डेव्हिल्स अॅडव्होकसी - भाड्याचं गर्भाशय आणि भाड्याचे स्नायू
(नवी बाजू 'गर्भाशय आणि मजबूत स्नायू असणारा हा भाड्या नक्की कोण?' असं विचारणार, अशी आपली मी एक प्रेडिक्शन करून ठेवतो.)
अतिशहाणा यांनी इथे डेव्हिल्स अॅडव्होकेटची भूमिका घेतलेली आहे. तीच अधिक खोलवर जाऊन मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.
स्त्रीमुक्ती चळवळीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. तो म्हणजे 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलेलं आहे'. या सिद्धांताच्या समर्थनार्थ काही मुद्दे वारंवार मांडले जातात.
१. स्त्री ही भोगवस्तू आहे, पुरुष हे उपभोक्ते आहेत.
२. पुरुष मुक्त असतात, स्त्रियांवर बंधनं असतात.
३. सर्व सत्तास्थानं पुरुषांच्या हातात असतात, तर स्त्रियांच्या हातात काहीच सत्ता नसते.
४. व्यवस्थेचे सर्व फायदे पुरुषांनाच मिळतात, तर तोटे फक्त स्त्रियांच्याच वाट्याला येतात.
वरीलपैकी १ मुद्द्यांमध्ये मला स्त्रियांनी पुरुषी मानसिकतेतून केलेला विचार दिसतो. म्हणजे लैंगिक उपभोगाचा आनंद हा पुरुषालाच मिळतो, ही पुरुषी मनोवृत्तीच यामागे आहे.३ मधल्या सत्तास्थानांच्या बाबतीतही तेच. 'पुरुषांकडे जी सत्तास्थानं आहेत ती महत्त्वाची, स्त्रियांकडची कमी महत्त्वाची' हा पुरुषी दृष्टिकोनच अंगीकारल्यासारखा वाटतो.
पण माझा मुख्य आक्षेप आहे तो २ आणि ४ बाबतीत. व्यवस्थेचे फायदे फक्त पुरुषांनाच (त्यात 'मुक्त'पणाही आलाच) हे सांगताना स्त्रियांना होणारे तोटे पुरुषांना कसे होत नाहीत हे सांगितलं जातं. मात्र पुरुषांना जे व्यवस्थेचे तोटे सहन करावे लागतात, ज्यांना स्त्रियांना कधी सामोरं जावं लागत नाही, त्यांचा मात्र उल्लेख कधीच होत नाही.
- रोजीरोटी मिळवणं ही आत्तापर्यंतच्या इतिहासात मुख्यत्वे पुरुषाचीच जबाबदारी राहिलेली आहे. स्त्रियांना केवळ रांधा-वाढा-उष्टी काढा यातच अडकून पडायला लागतं तसंच पुरुषांना खणा-नांगरा-कापणी मळणी करा - विका-पोसा यातच अडकून पडावं लागतं. स्त्रियांना जितकं घरात 'अडकून' पडावं लागतं, तितकंच पुरुषांना घराबाहेर 'अडकून' पडावं लागतं.
- देशाचं, राज्याचं, समाजाचं, समूहाचं संरक्षण करणं ही पुरुषांचीच जबाबदारी राहिलेली आहे. कुटुंबाच्या किंवा समाजाच्या संरक्षणासाठी लढून मेलेल्या पुरुषांची संख्या काढली तर ती कित्येक बिलियनांत जाईल. याउलट स्त्रियांवर फारतर बलात्कार होतात. मृत्यू की बलात्कार यात किती स्त्रिया मृत्यू स्वीकारतात?
- कोर्टशिपमध्ये पुढाकार घेणं ही जबाबदारी आत्तापर्यंत पुरुषांचीच राहिलेली आहे. याबद्दल कोणीही कसलंही शिक्षण देत नाही. हवी ती स्त्री न मिळाल्यामुळे आत्महत्या करणारांची संख्या किती आहे काही कल्पना आहे का?
थोडक्यात, स्त्रियांना घराच्या चार भिंतींत अडकल्याबद्दल घरात मिळणारी सुरक्षितता आणि स्थैर्य मिळत आलेलं आहे. पुरुषांना बाहेर पडण्याच्या मोकळिकीबरोबरच बाहेरचे धोके आणि कष्ट पत्करावे लागलेले आहेत.
हे सगळे विचार मांडावेसे वाटले कारण 'पुरुष गर्भाशय भाड्याने घेतात' वगैरेसारखे अत्यंत एकांगी विचार वाचल्यामुळे. कारण दुसऱ्या बाजूने बघितलं तर 'स्त्रिया पुरुषांचे स्नायू, मेंदू आणि रक्त भाड्याने घेतात' असंही म्हणता येईल. ही समानता नाही. ही स्पेशलायझेशनमधून होणारी देवाणघेवाण आहे. पण या व्यवस्थेतून स्त्रियांनाच हानी पोचते असं नाही, तर पुरुषांनाही पोचते. मुद्दा असा आहे की या व्यवस्थेतून स्त्रीची मुक्तता करणं यापेक्षा पुरुष आणि स्त्री यांच्यात समानता आणणं यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या दृष्टीने काही बदल होत आहेत - लष्करात स्त्रियांची भरती होणं, स्त्रियांना शिक्षण मिळून नोकऱ्या मिळणं, एकंदरीतच स्नायू आणि रक्त यांची गरज कमी होणं... या चांगल्या गोष्टी आहेत. पण त्याआधी गर्भाशय भाड्याने वगैरे शब्दप्रयोग थोडे जपून व्हावेत.
मुळात पुरुषाचा अॅडव्होकेट
मुळात पुरुषाचा अॅडव्होकेट म्हणजे डेव्हिल्स अॅडव्होकेट.. म्हणजे, पुरुष = डेव्हिल हे पक्कं मनात बसलेलं आहे बहुतांश लोक्सच्या.
हा लेख विडंबन असू शकतो. तसा असेल तर काही मत मांडून उपयोग नाही.
पण पुरुष ही जात काही अपवाद वगळता मुख्यत्वे डेव्हिल असते आणि त्यांचं सगळं असणंच स्त्रियांना कशाततरी अडकवून ठेवून स्वतःचे विविध सुख-उपभोग अबाधित ठेवण्यासाठी असतं असं मत बर्याच स्त्रियांचं मला दिसतं.
मला एक जुनीच शंका आहे. फार पूर्वीपासून फक्त पुरुष मोठ्या समूहाने बराच मोठा काळ एकत्र राहणे याची बरीच उदाहरणं असतात. बॉर्डरवरील किंवा अॅक्टिव्ह युद्धावर असलेलं सैन्य, बोटीवरचे खलाशी, दूरगावी/देशी केवळ पैसे कमावायला गेलेल्या मजुरांचे स्वस्त शेअर्ड बेसिस कॉमन अड्डे इत्यादि.
चिलीच्या खाणीत महिनोन महिने गाडलेल्या अवस्थेत राहिलेली खाणकामगारांची तुकडीही ऑल मेन अशी होती. या सर्व ठिकाणी प्रासंगिक वैरे, खटके झाले असतीलच पण पूर्ण सिस्टीम कोलॅप्स झाली असं कधी झालं नाही. पुरुषांचे मोठे समूह एकमेकांसोबत दीर्घकाळ उत्तम फंक्शनल टीमप्रमाणे राहू शकले.
स्त्रियांच्यात अशी कपॅसिटी आहे का?
पुरुषजात ऊर्फ डेव्हिल्स नष्ट झाले आणि जगात फक्त बायकाच राहिल्या तर त्या पुनरुत्पादन वगळता बाकी सर्व काही आपापसात उत्तम सिम्बायोसिस करुन सांभाळू शकतील?
पूर्णपणे बायकांचाच असा मोठा समूह एकत्र राहून एकमेकांची एक सुसंगत सिस्टीम मेन्टेन करु शकतो? अशी उदाहरणं आहेत? (लोणची पापड करणारा एखादा उद्योगसमूह सोडून, अधिक कठीण परिस्थिती एकत्रित हाताळणारा?)
जे काही पाहिलेय त्यावरुन तर मुलींचा तीनपेक्षा जास्त संख्येचा गट जमणं ही दुर्मिळ घटना आहे. त्यातही एक तुलनेत सुस्वरुप आणि दोन तिच्या "सखी".. दहा पंधरा मुलींचा ग्रुप आणि त्यात तीनचार सुंदर मुली..?! अशक्य.. जरुर समजून जावं की हे चार ग्रुप बळंच एकत्र आलेले आहेत.
बर्याच ठिकाणी मुलींनी ताडताड दिलेली मते वाचताना पुरुष या भूमिकेत आपण एक शुक्राणूंचा थेंब इतपतच मजबुरीसाठी ठेवावे लागणारे आवश्यक संकट आहोत असं भासतं.. म्हणून विचारलं.
अजून लग्न न झालेल्या तरुणांनी प्लीज भावी वधूला नक्की स्पष्ट विचारुन घ्या की बाई, पुरुष या प्राण्याविषयी तुझी कडवट मतं तर नाहीत ना? तुला आपण त्याच्याशी लग्न करुन एक गर्भाशय किंवा एक कामवाली म्हणून जातोय अश्या भावना नाहीत ना? अत्यंत उग्र अशा नकारात्मक भावनांनी संसार सुरु करण्यासारखी घोडचूक नाही.
मुळात पुरुषाचा अॅडव्होकेट
मुळात पुरुषाचा अॅडव्होकेट म्हणजे डेव्हिल्स अॅडव्होकेट.. म्हणजे, पुरुष = डेव्हिल हे पक्कं मनात बसलेलं आहे बहुतांश लोक्सच्या.
हा हा, कोणीतरी म्हणेल असं वाटलंच होतं. पण मी देवाचादेखील 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' झालेलो आहे.
हा लेख विडंबन असू शकतो. तसा असेल तर काही मत मांडून उपयोग नाही.
विडंबन नाही, मनापासून भूमिका मांडण्याचा प्रयत्न आहे. स्त्री-पुरुष विषमता आहेच - पण ती दोन्ही बाजूंनी आहे. त्यामुळे एकाच बाजूचं दुःखं मांडलं गेलं तर चित्र पूर्ण होत नाही. त्यामुळे ही दुसरी बाजू.
बाकी चर्चा सविस्तर होईलच.
या संदर्भात हे पण वाचा
जे काही पाहिलेय त्यावरुन तर मुलींचा तीनपेक्षा जास्त संख्येचा गट जमणं ही दुर्मिळ घटना आहे.
या संदर्भात हे पण वाचा. मराठीत लिहिण्याऐवजी कॉपी-पेस्ट केले आहे, म्हणून क्षमस्व.
A store that sells new husbands has opened in Toronto, where a woman may go to choose a husband. Among the instructions at the entrance is a description of how the store operates:
You may visit this store ONLY ONCE! There are six floors and the value of the products increase as the shopper ascends the flights. The shopper may choose any item from a particular floor, or may choose to go up to the next floor, but you cannot go back down except to exit the building!
So, a woman goes to the Husband Store to find a husband. On the first floor the sign on the door reads:
Floor 1 - These men have jobs.
