देव्युपासना: बंगाली कविता:ओळख - भाग १

https://lh3.googleusercontent.com/-EPZTTezv1VE/UAt3xAvrTNI/AAAAAAAAPmU/HTBAOL39f6YVlCHbxTJegyhf_6hVYTzzgCCo/s512/12.jpg
.
कलकत्ता या नावचा उगमच मुळी "काली" या नावाशी आहे. अर्थात कल्कत्त्यामधील दुर्गापूजा, कालीपूजा, शाक्त, तंत्र संप्रदाय आदिंची माहीती देणारी काही पुस्तके आधाशासारखी वाचून काढली, त्यातीलच गोळा केलेली माहीती या भागात देते आहे.
.
बंगाली पंडीत "शशीभूषण दासगुप्ता" यांनी देवीवर रचलेल्या काव्याबद्दल पुढील टिप्पणी केलेली आहे - देवीविषयक बंगाली काव्यात प्रामुख्याने २ देवता आढळतात पैकी उमा ही शंकराची पत्नी जी की देवीचे सुमुखी, वरदायिनी, मंगल अशी सौम्यस्वरुपा आहे. तिचा काव्य प्रकारात अंतर्भाव होणे यात काहीच नवल नाही , आश्चर्य तेव्हा वाटते जेव्हा काली जी की काळी आणि रुद्र अशी मृत्युदेवता आहे, गळ्यात नरमुंडांची माळा लेऊन, कापलेल्या मानवी हातांचा कंबरपट्टा लेऊन देखील काव्यप्रांतात शिरते व येवढेच नव्हे तर सौम्य उमेपेक्षा वरचढ ठरते. ते आश्चर्यच म्हणावे लागेल.
.
पुरुष देवतांच्या उपासनेची परंपरा, देव्युपासनेपेक्षा लवकरच झाली. मग ९व्या शतकातील विष्णु व शंकर या देवतांची दक्षिण भारतातील परंपरागत उपासना घ्या किंवा १५ व्या शतकापासून बंगालमध्ये रुढ झालेल्या श्रीकृष्णाच्या मधुराभक्तीचे उदाहरण घ्या. त्यामानाने कालीउपासना सुरु होण्याकरता १८ व्या शतकाचा मध्य उजाडावा लागला. या उपासनाकाव्यांमध्ये देवीकरता जो समर्पणभाव व भक्ती आढळते तिज शाक्तपदावली असेही म्हणतात. शक्तीची उपासना म्हणुन शाक्तपदावली हे नाव सार्थच आहे.यातील देवीविषयक काव्य हे मुख्यत्वे २ भागात विभागलेले आढळते - एक म्हणजे श्यामा संगीत. काली ही देवी श्यामलवर्णाची म्हणुन श्यामासंगीत. बंगाली समाजात हे संगीत अधिक रुढ असून दुसरे उमासंगीत जीमध्ये शिवपत्नी उमेच्या संदर्भातील गाणी आढळतात. श्यामासंगीतामध्ये मानवी भावनांचे आरोपण, भक्ताच्या भावभावनांचा अविष्कार दृगोचर होतो मग त्यात श्यामादेवीचे वर्णन घ्या अथवा स्तुती घ्या, तिच्या आशीर्वादाची अभिलाषा, तिला सांगीतलेले गार्‍हाणे, तिला दिलेला दिलासाच काय परंतु तिने कृपा न केल्यास तिला दिलेली धमकी हिचाही समावेश होतो. श्यामासंगीतात कवि, देवीशी थेट संवाद साधतो व तिच्या शत्रुविनाशक, कमल-पदांच्या सान्नीध्याची अभिलाषा बाळगतो.
