अलिकडे काय पाह्यलंत ? - २

अलिकडे काय पाह्यलंत ? इथे फार स्क्रोल करावं लागू नये म्हणून दुसरा धागा सुरु केला आहे.

कालच क्यूब नावाचा साय-फाय सिनेमा पाहिला. चित्रपट पहाणार असाल तर आधी विकीपिडीयावरची गोष्ट वाचू नका. धाग्यात गोष्ट दिलेली नाही.. दहाएक वर्षांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला होता तेव्हातर बहुदा मला विकीपिडीया माहितही नसावा. पण त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल होतं.

विचित्र आकार, रंगांच्या स्टेन्ड ग्लास आहेत अशा भिंती वाटणार्‍या, एकाच प्रकारचा उजेड दिसणार्‍या खोलीत काही माणसं दिसतात. त्यांना आणखी काही माणसं येऊन मिळतात. आपण कुठे आहोत, का आहोत, कसे आलो आहोत हे कोणालाही धड आठवत नाही. आपण या ठिकाणी कसे अडकलो आहोत हे ही त्यांना नीट समजत नाही. अन्न, पाण्याचा तिथे पुरवठा नाही, सगळ्यांचे कपडे एकसारखे, युनिफॉर्म्स आहेत. अंगावरचे दागिने, घड्याळं काढून घेतलेली आहेत. फक्त एका मुलीचा वाचायचा चष्मा तिच्याजवळच आहे. अडकलेल्या लोकांमधे एक पोलिस आहे, एक डॉक्टर आहे, एक आर्कीटेक्ट आहे, एक तुरूंगातून पळून जाणारा आहे, चष्मावाली मुलगी विद्यार्थिनी आहे आणि त्यांना पुढे एक स्वमग्न (autistic) मुलगा भेटतो. प्रत्येक खोलीत मध्यभागी सहा दारं आहेत आणि शेजारच्या प्रत्येक खोलीतला उजेड वेगळ्या रंगाचा आहे. शेजारची प्रत्येक खोलीही अशीच आहे.

चित्रपटाच्या सुरूवातीलाच एकजण एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातो. तिथल्या सापळ्यात अडकतो, बारीक तारांची जाळी त्या माणसाचे छोटे-छोटे क्यूब्ज करते. थोडक्यात काही खोल्यांमधे सापळे आहेत. काही खोल्या सुरक्षित आहेत. हे तिथून जिवंत बाहेर पडू शकतात का असे म्हटले तर गौण प्रश्न तर आहेतच. पण त्या ही पुढे अडकलेली माणसं माणुसकी विसरतात का? स्वमग्न मुलाचा 'उपयोग' समजेपर्यंत त्याला कोण कोण कसे वागवतात? या विविध व्यवसायच्या लोकांना एकत्र आणण्यामागे काही उद्देश असतो का? एकूणच या विक्षिप्त मायाजालाचा काही उद्देश असतो का? हे सगळं नियंत्रित करणारं कोणी आहे का?

आणि हे सगळे प्रश्न त्या क्यूबच्याही बाहेर कोणाला पडतात का?

चित्रपट मला आवडला. रेकमेंड करते. त्यातून नक्की काय सांगायचा प्रयत्न केला आहे हे मी सांगू शकत नाही. 'जग हे बंदीशाळा' असा थोडाफार अर्थ मला लागला. काहीतरी सांगायचं आहे पण ते निसटतं आहे असं काही! तुमच्यापैकी कोणी आधीच पाहिला असेल किंवा नंतर पाहिला तर जरूर लिहा.

कोणी चित्रपटगृहात जाऊन 'शाळा' पाहिला का? लोकांचा प्रतिसाद कसा आहे? त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जंतूच्या "'शाळा' – एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर" धाग्याचा दुवा.

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

गेल्या पंधरवड्यात पीबीएस वर तीन उत्कृष्ट प्रोग्राम्स पाहिले.

१.Broken Tail: A Tiger's Last Journey इथे पहा: http://www.pbs.org/wnet/nature/episodes/broken-tail-a-tigers-last-journe...
(भारतातून दिसला नाही तर इथे थोडक्यात माहिती आणि काही चित्रः http://www.pbs.org/wnet/nature/episodes/broken-tail-a-tigers-last-journe...)

वाईल्ड लाईफ फिल्ममेकर कॉलीन रणथंबोरला वाघांवर चित्रपट बनवायला येतो. इंग्रजी बोलू शकणार्‍या, या प्रकारचा अजिबात अनुभव नसणार्‍या, सलीमला घेऊन तो आपलं काम सुरु करतो. जवळजवळ दोन वर्षं रोज वाघाचा माग काढत त्यांचं त्या वाघाबरोबर एक नातंच बनतं. हे नातं म्हणजे फक्त या माणसांची स्वप्नाळू कल्पना नाही हे त्यांनी टिपलेल्या त्या वाघाच्या मुद्रांवरुन, मिश्कीलीवरून आपल्याला जाणवत राहतं.

रणथंबोरला आल्यानंतर कॉलीन आणि सलिम एका वाघीणीचा माग ठेवू लागतात. लवकरच ती काहीसं वेगळं वागते आहे असं त्यांना जाणवतं आणि मग तिचा रुबाबदार जोडीदार त्यांच्या नजरेस पडतो. काही दिवसांचा त्यांचा प्रणय हे दोघे टिपताना दिसतात. वाघांचा झुडूपाआड जातानाचा प्रसंग आणि त्याला दिलेली कमेंटरी हे प्रसंग माणसाच्या सिनेमातील रोमँटिक प्रसंगाना साजेसे वाटतात.

पुढे तिला दोन पिल्लं होतात, एकाची शेपटी तुटल्यासारखी असते. हे त्याला ब्रोकन टेल असे नाव देतात. लहानपणा पासूनच खट्याळ, धाडसी आणि खेळकर असलेल्या ब्रोकन टेलच्या प्रेमात हे दोघे पडले नसते तरच नवल. ब्रोकनटेलही यांच्या सहवासाला रुळल्यासारखा आपल्याला दिसत राहतो. रणथंबोरच्या किल्ल्याच्या खिडकीतून फक्त डोकं बाहेर काढून कॅमेरात पाहताना, मिश्किलपणे हळूच तोंड लपवण्याचा तयारीत असलेला ब्रोकन टेल पाहिल्यावर, आपणच ह्या सिनेमाचे 'हिरो' आहोत हे त्याला कळले आहे हे आपल्याला पटते.

एकेकाळी वाघांचं नंदनवन असण्यार्‍या जागी झालेल्या बेसुमार शिकारीमुळे आता वाघांचं अस्तित्व धोक्यात आलंय ही माहिती नवी नाही. पण इंग्रजांच्या आणि भारतीय राजांच्या वाघांच्या शिकारींची चित्रं आणि चित्रफिती पाहून खिन्न व्हायला होतंच. चार-चार पाच-पाच मारलेल्या वाघांना पायापाशी ठेवून काढलेले फोटो. शेकडो लोक हत्तींवर बसून, मचाणांवर चढून बेसुमार गोळीबार करतानाची ही चित्रं पाहून हताश व्हायला होतं. कॉलीन तिथल्या कोणत्यातरी महालाता फिरताना दाखवला आहे. जागो जाग वाघांना मारून त्याची मिरवण्यासाठी लावलेली कातडी, त्यांचे स्टफ केलेले अगणित सांगाडे. एका ठिकाणी वाघीण आणि तिच्या दोन पिलांना मारून त्यांचे स्टफ केलेले सांगाडे दिसतात, मग त्या पिलाच्या डोळ्यांचा क्लोज-अप घेतला आहे. तो इतका प्रभावी झाला आहे की एकही शब्दाने न सांगता त्या डोळ्यांतले भाव आपल्याला जाणवतात.

एक दिवस ब्रोकन टेल अचानक गायब होतो. त्याच्या नेहमीच्या ठिकाणी त्याचा मागमूसही लागत नाही. मग हे दोघे त्याच्या शोधार्थ निघतात. कुटुंबातल्या हरवलेल्या सदस्याच्या मागावर निघावं तस मजल दरमजल करत, आदिवांसीना 'आपण याला पाहिलंत का विचारत' हे फिरतात. वाघांची शिकार करणार्‍या प्रसिद्ध अशा एका अदिवाश्याला ते भेटतात, कदाचित याने शिकार केली असेल? २०० मैल गेल्यावर त्यांना एका मानवी वस्तीतल्या म्हातार्‍या आजीने ब्रोकन टेलला पाहिल्याची खबर कळते. आजीने पाहिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सकाळी एका भरधाव रेल्वेखाली येऊन ब्रोकन टेलचा मृत्यु झालेला असतो. ब्रोकन टेलला शेवटचं पाहणारी ही म्हातारी हे जाणवल्यावर कॉलीनच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत.

तो या मार्गाला का लागला असेल, तो परत का फिरला नाही, एखाद्या वाघीणीच्या 'नादाने' तर तो भरकटला नव्हता असे प्रश्न हे दोघांना सतावत राहतात. डोंगरावरून खाली रुळांकडे जाण्यार्‍या डोंगरउतारावर ते ब्रोकन टेलची शेवटची वाट कशी असेल याचा माग घ्यायचा प्रयत्न करतात. जिथे तो मेला होता त्या जागेवर दोघे जण घुटमळतात. हे सगळं खोटं असावं असंच त्यांना मनोमन वाटत असावं. शेवटी सलिम जवळील रानटी फूलं आणून, उदबत्ती लावून ब्रोकन टेलला श्रद्धांजली देतो. या दोघांनी त्यांच्या कुटुंबातलाच सदस्य गमावला आहे याची खात्री आपल्याला तिथे पटते.

इतर दोनांबद्दल सवडीने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

'शाळा' शनिवारी पुण्यात ई-स्क्वेअरमध्ये पाहिला. आवडला हे वेगळे सांगायला नकोच! कॅमेरा हाताळणी आणि काही दृश्ये यांनी तर वेडंच केलं. विशेषतः पहाटेचे खेड्याचे दर्शन!
बर्‍यापैकी लोक होते! डायलॉगला शिट्ट्या मारणे वगैरे देखील भरपूर चालू होते. माझ्या कादंबरी न वाचलेल्या मित्रांनाही आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवाच शेरलॉक होम्स २ पाहिला. पहिल्या भागाशी तुलना करता खास आवडला नाही. चित्रपटाच्या शेवटी शेवटी होम्स आणि मॉरियार्टी यांनी मनातल्या मनात केलेली लढाई ही एकच गोष्ट खूप आवडली. बाकी एक-दोन कल्पना चमकदार होत्या पण एकूण परिणाम फार चांगला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

नुकताच कॅलिडोस्कोप हा नृत्यमहोत्सव पाहण्याची संधी मिळाली. हा नृत्यमहोत्सव तीन सत्रांत सादर करण्यात आला. दुर्दैवाने मला एकच सत्र पाहणे शक्य होते, पण एकाच सत्रावरून एकंदरीत कार्यक्रम किती रंगतदार असेल त्याची कल्पना आली. या कार्यक्रमाची माहिती पुढीलप्रमाणे:
Kaleidoscope 2012
Sun Jan 15 2012 at 09:00 am
Venue : Yashwantrao Chavan Natyagraha, Kothrud, Pune.

