सह्याद्री वाहिनी वरील नाटकांच्या कार्यक्रमाबाबत

१. फार पुर्वी सह्याद्री वाहिनीवर रात्री एक नाटक लागले होते. त्यात नीना कुलकर्णी आईच्या भुमीकेत होत्या. त्यात या आईच्या व्यक्तिरेखेचा आपल्या अंध मुलावरील प्रेमापोटी आंधळे होऊन व अती सुरक्षीत ठेवण्यासाठी त्याला त्याची स्पेस न देणे असा काहीसा प्लॉट होता.
हे नाटक कोणते आहे? कुठे मिळेल?

२. हे आत्ता आठवण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपुर्वी सह्याद्री वाहिनीवर असेच एक नाटक लागले होते. तुषार दळवी आणि किशोरी शहाणे होते त्यात. एका लाडावलेल्या आणि उद्धट व्यक्तीची स्मॄती गेल्यानंतर त्याला नवे आयुष्य मिळते, जुने लोक त्याला खुप आठवुन द्यायचा प्रयत्न करतात, अनेक अनोळखी कुटुंब त्याच्यावर संपत्तीच्या लालसेपोटी हक्क सांगायला येतात व शेवटी एका अनाथ लहान मुलासोबत तो जातो असे कथानक आहे.
हे नाटक कोणते? आणखी माहिती कुठे मिळेल?

३. सह्याद्री वाहिनीवर हे असे रात्री उशीरा पर्यंत चालणारे नाटकं कधी लागतात? डीडीसह्याद्री.ईन वर काही मिळाले नाही, किंवा मीच नीट बघितले नसेल. ते पहिले नीना कुलकर्णी वाले नाटक रात्री १:३० पर्यंत चालले होते.

या दोन्ही नाटकांचे कथानक, अभिनय आणि ईतर गोष्टी खुपच चांगल्या होत्या.
सह्याद्रीवरील या नाटकांच्या कार्यक्रमाचे याचे वेळापत्रक आणि ही सगळी जुनी नाटकं कुठे मिळेतील?

धन्यवाद.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सह्याद्रीवर असे काही लागते कल्पना नव्हती.
कुणाला कल्पना आहे का? रात्री नाटके लावत असतील तर उत्तम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वाती चिटणीस यांच भारत पाकिस्तान फाळणी विषया संबंधित नाटक पाहिले होते.हे नाटक कोणते? आणखी माहिती कुठे मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0