.
https://lh3.googleusercontent.com/-RFjI_ekG75g/VxoieDt9P0I/AAAAAAAAQuw/5qFI6xp8Ceon_9GA3rGqASAmIF2xrDL6gCCo/s415/101.jpg
.
याउलट उमासंगीतात "आगमणी" प्रकारातील लहान कथा गायल्या जातात. या गाण्यांमध्ये उमेचे माहेरी येणे, माहेरवास वर्णिला जातो. दुर्गापूजेच्या सुमारास, नवरात्रात, म्हणजे वर्षातून एकदा उमा शंकरासमवेत, गिरीराज व मेनका या आपल्या मात्यापित्यांकडे माहेरी येते असे मानले जाते. ती दुर्गापूजेच्या ३ र्‍या दिवशी तिच्या सासरी कैलासावर परत जाते. हे वर्णन केलेली गाणी म्हणजे "आगमणी". तर या संगीतात अजुन एका प्रकारची गाणी आढळतात - "विजय(या?)" या प्रकारात दसर्‍यास दुर्गेने महिषासुरावर मिळविलेला विजय साजरा होतो. उमा माहेरी जाणे, दुर्गेचा विजय अशी आनंद व दु:ख संमिश्र भावनांची गाणी या प्रकारात येतात.
.
https://lh3.googleusercontent.com/-vgCMUNuYm9I/Vxoil_u-8yI/AAAAAAAAQvI/FNkURd2cGfMfYyCmv4qdanN_fr9TMhoLwCCo/s640/135.jpg
.
https://lh3.googleusercontent.com/-G94Oalzv8TY/UAt320gk4OI/AAAAAAAAPmU/AhyT1SdgxlAB_XPmqpf9GHjK_YCC4YU-wCCo/s576/137.jpg
.
११ व्या शतकात कालीउपासनेच्या तांत्रिक मार्गाचा अवलंब केला गेला, सुरुवात झाली. त्या सुमारास तंत्र रुढींनी व तत्वज्ञानाने जनमानसाचा ताबा घेतल्याचे दिसुन येते. कुंडलिनी उपासना ही याच मार्गातील पोट उपासना. श्यामासंगीतावर देखील तंत्र उपासनेचा प्रभाव काही प्रमाणात आढळतो. उदा - मायेमधुन मुक्ती, मोक्ष हवा असेल तर कालीउपासना करणे आवश्यक आहे ही श्रद्धा, करुणामयी, अनंता व आदिशक्ती या रुपात कालीची पूजा. अजुन एक रुप तारा या देवतेचे. तारा म्हणजे भवसागर तारुन नेणारी ही बौद्धधर्मातील देखील मुख्य देवता, या मार्गात आढळून येते. दुर्गेच्या विविध रुपांचा अंतर्भाव तंत्र मार्गात होतो. या मार्गातील, उमेचे स्थान मग त्यामानाने बरेच वरवरचे आहे. मुख्यत्वे शांकरी अर्थ्यात शंकरांची पत्नी असल्याने त्याना विविध प्रश्न विचारुन स्तोत्रे, तंत्रमार्गाची गुह्ये जाणुन घेणे अशा संदर्भात उमा समोर येते.
काली व उमेची संस्कृत स्तोत्रे , काव्ये ही फक्त शाक्तपदावली नसून, त्यांची छाप एकंदरच बंगाली संगीतावर दिसून येते.
.