२०११ साली या कार्यक्रमाची निर्मीती झाली. हे दुसरे वर्ष. वेगवेगळ्या भारतीय नृत्यशैलींचा रसीकांना एकत्रीतपणे लाभ घेता यावा, ओळख व्हावी, नृत्यांगनांना इतर शैलींमधून काही नवे शिकता यावे, या हेतूने या महोत्सवाची निर्मीती झाली. यात सोलो नृत्ये नसून, सांघिक नृत्ये होती.

मी पाहिलेल्या सत्रात अनुक्रमे एक भरतनाट्यम(मधुरा खिरे), एक कथक(ऋजुता सोमण) आणि एक ओडिसी(माधवीताई मुद्गल) नृत्यरचना सादर करण्यात आल्या. वाढत्या भाजणीने कार्यक्रम रंगला.

भरतनाट्यम नृत्याचा विषय होता रंग. सुर्यस्तुतीपासून(सोनेरी/पिवळा रंग) सुरुवात होऊन रंग आणि भाव-भावनांचे नाते उलगडत कार्यक्रमाची सांगता परत सुर्यस्तुतीने
झाली.

कथक नृत्याचा विषय होता, श्रीकृष्ण संकिर्तन. अवध्या एका तासात, अनेक कृष्ण्कथा किर्तन, कवीत, परन यांच्या जोडीने गुंफल्या होत्या. यात बालकृष्णाच्या माखनचोरीपासून, शेवटच्या गीतोपदेशाचा समावेश होता. उत्तम संकल्पना उत्तम पध्द्तीने अमलात आणली होती. जवळ-जवळ १५ कलाकारांचा ताफा असतानाही synchronization लक्षणीय होते. शेवट पदन्यासाने झाला.

पहिल्या दोन आविष्कारांचा प्रभाव पार धुवून टाकला तिसर्‍या आविष्काराने. ओडिसी नृत्यशैलीत कुमार-संभवम नाटकातील काही भाग सादर करण्यात आला. ओडिसी नृत्यशैली ही तुलनेने थोडी संथ आणि मृदु शैली आहे. यात synchronization करणे अधिक अवघड. कुठेही बोट ठेवायला जागा मिळू नये इतके सुंदर synchronization होते! अभिनय, मुद्रा, पदन्यास postures सारेच दोषरहित! या तिसर्‍या आविष्काराने सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमाला उत्तरोत्तर जास्त प्रतिसाद मिळो ही सदिच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाभ्रीचा पाऊस पाहिला. काय वाटलं ते शब्दात पकडता येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला, नाही आवडला, थोडा-थोडा आवडला? शिफारस करावीशी वाटते, नाही, माहित नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

करूण विनोद म्हणजे काय याचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट म्हणजे.
अवश्य पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलिकडे मिशन इंपोसिबल-घोस्ट प्रोटोकॉल पाहिला. दुबईमधले सर्वच सीन अविस्मरणीय.
त्यापाठोपाठ शाळा पाहिला. सुंदरच चित्रपट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

काल, लॉस्ट ईन स्पेस पाहिला. काही खास नाही वाटला. ५ पैकी १ अंक देऊ शकतो, ते पण डिजिटल वर्क साठीच.
त्याच्या आधी काही दिवस दोन नितांत सुंदर चित्रपट पाहिले राशोमान & फॉलोइंग. व आज परत inception पाहण्याचा मुड आहे रात्री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

२६ जानेवारीला "उर्जा" कार्यक्रम चिंचवडला बघितला, तबल्यावर झाकीर हुसेन, शेंब्यावर (Djembe) तौफिक कुरेशी, सतारीवर निलाद्री कुमार आणि सारंगीवर दिलशाद खान असे बापलोक होते, ह्या लोकांना कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मिशन इंम्पोसिबल-४':-एक तद्दन मारधाड पट, खरंतर ह्या चित्रपटाचा पहिला भाग साधारण जेम्स बॉन्ड चित्रपटांच्या धाट्णीचा होता,आवडलाही होता. 'मिशन इंम्पोसिबल-४'-तसाच पण म्हातार्‍या हीरो ला धावताना,पडताना,उडताना पाहुन यथातथाच वाटला.

'आरक्षण्'-हिंदी -आरक्षाणाचा मुद्दा आणि राजकीय रणधुमाळी..नविन काहीच नाही,तेच ते चर्वण वेगवेगळ्या कलाकारांबरोबर्.असे चित्रपट बघुन नेहमी असं वाटतं कि सेन्सोर बोर्डमध्ये असाही एक विभाग असावा,'जुन्या चावुन चोथा झालेल्या कथांना वेगळेपण सिद्ध करण्यासाठी कडक नियम'.

'द हेल्प':- १० पैकी ८ गुण.अमेरिकेत साधारण १९६० आसपास च्या सुमारास घडणारा.स्थळ-जॅकसन (शहर), मिसिसीपी (राज्य.चित्रपट माध्यमांसाठी विषय तसा नवा नाही,परंतु त्या सगळ्यांमधुन ठसठशीत पणे वेगळेपणा सिध्द केलेला वाटला. वेगळेपणाच्या ठळक घडामोडी अश्या:- कथेची सुरुवात एका गोर्‍या अमेरिकन कुटुंबातुन होते, त्यामध्ये आई,वडील्,त्यांची छोटी मुलगी,त्या मुलीला सांभाळायला एक निग्रो-आफ्रिकन अमेरिक्न आया कम कामवाली.शोषण, अपमान, हीन वागणुक ह्या तर त्या समाजानी गृहीत धरलेल्याच गोष्टी होत्या, त्या विरुध्द जाउन आवाज उठवावा किंवा असा आवाज उठवु शकतो ह्याची नुकती कुठे जाणीव होउ लागलेला वर्ग.

चित्रपटा पुरता बोलायचं झाला तर, आवाजाची धार जास्त तीव्र होते जेव्हा अनेकींची कथा जशीच्या तशी पुस्तक रुपातुन बाहेर येते तेव्हा आणि ती पण एका गोर्‍या जर्नालिस्ट (मराठी शब्द-पत्रकार?)च्या धडपडितुन.

सर्व कलाकारांचे काम उत्कृष्ट.शोषितांचे अरण्यरुदन्,त्यांचा झालेला मानसिक छळ (घरी काम करणार्‍या काळ्या कामगारांसाठी वेगळे बाथरुम्.हा ही एक प्रकारचा मानसिक छळ म्हणुनच लेखिकेने आणि दिग्दर्शकाने मांडला आहे)
प्रस्थापितांचा त्रागा,तन,मन्,धनावर मालकी गाजवाय्ची मानसिकता खुपच प्रभावी पणे दाखवलि आहे.
एकदा तरी जरुर पहावा असा चित्रपट.

--मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज अग्निपथ पाहिला
ह्रतिक रोशनच काम छान झालय
तसाही तो आवडता असल्याने त्याला दहापैकी दहा मार्क
संजय दत्तने रंगवलेला कांचा चीना अप्रतिम
रुषी कपूरच कामही छान आहे
जुन्या अग्निपथपेक्षा नव्याचा प्लाट बराच वेगळा आहे
मिथुन चक्रवतीचं कृष्णन अय्यरच पात्र यात नाही
एकदरीत एकदा बघण्यास हरकत नाही

टाँम क्रूझचा एम आय पाहिला ठीक वाटला

राहुल बोसचा भारतीय लष्कराच्या काश्मीरमधल्या अत्याचारावर(?) आधारित असलेला शौर्य बघितला
नक्की काय भूमिका हे कळत नाही
मनातल्या लष्कराची सँव्हिअर प्रतिमेने थोडी चलबिचल होते
एकुणात गोँधळ उडालेला आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

शौर्य हा चित्रपट टॉम क्रूझ आणि डेमी मूर यांच्या 'अ फ्यू गुड मेन' या अमेरिकी लष्करात केल्या जाणार्‍या वर्णभेदाबद्दलच्या चित्रपटाची सरळसरळ नक्कल आहे. राहुल बोसचे काम खूप छान झाले आहे. पण अमेरिकेतल्या वर्णभेदापेक्षा भारतात असलेली दोन धर्मांमधली तेढ वेगळ्या प्रकारची आहे असे वाटते. एका द्वेषाच्या जागी दुसरा द्वेष ठेवला की काम झाले असे दिग्दर्शकाला वाटत असले तरी प्रत्यक्षात चित्रपटाची भट्टी जमली नाही असे मलाही वाटले. चित्रपटात असा एक प्रसंग आहे की एका पात्राचे वडील ब्रिगेडियर या हुद्द्यावर असताना काश्मीरमधल्या ताबारेषेवर चकमकीत मारले गेले आणि त्यांना पदक मिळाले. काश्मीरमधे ताबारेषेवर लढायला ब्रिगेडियर पदावरचे अधिकारी प्रत्यक्ष जातात हे माझ्या तुटपुंज्या ज्ञानाच्या बळावरही पटणे अशक्य वाटते.
अशी डोळे मिटून नक्कल करण्यापेक्षा कमल हसनसारखे एखाद्या संकल्पनेचे रूपांतर का केले जात नाही असा मला प्रश्न पडला आहे. अशाच रूपांतराचे एक जमलेले उदाहरण म्हणून परिचय य चित्रपटाचे नाव घ्यावेसे वाटते. असे प्रयोग आपल्याकडे कधी वाढीस लागणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

शौर्य हा चित्रपट टॉम क्रूझ आणि डेमी मूर यांच्या 'अ फ्यू गुड मेन' या अमेरिकी लष्करात केल्या जाणार्‍या वर्णभेदाबद्दलच्या चित्रपटाची सरळसरळ नक्कल आहे.

बाकी सगळं एकवेळ आम्ही सहन करूनही घेऊ. पण फक्त "You want me on that wall, you need me on that wall" ज्या पद्धतीनं जॅक निकोल्सन म्हणतो त्याच्या एक दशांश क्वालिटीनं म्हणणारं कोणी या पृथ्वीतलावर असतं तर आम्ही सिनेमा पहायचा विचार तरी केला असता...

ज्या केविलवाण्या जीवांनी हा संवाद आधी ऐकला नसेल त्यां करता: http://www.youtube.com/watch?v=5j2F4VcBmeo

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

बाकी सगळं एकवेळ आम्ही सहन करूनही घेऊ. पण फक्त "You want me on that wall, you need me on that wall" ज्या पद्धतीनं जॅक निकोल्सन म्हणतो त्याच्या एक दशांश क्वालिटीनं म्हणणारं कोणी या पृथ्वीतलावर असतं तर आम्ही सिनेमा पहायचा विचार तरी केला असता...

