Skip to main content

मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - १०३

Questions issues queries problems

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 30/09/2019 - 04:39

साहित्य संमेलन हा प्रकार कोणाला आणि कितपत गंभीर वाटतो? अपवाद - बारक्या गावांत किंवा मोठ्या शहरांजवळ नसलेल्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे संमेलन भरतं तेव्हा स्थानिकांना सहज पुस्तकं खरेदी करता येतात; हा फायदा मला माहीत आहे.

'न'वी बाजू Mon, 30/09/2019 - 06:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अपवाद - बारक्या गावांत किंवा मोठ्या शहरांजवळ नसलेल्या तालुक्याच्या ठिकाणी वगैरे संमेलन भरतं तेव्हा स्थानिकांना सहज पुस्तकं खरेदी करता येतात; हा फायदा मला माहीत आहे.

पण मग त्याकरिता साहित्यसंमेलन कशाला पाहिजे? बुकसेलरांचा मेळावा भरवावा की त्याकरिता!

गवि Mon, 30/09/2019 - 08:37

In reply to by 'न'वी बाजू

तेच की, म्हणजे गावकऱ्यांना बुंदी भात मिळावा म्हणून लोकांनी लग्ने करावीत असं म्हटल्याप्रमाणे आहे ते. महाग लागतं प्रकरण.

मनीषा Mon, 30/09/2019 - 08:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

साहित्य संमेलने/मेळावे जरूर आसावेत असे वाटते. त्याचे स्वरूप अधिक रंजक, अधिक लोकाभिमुख असायला हवे.

वर्षातून एखाददूसऱ्या वेळी असण्याऐवजी अनेक वेळा, वेगवेगळ्या निमित्ताने असायला काय हरकत आहे?
त्यात चर्चा, भाषणां शिवाय स्पर्धा, सादरीकरण, इ. प्रकाराने वाचकांना, नवोदित साहित्यिकांना सहभागी व्हायची संधी असावी. पुस्तक विक्री सोबत पुस्तक परिचय, त्यावर बोलण्याची , ऐकण्याची संधी द्यावी.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी पुण्यात "कविता पानोपानी" नावाचा एक सुंदर प्रयोग पाहिला. कुसुमाग्रजांच्या कवितांचे संगीत, नृत्य आणि नाट्यमय सादरीकरण केले होते. असं काही केले तर साहित्य संमेलन म्हणजे काहीतरी क्लिष्ट, कंटाळवाणे असणार हा समज दूर होईल कदाचित.

चिमणराव Mon, 30/09/2019 - 10:48

सासंची वाट पाहणारे कविच जास्त असतात. त्यांना ऐसी/मिपा/माबो माहीत नसावीत. केव्हा एकदा एकेक ओळ दोन दोनदा वाचून*1 टाकतो/ते असं झालेलं असतं.
आपल्या कवितेतील विषय प्रगल्भ, संवेदना टोचक असतात त्या तळागाळापर्यंत वेळेवर पोहोचल्याच पाहिजेत यावर ठाम.

#1. कशी आली ही पद्धत? गाणारे कविही दोन तीन टक्के असतात.

अस्वल Tue, 01/10/2019 - 04:09

मीटप,कट्टे, बुक क्लब्स, पुस्तक प्रदर्शनं, लेखक तुमच्या भेटीस, मुलाखती, ब्लॉग्स, संस्थळं(घ्या!) फेसबुक लाईवच्या जमान्यात वर्षातून एकदा संमेलन भरवण्यामागचं सखोल तत्वज्ञान एकदा साहित्य संमेलन कमिटी का काय जे कुणी असतील त्यांनी सांगायला पाहिजे.
हे मराठीत "साहित्य" स्तोम बंद केलं पाहिजे. नसते उद्योग च्यायला. लिहणारे लिहितात वाचणारे वाचतात. ही खोंडं कशाला मधे?
काहीतरी पुन्हा जीवन, मूल्यं, समाज असले निव्वळ चोथा झालेले शब्द फेकून काय फायदा
?

चिमणराव Tue, 01/10/2019 - 05:35

काहीतरी पुन्हा जीवन, मूल्यं, समाज असले निव्वळ चोथा झालेले शब्द फेकून काय फायदा

- हे फक्त अध्यक्षांच्या दीड तासाच्या भाषणात.
पुस्तक विक्री, कविता वाचन ,कथाकथन,करमणूक स्थानिक कलाकारांकडून असते. खर्च ? नगरपालिका करते. म्हणजे सरकारी मदत नसली तरी चालणारं आहे. खाद्पदार्थ ठेले (शेगाव कचोरीसह) मुख्य आकर्षण म्हणता येईल इतकी गर्दी.

अबापट Tue, 01/10/2019 - 11:12

मी एकाच संमेलनाला गेलो.शाळकरी होतो.
पुण्यात गरवारे कॉलेज ग्राऊंडवर मोठा मंडप वगैरे.
पुलं वगैरे.अध्यक्ष भावेंनी संमेलनापूर्वी चातुर्वण्य जाहीर समर्थन केलं होतं.त्यामुळे निदर्शने, भाषणे, उधळणे ,डावे, सोशालिस्ट ,उजवे, अतिउजवे वगैरे. उत्तररात्री एक मोर्चा, ज्यात मी पण गंमत म्हणून सामील झालो होतो.आमचे शाळेतील एक सर त्यात पुढाकार घेऊन होते. मला ते पँथर चे वाटत होते.पण मला मित्राने त्यांची टोपी दाखवून ते संघाचे आहेत हे सांगितले.
हे सगळं ,अतिशय सभ्यपणे.. दगड वगैरे नाही.
धमासान भाषणे वगैरे.
मजा आली. असली खरी संमेलने पाहीजेत.
साधी आणि जिवंत .

गवि Tue, 01/10/2019 - 16:13

समजा अबक या राज्यात, उदा. एका पुरुषाला किंवा स्त्रीला दोन कायदेशीर विवाह करण्याची मान्यता आहे. बाकी राज्यांत (डइफ, हळक्ष, गडब, नगण, लमण) एकास एक हेच कायदेशीर आहे. दुसरे रीतसर कायदेशीर लग्न करण्यास मुभा नाही.

एके दिवशी देशाचं सरकार एक अधिसूचना किंवा काहीतरी, जे कोर्टात अपील करणेबल आहे, असं काढून अबक राज्यातही एक व्यक्तीस एक विवाह असा नियम आणते. हा नियम बदलल्यास भयंकर दंगल होईल असं आधीपासून बोलत असलेल्या लोकल पुढाऱ्यांना सरकार ताब्यात घेतं. त्यांचं मत विचारात न घेण्यासाठी चालूगिरी करुन काहीतरी कायदेशीर पण आदर्श नसलेली पळवाट काढतं. कारण या मूळ नियमाला सरकारची हरकत असते.

आता या action ला विरोध करायचा आहे. जो अगदी रास्त असू शकेल. तर खालीलपैकी कोणते मुद्दे योग्य?

१. एका व्यक्तीला दोन लग्ने करायला उदा. पुरुषांच्या दुप्पट स्त्रिया जन्माला यायला हव्यात. साध्या निसर्ग नियमाने सिद्ध होतं की असं घडणं शक्य नाही

२. गेल्या चाळीस वर्षात या राज्यात एकाहून अधिक विवाह करणाऱयांचं प्रमाण नगण्य आहे.

