१०० कौरव बंधूंची नावे

१०० कौरव बंधूंची नावे महाभारत आदिपर्वाच्या १०८व्या अध्यायात श्लोक २-१४ दिली आहेत ती अशी आहेत. उतारा BORI च्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीमधून घेतला आहे. (प्रत्येक श्लोकाअखेर मी त्यातील नावे सुटी करून मराठीमध्ये दिली आहेत आणि त्या नावांची गणती दाखविली आहे.)

दुर्योधनो युयुत्सुश्च राजन्दुःशासनस्तथा ।
दुःसहो दुःशलश्चैव जलसन्धः समः सहः ॥ २॥

दुर्योधन, युयुत्सु, दु:शासन, दु:सह, दु:शल, जलसन्ध, सम, सह (१-८)

विन्दानुविन्दौ दुर्धर्षः सुबाहुर्दुष्प्रधर्षणः ।
दुर्मर्षणो दुर्मुखश्च दुष्कर्णः कर्ण एव च ॥ ३॥

विन्द, अनुविन्द, दुर्धर्ष, सुबाहु, दुष्प्रधर्षण, दुर्मर्षण, दुर्मुख, दुष्कर्ण, कर्ण (९-१७)

विविंशतिर्विकर्णश्च जलसन्धः सुलोचनः ।
चित्रोपचित्रौ चित्राक्षश्चारुचित्रः शरासनः ॥ ४॥

विविंशति, विकर्ण, जलसन्ध, सुलोचन. चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, शरासन (१८-२६)

दुर्मदो दुष्प्रगाहश्च विवित्सुर्विकटानन: ।
ऊर्णनाभः सुनाभश्च तथा नन्दोपनन्दकौ ॥ ५॥

दुर्मद, दुष्प्रगाह, विवित्सु, विकटानन, ऊर्णनाभ, सुनाभ, नन्द, उपनन्दक (२७-३४)

सेनापतिः सुषेणश्च कुण्डोदरमहोदरौ ।
चित्रबाणश्चित्रवर्मा सुवर्मा दुर्विमोचनः ॥ ६॥

सेनापति, सुषेण, कुण्डोदर, महोदर, चित्रबाण, चित्रवर्मा, सुवर्मा, दुर्विमोचन, (३५-४२)

अयोबाहुर्महाबाहुश्चित्राङ्गश्चित्रकुण्डलः ।
भीमवेगो भीमबलो बलाकी बलवर्धनः ॥ ७॥

अयोबाहु, महाबाहु, चित्राङ्ग, चित्रकुण्डल, भीमवेग, भीमबल, बलाकी, बलवर्धन, (४३-५०)

उग्रायुधो भीमकर्मा कनकायुर्दृढायुधः ।
दृढवर्मा दृढक्षत्रः सोमकीर्तिरनूदरः ॥ ८॥

उग्रयुध, भीमकर्मा, कनकायु, दृढायुध, दृढवर्मा, दृढक्षत्र, सोमकीर्ति, अनूदर, (५१-५८)

दृढसन्धो जरासन्धः सत्यसन्धः सदःसुवाक् ।
उग्रश्रवा अश्वसेनः सेनानीर्दुष्पराजयः ॥ ९॥

दृढसन्ध, जरासन्ध, सत्यसन्ध, सद:सुवाक्, उग्रश्रवा, अश्वसेन, सेनानी, दुष्पराजय, (५९-६६)

अपराजितः पण्डितको विशालाक्षो दुरावरः ।
दृढहस्तः सुहस्तश्च वातवेगसुवर्चसौ ॥ १०॥

अपराजित, पण्डितक, विशालाक्ष, दुरावर, दृढहस्त, सुहस्त, वातवेग, सुवर्चस, (६७-७४)

आदित्यकेतुर्बह्वाशी नागदन्तोग्रयायिनौ ।
कवची निषङ्गी पाशी च दण्डधारो धनुर्ग्रहः ॥ ११॥

आदित्यकेतु, बह्वाशी, नागदन्त, अग्रयायिन्, कवची, निषङ्गी, पाशी, दण्डधार, धनुर्ग्रह, (७५-८३)