"मंगलकाव्ये" हा काव्याचा एक वेगळा प्रकार ज्यात देवीदेवतांची स्तुती, विजयाची वर्णने वगैरे आढळतात. १७ व्या शतकापर्यंत तरी काली ही "मंगलकाव्ये" जॉनरची नायिका नव्हती. १७ व्या शतकात कुठे ती या जॉनरमध्ये दिसू लागली, विशेषतः कालिकामंगलकाव्य व त्यातील "विद्या-सुंदर(रा?)" ही कथा. कालीच्या नरमुंडांची, ध्वस्त हातांच्या कंबरपट्ट्याची जागा यात रत्नमाणकांच्या अलंकारांनी घेतलेली दिसून येते. १७ व्या शतकात, जरी काली ही देवी या काव्यात आढळू लागली असली तरी उमेचे या काव्यातील स्थान केवळ अबाधित आहे. उमेची स्तुती तर आढळतेच पण रोचक वळण असलेल्या बंगाली कथा यात आढळतात. शंकर हा वृद्ध, जटाधारी, भस्मार्चित व कफल्लक, सांपत्तिकरीत्या विपन्न असाच यामध्ये वर्णिलेला असून, उमा तर त्याच्याबरोबर खूष नाहीच पण उमेच्या मात्यापित्यांचे ही दु:स्वप्न (नाईट्मेअर) असा जावई म्हणुन शंकर चित्रीत केलेला असतो.
.
बंगाली काव्यावरती एकंदर आधीच्या पुरुषदेवतांच्या काव्याचा विशेषतः कृष्ण व वैष्णव पदावलीचा प्रभाव निर्विवाद आढळून येतो. यमके, अनुप्रास, उपमा आदि अलंकारच काय पण "भणित" म्हणजे ती सिग्नेचर ओळ जिच्यात कवि आपले नाव गुंफतो ती पद्धतही वैष्णव पदावलींतून, बंगाली काव्याने जशीच्या तशी उचललेली दिसून येते. वैष्णव संप्रदायात हरीचे नाम "कृष्ण" जे की बंगाली काव्यात श्यामेचे नाव "कृष्णा" म्हणुन येते. वैष्णव काव्यातील यशोदेची बाळकृष्णाबद्दलची ओढ, माया, वात्सल्य हे बंगाली संगीतात मेनकेची, उमेबद्दलची ओढ बनुन जसेच्या तसे येते. काही विद्वद्जनांच्या मते "प्रति-वात्सल्य" म्हणजे, भक्ताची, देवतेबद्दलची ओढ या स्वरुपातही ते आढळते. अशा रीतीने शाक्त काव्यावरती, वैष्णव काव्याचा प्रभाव आढळतो.
.
शिव ही देवता तंत्रमार्गात समाविष्टच होत नाही तर ती उच्च देवता म्हणुन समाविष्ट केलेली आढळते. परमोच्च ध्येय हे शिवसान्नीध्य म्हणा किंवा कुंडलिनी मार्गातील शिव-शक्ती मीलन व कॉस्मिक नृत्य घ्या ना.कालीच्या पायांखाली शिव हा मृतप्राय, प्रेतावस्थेत जसा आढळतो, तसाच देवीचा कामक्रीडेतील जोडीदार म्हणुनही येतो. म्हणजे कुठे उमासंगीतातील, भणंग वृद्ध कपि तर कुठे तंत्रमार्गातील सर्वोच्च देवता शंकर. असे वैविध्य आढळते.
.
या पुढील भागात रामप्रसाद सेन, कमलाकांत भट्टाचार्य व अन्य बंगाली कविंच्या कविता देइन. तोच मुख्य जिव्हाळ्याचा विषय आहे, बाकी हा भाग म्हणजे कोरडी, शुष्क माहीतीच. असो.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

