छायाचित्रण स्पर्धा

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३१ : काँट्रास्ट

काही वेळा फोटोंमध्ये जेव्हा सार्‍या रंगसंगती एकमेकांना पुरक असतात आणि मध्ये एखादा अगदी वेगळा रंग त्यात उठुन दिसतो त्यावेळी त्या रंगाचं आणि तो रंग असलेल्या वस्तुचं अस्तीत्व ठळक उठुन दिसतं. तेव्हा यावेळचा विषय आहे "काँट्रास्ट". मी काढलेला एक फोटो उदाहरणादाखल दिला आहे.

------------

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३० : गंध

गंध, आपल्या मूलभूत संवेदनांपैकी एक महत्त्वाची संवेदना. ही अमूर्त संवेदनासुद्धा एखादं छायाचित्र पाहून कधी कधी आपल्या नाकाला जाणवते. फुलं, गवत, माती, स्वयंपाकघर असे काही विषय यात येऊ शकतील. उदा. हा फोटो

------------

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : पॅटर्न

आपल्याला आजूबाजूला अनेक पॅटर्न दिसतात, पुन:पुन्हा घडणारी, दिसणारी भौमितिक किंवा इतर कोणतीही घटना. जुन्या देवळांमधल्या शिल्पांमधे दिसणारी नियमितता, किंवा तारांच्या जाळीतली नियमितता, किंवा ऋतूंमधे दिसणारी नियमितता, किंवा वागण्या-बोलण्याचे पॅटर्न्स हा या आव्हानाचा विषय आहे. एकावर एक आलेले, वेगवेगळे पॅटर्न्स (उदा: हा फोटो पहा.) बघायला आवडतील.

याशिवाय विषयाचा काही वेगळा अर्थ लावला तरीही स्वागतच आहे.

------------

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २९ : सावली

कॅमेर्‍यातून काढलेल्या चित्रांना "छायाचित्रण" म्हणतात. (काहीकाही लोक रंगीत चित्रांना "प्रकाशचित्रण" म्हणण्याचा आग्रह धरतात, ही बाब त्यांना क्षणभर माफ करूया.) चित्रामध्ये सावल्यांचे पार्श्वभूमी म्हणून महत्त्व अनन्यसाधारण आहे. भगभगीत फ्लॅशमुळे सावल्या नाहिशा झाल्या, तर पुष्कळदा चित्र सपाट होते, त्याची त्रिमिती हरवते. द्विमिती चित्राची त्रिमिती हरवते, म्हणजे काय? चित्रातील वस्तू त्रिमिती असल्याचा हवाहवासा भास हरवतो. उलटपक्षी कधीकधी सावल्या नको तिथे येऊन रसभंग करतात... यावेळच्या पाक्षिक आव्हानात आपल्याला सावल्यांनाच विषय बनवायचे आहे. छोटी जिची बाहुली, मोठी माझी सावली.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २८ : दृश्य आणि दृश्येतर कला यांची सांगड

बरेचदा एखादे दृश्य पाहताना आपल्याला एखादी कवितेची ओळ, एखादा संगीताचा तुकडा, एखादे उद्धृत आठवून जाते. मग त्या दोन गोष्टींची सांगड आपल्या कायम लक्षात राहते आणि त्या दृश्याचा अनुभव अधिक चमकदार, तजेलदार, जिवंत होतो.

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २७: विनोद

या वेळेचा विषय आहे "विनोद".
वेगवेगळ्या माध्यमांतून होणारा विनोद देखील फार वेगवेगळ्या जातकुळींचा असतो. 'छायाचित्रणाच्या माध्यमातून सादर केला गेलेला विनोद' हे एक रोचक समीकरण आहे; कधी हा विनोद विसंगती टिपतो, कधी विनोदानंतरचा चमकता क्षण टिपतो, कधी आकार-रचना इत्यादी गोष्टींतून तयार झालेले विनोदी चित्र टिपतो तर कधी विनोदी अंगविक्षेप किंवा हावभाव टिपतो. विषय तसा पुरेसा मोकळा ठेवला आहे, छायाचित्रणाचा विनोदाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला तरी पुरेसा आहे.
निकष खालीलप्रमाणे असतील,

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २६: व्यक्तिचित्रे (पोर्टेट्स)

या वेळेची कथावस्तू (थीम) आहे "व्यक्तिचित्रे (पोर्टेट्स)"

चेहरा आणी चेहर्‍या मागची व्यक्ति छायाचित्रातुन दाखवणे हे एक कौशल्याचे काम आहे. व्यक्तिच्या मनातील भाव चेहर्‍यावर व्यक्त होत असतांना छायाचित्र टिपणे हे पण यामागचे गमक आहे. तेव्हा तुमच्या ठेव्यातील व्यक्तिचित्रे बाहेर येउ द्या!

अपेक्षा:

१. एका छायाचित्रात एकच व्यक्ती!
२. इतर फाफट पसारा नको
३. शक्य असल्यास उत्स्पूर्त / candid व्यक्तिचित्र असावे
४. चेहर्‍यावरचे भाव टिपण्यास प्राधान्य असावे

-----

छायाचित्रण पाक्षिक-आव्हान २५ : दारे-खिडक्या


खिडकीला गज सातच का अन् सकाळकिरणे
किती असावी त्या गुणिलेले मी सातांनी..
देव बांधुनी जात असावा चिमणीचा अन्
खिश्यात आजोबांच्या खोपा हळू हातांनी...

आरती प्रभूंच्या या ओळी खिडकीचे नेहमीचेच दृश्य एकाएकी विलक्षणरित्या पालटून टाकतात.

किंवा

'आमार आँगिना थेके चोले गेएछे तोमारो मोने
बोशे आछि बातायोने तोमारी आशाय, कि लिखी तोमाय ?
'

"माझ्या अंगणातून माझे मन थेट तुझ्या मनात मिसळून जाते आहे.
काय लिहू तुला ? मी इथे वातायनापाशी तुझ्याच ओढीने बसले आहे. "
इथे ते वातायन (खिडकी) तिच्यासाठी केवळ हवा येण्याचे निमित्तसाधन न राहता प्रियकराच्या भेटीचा मार्ग होते.

Subscribe to RSS - छायाचित्रण स्पर्धा