उग्रो भीमरथो वीरो वीरबाहुरलोलुपः ।
अभयो रौद्रकर्मा च तथा दृढरथस्त्रयः ॥ १२॥

उग्र, भीमरथ, वीर, वीरबाहु, अलोलुप, अभय, रौद्रकर्मन्, दृढरथ, (८४-९१)

अनाधृष्यः कुण्डभेदी विरावी दीर्घलोचनः ।
दीर्घबाहुर्महाबाहुर्व्यूढोरुः कनकध्वजः ॥ १३॥

अनाधृष्य, कुण्डभेदी, विरावी, दीर्घलोचन, दीर्घबाहु, महाबाहु, व्यूढोरु, कनकध्वज, (९२-९९)

कुण्डाशी विरजाश्चैव दुःशला च शताधिका ।
एतदेकशतं राजन्कन्या चैका प्रकीर्तिता ॥ १४॥

कुण्डाशी, विरजस् (१००-१०१) आणि राजकन्या दु:शला. भावांची ही नावे शंभर नसून १०१ आहेत

गांगुली भाषान्तरामध्ये हीच यादी अध्याय ११७ मध्ये सापडते. ती अशी आहे.

Duryodhana, Yuyutsu, Duhsasana, Duhsaha, Duhsala, Jalasandha, Sama, Saha, Vinda and Anuvinda, Durdharsha, Suvahu, Dushpradharshana, Durmarshana and Durmukha, Dushkarna, and Karna; Vivinsati and Vikarna, Sala, Satwa, Sulochana, Chitra and Upachitra, Chitraksha, Charuchitra, Sarasana, Durmada and Durvigaha, Vivitsu, Vikatanana; Urnanabha and Sunabha, then Nandaka and Upanandaka; Chitravana, Chitravarman, Suvarman, Durvimochana; Ayovahu, Mahavahu, Chitranga, Chitrakundala, Bhimavega, Bhimavala, Balaki, Balavardhana, Ugrayudha; Bhima, Karna, Kanakaya, Dridhayudha, Dridhavarman, Dridhakshatra, Somakitri, Anudara; Dridhasandha, Jarasandha, Satyasandha, Sada, Suvak, Ugrasravas, Ugrasena, Senani, Dushparajaya, Aparajita, Kundasayin, Visalaksha, Duradhara; Dridhahasta, Suhasta, Vatavega, and Suvarchas; Adityaketu, Vahvashin, Nagadatta, Agrayayin; Kavachin, Krathana, Kunda, Kundadhara, Dhanurdhara; the heroes, Ugra and Bhimaratha, Viravahu, Alolupa; Abhaya, and Raudrakarman, and Dridharatha; Anadhrishya, Kundabhedin, Viravi, Dhirghalochana Pramatha, and Pramathi and the powerful Dhirgharoma; Dirghavahu, Mahavahu, Vyudhoru, Kanakadhvaja; Kundasi and Virajas. (102)

BORI यादीहून ही यादी काही बाबीत वेगळी आहे. BORI यादीतील काही नावे येथे वगळली आहेत तर काही नावे येथे नव्याने दिसतात.

हीच नावे आदिपर्वाचे मराठी भाषान्तर देणार्‍या एका स्थानी आणखीनच वेगळी आहे.

१०० हून अधिक नावे असण्याचा हा प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग म्हणजे काही काही जागी शेजारच्या दोन शब्दांमध्ये एक विशेषण आणि दुसरा त्याचे विशेष्य मानून दोन नावांच्या जागी एकच नाव ठेवणे. पण असे निश्चित कोठे करायचे ह्याबाबत काहीच मार्गदर्शक तत्त्व नसल्यामुळे ह्या मार्गाचा वापर करता येत नाही.

