आणि मग..!!
आणि मग
च्याटवर चुरू चुरू बोलते ती बरंच बरंच
वाईट साईट नाही ...दोस्ती टाईपचंच खूप काही .
आणि दोस्तीची तिसरी परीक्षा पास झाल्यानंतर
तो देऊन टाकतो त्याचा मोबाईल नंबर थेट
ती स्वतःचा नंबर मात्र अजूनही गुलदस्त्यात राखून ठेवते
तो बघतो वाट फोनची
एक दोन पाच पंधरा दिवस ..आणि पुढेही अधून मधून
जागताना ...निजताना ..
ती आठवणीने आणि अधिकच निगुतीने
स्टोर मात्र करून ठेवते त्याचा तो नंबर
आणि मग बर्याच दिवसांनतर ...तिला वाटतं म्हणून
फटकन फिरवते त्याचा तोच सेव्ह्ड नंबर
म्हणते ...हं मी अमूक अमूक ....बोल काहीतरी ..
त्याला आधी झेपतच नाही ..तो टोट्टल ब्ल्यांक
आणि मग तर थिजून एकगठ्ठा बर्फ
काही न सुचून तो हं हं..हु हु करतो ..
नंतर फोन करतो म्हणून फोन ठेवून घाम पुसतो
आणि तिच्या रिझर्व फोन मधून तिचाच आवाज उमटतो
उलटेल सगळं एक दिवशी .
प्रतिक्रिया
एक प्रश्न
"रिझर्व फोन" म्हणजे काय ?
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.