सहमत आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--
सस्नेह,
अदिति
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात||

+ त्याचे सगळे डॉयलॉक जबर होते, "ऑफर मी सम कर्टसी", "यु वॉन्ट मी ऑन दॅट वॉल"...टॉम क्रुझ थोडासा शाहरुख खान टैप (ओव्हर कॉन्फिडंट्)..पण शौर्य वगैरे तद्दन बकवास कॉपी होते असे माझे प्रामणिक मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक्झटली
मलाही हेच वाटल चित्रपट बघून
राहुल बोस आणि के के मेनन सुसह्य ठरतात

जावेद जाफरी आणि मिनिशा लांबा नक्की काय करतात हा प्रश्नच पडतो

शेवटच्या लष्करासंबंधी पाट्या तर विनोदी वाटतात

बाँलिवूडवाल्याना धड काँपी देखील करता येत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

>>> मिनिशा लांबा नक्की काय करतात हा प्रश्नच पडतो

हा हा हा हा!!
चित्रपट तुम्ही किती पाहिला, ते समजले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

राजे तिला काय भूमिका दिली आहे ह्याचाच दिग्दर्शकाला विसर पडला आहे अस वाटतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

ती काय माझी खूप आवडती नटी आहे, इत्यादी काही भाग नाही.
पण तीचे काम चित्रपटात महत्त्वाचे आहे.

* बाकी चित्रपट चोरलेला आहे, कॉपी आहे इत्यादी मुद्दावर एकच मत मांडतो.
हिंदी चित्रपट पहाणे बंद करा, कारण ९९% चोरलेलेच असतात...!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

सध्या शेरलॉक या सिरिजचा दुसरा सिझन बघत आहे. एक एक भाग हा दिड तासाचा म्हणजेच चित्रपटाच्या लांबीचा आहे.
त्याच सोबत सध्या हाउस एम डी चे काही भाग बघत आहे. हाउस आणि होम्स यांचा कार्यपद्धतीत बरेचसे साम्य आहे. या सिरीज मधे ग्रेगरी हाउस हा एक विक्षिप्त डॉक्टर काही तज्ञ डॉक्टरांची डाय्ग्नोस्टिक टिमचे नेतृत्व करतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल टीव्हीवर एकिकडे मुन्नाभाई आणि एकीकडे हरीपुत्तरचे गॉब्लेट ऑफ फायर बघितले. दोन्ही करमणूकप्रधान असल्याने त्यात आवड-नावडीपेक्षा वेळ मस्त गेला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यावर एकमत झालेलं दिसत नाही (याला आम्ही भांडण म्हणतो हा भाग निराळा) ... पळा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

(यावेळी तसं नव्हतं Wink ) १० मिन्टांच्या ब्रेकला सत्कारणी लावायची ही खेळी आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'अल्बर्ट नॉब्ज' पाहिला. ग्लेन क्लोजला यातल्या अभिनयासाठी ऑस्कर नामांकन आहे. पटकथा काहीशी रचलेली पण रोचक आहे. स्वतःच्या भावना-इच्छांना दाबून ठेवल्यामुळे किंवा आयुष्यात आपल्याला नक्की काय हवं आहे ते नीट ओळखता न आल्यामुळे माणसांची होणारी फरफट परिणामकारकरीत्या दाखवली आहे. काहीसा असा विचार मांडणारा, याच काळाच्या आसपास आणि आयर्लंडच्या जवळ (इंग्लंडात) घडणारा, नोकरांच्याच पार्श्वभूमीचा (पण खूप वेगळं कथानक असणारा) 'रिमेन्स ऑफ द डे' हा काझुओ इशिगुरोच्या कादंबरीवर आधारित चित्रपट त्या निमित्तानं आठवला (अँथनी हॉपकिन्स आणि एम्मा थॉमसन). अगदी हॉलिवूडचा मसाला नको असेल, पण तरीही घट्ट (आणि सोयीस्कर योगायोगाच्या) कथानकानं प्रेक्षकांना बांधून ठेवणारा गंभीर चित्रपट पाहायचा असेल तर एकदा पाहायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Gentleman's Agreement पाहिला अफलातून चित्रपट आहे.
नक्की बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*******************
Evey, please. There is a face beneath this mask but it's not me. I'm no more that face than I am the muscles beneath it or the bones beneath them. -V (V for Vendetta)

मिडनाईट इन पॅरिस (वुडी अ‍ॅलनचा). कथाबीज साधेसोपेच आहे. पण पटकथा, संवादांच्या खुबींमुळे रंगतदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हल्ली फक्त राम राम महाराष्ट्र हा कार्यक्रम न चुकता पाहातो.
त्यात वाढदिवसाच्या शुबेच्छा असतात.
अगदी नॉन इनविसेव कार्यक्रम.
१ वर्षाच्या बालकांचे फोटॉ तर मस्तच.
४वर्ष + च्या बालकांचे(ह्यात तरुण तरुणी पण) च्या विविध पोझेस करमणुक करुन जातात.
शुभेच्छुक म्हणुन मालवण ची आज्जी आणि कोल्हापुर ची आत्याचा उल्ल्खेख तर अगदी मजेदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मास्तर
ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

क्रिस्टोफर नोलनच्या बॅटमॅनच्या सिरीजमधील शेवटचा चित्रपट "डार्क नाईट रायजेस" काल शेवटी घरच्या टिव्हीवर पाहिला. सुमारे चार वर्षांपूर्वी याच सिरीजमधला "द डार्क नाईट" पाहिला होता. "डार्क नाईट रायजेस" बद्दलचं हे http://apalacinemascope.blogspot.com/2012/07/blog-post_23.html उत्तम परीक्षण वाचल्यानंतर खरं तर याहून अधिक आणि चांगलं काय लिहिणार ? तरी आपले दोन पैसे टाकतोच.

वर दिलेल्या दुव्यातलं परीक्षण हे "सुपरहिरो" आणि त्याच्याशी संबंधित कथासूत्रे यांची काही तत्वे मान्य करून मग लिहिलेले आहे. त्यामुळे ते सुसंगत आहे, चांगलं लिखाण आहे. आमची गाडी त्या मूळ "मान्य करायच्या" तत्वांमधेच आधी अडकलेली आहे.

उडणारी यानं, अतिमानवी शक्ती असलेले हिरोज् (आणि हिरविणी) , चमत्कृतीपूर्ण ग्राफिक्स आणि स्टंट्स यामुळे हे प्रकार प्रेक्षणीय होतात. "प्लॉट प्वाईंट्स", त्यातली गुंतागुंत, त्यातली नैतिक (!) ओढाताण हे सगळं तोंडी लावण्यापुरतं आहे असं या उपरोल्लेखित गोष्टींमुळे वाटतं. संकटात सापडलेली शहरं, "दूष्ट" आणि अतिशक्तिशाली व्हिलन आणि त्यातून सोडवणारा सुप्परहिरो. तोच तो "सुष्ट विरुद्ध दुष्ट" हा झगडा. त्या सुप्परहिरोकडे ज्या शक्ती आणि यंत्रं आहेत ती पहाता तो या "दूष्टां"चा नायनाट साधारण साडेतीन मिनिटांत करू शकतो, मग त्याकरता ही सर्व फोडणी कशापाई ? सुप्परहिरो आपल्या प्रेयसीच्या दु:खात आठ वर्षं घरात कोंडून घेतो, तो उदास, एकाकी असतो आणि एकंदर हास्यविनोदाचे त्याला एरवीदेखील वावडेच आहे आणि मानवजातीवर संकट आल्यावर तर काय पहायलाच नको.

असो. "सुप्परहिरोचा मानवी चेहरा आणि गुंतागुंत" यातच काहीतरी मूलभूत विसंगती आहे. तिलाच सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ , अ‍ॅक्सेप्टन्स ऑफ् सम प्रेमिसेस अशी नावं असावीत. आमचे म्हणणे : सुप्परहिरोंनी वृथातात्विक कितपत व्हावे ? या चित्रपटांमधील चमत्कृतींपेक्षा त्यातली वृथातात्विकता अधिक मनोरंजक ठरते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

समहत.

सिरीजमधला दुसरा भाग आवडला असल्याने ह्या भागाबद्दल विशेष उत्सुकता होती, पण निवडलेल्या कथेमधेच दम नसल्याने पोहर्‍यात फक्त गाळच आला, पुढे ह्या गाळाचं जरा बरं प्रदर्शन नोलन ह्यांनी करावं अशी अपेक्षा होती पण त्यांनी गाळात भर टाकल्याचे जाणवतं, निदान जरा भपकेबाज संवाद तरी असावेत...पण छे!.

थोडंफार मनोरंजन झालच तर ते कॅटवुमनमुळं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडंफार मनोरंजन झालच तर ते कॅटवुमनमुळं होतं.

मला कॅटवुमनचे पात्र अजिबात समजले नाही. नक्की तिला काय हवं आहे ते कळत नाही. बेनचे पात्र मात्र फारच आवडले. विशेषतः त्याचा आवाज. जोकरशी तुलना होऊ शकत नसली तरी बेनची व्यक्तिरेखा अत्यंत सशक्त व काही काळ तरी आठवणीत राहणारी वाटली. जोवर बेन पडद्यावर दिसतो तोवर दुसऱ्या कोणाकडे लक्ष जात नाही. चित्रपटाचा मध्यंतरानंतरचा भाग जरा रटाळ वाटतो. शिवाय मध्यंतरानंतरचे सगळे स्टंट ते विमानच करते, विमानात अगदी गॉर्डन जरी असता तरी चालले असते. तिथे बॅटमॅनची गरज नाही. दुसऱ्या भागात गॉर्डनने आणि तिसऱ्या भागात कॅटवुमनने ही सगळी गॅजेटे लीलया हाताळली आहेतच.

तिसऱ्या भागातला आणखी न समजणारा संदर्भ म्हणजे इतकी सगळी अनाथ मुले बेनने गोळा करेपर्यंत पोलीस खाते झोपले होते काय? ह्या सगळ्या गॉथमच्याच भरकटलेल्या नागरिकांना अणुबाँबचे तोटे आणि बेनला आपण देत असलेला पाठिंबा यात काही वावगे दिसले नाही काय? आणि एवढी सगळी शस्त्रे त्यांच्याकडे कोठून आली? विशेषतः गेल्या सहासात वर्षात हार्वी डेन्ट ऍक्टान्वये गॉथम शहरातील संघटित गुन्हेगारी जवळपास संपली असताना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वन्स अपॉन अ टाइम इन अमेरीका बघीतला २ आठवड्यापूर्वी. Sergio Leone चा आहे, ४ तासाचा आहे. बराच चांगला आहे, पण बरेच shot छोटे करता आले असते.

The Iron Lady बघितला. बरा आहे, Meril strip ने कमाल केली आहे पण सिनेमा पकडुन ठेवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सचिन कुंडलकरचा 'रेस्टॉरन्ट' बघितला.
पुन्हा एकदा अय्या जाणवला होता तसा वापरलेल्या प्रतिकात्मकतेत आणि फ्रेम्सच्या टापटिपित वेगळा दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवला.
चित्रपट आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुठून मिळवलात? मला कवाधरनं बघायचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला एका मित्राने दिला. त्याने टोरेन्टवरून उतरवला होता..
त्याना गाठुन लिन्क असेल तर बघतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपलीमराठी डॉट कॉम वर हा चित्रपट आहे असे दिसते. मी पाहिला नाही पण निदान त्याचे नाव तरी दिसत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मैने गांधी को नहीं मारा' पाहिला. यातला कोर्टातला शेवटचा प्रचारकी प्रसंग वगळता बाकी संपूर्ण चित्रपट आवडला.