(अर्थात् ”कितीहि नावे असली तर काय फरक पडतो’ असे म्हणून प्रश्न option लाहि टाकता येतो. मात्र अतिचिकित्सक आणि शंकेखोर मनांचे त्यामुळे समाधान होत नाही हे उरतेच!)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

क्या बात है सरजी. दुर्योधन व दु:शासन हे सोडून त्यांची बहीण दु:शला इतकेच माहिती होते, नै म्हणायला भीमाने एकदा एका दिवशी धृतराष्ट्राचे विशालाक्ष वगैरे बरेच पुत्र मारले असा कथारूपी महाभारताच्या पुस्तकात एकोळी-दोनोळी उल्लेखच वाचला होता फक्त. तुम्ही तर सगळीच नावे दिलीत, त्याबद्दल अतिशय धन्यवाद!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त. दुष्प्रधर्षण, दुर्मर्षण, व्यूढोरु वगैरे नावांचे अर्थ काय असावेत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'धृष्' हा धातु बळजबरी करणे अशा अथाने वापरला जातो. 'धार्ष्टय' हा शब्द त्यातून बाहेर पडतो. 'दुष्प्रधर्षण' म्हणजे 'ज्याच्यावर बळजबरी चालत नाही असा'. 'शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी| विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह||'
(तरुण कुत्र्याप्रमाणे इन्द्राने गौतमाच्या धर्मपत्नीवर बळजबरी केली. म्हणून विचारी पाणिनीने श्वा, युवा, मघवा ह्यांना एका सूत्रामध्ये गोवले.)

'मृष्' हा धातु 'दुर्लक्ष करणे, सोडून देणे असा अर्थ दाखवतो. 'दुर्मर्षण' म्हणजे 'one who cannot be ignored'.

'व्यूढोरु' - ’ऊह्’ ह्या धातूचे 'to push, to thrust' अशा छायांचे अर्थ आहेत. 'व्यूढोरु म्हणजे 'मोठया मांडीचा' पक्षी 'बळकट'. कालिदासाने रघुवंशामध्ये राजा दिलीपाचे वर्णन 'व्यूढोरस्को वृषस्कन्ध: शालप्रांशुर्महाभुज: । आत्मकर्मक्षमं देहं क्षात्रो धर्म इवाश्रित: ।। असे केले आहे. (भव्य छातीचा, बैलाप्रमाणे खांदे असलेला, शाल वृक्षासारखा उंच, मोठ्या बाहूंचा, आपले कार्य करायला सक्षम असा क्षात्रधर्म जणू शरीररूपामध्ये असलेला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी| विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह||'

हा पाठभेद माझ्यासाठी नवीन आहे. मी ऐकलेला श्लोक असा:

काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नाति किमत्र चित्रम् | विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मृष्' हा धातु 'दुर्लक्ष करणे, सोडून देणे असा अर्थ दाखवतो.

मुमूर्षू शब्दातला मूळ धातू हाच का? (पहा: राजवाड्यांचा प्रसिद्ध प्रश्न 'मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?')

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मुमूर्षु' हा शब्द 'मृ' मरणे ह्या धातूपासून निर्माण होतो. त्याचा अर्थ 'मरू घातलेला, मरणाची वाट पाहणारा' असा इच्छार्थक होतो. 'पिपासु/पिपासा, जिज्ञासु/जिज्ञासा, विजिगीषु/विजिगीषा, चिकीर्षु/चिकीर्षा, युयुत्सु/युयुत्सा अशी अन्य परिचित इच्छार्थके त्या त्या क्रियांपदांपसून बनतात.

'मुमुक्षु' आणि 'मोक्ष' हे शब्द असेच 'मुच्' सोडणे ह्यापासून निर्माण होतात. कै.ल.रा.पांगारकर 'मुमुक्षु' नावाचे धार्मिक मासिक काढत असत. त्यावरून चिं.वि.जोशींच्या 'स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग' मधील एक प्रसंग आठवतो. गंभीर आजाराने दवाखान्यात पडलेल्या एका तरुण नातेवाइकाच्या समाचारासाठी चिमणराव जातात. त्यांना पाहताच रुग्ण अधीरपणे विचारतो: 'चिमणराव, माझ्यासाठी अमक्यातमक्या सिनेमासिकाचा ताजा अंक आणलाय का?' चिमणराव गंभीरपणे त्याला सांगतात, 'अरे बाळा, आता तसलं चटोर मासिक वाचायचे का तुझे दिवस आहेत? हा घे मी तुझ्यासाठी 'मुमुक्षु'चा ताजा अंक आणलाय.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा पाठभेद नसून संपूर्ण वेगळा श्लोक आहे.

