छायाचित्रण स्पर्धा
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १३: निसर्गात मानवी जीवन/भावना बघणार्या साहित्याची आठवण करुन देणारी छायाचित्रे
नेहमीची ओळख असणार्या पाण्याशी पहिली विस्फारीत भेट घालून देणार्या पावसाचे दिवस आहेत. सृजनाचा ऋतू म्हणतात पावसाळ्याला. खरंतर उत्पती, स्थिती, लय या निसर्गचक्राचं एक आरं. किंवा शाळेतली माहिती. बाष्प, हवा, धुळ वैगेरेचे ढग होतात मग पाउस पडतो वैगेरे. पण सगळ्या ऋतूंमध्ये त्याला भलताच भाव आहे.
.
.
.
थांबा. मी पाउस हा विषय देत नाहीय.
.
.
.
हां तर मग पाउस हा लाडका ऋतू का आहे? आपण निसर्गालाही नकळत आपल्या भावनांची लेबलं चिकटवतो. मग जसं छोटं मूल आवडतं तसं छोटुले कोंब, गवताची नाजूक पाती आणि शेवाळही आपल्याला आवडतं मग यांना साद घालणारा पाउस का नाही आवडणार?
स्पर्धा का इतर?
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..
खरं तर नवं आव्हान देण्यासाठी विचार करायला फारसा वेळ नाही आहे पण हे सुदैवाने चटकन सुचलं.
'थोडासा रूमानी हो जाएँ' या कमलेश पांडे लिखित चित्रपटात श्री. धृष्टद्युम्नपद्मनाभप्रजापतिनीळकंठधूमकेतू बारिशकर यांचा पुढील संवाद ऐका -
.
(https://youtu.be/LytifZOOENw)
पावसाची नि पर्यायाने पाण्याची विविध रुपं अतिशय नज़ाकतीत बयाँ केली आहेत.
.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १२: पानी तो पानी हैं..
- 43 comments
- Log in or register to post comments
- 33061 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात
सर्वप्रथम, विषय देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व!
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात
- 84 comments
- Log in or register to post comments
- 45219 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे
अतिवापराने वैशिष्ट्य हरवलेल्या प्रतिमा हव्या आहेत. सोबत दवणीय कॅप्शन असल्यास उत्तमच, पण त्याची आवश्यकता नाही.
उदाहरणादाखल -
१. सूर्यास्त/सूर्योदय/सोनेरी किनार असलेले काळे ढग
२. नितळ जलाशयातली एकाकी होडी
३. प्रसिद्ध इमारतींची आकाशरेखा (+पिरॅमिडचे टोक पकडणे, पिसाच्या मनोर्याला आधार देणे इ. लीळा)
४. निरागस बालके (मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का)/गरीब, तरीही सुहास्यवदनी मजूर (कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?)/ सुमार गझलांत येतो तसा विरोधाभास (गरीब-श्रीमंत, युवक-वृद्ध, भांग-तुळस इ.)
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग १०: क्लिशे
- 129 comments
- Log in or register to post comments
- 49827 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच
या पर्वात विषय देताना एकच एक विषय न देता वाचलेल्या पुस्तक, लेखनातला उतारा देणं अपेक्षित आहे. बंडखोरीचा नियम पाळत (किंवा आपण पुस्तकं वाचत नाही याची जाहिरात करत) पुढचा विषय देत आहोत - काच. (हा विषय सायली आणि मी संयुक्तपणे ठरवला आहे.) काचेतून आरपार दिसतं, काचेतून प्रकाश परावर्तित, अपवर्तित होतो, काच ठिसूळ असते, असे काचेच गुणधर्म दाखवणाऱ्या छायाचित्रांची या भागात अपेक्षा आहे. काचेसारख्या परावर्तन, ठिसूळपणा असे गुणधर्म दाखवणाऱ्या इतर वस्तूंचे फोटोही या स्पर्धेसाठी चालतील. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारे काचेचे फोटो अपेक्षित आहेत.