She is intrigued, but continues to the second floor, where the sign reads:
Floor 2 - These men have jobs and love children.
'That's nice,' she thinks, 'but I want more,' so she continues upward. The third floor sign reads:
Floor 3 - These men have jobs, love children, and are extremely good looking.
'Wow,' she thinks, but feels compelled to keep going.
She goes to the fourth floor and the sign reads:
Floor 4 - These men have jobs, love children, are drop-dead good looking and help with the housework.
'Oh, mercy me!' she exclaims, 'I can hardly stand it!'
Still, she goes to the fifth floor and the sign reads:
Floor 5 - These men have jobs, love children, are drop-dead good looking and help with the housework, and have a strong romantic streak.
She is so tempted to stay, but she goes to the sixth floor, where the sign reads:
Floor 6 - You are visitor 31,456,012 to this floor. There are no men on this floor. This floor exists solely as proof that women are impossible to please. Thank you for shopping at the Husband Store.
PLEASE NOTE:
To avoid gender bias charges, the store's owner opened a New Wives store just across the street.
The first floor has wives that love sex.
The second floor has wives that love sex, have money and like beer.
The third, fourth, fifth and sixth floors have never been visited.
पुरुषांचे मोठे समूह
पुरुषांचे मोठे समूह एकमेकांसोबत दीर्घकाळ उत्तम फंक्शनल टीमप्रमाणे राहू शकले.
स्त्रियांच्यात अशी कपॅसिटी आहे का?
हे विधान गंडलेलं आहे. त्याची चाल ही साधारण अशी आहे: "गोठ्यात अनेक गाई एकमेकींसोबत दीर्घकाळ उत्तम फंक्शनल टीमप्रमाणे राहू शकल्या. बैलांच्यात अशी क्षमता आहे का?"
मुद्दा असा आहे की: निरनिराळ्या कारणांमुळे पुरुषांना स्त्रीविरहित समाजात दीर्घकाळ राहावं लागलं. चला, आता स्त्रियांना वगळून एक समाज स्थापू आणि तो सुरळीत चालवून दाखवू, अशा आव्हानातून हे घडलेलं नाही. शिवाय अशा नाईलाजाच्या विजनवासातून यायच्या त्या विकृती आल्याच. (फक्त तुरुंगातील कैदी, खलाशी, सैन्य इत्यादी समूहांमध्ये दिसून येणारा गुदसंभोग. (हे नैसर्गिकरीत्या आढळणार्या समलिंगी संभोगाहून वेगळं मानलं जातं. बदलत्या परिस्थितीमुळे उद्भवलेली ही तडजोड असते.) लहानसहान गोष्टींवरून होणारी चिडचिड विकोपाला जाऊन टोकाच्या हाणामार्या होणं. हिंसेचं प्रमाण वाढणं. भावनिक घुसमट होणं. इत्यादी.)
अशा बळंच घडलेल्या एकजिनसी सहवासातून कोणतेही मानवसमूह एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकतातच. त्यात पुरुषांचं काहीच मोठंसं कौतुक नाही. महिलांच्या डब्यात आणीबाणीच्या प्रसंगी पार पडणारं बाळंतपण किंवा मुंबईत अतिपाऊस पडल्यावर आपोआप घडणार परस्परसाहचर्य जरी पाहिलं, तरी याचा प्रत्यय येईल. त्यासाठी मातृसत्ताक पद्धतीखाली चालणार्या समाजाचा विदा द्यायचीही गरज नाही.
बाकी मुलींचा तीनापेक्षा जास्त संख्येचा गट जमणं दुर्मीळ वगैरे गंभीरपणे म्हटलेलं आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. ते खरंच गंभीर प्रतिपादन आहे का, याची खातरजमा गविंनी करून दिली, तर पुढे काही बोलण्यात अर्थ आहे.
(गाळीव इतिहास)
'ऐसी अक्षरे' हे नाव मागाहून आलं, पण एक संस्थळ सुरू करू या असा विचार डोक्यात आला, तेव्हा मी मेघना भुस्कुटे, सविता, रोचना, रुची, सारिका, टिंकू, या सगळ्यांना इमेल केलं. "आपण संस्थळ सुरू करू या का, सगळ्या बायका मिळून?" असा इमेलमधला मुख्य प्रश्न होता. सगळ्यांनी होकार दिला. मग मुक्तसुनीत यांच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी घासकडवींना चर्चेसाठी पाचारण केलं. घासकडवी म्हणाले, "तुमच्यापैकी प्रत्येकीला स्वतःचं संस्थळ काढून चालवता येईल. सगळ्या मिळून तुम्ही निश्चितच हे करू शकता. पण तुम्ही सगळ्या स्त्रिया मिळूनच हे का करताय? उद्या कोणी गवि विचारतील, "सगळ्या स्त्रियांनी मिळून काही आस्थापना चालवली आहे का याची उदाहरणं द्या" त्यांना उत्तरं देण्यासाठी का? काय गरज आहे अशी उत्तरं देण्याची? परवा आणखी कोणी म्हणेल, "फक्त पुरुष एकत्र येऊन मेक्सिकोच्या आखातातलं तेल काढताना लाखो गॅलन तेल सांडवू शकतात. बायका असं करू शकतात का?" मग काय तुम्ही तेलविहीरीचे शेअर्स खरेदी करणार का? त्यापेक्षा आपण तिघं मिळून संस्थळ काढू."
असं म्हणून "लोणची-पापड संस्था" वगळता फक्त बायकांची एकतरी आस्थापना सुरू होता होताच राहिली.
दिल्लीत सरकारी कार्यालयांसमोर
दिल्लीत सरकारी कार्यालयांसमोर असलेल्या बगीच्यांमध्ये लंचच्या वेळी १०-१५ स्त्रिया एकत्र लंच करताना दिसतील. ९० टक्के स्त्रिया मिळून लंच करतात आणि ९० टक्के पुरुष एकटे. कामाच्या बाबतीत ४ स्त्रिया मिळून सहज काम करतात, दोन पुरुषांना एका टीम म्हणून काम करायला अवघड जाते. प्रत्येकाचा अहंकार आड येतो.
विखार नि विवाह
अजून लग्न न झालेल्या तरुणांनी प्लीज भावी वधूला नक्की स्पष्ट विचारुन घ्या की बाई, पुरुष या प्राण्याविषयी तुझी कडवट मतं तर नाहीत ना? तुला आपण त्याच्याशी लग्न करुन एक गर्भाशय किंवा एक कामवाली म्हणून जातोय अश्या भावना नाहीत ना? अत्यंत उग्र अशा नकारात्मक भावनांनी संसार सुरु करण्यासारखी घोडचूक नाही.
अतिशय सुयोग्य संतुलित सल्ला आहे. पुरुषांना एक वेगळी जात मानून त्याच निकषावर त्यांचेबद्दल कटूता बाळगणार्या स्त्रीयांना आयुष्यात फिरकू न दिलेले बरे. किमान त्यांचेशी विवाहसंबंध तरी कोणत्याही हालतीत नको.
----------
तरुण अविवाहित स्त्रीयांनी देखिल एतत्सम प्रश्न पुरुषांना अगोदर विचारले पाहिजेत. नुसती जात, पैसा, नोकरी, रुप, इ इ पाहून लग्न केले नि सबब पुरुष 'पायीची वहाण' तत्त्वज्ञानाचा निघाला तर जिंदगी बर्बाद. वहाणवादी नसला आणि जस्ट ऑर्डेनरी असला किंवा जस्ट गोइंग बाय सोसायटल नॉर्म्स असला तरी अवघड पडू शकते. व्यक्ति म्हणून लिंगनिरपेक्ष सन्मान करणारा, प्रेम करणारा, आदर करणारा (शिवाय लैंगिक प्रेम पण करणारा - ते सोडूनही चालणार नाही) मनुष्य जोडीदार हवा.
------------
विवाहापूर्वी सासरी, माह्रेरी, वा न्यूक्लिअर घरात कोणालाही प्रत्यक्ष स्वतः वागून माहित नसतं. याकरिता आपले जे सर्वोच्च इगो आहेत ते प्रत्येक तरुण तरुणीने अगदी नोंदवून ठेवावेत. हे इथे अवांतर आहे पण लिंगच काय अशा बर्याच निकषांच्या निरपेक्ष प्रेम करणारी व्यक्ति जोडीदार हवी. पहिलेच्या जमान्यात इगो विसरणे कोणालाही थोडे सोपे होते. आजकाल (गुर्जी, 'आजकाल' शब्द टाइप केल्याबद्दल क्षमस्व. अगदी नाईलाज आहे हो.) इगोज हे लहानपणापासून जास्त चांगल्या रितीने पोसले जातात. नाते हे इगोपेक्षा खूप कमी महत्त्वाचे झाले आहे. म्हणून खबरदारी घेतलेली बरी - नातं दुखरं आहे नैतर इगो दुखला आहे अशा अवस्थेत आयुष्यभर नेहमी राहणं दुर्भाग्यपूर्ण आहे.
----------
आजकाल (गुर्जी, पुन्हा क्षमस्व.) पहिल्यासारखा जमाना राहिला नाही. पहिले प्रत्येकाचं जीवनविषयक तत्त्वज्ञान बर्यापैकी कॉमन होतं, स्टँडर्ड आणि प्रेडिक्टेबल होतं. आजकाल (गुर्जी प्लीज क्षमा करा- इथून पुढे - गुप्लीक्षक) कोणत्या नवख्या व्यक्तिचे कोणत्या विषयावर काय विचार असतील काहीही सांगता येत नाही. शिवाय आजकाल (गुप्लीक्षक) लोक फार बोलत नाहीत, कोणाशी आपले मन मोकळे करत नाहीत. त्यांची पर्सनल स्पेस आक्रमित झालेली त्यांना आवडत नाही. आणि आपणही दुसर्याची पर्सनल स्पेस आक्रमित करत नैयत ना अशी भिती त्यांना नेहमी असते. मग अगदी ओळखीचे लोक देखिल एका नव्या विषयावर, प्रसंगावर प्रेडिक्ट करता येत नाहीत. उदा. आमचा एक गोडमिट्ट, महासभ्य, ज्येष्ठ, वि़ज्ञानवादी; स्त्रीया, त्यांचे प्रश्न, बलात्कार, इ इ प्रकरणी अतिशय संवेदशनशील असलेला व्यवसायमित्र मुलायमसिंगाच्या 'लडके हैं, गलतियाआँ हो जाती हैं।' समर्थक निघाला. आम्ही अवाक्. देव जाणो का ते.
----------------
गविंचा प्रतिसाद मला यादृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो. सहसा समाजाबद्दल विखार नसायला हवा. उदा. माझी बायको जर विखारी प्रकारची असली नि मलाच छळत असली असली तर विचारायलाच नको. पण समजा असं नसलं, आणि आम्हा दोहोंचे इक्वेशन फिट्ट असलं (मंजे माझ्या वर्तनामुळं वा विचारांमुळं बायकोला माझ्याबद्दल विखार नसला) तरी प्रश्न सुटत नाही. म्हणजे समजा मी आणि माझी बायको सकाळी ७.०० ला बाल्कनीत चहा पीत उभे आहोत. खालून एक जोडपं जात आहे. मी चहाचा घुटका घेत हे जोडपं कसं असेल वा कसं सुखी असेल असं कल्पतो. पण याच वेळी माझी बायको त्या जोडप्याबद्दल एक अतिशय दारुण चित्र बनवून त्यांचेकडे पाहत आहे याची 'जाणिव' जरी मला झाली तर माझा अख्खा दिवस खराब जाईल. आणि नेहमी असंच आहे असं 'ज्ञान' मला असेल तर घरात एक खिन्नपणाचा भाव नेहमी असेल.