३. हीच द्विभार्या पद्धत लमण, डईफ या इतर दोन राज्यांतही आहे. त्यांचं आधी काय ते बघा. ते बरं चालतं.?

४. अबक येथील लोकांना काय हवंय ते विचारलं गेलं नाही

५. अबक राज्यात द्विभार्या पद्धत बंद करणं हा त्यांचा विश्वासघात आहे. पूर्वी त्यांना वचन गेलंय.

६. कडइ राज्यात ही पद्धत नसूनही तिथे घटस्फोटाचं प्रमाण अबक राज्यापेक्षा जास्त आहे.

७. स्त्रीआरोग्य या घटकाची तुलना करता अबक हे तीन राज्यांपेक्षा सरस आहे.

इत्यादि

की

अ. द्विभार्या पद्धत इटसेल्फ as अ पद्धत योग्य न्याय्य आहे का?
ब. एका देशात काही राज्यांत वेगळी मुभा असणं, हे योग्य / अयोग्य.
क. या कायद्याचे फायदे आणि तो बंद केल्यास भविष्यात होणारे तोटे

याबद्दल मांडणी करणं जास्त योग्य?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/10/2019 - 06:08

In reply to by गवि

असे thought experiments भौतिकशास्त्रात शिकवतात. ते तिथे उपयुक्त वाटतात. कारण माणसांची आपसांतली देवाणघेवाण, न्याय, नीती, भावना अशा कुठल्याच गोष्टी तिथे आड येत नाहीत. शिवाय, घटस्फोटाचं प्रमाण जास्त असल्यामुळे नक्की काय फरक पडतो - समजा घटस्फोटाचं प्रमाण जास्त असल्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, सज्ञान लोकांत आनंदी असण्याचं प्रमाण वाढतं पण मुलं सतत फोनमध्ये तोंड खुपसत कुढी बनतात; स्त्रियांचं आरोग्य चांगलं आहे, हे नक्की कोणी ठरवलं आहे, असे गुंतागुंतीचे प्रश्न भौतिकशास्त्रात आड येत नाहीत.

गवि Tue, 01/10/2019 - 20:28

In reply to by चिमणराव

एका दिवशी एका क्षणी? तंतोतंत एकच कायदा आणि पार्श्वभूमी नसेल प्रत्येक राज्यात तरीही?

आणि तरीही योग्य असेल एकावेळी बंदी, तर तो मुद्दा पाळला की बाकी ठीक?

चिमणराव Wed, 02/10/2019 - 07:26

Chrome homepageवर आठ साईट्स राहतात. ( OS 8.0.0 ) नेहमी लागणाऱ्या पटकन उघडता याव्या यासाठी.
१) बुकमार्कांच्या यादीतून हवी ती साईट इथे homepageवर कशी ढकलायची? (गुगलून झालय पण दिलेले पर्याय येतच नाहीत.)
२) बुकमार्कांच्या यादीतून हवी ती साईट खालीवर करता येते का? नवा केलेला बुकमार्क शेवटाला जातो तो वर आणायचा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 02/10/2019 - 19:27

In reply to by चिमणराव

दुसऱ्या प्रश्नासाठी - ती साईट सतत उघडत राहा. हळूहळू वर यावी ...

खरं तर, क्रोम वापरण्यापेक्षा फायरफॉक्स वापरा; गूगलला आपली सगळी विदा देण्याची गरज नाही.

सामो Thu, 03/10/2019 - 01:09

In reply to by चिमणराव

बुकमार्कांच्या यादीतून हवी ती साईट खालीवर करता येते का? नवा केलेला बुकमार्क शेवटाला जातो तो वर आणायचा आहे.

ड्रॅग & ड्रॉप.

चिमणराव Thu, 03/10/2019 - 05:25

In reply to by सामो

माझ्या फोनात तरी 'ड्रॅग & ड्रॉप' चालत नाही, इतर पर्यायही दिसत नाहीत.
फायरफॉक्समधले page >view as HTML source उपयुक्त. असले वेगळे app घेऊन HTML कोड पाहायला नको.

चिमणराव Wed, 02/10/2019 - 20:23

फायरफॉक्सवर गेलो. तिकडे आहे pin site हा पर्याय. क्रोममध्ये हा नाही. आजपासून फायरफॉक्स.
----
Amazon , flipcart या साइटस क्रोमवर उघडल्या की शोधलेल्या वस्तुंचे पर्याय येत राहतात. EDGE वापरतो.

चिमणराव Thu, 03/10/2019 - 05:15

सोडून दिलं (unfollow)की वाचतो. साधारण महिन्याने उघडतो. पण १५ - ५५ वयोगटांतल्यांनी असा अकाली सन्यास घेऊ नये. माझं ठीक आहे, असंही मला टाळतातच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/10/2019 - 22:11

इतर कुठे चर्चेत हा विषय आला म्हणून. खालचं चित्र पाहा; पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. छान आहे ना चित्र, नेत्रसुखद वगैरे? संपूर्णपणे खोटं आहे, GAN (generative adverserial networks) ग्यान तंत्रज्ञान वापरून बनवलेलं आहे.

ह्या विषयात रस असेल त्यांच्यासाठी हे पाठ्यपुस्तकही उत्तम आहे. (माहितीची देवाणघेवाण - मी फक्त सुरुवातीचे ७ धडे वाचले आहेत.)
डीप लर्निंग ग्यान

तिरशिंगराव Tue, 08/10/2019 - 17:07

दसऱ्याला दाराला तोरण लावतात, हे बघत आलो आहे. पण कार वा स्कूटरला हे तोरण का लावतात ? नक्की, कुठल्या प्रकारचा मानसिक आनंद मिळतो त्यांत ? यंत्र, शस्त्र, वा अन्य विज्ञानाने दिलेल्या वस्तुंची पूजा करुन आपण विज्ञानावरच अविश्वास नाही दाखवत?
आपले संरक्षणमंत्री राफेल ची पूजा करायला गेले आहेत, म्हणून हा प्रश्न!

अभ्या.. Tue, 08/10/2019 - 18:51

In reply to by तिरशिंगराव

पण कार वा स्कूटरला हे तोरण का लावतात ?

भारी वाटते, भारी दिसते स्वच्छ चकचकीत धुतलेली गाडी, त्यावर कुंकवाचे ठिपके, गच्च झेंडु. एकच लंबर सीन असतो. कारला मात्र वायपरला अज्याबात लावायचा नाही हार, मध्ये एकाच्या गाडीला लावलेला हार गायीने खाताना हाराला असा हिसडा दिला की वायपरच बाहेर आला.
दसऱ्यालाच नायतर अधे मधे पण दिवाळी, पाडवा वगैरेला असल्या गोष्टी करत असतो (सांगितलेले बरे, नायतर म्हनताल दररोज का करत नाही? रोजरोज परवडत नाही हेही कारण आहे.) ह्यात विश्वास अविश्वास काय?

सामो Tue, 08/10/2019 - 19:43

In reply to by अभ्या..

