वैज्ञानिक

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

(सुचना – हा लेख वाचून ज्यांच्या भावना दुखवू शकतात अशा “प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाभिमानी” लोकांनी तो वाचू नये किंवा स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा. भावनाना ठेच लागल्यास अस्मादिक जबाबदार असणार नाहीत.)

समीक्षेचा विषय निवडा: 

तरीही मुरारी देईल का?

एका भाषेतल्या पुस्तकावर दुसऱ्या भाषेत लिहिताना शीर्षकापासून ठेचकाळणं काही खरं नाही. “The Great Derangement” या अमिताव घोषच्या नव्या पुस्तकाच्या शीर्षकातल्या “derangement” चं चपखल भाषांतर काय असावं? "वेडाचा झटका" हा तसा शब्दशः अर्थ, पण अमितावने ज्या अर्थी वापरला आहे तो "त्रुटी"कडे जास्त झुकणारा. शीर्षकापासूनच कोड्यात टाकणाऱ्या या पुस्तकाने अनेक कोडी उभी केली. काही सोडवली, काहींची उत्तरं पटली नाहीत, काही कोडी आहेत हेच नवीन ज्ञान झालं.

समीक्षेचा विषय निवडा: 

आश्चर्यकारक विज्ञान

आश्चर्यकारक विज्ञान या नावाने प्रकाशित केलेल्या या संचातील भुलभुलैय्या, महाशक्तीशाली लेसर, उर्जानाट्य,व अलिबाबाची गुहा ही विज्ञानविषयक पुस्तकं वाचत असताना आताच्या नवीन पिढीचा हेवा वाटू लागतो. कारण २०-३० वर्षापूर्वी आपल्या मनातील कुतूहलकारक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी, पालक, भाऊ-बहीण, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक, पाठ्य पुस्तकं, संदर्भ ग्रंथ, वाचनालय यांच्याकडे हेलपाटे घालावे लागत होते. (व त्या उत्तरावाचून काही अडत नाही हे लक्षात आल्यानंतर गप्प बसावे लागत होते.) परंतु आज गूगल अंकल एका क्लिकमध्ये सर्व माहिती तुमच्या डोळ्यासमोर हजर करतो.

समीक्षेचा विषय निवडा: 

गणितस्य कथा: रम्या: |

एकंदरीत मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये गणित या विषयाचा सिंहाचा वाटा असूनही गणित, गणितज्ञ, आणि गणिताचा इतिहास या बाबतीत समाजात सर्वसाधारणपणे अनभिज्ञता आढळते. अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाई या लेखकद्वयीनं मात्र या परिस्थितीला छेद देऊन अगदी अनादी काळापासून ते आजच्या आधुनिक उच्चस्तरीय गणितापर्यंतच्या या विषयाच्या प्रवासातले महत्वाचे टप्पे, ते गाठण्यात महत्वाचा वाटा असणारे गणितज्ञ आणि एकूणच गणिती प्रक्रियेचा गुंतागुंतीचा इतिहास वाचकांपुढे रंजकपणे मांडला आहे – त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडके!

- डॉ. श्रीकृष्ण दाणी
समीक्षेचा विषय निवडा: 

पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म


पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म

फोटोत डावी कडून श्री. श्री श्री भट, शशिकांत ओक, डॉ. प.वि. वर्तक आणि धनुर्धारीचे संपादक-मालक श्री सापळे
समीक्षेचा विषय निवडा: 

मेंदूचे अंतरंग

मेंदू हे माणसाला पडलेले सगळ्यात अवघड कोडे आहे. या कोड्याचे उत्तर पुन्हा मेंदूतच दडलेले आहे !
आपल्याला स्वप्न का पडतात? हरवून जातो? स्मरणरंजनात आपण इतके का हरवतो? सूड घ्यायची इच्छा मनात का निर्माण होते? आपण प्रेमात का पडतो? सगळ्या भावभावना हा जर मेंदूतल्या रसायनांचाच खेळ असला तर मग आपल्या हातात काय असतं? या प्रश्नाची उत्तर शोधायला जितकं खोल जावं तितकं गुंत्यात अधिकच अडकायला होतं!

समीक्षेचा विषय निवडा: 
Subscribe to RSS - वैज्ञानिक