विज्ञान/तंत्रज्ञान

नोकिया ८०८ घ्यावा का ?

सध्या नोकिया ८०८ ची किंमत बरीच कमी झालीये तो सध्या १७-१८ हजार रु. मध्ये मिळत आहे.
४१ मेगा असल्याने त्याने सगळ्या स्मार्टफोन कॅमेरांना मागे टाकले आहेच.. पण P&S आणि काही DSLR ना पण मात देतो ...

काय म्हणता ?

काही दुवे ...

किंमत

स्मार्टफोन सोबत तुलना इथे HTC One आणि iPhone 5 पण हवे होते ...

भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.

भास्कराचार्य, चंगदेव आणि चाळिसगावाजवळचे पाटण.

तर्कशास्त्र आणि विज्ञान - घनिष्ठ संबंध पण एकच क्षेत्र नव्हे

विज्ञानाच्या पद्धतीत तर्कशास्त्राच्या कसोट्या मूलभूत असल्या, तरी विज्ञान आणि तर्कशास्त्र एकच क्षेत्र नव्हे. (वाटल्यास तर्कशास्त्र आणि शुद्ध गणित हे एकच क्षेत्र असल्याचे मानता येते.) युक्तिवादांची आकृती अथवा सांगाडा (फॉर्म) हे तर्कशास्त्राचे क्षेत्र. त्या सांगाड्यात ज्या संकल्पना वावरणार आहेत, त्यांच्या तथ्यतेबाबत काहीच विचार नसतो. उदाहरणार्थ, शालेय तर्कशास्त्रात "(अ) सॉक्रेटिस मानव आहे, (आ) सर्व मानव मर्त्य आहेत, (इ) तस्मात् सॉक्रेटिस मर्त्य आहे" हा युक्तिवाद शिकवतात. हे जीवशास्त्राबाबत किंवा नश्वर आयुष्यात काय धोरण असावे, त्याबाबत नाही.

लॅपटॉप कुठला घ्यावा ?

मला व माझ्या मित्राला एक 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर याबाबतची माहिती मिळविण्यासाठी ही चर्चा! ( यात किँमत , कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित)

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.”
― Chris Hedges

खगोलशास्त्राविषयी

परवाच ऐसी अक्षरेवर खगोलशास्त्रज्ञ पॅट्रिक मूर यांचे निधन झाल्याची बातमी वाचली.पॅट्रिक मूर हे नक्की कोण होते हे मला ही माहिती वाचेपर्यंत माहित नव्हते आणि अजूनही नक्की त्यांनी काय कार्य केले याची मला माहिती नाही.त्यांना श्रध्दांजली. ती बातमी वाचून काही प्रश्न उभे राहिले आणि ते प्रश्न त्यांना श्रध्दांजली द्यायच्या धाग्यात उभे करणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून नवा धागा काढत आहे.

डेक्कन ट्रॅप, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादि.

"महाराष्ट्रात ज्वालामुखी नवीन नाही. सह्याद्रीच्या रांगा ज्वालामुखीच्या उद्रेकातूनच तयार झालेल्या आहेत हे आपण शालेय भूगोलातच शिकलेलो आहोत. पण हा ज्वालामुखी आता मृत आहे. निदान गेली ६५ लाख वर्ष या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला नाही असं मानलं जातं."

विक्षिप्त अदिति ह्यांच्या ह्या यलोस्टोन पार्कविषय धाग्यात वरील वाक्य वाचले आणि बरेच दिवस डोक्यात असलेला एक विचार पुढे आला. मी भूगर्भशास्त्राचा अभ्यासक नाही, केवळ थोडीबहुत माहिती सर्वसामान्य वाचनातून गोळा केली आहे. तसेच एकेकाळी सह्याद्रीच्या डोंगरपठारांमधून आणि किल्ल्यांवर बराच हिंडलो आहे आणि त्यातून हा येथे मांडलेला हा ढोबळ विचार तयार झालेला आहे. भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांकडून ह्याबद्दल अधिक खोलात जाऊन अधिकृत असे काही वाचावयास आवडेल.

मी वाचल्यानुसार डेक्कन ट्रॅपची निर्मिति ही पृथ्वीच्या पोटातील लाव्हा वरती येऊन घट्ट झाल्यामुळे निर्माण झाला आहे हे खरे पण ही प्रक्रिया ज्वालामुखींच्या उद्रेकातून स्फोट होऊन झालेली नाही तर पृष्ठभागावरील भेगांमधून दाबामुळे लाव्हा वर येऊन सावकाश क्षितिजसमान्तर पसरला जाऊन घडलेली आहे. सहज शोधता books.google.com येथे Hydrology and Water Resources of India हे पुस्तक मिळाले त्याच्या पृ.२४० वर हेच म्हटले आहे.