'विचारवान्पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह' असे का तर 'शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म ओक्के...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

... et idem
indignor quandoque bonus dormitat Homerus

Quintus Horatius Flaccus (Ars Poetica)
... अन् तिथेही
सले मज जेव्हा घेतो भला होमर डुलकी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलाच्या नांवासाठी आता उशीर झाला, पण माझ्या नातवाचं नांव मी 'दृढक्षत्र' ठेवायचं म्हणतोय!
च्यायला, ह्या अमेरिकनांची ऐशी की तैशीच करून टाकतो! उच्चारा म्हणावं ते नांव!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या साठी आणखी चांगले नाव 'धृष्टद्युम्न' आहे. नाव उच्चारता उच्चारता अमेरिकनांचे दातच तोंडातून बाहेर पडतील!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिरासदारांच्या भोकरवाडीतल्या काही छोट्या छोट्या गोष्टी, किस्से लक्षात आहेत. त्यातला हा एक.

एक कोणीतरी स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन मागायला जातो. त्याचे कुठलेही रेकॉर्ड मिळत नाहीत. म्हणून अधिक चौकशी होते. तो म्हणतो, मी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. तिथे आमची नावं नीट नोंदली गेली नाहीत. झालं असं की आमचे नेते होते गावातले अनिरुद्धाचार्य. सगळ्यांना पकडल्यावर त्यांना रांगेत सगळ्यात पुढे उभं केलं. तिथला कोणी उर्दूभाषिक मुस्लिम अधिकारी नावं लिहायला लागला. यांना विचारलं,
आप का नाम - अनिरुद्धाचार्य.
क्या? - अ नि रु द्धा चा र्य. अधिकाऱ्याने तोंड वेडंवाकडं करत नाव लिहिलं.
वालिद का नाम? - विश्वंभराचार्य
क्या? - वि श्वं भ रा चा र्य. अधिकाऱ्याने पुन्हा तोंड वेडंवाकडं करत नाव लिहिलं.

त्यांच्या मागे गावातला कोणी टवाळ उभा होता. त्याला विचारलं, नाम - प्रद्मुम्नाचार्य. वालिद का नाम - धृष्टद्मुम्नाचार्य. तर तो अधिकारी एवढा भडकला की "सब चार्य लोग अंदर भागो." म्हणून आमची नावं रेकॉर्डमध्ये नाहीत. त्या तुरुंगातून सुटका होण्याआधी आम्ही आपापली नावं लोट्यांवर लिहून तुरुंगातल्या विहीरीत ते टाकले होते. तिथे रेकॉर्ड सापडेल.

---

धाग्यामुळे अस्वलाची शतशब्दकथाही आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक आत्मचरित्रात असा किस्सा आहे. मराठवाडा व तेलंगण भागात स्वातंत्र्यपूर्व काळात निजामराज्य होते. त्यांचे जे मुसलमान अधिकारी असत त्यांना ही अशी नावे उच्चारणे खूपच जड जायचे. बिंदाचार्य, त्रिविक्रमाचार्य वगैरे नावांचे बिंदाचारी, तिरकम विरकम आचारी वगैरे व्हायचे. मात्र यज्ञेश्वर, घृष्णेश्वर, हयग्रीवाचार्य वगैरे नावे असली तर ते सरळ "वो रावसाब को बुलाव" असे म्हणत....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

श्रीलंकेतल्या भंडारनायके (सिंहली उच्चार) या राजकारणी आडनावाचे मराठी वृत्तपत्रांनीही सतत सरसकट बंदरनायके केल्याचे उदाहरण आठवले. (बहुतेक परदेशी वृत्तसंस्थांच्या बातम्यांचे चोप्य-पस्ते!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, अगदी अगदी....पार हनुमानच करून टाकला त्यांचा. ROFL

तदुपरि सिंहली भाषा ऐकायला तमिळसारखीच वाटते. नीट लक्ष दिल्याशिवाय वेगळेपण आजिबातच जाणवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला सिंहली आडनांवे आवडतात!
भंडारनायके, राजपक्षे, जयवर्धने!
सगळ्यात आवडतं 'जयसूर्या!'
काय जबरा आडनांव आहे!! असं आडनांव असल्यावर आपोआप पराक्रम करायची स्फूर्ती येते!!!!