थोडक्यात सांगायचं झालं तर ही गोष्ट आहे वाढत्या वयात स्मृतीभ्रंश झालेल्या वडलांची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करणार्‍या एका मुलीची. उर्मिला मातोंडकर आणि तिच्या वडलांच्या भूमिकेत अनुपम खेर या दोघांनीही फार चांगलं काम केलं आहे. बालवयात वडलांनी मारल्याचा परिणाम प्रा. चौधरींवर स्मृतीभ्रंश झाल्यानंतर झालेला दिसतो. वडलांचा स्मृतीभ्रंश दूर होईल अशा भ्रमात त्यांची मुलगी त्रिशा नसते; पण निदान आपण गांधीजींना मारलं या किटाळात त्यांनी स्वतःला अडकवलेलं आहे, त्यातून त्यांची सुटका व्हावी अशी तिची इच्छा असते. समाजात म्हातार्‍यांना, आणि त्यातून काही मानसिक विकार असणार्‍यांना खालच्या प्रतीची वागणूक मिळते, प्रसंगी घरातले लोकही हातपाय गाळतात, कधी कोणी बाहेरचाही अशा प्रसंगात आपला होऊन जातो अशा प्रकारचा हा ड्रामा आवडला. शेवटची प्रचारकी डायलॉकबाजी टाळली असती तर ते अधिक शोभून दिसलं असतं.

---

'अमरिका' नावाचा पॅलेस्टीनी-अमेरिकन चित्रपट पाहिला. त्यात बरेच प्रसंग आहेत पण फार काही होत नाही. पॅलेस्टीनी लोकांना स्वतःच्याच भूमीत उपर्‍यांचं जिणं जगावं लागतं. संधी आहेत, समानता आहे, निदान काही पॅलेस्टीनी लोकांनाही ते मिळावं अशी इच्छा अमेरिकी सरकारही दाखवतं म्हणून मुना आणि तिचा मुलगा फॅऽदी अमेरिकेत येतात. त्यांना काही चांगले लोक भेटतात, काही त्यांना दहशतवादी समजणारे, हीन वागणूक देणारे. तरीही आयुष्य सुरूच रहातं.

हे दोन्ही चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>'अमरिका' नावाचा पॅलेस्टीनी-अमेरिकन चित्रपट पाहिला. <<<

हा मला आवडला होता. "फील गुड" सिनेमा आहे. पण त्यातला प्रामाणिकपणा आवडलेला होता असं आठवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चिंतातुर जंतू यांनी लिहिलेल्या या इराणी चित्रपटविषयीचा धागा वाचल्यापासून हा चित्रपट पहाणे योजलेले होते. ((http://www.misalpav.com/node/19338) ) शेवटी परवा हा योग आला.

मूळ धागा (नेहमीप्रमाणेच) नेमकं ते सांगणारा, आशयसूत्रांची कल्पना देणारा परंतु कथानकातले कळीचे मुद्दे देऊन रसभंग न करणारा आहे. त्याउप्पर नवे लिहिण्यासारखे खरे तर माझ्यापाशी नाही. पण चित्रपट पहाताना मला जाणवलेले मुद्दे मांडतो.

मी पाहिलेला हा पहिला इराणी सिनेमा. इराणबद्दलच्या प्रचारकी चित्रांना तडा देणारा, त्या प्रचारामधला फोलपणा अधोरेखित करणारा मला वाटला. इराणमधलं धर्माचं समाजातलं स्थान, स्त्रियांचं समाजातलं स्थान याचं पाश्चात्य मिडियात होणारं चित्रण एकांगी आहे. त्याला छेद देणारं यथार्थ चित्रण वाटलं. एकाच वेळी त्या समाजात आपल्या साध्या विचारांवरही पापाची सावली न पडण्याची काळजी घेणार्‍या - आणि पेशंटची काळजी घेण्यासंदर्भातही पापाची शंका आल्यावर मुत्तव्यांना फोन करणार्‍या - स्त्रिया आहेत, तिकडेच (घराच्या प्रायव्हसीमधे) स्मोकिंग करणार्‍या, गाडी चालवणार्‍या , घटस्फोटाची मागणी करू शकणार्‍या स्त्रियांचा वर्गदेखील आहे.

इराणच्या न्यायव्यवस्थेचं चित्रण मात्र मला भयप्रद वाटलं हे मान्य करतो. पुन्हा एकदा, इथे पाश्चात्य मिडीयात रंगवल्याप्रमाणे मध्ययुगीन न्यायव्यवस्था आहे या समजाला छेद बसतो. परंतु, "इन्स्टंट जस्टीस" ची इराणी आवृत्ती मला भीतीप्रद वाटली. एका टीचभर खोलीत फिर्यादी, आरोपी , न्यायाधीश आणि पोलीसाचा एक माणूस ( आणि एक लेखनिक) बसतात, फिर्यादी, आरोपी आपापली बाजू आपण मांडतात , It is your word against my word. तिथल्या तिथे पुढील साक्षीदाराना पाचारण केलं जातं आणि एकंदर न्यायदानाचा खेळ काही दिवसांत खलास. हे सगळं विशेषतः भारतीय न्यायप्रक्रियेच्या भीषण कूर्मगतीच्या संदर्भात आकर्षक वाटतं खरं, पण एकंदर प्रक्रियेतील शिस्तीचा, संदर्भाचा अभाव, या प्रक्रियेचं Ad Hoc असं स्वरूप मला भीतीदायक वाटलं. एका जज्जला साधारण एका सेशन मधे जे वाटेल तो जवळजवळ अंतिम न्याय.

चिंतातुर जंतूंच्या मूळ धाग्यात कुटुंबव्यवस्था, पुरुषप्रधान घडी, धर्माचा पगडा या गोष्टी आलेल्या आहेतच. मात्र हे पुन्हा एकदा मान्य करायला हवं की चित्रपटातलं या गोष्टींचं अस्तित्व बिलकुल बटबटीतपणे आलेलं नाही. घडलेल्या घटना म्हण्टल्या तर काही व्यक्तींच्या आयुष्यात घडलेले काही अपघाती स्वरूपाचे एपिसोड्स आहेत. पण त्यामागे अपरिहार्यपणे कार्यरत असलेली यंत्रणा आपल्याला जाणवत रहाते. हे या चित्रपटाचं मोठं यश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जीन हॅकमनची प्रमुख भूमिका असलेला, कपोला-दिग्दर्शित "द कॉन्व्हर्सेशन".

लोकांची खासगी संभाषणे ऐकण्याच्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक असलेली व्यक्ती जेव्हा "टारगेट" व्यक्तींच्या आयुष्यामधे गुंतत जाते तेव्हा काय घडतं ? हा सिनेमाचा विषय. १९७४ साली आलेल्या नि गाजलेल्या या सिनेमाचं कथानक आणि इतर आशयसूत्रे इथे देण्याची गरज नाही. जीन हॅकमनची सर्वोत्कृष्ट भूमिका असं अनेक जण या रोलबद्दल मानतात. मला जाणवलेले काही मुद्दे मांडतो.

१. सर्व्हेलन्स, वायरटॅप या विषयांवरचा हा सिनेमा १९७४ साली बनवताना वॉटरगेटचे संदर्भ तर बनवणार्‍यांच्या मनात अगदी ताजे असणार. त्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा त्या काळात लोकांनी कसा स्वीकारला असेल याबद्दल मला जबरदस्त कुतुहल आहे. (सिनेमात एके ठिकाणी निक्सनचा - बहुदा त्याच्या राजीनाम्याचा - संदर्भ येतो)

२. "लाईव्ज ऑफ द अदर्स" हा जर्मन सिनेमा आठवणं अपरिहार्य आहे. शीतयुद्धाच्या काळात, पूर्व जर्मनीतल्या राजवटीदरम्यान "संशयितां"वर नजर ठेवणारा "सर्वेलन्स ऑपरेटर" त्यांच्या आयुष्यात गुंतत जातो . (म्हणूनच सिनेमाचे शीर्षक "इतरांची आयुष्ये")

३. १९९८ साली आलेल्या "एनिमी ऑफ द स्टेट" या चटपटीत, मसालेवजा थ्रिलरचा विषयही सर्व्हेलन्स्च्या अनैतिक वापराबद्दलच. त्यातही हॅकमन येतो आणि रिटायर झालेल्या "सर्व्हेलन्स एक्स्पर्ट"च्या भूमिकेत दमदार कामगिरी करून जातो. भूमिका तीच. पण दोन चित्रपटांच्या प्रकृतीमधे जमीनअस्मानाचा फरक. "द कॉन्व्हर्सेशन" व्यक्तीच्या मनातल्या गहिर्‍या स्तरांपर्यंत पोचणारा तर "एनिमी.." म्हणजे चटपटीत थ्रिलर. असो.

४. जुन्या काळातले सिनेमे हे आजकालच्या चकचकीत, "स्मार्ट" ट्रीटमेंटच्या तुलनेत "साधे" असतात (जरी त्यांचा विषय तंत्रज्ञानाचा असला तरी.). ते पहाताना या साधेपणामुळे , "मिनिमालिजम"चा निराळ्या अर्थाने प्रत्यय येतो. (मला माझं हे विधान कुणा अन्य अनुभवी प्रेक्षकाकडून तपासून पाह्यला आवडेल. )

परिशिष्ट : नुकतीच विकीएंट्री वाचली त्यात प्रस्तुत सिनेमाची पटकथा १९७०च्या आधीच तयार होती आणि वॉटरगेटमधे जे घडलं त्याचा नि चित्रपटातल्या गोष्टींचा अत्यंत जवळचा संबंध असणं हा निव्वळ योगायोग होता असं कपोला यांनी म्हण्टल्याचं वाचलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

जुन्या काळातले सिनेमे हे आजकालच्या चकचकीत, "स्मार्ट" ट्रीटमेंटच्या तुलनेत "साधे" असतात (जरी त्यांचा विषय तंत्रज्ञानाचा असला तरी.). ते पहाताना या साधेपणामुळे , "मिनिमालिजम"चा निराळ्या अर्थाने प्रत्यय येतो. (मला माझं हे विधान कुणा अन्य अनुभवी प्रेक्षकाकडून तपासून पाह्यला आवडेल. )>>सध्या जी स्मार्ट ट्रीटमेंट आहे, ती म्हणजे हजारो छोटे छोटे शॉट्स, हलते कॅमेरे, वेडेवाकडे अँगल्स. कधीकधी बघुन सुद्धा डोळ्यांना त्रास होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'वन्स' हा चित्रपट पाहिला. साधा पण सुंदर आहे. आवडला..गाणी अतिशय आवडली. सी डी विकत आणली लगेचच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाणी वगैरे बघून चुकून वन्सं असं वाचलं.म्हटलं अलका कुबल यांचा नवीन चित्रपट आला की काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>>म्हटलं अलका कुबल यांचा नवीन चित्रपट आला की काय. <<<<

___________/\_________

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>४. जुन्या काळातले सिनेमे हे आजकालच्या चकचकीत, "स्मार्ट" ट्रीटमेंटच्या तुलनेत "साधे" असतात (जरी त्यांचा विषय तंत्रज्ञानाचा असला तरी.). ते पहाताना या साधेपणामुळे , "मिनिमालिजम"चा निराळ्या अर्थाने प्रत्यय येतो. (मला माझं हे विधान कुणा अन्य अनुभवी प्रेक्षकाकडून तपासून पाह्यला आवडेल. ) <<

'कन्व्हर्सेशन' हा माझा अतिशय आवडता सिनेमा आहे. आशयाच्या बाबतीत म्हणायचं तर तो अजिबात 'साधा' नाही. त्या तुलनेत आजकालचे अमेरिकन सिनेमे फार कचकड्याचे आणि दरिद्री वाटतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"द बॉय वुइथ स्ट्राईप्ड पजामाज्" : ज्यू हत्याकांडाची पार्श्वभूमी असलेला आणखी एक चित्रपट.

छळछावणीचा प्रमुख असलेल्या एका नाझी अधिकार्‍याचं कुटुंब. त्यातले ताणेबाणे. त्यातला एक आठ वर्षांचा मुलगा. त्याचं निर्व्याज जग. ज्या घरात ते रहातात त्याच्या आजूबाजूला कुणाचंही घर नसल्याने मुलाला कुणीही मित्र नसणं. मग हुंदडताना छळछावणीच्या काटेरी कुंपणापलिकडाच्या एका ज्यू मुलाशी जुळलेली त्याची मैत्री. आणि शेवटी लागलेलं नाट्यपूर्ण वळण.

संपूर्ण चित्रपट लहान मुलाच्या दृष्टीकोनातून घडतो. मात्र शेवटच्या प्रसंगी मुलाच्या पर्स्पेक्टीव्हमधून सिनेमा प्रौढांच्या पर्स्पेक्टिव्हमधे जातो.

"होलोकॉस्ट" च्या थीमवर पुष्कळ चित्रपट आहेत. अन्य चित्रपटांचा पैस, त्यांच्यातली चित्रणं या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत चित्रपटाचं कथानक घडतं ते बराकीमधे नाही तर नाझी घरामधे. या बाबत हा चित्रपट वेगळा म्हणायला हवा. अंगावर शहारा येणारी चित्रणं, अमानवी हिंसेचं थैमान हे सारं यात नाही. त्यांचं सूचनच आहे. चित्रपटाची प्रकृती सौम्यच म्हणायला हवी. तरी आपल्या मर्यादित चौकटीमधे चित्रपट आवश्यक तो परिणाम साधतो. "रन ऑफ द मिल्" बनत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एकदाच पाहिला. दुसर्‍यांदा बघवत नाही. काही वेळाने डोळ्यांतल्या पाण्याने पडदा दिसेनासा होतो. अतिशय आवडूनही अतिशय कमी वेळा पाहिलेल्या चित्रपटांपैकी एक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

अमेरिकेतल्या विशीच्या आतल्या व्यक्तींमधे लोकप्रिय असलेल्या "द हंगर गेम्स" या कादंबरीमालिकेवरचा २०११ साली प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट.

चित्रपट निवडतानाच "हा चित्रपट काही आपल्याकरता नव्हे" याची मनोमन जाणीव होतीच. पण तरीही, टीनएजर्सना काय आवडतं ते पाहूया म्हणून मागवला.

काहीकाही बाबी अन्य अनेक चित्रपटांशी मिळत्याजुळत्या. उदाहरणार्थ "Post-apocalyptic , dystopian future" हा अमेरिकन (की अन्य देशातल्यासुद्धा ?) चित्रपटांमधला परिचित असा वर्ग आहे. प्रस्तुत चित्रपटाचा काळ आणि पार्श्वभूमी हीच. अशा या विपरित वातावरणामधे दर वर्षी काही लोकांना जंगलात सोडलं जातं आणि त्यांनी एकमेकांना मारून जो जिवंत राहील तो विजेता. कुठल्याशा वाईट श्रेणीच्या चित्रपटात हेही पाहिलं आहेच, की काही "कैदी" असेच जंगलात सोडले जातात आणि ते एकमेकांना मारतात. शेवटी "हिरो" जिवंत राहातो इत्यादि इत्यादि.

तर मग टीन-एजर्सनाच आकर्षण वाटेल असं काय ? तर यात असलेली नायिका आणि अन्य पात्रं विशीच्या आतबाहेरची आहेत. याखेरीज मला दुसरा कुठलाही, निव्वळ टीन-एजर्सना आकर्षित करणारा घटक जाणवला नाही. चूभूदेघे.

असो. चित्रपट काही अंशी मनोरंजक आहे परंतु प्रचंड मोठा गल्ला करावा आणि लोकप्रियतेचे उच्चांक मोडावेत असं नक्की काय, हे माझ्या न-टीन-एजर दृष्टीस दिसले नाही हे मान्य करतो.

अवांतर : हा विषय अगम्य नव्हे तर "सिमियॉटिक्स" या समाजशास्त्राच्या प्रशाखेच्या अंतर्गत येतो हे मला माहिती आहे. माझी वरील टिप्पणी निव्वळ विनोद म्हणून घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

त्या चित्रपटाची नायिका जेनिफर लॉरेन्स छान आहे. तिचा नुकताच आलेला सिल्वर लायनिंग प्लेबुकही छान रोम्यांटिक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपट पाहीला नाही पण तिन्ही पुस्तकं वाचली आणि आवडली आहेत. पहीलं पुस्तक सगळ्यात छान आहे.
१२ भुकेल्या स्टेटस् वर राज्य करणारी १३वी स्टेट 'केपिटॉल' ने, आपल्या श्रीमंत रहिवास्यांसाठी, प्रत्येक गरीब स्टेटमधुन १२ ते १८ वयाचा लॉटरी पद्धतीने काढलेला एक स्पर्धक, यांचा अरेँज केलेला रिअलिटी गेम शो आहे त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुतुहलापोटी विचारतो : ही पुस्तकं आवडली का ? मनोरंजनाबरोबर काही अन्य बोध त्यातून होतो का ?

हा विषय आला आहे म्हणून सहज सांगतो. आमचे चिरंजीव (यत्ता दुसरी) "ह्यारी पॉटर"च्या वयाचे - म्हणजे ते वाचायच्या वयाचे - झालेले आहेत. त्यांच्या निमित्ताने "हरिपुत्रा"चा पहिला भाग घरी आला. त्यातलं इंग्रजी नक्कीच सुबोध वाटलं. (पुस्तक मी किंचितच वाचलं. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हंगर गेम्स् सिरीज मधली पुस्तकं मला आवडली.
यंग अडल्ट फिक्शन बुक्स मधुन माझी अपेक्षा फक्त मनोरंजनाचीच असते. पण बोध वगैरे शोधायचाच म्हणलं तर मिळु शकेल.
एकाच मनोरंजन हे दुसर्यासाठी जगण्याचा झगडा असू शकतो, अन्न वाया घालवु नये, युद्धखोरी/ हुकुमशाही च्या विरुद्ध एकीने दिलेला लढा, बळी तो कान पिळी, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, एका हुकुमशहाला दुसर्या हुकुमशहाने रिप्लेस केल्यास सिस्टिममधे काही फरक पडत नाही इ...
सिंदबादच्या सात सफरी मधुन बोध मिळण्याची अपेक्षा असते का?
हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा बर्याच पालकांना तो १३ (की ११?) वर्षाँच्या मुलांसाठी अयोग्य वाटला, खूप व्हायोलन्समुळे..
यंग अडल्ट बुक्स हेरी पॉटर, ट्वायलाइट, हंगर गेम्स ही टिन्स साठी ठीक वाटतात. दुसरीतला मुलगा हेरी पॉटरच्या वयाचा असला तरी हेरी पॉटर वाचण्यासाठी लहानच आहे अजुन, असं माझं मत :-). तरी हेरी पॉटर ठिक आहे, पण हंगर गेम्स, ट्वायलाइट साठी तर कमीत कमी १३ वय हवंच.
सुबोध इंग्रजीबद्दल: मला बर्याचदा ब्रिटीश इंग्रजी अमेरीकन इंग्रजीपेक्षा सोपं वाटतं.
answers.yahoo.com/question/index?qid=20080128181321AAVr0lU ही एक चांगली लिँक मिळाली. 6th grade reading level म्हणजे सहावीतली मुलं (वय १२) वाचु शकतील तेवढं वाचन करणारा का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन तीन पुस्तकं खाल्लीत तुम्ही त्या 'हंगरची'?? माणूस आहात का कोण आहात? Wink च्यायला, आमचा एका शिनेमातच खुर्दा पडला ब्वॉ!! ही आजकालची टीनएजर पिढी काय वाचते अन काय पाहते... छ्या:!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

हा हा आमच्यासारख्या भुकेल्यांना चालतात हंगर गेम्ससारखी पुस्तकं खायला Smile
शिनेमा कसा बनवलाय माहीत नाही, पण पुस्तक वाचायला मला तर मजा आली बॉ. पहीलं पुस्तक तर खूप आवडलं. दुसरं तिसरं किँचीत बोअर झालं. एक्चुअली गेम्स चालु व्हायच्या आधीदेखील केटनीस जंगलात जाउन शिकार करुन आपलं आई बहिणीचं पोट कसं भरत असते. she's survivor that one... ते आवडलं मला. आणि चित्रपटात तिचा स्वतःशी संवाद कितपत दाखवलाय माहीत नाही. पुस्तकात ते सगळं नीट दिलेले असल्याने समजायला कठीण जात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>सिंदबादच्या सात सफरी मधुन बोध मिळण्याची अपेक्षा असते का? <<<
माझा "बोधा"बद्दलचा प्रश्न कथेच्या तात्पर्याला अनुलक्षून नव्हता. "हंगर गेम्स" वाचताना, तरुण पीढीला ही पुस्तकं का आवडली असतील अशा स्वरूपाचा बोध मला अभिप्रेत होता. असो.

"हॅरी पॉटर" यत्ता ६वी करताचा आहे ही माहिती मला नवीन आहे. आमच्या पोराला अधूनमधून शब्द अडत होते तेव्हा त्यातले काही त्याने मला विचारले. (त्याचा डिक्शनरी पाह्यचा आळस हा पिढीजाद आहे. ) पण एकंदर त्याला ते प्रकर्ण समजलं असावं असं मानायला जागा आहे. त्याने तो पहिला सिनेमाही आता पाहिलेला आहे. मीही थोडा पाहिला. अंमळ करमणूक झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

ओह.. ओके.. बोध म्हणल्यावर मला इसापनीती, पंचतंत्र, मॉरल ऑफ द स्टोरी वगैरे आठवलं...आणि उगाच हंगर गेम्स मधे बोध शोधायला लागले Biggrin
हअॅरी पॉटर, इयत्ता ६ वी बद्दल: मी दिलेल्या लिँक मधे answers.yahoo.com/ question/index?qid=20080128181321AAVr0lU विचारलेला प्रश्न आहे
Age range for Harry Potter? My 8-year old nephew is an avid reader. He reads on a 6th grade level already. Yes, I'm proud. I would love to buy him the first Harry Potter book. Too young?
त्यातल्या बेस्ट आन्सरशी मी सहमत आहे.
It would be fine to buy him the first one, but I must warn you that they get darker and darker with each book. My advice would be to give him only one book each year. That way he will be mature enough to handle the content....so on...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंकन आणि लाईफ ऑफ पाय नंतर अर्गो आणि झीरो डार्क थर्टी हे चित्रपट पाहिले. झीरो डार्क थर्टी फारच हाईप्ड आणि संथ चित्रपट वाटला. काही विशेष आढळले नाही. जाणकारांनी विश्लेषण करावे. अर्गो मात्र तुफान आवडला. बेन अफ्लेकने जोरदार काम केले आहे. चित्रपट शेवटापर्यंत खिळवून ठेवणारा आहे. शिवाय सत्तरीच्या दशकातले इराण-अमेरिका वगैरे पाहायलाही मस्त वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणेश मतकरी यांनी केलेले विशलेषण वाचले. (http://apalacinemascope.blogspot.in/2013/01/blog-post_27.html)

मात्र त्यांनी लिहिले आहे एवढे चित्रपटात आहे हे मला आता वाचूनच कळले. चित्रपट पाहताना एखादी रटाळ डॉक्युमेंट्री पाहत असल्यासारखे वाटत होते. असो. इथल्या सदस्यांचा या चित्रपटाबाबत काय अनुभव/प्रतिक्रिया?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ल मिझराब्ल पाहिला कालच. मस्त संगीतिका आहे एकदम. रसेल क्रो आणि वुल्व्हरीनचे काम करणारा अ‍ॅक्टर (नाव म्हैती नै) यांची कामे भारीच. कॉसेटचे काम केलेली अ‍ॅक्ट्रेस पण गोंडस एकदम. क्वचित कुठे बोअर झाला तरी एकूणात मस्त आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑ Hugh Jackman आणि Anne Hathaway यांचं नाव म्हैत नै म्हणता :O

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ ती कॉसेटची आई म्हंजे अ‍ॅन हॅथवे, कॉसेट नव्हे. अन वुल्व्हरीनवाल्याचे नाव खरेच माहिती नव्हते , धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा मलाही आवडला. मी ही कादंबरी वाचलेली नाही किंवा याआधी मला या प्रकरणाबद्दल ('ब्रिटन्ज गॉट टॅलेण्ट'चा व्हायरल व्हीडीओ वगळता) माहिती नव्हती.

ह्यू जॅकमन, अ‍ॅन हॅथवे, रसेल क्रो आणि एडी रेडमेन यांची कामं आवडली. कॉसेटचं पात्रच मला फार गोग्गोड इ. वाटल्यामुळे थोडं बोअर झालं. तिचा आवाजही फार आवडला नाही, त्याचंही कारण हा गोग्गोडपणा असावा. अ‍ॅन हॅथवेने म्हटलेल 'I dreamed a dream' त्यातल्या दु:खाच्या खरबरीत आवाजामुळे आवडलं.

या चित्रपटात जे पात्र येतं ते आपण कसे देवाचे माणूस आहोत, देव आपल्याच मागे आहे अशा प्रकारचा दावा करत बसतं. जाँ (ह्यू जॅकमन) सुरूवातीला कॉन्व्हेंटमधे जातो, तिथला फादर त्याच्याशी फार दयाबुद्धीने वागतो. त्यामुळे त्याने देवाबद्दल बरं बोलणं, त्याला स्वतःवर देवाचा अनुग्रह आहे असं वाटणं अस्थानी वाटत नाही. जावर्त (रसेल क्रो) हा तसा नियमांना चिकटून काम करणारा, कायद्यालाच देव मानणारा पण तरीही एकदा चोर तो नेहेमीच चोर अशा प्रकारची समजूत बाळगून असणारा. पण आपण करतो आहोत ते योग्यच आहे अशी त्याचीही खात्री असल्यामुळे तो ही देवाचं नाव घेत रहातो. फॅन्टीन (अ‍ॅन हॅथवे) ही गरीबीने पिचलेली, अतिशय हलाखीचं जगणं जगणार्‍यांमधली एक. दिसायला चारचौघींपेक्षा सुंदर एवढा फरक वगळता ती सामान्यांच्या पिचलेल्या आयुष्याची प्रतिनिधी. अर्थातच अशा दरिद्री आयुष्यात तिला देव हा एकमेव आसरा वाटतो. पुढच्या पिढीतला मारियस (एडी रेडमेन) हा क्रांतिकारकांचा प्रतिनिधी. या तरूणांना सामान्यांचे होणारे हाल बघवत नाहीत. मारियस हा खरंतर उमरावांच्या घरातला, पण सामान्यांच्या दु:खाविरोधात देव आपल्या बाजूने आहे असं त्यालाही वाटतं.

एवढा देव खरंतर बोअर झाला. पण एकमेकांच्या समोर, बाजूने उभ्या असणार्‍या प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी प्रत्येकालाच आपण योग्य तेच वागतो आहोत असं वाटत रहातं. देव हा फक्त देव न रहाता, आपापल्या योग्य वागण्याचं समर्थन वाटतं.

---

मी हा सिनेमा पाहिला तेव्हा आमच्या बरोबर नव्वदीच्या घरातल्या एक फ्रेंच आजी होत्या. चित्रपटानंतर फ्रेंच रेसिप्यांचा समाचार घेताना या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू होती. या आजींनी १९३० च्या दशकात ही म्युझिकल फ्रेंच टीव्हीवर पाहिलेली होती अशी आठवण सांगितली. त्यांची अगदी या सिनेमाबद्दलची अगदी सुरूवातीची प्रतिक्रिया "यातलं कोणीही फ्रेंच दिसत नाही."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऑलिव्हर स्टोन दिग्दर्शित, १९८६चा "प्लॅटून" पाहिला.

युद्धपट पहाण्याचा माझा अनुभव मर्यादित आहे. पण काही ठळक अमेरिकन वॉरमूव्हीज आठवतात. "सेव्हिंग प्रायव्हेट रायन" आणि जुने "ईगल हॅज लँडेड" , "गन्स ऑफ नॅव्हेरॉन" ही (आता ज्यांना बालपट म्हणायला हवं.) आमची गंगाजळी. ती तशी मर्यादितच आहे. परंतु अमेरिकन वॉर मूव्हीजची काहीकाही ठराविक गृहितके असतात असं आजवर दिसत होतं. "सेल्फ रायचसनेस" हा एक ठसठशीत गुणधर्म. अमेरिका देशाच्या युद्धखोरीबद्दलच्या उल्लेखाचा सामान्यतः अभाव वगैरे तर सोडून द्या, प्रत्यक्ष युद्धभूमीवर जे चालतं ते फक्त शौर्याचंच असतं नि त्यात नैतिक गुंतागुंत या भानगडी नसतात या आणि अशा निरीक्षणांचा आता जरा कंटाळा येत चालला होता. ("हर्ट लॉकर" सारखे वास्तव चित्रण करणारे चित्रपटही याला अपवाद म्हणता येणार नाहीत. )

"प्लॅटून" याला नक्कीच छेद देतो. (व्हिएतनाम युद्धात खुद्द गेलेल्या स्टोनने स्वानुभवावरून याची पटकथा लिहिलेली होती असं नंतर कळलं. ) सामान्य सैनिकाची मनोवृत्ती, अमेरिकन सैनिकांनी केलेले गुन्हे, ते झाकण्याचे प्रयत्न , युद्धाच्या धुमश्चक्रीत एकंदर मूल्यव्यवस्थेची उडालेली धूळधाण या सार्‍याचं यथार्थ चित्रण मला यात केल्याचं जाणवलं. चित्रपटाचा परिणाम चिरकालीन राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'द थिन् रेड् लाईन्' हा टेरेन्स मलिक दिग्दर्शित चित्रपट अवश्य अवश्य पाहा.
(दुर्दैवाने 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन'ची प्रदर्शित होण्याची वेळही जवळपास तीच होती त्यामुळे आणि श्पीलबर्गच्या नाममहात्म्यामुळे हा चित्रपट उपेक्षित राहिला.)
युद्धकाळात सैनिकाञ्च्या मनोवस्थेची सन्तुलन रेषेच्या आत-बाहेर करणारी दोलने अतिशय परिणामकारक पकडणारा हा चित्रपट. इङ्ग्रजी असूनही संवादानुवादासहित पाहावा असे सुचवेन, कारण सैनिकाञ्ची बोलीभाषा अनेकवेळा कळत नाही. प्रत्यक्ष लढाईची दृश्येही फारच उत्कृष्ट चित्रित केली आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेमाची गोष्ट पाहिला.. "साधी सोपी" गोष्ट आहे. इतकी सोपी की प्रक्षकांना डोकं आहे यावर लेखक-दिग्दर्शकाचा जराही विश्वास नसल्यानेउल्लेखकाही इतके सोपे-स्पष्ट करून ठेवले आहेत की प्रेक्षकाला जराही विचार करायची संधीच मिळू नये (की कष्टच पडू नयेत? Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>प्रक्षकांना डोकं आहे यावर लेखक-दिग्दर्शकाचा जराही विश्वास नसल्याने<<

प्रोमोजमध्ये 'तरुणाईची नाडी कशी आम्हाला सापडलेली आहे' वगैरे वल्गना करणारी मध्यमवयीन माणसं पाहिली होती तेव्हाच कळलं होतं की प्रकरण गोंधळाचं असणार Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Wink
गोंधळ असता तरी ठिक हे अगदीच बाळबोध आहे. प्रेक्षकांना आधी पात्रांची ओळख गोष्टीच्या ओघात होईल यावर विश्वासच नाही.. अतुल कुलकर्णी अन रोहिणी हट्टंगडी यांच्यामधील एखाद दोन वाक्यांनंतर शेंडा बुडखा नसलेले वाक्य मध्येच "तु का बोलायला हरणार आहेस मला. लेखक आहेस ना तु!" असे मधेच एक वाक्य येते (म्हंजे प्रेक्षकांना कळ्णार नाही की अतुल लेखक आहे अशी ठाम धारणा, त्यामुळे असे 'इस्कटून' सांगितले आहे).
हे केवळ वानगीदाखल. अख्ख्या चित्रपटात हे असंच आहे. प्रत्येक पात्र आपण कुठे आहोत हे संवादातून सांगतं, आपल्याला काय वाटतं ते बोलतं.. यापेक्षा श्रुतिका लिहायला हवी होती Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यापेक्षा श्रुतिका लिहायला हवी होती>> +१००००००००००००००

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही गोष्ट चित्रपट म्हणुन का काढली? चित्रपट या माध्यमाचा काय आणि कसा उपयोग करुन घेतला?
माझ्या मते तर हे नाटक आहे, फक्त शूट केले आहे. जर हेच करायचे होते तर टीवी वर २ तासाचे एक छोटे नाटक का नाही केले म्हणजे वेगवेगळ्या घरात शूटींग करता आले असते.
मराठी दिग्दर्शकांना चित्रपट हे काय माध्यम आहे हेच कळले नाहीये हे पुन्हा एकदा दाखवुन दिले.
जर कुठलाही सिनेमा बघुन तुम्हाला कथा चांगली होती आणि संवाद चांगले होते असे पहिल्यांदी वाटले तर ते दिग्दर्शकाचे failure आहे. आणि दिग्दर्शकाला चित्रपट माध्यमाचा आवाका कळला नाहिये असे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेमाची गोष्ट हा काय प्रकार आहे? मला वाटले मुक्ता बर्वेच्या मालिकेचेच भाग जोडून काहीतरी संकलन केले आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'जँगो अन्चेन्ड' पाहिला. मोठ्या पडद्यावर पहावा असा सिनेमा. वेस्टर्न या प्रकारात मोडणारा हा सिनेमा आहे. बॉलिवुडी हीरो असलेला हॉलिवुडी सिनेमा वाटला. काही सीन्स पॉवरफुल (परिणामकारक रितीनी साकारले आहेत) आहेत. लिओनार्डो डिकॅप्रिओ आहे या आशेवर सिनेमाला गेले होते...बरीच प्रतिक्षा करावी लागली त्याच्या एन्ट्रीसाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणी UK मधली life begins ही टीवी मालिका बघितली आहे का? मला पहिले २ सीझन्स बघायला मिळाले. फार सुरेख आहे आणि फास्ट सुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'फिफ्टी डेड मेन वॉकिंग' हा सिनेमा पाहिला. आर्यलंड्मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या याच नावाच्या आत्मचरित्रावर हा सिनेमा आधारित आहे.आयआरए (आयरिश रिपब्लिकन आर्मी) मध्ये राहून पोलिसाना मदत करणार्‍या एका तरूणाची ही कथा आहे.

आर्यलंडमधली ऐंशीच्या दशकातली सामाजिक अस्वस्थता दिग्दर्शकाने (कारी स्कॉगलंड)मोठ्या संवेदनशीलतेने हाताळली आहे. जिम स्टर्गेस आणि बेन किंग्जले यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सध्या बीबीसीच्या आयप्लेयर वेबसाईटवर बघता येईल. सिनेमाच्या शेवटी येणारे 'अँड देन माय सन ही वॉक्ड अवे' हे गीत निव्वळ अप्रतिम आहे. (हे गाणे युट्यूबवर देखील ऐकता येईल)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपट फसलाय.(किंवा प्रेक्षकाला फसवलेय.)
या चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शकाला (कमल हासनला) सीझोफ्रेनिया आणि अ‍ॅम्नेशिया दोन्ही एकदम झाल्यासारखे वाटले.
बाकी या चित्रपटावर पन्नास रुपयापर्यंत खर्च करायला चालेल. कोणी तिकीट काढून दाखवत असेल तर पार्किंगचे पैसे द्यायला हरकत नाही.
किंवा-
एक चित्रपट चांगला होता होता कसा हुकू शकतो? ते सविस्तर पहायला स्वखर्चाने जाऊ शकता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या चित्रपटाबद्दल जो गदारोळ झाला त्या अनुषंगाने चित्रपटात काय पहायला मिळालं ते ऐकायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

गदारोळ हा घडवून आणलेला होता, कारण जयललिता यांच्या जया टिव्ही वाहिनीला चित्रपटाचे हक्क मिळाले नाहीत अशी वदंता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोलानच्या बॅटमॅनमालिकेनंतर उत्सुकता जागृत झाल्याने टिम बर्टनने दिग्दर्शित केलेले सिनेमेही गेल्या काही दिवसात पाहिले. एवढे दिवस बॅटमॅन का पाहिला नव्हता असा प्रश्न पडला. जॅक निकलसन खरेतर अत्यंत आवडता अभिनेता, पण हीथ लेजरने सादर केलेल्या जोकरच्या तुलनेत जॅकचा जोकर फारच फिका वाटला. अर्थात दोन्ही जोकरची वृत्ती वेगळी असली तरी लेजरच्या जोकरची जशी भीती वाटते तशी जॅकच्या जोकरची वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१९९६ चा सुधीर मिश्रा दिग्दर्शित "इस रात की सुबह नहीं".

सुधीर मिश्रा यांचाच "हजारो ख्वाहिशें ऐसीं" हा सिनेमा अतिशय आवडला होता. "इस रात की.." बद्दल थोडे कुतुहल होते.

-------स्पॉइलर अलर्ट सुरुवात ----

एका रात्रीत घडणारं कथानक. दोन समांतर कथासूत्रे चालतात १. एका जाहिरात व्यावसायिकाच्या विवाहबाह्य संबंधांना लागलेले नाट्यपूर्ण वळण. २. गँगवॉर मधलं हिंसक सूडनाट्य. एका प्रसंगी ही दोन्ही कथानके एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यातून पडलेली संघर्षाची ठिणगी, वेगवान , गुंतागुंतीचं नाट्य. असा एकंदर पैस.

-------स्पॉइलर अलर्ट शेवट ----

बॉलिवूडीय मारधाड आणि मसाला चित्रपटांअधे जरी उपरोल्लेखित वेगवान नाट्य, हिंसा , विवाहबाह्य संबंध हे प्रकार असले तरी ते धंद्यावर डोळा ठेवून केल्याचं स्पष्ट दिसतं. कथानकाची वीण, त्या संदर्भात या सर्व गोष्टी अपरिहार्यपणे येत नाहीत. सांडलेलं रक्त आणि उघडी शरीरं आणि चटपटीत नाचगाणी टाकली की झाला चित्रपट असा प्रकार असतो. प्रस्तुत चित्रपटावर हा आरोप करता येणार नाही घटनाप्रसंगांदरम्यान मानवी संबंध आणि माणसाचे स्वभावधर्म, त्याच्या विशिष्ट परिस्थितीतल्या मजबूरी यावर निश्चितच काही चांगलं भाष्य सिनेमा करू पाहतो. वेगवान कथनादरम्यानही अनेक क्षण असे येतात की एखादी व्यक्ती विशिष्ट कृती करण्यामागच्या प्रेरणा, त्यामागे त्याची/तिची होत असलेली चलबिचल, अपरिहार्यता हे चांगलं टिपलं गेलं आहे.

हे सारं मान्य केलं तरी हा चित्रपट नवागताने बनवलेला कळतो. चित्रपटाचं दृष्य स्वरूप , त्याचा पोत या गोष्टी मला १९९० च्या दूरदर्शनवरील सिरियलच्या चित्रिकरणाइतक्या बटबटीत वाटल्या. गाण्यांचा वापर भीषण म्हणावा इतका वाईट आहे. निदा फाजली यांचे शब्द अर्थपूर्ण आहेत परंतु गायकांची निवड , गाण्यांचं चित्रिकरण झालेल्या नटांचा अभिनय हे फारच वाईट आहे. दुर्दैव म्हणजे, गाण्यांच्या दरम्यान अनेक घटना घडतात त्यामुळे गाणी ढकलता येत नाहीत. जी गत चित्रिकरण नि गाण्यांची तीच डबिंगची. (की यालाच रि-रेकॉर्डींग असं नाव आहे ? ) अत्यंत बटबटीत रीत्या केलेलं काम. प्रकाश संयोजनाचं काम प्रत्येक प्रसंगी दोन मोठ्ठे लाईट नटांच्या चेहर्‍यावर टाकून भागवलेलं स्पष्ट जाणवतं.

असो. जो आरोप मराठी चित्रपटांवर होतो आहे (वर "प्रेमाची गोष्ट" का कायश्या चित्रपटाबद्दल जे बोललं गेलं आहे त्याचा संदर्भ) ते या चित्रपटाबद्दलही खरं आहे. ढोबळ मानाने बोलायचं तर नाटकातले लोक चित्रपटात आल्यानंतर सुरवातीच्या काळात जसे चित्रपट बनवतील - आणि बनवतात - तशातला हा प्रकार मला वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला(त्यावेळी तरी -१९९६ साली - थिएटरमध्ये) आवडलेला चित्रपट. आता जरी जुनाट पठडीतला वाटला तरी त्यावेळी तो अगदी ताजा प्रयोग होता हे लक्षात घेतले पाहिजे. एका रात्रीत घडलेले वेगवान कथानक.
चित्रपटातले 'चुप तुम रहो' हे लक्षात राहण्याजोगे गाणे.

निर्मल पांडे (चित्रपटाचा हीरो) अकाली मेला तेव्हा धक्का बसलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या चित्रपटातलं 'जीवन क्या है' गाणंही मला आवडतं. चित्रपटात तुकड्या-तुकड्यांनी येत रहातं. दुसरं म्हणजे या चित्रपटातची श्रेयनामावली पाहिली तर आता हे लोकं बर्‍यापैकी प्रसिद्ध लोकं आहेत, तेव्हा ते नवेच होते.

सुधीर मिश्राचाच, एका रात्रीत घडणारा 'चमेली'ही सुंदर आहे. फोर्टमधे, धोधो पावसामुळे एका बिल्डींगखाली आसरा घेतलेला इन्व्हेस्टमेंट बँकर (राहुल बोस) आणि चमेली नावाची वेश्या (करीना कपूर) यांच्यातले भावनिक चढाव-उतार, एवढंच 'चमेली'बद्दल लिहीते. बघितला नसेल तर जरूर पहा. (साधारण अशाच प्रकारचा करीना कपूरने काम केलेला 'जब वी मेट' हा मात्र अतिशय टुकार पिच्चर आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चमेलीही आवडलेला आहे. म्हणजे नकळत सुधीर मिश्रा हा दिग्दर्शक आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांचा "हजारों ख्वाहिंशें ऐसीं" आवडलेला होता हे वर म्हण्टलेलंच आहे.

२००५ साली आलेल्या या आणीबाणीची पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटासंदर्भातली एक उत्तम चर्चा :
http://www.anothersubcontinent.com/forums/index.php?showtopic=2194

बटबटीतपणाचा आरोप मिश्रांवर आता कुणी करू शकणार नाही Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"इस रात की सुबह नहीं" १०+ वर्षांपूर्वी पाहिला होता. खूप आवडला होता. परत आता पाहिला तर त्यातले दोष दिसतीलच. पण तेव्हाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत तो सरस ठरेल असं वाटत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुन्या गोष्टी, जुने सिनेमे नव्या काळात कसे वाटतात. कुठल्या गोष्टी काळाच्या ओघात टिकाव धरतात आणि कुठल्या गोष्टींची लोकप्रियता क्षणभंगुर असते या विषयावर नवा धागा सुरू करता येईल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'नो वन् कॅन गो होम वन्स् अगेन् !' हे (बहुधा जी.एं. च्या) कुठल्याश्या अर्पणपत्रिकेत वाचलेले वाक्य कायम लक्षात राहिले आहे. एकदा आलेला अनुभव पुन्हा तश्याच प्रकारे येईल असे वाटत नाही. (अगदी देजा-वू त सुद्धा नाही ;)). जुन्या गोष्टी पाहणे, वाचणे, ऐकणे म्हणजे आपल्यातल्या बदलललेल्या गोष्टीञ्चे एका प्रकारे परिमाणच. त्याचबरोबर नव्या मला त्याच जुन्या गोष्टीत नव्या गोष्टी दिसतातच. धाग्याची कल्पना उत्तम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीएंच्या अर्पणपत्रिकेतला नेमका संदर्भ हा असावा :

http://en.wikipedia.org/wiki/You_Can%27t_Go_Home_Again

>>>>जुन्या गोष्टी पाहणे, वाचणे, ऐकणे म्हणजे आपल्यातल्या बदलललेल्या गोष्टीञ्चे एका प्रकारे परिमाणच. त्याचबरोबर नव्या मला त्याच जुन्या गोष्टीत नव्या गोष्टी दिसतातच. <<<

यावरून नारायण सुर्वे यांच्या ओळी आठवल्या (कविता : माझे विद्यापीठ.)

