माझे डॉक्टर होणे : २ (क्रमशः)

१. (ब) माझे (आयुर्वेदिक) डॉक्टर (न) होणे

तर २०व्या शतकाच्या अखेरीला केंव्हातरी एकदाचे अ‍ॅडमिशन फॉर्म वगैरे भरून वगैरे झाले.

मी इंजिनेरिंग, मेडिकल अन आयुर्वेद तिन्ही ठिकाणी फॉर्म 'टाकून' ठेवलेले होते. आता हे फॉर्म एकदा टाकून झाले की मग गळ टाकून निवांत बसलेल्या मुरलेल्या मच्छीमाराप्रमाणे स्थितप्रज्ञपणे वाट पहावी लागते. तिथे नवशिके मच्छीमार दर २ मिन्टाला गळ हलवून पहात असतात. इथे तेही करता येत नाही. वाट पहाण्यापलिकडे हातात काहीही नसतं. शुव्वर मार्क वाले बिन्धास्त असतात. पण माझ्यासारखे टेन्शनमधे. वर डीडीडी मास्तरांनी कुजकट हसून सांगितलेली बॉर्डरलाईन भविष्यवाणी डोक्यात असल्याने मी तो तिसरा फॉर्म भरून ठेवला होता. की ब्वा नैच लाग्ला बीजे/सीओईपी ला, तर इकडे तरी लागेलच नंबर.

योग्य तितके दिसमास भरल्यानंतर त्यात्या कॉलेजचे अ‍ॅडमिशन कमिटी वाले तुम्ही भरलेला फॉर्म छाननी इ. करून इतर मुलांच्या तुलनेत तुम्ही कुठे आहात, अन उपलब्ध जागांपैकी तुम्हाला अ‍ॅडमिशन मिळणारे की नाही याची एक यादी तिथे कॉलेजच्याच फळ्यावर लावत.

यात एक लै भारी गम्मत असे. माझ्यासारखे हातात चांगले पत्ते असूनही 'थ्रीपेज वॉर्निंग नॉट शुअर' वाले बॉर्डरलाईन लोक बाकी दुय्यम कॉलेजेस करता 'बकरे' कॅटेगरीत असत. मग व्हायचं असं, की बीजे ची लिस्ट लागणारे २८ तारखेला, तर १८ तारखेलाच टिळक आयुर्वेदची लिस्ट लागणार, अन ताबडतोब २१ तारखेपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार.( तेंव्हा ही प्रक्रिया डायरेक्ट असे. आजकाल सगळ्या पॅथीज एकत्र करून एकच अवाढव्य जगड्व्याळ की काय म्हणतात तशी कीच्चकट सीईटी प्रक्रिया असते. त्याची ष्टोरी नंतर कधीतरी.)

तर, प्रवेशप्रक्रिया 'पूर्ण' म्हणजे अ‍ॅडव्हान्समधे सगळी फी गोळा करून प्रवेश दिला जातो. अन सगळ्या सीट भरल्या असे जाहीर होते. मग यथावकाश बीजेची लिस्ट लागते, अन बॉर्डरलाइन बकरे लोक जर 'तिकडे' अ‍ॅडमिशन मिळण्यात सक्सेसफुल झाले, तर इथली अ‍ॅडमिशन सोडून जातात. मग इथल्या वेटिंग लिस्टवरच्या पोरांना अ‍ॅडमिशन देऊन नवी फी. जे बकरे अ‍ॅडमिशन सोडून गेले, त्यांची फी परत मिळणार नाही हे आधीच सांगितलेलं असतं. बकर्‍यांना टेन्शन असतं. की तिकडे नाही लटकलो, तर इथे अ‍ॅडमिशन फुल झालेली असेल. त्यापेक्षा इथे पैसे गेले तर गेले.. असं म्हणत आईबापांच्या आग्रहावर अ‍ॅडमिशन घेउन टाकतात. 'बकरा' प्रक्रिया लक्षात आली?