----------------
व्यवहार्य दृष्ट्या पाहिलं तर भारतीय संदर्भात तरुण मुलांना हा 'विखारप्रश्न' विचारा लागू नये. असली स्त्री ठळक ओळखू येईल. शिवाय ती वराची, प्रियकराची उलटपरीक्षा घेईल, त्यात बर्यापैकी सगळं कळून येईल. तरुण मुलींनी मात्र वहाणवादी आयडेंटीफिकेशन टेस्ट बनवून अॅडमिनिस्टर करावी. सद्य भारतीय समाजात सामान्य पुरुषांमधे वहाणवादी पुरुष सहजी ओळखू येत नाही म्हणून ते आवश्यक आहे.
--------------
व्यक्तिला आपल्या लोकांबद्दल, मग ते ममत्व कोणत्या का निकषावर (इथे स्त्रीत्व) असेना, जरूर वाटावं. त्यांचेवरील अन्यायाचा विरोध करण्याची इच्छा, शक्ती, असावी. तसा विरोध करण्यात पोटतिडिकही असावी. हे सगळं एका ठिकाणी नक्कीच कौतुकास्पद आहे. पण समाजाचं आलेखन करताना, त्याच्या एकूण इतिहासाचं वर्णन करताना पुरुषांना बुद्ध्या गुन्हेगार नि स्त्रीयांना चुपचाप अन्याय करून घेत आलेल्या मूर्ख मानत चालणं मला तरी मानवतेचा मोठा अवमान वाटतो.
जे काही पाहिलेय त्यावरुन तर
जे काही पाहिलेय त्यावरुन तर मुलींचा तीनपेक्षा जास्त संख्येचा गट जमणं ही दुर्मिळ घटना आहे. त्यातही एक तुलनेत सुस्वरुप आणि दोन तिच्या "सखी".. दहा पंधरा मुलींचा ग्रुप आणि त्यात तीनचार सुंदर मुली..?! अशक्य.. जरुर समजून जावं की हे चार ग्रुप बळंच एकत्र आलेले आहेत.
सबब विधान तद्दन हलकट आणि निरर्थक आहे. गविंकडून तर कधीच अपेक्षित नव्हते.
-----------
स्त्रीयांचे कितीही मोठे, कितीही प्रकारचे गट असू शकतात, असतात. समाजाने घराबाहेर मोठ्या संख्येने एकत्र करावयाची कामे पुरुष करतात म्हणून ते एकत्र आल्यासारखे भासतात. स्त्रीया सवत्या सवत्या घरातली कामे करतात म्हणून त्या एकत्र नाहीत असे भासते. माझ्या व्यक्तिगत मते भिन्न विचारांच्या लोकांना समावेश करून घेऊन शांतपणे वागण्याची स्त्रीयांची प्राकृतिक क्षमता पुरुषांपेक्षा इंचभर जास्त आहे.
------------
दोन सुंदर मुली एकत्र येऊ शकत नाहीत या विधानाला जर काही अर्थ असलाच तर तितकाच अर्थ 'दोन कर्तृत्ववान पुरुष एकत्र येऊ शकत नाहीत' या विधानाला आहे.
हा लेख तितकाच एकांगी वाटतो.
हा लेख तितकाच एकांगी वाटतो. आय मीन सगळेच समाजव्यवहार कॉण्ट्रॅक्ट म्हणून पाहणारा.
मला असं वाटतं की दुसर्या धाग्यावर लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यामागची भावना "ज्या महिलांना समानतेचा खरोखरचा वारा उपलब्ध झालेला आहे (कदाचित त्या महिला ०.१ टक्क्याहून कमी असतील) त्या महिलांची वागणूक पाहता त्या महिला समान फूटिंगवर व्यवहार करत नाहीत. स्त्री म्हणून त्यांना परंपरेने मिळणारे फायदे मात्र त्या पुरत्या वसूल करताना दिसतात" अशी होती.
ही मते/भावना ओव्हरऑल महिलांविषयी नसून ज्यांना स्वातंत्र्य खर्या अर्थाने उपलब्ध आहे त्यांच्या वर्तणुकीविषयी आहेत. असे मला वाटते. माझा अकाउंट जॉइंट असण्याबाबतचा प्रश्न तशाच स्वरूपाचा होता.
या लेखातले "गर्भाशय भाड्याने/बालसंगोपन" वगैरे मुद्दे मार्केट या दृष्टीकोनातून पाहिले तर बर्यापैकी श्रीमंत पुरुष आणि त्याची गृहिणी किंवा छोटीशी नोकरी करणारी पत्नी या जोडीत पुरुषाला खूपच नुकसान होते असे म्हणता येईल-- 'किंमत' म्हणून.
+१
सहमत. सगळेच समाजव्यवहार कॉन्ट्रॅक्ट म्हणून पाहणे म्हणजे कन्झ्युमरिझम आणि कॅपिटलिझमची परिसीमा गाठली आहे असे म्हणता यावे.
मी माझ्या प्रतिसादात डेविल्स अॅडवोकेट असा शब्दप्रयोग करताना पुरुष=डेविल किंवा मी डेविलची बाजू मांडतो आहे असा विचार केला नव्हता. स्त्रियांची बाजू मांडताना जेव्हा गर्भाशय भाड्याने देणे प्रकारच्या व्यवहाराची मांडणी केली जाते तेव्हा पुरुषांच्या बाजूने तशीच मांडणी होऊ शकते. असे वाद-प्रतिवाद डेविलिश आहेत असे म्हणायचे होते. अशा प्रकारची मांडणी सूज्ञ माणसाने करु नये. अशी मांडणी करणारा माणूस सूज्ञ नाही. तो डेविलिश विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतो असे मला वाटते.
सगळेच समाजव्यवहार कॉन्ट्रॅक्ट
सगळेच समाजव्यवहार कॉन्ट्रॅक्ट म्हणून पाहणे म्हणजे कन्झ्युमरिझम आणि कॅपिटलिझमची परिसीमा गाठली आहे असे म्हणता यावे.
मस्त.
Every nation has a stock of capital - natural/mineral resources, human resources/skills, machinary, equipments, contractual arrangements ..... etc. त्या दृष्टीने बघितले तर प्रत्येक देश हा कॅपिटलिस्ट्च असतो - कमी अधिक प्रमाणावर. या कॅपिटल ची मालकी कोणाकडे व किती काल व कोणत्याप्रमाणावर असावी याचा निर्णय व देशातील सत्तेचे/साधनसंपत्तीचे विकेंद्रीकरण यावर हे ठरते की तो देश किती कॅपिटलिस्ट आहे ते. जेवढे विकेंद्रीकरण जास्त तेवढे व्यक्तीस कॉन्ट्रॅक्ट करण्याचे स्वातंत्र्य जास्त.
मूल्ये (नैतिक्/सामाजिक) ही एक कॉन्ट्रॅक्ट असते. मूल्यांचे अस्तित्व देशातील ट्रांजॅक्शन कॉस्ट्स (अनुत्पादक) कमीतकमी ठेवण्यास मदत करते. या कॉस्ट्स शून्य असू शकत नाहीत. पण कमीतकमी ठेवणे हे उत्पादकतेस मददगार असते.
खरंतर काँट्रॅक्टेरियन व्ह्यु हा जास्त सत्याधारित आहे. Contract, rather than chose, is the mainstay of life ... अशा अर्थाचे विधान प्रा. जेम्स ब्युकॅनन यांनी केले होते.
----
सगळे व्यवहार कॉन्ट्रॅक्ट म्हणून पाहणे ह्या पेक्षा कॉन्ट्रॅक्ट च्या लेन्स मधून पाहणे हा एक पर्याय असू शकतो. कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट अस्तित्वात नसते - हा एक मुद्दा गृहितक म्हणून वापरला जातो.
तक्रार
ज्या महिलांना समानतेचा खरोखरचा वारा उपलब्ध झालेला आहे (कदाचित त्या महिला ०.१ टक्क्याहून कमी असतील) त्या महिलांची वागणूक पाहता त्या महिला समान फूटिंगवर व्यवहार करत नाहीत. स्त्री म्हणून त्यांना परंपरेने मिळणारे फायदे मात्र त्या पुरत्या वसूल करताना दिसतात
समानता/स्वातंत्र्य दिलं तरी ते आमची बरोबरी करू शकणार नाहीच / स्वातंत्र्य/समानतेचा गैरफायदा घेतील / स्वातंत्र्य/समानता मिळाली तरी त्याचा उपयोग करण्याची त्यांची लायकी/क्षमता/मानसीकताच नाही वगैरे तक्रारी ह्या जवळजवळ सर्वच पारतंत्र्य/असमानता लादणार्या वर्गाच्या क्लासिकल टेक्स्टबुकातील आहेत. आणि यातील कोणतीच तक्रार "म्हणून स्वातंत्र्य/समानता दिली जाऊ नये" याचे समर्थन करत नाहीत.
१) मी एक मुक्त व्यक्ती आहे.
१) मी एक मुक्त व्यक्ती आहे. माझ्या कुटुंबीयांनी स्त्री म्हणून माझ्यावर कधीही कोणतीही बंधनं घातलेली नाहीत. मला या स्वातंत्र्यासाठी कधी झगडावंही लागलेलं नाही. माझ्यासाठी निसर्गदत्त असलेलं स्वातंत्र्य इतर अनेक स्त्रियांना झगडून मिळवावं लागतं, हे मात्र हळूहळू कळत गेलं. पातळ्या निरनिराळ्या असतात, इतकंच. आता रूढार्थानं स्त्रियांवर होणार्या अन्यायाविषयी मी काहीही बोलले, तरी ते एका अर्थानं विसंगतच ठरणार. कारण 'स्त्रिया अमुक आहेत. पुरुष तमुक आहेत.' या आणि अशा चालीच्या सगळ्या विधानांना माझा (आणि माझ्यासारख्या काही अल्पसंख्याक स्त्रियांचा आणि त्यांच्याशी संबंधित पुरुषांचा) अपवाद असणारच. मग 'माझं स्वातंत्र्य मला मिळालं, बाकीचे मरेनात का' असं म्हणून गप्प बसायचं का? तर जमणार नाही. थोडक्यातः वरची क्र. १, २, ३, ४ या विधानांना काही अपवाद कायमच असणार. ते गृहितकच आहे.
