Skip to main content

फटका हुकला नसता तर?

योगायोगानं गोष्टी घडून येतात, आणि आपण त्याचा बरेचदा विचारही करत नाही. राजाराम महाराजांच्या प्रवासाच्या निमित्तानं या योगायोगांचा घेतलेला आढावा.

वारी.....

ओढ तुझ्या भेटीची,
आज लागली या मनाला..
चरणी तुझ्या लीन व्हाया,
निघालो पंढरपुरा....

प्रत्येक श्वासात माझ्या,
तुझ्याच नामाचा गंध दरवळतोय..
टाळ-मृदंगाच्या निनादात,
जणू तूच आम्हा नाचवतोय...

डोळ्यांसमोर फक्त तुझीच छाया,
तुझीच मूर्ती जडली आहे..
पाऊल-पाऊल चालताना,
अवघ्यात पंढरी घडली आहे...

ओठांवरी ह्या नित्य अभंग,
‘पांडुरंग पांडुरंग’ जपण्यासाठी..
आसुसलेत हे डोळे माझे,
सावळे रूप पाहण्यासाठी...

आठवणींच्या विश्वात

आठवणींच्या विश्वात
आज हरवून जावेसे वाटते,
हरवलेल्या त्या क्षणांना
आज नव्याने भेटावेसे वाटते...

आयुष्यातले ते क्षण
कसे निसटले कळलेच नाही,
निसटलेल्या त्या क्षणांच्या
आठवणी कधी झाल्या कळलेच नाही...

आज वाटते पुन्हा,
त्या क्षणांत जावे
जे काही जगायचे राहिले
ते आज जगून घ्यावे...

सुखदुःखाच्या त्या प्रवाहात
आज स्वताला विसरून जावे,
हरवलेल्या त्या क्षणांना
आज पुन्हा नव्याने शोधावे...

का कळेना आज वाटते
पुन्हा आठवणींमध्ये रमावे,
आठवणींच्या वाटेवरूनी
आठवणींच्या विश्वात जावे...

वैदिक काळात: स्त्रियांची शैक्षणिक आणि राजनीतिक स्थिति

ब्रिटिश येण्यापूर्वी आपल्या देशात स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, असा प्रचार ब्रिटिशांनी आणि स्वतंत्रता प्राप्तीनंतर ब्रिटिशधार्जिण्या सरकारी तंत्रानेही सतत केला. त्यामागे समाजाला विभाजित करण्याचा राजकीय उद्देशही होता. पण सत्य कितीही लपविले तरी लपून राहत नाही. आज एआयच्या काळात जुने संदर्भ शोधणे अधिक कठीण नाही. मीही त्याची मदत घेऊन वैदिक काळातील स्त्रियांची शैक्षणिक स्थितीबाबत वेदातील उल्लेख शोधले.

कवी केशवसुत : मराठी काव्यविश्वातील नवयुगाचा पहाटवारा

कवी केशवसुत : मराठी काव्यविश्वातील नवयुगाचा पहाटवारा

रानभूल रातभूल

केतकीच्या बनातून
धूसरल्या संध्याकाळी
सळसळत येणाऱ्या
अचपळ नागिणीचा
नागमोडी डौल घ्यावा

काजव्यांनी ओथंबल्या,
झपाटल्या झाडाखाली
अंधाराला अव्हेरून
उजेडाचा कौल घ्यावा

भणाणत्या वाऱ्यावर
वेळूवनी उमटल्या
सात सुरांचा कल्लोळ
रोमरोमी झंकारावा

ऐन भरातल्या रात्री
स्फटिकाच्या तळ्याकाठी
ओंजळीत काठोकाठ
चांदण्याचा सडा घ्यावा

रातव्याची गूढ साद
भवताली कोंदताना
अदृष्टाचा पायरव
एकाएकी थबकावा

उगवतीच्या भांगात
तांबडफुटीचे कुंकू
भरताना आसमंत
किल्बिलत जागा व्हावा

खरडफळा

द्रुपालच्या नव्या आवृत्तीत खरडफळा नसल्याने रिकामटेकड्या गप्पा मारण्याची सुविधा नाहीशी झाली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आता मोडून काढण्यासाठी हा खरडफळा हा धागा म्हणून काढलाय!!
मंडळी , रिकामटेकड्या गप्पा मारायला या . खरडफळ्याचे गतवैभव परत आणा.
नबा यांच्याशी गप्पा झाल्या नाहीत बऱ्याच दिवसात ..

फक्त हत्ती क्षमस्व !!
बाकी सगळे या
चालक मालक मंडळी - एवढे चालवून घ्या आमचे !!

अव्या, बाज्या आणि मी

१.अव्या
काळजात चांदणे घेऊन उन्हातानाची पर्वा न करता वाऱ्याबरोबर फिरण्याच्या वयात अविनाश म्हणजे अव्या माझ्या आयुष्यात आला. आला म्हणजे शब्दशः धाडकन दार आपटत घरात आला आणि जणू काही फारच घसटीची ओळख असल्याप्रमाणे म्हणाला, "चल, बाहेर चल."मी म्हटलं- कशाला तर म्हणे की "तुला काय करायचंय ? चल म्हणतो ना, मग चल! " मी कॉलेजचा अभ्यास, सबमिशन का असंच काहीतरी करत होतो म्हणून नाही म्हणून म्हटले ," कुठे जायचे ते सांग आधी , नाहीतर नाही येत." तर त्यावर ,"तू असाच मरणार, बस एकटाच घरात अंडी घालत " असे म्हणून फारसे मनावर न घेता आला तसा निघून गेला.

AIचा घो(र)

चौदा विद्यांच्या वाचस्पतींनो
चौसष्ट कलांच्या कलानिधींनो
गानगंधर्वांनो, भसाड्यांनो
चित्रकारांनो, रंगाऱ्यांनो
सिद्धहस्त लेखकांनो, कळफलकबडव्यांनो
कवींनो, कवड्यांनो
वैद्यराजांनो, वैदूंनो
नटवर्यांनो, साजिंद्यानो
विचारवंतांनो, प्रचारवंतांनो
कोतवालांनो, ठकसेनांनो
वलयांकितांनो, ट्रोलभैरवांनो
बेलकर्व्हवरील डाव्या-उजव्यांनो
बेलकर्व्हच्या मध्यावरील बेसुमार सुमारांनो
शुभ्रधवलांनो, काळ्याकुट्टांनो, अधल्यामधल्या कृष्णधवलांनो
सावध ! AIका AIच्या हाका
जुनी चंगळ संपली बर्का!
Plan B तय्यार ठेवा पक्का
नैतर वर्मी बसेल धक्का