Skip to main content

कथासंग्रह

चिं. त्र्यं. खानोलकर - "गणुराया" आणि "चानी"

चि.त्र्यं. खानोलकर, "गणुराया" आणि "चानी"
मौज प्रकाशन, मुंबई, प्रकाशन वर्ष १९??

समीक्षेचा विषय निवडा

'मुखवटे आणि इतर कथा'

संपादक: सदर धागा इथे प्रतिसाद रुपात हलवला आहे. समीक्षा सदरात अधिक विस्ताराने समीक्षा अपेक्षित आहे.

समीक्षेचा विषय निवडा

पुस्तक परिचय: घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा

ह्या पुस्तकाविषयी बोलायचं तर आधी थोडं लेखक आशिष महाबळविषयी बोलावं लागेल.

आणि आशिषविषयी बोलायचं तर आधी थोडं आमच्या साय-फाय कट्ट्याविषयी.

तर ह्या साय-फाय कट्ट्यावर मराठीतले बरेच हौशी आणि अनुभवी विज्ञानकथा लेखक मंथली चॅलेंजेस वर हिरहिरीने कथा लिहितात.

एकमेकांच्या आणि जगातील उत्कृष्ट सायन्स फिक्शन्सविषयी चर्चा करतात वगैरे.

आशिषची आणि माझी ओळख आणि मैत्री तिथलीच.

आता गंमत काय आहे ना की कोणत्याही जोड शब्दात बसणारी माणसं किंवा कलाकृती ह्या शब्दाच्या अल्यापल्याड ५०-५० टक्के विभागलेल्या कधीच नसतात.

(उदाहरणार्थ सोशिओ-पॉलिटिकल, ट्रॅजी-कॉमिक वगैरे)

समीक्षेचा विषय निवडा

गोष्टीवेल्हाळ लेखकाने बेमालूम रचलेल्या कथा

सतीश तांबे यांच्या 'मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट' या कथासंग्रहाचा युसुफ शेख यांनी करून दिलेला परिचय.
"कल्पनेला वास्तवाचं कोंदण दिल्यामुळे कल्पना आणि वास्तव यांच्या सरमिसळीतून एक नवंच वास्तवदर्शी जग तयार होतं. हे जग या कथांनी निर्माण केलेलं आपलं स्वत:चं एक वेगळंच जग आहे. त्यात सामान्य माणसाच्या आयुष्यातले नेहमीचे प्रसंग घेऊन त्यातून जीवनातल्या शाश्वत मूल्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आहे."

समीक्षेचा विषय निवडा

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

फिलिपाईन्स देशाचा मी आणि माझा बाप.

काही वर्षांपूर्वी मी पु ल देशपांडे यांनी भाषांतरित केलेले ‘काय वाट्टेल ते होईल‘ हे विनोदी पुस्तक वाचले होते. १९४०च्या सुमारास एक रशियन(George and Helen Papashvily) माणूस अमेरिकेत जातो. तो तेथे गेल्यानंतर काय अनुभव आणि गमती जमती होतात याचे बहारदार वर्णन त्यात होते. त्याबद्दल मी येथे लिहिले होते. मीही वीसेक वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन काही वर्षे तेथे राहिलो होतो.

समीक्षेचा विषय निवडा

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही.
इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं.

समीक्षेचा विषय निवडा

जरा जाऊन येतो...

परवा मी मुंबईला अमेरिकेच्या व्हिसासाठी गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रात्रीच्या मुक्कामासाठी बरोबर मोकाशी यांचे पुस्तक नेले होते. त्यातील ‘आता आमोद सुनासि आले’ ही कथा वाचत होतो आणि तिने मला खिळवून ठेवले. त्यात एकाच्या मुलाच्या मृत्यनंतर निर्माण झालेल्या मानसिक अवस्थेचे वर्णन, आणि समांतर अशी दुसरी घटना, जेथे एक गाय व्यायते आहे, अडली आहे, आणि त्यावेळेस होणाऱ्या निर्माण झालेल्या परिस्थितीचे, ताण-तणाव यांचे वर्णन असलेली ही कथा न संपवता झोपूच शकलो नाही. गेली ७-८ वर्षे मी मोकाशी यांची पुस्तके जमेल तशी मिळवून वाचतोय.

समीक्षेचा विषय निवडा