२) स्त्रीपुरुष विषमतेला आणि तिच्या परिणामांना केवळ स्त्रियाच बळी पडतात असं नाही. ही विषमता सगळ्याच प्रकारच्या, वयाच्या, आर्थिक-सामाजिक गटातल्या माणसांना कमीअधिक प्रमाणात स्पर्शून जात असते. सुनांना छळणार्या सासवा, पोटच्या मुलीचं स्वातंत्र्य खच्ची करणार्या आया, संस्कारांच्या, योनिशुचितेच्या नावाखाली स्त्रियांना घरी डांबून ठेवू बघणार्या वृद्धा अशा स्त्रियाही वरकरणी शोषित दिसत नसल्या; तरी शोषितच असतात. रडायला बिचकणे, कुवत नसताना केवळ पौरुषापोटी घरादाराची आर्थिक जबाबदारी पेलायला लागणे, शौर्य गाजवण्याची-तथाकथित पौरुषार्थाची एक कायमची अपेक्षा गळ्यात पडणे, बरोबरीच्या जोडीदारासोबत नातं जोडण्याच्या आनंदाला मुकणे... अशा अनेक प्रकारे पुरुषही या विषमतेचे परिणाम सोसतात.
३) पुरुषांवर होणार्या अन्यायाबद्दल पुरेसं लिहिलं-बोललं जात नाही हे खरंच आहे. पण ही उणीव पुरुषांनी भरून काढली पाहिजे. स्वातंत्र्याचे फायदे भोगणार्या काही अल्पसंख्याक स्त्रियांच्या आक्षेपार्ह वर्तनाकडे बोट दाखवून 'चळवळ म्हणजे काहीतरी अनावश्यक वायझेडपणा आहे' अशी बोंब न करता, पुरुषांनाही या प्रकारच्या विषमतेचे तोटेच होतात, हे पुरुषांनी ठासून सांगितलं पाहिजे. आज काहीशा एकांगी, अडकून पडल्याश्या वाटणार्या स्त्रीपुरुषसमतेच्या चळवळीलाही ते दूरगामी फायद्याचंच ठरेल.
सहमत. अशी समंजस मांडणी केली
सहमत. अशी समंजस मांडणी केली तर कोण कशाला हरकत घेईल? पण गर्भाशय भाड्याने घेतलं जातं वगैरे म्हटलं की व्यवस्था फक्त स्त्रियांना जाचक आहे, पुरुषांना केवळ स्वातंत्र्यं आणि शून्य जबाबदाऱ्या आहेत असं काळंपांढरं बटबटीत चित्र तयार होतं. 'पुरुष व्हीलन, स्त्रिया डेमसेल्स इन डिस्ट्रेस' अशा चित्राऐवजी 'कालबाह्य व्यवस्था स्त्री व पुरुष या दोहोंना जाचक' हे चित्र जास्त योग्य आहे. अशी मांडणी दोन्ही बाजूंनी झाली की एकमेकांकडे बोट दाखवणं कमी होईल.
लेख आवडला, पटला. निवड/चॉईस हे
लेख आवडला, पटला.
निवड/चॉईस हे कल्चरायझेशनचेच एक अपत्य आहे, 'साडी नेसणे' किंवा 'बिकनी घालणे' ह्या दोन्ही क्रिया संस्कृतीमुळे व्यक्तिगत निवड बनतात, पण बिकनी घालणे हे स्वातंत्र्य मानणे आणि साडी नेसणे हि दडपशाही मानणे चूक आहे.
पण, साडी नेसून किंवा बिकनी घालुन त्याशी निगडीत संस्कृतीला कळत-नकळत पाठिंबा देणे हे विधान शक्य आहे.
पण मग अशा संदर्भात निवड-स्वातंत्र्य नक्की ते काय?
एक गुंतागुंतीचा/ची सैतान
>> लैंगिक उपभोगाचा आनंद हा पुरुषालाच मिळतो, ही पुरुषी मनोवृत्तीच यामागे आहे
असहमत. भारतापुरता विचार केला, तर स्त्री-पुरुष शरीरसंबंधांत स्त्री ही बहुतांश वेळा भोगवस्तू ठरते, कारण तिला काय आवडतं ह्याचा एक तर विचारच केला जात नाही, किंवा तिला दीर्घकाळ संभोगातून जो आनंद मिळतो तो द्यायला पुरुष अक्षम असतात (त्यांचं ५ मिनिटात आटोपतं, आणि नंतर काही काळ ते संभोगक्षम नसतात.)
>> स्त्रियांना केवळ रांधा-वाढा-उष्टी काढा यातच अडकून पडायला लागतं तसंच पुरुषांना खणा-नांगरा-कापणी मळणी करा - विका-पोसा यातच अडकून पडावं लागतं. स्त्रियांना जितकं घरात 'अडकून' पडावं लागतं, तितकंच पुरुषांना घराबाहेर 'अडकून' पडावं लागतं.
हा जुना ब्राह्मणी किंवा उच्चवर्णीय दृष्टिकोनातून एकारलेला विचार वाटतो. निम्न स्तरांत स्त्रिया कष्टकरी (विशेषतः असंघटित क्षेत्रांत) आणि घराबाहेर असण्याचं प्रमाण पूर्वीही लक्षणीय होतं आणि आताही आहे. ह्या डेटानुसार २६% स्त्रिया श्रमदात्या आहेत; तर ५१% पुरुष श्रमदाते आहेत. शिवाय,
Majority of female workers (87.3 percent) are from rural areas. This is also twice that of male workers, which may be due to their being employed predominantly in activities like cultivation and agricultural labour.
[...]
Interestingly, among marginal workers females outnumber the males. In three of the four categories, viz. cultivators, agricultural labourers and household industries, female marginal workers outnumber male workers.
शिवाय, ज्या स्त्रिया गृहिणी आहेत त्यादेखील कष्टकरी असतातच. त्यामुळे वास्तव गुंतागुंतीचं आहे.
ते विधान उच्चवर्गीय-ब्राह्मणी
ते विधान उच्चवर्गीय-ब्राह्मणी मनोवृत्तीचं आहे यात वाद नाही. किंबहुना ही सर्व चर्चाच ब्राह्मणी-उच्चवर्णीय भाषेत चालते असा माझा दावा आहे. पण ते सोडलं तरी पुरुष हेड-ऑफ-द-हाउसहोल्ड असतात हे सत्य मागे पडत नाही. १९९२ ते २००५ या काळात स्त्रिया गृहप्रमुख असण्याचं प्रमाण ९.२ टक्क्यांवरून १४.४ टक्क्यांपर्यंत वाढत गेलं. तरीही सातापैकी सहा घरांत पुरुषच गृहप्रमुख आहेत. स्त्रियांचं गृहिणी म्हणून होणारं काम अर्थातच जीडीपीमध्ये धरलं पाहिजे असं माझं मत आहे. ते जर नीटपणे मोजलं तर स्त्रियांनाच आपण किती कॉंट्रिब्यूट करतो हे लक्षात येईल.
मुद्दा असा आहे की सध्याच्या स्त्री-पुरुष असमानतेविषयी मांडणी होताना पुरुषांना स्वातंत्र्य आणि स्त्रियांना जबाबदाऱ्या अशी होते, ती बरोबर नाही. पुरुषांनाही अनेक जबाबदाऱ्या समाजाने लादलेल्या आहेत. 'त्या हरामखोर पुरुषांनी सगळी स्वातंत्र्यं आपल्याकडेच ठेवलेली आहेत. आम्हालाही ती स्वातंत्र्यं हवीत' असं म्हणण्याऐवजी 'अनेक जबाबदाऱ्यांचं वाटप स्त्री-पुरुषांमध्ये असमान झालेलं आहे. सध्या पुरुष घेत असलेल्या जबाबदाऱ्या आम्हीही घेऊ शकतो.' असं म्हणणं हवं. पहिल्या मांडणीत एक बालिश त्रागा दिसतो, दुसऱ्या मांडणीत डोळस मोठेपणा दिसतो.
प्लीज!
'अनेक जबाबदाऱ्यांचं वाटप स्त्री-पुरुषांमध्ये असमान झालेलं आहे. सध्या पुरुष घेत असलेल्या जबाबदाऱ्या आम्हीही घेऊ शकतो.' असं म्हणणं हवं. पहिल्या मांडणीत एक बालिश त्रागा दिसतो, दुसऱ्या मांडणीत डोळस मोठेपणा दिसतो.
बायकोने नोकरी केलेलं चालणार नाही असे म्हणणारी सुशिक्षित मध्यमवर्गीय नवरेमंडळी मला माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या बायकांचा आम्हाला नोकरी करता येत नाही हा त्रागा मला तरी बालिश वाटत नाही. कुटुंबातील कमावती व्यक्ती नसल्याने कुटुंबाच्या अनेक निर्णयांमध्ये पडती बाजू घ्यावी लागणं हा ही त्रागा मला बालिश वाटत नाही.
'भाड्याने गर्भाशय' ही
'भाड्याने गर्भाशय' ही निश्चितच त्राग्याची मांडणी आहे. त्याची दुसरी बाजू म्हणून तितकीच त्राग्याची 'भाड्याने स्नायू, भाड्याने रक्त' अशी मांडणी केलेली आहे. सत्य मध्ये कुठेतरी आहे. ती आदर्श परिस्थिती नाही हे खरं आहे. पण सामाजिक अपेक्षांचा अन्याय केवळ स्त्रियांवरच होतो हे एकांगी आहे.
एक सहज कुतूहल
असहमत. भारतापुरता विचार केला, तर स्त्री-पुरुष शरीरसंबंधांत स्त्री ही बहुतांश वेळा भोगवस्तू ठरते, कारण तिला काय आवडतं ह्याचा एक तर विचारच केला जात नाही, किंवा तिला दीर्घकाळ संभोगातून जो आनंद मिळतो तो द्यायला पुरुष अक्षम असतात (त्यांचं ५ मिनिटात आटोपतं, आणि नंतर काही काळ ते संभोगक्षम नसतात.)
५ मिनिटांबद्दलचा विदा पहायला आवडेल.
५? नव्हे ६-७...
५ मिनिटात आटोपतं हा मुद्दा
५ मिनिटात आटोपतं हा मुद्दा महत्त्वाचा नसून, संपूर्ण दिवसभर बायकोकडे दुर्लक्ष, अन्याय अन एकंदर भावविश्वाची हेळसांड करुन , नंतर १ तास घासलं काय अन ५ मिनीटात संपलं काय हु केअर्स????
खरा फोरप्ले हा सकाळी उठल्यापासून सुरु व्हायला हवा = भावनिक श्रीमंती अन जवळीक, आपुलकी त्यात हवी. असो. हा मुद्दा पुरषांना समजेल तो सुदिन.
_____
मान्य आहे इतकं अन्डिव्हायडेड अन इन्टेन्स लक्ष (अटेन्शन) नेहमी तीन्ही त्रिकाळ देता येत नाही. तशी गरजही नाही. पण निदान प्रयत्न तरी करा. हाच मूळ फरक आहे. दोघांच्या अपेक्षाच भिन्न आहेत.
घिसडघाई
फार विचार न करता, घिसडघाईने लिहीलेला तुकडा वाटतो.
उदा -
१. "स्त्रीमुक्ती चळवळीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. तो म्हणजे 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलेलं आहे'."
याला संदर्भ नाही. (होय, मी ऐसी अक्षरेवर लिहीते आहे.)
२. "पुरुषांना घराबाहेर 'अडकून' पडावं लागतं."
