छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ४ : 'सुखकर्ता दु:खहर्ता'

तिघाही विजेत्यांच्यावतीने हे आव्हान देत आहे:

या विकांतापासून आपल्याकडे गणरायांचे आगमन होईल. गणेशाची सर्वप्रथम म्हटली जाणारी "सुखकर्ता दु:खहर्ता" ही आरती आपल्याला परिचित आहेच.
ही आरती अनेक गायकांनी आपापल्या आवाजात गायली आहे. अनेक ऐसी अक्षरेकरही आपापल्या आवडत्या/सर्वसाधारणपणे रुळलेल्या चालीतही ती गात असतीलच / गायली / ऐकली असेलच. त्यामुळे त्या आरतीचा ऑडीयो/व्हिडीयो इथे देत नाहियोत. त्या आरतीचे शब्द मात्र पुढे दिले आहेतः

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
सर्वांग सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया ।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। २ ।।

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ।।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। ३ ।।

-- रामदास स्वामी

या आरतीला ऐकताच काहिंना गणेशाचे रूप, काहिंना त्याचे गुण, काहिंना त्याच्याशी संबंधित इतर कथा आठवत असतील. तर काहिंना या आरतीबरोबरच आप्तेष्टांचा गोतावळा, घरी भावंडांचा दंगा आठवत असेल. काहिंना मखर आठवत असेल तर काहिंना मोदकपात्र, तर काहिंना मोदकांचे भरलेले ताट. काहिंना विसर्जनाआधी म्हटली जाणारी आरती आठवत असेल तर काहिंना तालात ठुमकणार्‍या-वाजणार्‍या झांजांची आठवण येत असेल. एकच आरती प्रत्येकाच्या मनात, डोळ्यांसमोर एक निराळेच काहि घेऊन येत असते.

तर यावेळच्या आव्हानात ही आरती वाचून/ऐकून/वाचताना/ऐकताना डोळ्यांसमोर तराळणार्‍या, लगेच आठवणार्‍या गोष्टींचे छायाचित्रण करायचे आहे.
चला तर, येऊ द्यात उत्तमोत्तम छायाचित्रे.. बोला गणपती बाप्पा मोरया!

नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १४ सप्टेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा! पंडाल, लाउडस्पीकर, मिरवणूक वगैरेंचा वीट आलाय, पण गणपतीत पुण्याची खूप आठवण होत राहते एवढे मात्र खरे. काही वर्षांपूर्वी तांबडी जोगेश्वरीच्या गणपतीचा फोटो, होम-हवन चालवताना समोर सर्व पुरोहित स्त्रिया.

tambdijogeshwariwomenpriests

स्पर्धेसाठी नाही. लोकसत्तेतला हा फोटू पाहून या स्पर्धेचा विषय आठवला:

लंबोदराला 'सरळसोंड वक्रतुंड त्रिनयना' का म्हटले आहे, ते या फटूतला तिसरा डोळा पाहून आपसूख कळेल. Wink

हा हा हा __/\__

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नंदन आणि अमुक, दोघांच्याही चरणी बालिकेचा शिरसाष्टांग नमस्कार!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वेगळा विषय द्या.

===
Amazing Amy (◣_◢)

आता तसेही शेवटचे चार दिवस राहिलेत.
गणपतींचे विसर्जनही झालेय, त्यात काही छायाचित्रे आली तर पाहु नाहितर मग केवळ रोचना यांनीच छायाचित्र टाकले असल्यास त्यांनाच पुढिल विषय द्यायला सांगुयात.

विषय कठीण नक्कीच नव्हता, तरीही प्रतिसाद का मिळाला नाही कल्पना नाही Sad

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटतं फोटोग्राफरची क्रिएटीव्हीटी/टअॅलेंट दाखवता येइल असे काही सुचले नसेल कोणाला. मग तेचते सगळीकडे दिसणारे गणपतीचे फोटो कशाला टाकायचे असा विचार केला असेल.

