Skip to main content

राजकारण

"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी" - खिळवून ठेवणारे पुस्तक

चार दशकांहून अधिक काळ कूमी कपूर या दिल्लीमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची धाटणी विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल असे काही लिहिण्यापेक्षा गप्पा छाटण्याकडे जास्ती झुकते. आणि हे कुणीही मान्य करील की गप्पा छाटणे ही मानवाची मूलभूत गरज आहे!
काहींना चित्रपटातील तारे-तारका यांच्या वैयक्तिक बाबींबद्दलच्या गप्पा भावतात, काहींना खेळाडूंच्या म्हणजे, अर्थातच क्रिकेट खेळाडूंच्या. काहींना राजकारण्यांच्या अनेकानेक बाबी भुरळ घालतात. मी त्यांतला एक.

समीक्षेचा विषय निवडा

रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन

२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्‍या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======

समीक्षेचा विषय निवडा

फॅंड्री - जाता नाही जात ती...

(ह्यात सिनेमाची गोष्ट अजिबात सांगितलेली नाही; त्यामुळे कोणताही रहस्यभेद ह्यात नाही.)

समीक्षेचा विषय निवडा

'इन्व्हेस्टमेंट'

१९९०च्या दशकात किंवा नंतर जी मध्यमवर्गीय पिढी कमावती झाली, तिला आर्थिक उदारीकरणाचे अनेक फायदे मिळाले. त्यामुळे ह्या मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या सुधारली. पण त्यासोबत मध्यमवर्गीय विचारसरणीतदेखील हळूहळू काही बदल झाले. एखादं सरकारी खातं किंवा बॅंकेत कायमची नोकरी पटकावली, कर्ज काढून छोटा फ्लॅट घेतला म्हणजे आयुष्य सफल झालं, ह्या तेव्हाच्या मध्यमवर्गीय मानसिकतेतून हा वर्ग बाहेर आला. साध्या राहणीची जागा चैनीनं घेतली.

समीक्षेचा विषय निवडा

असंच पाहिजे त्यांना!

ट्रम्प निवडून आला, आणि सत्तेवर येताच त्यानं भसाभस काहीबाही करायला सुरुवात केली. अमेरिकेतल्या भारतीयांना याबद्दल काय म्हणायचंय?

मराठीपणा : एक समस्या

भय्याजी जोशी यांनी नुकतंच एक विधान केलं : मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक अभ्यासक डॉ. राहुल सरवटे यांनी या पार्श्वभूमीवर मराठीपणा म्हणजे काय याचा घेतलेला हा एक धांडोळा.

ट्रम्पचा हैदोसधुल्ला

ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. त्याचा काही प्रमाणात अर्थ लावण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे.

अमेरिकन निवडणुकीत काय होणार?

Kamala Harris Donald Trump
कमला-दोलांड कांटे की टक्कर आहे असं म्हणतायत. ऐसीकरांना काय वाटतं? कोण निवडून येणार? आणि ते निवडून आल्यामुळे काय होणार अमेरिकेचं? आणि जगाचं?

विकीलीक्स : धोकादायक पण सुंदर?

ज्यूलिअन असांजची नुकतीच सुटका झाली आहे. तो कोण आहे? विकीलीक्स काय होतं? त्यामुळे काय झालं? याचा उहापोह या निमित्ताने पुन्हा एकदा.