कलाकार

जियो राघवन! अर्थात अंधाधून!

वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.

===================================================================================

ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन

ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.

मनात रेंगाळत राहणारा कलाप्रवास

समीक्षेचा विषय निवडा: 

विनिता भट

मागे रफीवरील लेख लिहित असताना त्याची बरीच गाणी ऐकली आणि काही निवडक गाणी पाहिली. तेव्हा अनायासे मोहम्मद रफीने गायलेलं आणि जाॅनी वाॅकरवर चित्रित झालेलं एक गाणं पाहण्यात आलं. त्यातील जाॅनी वाॅकरच्या कामाला तोड नाही. पण आता इथं त्याबद्दल नाही बोलत कारण, जाॅनी वाॅकरचं काम हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.

समीक्षेचा विषय निवडा: 

दोन संवेदनशील लघुपट दिग्दर्शक

(या लेखात उल्लेखलेल्या तीनही लघुपटांमधील कथा उघड केलेली नाही. अर्थात, यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पाॅयलर नाहीत. ''8'' या लघुपटाची लिंक शेवटी दिली आहे.)

लघुपट हे कमी कालावधीत जास्त परिपूर्ण, परिपक्व व परिणामकारक विषय मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. त्यातल्या त्यात आपल्याकडे लघुपट निर्मितीची एक क्रेझ आजकाल निर्माण झाली आहे. पण, त्यातील विषय, त्याची हाताळणी याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय का, हे पाहणे आता गरजेचे आहे. असो.
तर आपल्याकडेही कित्येक अप्रतिम दिग्दर्शक आहेत. ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करता येतील अशी - क्रांती कानडे, राम गावकर, इत्यादी मराठी नावंही आहेत. क्रांती कानडेची जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर आधारित 'चैत्र', किंवा रामचंद्र गावकर दिग्दर्शित 'सेल्फी' अशा कित्येक परिपूर्ण शाॅर्टफिल्म्स उदाहरण म्हणून सांगता येतील. असो.
तर लघुपट या विषयावर पुन्हा कधीतरी सविस्तर बोलूच, पण तूर्तास तरी आजच्या विषयाकडे वळू.

समीक्षेचा विषय निवडा: 

घेई छंद - पुस्तक परीक्षण

आपल्या आयुष्यात बऱ्याच phases येत असतात. कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ न मिळाल्याने त्या बाजूला पडत जातात. मग अचानक एखाद्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टींची आठवण येते.

मी लहान असताना बरीच पुस्तकं वाचायचो. हळूहळू जसा मोठा होत गेलो तसा पुस्तकांसाठी वेळ कमी मिळायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून पुस्तकांचं वाचन थोडं मंदावलं. तरीही मी जसा वेळ मिळेल तसा काढून पुस्तकांचं वाचन चालूच ठेवलं होतं. बरीच पुस्तकं वाचली तरी वाचलेल्या पुस्तकावर आजवर मी कधी काही लिहिलं नव्हतं. अपवाद फक्त सातवीत असताना लिहिलेल्या काही टिपणांचा. त्यामुळे पुस्तक परीक्षण करण्याचा मला अजून तरी काही अनुभव नाही.

समीक्षेचा विषय निवडा: 

बीटल्स बद्दल थोडेफार

१९५७ -५८ सुमारास लिव्हरपूल सारख्या कला प्रांतात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या शहरात ४ टीनएजर पोरं ( १४-१७ वयोगटातील ) एकत्र आली आणि त्यांनी एक बँड काढला . बरीच नावे बदलत अखेर त्यांनी बीटल्स हे नाव घेतले . पहिली ४-५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी घासूगिरी करत करत ( ज्यात हॅम्बर्ग मधल्या रावडी बार्स मध्ये मद्यधुंद सेलर्स समोर मध्ये दररोज रात्री ८- ८ तास गाणे वाजवणे वगैरे सुध्दा आले ) ते एक घट्ट परफॉर्मिंग बँड बनले .या घासू पणाचा फायदा त्यांना नंतर ,(तेव्हा पर्यंत फारश्या प्रचलित नसलेल्या ) स्टेडियम भर फॅन्स समोर बिनधास्त आरामात परफॉर्म करण्यात झाला .

समीक्षेचा विषय निवडा: 

जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...

आज जुलै १० २०१६, जीएंची ९३ वी जयंती....

जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...ते किती चांगले कवी होऊ शकले असते ह्याची झलक आपल्याला 'स्वामी' मधील embedded 'कविते'तून येते...

चित्रकारी बद्दल त्यांनी अधून मधून त्रोटक लिहले आहे... ही पहा एक झलक...

समीक्षेचा विषय निवडा: 

Half girlfriend अर्थात अर्धी प्रेयसी

Five point someone,Three mistakes of my life,2 states यासरख्या मनोरंजक कादांबर्‍या वाचल्यानंतर प्रकाशना पुर्वीपासुन गाजत असलेले आणि प्रकाशनानंतर best seller असलेले Half girlfriend कसे असेल याबद्दल उत्सुकता होती.चेतन भगतच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गोष्ट सांगतो ती तुमच्या आमच्या सारख्याच एखाद्या मुलाची,म्हणजे त्याच्या कथेतील नायक हा काही फार मोठा तीर मारणाराही नसतो आणि दुखः,दैन्य,दारिद्र्याने ग्रासलेला-अन्याय सहन करणारा बिचारा वैगेरे ही नसतो.म्ह्णुनच त्याच्या गोष्टींशी आपण सहजपणे जोडले जातो.

समीक्षेचा विषय निवडा: 

रिंगणः एक कथेचे अभिवाचन आणि एक नाट्यवाचन

२-३ आठवड्यांपूर्वी 'आसक्त'तर्फे राबवल्या जाणार्‍या "रिंगण" नावाचा उपक्रमाबद्दल कळलं. त्याअंतर्गत या विकांताला शनिवारी (८-ऑगस्टला) पु.शि.रेगे यांच्या "सावित्री"चे अभिवाचन तर रविवारी श्री.सुधन्वा देशपांडे यांच्या "बहुत रात हो चली है" या नाटकाचा ज्योती सुभाष यांनी अनुवाद केलेल्या "रात्र काळी" या नाटकाचे नाट्यवाचन होते.
=======

समीक्षेचा विषय निवडा: 

पाने

Subscribe to RSS - कलाकार