"आजचा भारत" अर्थात "रावल्या अखेर विमानात चढला त्याची गोष्ट"
धारावीतून रावल्याने बापास विचारले बाप्पा त्ये काय हो तेंव्हा बाप सावळा म्हणाला त्ये विमान हाये बेटा "आपण बसू शकतो त्यात ?"या प्रश्नावर बाप का रडला हे रावलयास कळले नाही पण "तू म्होटा झालास की जरूर बसशिला" हे तेंव्हा त्याला पुरले पंधरा वर्षांनतर जातीतल्या देवजीस वीस हजार रुपये देऊन सावल्याने रावल्यास एअर-केअर मध्ये कामास लावले: काम नाही केला तर मी लाथ घालल या अटीवर. एअर-केअर चा युनिफोर्म बघून बहिण यस्वदा हसू लागली व म्हणाली बुजगावण दिसतंय बुजगावण.विमान उतरले तसे देवजी आणि त्याची टीम वेगाने विमानात घुसली पंधराच मिनिटे हायेत साल्यो काम उरका भराभर देवजी खेकसला तसे खुरटलेल्या रावल्याने प्लास्टिक बादलीतले कळकट फडके काढले व तो विमानाची फरशी वेगाने घासू लागला.
प्रतिक्रिया
(No subject)