ललित लेखन
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
सॉक्रेटिसनंतर शिवाजीराजांच्या पराभवांविषयीचा लेख आहे. शिवाजी महाराजांचं पराक्रमांनी भरलेलं जे आयुष्य नेहमी सांगितलं जातं त्याला छेद देण्याचा प्रयत्न इथे आहे. स्वराज्याचं स्वप्न पुरं होईल की नाही ह्याविषयीची सततची अनिश्चितता, वारंवार होणारे हल्ले आणि त्यातून बाहेर पडणारा शिवाजी ह्यात दिसतो. आदिलशाही आणि मोगल सत्ता ह्यांचं बलाढ्य सामर्थ्य आणि त्याला सामोरं जाणारी, त्या मानानं छोटी असणारी शिवाजीची सेना असा पट ते मांडतात.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध (भाग २)
- 15 comments
- Log in or register to post comments
- 17601 views
निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
'नरहर कुरुंदकर' ह्या नावाला महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक वलय होतं; मर्यादित प्रमाणात आजही आहे. त्यामागे अनेक कारणं होती - त्यांचा मार्क्सवाद, त्यांचं नास्तिक असणं, शिवाजी किंवा मनुस्मृती अशा विषयांवरची त्यांची चिकित्सा, त्यांची साहित्यसमीक्षा, विद्यार्थीप्रियता आणि प्रभावी वक्तृत्व - अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. निजामाच्या राजवटीत जन्म आणि वाढ, समाजवादी वर्तुळात वावर, मराठवाड्यातल्या परंपराप्रिय ब्राह्मण घराची पार्श्वभूमी, मामा ना. गो. नांदापूरकरांचा लहानपणापासूनचा सहवास, हमीद दलवाईंशी मैत्री अशा अनेक घटकांनी त्यांच्या तीव्र बुद्धिमत्तेला पैलू पाडले. महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती झाली. १९८२ साली अवघ्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या त्यांच्या अकाली निधनानं त्यामुळे अनेकजण हळहळले.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about निवडक नरहर कुरुंदकर - खंड १ : व्यक्तिवेध
- 26 comments
- Log in or register to post comments
- 22465 views
झिम्मा – नाट्यचरित्र
नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले.
झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
- Read more about झिम्मा – नाट्यचरित्र
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2189 views
मातृभाषा : समज, गैरसमज.
मातृभाषा या शब्दाबद्दल जगभरातील बहुतेक लोकांचे गैरसमज आहेत. अनेकदा मातृभाषा हा शब्द आईने बोललेल्या भाषेला सूचित करतो. अलीकडे आमच्या कुटुंबातही हा वाद सुरू होता.( इथल्याच एका लेखावरून प्रेरणा घेऊन). मुद्दा असा होता की, मातृभाषा म्हणजे आईकडून मिळालेली भाषा. हा दृष्टिकोन मला चुकीचा वाटतो. ज्या समाजात आपण लहानपणापासून वाढलो तिथली भाषा हीच आपली मूळ भाषा किंवा मातृभाषा.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मातृभाषा : समज, गैरसमज.
- 9 comments
- Log in or register to post comments
- 2319 views
प्रॉफेट : खलील जिब्रान ; पुस्तक परिचय्
प्रॉफेटः खलील जिब्रान..
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about प्रॉफेट : खलील जिब्रान ; पुस्तक परिचय्
- Log in or register to post comments
- 669 views
तत्वमसि
सृष्टी से पहले सत्य नहीं था,
असत्य भी नहीं
अंतरिक्ष भी नहीं,
आकाश भीं नहीं था
छिपा था क्या कहाँ,
किसने देखा था
उस पल तो अगम,
अटल जल भी कहाँ था
सृष्टी का कौन हैं कर्ता
कर्ता हैं यह वा अकर्ता
ऊंचे आसमान में रहता
सदा अध्यक्ष बना रहता
वोहीं सच मुच में जानता.
या नहीं भी जानता
हैं किसी को नहीं पता
नहीं पता
कधीतरी लहानपणी ऐकलेले हे शब्द लक्षात राहिले कारण they talked about something deeper. या शब्दांचा अर्थ कळायच ते वय नव्हत पण हे नक्की होत कि कधीतरी कुठे तरी अर्थ उमजेल.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about तत्वमसि
- 3 comments
- Log in or register to post comments
- 3580 views
मोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू
लहानपणी मी ऐकल्याचं आठवतंय की फुलपाखरू, पाली, झुरळं इत्यादी 'निरुपद्रवी जीव' आहेत. फुलपाखरं तशी दिसायला बरी असतात. मस्त रंगीत पंख फडफडवत ती निवांत नेत्रसुख देतात. पण कुरूप फुलपाखरू एखादं असेल, तर ते सर्वथा (माणसासाठी) निरुपयोगी आहे. त्याच्या फडफडीकडे लक्षही जात नाही. गेलंच तर काय च्यायची कटकट... वगैरे मनात येऊन जातं. डिक्षनरीचा उलटा प्रकार थिसॉरस असतो. अर्थावरून शब्द शोधणे असा काहीसा. एखादं चुकार कुरूप फुलपाखरू अशा थिसॉरसावर जाऊन बसलं, की त्याच्या डोक्यात
थिसॉरस-सॉरस-डायनोसॉर-मी डायनोसॉरचा वंशज-वंशज-बघतोस काय रागानं, झेप घेतलीय टी-रेक्सनं
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about मोनेकृत थिसॉरसातले कुरूप जिप्सी फुलपाखरू
- 9 comments
- Log in or register to post comments
- 7215 views
जियो राघवन! अर्थात अंधाधून!
वि सू -तुम्ही अंधाधून चित्रपट पाहिला नसेल तर खाली लिहिलेलं मुळीच वाचू नका. उगाच मनस्ताप कशाला? आधी चित्रपट बघा, नक्की बघा. मग वाचा किंवा वाचू नका
हा घ्या ट्रेलर.
===================================================================================
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जियो राघवन! अर्थात अंधाधून!
- 28 comments
- Log in or register to post comments
- 20997 views
ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
ऐसी अक्षरे ह्या संस्थळाने आजपर्यंत मराठी रसिकांसाठी गेली ६ वर्ष दिवाळी अंकांची मेजवानीच सादर केली आहे. ह्यात प्रतिथयश लेखकांनी सदाबहार विषयांवर विविधतेने नटलेली शेकडो पुष्प रसिकांसमोर पेश केली आहेत. दर वर्षी नवनवीन संकल्पनांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण ही तर ऐसीची खासियत! त्यात पुन्हा चोखंदळ वाचकांच्या प्रतिक्रिया हे ऐसीचे आणखी एक वैशिष्टय. तर आता आपण एसीच्या गेल्या काही वर्षातील दिवाळी अंकांबद्दलची मराठी साहित्याच्या दृष्टीने समीक्षेच्या अंगाने होणारी वाटचाल पाहू.
.
- ह्या ऐसी दिवाळीसाठी माझ्यातर्फे इतकाच विनोद.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about ऐसी दिवाळी अंक - एक सिंहावलोकन
- 22 comments
- Log in or register to post comments
- 14797 views
"सशाची शिंगे" : पुस्तक परिचय
खरं म्हणजे हे "स.शा.ची शिंगे" असं लिहायला हवं. "स.शा." हे समाजशास्त्र या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about "सशाची शिंगे" : पुस्तक परिचय
- 34 comments
- Log in or register to post comments
- 26540 views