नियमः
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ९: काच
- 13 comments
- Log in or register to post comments
- 11349 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे
अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे छायाचित्रे हा छायाचित्रणातला एक अवघड प्रकार आहे. छायाचित्र काढण्याआधी त्यातून नेमके काय दाखवायचे आहे, हे आपण ठरवतो. एका डोंगरासमोर ५० लोकांना एकसमान कॅमेरा देऊन उभे केले तरी ५० वेगवेगळी छायाचित्रे मिळू शकतात. या वेगवेगळ्या शक्यतांमध्ये मजा आहे, आणि यातली एक मजा म्हणजे "अल्पावधानी" छायाचित्रे. या प्रकारात छायाचित्राचा मूळ विषय हा केंद्रबिंदू न ठेवता, त्याच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा चित्राचा अविभाज्य भाग बनतो. हे तंत्र लेखक कथांमध्ये वापरतात किंवा दिग्दर्शक चित्रपटांमध्ये वापरतात.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ८: अल्पावधानी (Minimalistic) छायाचित्रे
- 34 comments
- Log in or register to post comments
- 24395 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म
धर्म
भारतातला आणि समस्त अंतर्जालावारचा सर्वात संवेदनशिल विषय
पब्लिक लय तुटून पडतंय राव.
पण फोटोग्राफी किंवा कुठलीही कला हि कुठल्याच धर्माची नसते, त्यामुळे तिच्या नजरेतून हे विविध धर्म बघण्यातली मजा वेगळीच असेल
सो लेट्स स्टार्ट :)
नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म
- 47 comments
- Log in or register to post comments
- 30245 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल
वर्षाचा अंत जवळ येत आहे, माझ्या आजूबाजूची झाडे पाने गळून सांगाडे झाली आहेत, आणि कडाक्याच्या थंडीत निसर्ग निपचित पडल्यासारखा झाला आहे. अशा या वातावरणात मी अतुल गावंडे (अमेरिकेत उच्चार "गवांडे") या शल्यचिकित्सक लेखकाचे "Being Mortal" हे पुस्तक वाचले. वैद्यकशास्त्राने अनेक आजारांवर उपचार मिळवले आहेत, वेदना आणि दु:ख कमी केले आहे, आयुष्यमान लांबवले आहे, हे खरे.
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ६ : मर्त्य असण्याबद्दल
- 26 comments
- Log in or register to post comments
- 18927 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद
याआधीच्या भागात अतिशय कमी एंट्रीज आल्याने त्या भागाचा निकाल न लावता पुढिल भाग द्यायचे ठरवत आहोत. याही भागात कमी इंट्रीज आल्या तरीही आलेल्या इंट्रीजपैकी एक चित्र निवडून निकाल दिला जाईल
या वेळच्या आव्हानासाठी "सात सक्कं त्रेचाळीस" या किरण नगरकर यांच्या पुस्तकातील एक लहानसा उतारा देत आहोतः
--------
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ५ : 'सात सक्कं त्रेचाळीस' मधील परिच्छेद
- 42 comments
- Log in or register to post comments
- 29150 views
छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता'
तिघाही विजेत्यांच्यावतीने हे आव्हान देत आहे:
या विकांतापासून आपल्याकडे गणरायांचे आगमन होईल. गणेशाची सर्वप्रथम म्हटली जाणारी "सुखकर्ता दु:खहर्ता" ही आरती आपल्याला परिचित आहेच.
ही आरती अनेक गायकांनी आपापल्या आवाजात गायली आहे. अनेक ऐसी अक्षरेकरही आपापल्या आवडत्या/सर्वसाधारणपणे रुळलेल्या चालीतही ती गात असतीलच / गायली / ऐकली असेलच. त्यामुळे त्या आरतीचा ऑडीयो/व्हिडीयो इथे देत नाहियोत. त्या आरतीचे शब्द मात्र पुढे दिले आहेतः
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
स्पर्धा का इतर?
- Read more about छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता'
- 50 comments
- Log in or register to post comments
- 30635 views