>>>> मध्ये एकाच्या गाडीला लावलेला हार गायीने खाताना हाराला असा हिसडा दिला की वायपरच बाहेर आला.>>>> आई ग्ग!!! हे बरं सांगीतलत अभ्या.उत्तम

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/10/2019 - 23:43

In reply to by तिरशिंगराव

तोरण लावलं की राफेलचा घोटाळा अनंधश्रद्ध लोक विसरतात आणि तोरणाबद्दल बोलत बसतात. स्कूटरला तोरण लावलं की हाफीसात केलेला घपला असाच पचतो. अंधश्रद्ध लोक तसेही घपल्याकडे बघत नाहीतच आणि तोरणाकडे बघून खुश होतात!

सगळं चान चान होतं.

अबापट Wed, 09/10/2019 - 07:31

In reply to by गवि

छे छे, घोटाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहेत.
फक्त डोक्यावर 59000 कोटी रुपयांचे कर्ज असणाऱ्या, आणि विमान सोडा ,सायकलच्या चाकाचे नट बोल्ट ही उत्पादन करण्याचा अनुभव नसणाऱ्या उद्योगपतीला या उपद्व्यापाचा भाग बनवणं हे नक्कीच मेक इन इंडया साठी असणार .
कर्जात बुडालेल्या, कुठलेही प्री क्वालिफिकेशन नसलेल्या, आणि (लोकांच्या पैशावर) फसलेले धंदे करण्याचा इतिहास असणाऱ्या माणसाचा सहभाग वगैरे यात घोटाळा नक्की नसणार.
बाकी विमानविषयक आहे त्यामुळे तुमचे म्हणणे मान्यच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 09/10/2019 - 08:04

In reply to by अबापट

'राफेल'चा घोटाळा झालाच नसेल तर काश्मिरात लोक सर्पदंशासारख्या "छाटछूट" कारणांनी मरत आहेत, त्यावरून परदेशी माध्यमं भारताची छीथू करत आहेत; मंदीचं सावट आहे; झालंच तर शब्दशः जुनी मढी उकरून पहलू खाननं "आत्महत्या" का केली; डॉ. काफील खानची माफी मागितली का... हे सगळं सोडून लिंबू-मिरचीछाप न-मुद्दयांबद्दल बोलण्याचं काहीही कारण नाही.

लिंबामुळे कुणाचं नुकसान होत नाही, ना तो २-जी घोटाळा ठरत! असल्या निर्धोक अंधश्रद्धांना उगाच भाव देणं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं आहे. ते करणं सध्याच्या सरकारच्या पथ्यावर पडणारं आहे. त्यामुळेच त्याच्या बातम्याही होत आहेत. ह्याला बळी पडणं ही आधुनिक अंधश्रद्धा म्हणता येईल - सरकारच्या प्रत्येक हगल्यापादल्या कृतीकडे लक्ष देऊन स्वतःच स्वतःला ट्रोल करून घेणं!

गवि Wed, 09/10/2019 - 11:57

In reply to by अबापट

आणि विमान सोडा ,सायकलच्या चाकाचे नट बोल्ट ही उत्पादन करण्याचा अनुभव नसणाऱ्या उद्योगपतीला या उपद्व्यापाचा भाग बनवणं

हे पटलं. HAL या अनुभव असलेल्या एकमेव कंपनीशी जुळणी होऊ न शकल्यावर किमान फायटर विमान नाही तर ट्रक किंवा सायकल बनवणारी कंपनी तरी प्राधान्याने निवडायला हवी होती. राईट बंधू नव्हते का आगोदर सायकली दुरुस्त करत.. आणि ज्याची एकही कंपनी कर्जबाजारी किंवा तोट्यात नाही असा मालक निवडायला हवा होता. इथे तर अगदी चिवडा बनवण्याचा अनुभवही पाठीशी नसलेली कंपनी निवडली आहे.

नितिन थत्ते Wed, 09/10/2019 - 12:42

In reply to by गवि

सहमत आहे. एच ए एल नाही म्हटल्यवर विमान निर्मितीचा अनुभव असलेली कंपनी भारतात नसणारच. मग दुसरी कंपनी निवडायची तर ती कुठलीही का असेना? भले चिवडा बनवणारी असो. (दुर्दैवाने तो ही ती कंपनी बनवत नव्हती). कोणती ही कंपनी सारखीच म्हटल्यावर नेमकी विशिष्ट कंपनी निवडली जाणे हा योगायोगच असू शकतो.

बरं तेव्हा ती कंपनी निवडली होती तर आता त्या ग्रुपच्या सर्व कंपन्या दिवाळाखोरीत जात असताना त्य कंपनी ऐवजी दुसरी कंपनी ऑफसेट पार्टनर म्हणून शोधण्यास दसॉने सुरुवात केली आहे का हे पहायला हवे.

अनुप ढेरे Thu, 10/10/2019 - 09:49

In reply to by नितिन थत्ते

- ऑफसेट फक्त अनिल अंबानीच्या कंपनीला मिळणार आहेत हे खोटं आहे. एक दोन डझन कंपन्यांना मिळणार आहेत.
- पिपावाव डिफेंस ही जहाज बांधणी कऱणारी कंपनी विकत घेऊन ती आता रिलायंस डिफेंस या नावाने ओळखली जाते. पिपावाव सैनिकी जहाजे बांधते.
- अनिल अंबानी फेल्ड बिझनेसमन आहे याच्याशी सहमत.

धर्मराजमुटके Wed, 09/10/2019 - 16:06

ऐसीची सध्या काय स्थिती आहे ? बरेच दिवसांनी इकडे येणे झाले. इकडे एकूण किती सदस्य आहेत ? कधीही बघीतलं की ३-४ च्या वर सदस्य दिसत नाहीत. हे बदलायला हवं आहे असं मनापासून वाटते.
काय करता येईल ?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 11/10/2019 - 02:52

In reply to by अस्वल

हा प्रश्न कसा सोडवायचा हे मला अजिबातच माहीत नाही.

व्हॉट्सॅप विद्यापीठात शोभतील असे ज्ञानवर्धक लेख, फेसबुकवर वा-वा-चान-चान म्हणवलं जातं असं ललित, किंवा मराठी आंजावर जुन्या झालेल्या NRI विरुद्ध भारतात राहणारे, आस्तिक वि. नास्तिक, सध्याच्या मारामाऱ्यांतल्या भक्त विरुद्ध द्वेष्टे, किंवा अडाणी विरुद्ध शिकलेले, करुणाहीन विरुद्ध सहृदय अशा मारामाऱ्या चिकार चालतात. तेच पुन्हा ऐसीवर वाचावं का?

माझं ह्याबद्दल सध्या तरी काही मत नाही. मी काय आणि का वाचते, ह्याबद्दल थोडक्यात लिहू शकते -

पाचेक मिनीटं टाईमपास करायचा असेल तर फेसबुकवर लोकांनी घातलेले राडे वाचते. त्यावर मी काही बोलत नाही. सकाळी उठल्याउठल्या व्हॉट्सॅप पाहते - पण तिथे फक्त जवळचे लोकच आहेत, त्यामुळे बहुतेकदा कामाचे निरोप किंवा अत्यंत बकवास विनोद - ज्यावर हसू येतंच, असं काही असतं. फायरफॉक्सची नवी टॅब उघडल्यावर तीन लिंकाच्या शिफारशी येतात, वेळ असेल तर मी ते वाचते. बाकी न्यूयॉर्कर, जमल्यास टाईम साप्ताहिक वाचते. उरलेलं फार काही वाचायला वेळ नसतो.