तशी एकदाची 'टिळक' ची लिस्ट लागली, अन माझी पार दैना उडाली. त्या लिस्टवर माझा नंबर ७०-८० च्या आसपास कुठेतरी होता. म्हटलं आडकित्त्या, तुला इंजिनेरिंगला अ‍ॅडमिशन नै मिळाली बेट्या, तर वैद्यच व्हायला लागणारे. डाक्टर बिक्टर विसर. चल गुपचुप अ‍ॅडमिशन घेऊन टाक. पुण्याला पोहोचलो. इंटर्व्ह्यू अन फी वगैरे भरायची असल्याने यावेळी ताई सोबत आलेली होती. हो. फी म्हणजे २-३ हजार रुपयाचा मामला होता.

सकाळी १० ला कॉलेजच्या आवारात येऊन पोहोचलो.

कॅम्पस आमच्या गावाच्या (ज्यु.)कॉलेजच्या मानाने बराच इंप्रेसिव्ह होता, पण बीजे च्या तुलनेत अगदीच श्यामभट्टाची तट्टाणी. खट्टू होऊन, ओरीजनल सर्टिफिकेटांची फाईल उराशी कवटाळून एका विस्कळीत लायनित उभा होतो. लाईन कॉरिडॉरमधे होती. माझ्यासारखेच कावरे बावरे जीव त्यांच्या पालकांसोबत ताटकळत होते. एक शिपाईसाहेब एकेका नावाचा पुकारा कोर्टाच्या पट्टेदाराच्या स्टाईलीत करीत होते. मधूनच पांढरे कोटवाली 'सिनियर' भावी वैद्य मंडळी हे कोण तुच्छ जीव आमच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात उभे आहेत असा कटाक्ष टाकीत इकडून तिकडे जातांना दिसत होती.

दुपारी २ च्या सुमारास माझा नंबर लागला. एका हॉलमधे ३-४ टेबलं टाकलेली. प्रत्येक टेबला मागे एक प्राध्यापक. समोर स्टुलांवर अ‍ॅडमिशनेच्छुक विद्यार्थी अन पालक. मग तुमच्या फॉर्मवरच्या झेरॉक्शशी तुमची ओरिजिनल सर्टिफिकेटं अन मार्कशिटा ताडून पाहीली जात. ते झालं की एक कागद हातात. तो घेऊन कॅशियर कडे जाऊन फी भरणे. अन ओरिजिनल सर्टिफिकेटं सबमिट करणे. माझा नंबर एका टेबलावर लागला. प्रा. महोदय वैतागलेले दिसत होते. त्यांनी हात पुढे केला. मी फाईल त्यांच्या हातात दिली. समोरच्या गठ्ठ्यातून माझा फॉर्म काढून त्यांनी फाईलशी एकेक कागद पडताळून पहायला सुरुवात केली. मधेच त्यांनी दुसरा एक तक्ता काढला. तो पाहिला. मग शिपाईसाहेबांना हाक मारून 'लिस्टचे कागद' मागवले.

अचानक त्यांच्या चेहेर्‍यावरचे भाव झर्झर बदललेले दिसले. चष्म्याच्यावरून माझ्याकडे अन परत कागदांकडे परत माझ्याकडे, मधेच ताईकडे ते पहात होते. हळूच घसा खाकरत ते ताईला म्हटले 'काहीतरी चूक झालेली दिसते आहे.'

माझ्या काळजात धस्स झाले. म्हटलं आडकित्त्या, तेरी तो लग गई वाट. लिस्टवर चुकून नांव आलं वगैरे काहीतरी भानगड आहे..

आजकालच्या टीव्ही सिरियल्सच्या डायरेक्टराने तो प्रसंग फिल्मवला असता, तर या पुढच्या प्रत्येक वाक्यावर मी, ते प्रा.वै., ताई, यांचे डोळे वटारलेले भयचकित चेहेरे. ढ्यांग! ढ्यांग!! ढ्यांग!!! क्लोजप्स, अन मग ते सारेगमच्या एलिमिनेशन राऊंडचं रडकं मुझिक नक्कीच वाजवलं असतं.

'आय अ‍ॅम सॉरी. तुमची मार्कलिस्ट चुकीची धरली गेली आहे इथे.'

'म्हणजे? नक्की काय झालंय?' ताई. ती पण घाबरली होती बिचारी.

'अहो, तुम्हाला इथे अ‍ॅडमिशनसाठी यायची गरजच नाही. (ढ्यांग!!) का फॉर्म तरी भरत बसलात? (ढ्यांग!!!) याला बीजेला नक्की अ‍ॅडमिशन मिळणार आहे.'

