शुक्र आणि गुरू युती


(चित्रावर क्लिक केल्यास मोठे चित्र दिसेल.)
३० जून रोजी शुक्र आणि गुरू हे दोन ग्रह एकमेकांच्या खूप जवळ आले. इतके जवळ की जर त्यांच्या पुढे चंद्र असता तर ते संपूर्णपणे झाकले गेले असते. खरंतर चंद्राच्या व्यासाच्या सुमारे एक तृतीआंश इतके जवळ. त्याशिवाय ही युती आकाशात क्षितीजापासून बर्‍यापैकी वर असल्याने सहज जगभरात दिसली. गुरू आणि शुक्र हे पुन्हा इतके जवळ यायला अणि सुर्यास्तानंतर दिसायला साधारण १०० वर्षे वाट पहावी लागेल असे गणित खगोलशास्त्रज्ञांनी मांडले आहे. दुर्दैवाने आमच्याकडे मान्सूनचे ढग आल्याने ३० जूनला फोटो काढता आला नाही, पण मिनिटभर का होईना डोळ्यांनी युती पाहता आली, १ जुलैला रात्री उशीरा आकाश मोकळे झाल्यावर मला फोटो घ्यायची संधी मिळाली. हा फोटो गुरू क्षितीजापासून ४ अंशावर असताना घेतला आहे. चंद्राप्रमाणे शुक्राच्याही कला दिसतात, वरील फोटोत काळजीपूर्वक पाहिल्यास शुक्राची कला दिसेल. त्याशिवाय गुरूजे चार मोठे चंद्रही (ज्याला गॅलिलीअन मून्स असं म्हणतात) गुरूच्या डाव्या बाजूला दिसत आहेत. (ज्यांना गॅलिलीअन मून्स असं म्हणतात)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शुक्राच्या कलेमुळे फोटूला 'चार चाँद' लागलेत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छानच!

शुचि, या युतीचा अर्थ काय? गुरू आणि शुक्राची युती! अगदीच 'अय्या/इश्श मोमेंट' ए का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुरु/बृहस्पती हा देवांचा गुरु आणि शुक्र/भार्गव हा दानवांचा. यांची युती झाली असता असे भाकित निघते की मा.ना.छगन भुजबळ यांच्यावरचे आरोप लवकरच मागे घेतले जातील. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin

ओह! मला वाटलं शुक्र म्हंजे रोम्यांटिक नी गुरू म्हंजे तपस्वी सो रंभा-विश्वामित्र मोमेंट म्हणायची की काय? Tongue Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता वाचलं -

Some are calling this "The Star of Bethlehem" conjunction because Jupiter and Venus did something similar near the star Regulus in 3/2BC. Many astronomers have speculated that this ancient celestial event is the one recorded in the Bible's Gospel of Matthew.
_____
चला तर मग ऐसीकडून कोणते ३ वाइज मेन निघणारेत या युतीचे फलीत पहायला? अन फक्त मेन का वीमेन ही धरा.

पण जाऊ दे इथे ज्योतिष नको Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाईल - धन्यवाद.

गुरुचे चंद्र मस्त दिसतायत.

शुक्राची कला मात्र दिसली नाही ( म्हणजे कळली नाही )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो फारच छान. चंद्र अगदी स्पष्ट दिसत आहेत. तुम्ही अशीच लेखमाला चालू ठेवून त्यांत फोटोसहित सर्व नक्षत्रांची माहिती दिलीत तर एक वाचनखूण साठवण्यासारखी लेखमाला तयार होईल. भल्या मोठ्या आकाशांत जेंव्हा, तज्ञ अशी नक्षत्रे दाखवतात तेंव्हा, कित्येकदा न दिसूनही हो,हो, करावे लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. जवळ??? म्हणजे बहुतेक इथून पाहणाराच्या दृष्टीने. तसे ते यापेक्षाही जवळ येत असणार.
२. "आमच्याकडे" मान्सून??
३. क्षितीजापासून बर्‍यापैकी वर??? आकाशातली कुठलीही घटना रात्री अर्ध्या पृथ्वीला दिसेलच.
४. मिनिटभर का होईना ??? आपले सगळे सूर्यमालेतले ग्रह उपग्रह विषुववृत्तआच्या आजूबाजूच्या एका बँडमधे फिरतात. बहुतेक सगळे एकाच दिशेने. युति एकूण किती मिनिटे होती असे म्हणता येईल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाईल उत्तरे देईलच काही मला सहज सुचलेल्या गोष्टी देतोयः

. क्षितीजापासून बर्‍यापैकी वर??? आकाशातली कुठलीही घटना रात्री अर्ध्या पृथ्वीला दिसेलच.

