ललित लेखन
मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस - एक ललित लेखसंग्रह
युद्धस्य कथा रम्यः अशी एक सर्वमान्य समजूत असल्याने असेल, लष्करी आयुष्याबद्दल आतापर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे.
खुद्द लष्करी अधिकाऱ्यांनी लिहिलेली आत्मचरित्रे हा एक मुख्य प्रकार. अर्थात मराठीत आतापर्यंत असले लिखाण कमीच. १९६२ च्या चीन युद्धात बंदी होण्याचे भोग भोगलेल्या ले. कर्नल चव्हाण यांचे आत्मचरित्र हा एक अपवाद. जनरल एस एस पी थोरात यांचे आत्मचरित्र वाचल्याचे पुसटसे आठवते, पण खात्री देता येत नाही.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मुक्काम: आर्मी पोस्ट ऑफिस - एक ललित लेखसंग्रह
- 7 comments
- Log in or register to post comments
- 7631 views
"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी
इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी
- 25 comments
- Log in or register to post comments
- 21865 views
गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर
अरुण खोपकरांचं गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका हे पुस्तक अनेक वर्षं अनुपलब्ध होतं. अखेर त्याची नवी आणि देखणी आवृत्ती उपलब्ध झाली आहे. त्या निमित्तानं जुन्या आवृत्तीचा मी दिलेला परिचय पुन्हा प्रकाशित करतो आहे -
- Read more about गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका : अरुण खोपकर
- 5 comments
- Log in or register to post comments
- 7269 views
पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’
- 23 comments
- Log in or register to post comments
- 12746 views
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १
मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १
मस्त कलंदर अरुण वेढीकरचा तरुणपणातील सायकलनामा.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मुंबई ते काश्मीर... दुचाकीच्या संगे...भाग १
- Log in or register to post comments
- 1156 views
महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३
टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली
रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली
जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली
मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली
होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने - भाग ३
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4760 views
रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन
२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======
- Read more about रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन
- 7 comments
- Log in or register to post comments
- 5821 views
सत्कारणी लागलेली वार्षिक पुणे-भेट!
दुपारी अचानकपणे हाताशी असणार्या ३ ते ४ अशा मधल्या वेळाचं काय करावं बरं?? आणि लक्षात आलं की आपण इंटरनॅशनल बुक डेपोच्या अगदी जवळ आहोत. मग हातातील ओझं, (‘चितळ्यां’कडच्या खाऊमुळे झालेलं!) सावरत पोचले तिथवर! बघते तर दुकानाचा मुख दरवाजा बंद पण काचेचे शेल्फ उघडेच दिसत होते.
फोन करून विचारावं की पुस्तकं बघता येऊ शकतील का ते? की पुणेरी वा चितळे स्टाईल काहीतरी उत्तर मिळेल?
फोननंबर जवळ नव्हता म्हणून नेहमीच्या ठरलेल्या दोन-तीन पुस्तक-विक्रेत्यांना फोन करून विचारला. त्यांच्याकडे नाही मिळाला.
लक्षात आलं, ‘काखेत कळसा...’ झालायं!
सेलफोनवरून ‘गुगल-सर्च’ केलं आणि काय ... थेट कॉलच केला.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about सत्कारणी लागलेली वार्षिक पुणे-भेट!
- 7 comments
- Log in or register to post comments
- 2513 views
रावा - शुभांगी गोखले
(समीक्षेत याची जिम्मा होईल का, याबद्दल किंतू आहे. जर होत नसेल, तर सरळ 'सध्या काय वाचताय?'मधे घालून टाकावे.)
आज फारा दिसांनी प्रसन्न दिवस सुरू झाला. खिडकीपासची भरार वार्याची जागा, कोवळं ऊन आणि ताजातवाना पोपटी मूड. हातात मस्त कोरंकरकरीत पुस्तक.
शुभांगी गोखलेचं ’रावा’ नावाचं पुस्तक. फार काही जगावेगळं, जगात बदल घडवून आणायला निघालेलं, मैलाचा दगडबिगड ठरेलसं नव्हे. आहे आपलं साधंसंच. पण फार फार जवळचं, आत्मीय वाटलं.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about रावा - शुभांगी गोखले
- 2 comments
- Log in or register to post comments
- 3767 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)
भाग १ | भाग २
ह्यापुढचा लेख म्हणजे सावरकरांवरचा मृत्युलेख असावा. पुस्तकात त्याच्या प्रथम प्रकाशनाची तारीख १९६३ दिली आहे, पण त्यात सावरकरांच्या मृत्यूचा (१९६६) उल्लेख आहे. सावरकरांना अभिप्रेत असलेलं समाजाचं आधुनिकीकरण किंवा प्रत्येकाला पोटभर अन्नाची आणि अंगभर वस्त्राची हमी देणारा समाजवाद कुरुंदकरांना आवडतो, हे साहजिक आहे. त्याशिवाय, कुरुंदकर सावरकरांना 'सशस्त्र क्रांतीचे महान योजक' म्हणतात. 'सशस्त्र क्रांती भारतात शक्य होती का, हा प्रश्न बाजूला ठेवला तर क्रांतीची पहिली व्यवहार्य, सुसूत्र व अखिल भारतीय पातळीची योजना सावरकरांनी प्रगल्भपणे रचली', असं ते म्हणतात. 'देशावरील प्रेमामुळे सावरकर अधिक उत्कट, भाबडे व आततायी झाले नाहीत; ते अधिक शांत, व्यवहारी व व्यापक झाले' असंही ते म्हणतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग ३)
- 8 comments
- Log in or register to post comments
- 15602 views