सह्याद्रीमध्ये आसपास चारहि बाजूस डोंगर आहेत अशा जागी उभे राहून सभोवार दृष्टि टाकली की असे जाणवते त्या डोंगरांची रचना सर्वात खाली दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्याच्यावर शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत, त्यावर पुनः दगडमातीचा आणि चढाचा डोंगर, त्यावर पुनः शंभर-दीडशे फूट उंचीची खडकाची उभी भिंत अशा प्रकारची असते. बहुशः पहिल्याच खडकाच्या भिंतीवर सपाट जागा असते आणि त्यावर पुढील डोंगर नसते. महाराष्ट्रातील बहुसंख्य डोंगरी किल्ले ह्या सपाटीवर वसलेले असतात. उभ्या खडकाच्या भिंतीच्या वर असल्याने त्या जागा शत्रूपासून आश्रयाच्या जागा म्हणून अतिशय योग्य असतात. खडकाच्या भिंतीमध्ये आवश्यक तेथे दरवाजे काढले आणि थोड्याफार तटाच्या भिंती आवश्यक तेथे बांधल्या की स्वसंरक्षण करण्यास निसर्गाने निर्मिलेली अति-उपयुक्त अशी जागा तयार मिळते. पावसाच्या खडकात मुरलेल्या पाण्यामुळे तेथे पाण्यासाठी टाकीहि खोदता येतात सातार्‍याचा अजिमतारा, तेथील जवळचे सज्जनगड, नांदगिरी, चंदन-वंदन असे किल्ले, पुण्याजवळचे सिंहगड, पुरंदर, विसापूर-लोहगड हे किल्ले असेच आहेत. अशा जागा सह्याद्रीमध्ये भरपूर असल्याने येथे ३५०-४०० किल्ले ऐतिहासिक काळापासून निर्माण झाले आहेत.

काही ठिकाणी खडकाच्या एकाऐवजी दोन भिंती आढळतात. असे डोंगर साहजिकच एक भिंतवाल्या डोंगरांहून अधिक उंच असतात. पुण्याजवळ पुरंदरमध्ये अशा एकावर एक दोन भिंती आढळतात. राजगडचा बालेकिल्ला, नाशिक जिल्ह्यात चांदवडच्या सभोवतालचे डोंगर ही मी पाहिलेली अन्य काही उदाहरणे. ह्या पायर्‍यापायर्‍यांच्या रचनेमुळे त्यांना स्वीडिश भाषेतील तशा अर्थाच्या शब्दावरून 'डेक्कन ट्रॅप' हे नाव मिळाले आहे.

येथे सहजच लक्षात येणारी गोष्ट म्हणजे खडकांच्या ह्या पहिल्या वा दुसर्‍या भिंती सर्व जवळपासच्या डोंगरांवर एकाच समपातळीला असतात. महाबळेश्वर आर्थर्स सीट, हरिश्चंद्रगदाच्या पश्चिमेचा कोकणकडा येथे हे स्पष्ट दिसते.

अशी रचना का झाली असावी ह्याबद्दल माझा तर्क आहे तो असा. पृथ्वीच्या पोटातील लाव्हा भेगांमधून बाहेर येऊन पसरतांना लाव्हाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या काळात कधी मऊ तर कधी अधिक कठिण अशा लाव्हांचे थर एकावर एक बसत गेले. तदनंतर हवा,पाणी, तापमानातील बदल, वर वाढू लागलेल्या वनस्पति ह्यांमुळे ह्या थरांची झीज होऊ लागली आणि तुलनेने मऊ थर धुपून जाऊन त्यांचे उतार निर्माण झाले. धुपायला विरोध करणारे कडक थर तसेच राहिले आणि त्यांच्या भिंती तयार झाल्या आणि म्हणून एका आसमंतातील ह्या भिंती एकाच पातळीवर दिसतात.

सह्याद्रीत कित्येकदा वेळा मी लाव्हाच्या थिजलेल्या बुडबुडयासारखे दिसणारे गोल आकाराचे चेंडूसारखे गोळे आसपासच्या घट्ट दगडात अडकलेले पाहिले आहेत. हे गोळे अनेक थरांचे बनलेले असतात आणि हे थर अगदी ठिसूळ असून हातानेदेखील एकमेकांपासून विलग करता येतात. लाव्हा पसरत असतांना आतील गॅसमुळे हे बुडबुडे झाले असावेत असा माझा तर्क आहे.