अर्ध्या? खरंतर १/४ दक्षिण गोलार्धातील आकाश वेगळे असते. दुसरे असे की शुक्र फार काळ क्षितीजाच्या बर्‍यापैकी वर दिसत नाही. सुर्यास्तापाठोपाठ काही तासांत (जास्तीतजास्त) शुक्र मावळतो. शिवाय फार क्षितीजालगतच्या गोष्टी संधीप्रकाश, इमारती वगैरेंमुळे दिसतीलच असे नव्हे.

४. मिनिटभर का होईना ??? आपले सगळे सूर्यमालेतले ग्रह उपग्रह विषुववृत्तआच्या आजूबाजूच्या एका बँडमधे फिरतात. बहुतेक सगळे एकाच दिशेने. युति एकूण किती मिनिटे होती असे म्हणता येईल

युती कितीही असो. ढगांमुळे त्यांना ती मिनीटभरच बघता आली असा मी अर्थ घेतला

जवळ??? म्हणजे बहुतेक इथून पाहणाराच्या दृष्टीने. तसे ते यापेक्षाही जवळ येत असणार.

आँ? म्हणजे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या सेलेस्टियल घटनेचा नाईलने अर्थातच समजून उमजून आनंद घेतला आहे/असावा. ही बातमी अनेक माध्यमांत व्यापकपणे आली तेव्हा मला तिचा तितका नीट (म्हणजे फोटो इ सोडून) आनंद घेता आला नाही. म्हणून मी मनात आलेले प्रश्न लिहिले आहेत.
१. क्षणभर सारे ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला, एका रेषेत, आले आहेत असे मानले (सुलभीकरणाकरिता सूर्यमालेची मॉडेल्स शाळेत इ ठेवतात तसे.) तर शुक्र आणि गुरु पृथ्वीच्या दोन ऑपोझिट हातांना आहेत. ते जवळ दिसणे असंभव आहे. शुक्र सूर्याच्या अलिकडे नि गुरु पलिकडे किंवा दोघेही पलिकडे असले नि पृथ्वी-शुक्र-गुरु यांतून रफली सरळ रेष जात असली तर ते "पृथ्वीवरून" जवळ दिसतील. पृथ्वी त्या दोघांच्या सरळ रेषेत नसताना देखिल ते जवळ येतच असतील. शिवाय या दोन्ही वेळी मधे सूर्य असेल, तेव्हा दिसणे कसे शक्य आहे? सूर्यमालेचे सर्वसाधारणपणे एक प्रतल आहे, त्यात प्रत्येक ग्रहाच्या थोड्या कललेल्या कक्षा आहेत म्हणून सत्कृतदर्शनी हा प्रश्न साहजिक आहे.
२. क्षितिजाचा उल्लेख नाईलने का केला ते जाणून घेतले पाहिजे. त्याच्या स्वतःच्या लोकेशनच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असू शकतं पण त्यामुळे ही घटना पृथ्वीसाठी रेअर ठरत नाही. उदा. सूर्य वा चंद्र माझ्या क्षितिजावर असताना त्यांच्यासोबत अशी घटना घडत असली तरी ते पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागाच्या डोक्यावर असतील.
३. युती किती वेळ होती असा प्रश्न मी विचारला आहे. किती मिनिटे मिस झाली असं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोंना काय म्हणायचे आहे ते अनेकदा वाचूनहि मला कळले नाही.

दोन अथवा अन्य ग्रहांची (वा अन्य आकाशस्थ गोलांची) 'युति' म्हणजे पृथ्वीवरून आपल्या डोळ्यांना दिसणारी त्यांची स्थिति पुरेशी जवळ असणे. अशा वेगवेगळ्या आकाशस्थ गोलांच्या युति वेळोवेळी होत असतात. सध्या काही दिवस गुरु आणि शुक्राच्या पृथ्वीवरून दिसणार्‍या जागा एकमेकांपासून जवळ आहेत इतकाच ह्या युतीच अर्थ. त्रिमिति अंतरालामधील त्यांच्या खर्‍या जागा एकमेकांपासून खूपच दूर आहेत. शुक्राच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेची 'त्रिज्या' आणि गुरूची तशीच 'त्रिज्या' ह्यांच्यामध्ये शेकडो पटींचा फरक आहे आणि पृथ्वीवरून ते कितीहि 'जवळ' दिसले तरी प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये फार मोठे अंतर आहे.

आपणाला आता कोपर्निकन खगोल माहीत असल्याने आपण हे सांगू शकतो. प्राचीन कालात हे ज्ञान नसल्याने आकाशातील युति म्हणजे दोन्ही गोल एकमेकांपासून खरेच खूप जवळ आले आहेत असे भासत असे आणि त्यावरून अनेक कथा, मिथके, भविष्यवाण्या निर्माण केल्या गेल्या. अशा युतीला ती पृथ्वीवरून दिसते हेच महत्त्वाचे आहे. तसे पाहिले असता कोणत्याही दोन गोलांची 'युति' अवकाशामधून प्रत्येक क्षणाला कोठे ना कोठेतरी दिसत असणारच. ती युति 'पाहण्यासाठी' आपल्याला त्यांच्यामधून जाणार्‍या सरळ रेषेवर अंतराळात जाऊन उभे राहिले म्हणजे झाले. ह्यामध्ये मोठीच अडचण अशी आहे की असा अंतराळातील 'viewing platform' आपल्याला उपलब्ध नाही. आपल्याला एकच 'viewing platform' उपलब्ध आहे, तो म्हणजे पृथ्वी. तो 'viewing platform' अंतराळातून त्याच्या इच्छेने घुमत असतांना त्या सरळ रेषेवर येईल तेव्हाच आपणास ती युति दिसेल. अशा घटना रोजरोज होत नसल्याने त्या युतीचे आपणासारख्या पृथ्वीवर राहणार्‍यांना अप्रूप असते इतकेच.

दोनच काय अशा आठ-आठ ग्रहांच्या युतीहि झालेल्या आहेत. 'अष्टग्रही' आणि तिच्याशी संबंधित उद्रेकांची भाकिते आपण आपल्या आयुष्यात केव्हा ना केव्हातरी अनुभवलेली असतात. भारतीय ज्योतिषात अशी समजूत आहे की ज्या दिवशी चंद्रसूर्य धरून सर्व ग्रह रेवती तार्‍याशी (Zeta Piscium) युतीमध्ये होते आणि राहु हा काल्पनिक ग्रह (खरे पाहता अंतराळातील बिंदु, चन्द्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एकमेकांस छेदतात ते दोन बिंदु म्हणजे राहु आणि केतु) बिंदु रेवतीपासून १८० अंशावर होता त्या दिवशी कलियुग सुरू झाले आणि भारतीय युद्धाची समाप्ति झाली. गणिताने हा दिवस फेब्रुअरी १८, ३१०२ ख्रिपू असा शोधण्यात आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"जवळ" या नाईलच्या लेखातल्या मूळ शब्दाबद्दल त्याला, तुम्हाला नि मला नक्की म्हणायचं आहे ते वर तुम्ही कळायसारख्या भाषेत मांडलं आहे.

पृथ्वीवरून आपल्या डोळ्यांना दिसणारी त्यांची स्थिति पुरेशी जवळ असणे.

हेच म्हणायचं होतं ना अशी माझी चौकशी होती. ही भागली.

"सर्वसाधारणपणे" सारे ग्रह एकाच प्रतलात सूर्याभोवती गोल फिरतात (आपल्या जीपीस सॅटेलाईटस सारखे क्रिस क्रॉस फिरत नाहीत). म्हणून युत्या फार रेअर नसायला हव्यात. ही प्रतले, काल्पनिक सामयिक प्रतलापासून्, थोडी थोडी (५ ते १० डीग्री?) कललेली आहेत तेव्हा सूर्यप्रदक्षिणा वेगवेगळ्या गतीने घालणार्‍या ग्रहांचे टेकओवर खूपच कॉमन असणार. यात या विशिष्ट घटनेत रेअर काय अशी दुसरी चौकशी होती.

अंततः एक प्रश्न आहे. सूर्यमालेच्या प्रतलात सूर्य, शुक्र, पृथ्वी, गुरु यांची रिलेटिव पोझिशन अशी आहे कि शुक्र आणि गुरु यांची युति असताना पृह्वीकरांसाठी सूर्यप्रकाश नेहमीच मधे कडमडेल. ती युती पृथ्वीवरून दिसतेय आणि सूर्यप्रकाशाचा त्रास नाही अशी पोझिशन मी कल्पू शकत नाहीए. ही तिसरी चौकशी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. इतर कोनातून का जवळ दिसणार नाहीत? इथे पहा म्हणजे कळेल.

२. क्षितिजाचा उल्लेख नाईलने का केला ते जाणून घेतले पाहिजे. त्याच्या स्वतःच्या लोकेशनच्या दृष्टीने ते महत्त्वाचं असू शकतं पण त्यामुळे ही घटना पृथ्वीसाठी रेअर ठरत नाही. उदा. सूर्य वा चंद्र माझ्या क्षितिजावर असताना त्यांच्यासोबत अशी घटना घडत असली तरी ते पृथ्वीच्या कोणत्या ना कोणत्या भागाच्या डोक्यावर असतील.

जेव्हा गोष्टी क्षितीजापासून खूप जवळ असतात तेव्हा त्या बघताना तुम्हाला 'जास्त' वातावरणातून पहावे लागते. शिवाय, दिव्याचे खांब, गाड्यांचे दिवे वगैरेंमुळे 'दिसण्याचे' (seeing) अजून नूकसान होते. म्हणून क्षितीजापासून जवळ असल्यास अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी सहसा टाळली जाते. थोडक्यात, एखाद्याने माझ्याच आसपास पण अर्धा-पाऊणतास आधी फोटो काढल्यात तो जास्त चांगला दिसेल. म्हणून उल्लेख. (ढगांमुळे मला ते जमले नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

१. याहीपेक्षा म्हणजे कळले नाही. दोन ग्रहांमधील वास्तव अंतर याचा इथे थेट संबंध नाही. त्यांच्या ठराविक परिवलनामुळे ते पृथ्वीवरून आपल्याला असे जवळ दिसतात. एरवी त्यांच्यामधील (पृथ्वीच्या आकाशातील) अंतर पुष्कळ जास्त असते, म्हणून युती.
२. हो, आमच्याकडेही मान्सूनचे वारे येतात. अर्थात भारताकडून नव्हे.

क्षितीजापासून बर्‍यापैकी वर??? आकाशातली कुठलीही घटना रात्री अर्ध्या पृथ्वीला दिसेलच

नाही. काही घटना भर दिवसा घडतात त्यामुळे कुठलीही घटना अर्ध्या पृथ्वीला दिसेलच असे नाही. उदा. समजा एखादा धूमकेतू सुर्याकडे झेपावत आहे आणि सुर्याच्या अगदी जवळ आहे. तो एक वेगळा मुद्दा, पण तुमचा एकंदरीतच गोंधळ झालेला दिसतो. (जवळपास कुठे स्टार चार्ट मिळाल्यास घ्या, म्हणजे बेसिक गुंता सुटेल असे वाटते.)

मिनिटभर का होईना ??? आपले सगळे सूर्यमालेतले ग्रह उपग्रह विषुववृत्तआच्या आजूबाजूच्या एका बँडमधे फिरतात. बहुतेक सगळे एकाच दिशेने. युती एकूण किती मिनिटे होती असे म्हणता येईल?

३० जूनची युती जवळजवळ २-२.५ तास दिसली. त्या आधी आणि नंतर दोन ग्रहांमधले अंतर जास्त होते आणि ते बदलत होते, त्यामुळे आज रात्री दिल्लीतही युती दिसेल, पण अंतर ३० जूनपेक्षा जास्त असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

क्षितिजाचा मुद्दा कळला. धन्यवाद.
-------------------------------------------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गॅलिलेओने जेव्हा सर्वप्रथम गुरूचे चन्द्र आपल्या नव्याने शोधलेल्या दुर्बिणीतून पाहिले तेव्हा त्याला एक कल्पना सुचली, जी त्या काळातील एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आहे असे त्याला वाटले. त्याच्याच काळात युरोपातील देशोदेशीचे दर्यावर्दी जलमार्गाने जगभर प्रवास करू लागले होते. कोलंबस आणि वास्को दा गामा ह्यांचे इतिहास बदलणारे प्रवास १५व्या शतकाच्या अखेरीस झाले होते. अशा प्रवासामध्ये नेहमी जाणवणारी अडचण म्हणजे भर समुद्रावर आपले स्थान निश्चितपणे कळणे. सूर्य आणि अन्य तार्‍यांच्या उगवण्या-मावळण्यावरून आपल्या स्थितीचे अक्षांश निश्चित करणे अवघड नव्हते पण रेखांश ठरविणे ही मोठीच समस्या होती. त्यावरचे एक सहज सुचणारे उत्तर म्हणजे एका विवक्षित स्थानाच्या वेळेच्या तुलनेने आपली स्थानिक वेळ किती पुढे अथवा मागे आहे हे निश्चित समजले तर पृथ्वी दर चार मिनिटांनी आपल्या दैनन्दिन भ्रमणाचा एक अंश पुरा करते ह्यावरून आपल्या स्थानाचे रेखांश ठरविता येतात. मात्र ह्यासाठी त्या विवक्षित स्थानाची चालू वेळ काय आहे हे निश्चितपणे माहीत पाहिजे आणि खरी गोम येथेच होती कारण त्या विवक्षित स्थानाची चालू वेळ सांगणारे घडयाळ कसे बनवायचे हे अद्यापि कोणाला सुचलेच नव्हते, किंबहुना वाळू, पाणी, मेणबत्त्या ह्याखेरीज वेळ सांगणारा कोणताच सोपा मार्ग उपलब्ध नव्ह्ता.

ह्यावर गॅलिलेओने जो तोडगा सुचविला होता तो गुरूच्या चार चन्द्रांवर आधारित होता. ह्या चन्द्रांना आळीपाळीने 'ग्रहणे' लागतात. ते गुरु ग्रहाभोवती भ्रमण करतांना गुरूच्या बिंबामागे जातात आणि काही काळाने दुसर्‍या बाजूमागून बाहेर पडतात. ही ग्रहणे पृथ्वीच्या कोणत्याहि भागावरून पाहता येतात.

अशा ग्रहणांच्या वेळांची एका विवक्षित स्थानाच्या वेळेची कोष्टके बनवून प्रत्येक जहाजावर त्या कोष्टकांचे पुस्तक ठेवायचे. ज्या जागेचे रेखांश काढायचे आहेत तेथे गुरूच्या चन्द्राचे ग्रहण पाहून त्याची स्थानिक वेळ आकाशस्थ गोलांच्या वेधावरून निश्चित करायची. हेच ग्रहण त्याच वेळी मूळच्या विवक्षित स्थानीहि दिसत असणार. त्या विवक्षित स्थानाची वेळ कोष्टकावरून शोधायची. स्थानिक वेळ आणि विवक्षित स्थानाची वेळ ह्यातील फरक काढला की ४ मिनिटे = १ रेखांश अशा हिशेबाने स्थानिक जागा विवक्षित जागेच्या तुअलनेत किती अंश पूर्वेला वा पश्चिमेला आहे हे सांगता येईल.

समुद्रामुळे होणारी जहाजाची हालचाल, स्थानिक उष्णतामान इत्यादींचा परिणाम न होता ग्रीनिच टाइम निश्चित दाखविणारे मरीन क्रोनोमीटर १७३०पसून वापरात आल्यावर ही आणि रेखांश ठरविण्याच्या अशाच अन्य गुंतागुंतीच्या पद्धती विस्मरणात गेल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समुद्रामुळे होणारी जहाजाची हालचाल, स्थानिक उष्णतामान इत्यादींचा परिणाम न होता ग्रीनिच टाइम निश्चित दाखविणारे मरीन क्रोनोमीटर १७३०पसून वापरात आल्यावर ही आणि रेखांश ठरविण्याच्या अशाच अन्य गुंतागुंतीच्या पद्धती विस्मरणात गेल्या.

माह्त्त्वाची माहिती, आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शुक्राची कला दिसण्याकरता फोटो जरा झूमकरून शुक्राला पहा. तुम्हाला संपूर्ण गोल ग्रह न दिसता एकाबाजूचा तुकडा खाल्ल्यासारखा दिसेल. वरील फोटो झूम करून खाली चिकटवत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

झक्कास फोटो आहेत! आणि गुरूचे उपग्रहदेखील सुंदर!
पण फोटो कसा घेतला? म्हणजे नुसत्या SLRने की टेलिस्कोपला जोडून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डीएसएलाअर टेलिस्कोपला जोडून. दोन ग्रह ५०x मॅग्निफिकेशनला एकाच 'व्ह्यू' मध्ये दिसणं याचंच जरा अप्रूप. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

फोटो उत्तम. पण शुक्र त्यात असा पसरलेला का दिसतोय? शुक्राच्या तबकडीवर क्रोमॅटिक अॅबरेशनही दिसतंय. भिंगाची दुर्बिण वापरली का ही कॅमेऱ्याची 'करामत'?

३० जूनला आमच्याकडेही ढग होते त्यामुळे निराशा झाली. पण १ जुलैला आकाश बऱ्यापैकी स्वच्छ होतं. रात्री एका ठिकाणी आम्ही जेवायला गेलो होतो तिथून बाहेर पडताना उगाच त्या दोघांकडे बोटं दाखवून मराठीत असंबद्ध बोलत उभे राहिलो. चार लोक आजूबाजूला जमा झाले आणि लगेच आम्ही एक छोटेखानी भाषण देऊन मोकळे झालो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लाँग एक्स्पोझर आणि अल्टीट्यूड मुळे पसरल्या सारखा दिसतोय. १/१०० एक्स्पोझरमध्ये कला व्यवस्थित दिसत होती. रंग बहुतेक कॅमेर्‍याचीच करामत असावेत. किंवा स्ट्रे लाईट, नीट पाहिल्यास दिव्याच्या खांबांमुळे आलेला 'लेन्स फ्लेअर' सुद्धा दिसतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile


आकृतीत (सपाट नकाशा मानून) पृथ्वीवरच्या वायव्येकडच्या (म्हणजे अंधारातल्या) लोकांना शुक्र आणि गुरु यांचे आग्नेयेकडचे (प्रकाशित) भाग जवळ दिसत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी ही युती तीस जूनलाच पाहिली .फोटो मिळवलात याला शंभर गुण.आरशाची दुर्बिण असली तर त्याचा आइपिस कॅम्रय्राच्या तोडीचा नसतोच.परंतू C 8 वगैरे परदेशी दुर्बिण असल्यास अथवा कॅनन निकॅान 400mm lens असल्यास फोटो उत्तम मिळण्याची अपेक्षा धरू शकतो.

एक प्रश्न -क्रिकेट चे चित्रिकरण करणाय्रांकडे १०००mm lens चे कॅम्रे असतात ते एरवी असा फोटोंसाठी क्लबवाले बाहेर का काढत नाहीत? उगाच कुजवतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरशाची दुर्बिण असली तर त्याचा आइपिस कॅम्रय्राच्या तोडीचा नसतोच.

खरंतर आपले डोळे कॅमेर्‍याच्या तोडीचे नसतात. चांगले आयपीस विकत घेतात येतात, थोडे महाग असतात पण त्याकरता 'महाग दुर्बिणच' घ्यायला हवी असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

कुंडलीत गुरु शुक्र युती असता शुभफलदायक असते असे फलज्योतिष सांगते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

दर दोन वर्षांत दोन महिने या युतीवर जातक जन्म घेतील ना ? यावेळेस क्रांति तीन अंशात आणि शर जवळपास सारखाच हे विशेष होते नाही का? सर्वात कमी संख्या या तीन दिवसात काय दाखवली आहे पंचांगात ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतरः

या जुलै महिन्यात दोन पौर्णिमा (उर्फ ब्लू मून) आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो.१५ जून ते१६जुलै रवि मिथुनेत असतांना दोन अमावस्या आल्या -१६ जून आणि १६ जुलै.म्हणूनच अधिक महिना आला. १६ जूनचा अधिक आषाढ आणि १६ जुलैपासून निज आषाढ लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल फायरवर्क चालू असताना, अन न्यु यॉर्कची झगमगती स्कायलाइन दिसत असतानाही, एक अत्यंत लोभस, तेजस्वी चांदणी पाहीली. नक्की शुक्राची असावी. फायरवर्क फिक्कं पडलेलं होतं.अपूर्व चमकत होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0