आमचे पितर काय गांजा ओढून आडनांव शोधत होते की काय ते नकळे!!!
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत, सनथ जयसूर्या, अरविंदा डीसिल्वा, अर्जुना रणतुंगा, रोशन महानामा वगैरे नावे जामच आवडायची. जयसूर्याने ११ षट्कार मारल्याची न्यूज पाहिल्यावर टेम्परवारी बेसिसवर तो माझा सचिनपेक्षाही आवडता ब्याट्स्मन झाला होता. नावेही खतरनाक आणि त्यांचे मैदानावरील पराक्रमही तसेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नावाने 'महिला' असलेल्या पुरुष जयवर्धने याने भारतीय विनोदविरांच्या कितीतरी विनोदांची सोय केली त्याबद्द्ल खरोखर त्याचे आभार मानावे तितके कमीच !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहाहा, अगदी अगदी. त्यातून गोरे त्याच्या नावाचा उच्चार 'जाय्वार्देना' असा करतात ते ऐकून बटाट्याच्या चाळीतील कुणीतरी लिहिलेल्या 'नृत्यसाधेना' या 'आपण नृत्य का सोडले' या विषयावरील पुस्तकाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या साठी आणखी चांगले नाव 'धृष्टद्युम्न' आहे. नाव उच्चारता उच्चारता अमेरिकनांचे दातच तोंडातून बाहेर पडतील!

अहो माझं एकही जोडाक्षर नसलेलं नांव उच्चारतांनाही त्याच्या चिरफळ्या उडवतात शिंदळीचे!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकाच स्त्रीला १०० मुलं होणं शक्य नाही. मग ही १०० मुलं नक्की कोण असतील? ही सगळी एकाच पुरुषाची मुलं असणं शक्य आहे, पण आया निरनिराळ्या असणार. आणखी एक शक्यता म्हणजे यातली दोन-चार-सहा-आठ-दहा मुलं धृतराष्ट्र आणि गांधारीची असतील. बाकीची ह्या पोरांसाठी मित्रमंडळी म्हणून आजूबाजूची पोरं त्यांनी त्या कोणत्याशा ग्रीक समाजासारखी किंवा ऑस्ट्रेलियनांनी स्थानिकांची पोरं गोळा केली असतील. किंवा खरोखरच गरीबांची, निराधार किंवा पोरांची मित्रमंडळी पोटच्या पोरांसारखी वाढवली असतील.

---

(संस्कृत वाचायचा आळस असल्यामुळे ते थोडं ऑप्शनलाच टाकलं.) इंग्लिश नावांमध्ये काही नावं 'चित्रा आणि उपचित्रा' अशी का आहेत? कर्ण हे नाव दोनदा दिसलं.
११७ नावांपैकी १७ मुली असतील का? चित्रा, कुंदा ही तर आता मुलींची नावंच समजली जातात. (संस्कृत ऑप्शनला टाकण्यामुळे समजत नाही हे खरंच. सुलोचनः - सुलोचन हे मुलाचं नाव आहे हे चटकन दिसलं म्हणून समजलं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्र आणि उपचित्र असणार.

विविंशति, विकर्ण, जलसन्ध, सुलोचन. चित्र, उपचित्र, चित्राक्ष, चारुचित्र, शरासन (१८-२६)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गान्धारीला १०० मुलगे कसे झाले ह्याची चित्तचक्षुचमत्कारिक महाभारतकथा गांगुली भाषान्तरामध्ये येथे वाचा. त्याच्या पुढील अध्यायात दु:शला त्यानंतर एक महिन्याने कशी जन्मली ते दिले आहे.

त्याच अध्यायावरून १०१ मुलांचे कोडेहि सुटले. युयुत्सु हा गान्धारीचा मुलगा नसून एका वैश्य स्त्रीपासून धृतराष्ट्राला झाला असे दिसते. यादीमध्ये त्याचा क्रमांक दुसरा आहे. त्याला वगळले की बरोबर गान्धारीची १०० मुले उरतात.

