटी आमच्या पेक्षा २ वर्षे लहान असावी. सगळ्या पोरांची तिथं लाईन असे. म्हणून ते 'मामा' अन दुसर्‍या अर्थाने, आम्ही सगळे साले जावाई होतो जणू नुस्ते रेक्टरचेच नव्हेत, तर सरकारचेच. भयंकर माज करीत असत मुलं.

तर उजवी कडे वळून होस्टेलात घुसलात, तर समोरच ई ब्लॉक, त्याच्या एक्झॅक्ट समोर सी. या दोघांमधे अंडा़कृती बगीचा. पाठी बी अन ए. यापैकी ए सोडला, तर सगळ्या ब्लॉक्स मधे मी राहिलोय. दर टर्मला होस्टेल डिस्ट्रीब्यूशन होई, अन रूम बदलत असे.

हा एक चांगला रिवाज होता. तसं अ‍ॅडमिशन मिळाल्या मिळाल्या सगळी नवी मेंढरं ई ब्लॉकच्या ४ मजल्यांत कोंबली जात. या ब्लॉकच्या सगळ्या रूम्स ३ सीटर होत्या त्या काळी. बाकी ब्लॉक्स २ सीटर्स. काही दुर्मिळ रूम्स १ सीटर असत. ब्लॉक्स सगळे ४ मजली. सी अन ई लाच फक्त सगळे चारी मजले रहिवासी. ए अन बी च्या टॉपला २-२ मेस हॉल्स. ए चा एलेचच्या रस्त्याच्या बाजूचा मेसहॉल टीव्हीरूमात कन्व्हर्टेड होता. तिथे एक ब्लॅक अँड् व्हाईट टीव्ही. अन दुसरा हॉल टीटी हॉल. त्यात एक मोडकं टेबल असे. बी वरच्या २ पैकी १ मेस चालू होती.

सी ला बहुतेक सगळे एक्झाम गोईंग फायनल इयर वाले रहात. त्या रूम्स नीट मेन्टेन्ड अन शांत होत्या. ती मुलं पासआऊट झाली की या खोल्या रिकाम्या होत. मग अक्खं होस्टेल एकेक पायरी वर सरकत असे. अन ई मधली फस्/फस वाली मेंढरं थोडी जरा बर्‍या खोल्यांत जायची स्वप्नं पाहू शकत. हेच ते होस्टेल डिस्ट्रीब्यूशन.

मेस चालवणे, होस्टेल डिस्ट्रीब्यूशन इत्यादी बाबी पूर्णपणे मुलंच सांभाळत असत.

ब्लॉकची रचना म्हणजे ब्लॉक समोर उभे राहिलात, तर समोर एन्ट्रन्स अन जिना. उजवी अन डावी कडे २ विंग्ज. विंगच्या एका टोकाला बाथरूम ब्लॉक. दुसर्‍या टोकाला फक्त रूम्स. प्रत्येक मजल्यावर १२ रूम्स. जिन्याखाली एक रूम. त्यात वॉचमन असे. तिथेच बाजूची एक रूम कॉमनरूम/गेस्टरूम. ई ची बाथरूम होस्टेलात घुसल्याबरोब्बर समोर दिसते. त्याबाजूची रूम ती ई१२. माझी आयुष्यातली पहिली होस्टेल रूम.

ग्राऊंड फ्लोरवर प्रत्येक ब्लॉकला एक कॉमन रूम असे. तिला गेस्टरूमही म्हणत. आयडिया अशी की कुणी गेस्ट आले मुलांकडे तर रेक्टरच्या परवानगीने तिथे रहावेत. ए च्या गेस्टरूमात २ लाँड्रीज होत्या. बी च्या जिन्याखालच्या खोलीत को-ऑप स्टोअरचं एक्स्टेन्शन काऊंटर संध्याकाळी ७ ते ८.३० चालत असे. तिथे होस्टेलोपयोगी वस्तू मिळत. अंडरपँटी, पाव किलो साखरेचे ब्राउनपेपरात पुडे, साबण, दाढीचे ब्लेड्स, बादल्या, आंघोळीचे मग, टुथपेस्ट, ब्रश, चहा, कॉफी, अन काय अन काय. मॅगी बिगी त्याकाळी निघालेली नव्हती. हां. इलेक्ट्रीक शेगड्या देखिल मिळत अन मिल्क कूकर्स. लोडशेडिंग नसे, अन वीज फुकट होती. प्रत्येक रूमात १-२ विजेच्या शेगड्या असत. दूध तापवायला, अन चहा वगैरे करायला.

बी अन सी मधे एक पीडब्ल्यूडीचं ऑफिस असे, तिथे रूमातली ट्यूब उडालिये, गीझर चालत नाहिये, खुर्चीचा पाय मोडलाय इत्यादी क्म्प्लेंटा दिल्या की १ दिवसात निस्तरल्या जात. पण हा शोध लागेपर्यंत तुम्ही कमीतकमी २ वर्षं जुने होस्टेलाईट्स बनावे लागत.

ते अंडाकृती बगिचा अन ए ब्लॉकच्या दरम्यान मोकळं ग्राऊंड क्रिकेट खेळायला कामी येत असे. तिथेच एक सायकलस्टँडही होता. असे टिपिकल सायकल स्टँड आजकाल दिसत नाहीत. त्यात कायम २०-२५ मोडक्या सायकली गंजत पडलेल्या होत्या. होस्टेलात स्वयंचलीत दुचाकी विरळाच दिसे. दिसली तर तीही बजाजची स्कूटर. १००सीसी बाईक्सचा जमाना यायला थोडा वेळ होता तेंव्हा. थोड्याफार ल्यूना, हितोडी, टीव्हीएस फिफ्टी, बजाज एम फिफ्टी इ. गाड्याही दिसत.