मी हौशीखातर कायकाय लिहिते -
दर आठवड्याला 'लोकसत्ता'चा रतीब टाकावा लागतो. त्यापलीकडे काही लिहिण्यासाठी फार उत्साह उरत नाही. मग विनोदांची उबळ येते ती भागवण्यापुरतं फेसबुक किंवा खरडफळ्यावर लिहिते.

माझ्या दृष्टीनं सगळं गॉसिप फेसबुकवर चालतं; व्यक्तिगत निरोपानिरोपी व्हॉट्सॅपवर; महत्त्वाचं काही, जे कदाचित आणखी आठवड्यानंही उकरून काढावं लागेल ते इमेलवर. मुद्दामून लोकांसमोर लिहावं असं काही असेल तरच ते ऐसीवर लिहिते.

व्यक्तिगत माझा निर्णय असा असतो - जे काही लिहिण्यासारखं महत्त्वाचं वाटतं तेवढंच मी ऐसीवर लिहिते. ते खूप असतं असं नाही. बराच काळ काही विस्कळीत विचार करते, तेव्हा काही मुद्दाम लिहिण्यासारखं तयार होतं.

त्यातूनही स्त्रीवादाबद्दल काही लिहिलं की तेच-ते-नेहमीचे अनभ्यस्त ट्रोल येऊन अडाणचोटपणा करत पकवणार; ट्रोलांना फटकावून काढलं की उदारमतवाद्यांना पुन्हा त्यांचा कळवळा येणार; ह्यांतलं एक किंवा दोन्ही सहन करावं लागणार! मग जेवढं जास्त विचार करून, गोळीबंद लिहिता येईल तेवढं बरं असतं; किमान त्यातून मलाच ट्रोलिंगचा उपद्रव कमी होतो.

मग कदाचित असंही असेल की स्त्रीवाद हा प्लेसहोल्डर ठरेल. सगळ्याच विषयांत जर अनभ्यस्त ट्रोलांचा उपद्रव असेल तर शहाणेसुरते लोक कमी लिहिणार; त्यातून ट्रोल लोकप्रिय असतील तर विचारूच नका. तसं असेल तर ट्रोलिंग दिसल्यावर लगेच त्यांना गप बसवलं तर अभ्यास करून लिहिण्याची इच्छा टिकून राहील. ट्रोलिंग बघावं, ट्रोलाकडे बघू नये; आपल्या सग्यासोयऱ्यांनी ट्रोलिंग केलं तर त्यांनाही दम द्यावा.

कासव Fri, 11/10/2019 - 07:48

In reply to by धर्मराजमुटके

मीही माझ्यापुरतं सांगू शकतो. तेही अस्वलांनी चिमटा काढल्याने आणि म्याडमचा प्रतिसाद पाहिल्याने बोलावंसं वाटतंय. मला ललितेतर साहित्ययात रस आहे. त्यामुळे बाकीचं कविता सोडता वाचत नाही. मला रोजच्या दैनिक कामातून फारसा वेळ भेटत नाही. भेटलाच चुकून तर व्हाट्स अप पाहण्यात त्यातही स्टेट्स पाहण्यात तो खर्ची पडतो. ऐसीकडे मी ज्ञानवर्धक आणि विचारसमृद्ध अशा चर्चांचं व्यासपीठ समजतो. पण आता महितीप्रधान लेख फार कमी येत असल्याने फारसं लक्ष जात नाही. एकदम हटके काही आलं की ते वाचलं जातं. मात्र विचारात, माहितीत किंवा अनुभवात नावीन्यता आली नाही की तिकडे दुर्लक्ष होतंच होतं.

मला आठवतंय की, मी ऐसीकडे पहिल्यांदा वळलो तो पॉर्न विशेषांकामुळे. तो हटके होता. मी नियमित लोकसत्ता वाचत असल्याने त्याची प्रथम जाहिरात मी लोकसत्तातच वाचली. मला ऐसीचा तो अंक फार भावला होता. पण वाचनाची फारशी क्षमता माझ्यात नसली तरीही ती माझ्यात त्या विशेषांकामुळे निर्माण झाली. पण अस्वल म्हणतात तसा माझाही रसभंग झालाय. पण हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. चर्चेतील विषय, विचारही नवीन होते. त्यामुळे मला ऐसीचं वेगळेपण लक्षात आलं. ऐसीमुळेच इतर ब्लॉगचीपण माहिती झाली. पण आजही ऐसीची वेगळी छटा जाणवते. पण पहिल्यासारखी आता जाणवत नाही. विसंवादाला मी कचरापेटी म्हणणार नाही. कारण अशी भांडणंदेखील माझ्यासाठी नवीन आणि फायद्याची वाटत आहेत. विसंवाद वाचताना जो रस तयार होतो तो बाकीच्या वाचनातून भेटत नाही हे अनुभवलंय. असो.

आवर्जून लिहावंसं वाटलं नाही तरीही लिहिलं गेलं तरीही हरकत नसावी. पण लेखनशक्ती आटू देऊ नये. थोडंसं लिहिण्यातून जास्ती लिहिण्याची एकवेळ प्रेरणा तरी मिळेल. मात्र काहीच न लिहिण्यातून (म्याडमच्या भावना सोडता) काहीच साध्य व्हायचे नाही.

अभ्या.. Fri, 11/10/2019 - 15:50

In reply to by धर्मराजमुटके

ऐसीची सध्या काय स्थिती आहे ?

ॲक्चुअली पोपट मेलाय की त्याचा मल्टीपल डिसऑर्डर्ड हत्ती झालाय हे चेक करायला हवे.
सांगण्याआधी कळले तर बरेच बरे आहे.

सामो Fri, 11/10/2019 - 16:51

In reply to by धर्मराजमुटके

खरड फळा काढुन टाका. त्याच्यामुळे व्यक्त होण्याचे पोट भरतय. काय जे व्यक्त व्हायचे ते व्यासपीठावरती व्हा.

अभ्या.. Fri, 11/10/2019 - 17:02

In reply to by सामो

काय जे व्यक्त व्हायचे ते व्यासपीठावरती व्हा

व्यक्तच होत नाहीत ना, व्यक्त व्हायला कुणी येतच नाहीत नाही ना, नवीन कुणी आले तर परत यायचे डेरिंगच करत नाही ना कारण इथे आधिचे व्यक्त झालेले आहे का व्यक व्यक झालेले ते समजतच नाही ना.
मग व्यासपीठ असो की खरडफळा.
असु दे फळा, निदान खरडफळ्याची शेपूट वळवळतेय तरी थोडी तोपर्यंत येऊ.