होमर डुलकी घेत नव्हता तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

युयुत्सु गांधारीचा मुलगा नव्हे ही नवीन माहिती कळाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१००
आदल्या पिढीत विदुर, तसा या पिढीत युयुत्सु, असे पांडवांची सहानुभूती वाटणारे दासीपुत्र होते, तर.
(दुर्योधन त्यांना दास्याःपुत्र म्हणत असेल, म्हणा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीमवेग, भीमबल, भीमकर्मा आणि भीमरथ ही नावं पाहून, त्या काळातही जावेच्या चांगल्या निपजलेल्या पोरांबद्दल आईला मत्सर वाटत होता हे सिद्ध होते.

बाकी, जाता जाता, पांडवांचे आईबाप अगदीच अकल्पक होते नाही नावं ठेवण्यात. त्या युधिष्ठीराचं नाव नक्की जेष्ठ असल्याने जावेनं ठेवलं असणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

चांडाळ हे जस क्षुद्र पुरुष व बाह्मण स्त्री च्या संतती च नाव होत
तस क्षत्रिय पुरुष व वैश्य स्त्री च्या संतती ला काय म्हणत असत?
चांडाळ हे इतक घ्रुणास्पद विशेषण बनलेल आहे
ते सर्वात खालच्या वर्णाच्या क्षुद्राने सर्वात वरच्या वर्णा च्या स्त्री पासुन संतती प्राप्त करणे हे फार बोचत असेल कदाचित,
एकुण मनु इतका भारी आहे की जसजशी ब्राह्मणा पासुन संतती उलट वा खालच्या दिशेने जाते तसतसे संबोधन अधिकाधिक
निचतम मानहानीकारक होत जाते व जसजशी उलट वरती चढण होते तसतशी सन्मानजनक शब्द वापरले जातात
शिवाय ब्राह्मणाला कसे बोलवावे क्षुद्राला कशी हाक मारावी त्यातही तसेच क्षुद्रासाठीचे संबोधन परत तसेच
काय सुक्ष्मतेने शब्दांचे योजना केलेली आहे
काय प्रतिभा वापरलेली आहे अगदी संबोधनातही नावात सर्वत्र
काय जबरदस्त भाषिक हिंसा कीती सटल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

कस्ला भारी कवी होता नै!
कथा तर दूरच, त्याने कथेतील पात्रांसाठी वापरलेल्या नावांवर चर्चा झडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुलांची नावे मुद्दाम दुर्मर्षण, दुर्मुख, दुष्कर्ण अशी का ठेवली असावीत??
बरं पहिल्या १०-१५ मधली आहेत.. असं पण नाही की आता नावं सापडत नाहीत ठेवा काहितरी Smile

अशी नाव मुद्दाम व्हीलनच्या कुटुंबाला ठेवायलाच योग्य वाटतायत ..

बाकी १०० मुलं वगैरे मुद्द्लातच अति होतं . पण काव्य म्हणून तरी किती मोकळीक घ्यायची ती ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण काव्य म्हणून तरी किती मोकळीक घ्यायची ती ..

व्यासमुनींचे चुकलेच म्हणायचे, तुमचा सल्ला घ्यायला पाहिजे होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कौरवांच्या नावातील 'दु:' हा नकारार्थी अर्थाचा प्रत्यय नावांमध्ये कसा आला असावा ह्याबद्दल मी काही तर्क 'पांडव आणि राम ह्यांचे आदर्श' ह्या माझ्या धाग्यामध्ये लिहिला होता. सर्व इतिहास जेत्यांनी त्यांचीच बाजू जगापुढे राहावी अशा हेतूने लिहिलेला असतो हा तेथे मुद्दा होता. तेथे खाली एक प्रतिसादामध्ये मी हे लिहिले होते, ज्यावरून बाळ सप्रे ह्यांना काही उत्तर सापडू शकेल - दुर्मुख आणि दुष्कर्ण ह्या नावांसाठी नाही पण दुर्मर्षण ह्यासाठी निश्चितच.

महाभारताच्या गाभ्यातईल 'जय' नामक इतिहास पांडवांच्या भाटचारणांनी लिहिला आहे. त्यात साहजिकपणे धृतराष्ट्राच्या पुत्रांना काळे दाखविण्याचा प्रयत्न उघड दिसतो.

येथील एक सदस्य नगरीनिरंजन ह्यांची 'निशाण' नावाची कविता मिपावर आहे. तिच्यामध्ये असेच कही विचार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0