यात पुरुषांना घराबाहेरचं रंगीबेरंगी जग पाहता येतं. स्त्रियांच्या संकुचित जगात मात्र तेच-ते घर असतं. विशेषतः सफेद कॉलर जगामध्ये ही विभागणी जास्तच तीव्र होते, या फायद्या-तोट्यांचा काहीच विचार नाही.
३. "याउलट स्त्रियांवर फारतर बलात्कार होतात."
बलात्काराच्या हाय-प्रोफाईल घटना घडल्या की जशा नी-जर्क प्रतिक्रिया येतात, त्यातून बलात्काराच्या प्रश्नांचं सुलभीकरण होतं, त्याचं हे दुसरं टोक म्हणावं लागेल. समाज बलात्कारित स्त्रियांना वाळीत टाकतो, हा प्रसंग विसरण्याची इच्छा असतानाही पुन्हा त्याच गोष्टीची आठवण काढून दिली जाते, लग्न झालेलं असल्यास अनेकदा या स्त्रियांचे नवरेसुद्धा समजून घेऊ शकत नाहीत, अनेक स्त्रियांना पुढे लैंगिक सुख मिळत असेल तरी उपभोगण्याची मानसिकता राहत नाही, वगैरे वगैरे मुद्दे अगदी सेक्सॉलॉजिस्टांनीही मांडलेले असताना "याउलट स्त्रियांवर फारतर बलात्कार होतात." अशी वाक्य वाचता धाग्यावरचा पहिला प्रतिसाद योग्य वाटतो.
४. "हवी ती स्त्री न मिळाल्यामुळे आत्महत्या करणारांची संख्या किती आहे काही कल्पना आहे का?"
अ. किती?
आ. जीवितहानीबद्दल खेदच आहे. पण नकार पचवण्याची तयारी नसण्यामागे स्त्रियांनी काही कारस्थानं केलेली आहेत असं वाटत नाही, किंवा काही पुरुषांना नकार पचवता न येण्यात स्त्रियांचा काही फायदा आहे असंही दिसत नाही. तेव्हा जीवितहानीबद्दल सहानुभूती आहेच, पण तरीही या चर्चेत त्याचा काय संबंध ते समजलं नाही.
"स्त्रीमुक्ती चळवळीचा एक
"स्त्रीमुक्ती चळवळीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. तो म्हणजे 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलेलं आहे'." याला संदर्भ नाही.
१. सीमॉन बुव्हा - पुरुषांनी स्त्रियांना पददलित अवस्थेत ठेवण्यासाठी त्यांची प्रतिमा तयार केलेली आहे.
"A myth invented by men to confine women to their oppressed state. For women it is not a question of asserting themselves as women, but of becoming full-scale human beings."
"One is not born, but rather becomes, a woman"
सेकंड सेक्स
In chapter 1, Beauvoir states the problem that motherhood left woman "riveted to her body" like an animal and made it possible for men to dominate her and Nature.[10] In chapter 2, she describes man's gradual domination of women...
In chapter 3, explaining inheritance historically, Beauvoir says men oppress women when they seek to perpetuate the family and keep patrimony intact...
In chapter 4, Beauvoir says that with the exception of German tradition, Christianity and its clergy served to subordinate women...
२. टॉरिल म्वा -
"a woman defines herself through the way she lives her embodied situation in the world, or in other words, through the way in which she makes something of what the world makes of her"
३. व्हॅलेरी सोलानास - स्कम मॅनिफेस्टो
argues that men have ruined the world and that women should overthrow society and eliminate the male sex.
४. बेल हुक्स -
men are the primary agents maintaining and supporting sexism and sexist oppression, they can only be eradicated if men are compelled to assume responsibility for transforming their consciousness and the consciousness of society as a whole.
लढाईत मरण्याची जबाबदारी समाजाने पुरुषावर टाकलेली आहे हे अधोरेखित करायचं होतं. आणि होय, बलात्कार हा मृत्यूपेक्षा बराच प्रिफरेबल आहे यात शंका नाही. कारण अनेक बलात्कार मृत्यूचं भय दाखवून होतात.
तुम्हाला माझा बिगर पिक्चर मुद्दा लक्षात आलेला नाही असं वाटतं. जबाबदाऱ्या दोन्हीकडे असतात, त्या जबाबदाऱ्यांचं वितरण असमाधानकारक आहे, पोलराइज्ड आहे, आणि ते बदललं पाहिजे. फक्त 'गर्भाशय भाड्याने' सारखी भाषा खटकते.
सिमोन दी बोव्हारच्या १९७०-८०
सिमोन दी बोव्हारच्या १९७०-८० च्या काळात घेतलेल्या मुलाखतींमध्ये ती स्पष्टपणे असं म्हणते -
"द सेकंड सेक्स'च्या निष्कर्षांमधे मी म्हटलं होतं की मी स्वतःला स्त्रीवादी समजत नाही; कारण समाजवादी रचनेत स्त्रियांचे प्रश्न आपोआप सुटतील अशी माझी तेव्हाची धारणा होती. माझ्या मते, स्त्रीवादी म्हणजे वर्गभेदांपलिकडे जाऊन फक्त स्त्रियांच्या प्रश्नांवर लढा देणारी व्यक्ती." (या मुलाखतीचं शीर्षक "मी स्त्रीवादी आहे", असं आहे.)
"... स्त्रीवादी संघटनांच्या विचारांमधे वेगवेगळे प्रकार आहेत, आणि तिथे त्यांनी बरीच प्रगती केली आहे. यात बेटी फ्रीडनसारख्या समन्वयी-स्त्रीवादी आहेत आणि दुसऱ्या टोकाला SCUM (The Society for Cutting Up Men) सारख्या संघटनाही आहेत ज्यांना पुरुषांचा लिंगविच्छेद करावा असं वाटतं. चळवळीअंतर्गतच या दोन टोकाच्या भूमिकांमधे असंख्य भूमिका आहेत." (हे उद्धृत फक्त 'स्कम मॅनिफेस्टो'चं श्रेय कमी करण्यासाठी.)
"प्रश्न - स्त्रियांना मोकळेपणाने बोलावसं वाटणार नाही म्हणून पुरुषांना सध्या वगळणं हा तुम्हाला व्यावहारिक तोडगा वाटतो का? का हा राजकीय प्रश्न वाटतो? पुरुष व्यवस्थेचे प्रतिनिधी आहेत आणि पुरुष व्यक्ती म्हणूनही स्त्रियांवर अत्याचार करतात म्हणून त्यांच्याकडे प्रथम क्रमांकाचा शत्रू म्हणून सुरूवातीला पाहू नये का?"
"उत्तर - होय अर्थातच, पण हे तसं बऱ्यापैकी गुंतागुंतीचं आहे. मार्क्स भांडवलशाहीबद्दल जे बोलतो ते इथेही लागू पडतं. पुरुषसुद्धा व्यवस्थेचे बळी आहेत. मी काही काळ म्हणत होते, माणसाने व्यवस्थेशीच लढा द्यायला हवा, पण हे फार हवेतलं (abstract) बोलणं झालं. अर्थातच पुरुषांशीही लढा द्यायलाच हवा. ज्यांनी व्यवस्था बनवलेली नाही पण तिच्यातून फायदे उपटत आहेत असेही गुन्हेगार ठरतात. आजच्या पुरुषांनी ही पुरुषप्रधान व्यवस्था निर्माण केलेली नाही, ते अगदी व्यवस्थेवर टीका करतही असतील पण पुरुषांना या व्यवस्थेचे फायदे मिळतात. पुरुष स्वतःच्याही नकळत या व्यवस्थेचे भाग बनले आहेत.
व्यवस्थेशी लढा दिलाच पाहिजे, पण त्याच्याच जोडीला पुरुषांशी संपर्क ठेवताना वैरभाव बाळगला नाही तरी निदान काळजी बाळगली पाहिजे. आपलं कर्तृत्त्व झाकोळणार नाही, आपल्यावर बंधनं येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. पुरुष स्त्रीवादी असेल तरीही अंतर बाळगून, पुरुषांच्या पंखाखाली न जाण्याची काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांना समानता इनाम म्हणून नकोय, त्यांना ती मिळवायची आहे. या दोन्ही गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत."
ही मुलाखत १९७२ मधली, 'द सेकंड सेक्स' आलं १९४६ मध्ये.
---
तोरिल म्वाच्या उद्धृतामध्ये पुरुषांविरोधात काही म्हटल्याचं दिसलं नाही. व्हालेरी सोलानास हे टोकाचं उदाहरण आहे, आणि तिला फार - सिमोन दी बोव्हार, बेटी फ्रीडन यांना मिळाली तशी - लोकमान्यता, प्रसिद्धी मिळाली नाही.
--
लढाईत मरा-मारायला जाणं वा न जाणं हा पर्याय पुरुषांसमोर असतो. बलात्कार करून घेण्यासाठी किंवा टाळण्यासाठी घरात राहणं आणि घराबाहेर पडणं असे पर्याय स्त्रीसमोर नसतात. तरीही मृत्यु सगळ्यात वाईट, त्याखालोखाल आपण कोण हे विसरणं ... हे मान्य आहे.
---
'गर्भाशय भाड्याने' यात मुळातच मूल स्त्रीचं नाही, असं सुचवून मातेवर अन्याय केला जातो. पण तो दाखवण्यासाठी बलात्काराचं आणि स्त्रीवादी विचारधारेतलं पुरुषसंबंधी दृष्टीकोनाचं सुलभीकरण, 'प्रतिपक्षा'तली टोकाची क्रूर विधानं उद्धृत करणं का?
या उद्धृतांमुळे 'स्त्रीमुक्ती
या उद्धृतांमुळे 'स्त्रीमुक्ती चळवळीचा एक मूलभूत सिद्धांत आहे. तो म्हणजे 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलेलं आहे'.' हे असिद्ध कसं होतं ते कळलं नाही. स्कमचं टोकाचं उदाहरण मुद्दामून दिलेलं होतं. स्पेक्ट्रमच्या एका टोकावर जर 'पुरुषांना कापून काढा' म्हणत असतील, तर मध्ये कुठेतरी 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलं' असं म्हणतात हे दाखवण्यासाठी.
असो. हा शेवटी प्रीअॅंबलबद्दलचाच वाद आहे.
(अवांतर)
स्कमचं टोकाचं उदाहरण मुद्दामून दिलेलं होतं. स्पेक्ट्रमच्या एका टोकावर जर 'पुरुषांना कापून काढा' म्हणत असतील...
विभक्ती अंमळ चुकलीसे वाटते.१
...तर मध्ये कुठेतरी 'पुरुषांनी स्त्रियांचं शोषण केलं' असं म्हणतात हे दाखवण्यासाठी.
याचे दाखले शोधण्यासाठी वस्तुतः फार दूर जाण्याची आवश्यकता नसावी. हिंदी चित्रपटांमध्ये पदोपदी आढळतात.२
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ त्या प्रतिपादनातील अधोरेखित विभक्तिप्रत्यय हा द्वितीयेचा नसून षष्ठीचा (आणि त्यातही नपुंसकलिंगी)१अ असावा, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
१अ येथे 'षष्ठीचा (आणि त्यातही नपुंसकलिंगी)' प्रत्यय१ब हा किमान दोन पातळींवर पुरुषाकरिता (पोष्ट करेक्टिव अॅक्शन) रूपकात्मक असावा, अशी शंका येते.