===
Amazing Amy (◣_◢)

फोटो टाकेन म्हणाले आणि शोधलं तर अपेक्षाभंग झाला. असो. तरीही काही फोटो टाकतेय -
काही वर्षांपूर्वी गणपतीची मूर्ती बनवण्याचं वर्कशॉप केलं होतं. मूर्ती स्वतः बनवताना खूप मजा आलेली आणि त्याच मूर्तीची गणेशोत्सवात घरी स्थापना केली म्हणून छान वाटलं होतं.

प्रत्येक गणपतीच्या गळ्यात त्या त्या मूर्तीकारच्या नावचा टॅग अडकवलेला आहे. Smile

जास्वंद -

हा फोटो अतिशय ब्लर आहे हे माहीती आहे, तरी मला आवडतो

@ऋ - अजून काही फोटो आले नाहीत तर दुसरा विषय दे असं सुचवते.

फुलांचा फोटो खूप सुरेख. अगदी ताजे बागेतले फुलं आहेत वाटतं Smile

आणि तो पहिला गणपती मुर्तींचा फोटो पाहून असं वाटतं जसं काही शाळेच्या गॅदरींग मधे ह्या सगळ्या बाळ-गणपतींनी भाग घेतलाय आणि आत्ता चालू असलेल्या प्रयोगानंतर आपलाच प्रयोग आहे, आणि मग असे विंगेत तयार होऊन/मेकप करुन तयारीत उभे आहेत Smile गोडच!

जास्वंद आणि चाफा… ओहोहोहो!!!!

जास्वंद बघितला की गणपती आठवतोच! आणि चाफा तर… नितांत सुंदर! इथे आम्रविकेत राहून या मराठमोळ्या फुलांची आठवण प्रकर्षाने येते. माझ्या university मध्ये एकदा गुलाबी जास्वंद दिसला होता तेव्हा त्याला हरेक कोनातून टिपून काढला होता. तुझ्या या फोटोमध्ये माझ्या आवडत्या फुलांचं कोवळेपण जितकं जाणवतंय तितकंच सकाळचं कोवळं ऊन सुद्धा… त्यामुळे फोटो खासच आवडला…

गेल्या विकेंडलाच टेक्सासात रसरशीत जास्वंद पाहिला. चाफा मात्र दिसलेला नाही. (चोरून एखादं झाड आणावं लागेल.) अनंताची रोपं होम डीपोमध्ये दिसतात. मोगरा लोकांच्या घरांसमोर, कुंड्यांमधून बघितला आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हाईट हाऊसच्या रस्त्याला खेटून असलेल्या बागेत भल्या मोठ्या (हत्तीच्या कानाएवढ्या) जास्वंदाची फुले पाहिल्याचे आठवते

छे हो… दूर आहे खूप! नाहीतर पुढच्या वर्षी गणपतीला वाहायला कामी आले असते…

-

आणि त्याचवेळी हे काही दुवे:

पिंडी - https://stevemccurry.wordpress.com/2014/09/22/language-of-hands/

ब्रह्मांडी - http://www.boston.com/bigpicture/2014/09/images_from_nasa.html

ज्याच्या आराधनेने कामांचा शुभारंभ होतो, त्याच्याच छायाचित्रांच्या विषयाने या स्पर्धाप्रक्रियेत अडथळा यावा…. काय ही विसंगती!!

या विषयाच्या निकालाची आणि पुढच्या विषयाची मी मनापासून नाही तर मुळापासून वाट पाहत आहे.

या स्पर्धेचा निकाल देत नाहियोत. फक्त चारच चित्रे आली आहेत.
लवकरच नवा विषय देतोय

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशा विषयांना बहुदा असाच प्रतिसाद मिळेल अशी शंका वाटते.

या धाग्यावर न मिळालेला रिस्पॉन्स बहुतांश ऐसीकरांच्या एका मानसिकतेचा निदर्शक आहे. मराठी लोकांत जगात कुठेही गणेशोत्सव म्हटले कि नेहमीपेक्षा जास्त उत्साह संचारतो. इथे अगदी उलटे झालेले दिसते. भारतीय पारंपारिक, संस्कृती निदर्शक अशा कोणत्याही गोष्टीला शिवून विटाळ करून घ्यायचा नाही अशी मानसिकता बर्‍याच भारतीयांत निपजताना दिसते आहे.
----------
प्रत्येकच गोष्टीला प्रो आणि कॉन दोन्ही बाजू असतात. भारतीय स्वातंत्र्याची ७० वर्षे म्हटले कि काय आठवायला पाहिजे? फक्त रक्तरंजित फाळणी, काश्मिर आणि पंजाबचे प्रश्न, आणिबाणी, नक्षलवाद, न आलेली समता, १९९१ चा क्रिसिस, दंगे (सहसा दंगे म्हटले कि २००२ चे गुजरातचे दंगेच आठवतात हल्ली), महागाई, जातीवादाच्या जागी आलेला वर्गवाद, बाबरी मस्जिद, चीनकडून पराजय, बकाल शहरे आणि झोपडपट्ट्या, ढासळलेली मूल्ये, गुन्हेगारी, करोडो थकलेली कोर्ट प्रकरणे, असह्य भ्रष्टाचार, मेन इकॉनॉमी इतकीच ब्लॅक इकॉनॉमी, इ इ?

हाच हिशेब असेल तर लोकशाहीचे गोडवे पण नको गायला. निवडणूकांत, संसदेच्या गतिविधींवर लक्ष नको ठेवायला. तरी पण लोकशाहीत काय काय वाईट झालं आहे हे माहित असताना आपण सगळे एका आशेने जगत आहोत. गणेशोत्सवात सहभागी होणार्‍या बर्‍याच कुप्रवृत्ती असतील पण बरेच चांगले भाविक पण असतात. एक जो स्ट्राँग सेन्स ओफ डिसोसिएशन आहे तो फक्त संस्कृतीला दाखवायचा आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने बरबटलेल्या लोकशाहीला नाही दाखवायचा हा दुटप्पीपणा आहे.
--------------
बाय द वे, मी काही कोणा ऐसीकराच्या मनात जाऊन नै पाहिलंय कि त्याचे नक्की काय विचार आहेत. पण जनरली पाहता हा अशा व्यक्तिंचा फोरम आहे म्हणून असे लिहिले. कोणाला काही पर्सनल नाही. शिवाय ऋषिकेशने विषय "कोणालाही (देव न मानणारे ते गणेशोत्सवाची चीड असलेले ते मोदक आवडणारे ते भाविक) सहभाग घ्यायला आवडेल अशा शब्दांत मांडला आहे. इथे भाग घेतला मंजे सनातन प्रभात मधे लेख लिहिला असे होत नाही. वातावरणात प्रचंड भिन्नता आहे.
--------------
मराठी लोकांनी गणपतीच्या दहा दिवसाच्या काळात त्या विषयावर रुचि दाखवू नये हे विक्षिप्त आणि खटकणारं आहे. सबब प्रतिसाद लिहिला आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

एक जो स्ट्राँग सेन्स ओफ डिसोसिएशन आहे तो फक्त संस्कृतीला दाखवायचा आणि त्यापेक्षा कितीतरी पटीने बरबटलेल्या लोकशाहीला नाही दाखवायचा हा दुटप्पीपणा आहे.

आहाहाहा, क्या बात बोली है. या प्रतिसादासाठी एक सौथ इंड्यन थाळी तुम्हांला.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

चला, बहुतेक तीन-चार निगेटीव श्रेण्या घेऊन का होईना या प्रतिसादामुळे कोणाला सौथंडियन थाळी द्यावी वाटली याचा आनंद आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मराठी लोकांनी गणपतीच्या दहा दिवसाच्या काळात त्या विषयावर रुचि दाखवू नये हे विक्षिप्त आणि खटकणारं आहे

तुम्ही मराठी नाही?

काय संबंध?

एरवीही ऐसीवर आपण जणू या गावचेच नाही अशा थाटात कायबाय लिहीतच असतात की लोक. याच प्रतिसादात काय गैर आहे?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मी विचार केला हा धागा बिना-छायाचित्राचाच त्रिशतकी करुयात Wink

बाकी प्रतिसादाचं म्हणाल तर जोशी उचकवत आहेत असं मत आहे,

भारतीय पारंपारिक, संस्कृती निदर्शक अशा कोणत्याही गोष्टीला शिवून विटाळ करून घ्यायचा नाही अशी मानसिकता बर्‍याच भारतीयांत निपजताना दिसते आहे.

'आमच्या पुण्यातला' गणेशोत्सव बघितल्यावर आम्ही तरी असं ठोबळ वाक्य 'ट्रोलिंग' म्हणून स्विकारतो(किंवा फाट्यावर मारतो).

उचकवत आहेत असं मला तरी वाटत नाही. असो.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हे विधान एकूण लोकसंख्येवर नाही हो. जे सज्जन लोक (स्वतःला सज्जन समजणारे, तशी प्रामाणिक इच्छा असणारे), शिक्षित लोक, इ इ समाजाच्या अनेक घटनांत हीरीरीने सहभाग घेतात ते गणेशोत्सवातून माघार घेत आहे. नको तो गणपती उत्सव असे "उबग आल्यामुळे" म्हणणारांचे प्रमाण/टक्केवारी वाढते आहे.
------------------
या सहभागी न होणारांत अजून एक छोटा उपगट आहे. "धार्मिकतेचा" कसलाही संबंध नको म्हणणारे. ऐसीवर अशा विचारसरणीचं प्राबल्य आहे (धोरण म्हणून नव्हे, झुंडीची मानसिकता म्हणू) इथलं सहभागाचं अपिल कला क्षेत्रात येतं, धार्मिक नाही, पण धार्मिकता तरीही एक चांगलं निमित्त आहे. पण तरीही लोकांनी मी गणपतीचा फोटू टाकून - दोन शब्द चांगले लिहिणे डेंजरस मानले आहे. उगाच प्रतिमा खराब. प्रतिकात्मक वा नैमित्तिक सहभाग पण नको. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि हे लोक समाजातले महत्त्वाचे, प्रभावी लोक आहेत.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मी जितक्या नेहमी फोटो टाकणार्‍यांशी (काहिंशी प्रत्यक्ष, काहिंशी व्यनीतून) बोललो त्यांच्यामते या विषयावर "वेगळे" किंवा "खास स्पर्धेसाठी टाकण्यासारखे" असे काहि न सुचल्याने / उपलब्ध नसल्याने त्यांनी सहभाग घेतलेला नाही. तर उर्वरीत काहिंच्या घरी गणपती असताना नेहमीचे फक्त मखराचे वगैरे फोटोच काढले गेले - नी ही स्पर्धा नंतर लक्षात येईपर्यंत गणपती निघून गेले होते.
===
असो. तरीही तुमचे मत बदलणार नाही याची नितांत खात्री आहे. त्यासाठी हा प्रतिसाद नाहीच्चे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असो. तरीही तुमचे मत बदलणार नाही याची नितांत खात्री आहे. त्यासाठी हा प्रतिसाद नाहीच्चे!

तुमचे माझ्याबद्दल लै हेकटखोर असे मत असले तरी माझे तुमच्याबद्दल मत तसे नाही. दिलेले स्पष्टीकरण पुरेसे आहे. ऐसीकरांनी मुद्दाम सहभाग घेतला नाही ही माझी धारणा मी सविनय आणि बिनशर्त (शब्दसौजन्यः गवि) त्यागत आहे.
------
मी स्केप्टीक आहे, पण सिनिकल असायला मला आवडणार नाही.
--------------
या स्केप्टीसिझमचा स्रोत धार्मिक धाग्यांची इथली टवाळी आहे. (अर्थात ते धागे त्या लायकीचे नव्हते असेही म्हणता येत नाही.)

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

या सहभागी न होणारांत अजून एक छोटा उपगट आहे. "धार्मिकतेचा" कसलाही संबंध नको म्हणणारे. ऐसीवर अशा विचारसरणीचं प्राबल्य आहे (धोरण म्हणून नव्हे, झुंडीची मानसिकता म्हणू) इथलं सहभागाचं अपिल कला क्षेत्रात येतं, धार्मिक नाही, पण धार्मिकता तरीही एक चांगलं निमित्त आहे. पण तरीही लोकांनी मी गणपतीचा फोटू टाकून - दोन शब्द चांगले लिहिणे डेंजरस मानले आहे. उगाच प्रतिमा खराब. प्रतिकात्मक वा नैमित्तिक सहभाग पण नको. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि हे लोक समाजातले महत्त्वाचे, प्रभावी लोक आहेत

हां हे शक्य आहे, इथे मोकळेपणाने धार्मिकतेशी संबंध दर्शवणारी जनता कमी आहे, किंवा अपर्णा वगळता फारसे कोणीच नाही. कारणांची मिमांसा शक्य आहे, तेंव्हा होउ दे खर्च.

यस्स.
तितकंच टोळकं नेमकं ऐसीवर येऊन बसलं आहे असं वाटलं म्हणून लिहिलं. पण आता ऋषिकेशने सांगीतलं आहे तर सुधारणा करतो 'इथल्या मंडळींच्या बाबतीतल्या विचारांत'.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

>> जे सज्जन लोक (स्वतःला सज्जन समजणारे, तशी प्रामाणिक इच्छा असणारे), शिक्षित लोक, इ इ समाजाच्या अनेक घटनांत हीरीरीने सहभाग घेतात ते गणेशोत्सवातून माघार घेत आहे. नको तो गणपती उत्सव असे "उबग आल्यामुळे" म्हणणारांचे प्रमाण/टक्केवारी वाढते आहे.

असेलही, पण मग नक्की तक्रार कुणाबद्दल आहे? 'विक्षिप्त'पणा कोण करतंय? आणि ह्यात 'खटकण्या'सारखं काय आहे? उत्सवाचं सध्याचं सार्वजनिक स्वरूप तुमच्या मते उबग आणणारं आहे की नाही?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अजून एक छोटा उपगट

याबद्दल.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

>> या सहभागी न होणारांत अजून एक छोटा उपगट आहे. "धार्मिकतेचा" कसलाही संबंध नको म्हणणारे. ऐसीवर अशा विचारसरणीचं प्राबल्य आहे (धोरण म्हणून नव्हे, झुंडीची मानसिकता म्हणू) इथलं सहभागाचं अपिल कला क्षेत्रात येतं, धार्मिक नाही, पण धार्मिकता तरीही एक चांगलं निमित्त आहे. पण तरीही लोकांनी मी गणपतीचा फोटू टाकून - दोन शब्द चांगले लिहिणे डेंजरस मानले आहे. उगाच प्रतिमा खराब. प्रतिकात्मक वा नैमित्तिक सहभाग पण नको. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि हे लोक समाजातले महत्त्वाचे, प्रभावी लोक आहेत.

आता विषयच निघाला आहे म्हणून एक गंमत सांगतो - त्याविषयी हवा तो निष्कर्ष तुम्ही काढू शकता. भर गणेशोत्सवादरम्यान एका संध्याकाळी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मांडवात गणपतीच्या पुढ्यात (जाहीररीत्या नास्तिक असूनही) मी दोन तास बसलो होतो. 'प्रतिमा खराब होते का' (तुमच्या मते) वगैरेंचा विचार न करता. केवळ कलेसाठी बरं - कारण तिथे त्या दिवशी मंत्रजागराचा कार्यक्रम होता आणि ते ज्या पारंपरिक पद्धतीनं ते मंत्र म्हणतात, ते ऐकण्यात मला रस होता.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जनरल ऐसीकरांबद्दल केलेलं विधान चूक होतं हे अगोदरच मान्य केलं आहे. व्यक्तिशः तुमच्याबाबतीत तो परिच्छेद लागू नाही हे दखिल तुमचा अनुभव वाचून प्रांजळपणे मान्य करतो.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

भर गणेशोत्सवादरम्यान एका संध्याकाळी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मांडवात गणपतीच्या पुढ्यात (जाहीररीत्या नास्तिक असूनही) मी दोन तास बसलो होतो

उद्या पटवर्धन पाठशाळेत श्रावणीला बसलो होतो असं वाचलं तरी आता नवल वाटणार नाही. Wink

आचाराचा आणि विचाराचा काडीचा संबंध नाही. तो लावणारे मूर्ख असतात.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

>> इथे अगदी उलटे झालेले दिसते. भारतीय पारंपारिक, संस्कृती निदर्शक अशा कोणत्याही गोष्टीला शिवून विटाळ करून घ्यायचा नाही अशी मानसिकता बर्‍याच भारतीयांत निपजताना दिसते आहे.