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

माझ्याजवळ जी.एं.चे आत्ता कुठलेच पुस्तक नाही. त्यामुळे रुजुवात करू शकत नाही. पण दुव्यावरच्या एकूण मजकुरावरून शक्य वाटते आहे.
त्या दुव्याकरिता तुम्हांला दुवा.
(अवान्तर - हे कवितेतले 'सदंतीस' काय आहे ? की तो आकडा ३७ आहे ?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही कविता प्रसिद्ध होताना असलेलं सुर्यांचं वय.
माझे विद्यापीठ : circa १९६५

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"जब वी मेट" अगदी टुकार आहे अस वर ३_१४अदितीने (पांढर्या शाईत का असेना) म्हटल्यामुळे हा प्रतिसाद लिहावा वाटलं. 'चमेली' मी पाहिलेला नाही...पण वर वर्णन केलं आहे तसा तो असेल तर "जब वी मेट"ला 'तशाच प्रकारचा' कसं म्हणावं ? असो.
"जब वी मेट" मध्ये विशेष मला जाणवलेलं असं की हिरॉइन (गीत, करीना कपूरने अतिशय छान साकारलेली) स्वतंत्र विचारांची, स्वत:ला हवं तेच करणारी, आणि जे करू त्याची जबाबदारी घेणारी आहे (म्हणून सिनेमा कसाही असला तरी चालेल असं नाही सुचवायचं). सिनेमाला चांगली गोष्ट आहे,संवाद चांगले आहेत आणि अभिनयही सगळ्यांनी चांगला केला आहे. हिंदी सिनेमातलं कास्टिंग अनेक वेळा खुपतं, पण यात जमून आलं आहे. गाणी सुद्धा गोष्टीत छान मिसळली आहेत. पानचट विनोद करणारं एकही पात्र नाही. मला हा सिनेमा खूप आवडला. "थ्री इडीयट्स" बरोबर तुलना केली तर माझ्या मते त्यापेक्षा १०० पट चांगला.
त्यामुळे या सिनेमा बद्द्ल एक वेगळं मत नोंदवते एवढच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

जब वी मेट अगदीच टुकार नाही
प्रथमदर्शनी गीतच कँरेक्टर पटत नसलं तरी हळुहळू आपण गुंतत जातो
गाणीही श्रवणीय आहेत
शाहिद कपूरही पहिल्यांदाच आवडला

इम्तियाझच्या नायिकांच एक वैशिष्ट्य म्हणजे त्या नेहमीच सेन्सिबल असतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

हजार ख्वाईशे ऐसी किँवा इस रात की सुबह नही पाहीला नाहीय अजुन, पण ये साली जिँदगी खूप आवडला.
आणि चमेली देखील छानच आहे. पण त्यातला काही भाग कुणा वेगळ्यानेच डिरेक्ट केलाय. त्याच्या मृत्युनंतर मिश्रा आले.
बादवे इस रात च्या वेळी मिश्रा नवागत नव्हते. आधी धारावी आलाय आणि खात्रीपूर्वक नाही सांगता येणार पण जानेभी दो यारोँ मधे देखील त्याचं नाव वाचल्यासारख वाटतय.
जब वुई मेट ठीक tp आहे. कथेपेक्षा शाहीद करीनाच्या अभिनयाने जान आणलीय चित्रपटात.
'इम्तियाझच्या नायिकांच एक वैशिष्ट्य
म्हणजे त्या नेहमीच सेन्सिबल असतात' ए असं काही नै हं Smile ती रॉकस्टार मधली हिरवीण पाउटिँगशिवाय काय करतच नव्हती. एकंदर मला इम्तिआझ ने ज्या क्रमाने चित्रपट बनवले त्याच क्रमाने आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द आयटी क्राऊड नावाची एक थोडीशी जुनी ब्रिटिश मालिका पुन्हा एकदा पाहतो आहे. http://www.imdb.com/title/tt0487831/. अतिशय झकास विनोद. आयटीचा गंधही नसलेली एक मॅनेजर आणि तिचे दोन नर्ड्स म्हणावेत असे दोन सहाय्यक आणि कंपनीचा स्त्रीलंपट मालक ही मुख्य पात्रे. पात्रांचे कास्टिंग अगदी परफेक्ट आहे. मस्ट सी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'स्पेशल 26' हा अक्षय कुमार, अनुपम खेर, जिमी शेरगिल आणि मनोज वाजपेयी यांचा (द वेन्सडे फेम) नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा पाहिला. ऐंशीच्या दशकातील सीबीआय किंवा इन्कमटॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करुन मोठमोठे उद्योगपती आणि राजकारण्यांना ठकवणाऱ्या टोळीवर हे कथानक आधारित आहे. तगडी आणि परफेक्ट स्टारकास्ट, उत्तम अभिनय आणि वेगवान कथानक यामुळे चित्रपट अत्यंत प्रेक्षणीय झाला आहे. बटबटीत हाणामाऱ्या, आयटेम साँग, वगैरे नसल्याने निखळ करमणूक होते. फुल टू पैसा वसूल मनोरंजन आहे. मात्र नायिकेचे पात्र पूर्णपणे अनावश्यक वाटले. एक तर ती पूर्ण चित्रपटात अंगभर पंजाबी ड्रेस वगैरे कपड्यात वावरली आहे त्यामुळे ग्लॅमर कोशंट Wink झीरो आणि तिचे अक्षयकुमारसोबतचे प्रेमसंवाद आणि गाणीही अनावश्यक आहेत.

अवांतरः या चित्रपटातील नायिकेची व्यक्तीरेखा 'मराठी तरुणी'ची आहे. आजकाल अनेक चित्रपटांत नायिका ही मराठी घरातील असल्याचे दाखवत आहेत. घरातील कामवाली किंवा छातीवर पदर न घेतलेली मासेवाली या व तत्सम रोलमधून मध्यवर्ती नायिकेपर्यंत मराठी व्यक्तिरेखेचे स्थित्यंतर सुखद वाटते. उदा. इंग्लिश विंग्लिश, अय्या, स्पेशल 26, सिंघम वगैरे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.

आत्ताच बघितला. मस्त वाटलं.

बाकी अवांतराबद्दल लैच खंप्लीट सहमती. मराठी लोकांचे रिप्रेझेंटेशन अखेरीस नीट केल्याचे पाहून अलीकडे सुखद वाटते खरे. शिवाय अक्षय कुमारही मराठी नीट बोलताना दाखवला आहे. त्याला तसेही मराठी येतेच म्हणा. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'स्पेशल २६' पाहिलेला नाही. पण लोकसत्तामधलं परीक्षण वाचलं.
पुन्हा एकदा, आपण केली तर मजबूरी, त्यांनी केलं तर भ्रष्टाचार?

या चित्रपटातील नायिकेची व्यक्तीरेखा 'मराठी तरुणी'ची आहे. आजकाल अनेक चित्रपटांत नायिका ही मराठी घरातील असल्याचे दाखवत आहेत. घरातील कामवाली किंवा छातीवर पदर न घेतलेली मासेवाली या व तत्सम रोलमधून मध्यवर्ती नायिकेपर्यंत मराठी व्यक्तिरेखेचे स्थित्यंतर सुखद वाटते. उदा. इंग्लिश विंग्लिश, अय्या, स्पेशल 26, सिंघम वगैरे

तेवढंच नाही तर मध्यमवर्गाचं काही प्रतिनिधित्त्व पाहूनही आनंद होतो. नाहीतर करण जोहरच्या गर्भश्रीमंत नायिका किंवा दुसर्‍या टोकाच्या कामवाल्या किंवा कोळणी, आणि त्यांचे पुरुष काउंटरपार्ट यांच्यापलिकडे फार काही दिसतच नसे. मेहेरा, खन्ना, कुमार वगैरे आडनावं लावणार्‍या व्यक्ती आपल्यासारख्या ट्रेन, बसचे धक्के खात कॉलेजात येऊन आपल्याच वर्गात शिकत आहेत याचा नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला होताच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एचबीओ वर राँबर्ट डाऊनीचा शेरलाँक होम्स द गेम आँफ शँडोज बघितला
काँनन डायलच्या शेवटच्या गोष्टीवर आधारित हा चित्रपट
आधीच्या डाऊनीस्टाईल होम्सपटाप्रमाणेच आहे
पण होम्सप्रेमामुळे आवडून घेतला

स्टार मुव्हीजवर द आर्टीस्ट अर्धा पाहला
होम्स की आर्टिस्ट यात होम्सने बाजी मारली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

थोबाड. स्वतःचं. आरशात. रक्तबंबाळ. दात घासताना. पुन्हा एकदा दाढी करतेवेळी.

पुढला प्रश्न?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग कस वाटल स्वतच थोबाड पाहून
त्याबद्दलही लिहीणे अपेक्षित Wink Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

अजून कसं वाटणार?

(हवं तर 'थोबाडावर तांबडं फुटलं होतं' असं वर्णन करता येईल. तेवढंच काव्यात्मक.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटल "गेले ते दिन राहिल्या त्या आठवणी" अशा छापाच ऊत्तर येईल
Wink Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

चालू वर्तमानकाळ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावना पोचल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

...घेतल्यात की नाही नीट? प्रवासात काही त्रासबीस नाही ना झाला त्यांना? तसं रिझर्वेशन करून दिलं होतं म्हणा, पण हल्ली त्याला काही अर्थ नसतो. लोक कुठेही कसेही घुसतात. सगळा म्यानरलेस कारभार होऊ घातलाय पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घेतल्यात की नाही नीट? प्रवासात काही त्रासबीस नाही ना झाला त्यांना? तसं रिझर्वेशन करून दिलं होतं म्हणा, पण हल्ली त्याला काही अर्थ नसतो. लोक कुठेही कसेही घुसतात. सगळा म्यानरलेस कारभार होऊ घातलाय पहा.

नै नै काळजी करु नका, व्यवस्थित पोचल्या अगदी. तसही भारतात अजूनही कायद्याच राज्य ही संकल्पना आहे अस्तिवात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

संकल्पना चांगली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संकल्पना चांगली आहे.

सहमत आहे. कधी कधी अनुभव येतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

आरशावर कुंकवाची बोटं पुसली गेली असावीत. धोंडो भिकाजी जोश्यांनाही असे वाटत असे असे भाईकाकांनी लिहिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'प्रॉमिस्ड लँड' पाहिला. बरा आहे...मॅट डेमनचा अभिनय आवडला. मोठ्या कंपन्या त्यांचं हित साधून घेण्यासाठी कसं सगळं मॅनिप्युलेट करतात याच उदाहरण या चित्रपटात पहायला मिळालं.चित्रपट एकदा पहायला हरकत नाही...छोट्या स्क्रीनवरही चालेल.
'रेचेल गेटिंग मॅरीड' या सिनेमातली 'रेचेल' या सिनेमात एका छोट्या भूमिकेत आहे.तीही आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काटकोन त्रिकोण पाहिलं.
तिरशिंगरावांनी करून दिलेल्या या परिचयावर आलेल्या प्रतिक्रीयांत व्यक्त झालेल्या "शेवटाचे 'हवा आने दे' टाईप भाषणबाजी सोडल्यास चटपटीत संवाद आणि वेगवान मांडणी नाटक 'वन टाईम वॉच' नक्कीच ठरते" या भावनेशी सहमत आहे. एकूणात पैसे वाया गेल्यासारखे वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!