पाठीमागचा एफ ब्लॉक एलीट. तिथे एकूण ७१ रूम्स. सग्ळ्या २ सीटर्स, फक्त ८ रूम्स ३ सीटर्स. प्रत्येक रूममधे सरकारी सिलिंग फॅन अन फुल हाईट क्लोसेट. अन ब्लॉक नवीन बांधकाम केलेला. H आकारात. समोरचा विंग ३ मजली. मागचा २ मजली. मागे खाली ग्राऊंडफ्लोअरला टीवी हॉल अन स्वत:ची मेस. जी बंदच होती, अन तिथे नंतर एक लायब्ररी काढली होती. इथे बहुतेक फिरंगी लोक रहात. म्हणजे १२वी पर्यंत इंग्रजी मेडियमवाले. अन बहुधा श्रीमंत बापाची मुलं. मी दोन्ही नव्हतो, पण याच ब्लॉकला निम्मं होस्टेल लाईफ काढलं, कारण इथला 'अँबियन्स' फार मस्त होता.

मेस क्लब सिस्टिमने चालत असे. आम्ही आलो तेंव्हा एक मिल्या होता मेस चालवणारा. फार झक्कास मेस चालवत असे तो. सेकंड इयरची मुलं चालवत मेस. आम्ही पण चालवली १ टर्म. मजा येई. पहिल्या महिन्याचं मेसचं बिल ९०-९२ काहितरी रुपये होतं. आमची पाळी येईपर्यंत महागाई दुप्पट झालेली, आम्ही १८० च्या आसपास बिल घेत असू, पण त्यात ब्रेकफास्टही मिळे.

ए ब्लॉकच्या पाठीमागे एक पाण्याची टा़की आहे. एकदम शोले स्टाईल. पण त्यापेक्षा खूप उंच.

होस्टेल २४ तास उघडे असे. कुणीही विचारत नसे की कोण येतं अन कोण जातं. नॉनमेडिको लोक मित्रांच्या रूमवर राहून एल.एल.बी, बी.ई., इ. करीत असत. यांना पॅरासाईट म्हणत. हे राजरोस मेसही लावत. अन बिन्-भाड्याने रहातही असत.

तर हे असं होतं मला आठवणारं बीजेचं होस्टेल. म्हणजे होस्टेलची अ‍ॅनाटॉमी. थोडी विस्कळीत झालिये लिहीताना. पण पार्श्वभूमी म्हणून पुरेशी आहे असं वाटतं. याचे संदर्भ पुढे देत राहीन. हवं तेव्हा इथे येऊन बघा परत.

याच होस्टेलात, रूम मिळायच्या आतच माझी पहिली रॅगिंग झाली, ती ए ब्लॉक ला. कदाचित म्हणूनच मी कधीच ए ब्लॉक घेतला नसावा..

****
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

ता.क.
हा सापडला एक फोटो डी ब्लॉकचा. होस्टेलच्या मेन गेटमधून आत आल्या आल्या उजव्या हाताला हा असा दिसतो. तो पलिकडला दिवा आहे तिथे ती बीजे मेडीकल स्कूलची पाटी आहे.
bj D block

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरोखर वाचनीय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान.
हा भाग थोडासा लहान वाटला Smile
बाकी आधीच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे मलाही अनिल अवचटांच्या लिखाणाची आठवण येतेय. लिहित राहा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवचटांच्या "स्वतःविषयी" पुस्तकाची आठवण झाली..

लिखाण चित्रदर्शी आहे... येऊ दे असेच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे, आज ओळीनं पाचही भाग वाचले. आता पुढच्या भागाची वाट पाहावी लागेल.
भारी आहे तुमची शैली. नि त्यात सदाबहार होस्टेलातले आयुष्य. जबरा कॉम्बो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाचते आहे. मजा येते आहे वाचायला. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जरा भूगोल कमी करून ललित वाढवा राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो. येऊद्या पुढचे लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचा भाग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक भाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आडकित्त्याला लिहितं ठेवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लिहावं लागेल असं दिसतंय.
काही कारणांनी खीळ लागली होती खरी!

शक्य तितका प्रयत्न करतो.

@ संपादक : लेखमाला लिंकून देणार का प्लीज?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जुन्या भागांमधेही नव्या भागांच्या लिंका टाकते. म्हणजे नैतिक दबाव वाढेल तुमच्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या तुमच्या शुभेच्छांनी दुकान जरा जास्तच जोरात आहे हो.. कितीही कर्टेल केलं तरी वेळ मिळत नाही. नक्कीच पुढे लिहीन, असे न्यू इयर रिझोल्युशन करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्त्याला लिहितं ठेवा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'सुपार्‍या' द्याव्या लागतील!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद योग्य जागी हलवल्यामुळे काढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही लेखमाला मी वाचलेली नाही म्हणून पहिल्या भागापासून सुरुवात करावी ह्या उद्देशाने भाग १ ते ४ च्या दुव्यांवर टिचकावून पाहिले, पण ती चारही पाने उघडली नाहीत. दुवे खराव आहेत की मागील भाग उपलब्ध नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुवे खराब होते, आता सुधारले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान लिहिलय. पुढचे भाग आहेत का? लिंक मिळतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.aisiakshare.com/node/217
एवढीच गुगलवर सापडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0