१ब असा प्रत्यय वैर्यासही न येवो.
२ 'अगर किसी ने माँ का दूध पिया है, तो सामने आ जाओ|'
सोयीस्कर संदर्भ
सोयीस्कर संदर्भ घेतले तर काय हवे ते सिद्धांत मांडलेले दाखवता येतील.
'द सेकंड सेक्स' लिहीणारी सिमोन दी बोव्हार, अमेरिकेत स्त्रीवाद्यांची दुसरी पिढी तयार करणारी बेटी फ्रीडन "पुरुषांनी शोषण केलं आहे" असं म्हणत नाहीत. त्या व्यवस्थेवर टीका करतात. सिमोनच्या उद्धृतांमध्ये "पुरुषही व्यवस्थेचे बळी आहेत" असं म्हणते, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्षच करायचं असेल तर चर्चेची आवश्यकता नाही.
गृहितकं?
रोजीरोटी मिळवणं ही आत्तापर्यंतच्या इतिहासात मुख्यत्वे पुरुषाचीच जबाबदारी राहिलेली आहे. स्त्रियांना केवळ रांधा-वाढा-उष्टी काढा यातच अडकून पडायला लागतं तसंच पुरुषांना खणा-नांगरा-कापणी मळणी करा - विका-पोसा यातच अडकून पडावं लागतं. स्त्रियांना जितकं घरात 'अडकून' पडावं लागतं, तितकंच पुरुषांना घराबाहेर 'अडकून' पडावं लागतं.
बहुतांश लेख हा समाजातील स्त्री आणि पुरूषाचे 'रोल्स' हे परस्पर संमतीनं ठरवलेले आहेत ह्या गृहितकावर आधारलेला आहे असे वाटते.
परस्परसंमतीचं गृहितक नाही.
परस्परसंमतीचं गृहितक नाही. दोन्ही बाजूंची इकॉनॉमिक नेसेसिटी म्हणून ही कामांची विभागणी आलेली आहे. एकदा ती विभागणी झाल्यावर सामाजिक बंधनांनी हे पोलरायझेशन अधिक घट्ट आणि जाचक केलं. दोन्ही लिंगांसाठी काहीसं जाचक. म्हणूनच बदलत्या काळात डीपोलरायझेशन होणं आवश्यक आहे. पण - गर्भाशय भाड्याने घेणारे हरामखोर पुरुष - सदृश भाषा/दृष्टिकोन बालिश आणि एकांगी वाटतो.
नेसेसिटी
दोन्ही बाजूंची इकॉनॉमिक नेसेसिटी म्हणून ही कामांची विभागणी आलेली आहे.
हे स्पष्टीकरण 'टू सिम्प्लिस्टीक' प्रकारचं वाटत. कोणत्या शतकात ही विभागणी "फक्त" इकॉनॉमिक इन्सेटीव्ह्स ने झाली असेल? आणि तेव्हा एका गटाने दुसर्या गटावर काही लादलं नसेल याची खात्री कशावरून?
एकदा ती विभागणी झाल्यावर सामाजिक बंधनांनी हे पोलरायझेशन अधिक घट्ट आणि जाचक केलं. दोन्ही लिंगांसाठी काहीसं जाचक.
जरी वरचं स्पष्टीकरण मान्य केलं तरी आज जाचकता दोन्ही लिंगांसाठी वेगवेगळी आहे. वरती दिलेलं एक उदाहरण घ्यायचं तर, पुरूष वर्गाला नोकरी न करता घरी बसणं जितकं सहज आहे तितक स्त्री वर्गाला "पौरूषत्व" नाही (भारतात).
कोणत्या शतकात ही विभागणी
कोणत्या शतकात ही विभागणी "फक्त" इकॉनॉमिक इन्सेटीव्ह्स ने झाली असेल?
याला सुरूवात उत्क्रांतीपासूनच झाली. जैविक कार्यांची विभागणी झाली तशीच आणि त्यामुळेच शरीररचनेचं ध्रुवीकरण झालं. पुरुष अधिक सशक्त, स्पेशो-टेम्पोरल अनॅलिसिसमध्ये पुढारलेले असतात. हे गुण शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. स्त्रिया शारीरिकदृष्ट्या कमी शक्तिवान, अधिक प्रेमळ आणि संवाद साधू शकणाऱ्या असतात. हे गुणधर्म संगोपन करणं आणि समाजात वावरणं यासाठी उपयुक्त ठरतात.
वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासूनच वर्षा-दोन वर्षांत एक याप्रमाणे गरोदरपण असेल तर उरलेल्या तीसेक वर्षांच्या आयुष्यात एकतर गर्भार असणं, किंवा अंगावर पिणारं मूल असणं, किंवा ज्यांची काळजी घ्यावी लागेल अशी मुलं असणं यात आदिम स्त्रीचा प्रचंड वेळ जात असे. तेव्हा तिने मुलं/घर/झोपडी/गुहा सांभाळणं हे साहजिक होतं. याउलट पुरुषांना तशा शारीरिक अडचणी नसल्यामुळे बाहेर जाऊन शिकार करणं, अन्न गोळा करणं ही कामं त्यांच्यावर पडणंही साहजिकच होतं. या दोन प्रकारच्या कामांसाठीची अॅडाप्टेशन्स झालेली दिसतात. याला मी इकॉनॉमिक इन्सेंटिव्हमधून आलेलं ध्रुवीकरण म्हणतो.
जरी वरचं स्पष्टीकरण मान्य केलं तरी आज जाचकता दोन्ही लिंगांसाठी वेगवेगळी आहे.
बदललेल्या परिस्थितीमुळे ही आर्थिक समीकरणं बदललेली आहेत. स्त्रीची फर्टिलिटी ७ वरून २ वर आलेली आहे. कर्तबगार आयुष्यही दुप्पट झालेलं आहे. तसंच कामांमध्ये असणारं शारीरिक शक्तीचं महत्त्व नगण्य होत चाललेलं आहे. त्यामुळे ध्रुवीकरण कमी होऊन ओव्हरलॅप वाढताना दिसतो आहे.
पुरूष वर्गाला नोकरी न करता घरी बसणं जितकं सहज आहे तितक स्त्री वर्गाला "पौरूषत्व" नाही (भारतात).
तुम्हाला वाटतं तितकं ते सोपं नाही. खाष्ट सासूने जशी सुनेची तिरकस शब्दांनी हेटाळणी करावी तशी हेटाळणी घरी बसलेल्या पुरुषाची समाज करतो.
उत्क्रांती
याला सुरूवात उत्क्रांतीपासूनच झाली.
उत्क्रांती म्हणजे मानवाची (होमो सेपिअन्स)? त्याआधी सुद्धा (एप्स) नर-मादी यांच्या शरीररचनेत बदल होताच. (जसा इतर अनेक प्रायमेट्समध्ये आहे.)
माझा मुद्दा थोडा वेगळा आहे, ह्या जैविक बदलाबरोबरच सामाजिक बदल झालेले आहेत. हे सामाजिक बदल होताना शारिरीक दृष्ट्या बलवान असलेल्या घटकाने दुर्बल असलेल्या घटकांवर काही लादलेले नाही असे फक्त जैविक उत्क्रांतीतून सिद्ध होत नाही.
त्यामुळे ध्रुवीकरण कमी होऊन ओव्हरलॅप वाढताना दिसतो आहे.
ध्रुवीकरण कमी होत आहे, होय. (पण ह्याचं बरंचस श्रेय स्त्री मुक्तीवाद्यांना आहे) तरीही, आज भारतात दोन्ही घटकांची जाचकता सारखी नाही.
खाष्ट सासूने जशी सुनेची तिरकस शब्दांनी हेटाळणी करावी तशी हेटाळणी घरी बसलेल्या पुरुषाची समाज करतो.
तुम्ही सीमारेषा ओलांडल्यानंतरची गोष्ट करत आहात. मी ती रेषा ओलांडणे दोघांना किती अवघड आहे याबाबत बोलतोय. (भारतात) माझ्या मते सासरकडच्या लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन नोकरी स्विकारणे जितके स्त्रीला अवघड आहे तितके नवर्याला नोकरी सोडून घरी बसणे नाही.
उत्क्रांतीचं स्पष्टीकरण इथे
उत्क्रांतीचं स्पष्टीकरण इथे फारसं लागू नाही. ज्या काळात माणसाचा मेंदू विकसित होत गेला (सॉरी, जार्गन विसरले.) त्या काळातही स्त्रिया निदान ६०% उष्मांक गोळा करत होत्या आणि पुरुष कधी शिकार मिळाली तर ४०% कोटा भरत होते. शिकार-सावड करणाऱ्या मनुष्यांमध्येही स्त्रियांवर घराची "आर्थिक" जबाबदारी जास्त होती.
+ / सेल्फ-गोल!
पण - गर्भाशय भाड्याने घेणारे हरामखोर पुरुष - सदृश भाषा/दृष्टिकोन बालिश आणि एकांगी वाटतो.
त्यापेक्षासुद्धा, पुरुष जर गर्भाशय भाड्याने घेतात असा दृष्टिकोन असेल (इर्रेस्पेक्टिव ऑफ व्हेदर त्यामुळे ते हरामखोर ठरतात की नाही), तर मग त्याच न्यायाने, अशा (हरामखोर ऑर अदरवाइज़) पुरुषांना गर्भाशय भाड्याने देऊ करणार्या या ट्रॅन्झॅक्शनमधील पार्टीबद्दल काय म्हणावे?
बरे, ती पार्टी स्वखुशीने गर्भाशय भाड्याने देत नाही, असा जर दावा असेल, तर मग त्या पार्टीच्या खुशीविरुद्ध तो गर्भाशय भाड्याने देऊ करणारे दलाल१ कोण? त्यांचा निषेध!
(त्याच आर्ग्युमेंटात 'पुरविलेल्या शेजेवरील सोबती'चाही ज़िक्र झाला होता, असे आठवते. त्याबद्दलही असेच.)
नाही म्हणजे, समाजव्यवस्थेत वास्तवात स्त्रियांचे कमॉडिटीकरण होत असेलही - ऑल्दो आय सीरियसली डाउट की हा सरसकट दृष्टिकोन असावा, परंतु तरीही, हे होत असणे शक्य आहे. पण म्हणून स्वतःच आपल्या पक्षास कमॉडिटीच्या, विटिंग किंवा अनविटिंग सर्विस प्रोवायडरच्या, स्वरूपात मांडणे - आणि त्या फूटिंगवर निगोशिएट करणे, अधिक बरा डील मागणे - हे (१) सेल्फ-डीमीनिंग आहे (ऑल्दो, द्याट इज़ नॉट माय हेडेक)२, (२) अंतिमतः कौंटरप्रॉडक्टिव आहे.