'क्क्काय??!!'

'हो. बीजेला मिळेल याला अ‍ॅडमिशन. फॉर्म भरलाय ना? इथे आमच्या लिस्टला याचे ११ वीचे मार्क धरून चुकून याचा नंबर इतका खाली आलाय. १२ वीचे मार्क धरले, तर आमच्या लिस्टवरच्या टॉपरच्याही भरपूर पुढे आहे हा! आमच्या क्लेरिकल स्टाफची कुठेतरी गडबड झाली असावी..'

जीव भांड्यात धपकन कसा पडतो, ते त्यादिवशी मला समजले. अचानक, ते सर छान होते असा एक साक्षात्कार मला झाला. त्यांनी त्यांच्या कॉलेजची चूक कबूल करून, अ‍ॅडमिशनसाठी न गंडवता वर मला फुल कॉन्फिडन्स दिला, की याला बीजेला अ‍ॅडमिशन मिळणार हे नक्की. अन त्यांना बिचार्‍यांना हीपण काळजी वाटत होती की या गाढवाने तिकडे फॉर्म तरी भरलाय की नाही?

झाले होते ते असे: ११वी 'रेस्ट इयर' असते. १०वी चा अभ्यास करून दिवे लावून झाल्यावर १ वर्ष थोडं हलके घेतलं तरी चालतं असं म्हणून दिलेल्या ११वीच्या परिक्षेत डिस्टिंक्शन अन ८०-८२% तर होते. पण १२वी सारखे ९३.३% नव्हते. मार्क मोजताना, तिथल्या क्लर्कने १२वी ऐवजी ११वीच्या मार्क्सवर माझे गुणांकन केले होते. सहाजिकच लिस्टला नंबर खाली होता. पण त्याही मार्कांवर मला तेंव्हा टिळक आयुर्वेद कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळून गेली असती. पण ती अ‍ॅडमिशन घ्यावी लागण्याऐवजी 'बीजेची नक्की' हे प्रत्यक्ष अ‍ॅडमिशन प्रोसेसवाल्या प्राध्यापक वैद्यांनी (वैद्य म्हणजे आडनांव नव्हे. प्रा.डॉ. सारखं प्रा.वै. मला आजही त्यांचे नांव ठाऊक नाही.) सांगितल्यामुळे खुष होऊन मी अन ताई खडकवासल्याला परतलो.

-------------
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५

field_vote: 
3.77778
Your rating: None Average: 3.8 (9 votes)

प्रतिक्रिया

आमाला त्या टायमाला दहावीनंतर साडेसात वर्षांचा बी ए एम एस च्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळाली होती. पण त्या वर्षा पासून तो शुद्ध आयुर्वेद असा कोर्स केला. पुर्वी तो मिश्र आयुर्वेद होता. त्यात अ‍ॅलोपॅथीचाही सामावेश होता. वडिलांना शुद्ध आयुर्वेद मान्य नव्हता. त्यामुळे अ‍ॅडमिश कॅन्सल केली. अन्यथा आमचा प्रवास दाक्तर होउन गावाकडं वडिलोपार्जित शेती आन दाक्तरकी करायची असा पक्का ठरलेला होता. वडिलांना मला दाक्तर करायच होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

त्याकाळी (आधीच्या लेखात फारच जुना काळ असे जाणवले असल्याने असे 'त्याकाळी' म्हटलेय Wink ) १२वीला ९३.३% टक्के मार्क मिळवलेत म्हणजे तुम्ही भरपूर हुशार दिसताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

अहो, 'त्या' काळी सुद्धा लिस्टला पहिल्या नंबरला ९८ + मार्क्स होते. अन ते बोनस(स्पोर्ट्स इ.) मिळून १००च्या वर गेले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुमची १२वी बर्‍याच आधी म्हणजे ९०च्या दशकात झाली असावी असं वाटतं आणि तेव्हाही लोकांना बोनस गुण मिळून १०० पेक्षा जास्त टक्केवारी निघत होती हे बघून आश्चर्य वाटलं. बहुतेक मोठ्या लोकांच्या बोलण्यावरून मला ती आजच्या जमान्यातली गोष्ट वाटत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