>> मराठी लोकांनी गणपतीच्या दहा दिवसाच्या काळात त्या विषयावर रुचि दाखवू नये हे विक्षिप्त आणि खटकणारं आहे. सबब प्रतिसाद लिहिला आहे.

अहो किती तो राग तथाकथित (पुरोगामी/उदारमतवादी/आपल्या आवडीची शिवी इथे भरून घ्या) मानसिकतेवर? गणेशोत्सवाचं सध्याचं प्रचंड कंठाळी, धंदेवाईक आणि सर्वसामान्यांच्या रोजच्या व्यवहारांमध्ये अडचणी आणणारं स्वरूप पाहिलंय का आपण? माझ्या आसपासचे अनेक आस्तिक लोकसुद्धा त्याला कंटाळलेले दिसतात. ते दहा दिवस पुणे-३०मध्ये घालवून दाखवा एकदा.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिसाद तुम्ही वाचलाच नाही वाटतं. गणेशोत्सव आणि लोकशाही यांची तुलना केली आहे. (आपण ज्या गोष्टीत, क्षेत्रात सहभागी होता त्याची कल्पना द्या तिथे काय गोरखधंदा चालत असतो ते देखिल चर्चिता येईल.). फक्त एकिकडचंच कुसळ पाहायचं हा दुटप्पीपणा बरा नव्हे. गणेशोत्सव म्ह्टलं कि कडक सोवळं घालायचं आणि इतरत्र इतकं तर चालतं म्हणत सहभागी व्हायचं. टिका फक्त देव, धर्म, परंपरा यांचेवर. बाकी सारे घोळ तर ओक्के.
--------------------
मानव जातीचे ज्या उपद्रवाने जितके जास्त नुकसान होत आहे तितके त्या उपद्रवावर जास्त फोकस होऊन टिका करायला पाहिजे. फॅशन काय आहे आणि आपल्याला "पुढे गेलेल्या लोकांच्या तथाकथित क्लबात पटकन प्रवेश कसा मिळेल" ते पाहून नाही.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मानव जातीचे ज्या उपद्रवाने जितके जास्त नुकसान होत आहे तितके त्या उपद्रवावर जास्त फोकस होऊन टिका करायला पाहिजे. फॅशन काय आहे आणि आपल्याला "पुढे गेलेल्या लोकांच्या तथाकथित क्लबात पटकन प्रवेश कसा मिळेल" ते पाहून नाही.

पहिल्या वाक्याच्या रोखाशी साफ असहमत.

पण दुसरे वाक्य एक नंबर जबर्‍या आहे. नादच खुळा.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

शेवटी आपल्याला हवे ते निष्कर्ष काढायचे असतील तर ते काढता येतातच पण मला या स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा होती आणि खाली जो फोटो दिला आहे त्याच विषयावर एखादा नवीन फोटो देणार होते पण फोटो खराब आला आणि जुनाच फोटो द्यायला नको वाटले.
स्वगत - हे सांगायची मला का गरज वाटली? माहित नाही.
स्वगत - मी हे सांगितल्याने कोणाच्या विचारात काही फरक पडणार आहे का? मुळीच नाही.
स्वगत - ऐसी अक्षरेवर कोणत्याही विषयावर चालू झालेल्या मारामार्यांचा प्रचंड उबग आला आहे. शेवटी ज्यांची चिकाटी जास्त तेच इथे टिकणार! त्यामुळे शेवटी आपण आपला वेळ कसा कारणी लावायचा ह्याचा निर्णय आपल्यालाच घ्यायला हवा.

modak-dimsum

मोदक रोचक कि स्वगते?
@रुचि: उबग, त्रागा करून घ्यायला काय झालं? वायझेड असतात लोक म्हणायचं नि सोडून द्यायचं.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