एकदा का स्वतःस 'सर्विस प्रोवायडर' म्हटले, की तुमची वैयक्तिक किंमत मग मार्केट फोर्सेसप्रमाणे ठरली. सप्लाय अँड डिमांड, झालेच तर क्वॉलिटी ऑफ सर्विसेस प्रोवायडेड, प्रॉडक्टिविटी वगैरे. (मला या क्षेत्रातील कळत नाही; कदाचित श्री. गब्बर सिंग हे अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. पण मज अडाण्यास जे दिसते, ते येणेप्रमाणे.) मग समानता, तुमचे हक्क वगैरे सगळ्या बाबी तेल लावत जातात. आणि मग तुम्ही (आज किंवा पुढेमागे) व्यक्तिशः कौंटरप्रॉडक्टिव ठरलात, मार्केटमध्ये निरुपयोगी ठरलात, तर तुमच्या स्वस्तातल्या स्वस्तात आणि शक्य तितक्या एफीशियंटली एलिमिनेशनचे मार्केट पाहून घेते. मार्केट शेवटी मार्केटच्या गरजा पाहते, तुमच्या नव्हे. मग तुम्ही(सुद्धा) मानव आहात, या बाबीला काहीही किंमत उरत नाही. आणि मग 'समानता' (किंवा किमानपक्षी मानव म्हणून समान वागणुकीची अपेक्षा) या गोष्टींना अर्थ उरत नाही. मार्केटमध्ये तुम्हाला जर सर्विस प्रोवायडर म्हणून फेवरेबल डील हवा असेल, सोडा, टिकायचे जरी असेल, तर एक तर काँपिटीटिव मार्केटमध्ये तुमची सेलेबिलिटी दणकट पाहिजे, किंवा मग तुम्ही पुरविता ती सर्विस केवळ डिमांडमध्येच नव्हे, तर दुर्मिळ असली पाहिजे, नाहीतर तुमच्याजवळ व्यक्तिशः काही यूएसपी असला पाहिजे. एवढेही करून तुम्ही टिकाल, किंवा तुम्हाला हवा तो भाव मिळेल, याची ग्यारंटी मार्केट तुम्हाला देत नाही. किंवा मग सर्विस प्रोवायडरऐवजी सर्विस कन्झूमर होता आले तर ट्राय युअर लक - प्रोवायडेड देअर आर इनफ प्रोवायडर्स विलिंग टू ऑफर यू द काइंड ऑफ डील द्याट यू वुड लाइक टू बी ऑफर्ड. पुन्हा, त्याचीही ग्यारंटी मार्केट देत नाहीच, पण यू कुड ट्राय. पण व्हॉटेवर सेड, तुम्ही 'मानव' आहात ही बाब, किंवा (मानव म्हणून) तुम्हाला समान हक्क वगैरे बाबी फ़िज़ूल ठरतात.
हे जर अॅक्सेप्टेबल असेल, तर मग मुळात लढा कशासाठी?
तेव्हा, या तो 'सर्विस प्रोवायडर' बोलो, या तो 'मानव' बोलो... या तो 'गर्भाशय/शय्यासोबत भाड्याने देणे/घेणे' बोलो, या तो 'ईक्वल पार्टनरशिप' बोलो. (मग भले ही व्यवहारात तूर्तास ही पार्टनरशिप ईक्वल ठरत नसेलही - द्याट कुड बी समथिंग टू फाइट फॉर, अ गोल (येट) टू बी अचीव्ड. पण स्वतःस सर्विस प्रोवायडर म्हणून प्रोजेक्ट करून त्या बेसिसवर निगोशिएट करण्याने तो गोल कदापि अचीव होणे नाही, उलट तो गोल स्वहस्ते निगेट करणे आहे.)
सरतेशेवटी, स्त्रीपुरुषसमानतावाद्यांच्याच गोटातून अशी भाषा येऊ लागली, असा दृष्टिकोन मांडला जाऊ लागला, तर मग विरोधकांस विरोध करण्याचेही कष्ट घ्यावयास नकोत - दे ह्याव ऑलरेडी वन द ब्याटल - यू जस्ट ह्याण्डेड देम द व्हिक्टरी!
इत्यलम्|
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१ सभ्य शब्द जाणूनबुजून वापरला आहे.
२ वर 'नॉट माय हेडेक' म्हणालो खरा, पण अंतिमतः स्वतःस 'मानव' म्हणवून घेणार्या सर्वांकरिताच - व्हेदर स्त्री ऑर पुरुष - ते डीमीनिंग आहे. अँड दस, आय फाइंड इट एक्स्ट्रीमली ऑफेंडिंग.
विषय काही पटला नाही आणि रुचला पण नाही.
'पुरुष गर्भाशय भाड्याने घेतात' आणि 'स्त्रिया पुरुषांचे स्नायू, मेंदू आणि रक्त भाड्याने घेतात' हे काही पटले नाही आणि रुचले पण नाही. मी माझ्या स्पाऊसवर १००% खूष आहे, असे म्हणणारी व्यक्ती म्हणजे सशाच्या शिंगाइतकी दुर्मिळ. शेवटी संसारात अॅडजस्टमेंट हा प्रकार असतोच. आमचेच बघा ना, मस्त चालले आहे. आठवड्यातून दोनदा मी आणि माझी मांजर, आम्ही चांगल्या हॉटेलात जातो, छान जेवण जेवतो, वाईन वगैरे पितो, एखादा सिनेमा बघतो. ती मंगळवारी जाते आणि मी शुक्रवारी जातो.
काँगोमधील मजुरांची राजा लियोपोल्डशी देवाणघेवाण
19व्या शतकात आफ्रिकेतील काँगो प्रदेश बेल्जियमचा राजा लियोपोल्ड याची वैयक्तिक-खाजगी मालमत्ता होती. तेथील (बहुतेक) मजूर मानवाकरिता सहज वाटणार नाही असे कष्ट करून लियोपोल्डच्या मध्यस्थांची शस्त्रे भाड्याने घेत. भाड्याने घेतलेली शस्त्रे मग स्तब्ध होत आणि मजुरांचे हातपाय छाटत नसत. उलट दिशेने हिशोब बघता लियोपोल्ड मजुरांचे स्नायू भाड्याने घेत होता.
मजुरांना अविच्छिन्न हातपाय असण्याची सुरक्षितता मिळे, लियोपोल्डला हस्तिदंत वगैरे माल बाजारपेठांपर्यंत पोचवून विकण्याचे कष्ट घ्यावे लागत. जी स्थिर ठेवल्यामुळे मजुरांचे हातपाय अविच्छिन्न राहत, ती शस्त्रे विकत घेऊन, शस्त्रे न-चालवणार्या शिपायांचा खर्च उचलावा लागे.
आजकाल मालक-मजूर संबंधात अशा प्रकारची स्पेशलाइझ्ड देवाणघेवाण बेकायदेशीर आहे, म्हणून मानवी समानता वाढते आहे, हे चांगलेच. परंतु (लियोपोल्डच्या समकालीन) मार्क ट्वेनने लियोपोल्डची अमानुष छळवादी म्हणून केलेली टीका टोकाची वाटते, त्याने असे शब्दप्रयोग काळजीपूर्वक करायला हवे होते.
हो ना, आणि त्या मजूर आणि
हो ना, आणि त्या मजूर आणि शिपायांच्या नात्यावर किती एक कवींनी सुनितं, महाकाव्यं रचलेली आहेत; नाटककार व कादंबरीकारांनी त्या नात्यांच्या तरलपणावर गाजलेल्या कलाकृती तयार केलेल्या आहेत आणि झालंच तर हिंदी सिनेमांतून त्यांनी एकमेकांसोबत प्रेमपूर्वक नृत्यंही केलेली दाखवलेली आहेत हे कसं विसरता येईल?
प्रजननाच्या प्रक्रियेचे २
भाड्याचं गर्भाशय आणि भाड्याचे स्नायू
.
प्रजननाच्या प्रक्रियेचे २ भागात विभाजन करा -
१) फर्टिलायझेशन
२) इन्क्युबेशन
१) फर्टिलायझेशन - यात स्त्री एग्ग चे योगदान करते. व पुरुष शुक्राणू चे योगदान करतो. दोघे (जवळपास) सारखेच भागीदार ठरतात.
२) इन्क्युबेशन - यात स्त्री becomes provider of monopoly asset - the uterus. This is natural monopoly. (याचा अर्थ हा की स्त्रियांकडे किमान एक अशी कपॅसिटी असते की जी पुरुषांकडे निसर्गतः नसते. म्हंजे किमान या बाबतीत स्त्रियांकडे जास्त योग्यता असते. व याअर्थाने स्त्रिया व पुरुष असमान असतात. म्हंजे विषमता अस्तित्वात असते.) याचा अर्थ हा की स्त्री ला इन्क्युबेशन च्या ९ महिन्याच्या कालावधीसाठी प्रिमियम पुरुषाने द्यायला हवा. पण असे करण्याचा परिणाम - तंत्रज्ञानाच्या विकसित होण्यात होऊ शकतो. असे तंत्रज्ञान की जे uterus ला पर्याय बनू शकेल ... जेणेकरून प्रिमियम कमी केला जाऊ शकतो. पण तरीही समस्त स्त्रीवर्गाने एग्ग द्यायला नकार दिला (collusion) तर ते तंत्रज्ञान असून नसून सारखे ठरू शकते. व म्हणून पर्याय हे नेहमीच "मेथडॉलॉजिकल इंडिव्हिज्युअलिझम" वापरूनच अॅनॅलाईझ केले जावेत.
स्त्रियांनी व पुरुषांनी हे मान्य करणे गरजेचे आहे की - समानता हा बकवास च असतो. बकवासाशिवाय काही असूच शकत नाही. विषमता हीच नॉर्मल स्टेट ऑफ अफेअर्स आहे. क्षमतांची असमानता हा आरंभबिंदु घेऊन रिझल्ट्स्ची समानता निर्माण करणे हे त्या असमानतेच्या वास्तवापेक्षाही जास्त भयानक असू शकते (असतेच असे नाही. पण असू शकते.). राहता राहिला प्रश्न संधीची समानता. हे सुयोग्य असू शकते पण ही संधीची समानता निर्माण करण्यासाठी जी यंत्रणा राबवावी लागते तिच्या चालवण्याचा भार (कॉस्टस) असमान का असावा ??? जे कमी/कमजोर आहेत त्यांच्यावर हा भार (यत्किंचितही) टाकायला डावे लोक रिलक्टंट असतात. व जे जास्त/बलवान आहेत त्यांना संधीच्या समानतेची गरजच नसते. मार्क्स चा उल्लेख वर आलेला आहे. त्याचे एक वाक्य आहे की - Philosophers have only interpreted the world. The real point is to change it. व या वाक्यानुसार डाव्यांना जंगलातली उंच झाडे कापून त्यांना (इतर बुटक्या झाडांच्या बरोबरीची) एकसमान उंचीची बनवण्याचा सोस दांडगा असतो.
----
Two insights follow immediately from economists’ study of collective choice processes.
First, the individual becomes the fundamental unit of analysis. Public choice theory rejects the construction of organic decision-making units, such as “the people,” “the community,” or “society.” Groups do not make choices; only individuals do. The problem then becomes how to model the ways in which the diverse and often conflicting preferences of self-interested individuals get expressed and collated when decisions are made collectively.
