छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३७ : पैसे/ व्यवहार
या वेळचा विषय आहे "पैसे". (नाणी/नोटा/अजून काही वेगळ्या कल्पना, काहीही चालेल).
(उदाहरणार्थ) नाण्यांचा वापर करून वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधे सुंदर/नाविन्यपूर्ण छायाचित्र घेता येईल. किंवा एखादे प्रतिकात्मक (सिम्बॉलीक) छायाचित्र ही घेता येईल, जिथे महत्व छायाचित्रणाच्या स्किलला नसून त्यामागचा कल्पनेला असेल.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, फक्त Width द्यावी (इंग्रजी आकडयामधे).
Height देऊ नये, ती जागा रिकामी सोडावी. कृपया Width 550 पेक्षा जास्त देऊ नये. फोटो imgur.com किंवा अजून कुठल्याही वेबसाइट वर अपलोड करून इथे टाकावेत.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ४ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. फोटो एडीट केला असल्यास (कलर, ब्राईटनेस) तसे नमूद करावे.
४. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
यापूर्वीच्या स्पर्धेतील छायाचित्रे इथे बघता येतील.
प्रतिक्रिया
वेगळाच विषय आहे. पैसे असताच
वेगळाच विषय आहे. पैसे असताच प्रत्येकाकडे. (नसतील तर नसलेल्या पैशांचा फोटो काढा!
) आता काढा फोटो! आम्ही सध्यातरी प्रेक्षक 
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोचक विषय!
गब्बरसिंग भरपूर एंट्री टाकतील अशी अपेक्षा आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कल्पना सुचण्यासाठी ही लिंक
कल्पना सुचण्यासाठी ही लिंक बघा http://photographyblogger.net/19-interesting-currency-pictures/
(विषय बदलून पाहिजे असल्यास खाली कमेंट करा.)
चलन/व्यवहार
'पैसे' ह्यापेक्षा 'चलन' किंवा 'व्यवहार' हा विषय सर्जनशीलतेला अधिक वाव देईल असं वाटतं. वेगवेगळ्या वस्तू एकेकाळी चलन म्हणून वापरल्या जात होत्या, उदा. कवड्या. वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या 'बार्गेनिंग चिप्स' असतात; त्याबद्दल चित्ररूप विचार करता येईल. असा थोडा अमूर्त विचार सुचत आहे; मला काय फोटो काढता येतील त्यात काहीतरी तरी निराळं असेल हे अजूनही मूर्त रूपात डोक्यात येत नाहीये.
ह्या प्रतिसादाच्या निमित्ताने असंही सुचवावंसं वाटतं की एखाद्या विषयानुरूप चित्रं आपल्या डोक्यात येतात. प्रत्येक वेळी आपल्याला तसे फोटो काढणं शक्य असतं असं नाही. त्या कल्पना या धाग्यांवर मांडल्या तरीही त्यातून कोणाला फोटो काढण्याची प्रेरणा मिळू शकेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
'पैसे' ह्यापेक्षा 'चलन' किंवा
हां, तसेही चालेल.
उदाहरणार्थ या विषयामधे हॉटेलचे बील सुद्धा येऊ शकते, कारण त्यात पैसे "लिहीलेले" असतात.
मला एक सुचलं होतं, भारतीय कायद्यांचं पुस्तक/संविधान आणि त्यात बुकमार्क म्हणून एक पाचशेची नोट.
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=dollar+origami&safe=strict&espv=2&biw=19...
काय सुंदर आहे.
इथे एक "इण्टर्नॅशन्ल
इथे एक "इण्टर्नॅशन्ल इम्पोर्टसचे" दुकान आहे तिथे भारतीय १० पैसे, २५ पैसे या नाण्यांना भोक पाडून, ओवून केलेले दागिने (जंक/फॅशन ज्वेलरी) मिळते.


खाली नेटवरुन एक चित्र दिले आहे. त्या प्रकारची -
.
रुपी रायझिंग
"wishful thinking"
Camera: Sony NEX-5N
Lens: Jupiter 85mm F2.0 @5.6
Light Source: natural light
Post Processing: Simple crop, increase contrast, very little curve adjustment
नाणे....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 135mm
ISO: 400
एक नया पैसा....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 165mm
ISO: 400
स्पंदन यांचे दोन्ही फोटो
स्पंदन यांचे दोन्ही फोटो आवडले.
एक नया पैसा....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 165mm
ISO: 400
नाणे.....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 135mm
ISO: 400
तुमचे फोटो दिसत नाहीएत.
तुमचे फोटो दिसत नाहीएत मला. मोबाईल, डेस्कटॉप दोन्ही ट्राय केलं.
परत upload केले. पुर्वद्रुश्य
परत upload केले. पुर्वद्रुश्य मला photo दिसल्या वरच मग मी photo प्रकशित केले.
तुम्ही 'Browser Private mode'
तुम्ही 'Browser Private mode' मध्ये तर नही ना ठेवले? मला फोटो दिसत आहेत, पण browser private mode मध्ये ठेवल्यास फोटो दिसत नहीत.
नाणे....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 135mm
ISO: 400
एक नया पैसा....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 165mm
ISO: 400
तुम्ही 'Browser Private mode'
तुम्ही 'Browser Private mode' मध्ये तर नही ना ठेवले? मला फोटो दिसत आहेत.
नाणे....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 135mm
ISO: 400
नाणे...!!!
एक नया पैसा....!!!
Camera : Canon 60D
Lens: 18-200mm
Photo shoot taken at: 165mm
ISO: 400
'नया' है वह?
१९४७ सालचा (आणि त्यातही 'PICE' असे लिहिलेला) पैसा हा 'नया' कसा?
(रुपयाचे चौसष्टऐवजी शंभर पैसे होऊ लागले, तेव्हाच्या संक्रमणाच्या काळात - आणि तेव्हापासून १९६४पर्यंत - 'पैसा' म्हटले, की नेमका कोणता पैसा, याबद्दल लोकांचे कन्फ्यूजन टाळण्याकरिता, (नव्या) दशमान पैशाचे (तात्पुरते) नामाभिधान (अधिकृतरीत्या) 'नया पैसा' असे केले गेले. भारतात चलनाचे दशमानीकरण माझ्या कल्पनेप्रमाणे १९५७मध्ये झाले. असो.)
बरं मग पुढे?
या स्पर्धा हल्ली होत नाहीत वाटतं
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता
गांभीर्यानं विचारत्ये...
पुढचा विषय देऊन सुरू करताय का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
स्वैर विषय ठेवता येईल - आवडेल
स्वैर विषय ठेवता येईल - आवडेल तो.
---
स्मार्टफोनातल्या फोटोतून exif data आपोआप पाठवला जात असतो. ( कोणता कॅम्रा ,रेझ०, अॅपरचर,पासून तारीख आणि जिपीएस लोकेशन. त्यातून पकडले जाण्याची शक्यता असते. अरे, तुम्ही इथे होतात वाटतं?
एकदा गम्मत म्हणून विकिकॅामन्सवर एक फोटो अपलोड केल्यावर त्याखाली सगळी कुंडलीच छापून आल्यावर कळलं.