छायाचित्र अतिशय आवडले! बांबु/वेताचा डबाही सुरेख आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कारभारणीने चुलीवर टाकलेल्या खमंग भाकरीप्रमाणे पोळून निघालेल्या दुपारी, डेरेदार वडाच्या झाडाखाली ऐसपैस चार पाय पसरून बसलेल्या, पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पण माथ्यावर काळा ठिपका आणि एक पूर्ण पण एक ३/४ तुटलेलं शिंग असलेल्या, आणि "कपिला" अशा शुद्ध नावाने हाक मारल्यास हंबरणे सोडाच पण मान देखील न वळवणाऱ्या, पण "आगा ये कापिल्ल्ये…." अशा भरघोस हाकेला अंगात वारा संचारल्यासारखे धावत येउन उत्तर देणाऱ्या गाईने पण हिरवा लुसलुशीत चारा जितका चघळला नसेल, तितके चर्वितचर्वण या उकर्लेल्या धाग्याचे जाहलेले पाहून मुळापासून आनंद झाला.

मी बरेचदा या स्पर्धांमध्ये फोटो टाकते. यावेळेस टाकला नाही. (इतर काही अपवादात्मक वेळाही तसं झालेलं आहे.) कोणीतरी त्यावरून खुस्पट काढणार असं आधीच वाटलंही होतं. आणि ते कोणीतरी खुस्पट काढणार म्हणून वाट वाकडी करून दुर्वा, जास्वंद शोधायचं, आवड नसताना मोदक बनवायचे आणि इच्छा नसताना कुठलातरी सार्वजनिक गणपती शोधायचा असे प्रकार करण्याइतपत माझी फोटोस्पर्धेवरही श्रद्धा नाही.

तेव्हा ज्यांना खुस्पटं, बोचकारे काढायचे आहेत, मारामाऱ्या करायच्या आहेत, आठवड्याला शे-पाचशे प्रतिसादांचे रतीब टाकायचे आहेत त्यांना ते करू देत; मी दुर्लक्ष करायला समर्थ आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमचा प्रतिसाद माझ्याकडे रोख करून आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी. By the way I don't suffer from 'the regressive's inhibition syndrome'. मला जे वाटलं ते लिहिलं आहे. नंतर गैरसमज दूर झाला आहे असंही लिहिलं आहे. तरीही पुरोगाम्यांचा गुस्सा उतरला नसेल तर माझा नाईलाज आहे.
-------------
लोक एका विशिष्ट प्रकारे वाईट आहेत अशा गैरसमजात राहिल्यापेक्षा चेक करून पाहिलेलं काय वाईट आहे?

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

लोक एका विशिष्ट प्रकारे वाईट आहेत अशा गैरसमजात राहिल्यापेक्षा चेक करून पाहिलेलं काय वाईट आहे?

हाहा, एकच नंबर.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तुमचा प्रतिसाद माझ्याकडे रोख करून आहे हे वेगळे सांगायची गरज नसावी.

असा तत्कालिक समज होण्याबद्दल आश्चर्य वाटलं नाही.

कोणाला तरी, आपले काही विचार अयोग्य वाटतात, कोणीतरी आपल्यावर काहीतरी जबाबदारी टाकली जी आपली नाही किंवा आपल्याला मान्य नाही आणि ते काम पूर्ण झालं नाही, म्हणून आपण निष्कारण मनात अपराधगंड बाळगायचा हे मला पटत नाही. असा काहीसा (फार नाही, जरासाच) अपराधगंड या आणि या प्रतिसादांमध्ये आहे का, अशी शंका मला आली. तो असू नये असंही मला वाटतं म्हणून आधी एका पद्धतीने सांगितलं, आता थोड्या वेगळ्या पद्धतीने.

कदाचित (मेघना आणि रुचीच्या) त्या दोन प्रतिसादांमध्ये अपराधगंड नसेल, स्वतःची भूमिका जाहीररित्या तपासून घेण्याचा प्रयत्न असेल; तर माझे प्रतिसाद काहीही किंतू न ठेवता त्या भूमिकेचं समर्थन करणारे आहेत. मी माझी भूमिका मांडण्याला 'गुस्सा येणं आणि तो न उतरणं' असं समजत असाल तर ते मी थांबवू शकत नाही. मला खुस्पटं, बोचकाऱ्यांमुळे आलाच असेल तर तो कंटाळा आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यात इतक्या जास्त निररथक फ्रेजेस आहेत कि ...

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.