Second, public and private choice processes differ, not because the motivations of actors are different, but because of stark differences in the incentives and constraints that channel the pursuit of self-interest in the two settings.
डाव्यांना जंगलातली उंच झाडे
डाव्यांना जंगलातली उंच झाडे कापून त्यांना (इतर बुटक्या झाडांच्या बरोबरीची) एकसमान उंचीची बनवण्याचा सोस दांडगा असतो.
या विषयाच्या बाबतीत या वाक्याशी सहमत आहे.स्त्रिया इन्क्युबेशनमध्ये जास्त गुंतवणूक करतात आणि पुरुषाने त्याची इतर मार्गाने भरपाई केली पाहिजे वगैरे जैविक/जनुकीय पातळीवरच्या गप्पा मारताना हे लक्षात घेतलं पाहिजे की स्त्रीच्या जनुकीय ऊर्मी यातून पूर्ण तरी होतात, वंशवृद्धीसाठी जास्तीत जास्त माद्यांचे आपल्या बीजाने फलन करायच्या जनुकीय ऊर्मीचा नराने त्याग केला आहे असे म्हणणे मात्र "शांतम् पापम्". समाजाचे नीतिनियम स्त्रीच्या ऊर्मींशी संलग्न आहेत आणि पुरुषांनी त्यांच्याशी स्वतःला जुळवून घेतले आहे. अर्थातच त्याची किंमत काहीच नाही, हे तर अपेक्षितच आहे असं म्हटलं की झालं.
कॅपिटलिस्ट नाइट्स विथ गब्बर
कॅपिटलिस्ट नाइट्स विथ गब्बर असा शो सुरू करा हो.
वा. आयडिया मस्त आहे.
अर्थशास्त्र म्हंजे कॅपिटलिझम - ही गल्लत तुम्ही केलेली नाही - हे ही मस्तच.
-----
दुनियेतल्या प्रत्येक गोष्टीचे कमोडिटीत रुपांतर करण्याचे मनोरंजन मूल्य अपार आहे.
ते गाणं ऐकलयंत का - रात कली एक ख्वाब मे आयी ... और गले का हार हुई. त्यानुसार प्रथम कळी व नंतर गळ्यातला हार बनून जाते ती. कळ्या कमोडिटी असतीलही पण नंतर गळ्यातला हार कमोडिटी नसतो हो. आणि अगदी शुद्धातिशुद्ध कॅपिटलिस्ट विचार केलात तर सोयाबिन, गहू, तांदूळ, कॉफीच्या बीन्स ह्या कमोडिटी मानल्या जातात पण त्याचबरोब सोनं, चांदी, प्लॅटिनम - हे सुद्द्धा कमोडिटी मानले जातात. म्हणून कमोडिटी बनणे हे अगदीच अनिष्ट नाही.
कल्पनादारिद्र्य!
तुम्हा रूक्ष कॅपटिलीस्ट लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे बघा. कल्पनादारिद्र्यामुळे मानवाला प्रिय असलेल्या भावना तुम्हाला कधी कळतंच नाहीत अन म्हणूनच त्याला काय महत्त्वाचं आहे यापेक्षा कशाने फायदा जास्त यावरच तुम्ही वाद घालत राहता.
सुंदर कळी जशी अलगद उगवते त्याप्रमाणे माझ्यास्वप्त्नात आलेल्या तीने मला मिठी मारली असं तो म्हणतो अन तुम्हाला हाराच्या पुढे कल्पना करवत नाही. दया येते ब्वॉ तुमची!
(हलके घेणे!)
हवी ती स्त्री न मिळाल्यामुळे
हवी ती स्त्री न मिळाल्यामुळे आत्महत्या करणारांची संख्या किती आहे काही कल्पना आहे का? >> आर यू सिरीअस? नै मला आपलं शोले, मौसी, सुईसाईड वगैरे आठवलं.
आणि कोर्टशिपबद्दल कोणीही कसलंही शिक्षण देत नाही? हिंदी चित्रपट बघीतले नाय का कधी? हे घ्या एक उदाहरण
बाकी अजून एक बारीक
बाकी अजून एक बारीक शंका:
पुरुष गर्भाशय भाड्यानं घेतात, शेजेवरची सोबत इत्यादी गोष्टींबद्दल खूप लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत असं दिसलं.
पण - स्त्रियांचं गर्भाशय नि योनी, आणि पुरुषांचं शिस्न नि स्नायू यांचा परस्परांना होणारा फायदा जमेस धरलाच नाही, तर विवाह झालेल्या स्त्रीपुरुषांनी एकमेकांची संपत्ती वाटून घेणेच योग्य आहे हा जो ठाम समज / श्रद्धा आहे (जॉइंट सॅलरी अकाउंटाचं झालेलं स्वागत हा एक बारक्कास्सा पुरावा. या समजाचे इतरही पुरावे अनेक मिळतील.) त्याला आधार नक्की कसला आहे?
लेख
लेख वाचला.
एकंदर लेखाची मांडणी "स्त्रिया विरुद्ध पुरुष" अशी काहीशी बालसुलभ वाटली.
>>>>
१. स्त्री ही भोगवस्तू आहे, पुरुष हे उपभोक्ते आहेत.
२. पुरुष मुक्त असतात, स्त्रियांवर बंधनं असतात.
३. सर्व सत्तास्थानं पुरुषांच्या हातात असतात, तर स्त्रियांच्या हातात काहीच सत्ता नसते.
४. व्यवस्थेचे सर्व फायदे पुरुषांनाच मिळतात, तर तोटे फक्त स्त्रियांच्याच वाट्याला येतात.
>>>>>>
या सर्व विधानांमधे कुठली तरी एक बाजू काळी आणि दुसरी पांढरीलख्ख आहे असं चित्र आहे. धाग्याचा लेखक एकेक विधान घेतो नि त्याचा प्रतिवाद करतो. हे सर्व मला
२+२= ५
२०+२०= ५००
अशी विधानं घेऊन मग ती विधानं कशी चुकीचीच आहेत असं म्हणून काहीतरी महत्त्वाचं सिद्ध केल्यासारखं वाटतं आहे.
माझ्यामते अशी सिम्प्लिस्टीक मांडणी करून मग त्यावर "आम्ही पुरुष कसे असे नाहीच्च आहोत" वगैरे निरनिराळ्या पद्धतीने म्हणणं यात फार काही राम नाही.
अवांतर : तीन किंवा अधिक स्त्रिया मिळून कधीच काहीच करू शकत नाहीत, पुरुष कसे एकत्र येऊन छान छान गोष्टी करतात या अंगाचं विवेचन वाचलं आणि काही मिनिटं छान हसण्यात गेली. ते विवेचन मूळ लेखापेक्षा कितीतरी अधिक मनोरंजनमूल्याचं आहे.
१ ते ४ प्रकारच्या
१ ते ४ प्रकारच्या युक्तिवादाची शेकड्यांनी उदाहरणं देता येतील. 'असा एकांगी युक्तिवाद करू नये' असंच लेखाचं म्हणणं आहे. उलट, पुरुष हेही व्यवस्थेचे तितकेच बळी असतात हा युक्तिवाद तितक्या सहजपणे सापडत नाही, असंही म्हणणं आहे. आम्ही पुरुष तसे नाहीच्च वगैरे काही म्हणणं नाही. लेख पुन्हा एकदा वाचावा ही विनंती.
>> १ ते ४ प्रकारच्या
>> १ ते ४ प्रकारच्या युक्तिवादाची शेकड्यांनी उदाहरणं देता येतील. 'असा एकांगी युक्तिवाद करू नये' असंच लेखाचं म्हणणं आहे.
यालाच मी स्टेटिंग द ऑब्व्हियस असं म्हणतो.
>>उलट, पुरुष हेही व्यवस्थेचे तितकेच बळी असतात हा युक्तिवाद तितक्या सहजपणे सापडत नाही, असंही म्हणणं आहे.
जाड ठशातल्या शब्दाने अधोरेखित झालेल्या या विधानाशी असहमती व्यक्त करतो :-)
बाकी, "बायकांवर काय, फक्त बलात्कार तर होतात; त्यांच्यावर मृत्यू कुठे पुरुषांएवढा ओढवतो" या विवेचनाबद्दल मी न बोललेले बरे :-)
>>उलट, पुरुष हेही व्यवस्थेचे
>>उलट, पुरुष हेही व्यवस्थेचे तितकेच बळी असतात हा युक्तिवाद तितक्या सहजपणे सापडत नाही, असंही म्हणणं आहे.
बाकी, "बायकांवर काय, फक्त बलात्कार तर होतात; त्यांच्यावर मृत्यू कुठे पुरुषांएवढा ओढवतो" या विवेचनाबद्दल मी न बोललेले बरे (स्माईल)
मुक्तसुनीत यांच्या असहमतीला +१.
शिवाय या दोन विधानांमध्ये विरोधाभास आहे. एकीकडे म्हणायचं, "पुरुषही तितकेच बळी असतात." दुसरीकडे "पुरुषांना येणारा मृत्यु अधिक वाईट; बायकांवर फक्त बलात्कार होतात." एक पे रहना ... एक तर अन्यायात समानता म्हणा किंवा पुरुषांना अधिक सहन करावं लागतं म्हणा.
तितकेच हा शब्दप्रयोग चुकला
तितकेच हा शब्दप्रयोग चुकला खरा. कदाचित जास्त असतील, कदाचित कमी असतील. कारण मोजमाप शक्य नाही. जर तुमच्याकडे मोजमापीचे काही निकष असतील तर सांगावेत. म्हणजे आक्षेपाला गट फीलिंगपलिकडे काहीतरी आधार आहे हे कळेल. तुमचं म्हणणं स्वयंसिद्ध आहे असं म्हणायचं असेल तर चर्चाच खुंटते.
" विद्रोही साहित्याविषयी
" विद्रोही साहित्याविषयी बोलताना ते 'सतत ओरडून बोलणारा माणूस काय बोलत आहे, हे अनेकदा समजत नाही'
हे वाक्य सन्जोप रावांच्या ब्लॉगवरुन उचलले आहे.
आताशा स्त्री-पुरुष अन्याय्/विषमता/श्रेष्ठत्व आदि लेख आले की तेच वाक्य आठवतं.
___________________
राघांनी मांडलेले मुद्दे कौतुकास्पद आहेतच. पण या विषयाचा अन मुख्य "आपलं तेच खरं" अशा स्टँडचा फार कंटाळा आला आहे. नात्यातली गोडी टाकून उसाचं चिपाड रवंथ करत बसल्यासारखं वाटतं.
www.timesofindia.com/india/Ce
www.timesofindia.com/india/Census-busts-urban-myth-finds-Bharat-has-mor…
Census 2011 data had earlier shown that the share of working women in rural areas was 35 per cent compared to just 21 per cent in urban areas.
स्कॉट अॅडम्स
ऐसीवरील चर्चा वाचून स्कॉट अॅडम्स यांनी ताजा लेख लिहिला आहे असे वाटले. ;)
संस्थळावर कालच्या हाणामारी
संस्थळावर कालच्या हाणामारी नंतर फारच शांतता वाटत असल्याने गुर्जींनी काडी टाकली आहे.