धन्यवाद पुढे या अध्यात्मिक कविताच देणार आहे. पण तुकड्यातुकड्याने कविता दिली की तिचा अर्थ पूर्ण लागत नाही हे पूर्वीच्या स्वानुभावावरुन*. पण द्यायची इच्छा तर आहे. काही अर्थ गद्यात सांगेन, काही पद्याच्या ओळी उधृत करीन.

* -
http://aisiakshare.com/node/3691
http://aisiakshare.com/node/3692
http://www.aisiakshare.com/node/3695

परत झैरात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्सुकतेने वाचत आहे!
छान धागा!

'आमार कालो मे राग कोरेछे'(माझी काळी मुलगी रुसली आहे) हे गाणं ऐकून या संगीताविषयी उत्सुकता वाटली होती पण ते तितकंच राहिलं. श्यामासंगीत असं नाव ऐकलं होतं पण उमासंगीतही असतं होय!

देवी उपासनेची परंपरा फारशी पुरातन नाही हे वाचून आश्चर्य वाटलं.

त्यामानाने कालीउपासना सुरु होण्याकरता १८ व्या शतकाचा मध्य उजाडावा लागला.

आणि

११ व्या शतकात कालीउपासनेच्या तांत्रिक मार्गाचा अवलंब केला गेला, सुरुवात झाली.

ही टायपिंग मिस्टेक आहे का?

जगद्धात्री नावाच्या एका देवीचीही उपासना चंदननगर भागात होते. १८/ १९व्या शतकात तिथल्या जमीनदारांनी सुरू केली जगद्धात्री पूजा. सरस्वती, लक्ष्मी या तर पॉप्युलर आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाकरता धन्यवाद चार्वी.
.
नाही टायपिंग चूक नाही मलाही पुस्तकात ते चूकीचे वाटले होते पण मग मनाची अशी समजूत घातली की ११ व्या शतकात उपासना तुरळक सुरु झाली की काय? बाकी तो सिक्वेन्स मलाही खटकतोय. नेटवर मात्र शोधले नाही.
.
"श्यामला दंडकम" चा उल्लेख कोणीतरी जालावरती केलेला आहे बहुतेक माबोवरचे चैतन्य दीक्षीत पण मला खात्री नाही तेव्हा संस्कृत डॉक्स वरती ते स्तोत्र http://sanskritdocuments.org/doc_devii/shyaamala.pdf वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केलेला होता.
.

'आमार कालो मे राग कोरेछे

यवरुन आठवले, दिलतितली यांनी दिलेले हे रवींद्रनाथांचे गाणे देवीवरचे आहे की काय?
http://aisiakshare.com/node/97
वाचले तेव्हापासून हे गाणे सौंदर्यानुभव म्हणुन डोक्यात आहे.

___

हां मायबोलीवरचा लेख सापडला - http://www.maayboli.com/node/36828

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

* ११व्या शतकापासून तांत्रिकांत कालीची उपासना प्रचलित होती, पण ती मुख्य प्रवाहात, नागर समाजात रूढ व्हायला १८वे शतक उजाडले असा त्याचा अर्थ असेल असे वाटत आहे. कालीपूजा दिवाळीत (अमावस्येला) करतात, ती का? यासंदर्भात काही उल्लेख सापडला का? दिवाळी हा आपण प्रकाशाचा उत्सव मानतो, या सणाशी काली कशी संबद्ध झाली असेल याविषयी कुतूहल वाटते.
* श्यामलादंडकम् दणदणीत स्तोत्र दिसतंय. वाचताना फेफे उडाली.
* दिलतितलीच्या धाग्याचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद! सुंदर कविता वाचायला मिळाली. पण ती कविता कालीविषयी असेल असे मला वाटत नाही. रवींद्रनाथांच्या काव्यावर वैष्णवांच्या (बाउल वगैरे) मधुरा भक्तीचा जास्त प्रभाव आहे असे म्हणतात. परमेश्वराला प्रियकर/प्रेयसीच्या रूपात पाहणं वैष्णव पंथात जितकं रूढ आहे, तितकं तांत्रिक/शाक्त पंथात नसावं. कालीला माता किंवा मुलगी (डॉटर या अर्थी) मानतात, शंकराची कामिनी या रूपात बघतात, पण भक्ताची प्रेयसी या रूपात बघतात का? असे काही संदर्भ मिळाले तर नक्की सांग.
* तुला रुक्ष माहिती वाटत आहे, तोच मला जिव्हाळ्याचा विषय वाटत आहे Tongue म्हणून थोडा त्रास देत आहे.
आयती माहिती मिळेल अशा अपेक्षेने Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ती कविता कालीविषयी असेल असे मला वाटत नाही. रवींद्रनाथांच्या काव्यावर वैष्णवांच्या (बाउल वगैरे) मधुरा भक्तीचा जास्त प्रभाव आहे असे म्हणतात. परमेश्वराला प्रियकर/प्रेयसीच्या रूपात पाहणं वैष्णव पंथात जितकं रूढ आहे, तितकं तांत्रिक/शाक्त पंथात नसावं. कालीला माता किंवा मुलगी (डॉटर या अर्थी) मानतात, शंकराची कामिनी या रूपात बघतात, पण भक्ताची प्रेयसी या रूपात बघतात का? असे काही संदर्भ मिळाले तर नक्की सांग.