अस्वल Mon, 14/10/2019 - 23:58

भक्त किंवा लिबरल वगैरे फालतूगिरी सोडून सोडा.
पण सध्या (भारत) सरकार कुणीही विरोधात काही बोललं, आकडेवारी पुढे केली, विदा/माहिती सांगून काही मुद्दे मांडले तरी हसून "हे खरं नाहीच्चे मुळी" असं म्हणून मुळात मुद्दाच नाकारून टाकतात.
हे सगळं फार बालीश आणि वाळूत तोंड खुपसून घेणाऱ्या शहामृगासारखं वाटत नाहीये का?
परवा मंत्री म्हणाले की म्हणे कसली मंदी? चित्रपटांनी १२० कोटी कमावले एका दिवसात.
हे स्पष्टीकरण आहे? खरंच?

सरकारची मुन्नाभाई प्रॉब्लेम सॉल्विंग पद्धत बघून काहीतरी भयानक चुकतंय असी भीती वाट्टेय राव. (ती खोटी ठरो ही हस्तरचरणी प्रार्थना)

नितिन थत्ते Tue, 15/10/2019 - 07:52

In reply to by अस्वल

श्री पी प्रभाकर* यांचा हिन्दूमधील लेख.

https://www.thehindu.com/opinion/op-ed/a-lodestar-to-steer-the-economy/…

*हे ग्रुहस्थ विद्यमान अर्थमंत्र्यांचे पती आहेत.

बाकी लेखात म्हटल्याप्रमाणे भाजपचे अर्थविषयक धोरण नेहरुवियन सोशालिझमवर टीका करण्याच्या पलिकडे गेले नाही. आणि ते त्या धोरणावर टीका करत असले तरी मोदी सरकारचे धोरण "फुकट गॅस कनेक्शन, फुकट वीज कनेक्शन, फुकट टॉयलेट" अशा प्रकारचे - ज्यासाठी काँग्रेसवर टीका केली तसले पॅट्रनायझिंगचे- आणि स्टेटिस्ट (स्टेट विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग) राहिले आहे. [बाजपेयींचे सरकार बऱ्याच समाजवादी लोकांचा सरकारात सहभाग असूनही या सरकारपेक्षा अधिक इकॉनॉमिकली लिबरल होते).

या सरकारने केलेली एकमेव रिफॉर्मिस्ट गोष्ट म्हणजे पेट्रोल डिझेल दरांचे डीरेग्युलेशन. पण त्यात रिफॉर्मिस्ट प्रेरणेपेक्षा मालकाचे हित हे कारण होते.

बँक्रप्सी कायदा आणला हेही एक चांगले काम केले. पण ते रिफॉर्म नसून बेशिस्तीला आळा घालणे होते. (हे काही प्रमाणात सध्याच्या स्लोडाउनचे कारण असले तरी ती योग्यच गोष्ट या सरकारने केली आहे).

अस्वल Wed, 16/10/2019 - 00:50

In reply to by नितिन थत्ते

लेखातला आणखी एक मुद्दा -
२००४ च्या निवडणूकांत भाजपाने "विकास"मुद्द्यावर आधारित इंडिया शायनिंगची मांडणी केली- ती अंगलट आली.
तेव्हा यावेळी २०१९मधे सरकारने जाणूनबुजून विकासावर मतं मागितली नाहीत (ती तशी मागता आली असती का हा वेगळा मुद्दा, पण मार्केटिंगचे सम्राट असलेल्या मोदींनी ती रिस्क घेतली नाही).
२०१९ ची निवडणून अर्थमुद्द्यांपासून लांब - पाकिस्तान, बालाकोट, उरी, राष्ट्रवाद अशा सेफ गोष्टींवरच आधारीत ठेवली.
----

तवलीनसिंग, सदानंद धुमे आदी लोक २०१४मधे भाजपाच्या आर्थिक मुद्द्यांबाबत अतिशय आशावादी होते. आता अशा मंडळींचा 'आधी होतं ते काय वाईट?' म्हणण्याइतपत भ्रमनिरास झाला आहे

नगरीनिरंजन Wed, 16/10/2019 - 14:02

In reply to by अस्वल

ज्या माणसाच्या शैक्षणिक पात्रतेचा पत्ता नाही; ज्याचा इकॉनॉमिक सीस्टिम्सचा अभ्यास असल्याचा कोणताही पुरावा नाही; ज्याने गुजरातमध्ये असं काही राबवलं असल्याचा इतिहास नाही अशा माणसाला त्याच्या नावावर मत देणाऱ्या लोकांनी शुद्ध कॅपिटॅलिझम आणावा म्हणून निवडून दिले आणि हा माणूस अत्यंत विशुद्ध अशी भांडवलशाही राबवेल असा ह्या कॉलमनिस्टांचा भ्रम होता की काय? भ्रमनिरास व्हायला सहा वर्षं लागण्यासाठी भ्रम तरी जरा सेन्सिबल हवा ना.

चिमणराव Wed, 16/10/2019 - 21:48

In reply to by नगरीनिरंजन

ममोसिंग यांचा इकॉनॉमिक सीस्टिम्सचा अभ्यास होता पण अधिकारीवर्ग आणि राजकीय नेते हे दोन वेगळे प्रकार आहेत.

अस्वल Wed, 16/10/2019 - 22:17

In reply to by नगरीनिरंजन

२०१४ निवडणूकांमधे जेव्हा मोदी त्यांच्या "गुजरात मॉडेलचा" हवाला देत होते तेव्हा पी. साईनाथांनी तथाकथित गुजरात मॉडेलचं (आणि पर्यायाने मोदींचं) वर्णन "the biggest public relations con job of our time" असं केलं होतं.

तेव्हा पी.साईनाथ हे आद्य राष्ट्रद्रोही ठरावेत.

नितिन थत्ते Thu, 17/10/2019 - 20:04

In reply to by अस्वल

च्यायला २०१०-११ मध्ये मी गुजरातमध्ये रहात होतो आणि महाराष्ट्रापेक्षा काही अलौकिक विकास गुजरातमध्ये झाला असल्याचे मला दिसत नाही असे मी आंतरजालावर लिहित असे तेव्हा पुण्यात बसून गुजरात मॉडेलचा हवाला देणारे आंतरजालावरचे अनेक लोक मला दोष देत होते.

ओंकार Wed, 16/10/2019 - 12:18

In reply to by नितिन थत्ते

इतके सगळे फुकट करून देखील रागा अजून हेच म्हणतायत.

मोदी हे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर

- ओंकार.

नगरीनिरंजन Thu, 17/10/2019 - 09:42

In reply to by ओंकार

मोदींच्या फुकट देण्यावर लेख लिहायचा झाला तर त्याचं शीर्षक “द लाल ऑफ गुजरात” असं द्यायचं असं ठरवून टाकलेले आहे मी.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/10/2019 - 18:17

In reply to by अस्वल

भारतात राजकीय परिस्थितीवर विनोद करणं कठीण असणार. मंत्री-संत्रीच असल हास्यास्पद विधानं करतात, विनोद काय वेगळे करणार?

चिमणराव Wed, 16/10/2019 - 04:30

आर्थिक स्थिती बदलवणे यास भांडवलदारी प्रवृत्तीचे लोक कारण असतात.
विरोधी पक्षात असणारे एक मुद्दा वारंवार सांगतात की आमचे सरकार आले की इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ, नसणाऱ्यांना भत्ता देऊ. हे कसं शक्य आहे हे मात्र सांगू शकणार नाहीत.
दुसरं एक - शेतकरी जगला पाहिजे. त्याने शेतात पीक काढलं नाही तरीही.

मारवा Wed, 16/10/2019 - 22:32

एक विलक्षण वचननामा चिमुर च्या वनिता राऊत यांनी दिलेला आहे.

चिमूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी थेट जाहीरनामा प्रकाशित करत दारुला समर्थन दिलं आहे (Chandrapur Liquor Ban). त्यांनी ‘गाव तिथे बियर बार’ अशी घोषणा देत प्रचाराचा बार उडवला. दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात वनिता राऊत यांनी ही घोषणा दिल्याने सध्या चंद्रपुरात सर्वत्र या घोषणेची चर्चा होत आहे.
इथे खालील लिंकवर पुर्ण जाहीरनामा वाचा फार रोचक मजकुर आहे. त्यांची निशाणी पण जबराट आहे " पेनाची निब सात किरणांसह"
https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/assembly-election-candidate…

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 17/10/2019 - 20:20

पण सरकार मंदीबिंदी झूट आहे असं म्हणत असेल तर निदान बरासा पुरावा तरी द्या!

आता इंटरनेटमुळे आकडे मिळवणं आणि आपल्याला त्यातून काय समजलं हे जाहीर करणं फार सोपं झालं आहे. रवी शंकर प्रसाद (तेच ना?) ह्यांनी वक्तव्य केलं, सिनेमाचा गल्ला बघा. तर लगेच काल फेसबुकवर आकडेवारी दिसली. चलनवाढीचा दर जमेस धरता, पहिल्या दहा हिट सिनेमांत फक्त एक सिनेमा भाजप काळात आला. तोसुद्धा बाहुबली-२. म्हणजे त्यालाही काळ लोटला, सध्याचा सिनेमा नाही.

मात्र ज्यांना भाजपाला मत द्यायचंच आहे, अशांना ह्या गणितामधल्या चुका काढता येतील. (मलाही ह्या गणिताच्या विश्लेषणाबद्दल सहज शंका काढता येतील.) मुळातलं विधानच ते फार गांभीर्यानं घेणार नाहीत, त्यामुळे त्याच्या प्रतिवादाकडेही सहज दुर्लक्ष करता येईल. किंवा ह्या इंटरनेटवरचे आकडे जमवणाऱ्या शहाण्यांना काय अक्कल म्हणत भाजपाचा उदोउदो करतील.

आपण नक्की कोणावर विश्वास ठेवतो, का?

चिमणराव Fri, 18/10/2019 - 17:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मप्र, राजस्थान विधानसभेला कॉन्ग्रेसला निवडले पण लोकसभेला पाडले. मतदार सर्व पाहतो आणि ट्रेन्ड बदलून टाकतो अचानक.

'न'वी बाजू Sun, 20/10/2019 - 20:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाल तथा पालीची अंडरबेली सुंदर तथा मोहकच आहे.

मात्र, एक शंका. पालींना गुळगुळीत काचेवर चढता येते?

(वेल, आय गेस येत असले पाहिजे. पायांतून सक्शन, कदाचित?)

सुधीर Sat, 19/10/2019 - 18:41

‘द अनसीन वर्ल्ड : इंडिया अ‍ॅण्ड द नेदरलॅण्ड्स फ्रॉम १५५०’
https://www.loksatta.com/athour-mapia-news/book-about-the-dutch-east-in…

"विशेषत: जवळपास अख्खे सतरावे शतक आणि अठराव्या शतकाचा काही भाग इतक्या मोठय़ा कालावधीत डच कंपनी ही भारतातील सर्वात मोठी व बलशाली व्यापारी सत्ता होती हे आज सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही."

भारतात राज्य करण्यासाठी इतर युरोपियन देशांपेक्षा इंग्रज यशस्वी झाले याची इतर काही प्रमुख कारणं आहेत काय? का केवळ प्लासीची लढाई निर्णायक ठरली आणि इंग्रजांची ताकद वाढली आणि हातपाय अधिक जोमाने पसरवता आले?

चिमणराव Sat, 19/10/2019 - 19:17

१) तैनाती फौज ( subsidiary force) देण्या बदल्यात त्या राजास संरक्षण देणे.
२) हळहळू राजकीय भारत ताब्यात घेतला. पॉलटिकल एजंटशिवाय त्यांना निर्णय घेता येईना.

नितिन थत्ते Sun, 20/10/2019 - 18:55

In reply to by चिमणराव

तैनाती फौज घेणाऱ्या राजाच्या (उदा होळकरांच्या) मनात प्रश्न येत नसे का? की बाबा तुम्ही मला सर्व्हिस देताय तशीच सर्व्हिस पेशव्याला किंवा शिंद्यांना पण देताय. माझं शिंद्यांशी वाजेल तेव्हा तुम्ही नक्की कोणत्या बाजूने?

चिमणराव Sun, 20/10/2019 - 21:40

तैनाती फौज घेणाऱ्या राजाच्या (उदा होळकरांच्या) मनात ~~~
- मुळात हारलेल्या राजास अक्कल ठेवणे हे बादच होते. दिलेलं गिळायचं आणि भिजल्या उंदरासारखं खुर्चीवर बसायचं एवढंच काम होतं.
एकेका राज्यात म्हाताऱ्या राजाच्या पोरांत आपल्यालाच राज्य मिळायची लालसा असतेच त्यातल्या अबलु/टबलु/डबलु पैकी एका डबलुला बसवायचं, बथ्थड करायचं हेच तंत्र वापरून व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी मागच्या दाराने राजकीय शक्ती झाली. पुढे राणीकडून कुक्कुही लावून रीतसर राज्यकर्ते झाले असा माझा अकरावी पर्यंतच्या अभ्यासातून समज झाला. नंतर काही अवांतर वाचन झाले नाही.

-----
बुंदेला राजे त्याच्याच भावंडाच्या - चांदेलाच्या सततच्या आक्रमणास कंटाळून मराठ्यांची मदत घेतली. चांदेलांनी इंग्रजांची. पुढे गंगाधरपंत ( झाशीच्या राणीचा नवरा) यांनीही इंग्रजांची सेवा घेतली. मग जैसे थे. चांदेलांकडेही समकालीन युद्ध करणारी राणी होतीच.
मौर्य,गुप्त, राष्ट्रकुट, पल्लव वगैरे उत्तरोत्तर राजे छोटे होत जाऊन आपसात लढू लागले. वीस पंचवीस हजार सैन्य जाऊन दोन तीन हजारावर आल्यावर ब्रिटिश त्यांचे सुसज्ज सैन्य पाठीशी देतील तेव्हा त्या आपसातल्या लढाया बंद झाल्या.

सुधीर Tue, 22/10/2019 - 16:46

In reply to by चिमणराव

पण या सगळ्या प्लासी आणि बक्सरच्या लढाई नंतरच्या घटना. त्याअगोदर सगळ्यांना समान संधी होती.
कॉन्स्टॅन्टीनोपला पर्यायी सागरी मार्ग शोधण्याची धडपड सगळ्यांनीच केली. पोर्तुगिज त्यात पहिले यशस्वी झाले. पण पोर्तुगिज, फ्रेंच, डज, सगळ्यांना पाठी सारून शेवटी ब्रिटीशांनी कब्जा केला. रॉबर्ट क्लाईव्ह सारखा धूर्त माणूस नसता तर इंग्रजांची ताकद इतकी वाढली असती काय?