वर उल्लेखिलेल्या खडकाच्या दोन उभ्या भिंती आणि मधील चढाचा डोंगराचा भाग सातार्‍याजवळील ह्या चित्रात स्पष्ट दिसत आहेत. सातार्‍याच्या अजिमतार्‍याच्या जवळजवळ पश्चिम पायथ्यापासून आणखी पलीकडे दिसणार्‍या यवतेश्वर परिसराचे हे चित्र आहे. पुढचा डोंगर पहिल्याच भिंतीपाशी संपतो. मागे - न दिसणारा - अजिमतारहि असाच एक भिंतीचा आहे. उजव्या वरच्या कोपर्‍यात यवतेश्वराची पहिली आणि दुसरी अशा दोनहि भिंती दिसत आहे. डाव्या बाजूच्या सांबरवाडी नावाच्या डोंगरालाहि त्याच उंचीवर तशीच दुसरी भिंत आहे. (यवतेश्वराच्या टोपीसारख्या दिसणार्‍या दुसर्‍या भिंतीला सातार्‍याचे लोक 'बंडा' असे म्हणतात - का ते ठाऊक नाही! त्याच्यावर फूटबॉलच्या मैदानाइतक्या आकाराचे सपाट मैदान आहे नेहमीपेक्षा अधिक पाऊस एखादे दिवशी पडला तर तर ह्या बंडावरून धबधबे लागतात, सातार्‍यातून हा देखावा मोठा प्रेक्षणीय दिसतो. अलीकडे बरेच प्रसिद्धीला आलेले कासचे पठार यवतेश्वराच्या मागे आणि पहिल्या भिंतीच्या पातळीवर आहे.)

त्यापुढील चित्र चंदन-वंदन ह्यांपकी एका किल्ल्यावरून दुसर्‍याचे घेतलेले चित्र आहे. (हे ३६० अंशात फिरविता येते.) ह्या चित्रातही समपातळीवरील थर स्पष्ट दिसतात.

भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांचे आणि अन्य निरीक्षकांचे ह्यावरचे विचार वाचावयास आवडतील.

मीही वाचलेला एक भयंकर ब्लॉग

चार्ल्स डार्विन नावाच्या एका पुरुषाचा ब्लॉग मी वाचला. ब्लॉग अभ्यासपूर्ण वाटला. म्हणजे किमान लेखन अभ्यासपूर्ण आहे, हे दिसेल याची खबरदारी लेखकाने घेतलेली दिसली. या ब्लॉगवरील मजकूर धक्कादायक आहे. "सर्व माणसे (चक्क ब्राह्मण सुद्धा)पूर्वी म्हणे माकडे होती" या विषयावरीलच लेख तर भयंकरच आहेत. या विषयावर अनेक लेख ब्लॉगवर आहेत. हे लेख वाचून मला भोवळच आली. प्राचीन काळी ब्राह्मण माणसे सुद्धा माकडे होती, असे ह्याच्यातील प्रत्येक लेखात वारंवार सांगितले गेले आहे. तसा दावा करण्यात आला, असे म्हणणे अधिक योग्य राहील.

हकीम वैद्य आणि डॉक्टर..

आजच्या मुंबई मिररमधे वाचलं की आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशनने) अशी मागणी केली आहे की "डॉक्टर" किंवा "डॉ." हे बिरुद / पदवी फक्त अ‍ॅलोपथी (मॉडर्न मेडिसिन) डॉक्टर्सनीच वापरली पाहिजे. बाकीच्या वैद्यकीय पॅथीजना आपापली इनिशियल्स वापरणं बंधनकारक व्हावं.

ऑनलाईन लिंक सापडत नाहीये. छापील मिररमधे वाचलं आहे.

त्यांचं म्हणणं थोडक्यात असं की भारतात मोठ्या संख्येने नवनवे डॉक्टर्स तयार होत आहेत. यातले बरेचजण आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथीमधे पदव्या / पदविका इत्यादि घेऊन प्रॅक्टिस करतात आणि प्रत्यक्षात अ‍ॅलोपथी औषधंच लिहून / बांधून देतात.

देवपूजा

देवपूजा ही करावी की करु नये, हा चर्चेचा विषय होऊच शकत नाही. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्याला कोणी वैज्ञानिक आधार देऊ लागले तर त्याचा प्रतिवाद करण्याची प्रत्येक विज्ञानप्रेमीला मुभा असावी. त्यातही कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता ही चर्चा नक्कीच करता येईल, असे वाटल्याने मी हे आपणासमोर मांडत आहे. मला खालील मेल आल्याबरोबर, सहजपणे जे मनांत आले ते लिहिले आहे. ते अर्थातच मूळ परिच्छेदाच्या खाली आहे.

देवपूजेमागचं शास्त्र

पाने

Subscribe to RSS - विज्ञान/तंत्रज्ञान