त्याच्या थोडं आधी. नेमकी कधी ते सांगितलं तर अ‍ॅनॉनिमिटी जाईल अन लिहीण्यावर असंख्य एथिकल बंधने येतील. वेगवेगळया जमान्यात वेगवेगळे बोनस मिळतच आले आहेत. आमच्या काळी एक हेल्थ सर्वे नावाचा प्रकार होता त्याचे मॅक्स ५ कच्चे मार्क्स = १.६६% मिळत. अन स्पोर्ट्स चे ३% वेगळे. असे साडेचार टक्के मिळाले तर आरामात ९६ वाला १०० पुढे जाऊन पोहोचे. अन ९६% वाल्या/वाली ला कॉलेजेस आपोआपच स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स देत. तेंव्हा फक्त इंटरकॉलेजिएट लेव्हल टीम मधे (तालुका लेव्हल ही नाही) रिझर्व असला तरी ते गुण मिळत.

हेल्थ सर्वे म्हणजे ५०० कुटुंबांचा १ ब्लॉक. असे ५ ब्लॉक सर्व्हे केले की ५ मार्क. खेडेगावांत जाऊन लशीकरण अन कुटुंबनियोजनाबद्दल माहिती गोळा करण्याचे काम ते होते. हे ऐच्छिक होते. मेडीकलला जाण्यासाठी इच्छुक मुलं/मुली सुट्यांत ते करीत. एकाद्या रूरल हॉस्पिटलात जाऊन तिथे ते मेडीकल ऑफिसर सर्वे करण्याचे ट्रेनिंग ३ दिवस देत. मग त्यानंतर आपल्या चॉइसच्या गावात जाऊन सर्व्हे पूर्ण करायचा. त्यानंतर तो डेटा, अन एक सोपासा अ‍ॅनालिसिस फॉर्म भरून पीएचसीला नेऊन द्यायचा असे होते. त्या सर्व्हे मधे भरपूर गमतीजमती, अन लोकांशी डायरेक्ट कसे बोलावे? कुणा घराची कडी वाजवून तिथे असलेल्या स्त्री पार्टीला लसिकरणाबद्दल एकवेळ ठीकाय हो, पण संततीचं ऑपरेशन झालंय की तांबी बसवली आहे? की गोळ्या/निरोध वापरता? हे प्रश्न without being offensive कसे विचारावे? इ. फार महत्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या मुळे ह्या ऐच्छिक कामामुळे, मेडिकल ला ५ मार्क मिळणे हे पूरक अन उपयुक्तच होते. नुसते मार्क्स नाही, तर मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असे मी म्हणेन..

१: जेम्स हेरियट या टोपणनांवाने लिहिणारे एक पशुवैद्य इंग्लंडात होऊन गेले. ते माझ्या अत्यंत आवडीच्या लेखकांपैकी एक. त्यांची आत्मचरित्रपर पुस्तके खूप प्रसिद्ध आहेत. वेळ मिळाला तर वाचून बघा. माझी ३-४ पारायणं झालीत त्यांच्या सगळ्या पुस्तकांची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

रोचक भाग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

लिहित रहा, वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आडकित्ताराव,
एकदम मस्त लिहिताय.
बाकी लेखमाला पूर्ण होता होता सविस्तर प्रतिक्रिया दिली जाईलच.
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-----------------------------------------------------------------------------------------------------
'प्रास'ची
१) सांगीतिक आवड
२) लेखन मुसाफिरी

इंटरेस्टिंग आहे ही मालिका.. वाचतोय. वेळोवेळी प्रतिक्रिया देईनच..

उत्तम विषय. पहिल्यांदाच एका डॉक्टरची जुबानी डायरेक्ट दिलसे मराठी आंजावर वाचतोय. नाहीतर मेडिकल डॉक्टर्स फारसे लिहीत नाहीत स्वतःच्या विषयावर..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही भाग एकत्र वाचले.. छान लिहिलंय
लिहा लिहा... लिहित रहा!
लेखन 'वगैरे' आवडतंय! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ का? हृ का नाही? Sad <-- फारा दिवसांपासून दाबून ठेवलेला प्रश्न! तुमच्यासाठी घिसापिटा असेल.. मला उत्तर देऊनच टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दोन्ही भाग रोचक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झक्कास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.