सुधीर Tue, 22/10/2019 - 21:19

In reply to by चिमणराव

माझं फक्त इतकच कुतुहल आहे की, ईस्ट इंडिया कंपनी बाकिच्यांपेक्षा कधी आणि कशी शक्तीशाली झाली.
अवांतर:
मारवा यांचे हे लेख सापडले...

चिमणराव Thu, 24/10/2019 - 05:48

In reply to by सुधीर

अगदी थोडक्यात म्हणजे किनारपट्टीची बंदरे , भुभाग सोडला तर देशांतर्गत मोठी शक्ती १) मराठा, २)फ्रेंचांची मदत मिळवणारा टिपू हे इंग्रजांनी ओळखले. ३)शेवटचा मुगल सैन्यबळाने संपत आला होता तरी त्यास नैतिक पाठिंबा होता.
पेशव्यांचे तीन मोठे सरदार दोस्तीत आल्यावर पेशवे ,भोसले एकाकी पडले.
हैदराबाद संस्थानाशी जुळवून घेतल्यावर टिपूला विरोध करणे सोपं झालं.
१८५७ मध्ये सैन्याचा उठाव झाला. आता हे सैन्य इंग्रजांनीच प्रशिक्षित केलेलं परंतू त्यांना सेनापती नव्हता. जो सक्षम हुशार होता त्याला काढून शेवटच्या मुघलाने आपल्या लाडक्या बायकोच्या भावाला ( यासच साला म्हणतात) सेनापती बनवून ( पायावर धोंडा पाडून घेतला.) इंग्रजांशी लढण्याची संधी गमावली. दिल्लीचे तख्त राहिले दूर, गेला रंगूनला.
अशाप्रमाणे तीन मोठ्या शक्ती बाद झाल्यावर भारत इंग्रजाच्या ताब्यात गेला.
(( समिक्षाकारांनी या विषयावर जाडजूड पुस्तकं ठोकली आहेत तिथे माझ्या चारोळी समजून घ्या. ))

घाटावरचे भट Wed, 23/10/2019 - 10:40

In reply to by चिमणराव

पन्हाळ्याच्या वेढ्यात टोपीकर तोफा आणि युनियन जॅकसहित होते. हेन्री रिव्हिंग्टन नावाचा अधिकारी होता बहुतेक.

पुरंदराच्या वेढ्याच्या वेळी दिलेरखानाने आधी वज्रगड घेतला आणि मग वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरावर डागल्या. त्या तोफा मोंगलांच्याच होत्या.

घाटावरचे भट Fri, 25/10/2019 - 13:50

In reply to by नितिन थत्ते

>>पन्हाळ्याचा वेढा सिद्दी जोहरनेच घातला होता (पक्षी - जंजिऱ्याचा हबशी).
सिद्दी हे जनरल हबसाणातून आलेल्या लोकांना म्हणत. सिद्दी जोहरचा जंजिऱ्यांच्या सिद्दींशी संबंध असावा असे वाटत नाही. ब्याटोपंत अधिक खुलासा करु शकतील.

नगरीनिरंजन Mon, 21/10/2019 - 01:46

आयएमएफच्या मुख्य आर्थतज्ज्ञ असलेल्या गीता गोपीनाथ यांनी खुशखबर दिली आहे की २०२० मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७% नी वाढेल.

गोपीनाथ यांची मुलाखत.
ह्यात त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जी भारताच्या अर्थमंत्री वारंवार सांगत होत्या. ती म्हणजे “ही मंदी चक्रनेमेण येणारी मंदी आहे”. म्हणजे सायक्लिकल डाऊनटर्न होता, स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नाही.
माझ्या तुटपुंज्या ज्ञानामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत. कोणाला माहित असतील तर कृपया सांगाव्यात.
१. जर चक्रनेमेण येणारी मंदी असेल, तर मॉनेटरी पॉलिसी पुरेशी का ठरली नाही? कॉर्पोरेट कर माफी, ग्रामीण उत्पन्न वाढवण्याच्या योजना व बजेटमधल्या तरतुदी रोलबॅक करणे हे सायक्लिकल डाऊनटर्नमध्ये नेहमीच होतं का?
२. ग्रामीण उत्पन्न वाढवण्याच्या कोणत्या नव्या योजनांबद्दल गोपीनाथ बोलत होत्या?
३. सरकारी आकडेवारीमध्ये ओव्हरएस्टिमेशन आहे का या प्रश्नाला “We think these are the numbers that will play out” असं त्या म्हणाल्या. प्ले-आऊट म्हणजे काय?

सुधीर Tue, 22/10/2019 - 16:31

In reply to by नगरीनिरंजन

काही ठिकाणी मतभेद आहेत. उदा. वॉटसन इन्स्टीट्यूट मध्ये गेल्या आठवड्यात झालेली ही लेक्चर्स.

भागः १: सध्य स्थितीला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत यावर राजन आणि सुब्रमण्यम दोघांचे विश्लेषण, मतभेदाचे मुद्दे

भाग २: राजन आणि बॅनर्जी यांची मते. (खास करून राजनचे पॉलिटिकल इकॉनॉमीवरचे विचार)

नगरीनिरंजन Wed, 23/10/2019 - 08:21

In reply to by सुधीर

राजन यांचे भाषण ऐकले आहे. फिस्कल डेफिसिट दिसतो त्यापेक्षा जास्त आहे कारण सरकारचे ताळेबंदाबाहेरचे कर्ज त्यात धरलेले नाही. फूड कॉर्पोरेशन व एनएचएआय मार्फत घेतलेली कर्जे आहेत ती. बॅंकांचीही हालत खराब आहे.
नुकतीच बातमी आली की करसंकलन दोनलाख कोटींनी कमी होण्याची शक्यता आहे. मनरेगामध्ये रोजगार मिळवणाऱ्यांची संख्या वाढली आहे याचा अर्थ शहरी भागातून लोक परत गावी जाऊन काम शोधताहेत.
तरीही गोपीनाथ बाई नक्की कोणत्या उपाययोजनांमुळे जीडीपी ७% नी वाढेल म्हणताहेत ते कळले नाही अजून.

नगरीनिरंजन Sat, 26/10/2019 - 10:01

In reply to by नगरीनिरंजन

फिच रेटींग एजन्सीने २०२० च्या जीडीपीच्या ग्रोथरेटचा अंदाज कमी करून ५.५% केला आहे.

https://www.business-standard.com/article/economy-policy/india-s-credit-squeeze-pushes-growth-to-a-6-year-low-fitch-ratings-119102400780_1.html

नगरीनिरंजन Tue, 21/01/2020 - 03:29

In reply to by नगरीनिरंजन

हे मोठमोठे अर्थशास्त्री ज्या मुलाखती देतात त्याबद्दल त्यांचे काही उत्तरदायित्व असते की नाही?
गोपीनाथ बाईंनी अखेर भारताच्या अर्थवृद्धीच्या दराचा अंदाज घटवला आहे. मग आधी जे म्हणाल्या होत्या सरकारच्या नव्या योजना वगैरे ते काय होते?
पत्रकार लोक इतके लाचार का असतात ह्या लोकांच्याही बाबतीत? या बाई म्हणजे कोणी राजकारणी नाहीत त्यांना घाबरून प्रश्न न विचारायला.
उलट सगळ्यात आधी इंटेलेक्चुअल्सना धारेवर धरलं पाहिजे.
https://www.livemint.com/news/india/imf-revises-downward-india-s-economic-growth-to-4-8-for-2019-20-11579527054651.html

वामन देशमुख Tue, 22/10/2019 - 07:49

गाणी शोधण्यात मदत हवी आहे.

१. छान पालखी सजवा न माझ्या राजाला मिरवा ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ मराठी गाणं कोणतं ? "डोंगर", "सपान" असे शब्द त्या गाण्यात आहेत.

२. अशी चिक मोत्याची माळ होती गं तीस तोळ्याची गं ह्या गाण्याची चाल असलेलं मूळ गुजराती गाणं कोणतं? सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ऐकलं होतं आणि तेंव्हा खूप आवडलं होतं, पण आता नेमके शब्द आठवत नाहीत.

रच्याक, आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे हे सुमन कल्याणपुरांचे सुमधुर गीत मला परवापर्यंत माहित नव्हतं.

jitendra Deshpande Thu, 24/10/2019 - 12:23

आत्ता आपल्याला कुठल्याही कारणामुळे वेबसाईट बनवणे शक्य नसेल तर अगदी स्वस्तात सिंगल वेबपेज कम ब्लॉग माझ्या साईट वर बनवून घ्या !
(Personal Business Landing Page)

आज मोठा खर्च करून वेबसाईट बनवण्याचे दिवस गेले, आता फक्त नाव, पत्ता, तुमच्या बिझनेसची माहिती, काही फोटो, कॉन्टॅक्ट डिटेल्स, इत्यादी असले तरी बास, कारण लोक जेव्हा तुमचे प्रॉडक्ट्स व सर्विसेस Google वर Search करतात तेव्हा त्यांना तुम्ही माहिती Google वर वेबसाईट स्वरूपात दिसली म्हणजे झाले !

+ FREE Digital Visiting Card पण मिळवा !

याचे फायदे बघूया:
१. गूगल वर कोणी आपले प्रॉडक्ट्स व सर्विसेस बद्दल सर्च केले तर आपली माहिती सापडेल.
२. किमान ३००० ते ५००० हजार ऑनलाईन कस्टमर्स आपले वेबपेज भागातील.
३. त्या मध्ये स्वतंत्र कॉमेंट बॉक्स असेल जिथे लोकं डायरेक्ट आपल्याशी संवाद करू शकतील.
४. पूर्ण SEARCH ENGINE OPTIMIZATION सहित
५. हि वेबसाईट आपण ब्लॉग म्हणून पण वापरू शकता.

-
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
-
व्यवस्थापकीय नोंद - जाहिरातसम दुवे काढून टाकले आहेत.
-
Call: 9822289072, Pune.
Jitendra Deshpande

तात्या,
विक्स.कॉम (डब्ल्यू आय एक . सी ओ एम) पेक्षा तुमची साईट भारी कशी?
[दुवा काढून टाकला असं म्हणायला नको, हॅ हॅ हॅ]
ब्लॉगर/विक्स सारखे लोक फुकटात हे सगळं देतातच की.
मग तुमच्याकडे का यावं लोकांनी?

सांगा!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/10/2019 - 21:56

कालची शनिवार संध्याकाळ. नेहमीची, आठवडी खरेदी करण्याची वेळ. सकाळी बरीच थंडी होती, पण दिवसभरात उन्हानं बाहेर ऊब आलेली.

मी कपडे बदलायला गेले. मनात विचार - 'आज ही शॉर्ट्स वापरली तर नंतर धुवायला टाकता येईल. ह्यापुढे काही शॉर्ट्स घालायची हवा उन्हाळा येईस्तोवर येणार नाही.'

दुकानात गेलो. बरा अर्धा म्हणे, "आज चिकार भारतीय दिसताहेत."
मी, "ते तुला आज भारतीय दिसताहेत."
तो, "का? म्हणजे?"
मी, "दिवाळी आहे. ते भारतीय दिसत आहेत."
तो, "अच्छा, दिवाळी आहे तर!"

बऱ्याच भारतीय स्त्रिया माझ्याकडे हताश-निराश कटाक्ष टाकत होत्या. बरेच भारतीय पुरुष लक्ष्मण बनून माझ्या पायांकडे बघत होते. हे असं काही सुरू आहे, ह्याची बऱ्या अर्ध्याला अजिबात जाणीव नव्हती.

अस्वल Mon, 28/10/2019 - 09:47

https://theresurgent.com/2019/10/27/washington-post-headline-writers-ch…

वॉशिंग्टन पोस्टने इसिसच्या म्होरक्याच्या निधनाची बातमी देताना वापरलेल्या मूळ मथळ्यात "अतिरेकी(terrorist)" असा उल्लेख केला होता.
तो नंतर गाळून त्याजागी "धार्मिक विद्वान (austere religious scholar) असा उल्लेख केला आहे.

नशीब हिटलर मेला तेव्हा पोस्ट नसावं, नव्हतं, किंवा कसंही. नाहीतर त्यांनी "एकेकाळचा उमदा चित्रकार आणि कट्टर शाकाहारी" असा हिटलरचा उल्लेख केला असता.

हीसुद्धा दिशाभूलच.

गवि Thu, 23/01/2020 - 10:35

In reply to by अनुप ढेरे

मला 26. :-( 12 मिनिटे.

पण पाहिले दहा स्कीम समजून घेण्यात गेले. आता इतके लागणार नाहीत.

ता.क. तो स्पॉयलर शब्द हटवा की प्रतिसादातून.

सामो Thu, 23/01/2020 - 15:23

In reply to by अनुप ढेरे

नॉर्मल-
मला पकर व प्युबरटी च्या मधला आला = पब्लिक (२१ गेस) + गिव्ह अप :(
__________
हार्ड्
Clout - a heavy blow with the hand or a hard object. (११ गेस + गिव्ह अप)
_____________
भॉषॉण भालो गेम छे

ओंकार Thu, 23/01/2020 - 15:26

In reply to by अनुप ढेरे

वरच्या भागात जुने शब्द शोधायची पण सोय आहे. बायनरी ट्री वापरून तर्क कमी करता येतात.

- ओंकार.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 23/01/2020 - 20:28

In reply to by ओंकार

मी तेच करत होते. किती वेळ आणि वेळा लागल्या ते मोजणं सोडून दिलं. मागेमागे जाऊन खेळत होते. सकाळी खायला बसेन तेव्हा हेच!

सोप्या शब्दालाही किंचित कमी वेळा प्रयोग करावा लागला, दीड मिनीट लागलं.
आजचा कठीण शब्द - (19 guesses in 2m 40s)

गवि Thu, 23/01/2020 - 15:49

In reply to by अनुप ढेरे

हाइला, सगळ्यांना तोच आहे होय!

होय.

तो प्रतिसादाच्या शीर्षकातला शब्द 'अनुप'लब्ध करायला विसरलात.