अरे खरच की अशा मृत्युदेवतेला प्रेयसी कोणीच मानत नसणार, मला जर तशी काही कविता मिळाली तर नक्की देते.
.
चार्वी तुमच्या प्रतिसादांनी खूप बरे वाटले. मी अधिक माहीती जमवेन. आपल्याला नक्की देइन काही सापडली तर.
.

श्यामलादंडकम् दणदणीत स्तोत्र दिसतंय. वाचताना फेफे उडाली.

हो ना ऐकायला फार गोड आहे पण. युट्युबवरती आहे.
.

११व्या शतकापासून तांत्रिकांत कालीची उपासना प्रचलित होती, पण ती मुख्य प्रवाहात, नागर समाजात रूढ व्हायला १८वे शतक उजाडले असा त्याचा अर्थ असेल असे वाटत आहे. कालीपूजा दिवाळीत (अमावस्येला) करतात, ती का? यासंदर्भात काही उल्लेख सापडला का? दिवाळी हा आपण प्रकाशाचा उत्सव मानतो, या सणाशी काली कशी संबद्ध झाली असेल याविषयी कुतूहल वाटते.

शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आशेच आजून येऊंद्या. रच्याकने कोलकात्यातले दक्षिणेश्वरचे मंदिर जितके आवडले तितकेच कालीघाटचे मंदिर नावडले. (अगागागागागा, अतिशय घाणेरडे मंदिर, चुकूनही जाऊ नका.) बेलूर-दक्षिणेश्वर करा, खूप सुंदर अनुभव. विशेषतः बेलूरमठातील सायंकाळची आरती/पूजा झाल्यावर नावेत बसून गंगेतून दक्षिणेश्वरास येणे म्हणजे निव्वळ आहाहाहा....दक्षिणेश्वर मंदिरात गेल्यावर रामकृष्णांचीच आठवण येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्वाद बॅट्या.

तितकेच कालीघाटचे मंदिर नावडले. (अगागागागागा, अतिशय घाणेरडे मंदिर, चुकूनही जाऊ नका.)

ओह Sad

बेलूर-दक्षिणेश्वर करा, खूप सुंदर अनुभव. विशेषतः बेलूरमठातील सायंकाळची आरती/पूजा झाल्यावर नावेत बसून गंगेतून दक्षिणेश्वरास येणे म्हणजे निव्वळ आहाहाहा....दक्षिणेश्वर मंदिरात गेल्यावर रामकृष्णांचीच आठवण येते.

सॉलिड!
बाय द वे ही सर्व पुस्तके मी अ‍ॅमेझॉनवरुन सेकंडहॅन्ड मागवलेली. पैकी एकामध्ये कोणीतरी रवींद्रनाथांचा फोटो ठेवलेला आढळला Smile अकस्मिक भेटीमुळे मस्त वाटलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंत्राच्य मागे लागण्याचे कारण मोठ्या शत्रुवर विजय मिळवण्याचे लेचापेचांचे उपाय असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीनच माहिती कळली. श्यामा सन्गीत आणि उमा सन्गीत. फरक छान सान्गितलास. Smile
गेल्या वर्षी ह्याच सुमारास पुलन्चे 'वन्ग-चित्रे' वाचले. ते शान्तिनिकेतन मधे राहुन बन्गाली शिकले तो सम्पूर्ण अनुभव म्हणजे ते पुस्तक आहे. त्यन्च्या लेखन शैलीनुसार बन्गाली व्यक्तिचित्रे मधुन मधुन डोकावतात. वाचले नसशील तर जरुर वाचुन बघ.
सध्या ह्य लेखमालेमुळे बन्गालात घुसलीच आहेस तर तुला आवडेलही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

माहिती आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त माहिती विथ चित्रं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी